Friday, March 6, 2020

गहिनीनाथगडाचे मठाधिपती ह.भ.प. पुंडलिक महाराजांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी.

*पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना*

बीड दि.६ (प्रतिनीधी ) संत वामनभाऊ महाराजांचे विचार पुढे घेऊन जात समाजाला एक नवी दिशा देणारे गहिनीनाथ गडाचे मठाधिपती ह.भ.प. पुंडलिक महाराज यांच्या निधनाने बीड जिल्हयाच्या अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशा शब्दांत शोकभावना व्यक्त करून पंकजाताई मुंडे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
संत वामनभाऊ महाराज यांच्यानंतर ह.भ.प. पुंडलिक महाराज यांनी गहिनीनाथ गडाचे मठाधिपती म्हणून काम पाहिले. वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेत त्यांनी किर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून संत वामन भाऊंचे विचार सर्व जन माणसांत रूजविले. समाजातील वाईट रूढी, परंपरांना तिलांजली देण्याचे तसेच अंधश्रद्धे पासून दूर राहण्याचे आवाहन ते नेहमी आपल्या प्रवचना तून करत. समाज प्रबोधना बरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचे कार्य मोलाचे होते, त्यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

No comments:

Post a Comment