Tuesday, June 30, 2020

अंबाजोगाईतील ‘त्या’ २८वर्षीय तरूणाचा कोरोणामुळे मृत्यू.

अंबाजोगाई;-(प्रतिनीधी ) भावाकडे आलेला उस्मानाबाद जिल्ह्यातील२८वर्षीय तरुणकोरोणापाँझिटीव्हशुक्रवारी(दि.२६)निष्पन्न झाले होते.या तरुणाचा अंबाजोगाई येथीलस्वा.रा.ती.रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.
मुळचा गिरवली (ता.भुम)जि.उस्मानाबाद येथील हा तरूण ट्रकचालक होता.त्याचा भाऊ अंबाजोगाई शहरातील आनंदनगर भागात राहतो हा तरुण मागील आठवड्यात त्याच्या भावाकडे आला होता.सर्दी आणि ताप सुरु असल्याने दुसरया दिवशी अंबाजोगाई शहरातील एका खाजगी रूग्णालयात गेला होता,डॉ क्टरांना शंका आल्याने त्याला शासकीय रुग्णालयात पाठविले,तिथे त्याचा थ्रोट स्वँब तपासला असता तो कोरोणा पाँझिटिव्ह असल्याचे आढळून आले.त्यानंतर त्याच्यावर अंबाजोगाईच्या स्वा.रा.ती रूग्णालयात उपचार सुरु होते आज मंगळवारी दुपारी त्या तरूणाचा मृत्यू झाला.

दूरदर्शनची टीम क्वरंटाइन.शासकीय महापूजेच्या थेट प्रक्षेपणावर प्रश्नचिन्ह.

सोलापूर : (प्रतिनीधी ) श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यासाठी आलेल्या दूरदर्शनच्या टीममधील एका व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे संपूर्ण पथकाला क्वरंटाइन करण्यात आले आहे. नव्याने दाखल होणा-या पथकाचे स्वॅब घेतले जाणार आहेत. त्यामुळे लाइव्ह प्रक्षेपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत  मध्यरात्री होत आहे. या सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यासाठी दूरदर्शनची सहाजणांची टीम सोमवारी पंढरपुरात दाखल झाली होती. या सर्वांची राहण्याची एकत्रित व्यवस्था करण्यात आली होती. प्रशासनाने सोमवारी त्यांची स्वॅब टेस्ट घेतली.मंगळवारी सकाळी यातील एकाचा स्वॅब टेस्ट पॉझीटिव्ह आली. त्यामुळे उर्वरित पाच जणांना भक्तनिवासात क्वरंटाइन करण्यात आले. पुणे, मुंबईतून नवी टीम येत आहे. ही टीम सायंकाळी चारपर्यंत पंढरपुरात दाखल होणार आहे. पंढरपुरात आल्यानंतर या सर्वाचे स्वॅब घेण्यात येतील. स्वॅब रिपोर्ट आल्यानंतरच त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. शासकीय महापूजेचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभार्याजवळ कॅमेरे लावले जातात. यासाठी दोन तीन तासांचा कालावधी लागतो. या पार्श्वभूमीवर लाइव्ह प्रक्षेपणाची तयारी होईल की नाही यावरुन जिल्हा प्रशासनाची यंत्रणाही बुचकाळ्यात पडली आहे.

दिव्य मराठी वृत्तपत्राच्या विरोधातील गुन्हे मागे घ्या.या मागणीसाठी .परळी पत्रकार संघाचे तहसिलदार यांना निवेदन.


परळी वैजनाथ ;- (प्रतिनिधी)
औरंगाबाद येथे कोरोना संदर्भात सत्य लिखाण करत प्रशासनाच्या चुका चव्हाट्यावर मांडल्यानंतर आपले अपयश झाकण्यासाठी प्रशासनाने दिव्य मराठीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रशासकीय यंत्रणेचा परळी पत्रकार संघाच्या वतिने निषेध करण्यात येवुन हे गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
औरंगाबाद महानगर भागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना या पार्श्वभुमीवर प्रशासनाचा निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा बाबत दैनिक दिव्य मराठीने सत्य परिस्थिती मांडल्यानंतर प्रशासनाने वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याच्या हेतूने व आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने दैनिकाचे संपादक, प्रकाशक व वार्ताहरावरच गुन्हे दाखल केले आहेत.प्रशासनाच्या या मुजोरपणाचा जाहीर निषेध करीत दैनिका विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे पोलिस प्रशासनाने तात्काळ मागे घेण्यात यावी व या कार्यपद्धतीत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत तहसिलदार यांना निवेदन दिले.या निवेदनावर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनंत गित्ते,शहराध्यक्ष संभाजी मुंडे,कार्याध्यक्ष धीरज जंगले,ओमप्रकाश बुरांडे,प्रशांत प्र.जोशी,शिवशंकर झाडे,आत्मलिंग शेटे,रानबा गायकवाड यांच्यासह प्रा.रविंद्र जोशी(दै.पुढारी),प्रा.प्रविण फुटके (दै.सकाळ),धनंजय आरबुने(दै.पुण्य नगरी),धनंजय आढाव (दै.दिव्य मराठी),जगदिश शिंदे (दै.आदर्श गावकरी),दत्तात्रय काळे(दै.मराठवाडा साथी),स्वानंद पाटिल (दै.सामना),महादेव गित्ते(सायं.दै.अभिमान),माणिक कोकाटे(दै.आनंद नगरी),गणेश आदोडे(सायं.दै.सरकार),शेख बाबा(दै.जंग),संजीव रॉय (सुदर्शन न्युज),संतोष जुजगर (सायं.दै.रणझुंजार),सुकेशनी नाईकवाडे (एच.एम.न्युज),इंजि.भगवान साकसमुद्रे,बालाजी ढगे (दै.बीड नेता),प्रा.दशरथरोडे(जनसन्मान),सेवकराम जाधव,अंबाजी मुंडे,सुरेश जाधव आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
@@@@@
तीव्र आंदोलन छेडु-संभाजी मुंडे
मागील काही महिन्यामध्ये पत्रकारांवर हल्ले करण्याबरोबरच गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे.यामुळे पत्रकारांचे जीवन असुरक्षीत बनले आहे.पत्रकारांना शस्त्र परवाने द्यावेत.दिव्य मराठीसह इतर पत्रकारांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा .

राज्यात शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचा बाह्य रुग्ण विभाग २४ तास सुरु करण्याच्या हालचालीस झाली सुरुवात.

* वर्ग १ ते वर्ग ४ श्रेणीची पदे भरण्यासंदर्भात शासनाने मागवला प्रस्ताव. प्रस्ताव आल्यानंतरच घेतला जाईल निर्णय.

बीड ;- (प्रतिनीधी ) राज्यातील शासकीय रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग २४तास सुरु ठेवण्याच्या हालचाली वरीष्ठ पातळीवर सूरु करण्यात आल्या असून याबाबत वर्ग १ ते वर्ग ४ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या आवश्यक पद निर्मिती संदर्भातील माहिती वैद्यकीय शिक्षण व सशोधन विभागाच्या संचालकांनी एक परिपत्रक काढून संबंधितांकडुन मागवली आहे.
याबाबतचा अधिक तपशील असा की, लातुर जिल्हा काँग्रेसचे सचीव बिभीषण सांगवीकर यांनी ७ मार्च २०२० रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख यांना एक निवेदन देवून राज्यातील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्यरुग्ण विभाग २४ तास सुरु करण्यात यावेत अशी मागणी केली होती. या निवेदना संदर्भात गांभीर्याने विचार करुन राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांनी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना २९जून २०२० रोजी एक परिपत्रक पाठवून वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग २४ तास सुरु करण्यासाठी वर्ग १ ते वर्ग ४ श्रेणीतील किती कर्मचाऱ्यांची व वैद्यकीय अधिकारी यांची पदे निर्माण करण्याची आवश्यकता असुन त्यांच्या वेतनावर किती अनावर्ती खर्च अपेक्षित आहे, याबाबतचा प्रस्ताव तयार करून अधिष्ठातांच्या अभिप्रायासह राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांडे पाठवावा असे सुचीत केले आहे. संबंधित अधिष्ठातांच्या प्रस्ताव या विभागाकडे आल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचा बाह्यरुग्ण विभाग २४ तास सुरु करण्या बाबतची पुढील कार्यवाही करणे शक्य होईल, असे या परीपत्रकात म्हटले आहे. या परिपत्रकावर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या

जिल्हाधिकार्‍यांनी केले माजलगावचे नगराध्यक्ष पद रिक्त.

माजलगाव;-  (प्रतिनीधी ) गेल्या तीन महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळापासून माजलगाव नगर पालिकेत गैरहजर असलेले नगराध्यक्ष सहाल चाऊस यांचे पद रिक्त केल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी घोषीत केले असून याबाबतचा आदेश मुख्याधिकार्‍यांना पाठवण्यात आला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गेल्या काही महिन्यापासून नगराध्यक्ष सहाल चाऊस हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. माजलगाव नगरपरिषद बरखास्त करण्यासाठी आ.प्रकाश सोळंकेंनी गेल्या काही दिवसापासून आपली प्रतिष्ठापणाला लावलेली असताना हा निकाल लावला असून जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षची बरखास्ती प्रकरण राज्यात हे एकमेव असेल.
माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या विरोधात माजलगाव नगरपरिषदेतील नगरसेवकांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे अविश्‍वासाचा प्रस्ताव दाखल केलेला होता. जिल्हाधिकार्‍यांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती. मात्र जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षावर असा अविश्‍वास आणता येत नसल्याचे आदेश सहाल चाऊस यांनी औरंगाबाद खंडपीठाकडून आणले. त्यानंतर हि सभा रद्द झाली. याप्रकरणी उपनगराध्यक्ष सुमन मुंडे यांनी २७ मे रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज करून नगराध्यक्षांचा पदभार उपनगराध्यक्षांकडे देण्यात यावा अशी मागणी केली. यामध्ये त्यांनी नगराध्यक्ष ४ मार्चपासून अटकेत असल्याचे कारण दिले. तीन महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ नगराध्यक्ष गैरहजर असल्यास ते बरखास्तीस पात्र ठरतात. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत अधिनियम १९६५ चे कलम ५६(१), (२), (३) या कलमाच्या आधारावर आणि कलम ५७(२) नुसार नगराध्यक्ष पदभार उपनगराध्यक्षांकडे देण्यात यावा अशी विनंती उपनगराध्यक्ष मुंडे यांनी केली होती. जिल्हाधिकार्‍यांनी या अर्जास तत्वत: मान्यता दिली आहे. मात्र नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्षांकडे देण्यात यावा असे स्पष्टपणे म्हटले नाही. परंतू हे पद रिक्त असल्याचे जाहिर केले असून जिल्हाधिकार्‍यांनी नगराध्यक्षपद रिक्त करताना महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत अधिनियम १९६५ चे कलम ५६(३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे माजलगावचे नगराध्यक्ष पद सध्या रिक्त असून तसा आदेश मुख्याधिकार्‍यांना पाठवण्यात आला आहे. रिक्त पदाबाबतची माहिती निवडणूक आयोगाला कळवावी असेही मुख्याधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे.

एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांच्या बदल्या.

* बदली आदेशानंतर तीन दिवसात रुजू व्हा नसता सेवा समाप्त.जिल्हधिकारी राहुल रेखावार .

बीड;-  (प्रतिनीधी ) जिल्हा रोजगार हमी योजने अंतर्गत विविध शासकीय कार्यालयामध्ये प्रकल्प अधिकारी, तांत्रिक सहाय्यक ठाण मांडून बसलेले आहेत. याठिकाणी अनेक अधिकारी आणि कर्मचारी आपले हितसंबंध जोपासत वलय निर्माण केले होते. या सर्वांच्या काल जिल्हाधिकार्‍यांनी बदल्या केल्या असून त्यांना तात्काळ बदली झालेल्या ठिकाणातून इतर ठिकाणी रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ३७ प्रकल्प अधिकारी, ७० तांत्रिक सहाय्यक आणि २२ संगणक चालकांचा समावेश आहे. या सर्वांच्या एकाचवेळी जिल्हाधिकार्‍यांनी बदल्या केल्यामुळे हितसंबंध उतलेल्या अधिकारी कर्मचार्‍यांनी आपली राजकीय वसेलीबाजी लावत बदली रद्द करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
जिल्ह्याच्या जिल्हा नरेगा कक्ष, पंचायत समित्या, तहसिल कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, वनीकरण विभाग याठिकाणी प्रकल्प अधिकारी, कंत्राटी अभियंते आणि संगणक परिचालक यांनी ठाण मांडले होते. राजकीय पदावरील व्यक्तींसोबत संगनमत करत अनेक सरपंच, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य यांना हाताशी धरत त्यांनाही माल कमवून देणे आणि स्वत:ही माल कमवणे अशा भुमिकेतून या सर्वांची कार्यपध्दती चालु होती. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निवडणूक कामाचा व्याप संपल्यानंतर लागलीच कोरोना या महाभयंकर आजारामुळे त्यांना आपला बराचसा वेळ कोरोना नियंत्रणासाठी घालावा लागला. गेल्या आठवड्यात थोडीशी उसंत मिळाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा रोजगार हमी योजनेकडे वळवला. याठिकाणी गेल्या दहा वर्षापासून अनेक सहाय्यक प्रकल्प अधिकारी, कंत्राटी अभियंते आणि संगणक परिचालक ठाण मांडून बसले होते. अशा सर्वांच्या बदल्या या तालुक्यातून त्या तालुक्यात आणि एका कार्यालयातून दुसर्‍या कार्यालयात केलेल्या आहेत. त्यामुळे ३७ प्रकल्प अधिकारी, ७० कंत्राटी अभियंते, २२ संगणक चालक यांना बदली झाल्याच्या आदेशापासून तीन दिवसाच्या आत बदलीच्या ठिकाणी पदभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जर तीन दिवसात बदली कर्मचार्‍यांनी आपला पदभार स्विकारला नाही तर त्यांची कंत्राटी सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल असेही बदली आदेशात रेखावार यांनी म्हटले आहे.
----

राज्य शासनाच्या संतप्त चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे राजव्यापी आंदोलन .

* काळ्या फिती लावून केले काम .१०० टक्के कर्मचा-यांचा आंदोलनात सहभाग.
मुंबई : (प्रतिनीधी ) महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांनी राज्यव्यापी आंदोलनाला प्रारंभ केला असून आजपासून काळ्या फिती लावून काम सुरू केले आहे. त्याचबरोबर दुपारच्या सुट्टीत मुंबईतील ५ आणि उर्वरित महाराष्ट्रातील १४ रुग्णालयांबाहेर तीव्र निदर्शनेदेखील करण्यात आली. यात १०० टक्के कर्मचारी सहभागी झाले. जे. जे. रुग्णालयातील ९ संघटना मिळून निर्माण केलेल्या कृति समितीचाही त्यात सहभाग होता. हे आंदोलन २ जुलैपर्यंत असेल. त्यानंतर दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आपला निषेध आंदोलनाच्या माध्यमातून नोंदवला जाईल, अशी माहिती राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिली. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचाही पाठिंबा मिळाला आहे. या परिचारिकादेखील संपूर्ण ताकदीनिशी आंदोलनात 100 टक्के सहभागी झाल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची सरळसेवा पद्धतीने भरती न करता बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी भरती करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे. २ जुलैपर्यंतच्या आंदोलनानंतरही त्याची दखल घेतली नाही तर मात्र ३ ते ५ जुलै दररोज दोन तास काम बंद आंदोलन केले जाईल. त्यानंतर ७ जुलैला संपूर्ण दिवस काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. आजच्या या १०० टक्के यशस्वी झालेल्या आंदोलनानंतरही अद्याप शासनाने त्याची दखल घेतली नाही, संघटनेचा चर्चेसाठी निमंत्रित केले नाही, त्याबद्दल कर्मचा-यांच्या मनात असंतोष आहे, असेही भाऊसाहेब पठाण यांनी म्हटले आहे.
राज्य शासनाच्या याबाबतच्या निर्णयाबद्दल कर्मचा-यांच्या भावना अत्यंत संतप्त आहेत. शासनानेअध्यादेशाद्वारे गट १ ते ३ पर्यंतची पदे सरळ सेवा भरतीने करायचा निर्णय घेतला आहे. फक्त गट ४ साठी कंत्राटीपद्धतीने भरती होणार आहे. ही ३,६३२ पदं असून त्यात सध्याचे १९८१ वर्षांपासूनचे ९२२ बदली कामगार तसेच आरोग्य आस्थापनावरील राजीव गांधीजीवनदायी योजनेतील कामगारांना कायम करणे किंवा प्रलंबित असलेले वारसाहक्क व अनुकंपा तत्वावरील पदे यांचा कुठलाही समावेश नाही. याबाबत वर्षानुवर्षे पाठपुरावा करत असूनही काहीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे या अन्यायाबाबत कर्मचा-यांच्या भावना अतिशय ती्व्र आहेत. म्हणूनच हे आंदोलन केले आहे.  यानंतरही निर्णय घेतला गेला नाही तर मात्र बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या भरतीबाबत संघटना गेली अनेक वर्षे संघर्ष करत आहे. वारंवार नोटीसादेखील देत आहे, असे असतानाही जाणीवपूर्वक हा निर्णय घेतल्यामुळे राज्य शासनाच्या सर्व चतुर्थश्रेणी कर्मचा-यांमध्ये कमालीचा असंतोष आहे.

ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वरील गुन्हा शासनाने त्वरित मागे घ्यावे ;- राष्ट्रीय वारकरी परिषद.

पंढरपूर;- (प्रतिनीधी ) ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावरील गुन्हा शासनाने त्वरित मागे घ्यावे अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषद च्या वतीने अध्यक्ष ह. भ. प. मारुती शास्त्रे तुणतुणे, उपाध्यक्ष ह. भ. प. कारभारी महाराज अंभोरे, कार्याध्यक्ष ह. भ. प. बापू महाराज रावकर यांच्या द्वारे करण्यात आली आहे.
धर्मग्रंथा मध्ये अनेक अशा गोष्टी आहे जे सध्याच्या विज्ञान वाद्यांना मान्य नाही असे संदर्भ फक्त हिंदूंच्या ग्रंथात आहे असे नाही. अनेक अन्य धर्मियांच्या ग्रंथात सुद्धा असे विषय आहे मात्र कुठल्याही अन्य धर्मियांच्या प्रचारका विरुद्ध कधीही गुन्हे दाखल होत नाही. यापुढे तुकोबाराय सदेह वैकुंठास गेले जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या असे सांगणाऱ्या कथा किर्तनकार यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात. त्या उपक्रमाची या अंनिस पुरोगामी  मंडळींची ही पूर्व तयारीच आहे. या महाराष्ट्रात संत बालयोगी सदानंद महाराज यांचा जंगलातील आश्रम अतिक्रमण आहे म्हणून पाडण्यात आला. काही दिवसापूर्वी पालघर येथे साधूंची हत्या याच पोलिसांच्या समक्ष करण्यात आली. तबलीकी जमातीचे अवैध रित्या वास्तव्य करणारे विदेशी मौलवी याच नगर जिल्यात सापडले मात्र त्यांच्याविषयी ना प्रशासन कठोर कारवाई करतात ना अंनिस व पुरोगामी  कारवाईची मागणी करतात. या देशात सैनिकांवर दगड फेकणाऱ्यांचे गुन्हे मागे घेण्यात आले समाजवादी पक्षाने दंगलीतील अनेक गुन्हे मागे घेतले. मग महाराष्ट्रात किर्तनकार यांच्यावरील गुन्हा का मागे घेऊ नये हा प्रश्न सर्व वारकरी मंडळींना पडलेला आहे.
स्व. श्री बाळासाहेब ठाकरे यांचा नेहमी वारकरी महाराज मंडळी यांना कायमच पाठिंबा असायचा स्वतः कायम भगवे वस्त्र परिधान करून त्यांनी हिंदू धर्माचा अभिमान बाळगला त्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात सुप्रसिद्ध कीर्तनकारांवर गुन्हा दाखल होणे दुर्दैवी आहे. विशेष म्हणजे इंदोरीकर महाराजांनी बाळासाहेब यांच्या जयंती पुण्यतिथीचे कितीतरी किर्तने केलेली आहे. या सर्व गोष्टी विचारात घेऊन सरकारने त्यांच्यावरील गुन्हा त्वरित मागे घ्यावे अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषद चे अध्यक्ष ह. भ. प. मारुती शास्त्रे तुणतुणे, उपाध्यक्ष ह. भ. प. कारभारी महाराज अंभोरे, कार्याध्यक्ष ह. भ. प. बापू महाराज रावकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

वाढत्या वीज बिलांच्या तक्रारींची आयोगानं घेतली दखल, वीज कंपन्यांना दिले निर्देश.

* कोरोनाचं संकट, त्यात लॉकडाऊन असताना महावितरणनं वाढील बिल पाठवून ग्राहकांना जोरदार शॉक दिला आहे.

मुंबई ;- (प्रतिनिधी)  कोरोनाचं संकट, त्यात लॉकडाऊन असताना महावितरणनं वाढील बिल पाठवून ग्राहकांना जोरदार शॉक दिला आहे. महावितरण कंपनीने धाडलेल्या हजारो रुपयांच्या बिलांमुळे ग्राहक हैराण झाले आहेत. जास्त रकमेची देयके मिळत वीज ग्राहकांनी केल्याल्या तक्रारींची दखल महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने घेतली आहे.
देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी सनियंत्रण यंत्रणा उभारावी, असे निर्देश आयोगानं वीज कंपन्यांना दिले आहेत
महाराष्ट्रातील विद्युत क्षेत्राचे नियमन करण्यासाठी विद्युत अधिनियम, २००३ अंतर्गत स्थापन करण्यात आलेला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, राज्यातील वीज कंपन्यांनी वीज ग्राहकांवर आकारावयाचे वीज दर नियम कांलातराने निश्चित करते. विजेच्या वाढलेल्या देयकाविषयी ग्राहकांमध्ये असंतोष असल्याचे दिसून आल्यानंतर आयोगाने वीज कंपन्यांच्या विशेषत: जून, २०२० महिन्याच्या देयक आकारणी पद्धतीचा आढावा घेतला.
१ एप्रिल २०२० पासून सुधारित वीज दर कमी करण्यात आले आहेत. हे दर मागील वर्षाच्या तुलनेत लाक्षणिकरित्या कमी आहेत. या सुधारणेनंतर महाराष्ट्रातील सर्व निवासी ग्राहकांसह सर्व वर्गवारींसाठीच्या वीज दरात घट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. सुधारित वीज दर निर्गमित झाल्यानंतर, एप्रिल महिन्यानंतरच्या वीज वापरासाठी महिन्यामध्ये आकारण्यात आलेल्या देयकांसाठी इंधन समायोजन आकार (एफएसी) लावण्यात आलेले नाहीत. तसेच यापुढेही इंधन समायोजन आकार लागू नये याची उपाययोजना करण्यात आली आहे.
वीज दराचा आदेश कोविड १९ च्या लॉकडाऊनच्या कालावधी दरम्यान निर्गमित झाल्यामुळे, वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउनच्या नियमांचे पालन करणे शक्य होण्यासाठी आणि ग्राहकांना काहीसा दिलासा देण्यासाठी आयोगाने काही बाबतीत वीज कंपन्यांना परवानगी दिली.
मीटरमधील नोंदी घेण्यासाठी ग्राहकांच्या इमारती/घरी न जाता मार्च ते मे या लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान (ॲटोमॅटीक मीटर रिडिंगची सुविधा जेथे उपलब्ध आहे त्यांना वगळून) सरासरी वीज वापराच्या आधारावर वीज देयके आकारावीत, असंही आयोगानं म्हटलं आहे.

एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यातील प्रवासासाठी पास आवश्यक.

सातारा : (प्रतिनीधी ) राज्यात येत्या ३१ जूलैपर्यंत काही सवलती देवून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउनमध्ये काही निर्बंध शिथील केले असले तरी राज्यातील जिल्ह्यांच्या सीमांवर पासशिवाय प्रवेश करता येणार नाही. असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केल्याने एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात पास असल्यासच प्रवास करता येणार आहे.
 राज्य सरकारने येत्या ३१ जूलैपर्यंत काही काही निर्बंध शिथील करत लॉकडाउन जाहीर केला आहे.सध्या राज्यातीस एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यातील प्रवासासाठी पास आवश्यक असून,पासाशिवाय असा प्रवास करता येत नाही हाच नियम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्यातील जिल्ह्यांच्या सीमांवर पासशिवाय प्रवेश करता येणार नाही.असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. लॉकडाउनंतर शिथिलता दिल्यामुळे उद्योग सुरु झाले आहेत. त्यामुळे परप्रांतीय मजूर परत राज्यात येत आहेत. कोरानाचे संक्रमण वाढू नये यासाठी येणाऱ्यांबाबत दक्षता घ्यावी अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या.करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संस्थात्मक विलगीकरण वाढविणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.करोनाच्या पार्श्वभूमीवर ५५ वर्षावरील १२ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ५० ते ५५ वर्ष वयोगटातील पोलीस कर्मचाऱ्यांना साधेकाम देण्यात आले असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

लॉकडाऊनचा कालावधीत ३१ जुलै पर्यंत वाढ.कलम १४४ (१) (३) अन्वये मनाई व जमावबंदी आदेश कायम;-जिल्हाधिकारी राहुल रेखावार.


बीड, दि. ३०:- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ३१ जुलै २०२० रोजी पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला असून  त्यानुसार जिल्हयात दिनांक ३१ जुलै २०२० रोजी रात्री १२.०० वा. पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंडसंहिताचे कलम १४४ (१) (३) अन्वये मनाई व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे आज जे आदेश लागू आहेत ते आदेश दिनांक ३१ जुलै २०२० पर्यंत कायम राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. 
 यापूर्वी आदेशानुसार जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १४४ (१) (३) अन्वये दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० वा. पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले होते त्या कालावधीत 
३१ जुलै २०२० पर्यत वाढ झाली आहे. 
   राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा  1897 खंड 2 , 3 व 4 नुसार  13 मार्च 2020 पासून प्रतिबंध लागू केले आहेत. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.
००००

Monday, June 29, 2020

न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्थेच्या वतिने कोरोना योद्धा शेतकरी बांधवाचा सन्मान.

वरोरा ;- (प्रतिनीधी ) कोविड १९ कोरोना च्या महामारी मध्ये पूर्ण देशभरात स्वतःची काळजी न करता आपल्या साठी लढणारा खरा योद्धा म्हणजे जगाचा पोशिंदा शेतकरी आज शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन    शाल श्रीफळ व सत्कार चिन्ह गुलाबाचे फुल देऊन सन्मान करण्यात आला व ते आपल्या साठी  योद्धा म्हणून उभे आहेत त्यासाठी त्यांचे आभार मानले जा महामारी मध्ये संपूर्ण जग थांबले आहे पण शेतकरी शेताच्या बांधावर राहून संपूर्ण जगाला अन्य पुरवत आहे त्या मुळे त्यांचे आभार मानायला हवे , अभिजित कुडे यांनी शेतकऱ्यांचा समस्या जाऊन घेतल्या व त्यांची विचारपूस केली .न्यू आदर्श बहुउद्देशीय अभिजित कुडे , रोशन भोयर, विनोद कोठारे, तेजस उरकुडे , विजय कुडे, आझाद शेख, रणजित कुडे उपस्थित होते,

चाकरवाडी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

नेकनूर;- (प्रतिनीधी ) बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. नेकनूर हद्दीत असलेल्या चाकरवाडी येथील एका 25 वर्षीय तरुणाने घरासमोर असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शेतकर्‍यांसह बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणात आत्महत्या करू लागले आहेत. बीड जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात ऐंशीपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. नेकनूर हद्दीत असलेल्या चाकरवाडी येथील महादेव चंद्रसेन माने (वय 25) या तरुणाने घराच्या समोर असलेल्या चिंचाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समोर आल्यानंर घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार पोलिस कर्मचारी कैलास बामदाळे, खांडेकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ परळीत काँग्रेसच्या वतीने मंगळवारी निदर्शने.


परळी वैजनाथ;- (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष ना बाळासाहेब थोरात संपर्कमंत्री ना अशोकराव चव्हाण उपाध्यक्ष रजनीताई पाटील यांच्या आदेशावरून परळी तहसील कार्यालयावर केंद्र सरकारच्या जुलमी राजवटी विरोधात पेट्रोल डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बी बियाणे बोगस खते औषधी इत्यादी मागण्या च्या पाठपुराव्यासाठी परळी तहसील कार्यालय समोर दि30 जून 2020 वेळ 11 ते 1 च्या दरम्यान तहसील कार्यालयासमोर निदर्शने काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहेत केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढ केली आहे ती मागे घेण्यात यावी व शेतकऱ्यांना बोगस खते बी-बियाणे औषधी देणाऱ्या कंपन्याचे परवाने रद्द करण्यात यावेत या मागण्यासाठी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या कार्यक्रमास काँग्रेस चे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग डॉ सुरेश चौधरी गणपत आप्पा कोरे प्रकाश देशमुख जीएस सौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन कार्यक्रम होणार आहे 11ते 1 च्या दरम्यान काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी विविध सेलच्या नेत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले परळी काँग्रेस शहराध्यक्ष बाबू नंबरदार कार्याध्यक्ष विश्वनाथ गायकवाड सरचिटणीस सय्यद अल्ताफ महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनिता मुंडे महिला शहराध्यक्ष आशाताई कोरे अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहराध्यक्ष सिकंदर भाई परळी तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक जावेद भाई परळी किसान काँग्रेस अध्यक्ष लहू दास तांदळे परळी युवक काँग्रेस अध्यक्ष शेख जाहीर यांनी केले आहे

विजेची तार तुटून टेम्पोवर पडली. आग लागून टेम्पोचे नुकसान.

बीड;- (प्रतिनीधी ) केज तालुक्यामध्ये वादळी वार्‍यासह पाऊस झाला. या पावसामध्ये सारणी या गावी विजेची तार तुटून ती उभी असलेल्या टेम्पोवर पडली. टेम्पोने पेट घेतल्याने त्यात सदरील टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 
गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडत आहे. काल केज तालुक्यात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. या वादळात सारणी येथील अरविंद श्रीरंग ओव्हाळ यांच्या टेम्पोवर विद्युत तार तुटून पडल्याने टेम्पोने पेट घेतला. टेम्पो पेटल्याचे तेथील लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणार्‍या जिल्ह्यात आज पाच पॉझिटिव्ह.

बीड;- (प्रतिनीधी )गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचे मिटर थांबल्याने बीड जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु असतांना आज तब्बल 5 नवीन रुग्णांची भर पडल्याने कोरोनाचे मिटर पुन्हा सुरु झाले आहे. पॉझिटिव्ह रुग्णामध्ये  बीड आणि आष्टी येथील रुग्ण आढळले आहेत.
आज बीड जिल्ह्यातून एकूण 37 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी  स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. 
त्यापैकी निगेटिव्ह अहवाल - 32, पॉजिटिव्ह अहवाल - 05 यामध्ये
आष्टी येथील (रा.सुर्डी ता. आष्टी, एक 59 व 31 वर्षे महिला, तर 32 वर्षे पुरूष (मुंबईहून आलेले आहेत) तर
बीड येथील -( रा.अजिजपुरा, बीड - 33 वर्षे पुरूष (औरंगाबादहून आलेला)
 दत्तनगर  समोरील गल्ली, बीड - 44 वर्षे पुरूष (पॉझिटिव्हशी संपर्क)

आज पाठवलेले अहवाल
1)    जिल्हा सामान्य रुग्णालय बीड      10
2) ग्रामीण रुग्णालय आष्टी 09

3) ग्रामीण रुग्णालय
                       माजलगाव 04
4)स्वाराती ग्रा वै महाविद्यालय       आंबाजोगाई   14
एकूण    बीड जिल्हा 37
आजपर्यंत जिल्ह्यात तब्बल 111 रुग्णांची नोंद होती त्यामध्ये आजचे नविन 5 असे एकून 116 असून  98 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यात आज धारूर येथील दोन तर बीड जिल्हा सामान्य रुग्णालयातून 8 रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याने सध्या जिल्हा रुग्णालयात 10 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात आजचे 5 रुग्ण. आतापर्यंत जिल्ह्यात 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रवादी काॕग्रेसचे अध्यक्ष मा.खा.शरद पवार यांच्या ताफ्यातील व्हॅनला अपघात.

मुंबई;-  (प्रतिनीधी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाहन ताफ्यातील एक मोटार उलटल्याची घटना आज सकाळी अमृतांजन पुलाखाली घडली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र दोन जण जखमी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आपल्या वाहन ताफ्यासह मुंबईच्या दिशेने निघाले होते. तेव्हा हा अपघात घडला. दरम्यान, स्वतः शरद पवार यांनी खाली उतरून जखमींची विचारपूस केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने शरद पवार निघाले होते. तेव्हा, पाठीमागील पोलीस व्हॅन (चक- 12 छण- 5881) ही अचानक उलटली. यामुळे यातील वाहनचालक आणि एक अधिकारी जखमी झाले.  दरम्यान, अपघात झाल्याने शरद पवार यांनी त्यांची गाडी थांबवून अपघातात जखमी झालेल्यांची विचारपूस केली आणि त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. अपघातात पोलीस व्हॅनचे नुकसान झाले आहे. लोणावळा पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

Sunday, June 28, 2020

परळीत भारतीय जनता पार्टि च्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद.

* सोशल डिंस्टन्सच चे पालन करत 106 रक्तदात्यांनी केले रक्तदान .

परळी वैजनाथ;- (प्रतिनिधी) मोदी-2 सरकारची पहिली वर्षपूर्ती होत असून महाराष्ट्र सहित अनेक राज्यात विविध लोकहिताचे सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत तसेच सध्या कोरोनाचे संक्रमण वाढत आहे त्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे या पार्श्वभूमीवर मा.पंकजाताई मुंडे व खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या आदेशानुसार भारतीय जनता युवा मोर्चा परळीच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन रविवार दिनांक २८ जून २०२० रोजी अक्षदा मंगल कार्यालय येथे करण्यात आले.यात सर्व भाजपा,भाजयुमो, गणप्रमुख,सरपंच, पदाधिकारी,शक्तीप्रमुख, बूथ प्रमुख,कार्यकर्ते तसेच शहर व ग्रामीण भागातील महिला व युवकांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिरात सोशल डिस्टन्सचं पालन करत 106 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे सन्मानपत्र देऊन व शासकीय रुग्णालय रक्तपेढी अंबाजोगाई यांचे आभार मानले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे,शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,जेष्ठ नेते दत्ताप्पा ईटके गुरुजी,राजेश देशमुख,शेख अब्दुल करीम,जीवराज ढाकणे,श्रीहरी मुंडे,भीमराव मुंडे,श्रीराम मुंडे,रमेश कराड,डॉ.शालिनी कराड,लक्ष्मण कराड,सुधाकर पौळ राजेंद्र ओझा,नीळकंठ चाटे,बिबीशन फड,राजेश गित्ते,विजय मुंडे,महादेव ईटके,उत्तम माने,उमेश खाडे,नगरसेवक पवन मुंडे,किरण धोंड,सुरेश माने,योगेश मेनकुदळे,रवी कांदे,मोहन जोशी,पवन मोदानी,अरुण पाठक,नरेश पिंपळे,राजेश कौलवर,सचिन गित्ते,प्रशांत कराड,प्रितेश तोतला,किशोर केंद्रे,योगेश पांडकर,नितीन समशेट्टी,प्रल्हाद सुरवसे,गोविंद चौरे,विजय दहिवाळ,वैजनाथ रेकने,चंद्रकांत देवकते,संतोष सोळंके,शाम गित्ते,वेदांत सारडा,तानाजी वावळे बाळासाहेब काळे वृक्षराज निर्मळ महादेव दहिफळे बळीराम गडदे संजय मुंडे प्रभाकर कदम भरत सोनवणे गोविंद कांदे माऊली साबळे बाळासाहेब शिंदे बाबा शिंदे नवनाथ मुंडे राजाभाऊ मुंडे गणेश होळंबे श्रीहरी मुंडे नाथरा ओमकेश कराड मोहन मुंडे नारायण तांबडे नितीन मुंडे,श्रीपाद शिंदे,मदन वाघमारे,विकास हालगे, सुशील हरंगुळे,दिलीप नेहरकर,विजय खोसे,वैजनाथ पवार,कृष्णा मुंडे,समाधान मुंडे,विशाल मुंडे,विशाल आघाव,ताज्जोद्दीन मामु,गणेश फड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

परळीच्या दिव्या नंदिकोले चे बारावी परिक्षेत तेलंगणा राज्यात घवघवीत यश.


*दिव्या महादेव नंदिकोले हिच्यामुळे महाराष्ट्राचा गौरव तेलांगणा राज्यात सर्वत्र होत आहे कौतुक.

परळी वैजनाथ;- (प्रतिनिधी) एच.एस.सी बोर्ड परीक्षेत तेलंगना राज्यातील  हैदराबाद येथील आयडियल कॉलेज येथे परळीच्या दिव्या महादेव नंदिकोले रा.विद्यानगर याने 470 पैकी 461 गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. आयिडयल कॉलेजमधून ती सर्वप्रथम येण्याचा बहुमानही तिने प्राप्त केला आहे. कु.दिव्या नंदिकोले हिने परळीचे नाव हैद्राबाद (तेलंगणा) राज्यात नावलौकिक केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील विद्यानगर भागातील रहिवाशी असलेले महादेव दत्तात्रय नंदिकोले यांची मुलगी कु.दिव्या हिने तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील दिलसुखनगर येथे इयत्ता बारावीचे शिक्षण घेत होती. तिने या परिक्षेत घवघवीत यश संपादन करीत परळीचे नावलौकिक केले आहे. इयत्ता बारावीत तिने 470 पैकी 461 गुण घेवून यश संपादन केले आहे. इंग्रजी विषयात तिला 95, गणित 73, फिजीक्स 60, संस्कृत 99, गणित भाग 2 मध्ये 75 तर केमिस्ट्री विषयात 59 गुण मिळविले आहेत.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Saturday, June 27, 2020

कु. निकीता जगतकर आत्महत्या प्रकरणी दोषींना तातडीने अटक करण्याचे धनंजय मुंडेंचे पोलिसांना निर्देश.


*जगतकर कुटुंबियांचे दूरध्वनीवरून केले सांत्वन, आर्थिक मदतीसाठी समाज कल्याण विभागालाही दिले निर्देश.

परळी वैजनाथ (दि. 27) -- : कु. निकिता जगतकरच्या  आत्महत्या प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पोलिसांना तातडीने आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच समाज कल्याण विभागामार्फत तिच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याचेही निर्देश ना. मुंडे यांनी दिले आहेत.
ना. मुंडे हे होम क्वारंटाईन असतानाही या प्रकरणाची दखल घेत त्यांचे सहकारी प्रतिनिधी डॉ. विनोद जगतकर यांच्या माध्यमातून ना. मुंडेंनी जगतकर कुटुंबियांचे दूरध्वनीवरून संवाद साधत सांत्वन केले.
यावेळी ना. मुंडे यांनी आपण जगतकर कुटुंबियांच्या पाठीशी असून कु. निकिताच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी असे निर्देश बीड जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. तसेच सदर प्रकरणातील दु:खीत जगतकर कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत जिल्हा समाज कल्याण विभागालाही निर्देश दिले आहेत. निकीताच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करून निकीताच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन यावेळी ना. मुंडे यांनी दिले आहे.

परळी शहरातील माधवबाग-शारदा नगर येथील कन्टेनमेंट झोन शिथील--जिल्हाधिकारी राहुल रेखावार.


बीड, दि.२७:-परळी शहरातील माधवबाग-शारदा नगर येथे कोरोना विषाणू बाधित (कोविङ -१९)  रुग्ण  पॉझिटिव्ह आढळुन आले होते. त्यामुळे या परिसरात कन्टेनमेंट झोन संचारबंदी लागू करण्यात आली होती.  शासनाचे नियमानुसार येथील प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने त्या ठिकाणीचे प्रतिबंध शिथील करण्यात येत  असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
 याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,बीड यांनी या प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आला नाही असे कळविले आहे. 
यामुळे परळी शहरातील माधवबाग-शारदा नगरचा
भगवान बाबा चौक अश्रुबा मुंडे यांचे टी हाऊस पर्यंतचा भाग येथील कन्टेनमेंट झोन (Containment zone) शिथील करण्यात येत आहे व परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश दिले आहेत. 
जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० या पर्यंत फौजदारी प्रकिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) नुसार मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहतील.
०००००

फडणवीस काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत-शरद पवार

* गोपीचंद पडळकर यांच्या बद्दल बोलताना पवार साहेब म्हाणाले ज्यांना जनतेनी नाकारले त्यांना एवढे महत्त्व देण्याची गरज नाही.

सातारा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच शरद पवार यांनी सत्तास्थापनेसंदर्भातल्या दाव्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. फडणवीस काहीना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी खोचक टीका शरद पवार यांनी यावेळी केली आहे.
सातारा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आले आहेत. यावेळी भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोघांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी शरद पवार यांनी पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर शेलक्या शद्बांत टीका केली. मला नाही वाटत त्याला काही महत्व द्यावे. लोकसभेला, विधानसभेला ज्या व्यक्तीचे डिपॉझिट जप्त झाले त्या बद्दल काय बोलणार. त्याला लोकांनीच त्या त्या वेळेला बाजुला केले आहे. त्याची नोंद का घ्यावी, सोडून द्या, अशी शेलक्या शब्दांतील टीका शरद पवार यांनी केली.यावेळी त्यांनी चीन भारत सीमेवरील घडामोडींवरून म्हटलं की, संरक्षण मंत्रालयावर आरोप करणं योग्य नाही. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आता राजकारण नको. भारत-चीन संघर्ष हा गंभीर मुद्दा आहे. मात्र भारत-चीन युध्द होण्यासारखी परिस्थिती नाही. तो रस्ता आपला आहे. चीनने रस्त्यावर अतिक्रमण केलं. तिथं फायरिंग न करण्याचा करार आहे. शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम सर्व गोष्टींवर होत आहे. लॉकडाऊनमुळे लोक बोलत नाहीत. त्याचा हे फायदा घेत आहे. लोकांच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेतला जातोय. अर्थव्यवस्था रुळावर आणण्याची आता गरज आहे.

पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी बीडकरांच्या प्रश्‍नाकडे करतात दुर्लक्ष; -आ.सुरेश धस.

आष्टी;- (प्रतिनीधी )  जिल्ह्यातील शेतकर्‍यांना यावेळेस पावसाने तारले पण कृृषी विभागाने व जिल्हाधिकारी यांनी मारले आहे.मागील महिन्यात जिल्हाधिकारी व पालकमंञ्याच्या बैठकीतच आपण सोयबीनचा तुटवड्याची माहिती सांगितली होती.पण पालकमंञी व जिल्हाधिकारी या प्रश्नाकडे सपशेल दुर्लेक्ष केल्याने आज शेतकर्‍यांनावर ही वेळ आली आहे. तसेच पिक कर्जासाठी जिल्हाधिकारी सांगतात एकही कागद ऑनलाईन व्यतीरिक्त लागत नाही,पण बॅका शेतकर्‍यांना कागदपञांसाठी पिळवणूक करीत असल्याचा असा घणाघात आरोप माजी महसूल मंञी आ.सुरेश धस यांनी केला आहे.
आष्टी येथील आ.धस यांनी आज दि.२७ शनिवारी रोजी सकाळी ९ वाजता निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत आ.सुरेश धस बोलत होते.यावेळी पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,बीड जिल्ह्याची मागिल महिन्यात जिल्ह्याचे पालकमंञी व जिल्हाधिकारी यांनी बैठक घेतली होती.यावेळी सर्व जिल्ह्यातील आमदार बैठकीस उपस्थित होते.यावेळी मी व आ.प्रकाश सोळूंके आम्ही दोघांना सोयाबीन पिका संदर्भात तक्रार केली होती.याचे प्रोसिडींगसुध्दा पहायला मिळेल,आज अशी परिस्थीती आहे की,पावसाने तारले व प्रशासनाने मारले आहे.तसेच जिल्हाधिकारी शेतकर्‍यांना कर्जासाठी एकही ऑनलाईन सोडता कागद लागणार नाही.पण बॅका शेतकर्‍यांना सिबील रिपोर्ट,मुल्याकंन, बेबाकी याची गरज नसतांनाही त्याची मागणी बॅका करतात त्यामुळे शेतकरी अडचणीत येतात.एक फाईल करण्यासाठी शेतकरी किमान दिड दोन हजार रुपये खर्चात भुरदंड होत आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी यांचं बॅका ऐकत नाहीत का?असा सवालही आ.धस यांनी केला आहे.तसेच सरकारनेही शेतकर्‍यांविषयी चांगला निर्णय घेण्याची गरज आहे.परंतु त्यांचे वरवरचे निर्णय हे नुसते जहिरात बाजी करीत आहेत.परंतु शेतकर्‍यांना ते वेठीस धरत असल्याचाही आरोप आ.धस यांनी केला आहे.

बीड जिल्हात १८० दिवसात ८३ आत्महत्या .

बीड (प्रतिनीधी )- २०१२ पासून दुष्काळाच्या गडद छायेत असलेल्या बीड जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबता थांबत नसून जानेवारी २०२० पासून आजपावेत बीड जिल्ह्यात तब्बल ८३ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतातली नापिकी, कर्जबाजारीपणा यासह आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचा आकडा रोज वाढत आहे. दर ४० ते ४८ तासात एक आत्महत्या जिल्ह्यात होत असून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर लढणारे शेतीविषयक जाचक कायदे रद्द करा’ची मागणी करत असले तरी सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालखंडात तब्बल ८२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून आज पुन्हा गेवराई तालुक्यातील भेंड येथे ३० वर्षीय तरुण शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास येते. विशेष म्हणजे तरुण शेतकरी मोठठ्या प्रमाणात आत्महत्या करत असल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनासह सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्थांनी पुढे येऊन शेतकर्‍यांचं उद्बोधन करणं गरजेचं आहे. 
 गेल्या पंधरा वर्षांपासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहे. हे सत्र अद्यापही थांबलेले नाही. कर्जमाफीच्या निर्णयानंतरही शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. मराठवाड्यात सगळ्यात जास्त आत्महत्या ह्या बीड जिल्ह्यात होतात. गेल्या सहा महिन्यात ८२ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे. नापिकी आणि कर्जबाजारी व शेती मालाला नसणारा भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो आणि यातूनच तो आपले जीवन संपवत आहे. 
महाराष्ट्रामध्ये कधीकाळी शेतकर्‍यांना सुगीचे दिवस होते. मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून शेतकर्‍यांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या खालावली. शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले. मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. या आत्महत्यांना वेगवेगळे कारणे आहेत. या कारणांचा शोध शासन घेत नाही आणि त्यावर कुठल्याही उपाय योजना आखत नाही. सरकार कोणतही असलं तरी फक्त आश्‍वासनाशिवाय काहीच मिळत नाही. भाजपाच्या कार्यकाळात आणि त्यानंतर आता आघाडीच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली तरी देखील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. राज्यात सर्वात जास्त आत्महत्या ह्या मराठवाड्यात होतात आणि मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील ८२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

युवक नेते प्रविण कांदे यांनी वाढदिवसा निमित्त केले 101 वृक्षारोपन.

परळी (प्रतिनिधी) । प्रविण  कांदे रा.जिरेवाडी यांनी वाढदिवसानिमित्त अवांतर खर्चाला फाटा देत श्री सोमेश्वर मंदिर परिसरात आज 101 रोपांचे वृक्षारोपन केले. 
जिरेवाडी येथील श्री सोमेश्वर मंदिरात सरपंच प्रा.गोवर्धन कांदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि तरूणांच्या उपस्थितीत प्रविण कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन करण्यात आले. सोमेश्वर मंदिर परिसरात विविध वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली. 

Friday, June 26, 2020

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी सरकारची मोठी घोषणा.

मुंबई : (प्रतिनीधी ) राज्यात कोरोनाचे संकट आल्यापासून रात्रदिवस सेवा बजावणा-या आणि राज्यातील एकूण ५७ पोलीसांना आपला जीव गमवावा लागला आहे.अशा पोलीसांच्या कुटुंबीयांना ठाकरे सरकारने मोठा धीर दिला आहे.कोरोनाने जीव गमावलेल्या पोलिसांच्या निवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानात राहता येईल,अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याच टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.या कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील पोलीस आणि पोलीस अधिकारी रात्रदिवस सेवा बजावत आहेत.टाळेबंदीच्या काळात राज्यातील जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत.त्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदीसाठी चेकपोस्ट निर्माण करण्यात आल्या आहेत.त्यासाठीही मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.परराज्यातील मजूरांच्या घर  वापसीमध्येही पोलीसांनी आपले कर्तव्य बजावले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ३६ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३७, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे २, ठाणे २ पोलीस व ठाणे ग्रामीण १ अधिकारी २, जळगाव ग्रामीण १,पालघर १, जालना  पोलीस अधिकारी १, उस्मानाबाद १ अशा  एकूण ५७ पोलिसांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १०७ पोलीस अधिकारी व ९०८ पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या संकटात आपला जीव गमवावा लागलेल्या पोलीसांना सरकारच्या नियमाप्रमाणे विमा कवचाची नुकसान भरपाई मिळणार आहे.शिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना त्यांच्या निवासाची गैरसोय होवू नये म्हणून कोरोनाने जीव गमावलेल्या पोलिसांच्या निवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानात राहता येईल अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.गृहमंत्री देशमुख यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे  मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना मोठा धीर मिळाला आहे.सध्या राज्यातील ९९१ पोलीस कर्मचारी उपचार घेत आहेत तर सुमारे साडेतीन हजारांहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

ईस्ट वेस्ट सिड्स कंपनी व कार्ड च्या वतीने 100 गरजु कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किराणा किट वाटप.

राजूर  ;-(प्रतिनीधी ) दिं 26, आज रोजी दगडवाडी,तुपेवाडी,चनेगाव, राजूर व पापळ मध्ये सदर किराणाचे वाटपईस्ट वेस्ट सिड्स कंपनी चे विभागीय व्यवस्थापक दिलीप देशपांडे, शरद सावळे,अरविंद माकोने,श्री पवार,श्री बुरुकुल यांच्यासह तुपेवाडी चे सरपंच रतनकुमार नाईक,तलाठी श्री ठाकूर ग्रामसेवक जगदीश लताड,कृषी सहाय्यक भास्कर ठाकरे, माजी सरपंच एकनाथराव मोरे आणि कार्ड चे सचिव पुष्कराज तायडे यांच्या हस्ते करण्यात आले असल्याची माहिती कार्ड संस्थांचे सचिव पुष्कराज तायडे यांनी दिली आहे.
  कार्ड च्या वतीने गरीब व गरजु कुटुंबाचा सर्व्हे करून अगदी गरीब व गरजू 100 कुटुंबाची निवड करून मजुरी काम करणाऱ्या कुटुंबाना प्रत्येकी 600 रुपये किंमतीची किराणाची किट आज वाटप करण्यात आले आहे. 
यात प्रत्येक किराणा किट मध्ये पाच किलो पीठ, एक लिटर तेल,अर्धा किलो तूरडाळ,200 ग्राम मसाले,प्रत्येकी एक किलो मिठ,साखर,डिटर्जंट पावडर,50 ग्राम चहापत्ती,साबण,सॅनिटायझर आदी साहित्य दिले आहे.यामुळे 10 दिवस तरी घराबाहेर कोणी येणार नाही कोरोनाच्या संसर्गाची शिकार होणार नाही.शिवाय आपण दररोज खिचडी सारखे अन्न पदार्थ तयार करून वाटप करणं हे पण आपली जोखीमच आहे. जसे आपण गरजूंना अन्न पोहचवून घास भरवतो त्यातून कोण कोरोना पॉझिटिव्ह आहे हे कळत नाही चुकून आपला बाधित व्यक्तीशी संपर्क आल्यास आपण ही कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकतो हे नाकारता येणार नाही. त्यामुळे किराणा सामानच देणं गरजेचं आहे. म्हणून किराणा जीवनावश्यक वस्तू देन्यात आल्या आहेत.अशी माहिती कार्ड संस्थांचे सचिव पुष्कराज तायडे यांनी दिली आहे. या वाटपासाठी रोहन मगरे,सुनील डोळसे, देविदास राठोड,अर्पणा खरात,माया घोरपडे, भारत दांडगे यांनी परिश्रम घेतले.

परळीत राष्ट्रीय काॕग्रेस च्या परळी तालुका महिला काँग्रेस व शहर महिला काॕग्रेसच्या निवडी .

परळी वैजनाथ;(प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा खा सौ रजनीताई पाटील महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस बीड जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष मीनाक्षी ताई पाटोळे यांच्या आदेशावरून परळी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षपदी सुनिता मुंडे तर परळी शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी आशाताई कोरे यांची निवड करण्यात आली सर्व जबाबदारी पक्षसंघटन वाढविणे जनतेची काम करणे महिलांचे प्रश्नावर आवाज उठवणे  जनतेचे व महिला च्या प्रश्नावर आंदोलने करणे जबाबदारी सोपविण्यात आली आहे या निवडी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग डॉ सुरेश चौधरी गणपत आप्पा कोरे बाबू नंबरदार विश्वनाथ गायकवाड जीएस सौंदळे सय्यद अल्ताफ मा नगरसेविका हलीना बी जय नबी नंबर दार लक्ष्मी गायकवाड उषा रायभोळे महानंदा राठोड सुमन गिरी लक्ष्मी शिंदे समीना सोफिया महिला व कार्यकर्त्यांची या निवडीच्या संदर्भात उपस्थिती होती सर्वांनी या निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या

कोरोना उपचारासाठीची औषधे जुन अखेरीस जिल्ह्यात उपलब्ध होणार;-ना.राजेश टोपे


मुंबई : (प्रतिनीधी ) राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून होणारी सामान्य रुग्णांची पिळवणूक थांबावी यासाठी खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेऊन त्यांचा प्रति किमी दर निश्चित करून त्याप्रमाणेच दर आकारणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा कणा म्हणून ओळख असलेल्या आशा कार्यकर्तींच्या मानधनात २००० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राजयातील ७१ हजार आशा कार्यकर्त्यांना लाभ मिळेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध निर्णयंबाबत माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आरोग्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह संवादातील ठळक मुद्दे असे:

*कोरोना रुग्णांची ने-आण करण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांकडून मनमानी पद्धतीने आकारणी केली जाते. त्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. त्याची दखल घेऊन आरोग्य विभागामार्फत समिती नेमण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णवाहिकांची यादी केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त या रुग्णवाहिका ताब्यात घेतील आणि त्यांचे प्रति किमी दर निश्चित केले जातील. त्यानुसार रुग्णांकडून दराची आकारणी होईल. निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त आकारणी झाल्यास परवाना रद्द करण्यात येईल. सामान्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
*कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेमीसीवीर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा ही औषधे उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आणि औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे मागणी केली. त्यानुसार आता राज्यात जून महिन्याच्या अखेरीस ही औषधे प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होतील.
*राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परिक्षा पुढे ढकलण्याबाबत आज राज्याच्या मंत्रिमंडळाने ठराव केला असून तो केंद्राकडे पाठवणार आहे. असा ठराव करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांची परिक्षा ऑगस्टमध्ये नियोजीत आहे. मात्र हे विद्यार्थी परिक्षेच्या अभ्यासाला लागल्यावर राज्यातील रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर्सची कमतरता जाणवेल. त्यातच पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे परिक्षा पुढे ढकलण्याचा ठराव केला आहे.
*शहरी भागातील आरोग्य सेवेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाकडून समन्वय व्हावा यासाठी यपुढे संचालक (शहरी आरोग्य) हे नविन पद निर्माण करण्यात आले असून त्याची येत्या दोन दिवसात नियुक्ती केली जाईल.
*ग्रामीण भागात आशा वर्कर ७४ प्रकारचे विविध कामे करतात त्याचा त्यांना कामानुसार मोबदला मिळतो मात्र राज्य शासनाकडून २००० रुपये कायमस्वरूपी मानधन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अशा प्रकारे आशा वर्कर आता १५ हजार रुपयांपर्यंत मानधन मिळवी शकतात. गटप्रवर्तकांना ३००० रुपये मानधन देण्यात येणार आहे.
*कोरोना बरोबर जगण्यासाठी एसएमएस ही त्रीसुत्री अंगीकारावी लागेल. यातील एस म्हणजे सोशल डिस्टसिंग, एम म्हणजे मास्क आणि एस म्हणजे सॅनिटायजरचा वापर करणे.
* राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी ३० दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ५२ टक्के आहे.
मृत्यू दर रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यात दररोज सुमारे २० हजार चाचण्या केल्या जात आहेत. ॲण्टीजेन आणि ॲण्टीबॉडी चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

परळी न.प.चे कर्मचारी सत्यवान रोडे यांचा पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने कोवीड योध्दा म्हणून गौरव.


 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील नगर परिषदेचे लिपिक सत्यवान प्रकाश रोडे यांचा पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने कोरोनाच्या संकटात उत्कृष्टपणे सेवा बजावल्याबद्दल कोरोना योध्दा म्हणून गौरव करून सन्मानित करण्यात आले आहे. 
     जगातसह संपूर्ण देशात कोरोनाने आहाकार घातला आहे. अशा कठीण परिस्थितीत कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या. सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्य करणाऱ्या रोडे यांचा गौरव करण्यात आला.  कोरोनाच्या संकटात सत्यवान रोडे यांनी प्रभाव सुरक्षा समिती कोरोना कोवीड 19 विषाणुजन्य परिस्थितीची माहिती विभाग नगर परिषद परळी वैजनाथ यांच्या वेळोवेळी सुचनांचे काटेकोर पालन करत.प्रभाग क्र.11 मध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांना व स्थानिक नागरिक जनजागृती करणे, व्यक्तीची नाव नोंदणी करणे, नोंदणी करून. गरजेनुसार दावाखान्यात घेऊन जाणे, त्यांना होम काँरंटाईन करणे, दररोज त्यांच्यावर घराबाहेर निघु नये म्हणून आवाहन करणे, घरोघरी जाऊन जनजागृतीच्या माध्यमातून माहिती देणे, नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा. कराड, नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, मुख्याधिकारी डॉ. अरविंद मुंडे यांच्या सुचनांच्या पालन करत प्रभाग क्रमांक 11मध्ये कोरोनाला दूर ठेवल्याबद्दल व कर्मचाऱ्यांच्या भूमिका उत्कृष्टपणे निभावल्याबद्दल पुरोगामी पञकार संघाचे संस्थापाक अध्यक्ष. विजय सुर्यवंशी यांच्यामार्गदर्शनाखाली 
पुरोगामी पञकार संघाचे  महाराष्ट्र  राज्य उपाध्यक्ष प्रा. दशरथ वैजनाथ रोडे व परळी पुरोगामी पत्रकार संघा यांनी नगर परिषदेचे लिपिक सत्यवान रोडे यांना कोरोना योध्दा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. रोडे यांना कोरोना योध्दा म्हणून गौरव केल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

हक्क अधिनियम अंतर्गत अधिसूचित महसुली सेवा पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने देण्यात याव्यात--जिल्हाधिकारी राहुल रेखावार.


बीड,  दि. २५:-महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ या अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेसाठी अधिनियमात नमूद सेवा, नमूद कालावधीत व पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने दिनांक २९ जून २०२० पासून महाऑनलाईन पोर्टलद्वारे नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबत  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या अधिनियमांतर्गत निर्देश दिलेे आहेत. 
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अधिसूचित महसुली सेवा त्यानुसार पदनिर्देशित करण्यात आलेले अधिकारी व संबंधित कर्मचारी यांनी यासाठी नागरिकांकडून महसुली सेवा आपले सरकार सेवा केंद्राद्वारे आज पर्यंत प्राप्त
प्रस्ताव व अर्ज दिनांक २६ जून २०२० रोजी पर्यंत निकाली काढणेची कार्यवाही पूर्ण करावी असे आदेश दिले आहेत .
  जिल्हाधिकारी यांनी नियंत्रक अधिकारी म्हणून  या बाबतीत आढावा घेतला असता, अद्यापही बऱ्याच सेवा सेमीआॅनलाइन व आॅनलाइन ( Semi Online / Offline) पद्धतीने देण्यात येत आहेत. 
यामुळे अधिनियमातील तरतुदीचे उल्लंघन होत असल्याचे नमूद केले आहे दिनांक २९.जून .२०२० पासून वरीलपैकी कोणतीही सेवा सेमीआॅनलाइन व आॅनलाइन पद्धतीने देण्यात आली तर सदर प्रमाणपत्र अवैध समजण्यात येईल. तसेच संबंधितांचेवर बोगस कागदपत्रे तयार केल्यामुळे कार्यवाही केली जाईल.

  या अधिनियमातंर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या सर्व महसुली सेवा विहित करण्यात आलेल्या कालावधीव पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने महाऑनलाईन पोर्टलद्वारे नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात व वरील सर्व प्रमाणपत्रे
केवल डिजिटल  साइन करून (Digitally  signed ) करण्यात यावे असे सूचित केले आहे 
महाऑनलाईन पोर्टलद्वारे नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार्‍या  सेवांची यादी,  त्या देणारे अधिकारी आणि कालावधी सोबत प्रसिद्ध करण्यात आला आहे. 
००००

परळी विभागातील कापुस उत्पादक शेतकऱ्यानी तात्काळ संपर्क साधावा बिल देय केले जाईल.


* महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक व पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अॅड.विष्णूपंत सोळंके व संचालक राजकिशोर मोदी यांचे आवाहन.

अंबाजोगाई (प्रतिनिधी) बीड,लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्या कापूस उत्पादक शेतक-यांनी आपला कापुस पणन महासंघाकडे विक्री केला आहे.त्या शेतक-यांपैकी जर कोणत्याही शेतकरी बांधवाचे पेमेंट तांञिक कारणांमुळे किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे अद्यापही त्या शेतक-यांला  मिळालेले नाही अशा शेतकरी बांधवांनी कापुस खरेदीची पावती,बँक पासबुक व आधारकार्ड झेरॉक्स प्रति आदी कागदपत्रांसह तात्काळ मंगळवार,दिनांक 30 जून पर्यंत परळी विभागीय कार्यालयात संपर्क साधावा.जेणेकरून या शेतक-यांना त्यांच्या कापुस खरेदीचे पेमेंट लवकरच अदा करण्यात येईल अशी माहिती देवून परळी विभागातील कापुस उत्पादक शेतक-यांनी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक व पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अॅड.विष्णूपंत सोळंके व संचालक राजकिशोर मोदी,संचालक भरत चामले यांनी केले आहे.

*शेतकऱ्यांच्या खात्यावर पेमेंट त्वरित होणार जमा*
====================
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कापुस खरेदी होत असून शेतकऱ्यांची व्यापा-यांकडून लूट होऊ नये म्हणून कापुस खरेदी सुरू केली.कापसाला चांगला भाव मिळत आहे.त्याखाली खरेदी होऊ नये म्हणून हे पाऊल उचलले.शेतकऱ्यांना अधिक भाव मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे.कारण,शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळाल्यास आपल्याला आनंदच होईल. कापूस पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रावर लॉकडाऊन काळात शेतक-यांची हेळसांड होणार नाही याची खबरदारी घेतली.खासगी व्यापा-यांकडून लूट होणार नसल्याने शेतक-यांचा फायदाच होईल असा आम्हाला विश्वास आहे.यावर्षी शेतक-यांनी कापुस घातल्यानंतर लगेच त्याचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहेत.ज्या शेतक-यांचे राहीले असतील त्यांना ही लवकरच त्यांचे पेमेंट अदा केले जाईल.

*-राजकिशोर मोदी (संचालक,महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक व पणन महासंघ.)*


*_परळी विभाग राज्यात अव्वल_*
====================
बीड,लातूर व उस्मानाबाद हे जिल्हे कापूस उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात.त्यामुळे या तीनही जिल्ह्यात कापुस उत्पादक शेतक-यांना आर्थिक नफा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.यावर्षी  
शेतक-यांना चार पैसे जास्तीचे मिळू शकतील.कारण,लॉकडाऊन कालावधीत ही महासंघाच्या वतीने शेतक-यांकडून ऑनलाईन नोंदणी करून कापुस खरेदी करण्यात आली.यावर्षी दुष्काळी परिस्थिती होती.परंतू,शेवटच्या टप्प्यातील पावसाने कापुस उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे.त्यामुळे कापूस पणन महासंघाने कापसाला चांगला दर देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.जिल्ह्यात ज्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू केले याचा कापूस उत्पादक शेतक-यांनी लाभ घेतला.यावर्षी परळी वैजनाथ विभागातील हंगाम 2019-20 शासकिय कापुस (पणन महासंघ) खरेदीची माहिती (दि.25/6/2020 अखेर)परळी विभागात 69,764 शेतक-यांनी त्यांचा तब्बल 17593328.55 क्विंटल एवढा कापुस पणन महासंघाकडे विक्री केला.विक्री केलेला कापुस 941 कोटी,24 लाख,7 हजार सातशे 43 रूपये एवढ्या किंमतीचा झाला.त्यापैकी सुमारे 910 कोटी रूपयांची पेमेंट थेट शेतक-यांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आली आहे.

*-अॅड.विष्णुपंत सोळंके (उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक व पणन महासंघ.)*

Thursday, June 25, 2020

एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन ५०% अदा करण्याच्या एस टी च्या निर्णयाला कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेचा तीव्र विरोध.


बोरघर/माणगांव :-(प्रतिनीधी ) कोविड -१९ चा प्रादुर्भाव संपूर्ण देशभर रोखण्यासाठी दिनांक २३/०३/२०२०पासून लॉकडाउन सुरू झाले आहे.  राज्य   सरकारच्या आदेशानुसार नॉन रेड झोन भागा भागात अंशतः बस सेवा सुरू केली आहे. तथापि,
दि२३/०३/२०२०पासून रा प महामंडलास वाहतुक  उत्पन्न प्राप्त होत नाही.  त्यामुळे खर्च वेतन  (वेतन,डिझेल इत्यादी) भागीवणे कठीण झाले आहे. त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांचे तुटपुंजे वेतन हा ५०%  देण्याचे नियोजन करण्यास सांगितले या निर्णयामुळे 
एस टी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे
घर खर्च कसे भागवावे आसा प्रश्न एस टी कर्मचाऱ्यांना पडला आहे. जर अशी परिस्थिती राहिली तर एस टी कर्मचाऱ्या कडे आत्महत्या हा एकमेव उपाय असेल. चुकीचे निर्णय एस टी महामंडळाने त्वरित मागे घेण्यात यावे. 
ब्रिक्स कंपनी चे कंत्राट,शिवशाही बसेस खाजगी कंत्राट मुले एस टी महामंडळ चे खूप नुकसान झाले पण या चुकीच्या निर्णय या मुळे कर्मचाऱ्यांना फटका बसलाचे बोलले जात आहे. माहे मार्च पेड इन एप्रिल चा सुद्धा वेतन ७५% झाला होता त्यामुळे तो फरक सुद्धा कधी मिळणार का बुडीत जाणार आसा प्रश्न आता कर्मचाऱ्यांना पडत आहे एस टी महामंडळाची आर्थिक हलाखीची परिस्थिती विचारात घेता, एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मे महिनाचा पगार जुनच्या एकूण वेतनाच्या ५० टक्के वेतन म्हणजेच १५ दिवसांचे एकूण वेतन अदा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मे महिन्याचा पगार ५० टक्के दिला जाणार आहे, अशा सूचना एसटी महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी विभागाकडून दिल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ७ तारखेस वेतन दिले जाते. मे महिन्याचा पगार २४ जून उलटून देखील झाला नसल्याने कर्मचारी व त्यां कुटंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना अनेक कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे. 
एसटी महामंडळाच्या सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी राज्य सरकारकडून २७० कोटी रूपयांमधून २४९ कोटी रूपये वेतनासाठी लागणार आहेत. तर, मग उर्वरित रकमेचे काय करण्यात येणार आहे. एसटी कर्मचा-यांच्या उर्वरित ५०% वेतन कधी देणार, असा प्रश्न कास्ट्राईब  राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री राहुल गायकवाड यांनी एसटी महामंडळाला विचारण्यात आला आहे.

परळीतील वीज ग्राहकांना मीटरवरील रिडिंगप्रमाणे विजेची देयके द्यावीत; - श्रीनिवास देशमुख.

परळी वैजनाथ, दि.25 (प्रतिनिधी):-
परळी शहर व परिसरातील वीज ग्राहकांना त्यांच्या मीटरवरील रिडिंगप्रमाणे वीज वितरण कंपनीने विजेची देयके द्यावीत अशी मागणी शरद पवार विचार मंचचे बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे.
गुरूवारी (ता.25) वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयात कनिष्ठ अभियंता यांना दिलेल्या निवेदनात श्री देशमुख यांनी ही मागणी केली आहे. कोरोना मुळे गेल्या तीन महिन्यांपासून वीज ग्राहकांची मीटरवरील रिडिंग घेणे, देयके देणे ही कामे विस्कळीत झाली आहेत. त्यामुळे वीज बिलाच्या वसुलीसाठी वीज वितरण कंपनी वीज ग्राहकांना ऑनलाईन देयके देण्यास सुरूवात केली आहे. या देयकावर वीज वापर व प्रत्यक्ष मीटरवरील वीज बिलात मोठी तफावत आहे. अंदाजे युनिटचे बिल देयकावर टाकले आहे. यामुळे अनेक ग्राहकांना आव्वाचे सव्वा वीजेची बिले आली आहे. यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत असून अनेक ग्राहक वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत संतप्त झाले आहेत. अगोदरच कोरोना मुळे सर्वसामान्य माणूस मोठ्या आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. त्यातच विजेची आव्वाचे सव्वा बिले आल्याने या आर्थिक संकटात भर पडली आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकरणी लक्ष घालून वीज ग्राहकांच्या मीटरवरील विजेचा वापर प्रत्यक्ष पाहून वीज ग्राहकांना बिले द्यावीत, गेल्या तीन महिन्यात ज्या ग्राहकांना बिल भरता आले नाही, त्यांना दंड, व्याज लावू नये अशी मागणी श्री देशमुख यांनी या निवेदनात केली आहे. वीज वितरण कंपनीच्या परळी येथील कार्यालयात चौकशी कक्ष स्थापन करून तिथे कायम कर्मचार्‍याची नेमणूक करावी, अनेक वर्षापासून बंद पडलेला या कार्यालयाचा दूरध्वनी सुरू करावा, एखाद्या भागातील वीज पुरवठा बंद करावयाचा असल्यास त्याबाबतची कल्पना वीज ग्राहकांना एसएमएस द्वारे द्यावी किंवा स्थानिक वर्तमानपत्रातून माहिती द्यावी तसेच यापूर्वी ज्यांना ग्राहकांना जास्तीची बिले आली आहेत त्या ग्राहकांच्या वीज बिलाची त्वरित दुरुस्ती करून द्यावी, वीज बिल स्वीकारण्यासाठी शहराच्या विविध विभागात वीज वितरण कंपनीने स्वतंत्र कक्ष स्थापन करावेत आदी मागण्याही या निवेदनात केल्या आहेत. यावेळी श्रीनिवास देशमुख यांच्यासह श्रीकांत माने व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

खाजगी नर्सिग विद्यालयाची विद्यार्थ्यां निकीता जगतकर ची आत्महत्या .परळीत खळबळ पोलीस तपास यंत्रणेकडे लक्ष .


बीड (प्रतिनिधी) -: परळी येथील एका खासगी नर्सिंग विद्यालयाची विद्यार्थिनी कु. निकिता सखाराम जगतकर  वय (24) येथे 12 जून 2020 या दिवसी आपल्या दुपारच्या वेळी राहत्या घरी आत्महत्या केली होती. सदरील आत्महत्या हा चर्चेचा विषय परळी शहरात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होता. परंतु निकिताच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी दुःखातून सावरून दिनांक 24 जून रोजी  न पोलिसांमध्ये जाऊन रीतसर तक्रार देऊन निकिताच्या मारेकऱ्यांना ,आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या मूलास शिक्षा व्हावी यासाठी तक्रार दाखल केली, ज्या दिवशी निकिताने आत्महत्या केली. त्या दिवशी त्याच्या घरातील चुलत भावाचे लग्न हे सोनपेठ येथे होते. आई-वडीलांनी निकिताला लग्नाला सोबत चल म्हणून बोलले पण निकिताने लग्नात जाण्यास नकार दिला त्यामुळे त्याच्या मनात काहीतरी वेगळेच चालू होते असं दिसून येते, सकाळी आई-वडील लग्न साठी गावाला गेल्या नंतर दुपारच्या वेळेस घरी ज्यावेळेस परत आले व पाहिले त्यावेळेस निकिता घरातील पत्राच्या आडूला  लटकलेल्या स्थितीमध्ये  मृतावस्थेत दिसून आली.
घरातील सर्वात छोटी लाडाची मुलगी म्हणून निकिता ओळखली जात होती.  उस्मान लतीफ शेख रा. मुल्ला गल्ली, इस्लामपूरला बंगला ,परळी. मुलावर प्रेम करत होती. तो मुलगा पण लग्नाच्या अणाभका खात होता.परंतु त्या मुलाने लग्नास नकार देऊन तुला व तुझ्या आई वडीलांना मारुन टाकीन अशी धमकी सतत देत असल्याने त्रासाला कंटाळून शेवटी आत्महत्या केली. निकिताच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली, तिचा बोलका स्वभाव या सर्व गोष्टी व शिक्षणाची जिद्द वाखाणण्याजोगी होती. परंतु तिच्या आयुष्यात असे काही तरी घडले की तिने आपली स्वतःची जीवन यात्रा घरात कोणी नसताना संपवली
संभाजीनगर पोलीस ठाण्या परळी च्या वतीने संबंधित प्रकरणाची तपासणी करण्यात येत आहे. परळी येथील संभाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्या प्रवृत्त करून जीवे मारण्याच्या धमकी दिल्याबाबत उस्मान शेख यांच्यावर भादावी प्रमाणे 306 / 506 , अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत 3(2) va गुन्हा नोंद झाला असून .पुढील तपास  डी.वाय.एस.पी.राहुल धस हे करितआहेत.

गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करणारे केळवे पोलीस ठाण्याचे एपीआय निलंबित.

पालघर;- (प्रतिनिधी)  कोळंबी प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात चोरलेल्या कोळंबी चोरीचा गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करणारे पालघर तालुक्यातील केळवे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू नरवडे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
तालुक्यातील केळवे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जलसार व खार्डी येथील कोलंबी प्रकल्पातील कोलंबी मोठ्याप्रमाणावर चोरी झाल्याची व चोरी करणाऱ्यांनी दगडफेक केल्याची प्रकल्प मालक अनंत पाटील व राहुल जगताप यांची तक्रार होती. याबाबत तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवून पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी केळवे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे

Wednesday, June 24, 2020

पडळकरांच्या वक्तव्याचा परळीत तीव्र निषेध पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

* राणी लक्ष्मीबाई टाॕवर मध्यवर्ती चौकात घोषणाबाजी करत निषेध केला.

परळी (प्रतिनिधी) -: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या वैचारिक दिवाळखोरी दाखवणाऱ्या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे, परळीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आ. पडळकरांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून त्यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे परळी राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
एका गाढवाच्या गळ्यात 'मी गोपीचंद पडळकर' असा फलक लावून कार्यकर्त्यांनी येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. 
दरम्यान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही ट्विट करत 'सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका' असे म्हटले आहे. राजकारणात नेम अँड फेम मिळवायचे असले की पवार साहेबांवर टीका करायची, झटपट प्रसिद्धी मिळते, असं समजून अनेकजण 'उचलली जीभ लावली टाळ्याला' अशा उचापती करत असतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा डिपॉझिट आणि अस्तित्व टिकुन राहील, देवादिकांच्या खोट्या शपथा घ्यायची पाळी येणार नाही, याकडे लक्ष द्यावे. बिरोबा अशांना सद्बुद्धी देवो! अशा शब्दात ना. मुंडेंनी पडळकरांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
पडळकरांची ही कृती सबंध महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी असून भाजप कडून द्वेष आणि सूडबुद्धीने प्रतिक्रिया देणे सुरू आहे. पडळकरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणार असल्याचेही परळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे. 
यावेळी  माजी नगराध्यक्ष व नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड,शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे,जि.प.सदस्य प्रा.डॉ.मधुकर आघाव सर,उपनगराध्यक्ष शकील कुरेशी,राष्ट्रवादीचे नेते वैजनाथराव सोळंके,रमेश भोयटे,रविंद्र परदेशी,माधवराव ताटे,माजी नगराध्यक्ष जाबेर खान पठाण, नगरसेवक अय्युब पठाण,गोपाळ आंधळे,अनिल आष्टेकर,श्रीकांत ढेले,विजय भोयटे,वैजनाथ बागवाले,राजेंद्र सोनी,खा.शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख,शंकर आडेपवार,चेतन सौन्दळे,सरचिटणीस अनंत ईंगळे,शंकर कापसे,महेंद्र रोडे,स्वप्नील वेरुळे,संजय देवकर,के.डी.उपाडे,केशव गायकवाड,शेख शम्मो,अल्ताफ पठाण,गफार काकर,बळीराम नागरगोजे,लालाखान पठाण,शरद कावरे,जयदत्त नरवटे,रामदास कराड,मोहन साखरे,अनंत ढोपरे,डी.जी.मस्के,शशी बिराजदार, राज जगतकर,अमर रोडे,प्रताप समीदरसावळे,सुरेश नानावटे, गिरीष भोसले,माऊली होळबे,धम्मा जगतकर, गुलाबभाई,श्रीहरी शेप,विश्वजीत कांबळे, तक्की खान यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, या निषेध आंदोलनाच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन करण्यात आले.

बेताल व्यक्त करणार्‍या पडळकरांचा परळीत‘शरद पवार विचार मंच’च्या वतीने जाहीर निषेध.

* पडाळकरांवर कारवाई करा-बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख.

परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः-
देशाचे माजी कृषीमंत्री, शेतकरी, कष्टकरी व दिनदुबळ्यांचे कैवारी, राष्ट्रवादी काँगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जावून बेताल वक्तव्य करणारे भाजपचे गोपीचंद पडळकर यांचा शरद पवार विचार मंचच्या वतीने परळीत जाहीर निषेध करण्यात आला असून पडळकरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी विचार मंचचे बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे.
शरद पवार विचार मंच च्या वतीने बुधवारी (ता.24) परळी तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, भाजपचे पडळकर यांनी श्री पवार साहेबांवर केलेल्या बेताल व्यक्तव्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील सर्वसामान्य नागरिक, पक्ष कार्यकर्ते, समर्थक यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी शरद पवार विचार मंचने दिलेल्या निवेदनात पडळकरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
पडळकरांवर कारवाई न झाल्यास शरद पवार विचार मंचच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांनी दिला आहे. दरम्यान, तहसील कार्यालयात निवेदन देताना श्री देशमुख यांच्यासह
श्रीकांत माने, सुनील देशमुख, लक्ष्मण कलमे, अरविंद देशमुख, सतीश भोकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांना हे निवेदन सादर करण्यात आले.
दरम्यान, देशासह महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपले आयुष्य दिले आहे. अशा नेत्यांवर बेताल व्यक्तव्य करणे अशोभनिय आहे असेही श्री देशमुख यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

आधार प्रमाणीकरण तक्रार निवारणासाठी तहसिल कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन.



* महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना .2019 .

बीड,  दि. २४:- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९अंतर्गत आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर देखील संगणकीय पावतीमध्ये "आपले आधार प्रमाणीकरण होत नसल्याची तक्रार  तहसिलदारकडे वर्ग करण्यात आली
आहे" असा शेरा नमूद असलेल्या अशा शेतक-यांनी त्यांचे आधार कार्ड,बचत खात्याचे पासबुक व इतर ओळखपत्र इत्यादीसह संबंधित तहसिलदार यांच्याकडील तालुकास्तरीय समितीकडे हजर होऊन आपल्या ऑनलाईन तक्रारीचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन शिवाजी बढे,  जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था बीड यांनी केले आहे.
 यानंतर पात्र लाभार्थ्यांची रक्कम त्यांचे खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही.
यासाठी  तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त असलेल्या  तक्रारी संबंधित तहसिल कार्यालयास ऑनलाईन उपलब्ध असून सदरील यादया संबंधित तहसिल कार्यालय, सहायक निबंधक,सहकारी संस्था कार्यालय व संबंधित बॅंक शाखेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येत आहेत.
शासनाचे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पोर्टलवर ज्या शेतक-यांची नावे  पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नमूद आहेत. त्यांना आधार प्रमाणीकरण करणेसाठीची सुविधा
१७ जून २०२० पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 यादीमधील नाव असलेल्या शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही करताना ऑनलाईन पद्धतीने निर्गमित झालेल्या तक्रारींचे निराकरण जिल्हास्तरीस व तालुकास्तरीय समिती मार्फत करण्यात येत असून सदयःस्थितीत तालुकास्तरावर १५७१ ऑनलाईन तक्रारी प्राप्त असून त्यापैकी ५१५ निकाली काढलेल्या आहेत व १०५६ एवढया तक्रारी प्रलंबित आहेत.

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕक बरखास्त करा ;- भाई थावरे.

बीड (प्रतिनीधी )ः- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकर्‍याची बँक म्हणून ओळखली जाते. मात्र या बँकेकडून शेतकर्‍यांना कसल्याही प्रकारचा फायदा  मिळत नाही. त्यामुळे या बँकेचे संचालक मंडळच बरखास्त केलेले बरे आहे तसेच राष्ट्रीयकृत बँकेतही शेतकर्‍यांना चांगली वागणूक मिळत नाही. शेतकर्‍यांची अडवणूक करणार्‍या बँक कर्मचार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकरी संघटनेचे गंगाभिषण थावरे यांनी केली.
सध्या पिक कर्जाचे वाटप सुरू आहे. मात्र पिक कर्ज अत्यंत कमी प्रमाणात वाटप करण्यात आले. याला सर्वस्वी बँक प्रशासन जबाबदार आहे. जिल्हा बँकही शेतकर्‍यांची बँक म्हणून ओळखली जाते. मात्र या बँककडून शेतकर्‍यांची नेहमीच अवहेलना केली जाते. आजपर्यंत जे काही शेतकर्‍यांना अनुदान व कर्ज माफी आली आहे. ती जिल्हा बँकेमार्फत आली. पिक विम्याची रक्कमही जिल्हा बँकेत येते. बँक शेतकर्‍यांना वेळेवर त्यांचे आलेले पैसे वाटप करत नाही. बँक प्रशासन स्वतः पैसे वापरते आणि त्यानंतर काही दिवसांनी शेतकर्‍यांना वाटप करते. पिक कर्जाचे अनुमान काढले असता. अत्यंत कमी पिक  कर्ज जिल्हा बँकेने वाटप केले. जिल्हा बँक खर्‍या अर्थाने शेतकर्‍याची असतांना त्यांचा लाभ शेतकर्‍यांना होत नसेल तर या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केलेले बरे आहे असे गंगाभिषण थावरे यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँकेतही शेतकर्‍यांना न्याय मिळत नाही. या बँकेतील कर्मचारी अधिकार्‍यांना मराठी भाषा कळत नाही त्यामुळे शेतकरी आणि कर्मचार्‍यांमधला संवाद व्यवस्थीत होत नाही. बँकेचे कर्मचारी शेतकर्‍यांचा अवमान करतात. अशा कर्मचार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणीही गंगाभिषण थावरे यांनी केली आहे.

सूर्यावर थुंकू नका ! डिपॉझिट अन अस्तित्व टिकून राहिल हे बघा. धनंजय मुंडेंनी पडळकरांना सुनावलं.


बीड -; (प्रतिनीधी ) राजकारणात नेम आणि फेम मिळवायचा असेल कि शरद पवार साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण जीभ उचलून टाळ्याला लावत उचापती करतात . भाजपाने दिलेल्या आमदारकीची परतफेड करण्यासाठी वायफळ बडबड केली जाते .असे सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो!अश्या शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला . भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली होती टीका 
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पडळकरांचा समाचार घेतला जात असून मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी “शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे. केवळ प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा हा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची. जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवताय. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला शरद पवारांनी इथपर्यंत आणलं आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलं.
तर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातून प्रतिक्रिया देताना म्हटले कि मंडल आयोग,नामविस्तार, बहुजनांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवून मा.शरद पवार  साहेबांनी आम्हा बहुजनांच्या आयुष्याचं सोनं केलं हे महाराष्ट्राला वेगळे सांगण्याची गरज नाही.पण भाजपने दिलेल्या आमदारकीची परतफेड करण्यासाठी गोपीचंद पडळकर  यांना वायफळ गोष्टी कराव्या लागतात हे वाईट वाटतं. राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की शरद पवार  साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो.

अल्पवयीन १२ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार आरोपीला अटक .

वडवणी;-(प्रतिनीधी )१२ वर्षीय मुलावर एका २० वर्षीय युवकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना रात्री वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथे घडली असून अत्याचारग्रस्त मुलाच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
 वडवणी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सोन्नाखोटा येथील आरोपी हरिदास गोंविद खोटे वय वर्ष २० याने शेतात गवत कापत असलेल्या १२ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकरणी  अत्याचारग्रस्त मुलाच्या वडिलाच्या फिर्यादीवरुन आरोपी हरिदास गोंविद खोटे यांच्याविरुध्दात वडवणी पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.१३१/२०२९ कलम ३७७,३२३,भादवि सह कलम ४,६,८ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास एपीआय महेश टाक हे करत आहेत.

घरफोडीसह दुचाकी चोरणार्‍या आरोपींच्या परळी पोलीसानी आवळल्या मुसक्या.

बीड (प्रतिनीधी )- घरफोडी करून दुचाकी लंपास करणार्‍या टोळीच्या परळी पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून रोख रकमेसह चोरलेल्या दुचाकीही हस्तगत केल्या आहेत.   २३ जून २०२० रोजी अंगद केशव मुंडे (रा. कोटवाडी) यांची दुचाकी (क्र. एम.एच. ४४ एच. ६२२७) ही बाजार समिती परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. त्यावरून परळी शहर पोलिसात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास लावून विनोद विष्णू चव्हाण (रा. चोरांबा ता. धारूर) यास अटक करून त्याने चोरलेली दुचाकी जप्त केली आहे तर दि. १५ जून २०२० रोजी कालिदास कुंडीराम पवार (रा. बजरंग नगर, परळी) यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करत एक इलेक्ट्रीक शेगडी,  १२ ग्रॅम सोन्याचे दागिने व नगदी २५ हजार रुपये चोरून नेले होते. या प्रकरणीही अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा पोलिसांनी शोध लावत आरोपी हनुमंत सावळराम जोगदंड (रा. रामरहीम नगर, वडसावित्री ) यास अटक करून चोरलेल्या मुद्देमालासह रोख ५ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेला रिक्षा असा मुद्देमाल जप्त केला. तसेच त्याचा साथीदार शेख वाजेद शेख उस्मान रा. मलिकपुरा परळी यास अटक केली आहे. वाजेद ह्याने शेख सिराज शेख हुसेन (रा. अब्दुल कलाम नगर, लातूर) याला सदरील चोरी केलेले सोने विकले आहे. तर तिसरा गुन्हा २६ मे २०२० रोजी विकासराव (रा. देशमुख कॉम्प्लेक्स अरुणोदय मार्केट, परळी) यांची पल्सर मोटारसायकल (क्र. टी.एम. ०१ ईएम ०५१०) ही सुरज आनंद जाधव याने चोरून नेली होती. त्याला परळी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे. सदरील कारवाई पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत कदम, प्रदीप एकलिंगे, पो.ह. केंद्रे, मुंडे, भताने, बुड्डे, तोटेवाड, अन्नमवार यांनी केली आहे.

दहा दिवसात दिव्यांगांचे अनुदान वाटप करा, अन्यथा ग्रामपंचायतीवर हाल्लाबोल करणार:- अभिजित कुडे


* सरपंच व ग्रामसेवकाला दिले निवेदन .

 वरोरा: - (प्रतिनीधी ) उखर्डा केळी येथे दिव्यांगांना ५% उदरनिर्वाह निधी भत्ता दहा दिवसात त्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा ग्राम पंचायत ताब्यात घेऊ    उखर्डायेथे दिव्यांगांचा ५% उदरनिर्वाह निधी भत्ता लवकरात लवकर मिळावा, यामागणी साठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची ग्राम पंचायत वर धडक, यावेळी ग्राम पंचायत सरपंच मनाबाई ऊईके व ग्राम सेवक यांनी दिव्यांगांशी चर्चा करून उदरनिर्वाह निधी लवकरच खात्यावर जमा करण्याचे आश्वासन दिले आहे.     
कोविड १९ या रोगाच्या साथीच्या प्रादुर्भावामुळे देशातील अनेक व्यवसाय बंद झाले आहेत, त्याचा परिणाम अनेक कामगारांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे, त्यात दिव्यांग बांधवही शामिल आहेत, दिव्यांग बांधवांचे ही सध्या हाल होत असून अनेक शासनाकडे दिव्यांगांचा  असणारा ५ % निर्वाह भत्ता हा दिव्यांंगांंच्या हक्काचा असून बऱ्याच ग्रामपंचायत, यांनी अद्याप तो दिलेला नाही,  यामुळे येथील दिव्यांंग बांधवांनी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे  यांच्या नेतृत्वात ग्राम पंचायत वर धडक दिली व सरपंच व ग्राम सेवक यांना निवेदन देऊन चर्चा केली.
ग्राम पंचायत मध्ये११  दिव्यांगांची नोंंदणी असून त्यांंचा हक्काचा ५ % उदरनिर्वाह भत्ता अदयाप दिव्यांगाच्या खात्यां वर वाटप झालेला नाही.तसेच वारंवार सांंगुन सुद्धा ग्राम पंचायत प्रशासनावर  कोणती ही दखल घेतलेली नाही  त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका उपाध्यक्ष अभिजित कुडे कोवीड च्या प्रादुर्भावामुळे अडचणीत सापडलेल्या दिव्यांगांना लवकरात लवकर दिव्यांग निधी मिळावा अशी मागणी केली, तर सरपंच व ग्राम सेवक यांनी निधी लवकरात लवकर जमा करणार असे आश्र्वासन दिले. या वेळी रणजित कुडे, रोशन भोयर, मारोती लांडगे, विजय कुडे, तेजस उरकुडे, ऋषिकेश कुडे, विनोद कोठारे, अविनास डोमकावडे, अनिकेत राऊत, आकाश कुडे, प्रफुल उरकुडे, योगेश पुसदेकर, हनुमान नखाते उपस्थित होते. आता निवेदन नाही तर सरळ हल्ला बोल म्हणत येणाऱ्या दहा दिवसात निधी दिव्याग्यांच्या खात्यात जमा न झाल्यास ग्राम पंचायत ताब्यात घेऊ असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यांनी दिला आहे.

Tuesday, June 23, 2020

परंडा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीसाचा कोरोना मूळे मृत्यू .


परंडा:- दिनांक 23 (प्रतिनीधी )  उस्मानाबाद जिल्हयातील परांडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सुधाकर जाधवर या पोलिस कर्मचाऱ्याचा, कोरोना मूळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे
त्यांना उपचारासाठी सोलापूर च्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री 2.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला जनतेच्या सेवेसाठी, रस्त्यावर जाऊन कोरोनाशी लढताना , जीव गमवावा लागलेला आहे आता उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना मुळे मृत्यूची संख्या सात झाली आहे