Wednesday, June 30, 2021

१ जुलैपासून ‘या’ महत्वाच्या बँकांचे नियम बदलणार.



कांतीकारी साथी न्युज– जुलै महिना सुरू होत आहे आणि नवीन महिन्यासह बरेच बदल आणि नवीन नियम लागू केले जात आहेत, त्यामुळे त्याविषयी जागरूकता असणे आवश्यक आहे. येथे आपण बँकिंग क्षेत्रात होणार्या बदलांविषयी बोलत आहोत, विशेषत: स्टेट बँक ऑफ इंडिया, अ‍ॅक्सिस बँक आणि सिंडिकेट बँक या प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ग्राहकांसाठी काही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.

एसबीआयने एटीएममधून पैसे काढणे, चेक स्लिप आणि मूलभूत बचत बँक ठेवी खात्यांसाठी काही बदल केले आहेत, जे १ जुलैपासून लागू होतील. अ‍ॅक्सिस बँकेच्या एसएमएस सतर्कतेवर मासिक शुल्क वाढणार आहे. त्याशिवाय सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांसाठी आयएफएससी कोडबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे.


एसबीआय ग्राहकांसाठी बदल रोख पैसे काढण्यावरील शुल्क: आता आपण बँक शाखेतून फक्त चार वेळा विनामूल्य रोकड काढण्यास सक्षम असाल. या वरील व्यवहारांसाठी, ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासाठी 15 रुपये अधिक जीएसटी आकारला जाईल. त्याच वेळी, एटीएम व्यवहारासाठी देखील हाच नियम लागू होईल.

SBI चेक बुक शुल्कः बीएसबीडी खातेदार एका वर्षात केवळ 10 चेक स्लिप वापरू शकतील. याशिवाय जर एखाद्या ग्राहकाला चेक स्लिपची आवश्यकता असेल तर त्याला 10 लीफ चेक बुकसाठी 40 रुपये आणि 25 लीफ चेक बुकसाठी 75 रुपये अधिक जीएसटी द्यावे लागेल. ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीतील ग्राहकांना हा नियम लागू होणार नाही.

Axis बँकेच्या ग्राहकांसाठी बदल

अ‍ॅक्सिस बँक एसएमएस अलर्ट शुल्क वाढवित आहे. दरमहा निश्चित 5 रुपये आकारण्याऐवजी प्रत्येक एसएमएस इशार्‍यावर 25 पैसे (दरमहा जास्तीत जास्त 25 रुपये) आकारण्याचा बँकेने निर्णय घेतला आहे. तथापि, हे जाहिरात मजकूर संदेश आणि ओटीपी असलेल्या संदेशांवर लागू होणार नाही.

आधीच्या सिंडिकेट बँकेच्या शाखांचा आयएफएससी{IFSC} कोड बदलण्यासाठी
पूर्वीच्या सिंडिकेट बँकेच्या शाखांचा आयएफएससी कोड 1 जुलै 2021 पासून बदलला जाईल कारण ही बँक कॅनरा बँकेत विलीन झाली आहे. १ जुलैपासून ग्राहकांना एनईएफटी / आरटीजीएस / आयएमपीएसद्वारे निधी मिळविण्यासाठी नवीन कॅनरा आयएफएससीचा वापर करावा लागणार आहे.

नवीन आयएफएससी यूआरएल Canarabank.com/ifsc.html किंवा कॅनरा बँकेच्या वेबसाइटवर किंवा कोणत्याही कॅनरा बँकेच्या शाखेत जाऊन मिळू शकते. पूर्वीच्या सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना बदललेल्या आयएफएससी आणि एमआयसीआर कोडसह नवीन चेकबुक मिळवावे 

मलिकपुरा इदगाह पायरीजवळील डी.पी.झुकल्यामुळे धोका. डी.पी.तात्काळ हटविण्याची नागरिकांची मागणी.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)शहरातील न.प.वॉर्ड क्र.16 मलिकपुरा, इदगाह जवळ असलेली महावितरणची डि.पी.एका बाजूने पूर्णपणे झुकली असून जास्तीचा पाऊस व जमिन खचल्यास सदरची डि.पी.नजीकच्या नागरी वस्तीवर कोसळून रहिवाशांच्या जीवीतास धोका होण्याची शक्यता आहे. महावितरणने सदरची धोकादायक डि.पी.येथून हटवावी किंवा दुरूस्त करावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी महावितरणला निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मलिकपुरा इदगाह पायरीजवळ संतराम ढाकणे यांच्या घराजवळ महावितरणची डि.पी.असून झुकलेल्या डि.पी.च्या समोरच अनेक पत्राचे घरे आहेत. येथे राहणारे नागरिक हे मजूर असून डि.पी.झुकल्यामुळे तसेच वादळ वार्‍यामुळे कोणत्याही क्षणी झुकलेली डि.पी.समोरच्या पत्र्याच्या घरावर पडून खूप मोठी जीवीत हानी होणार आहे. या जीवीत हानीस संपूर्णपणे प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे. 

दरम्यान सदरील डि.पी.तात्काळ हटविण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर बालाजी मुंडे, साजीत शेख, एकनाथ मुुंडलिक, संजीवनी सांगळे, संतराम ढाकणे, गोदावरी शिंदे, ज्ञानोबा आंबळे, गुलाब शेख, खान युसूफ, इम्रान खान, सद्दाम शेख, आमेर शेख, अजीम शेख, सय्यद जुबेर, कैलास काजळे, आदींसह अनेकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार परळी मुख्याधिकारी न.प.परळी, मुख्य अभियंता महावितरण अंबाजोगाई यांना देण्यात आल्या आहेत.

Tuesday, June 29, 2021

गर्भवती महिलांसाठी कोरोना लस किती सुरक्षित आहे?..सरकार कडून नवीन मार्गदर्शक तत्वे जारी.


कांतीकारी साथी न्युज - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांना कोविड -19 च्या लसीकरणासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बहुतेक गर्भवती महिलांना कुणालातरी संपर्क साधल्यास संसर्ग होईल किंवा त्यांना सौम्य आजार असेल पण त्यांचे आरोग्य झपाट्याने कमी होऊ शकते आणि त्यामुळे गर्भावरही परिणाम होऊ शकतो.

“कोविड -19 पासून लस देण्यासह कोविड -19 पासून स्वत: चा बचाव करण्यासाठी त्यांनी सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे,” असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. म्हणूनच सल्ला दिला आहे की गर्भवती महिलांनी कोविड -19 ही लस घ्यावी.

गर्भवती महिलांसाठी कोविड -19 लसीची सुरक्षा:
मंत्रालयाने म्हटले आहे की उपलब्ध कोविड -19 लस सुरक्षित आहेत आणि लसीकरण गर्भवती महिलांना कोविड -19 रोग किंवा आजारापासून संरक्षण करते. कोणत्याही औषधाप्रमाणे, लस देखील सामान्यतः सौम्य असे दुष्परिणाम होऊ शकते. त्याला हलका ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना होऊ शकते किंवा लस इंजेक्शन दिल्यानंतर 1-3 दिवसांपर्यंत अस्वस्थ वाटू शकते

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भविष्य.असा जाईल तुमचा दिवस.


राशी भविष्य २९ जून २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: अध्यात्माकडे कल राहील. विविध क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यांचा जरूर विचार करा. विचार करून कामे करा. आजचा शुभ रंग - नारंगी.
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: अनेक दिवसांपासून प्रलंबित कामं पूर्ण होतील. नोकरीत यश प्राप्त होईल. मुलांना यश प्राप्त होईल. बँकिंग, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - राखाडी. 
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन येणारा असेल. व्यापारात लाभ होईल. जुनी थांबलेली कामे पूर्ण होतील. नात्यात सुधारणा होईल. नव्या कामाची सुरूवात करू शकता. आजचा शुभ रंग - पिवळा.
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: तुम्ही कार्यात निपुण आहात त्यामुळे तुम्हाला अधिक कामे मिळतील. यामुळे तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल. स्वभावाने तुम्ही चतुर आहात त्यामुळे गर्दीमध्येही तुम्ही स्वत:ची ओळख बनवू शकता. आजचा शुभ रंग - आकाशी.
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: जोडीदाराची साथ तुम्हाला एक नवी ऊर्जा देईल. आज धार्मिक यात्रा होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात यश आणि प्रगतीची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्य चांगलं राहील. आजचा शुभ रंग - पोपटी.
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - हिरवा.
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आज वाद-विवाद टाळा. भावूक होऊन कुठलाही मोठा निर्णय घेऊ नका. तब्येतीची काळजी घ्या. ऑफिसमधील कामात यश प्राप्त होईल. आजचा शुभ रंग - तपकिरी.
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य  / Scorpio Horoscope Today: घरात लवकरच मंगल कार्ये होतील. आज दिवसभर धनप्राप्तीचे योग आहेत. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. महागड्या वस्तू जपून वापरा. आजचा शुभ रंग - तांबडा.
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेम प्रसंगात थोडा ताणतणाव निर्माण होऊ शकतो. धन प्राप्ती होऊ शकते. नोकरीमध्ये अधिकारांमध्ये बढती होईल. व्यापार उत्तम राहील. आजचा शुभ रंग - जांभळा.
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: मिळणाऱ्या यशामुळे मन प्रसन्न असेल. लव्ह लाईफमधील अडथळे दूर होतील. दाम्पत्य जीवनात आनंदी आनंद होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. आजचा शुभ रंग - मोरपंखी.
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: प्रेमात असाल तर जोडीदाराला लग्नाचा मागणी घालण्यास योग्य वेळ आहे. भगवान विष्णूचं नामस्मरण करा. तुमचं आरोग्य चांगलं राहिल. आजचा शुभ रंग - पांढरा.
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: अनेक योजना तुमच्या डोक्याला त्रासदायक ठरतील. प्रेमप्रकरणात काही तणाव निर्माण होण्याची स्थिती आहे. प्रगतीच्या आड येणाऱ्या बाधा नष्ट होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - हिरवा.

Sunday, June 27, 2021

स्वस्त धान्य दुकानातील १२ लाख रूपये किमंतीचा ५६ टन तांदुळाचा अवैध ट्रक पोलीसांच्या ताब्यात.



* नांदेड महामार्गावर दोन ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ असल्याच्या संशयावरून लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतले. यात १२ लाख रूपये किमंतीचा ५६ टन तांदुळ पकडण्यात आला आहे.

लातूर :(प्रतिनीधी) उमरग्याहून जात असलेल्या दोन ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ असल्याच्या संशयावरूनलातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतले. यात १२ लाख रूपये किमंतीचा ५६ टन तांदुळ पकडण्यात आला असून पुढील चौकशी करून कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

लातूर-नांदेड महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरु असताना रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
यातील दोन ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ अवैद्य मार्गाने विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. यावरून चाकूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हणमंत आरदवाड, ईश्वर स्वामी, हणमंत मस्के व इतर पोलीसांनी या दोन ट्रकची तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये तांदुळ आढळून आला. याबाबत चालकास याबाबत विचारणा केली असता हा कर्नाटक राज्यातून तांदुळ गोंदीया येथे घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. परंतू ट्रकचे वजन उमरगा चौरस्ता येथे करण्यात आल्याचे दिसून आले. चालक देत असलेली माहिती व कागदपत्र यात तफावत असून तांदुळ स्वस्त धान्य दुकानाला पुरवठा केला जाणार असल्याचा संशय आल्यामुळे पोलीसांनी दोन्ही ट्रक ठाण्यात आणले. ट्रकचे चालक बीरागोंडा ईश्वर हुगुंडा (वय ३०) व अहमद अमिर पटेल (वय २५) रा. दोघें वडनखेरा ता. हुमनाबाद) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

स्थानीक गुन्हे शाखेची कामगिरी.अट्टल दरोडेखोरांची टोळी जेरबंद !


बीड : (प्रतिनीधी) जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यात घरफोड्या करणारे अट्टल दरोडे खोरांच्या टोळीचा स्थानीक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून चौघां जणांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सहा तोळे सोन्यासह 68 हजार रुपये नगदी असा 2 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल व एक दुचाकी जप्त केली. अटक केलेल्या दरोडेखोरांनी यापूर्वी 14 गुन्हे केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.

जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरुर येथे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात घरफोडया झाल्या होत्या. पाटोदा तालुक्यातील नफरवाडी येथील नामदेव विठ्ठल मंडलीक यांचे भरदिवसा घर फोडले होते. याप्रकरणी त्यांनी पाटोदा पोलीसात रितसर तक्रार दिली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतांना स्थानीक गुन्हे शाखेला या दरोडेखोराच्या टोळीबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी काल आष्टीत सापळा रचून चौघांच्या मुसक्या आवळल्या.

त्यांची पोलीसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी 14 गुन्हे केल्याची कबूली दिली. यात एक रोड रॉबरी तर 13 घरफोड्या करुन लाखोचा मुद्देमाल हडप केला आहे. पोलीसांनी चौघांनाही ताब्यात घेतले. तेव्हा त्यांच्याजवळ 6 तोळे सोने, 68 हजाराची कॅश व एक मोटार सायकल मिळून आली. पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या पैकी नवनाथ उर्फ मटक्या ईश्‍वर भोसले(रा. बेलगांव ता.कर्जत, जि.अहमदनगर, वय-20 वर्षे,) दिपक उर्फ पल्या ईश्‍वर भोसले (रा. बेलगांव ता.कर्जत, जि.अहमदनगर, वय-28 वर्षे,) गहिनीनाथ ईश्‍वर भोसले (रा. बेलगांव ता.कर्जत, जि.अहमदनगर, वय-33 वर्षे,) चिमन्या मैदान भोसले (रा. कासारी ता.केज.जि.बीड वय-36 वर्षे,)हे आहेत.

नफरवाडीत घरफोडीत गहिनीनाथ हा नव्हता गहिनीनाथ यांने नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी केली होती. त्याच्या शोधात नेकनूर पोलीस होते. स्थानीक गुन्हे शाखेने या चौघांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनी 14 गुन्हे केल्याची कबूली दिली. पुढील तपासासाठी चौघांना पाटोदा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. सदरील कारवाई स्थानीक गुन्हे शाखेचे पिआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय संतोष जोंधळे, पिएसआय भगत दुल्लत, जगताप, डोळस, शेख नसीर, रामदास तांदळे, प्रसाद कदम, सतिष कातखडे, सोमनाथ गायकवाड, मुन्ना वाघ, अशोक दुबाले, नरेंद्र बांगर, बागवान, पवार, ठोंबरे, कुळेकर, वंजारे, हरके, हराळे यांनी केली.

मराठा आरक्षण मोर्चास लहुजी साळवे बहुजन क्रांति सेनेचा जाहिर पाठिंबा ;- दादा रोकडे.

तलवाडा (प्रतिनिधी) बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर ऊद्या दिं २८ सोमवार रोजी निघना-या मराठा आरक्षण मोर्चास लहुजी साळवे बहुजन क्रांति सेनेचा जाहिर पाठिंबा आसल्याचे निवेदन या मोर्चाचे आयोजक आमदार सुरेश अन्ना धस यांना देण्यात आसल्याचे प्रस्धिपत्राव्दारे दादाराव रोकडे यांनी कळविले आहे.
मराठा समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक न्यायहक्कासाठी लडना-या मा. आमदार सुरेश अन्ना धस यांच्या नेत्रुत्वाखाली निघत आसलेल्या मराठा आरक्षण मोर्चा उस तोड कामगार. मुकादम. कंत्राटी आरोग्य कर्मचारी व विविध मागण्यासाठी निघना-या मोर्चास लहुजी साळवे बहुजन क्रांति सेनेचा जाहिर पाठिंबा आसल्याचे निवेदन लहुजी साळवे बहुजन क्रांति सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष दादाराव रोकडे यांनी आमदार सुरेश अन्ना धस यांना प्रतेक्ष भेटुन निवेदन देऊन जाहीर केला आहे.

प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार डेप्युटी आरटीओ नानासाहेब बच्छावचा हप्तेखोरीसाठी 10 लाख कनेक्शन करुन देण्याचा व्हिडिओ व्हायरल कनिष्ठ अधिका-यांनी केला भांडाफोड.


भ्रष्ट डेप्युटी आरटीओ

नंदुरबार : (प्रतिनीधी) राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार होत असल्याच्या प्राप्त झालेल्या तक्रारीने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. मात्र नाशिक पोलिसांच्या चौकशीअंती याबाबतचा कुठल्याही प्रकारचा गुन्हा शहर आयुक्तालयाच्या हद्दीत घडला नसल्याचे प्रशासनाने मंगळवारी (दि.22) स्पष्ट केले आहे. नाशिक पोलिसांनी आरटीओ घोटाळ्याबाबत त्यांच्या हद्दीपुरती क्लीन चिट दिलेली असतानाच आता एक व्हिडिओ समोर आला आहे.

नंदूरबारचे डेप्युटी आरटीओ नानासाहेब बच्छाव टेबलवर मोठी रक्कम ठेवून बोलत काही जणांशी बोलत असतानाचा हा व्हिडिओ आहे. कनिष्ठ आरटीओ खडसे आणि भोई यांच्याकडून पैशाचा कथित हिशोब ते मागत असल्याचे दिसते.

बच्छाव यांनी तो पैसा स्वीकारलेला नाही, पण १० लाख रुपयांची मागणी करताना दिसतात. हा व्हिडिओ दीड वर्षापूर्वीचा असला तरी आरटीओतील घोटाळ्यांच्या निमित्ताने त्याची चर्चा सुरू झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्याच एका सहकाऱ्याने तयार केला होता. 'हा व्हिडिओ म्हणजे माझ्याविरुद्धचा कट आहे. तो मोडूनतोडून तयार केलेला आहे', असे बच्छाव यांचे म्हणणे आहे.

राज्याच्या मंत्र्यांपासून उच्चपदस्थ अधिकारी वर्गांपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप करणारी तक्रार आरटीओचे निलंबित मोटार निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीची गंभीरपणे दखल घेत पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिले होते. 27 मे पासून याप्रकरणी चौकशीला सुरुवात झाली होती. दोनदा मिळालेल्या मुदतवाढीनंतर गुन्हे शाखेने पंधरवड्यात चौकशी पूर्ण केली आहे. या दरम्यान राज्याच्या अवर सचिव, उप सचिवांपासून नाशिक, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, आरटीओची कामे करणारे खासगी व्यक्ती आणि तक्रारदार असे सुमारे 35 पेक्षा अधिक लोकांची कसून चौकशी करण्यात आली. सुरुवातीपासून यामध्ये क्लिष्टता, गुंतागुंत आढळून येत होती.

महिला प्रांताधिकारीसह लाचखोर लिपिकाला सव्वा लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले.

 

 


जळगाव : (प्रतिनीधी) वाळू वाहतूकदारांकडून सव्वा लाख रुपयाची लाच घेताना जळगाव येथील प्रांताधिकारी व लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार अटक केली आहे. या दोघांनी वाळू वाहतूकदारांकडे ट्रक सोडण्यासाठी दोन लाखाची मागणी केली होती. दिपामाला चौरे असे प्रांताधिकारी यांचे नाव आहे. तर अतुल सानप असे लिपिकाचे नाव आहे.

जळगावात वाळू वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराकडे गौण खनिजकर्म अधिकारी बुलढाणा यांचा वाळू वाहतुकीचा परवाना होता. मात्र, या वाहतूकदाराचे वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक जळगावच्या तहसील पथकाने पकडून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात उभे केले होते. हे ट्रक सोडण्यासाठी दीपमाला चौरे यांनी लिपिक अतुल सानप याच्या मार्फत दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीमध्ये सव्वा लाख रुपये देण्याचे ठरले होते.

या संदर्भात वाळू वाहतूकदाराने लाचलुपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता दीपमाला चौरे यांनी लिपीक सानप याच्यामार्फत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांनी सापळा रचून अतुल सानप यांच्या खासगी पंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. त्याने प्रांताधिकारी दीपमाला चौरे आणि लिपिक अतुल सानप यांच्यासाठी रक्कम स्वीकारत असल्याचे सांगितल्या नंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या दोघांवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक जी. एम. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजोग बच्छाव, हवालदार अशोक आहिरे, मोनोज जोशी, सुनील शिरसाठ, प्रवीण पाटील, नासीर देशमुख व ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच सोने खरेदीदारास सुर्वण संधी जाणुन घ्या आजचे भाव.




कांतीकारी साथी न्युज – आपण सोने खरेदीची प्रतीक्षा करत असल्यास आपल्यासाठी ही चांगली संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत घट सुरु आहे. परिस्थिती अशी आहे की आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा सोन्याचे दर 10 ग्रॅम 9000 रुपयांपेक्षा स्वस्त झाले आहेत. एवढेच नव्हे तर सोन्याच्या किंमतीतही गेल्या आठ व्यापार दिवसात सातत्याने घसरण सुरू आहे.

सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47000 रुपयांवर आली आहे. मागील वर्षी 7 ऑगस्ट 2020 रोजी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 56200 रुपयांच्या पातळीवर होता, जो आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे. त्याचबरोबर आता सोन्याला प्रति 10 ग्रॅम 47065 रुपयांच्या पातळीवर विक्री केली जात आहे. अशा प्रकारे सोन्याचे भाव आतापर्यंत 9000 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

सोन्यात गुंतवणूक करण्याची चांगली संधीज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत वाढ होणार आहे. तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. सोने सध्या प्रति 10 ग्रॅम 47000 रुपयांच्या आसपास व्यापार करीत आहे. परंतु येत्या काही दिवसांत त्याची किंमत आणखी वाढू शकते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अशी अपेक्षा आहे की त्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56000 रुपयांपर्यंत जाईल.

एका अहवालानुसार गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही सोनं नवीन विक्रम नोंदवू शकतो. त्याचबरोबर काही लोक असे म्हणतात की सोन्यामुळे प्रति 10 ग्रॅम 60,000 रुपयांचा आकडा ओलांडू शकतो. म्हणूनच, सोने खरेदी करणारे किंवा गुंतवणूकदारांनी आता सोने खरेदी केले पाहिजे. जेणेकरून येत्या काही दिवसांत तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल.

नवीनतम सोन्याची किंमत

या ट्रेडिंग आठवड्याच्या पाचही दिवसांत सोन्याच्या भावात घसरण झाली. शुक्रवारी 25 जूनला सोन्याचे दर 10 ग्रॅम 151 रुपयांनी स्वस्त झाले. या घसरणीसह शुक्रवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 47065 रुपये होते. यापूर्वी गुरुवारी सोन्याच्या दरात 10 ग्रॅम 47216 रुपयांवर बंद झाला होता.

शुक्रवारी सोन्याच्या किमतीत नरमाई दिसून येत असताना चांदीच्या किंमतीत वाढ नोंदली गेली. शुक्रवारी चांदी 225 रुपयांनी महाग झाली आहे. या वाढानंतर चांदीचा दर शुक्रवारी 68348 रुपये प्रति किलोच्या पातळीवर आला. याआधी गुरुवारी चांदी 68123 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली.

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भविष्य.






 

मेष

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपल्याला मिश्र फल देणारा असेल. कुटुंबियांबरोबर बसून महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल. कार्यालयीन किंवा व्यापारी क्षेत्रातील अधिकार्‍याबरोबर महत्त्वपूर्ण चर्चा होईल. सरकारी फायदा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी संबंधी कामासाठी प्रवास घडेल.काम वाढेल. शारीरिक थकवा जाणवेल. आईकडून लाभ होऊ शकतो.

वृषभ

श्रीगणेशजी सांगतात की नवीन कामांची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही त्यांची सुरुवातही करु शकाल. एखादया धार्मिक स्थळाला भेट देऊन तुमची वृत्तीही धार्मिक बनेल. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. दूरवरच्या मित्रांच्या शुभवार्ता समजतील. परदेश जाण्याचे योग येऊ शकतात. व्यापारात आर्थिक लाभ होऊ शकतो. आरोग्य मध्यम राहील.

मिथुन

आजचा दिवस प्रतिकूल आहे म्हणून आपण प्रत्येक दृष्टीने सावध राहा असे श्रीगणेशजी सांगतात. आज नवीन कामाची सुरुवात करू नका. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. आजार्‍याने नवीन इलाज सुरु करु नका. कामवृत्तीवर संयम ठेवा. खर्च अधिक होऊ शकतो. घरात किंवा कार्यालयात वाणीवर ताबा ठेवा. वाद टाळा. काही कारणाने वेळेवर खाण्यापिण्याची व्यवस्था होणार नाही. ईश्वर भक्तीने मनाला शांती मिळेल.

कर्क

श्रीगणेश सांगतात की आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह आणि मनोरंजनात जाईल. भिन्न लिंगीय व्यक्ती भेटतील. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. प्रणय विषयक यश मिळेल. स्वादिष्ट भोजन आणि वाहन सुखाचे योग आहेत. प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभदायी दिवस. तब्बेत चांगली राहील.

सिंह

संमिश्र फलदायी दिवसाचे भाकित श्रीगणेश सांगतात. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांचे सहकार्य कमी मिळेल. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू आणि प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. उच्च अधिकार्‍यांशी वाद टाळा. माहेरहून चिंता वाढविणार्‍या बातम्या मिळतील. आज उदासीनता व साशंकता जास्त राहील. त्यामुळे मन उदास राहील. तब्बेत साधारण राहील. खूप परिश्रम करुनही यश अल्प मिळण्याचे संकेत श्रीगणेश देत आहेत.

कन्या

श्रीगणेश सांगतात की संततीमुळे चिंता राहील. मन विचलीत राहील. पोटाच्या तक्रारीमुळे यातना होतील. विद्यार्जनात अडथळे येतील. अचानक खर्च उद्भवतील. बोलताना बौद्धीक चर्चेपासून दूर राहा. प्रिय व्यक्ती भेटतील. शेअर्स, लॉटरीपासून सावध राहा.

तुळ

आज मानसिक थकवा जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. जास्त हळवे बनाल. मनात उठणार्‍या विचारतरंगांमुळे त्रास होईल. आई आणि स्त्री विषयक चिंता सतावेल. प्रवासासाठी प्रतिकूल दिवस. पाण्यापासून जपा. झोप पूर्ण न झाल्याने मानसिक ताण येईल. कौटुंबिक तसेच जमीन-मालमत्ता या विषयी सावध राहा.

वृश्चिक

श्रीगणेश वर्तवितात की आज दिवसभर आपण आनंदी राहाल. नवीन कार्याचा आरंभ कराल. सहकार्‍यांकडून सुख व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात आज यश मिळेल. आर्थिक फायदा व भाग्योदयाचे योग आहेत. भावा- बहिणींकडून लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. स्नेहसंबंध जुळतील. छोटे प्रवास होतील.

धनू

मध्यम फलदायी दिवसाची शक्यता श्रीगणेश सांगतात. नाहक खर्च होईल. मनात मरगळ असेल. कुटुंबीयांशी गैरसमज वाढतील त्यामुळे मनस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. दविधा मनःस्थितिमुळे कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. म्हणून आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. असे श्रीगणेश सांगतात. दूर राहणार्‍या नातलगांकडून संदेश व्यवहार होतील. त्यामुळे लाभ होईल. कामाचा व्याप वाढेल.

मकर

श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी- व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. गृहस्थी जीवनात आनंदी वातावरण राहील. शारीरिक दुखापतीचे योग असल्याने सांभाळून राहा. धडपडणार नाही याची दक्षता घ्या. मित्र परिवार आणि स्नेही यांची भेट होईल. मानसिकदृष्टया शांती लागेल.

कुंभ

पैशाचे व्यवहार तसेच जमीन- जुमला अशा व्यवहारांमध्ये कोणाला जामीन राहू नका असे श्रीगणेश सुचवितात. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. अयोग्य जागी गुंतवणूक होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या निर्णयात स्वकीय सहमत होणार नाहीत. इतरांच्या बाबींत हस्तक्षेप करू नका. त्यामुळे नुकसान होईल. संभ्रमावस्था व अचानक संकट यांपासून दक्ष राहा. रागावर नियंत्रण ठेवा.

मीन

श्रीगणेशांच्या मते आज आपण कौटुंबिक आणि सामाजिक गोष्टींत भाग घ्याल. मित्रांच्या भेटी होतील. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. एखाद्या रम्य स्थळी सहलीसाठी जाऊ शकाल. प्रत्येक क्षेत्रात आपणाला फायदा होईल. विवाहोत्सुकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत.

परळी तालुक्यातील विविध व्यवसायीकांना अ‍ॅन्टीजन टेस्ट बंधनकारक-उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसिलदार सुरेश शेजुळ, मुख्याधिकारी अरविंद मुंडे


* अ‍ॅटिजन टेस्ट न केल्यास दुकाने सोमवारी पासुन अनिश्चित कालावधीसाठी सिल होणार.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-परळी शहरातील सर्व किराणा व्यापारी, कापड व्यापारी, आडत व्यापारी, नाभिक व्यावसायीक, सोने व चांदी व्यापारी, मेडीकल व्यापारी, भाजीपाला व फळ विक्रेते आदींसह सर्वच व्यापार्‍यांना अ‍ॅन्टीजन टेस्ट बंधनकारक असुन टेस्ट न केल्यास सोमवार दि.28 जून पासुन अनिश्चित कालावधीसाठी दुकाने सिल करुन फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे परळीच्या उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसिलदार सुरेश शेजुळ व परळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.अरविंद मुंडे यांनी म्हटले आहे. 
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता विविध यंञनेने वृतवली आहे.यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणुन विविध व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍याची अन्टीजन टेस्टचा उपक्रम आता हाथी घेतला असुन अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरण तथा तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी आदेश निर्गमित केला आहे.
राज्य शासनाने कोरोना विषाणूमुळे कोव्हीड-19 या साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 पासून लागू केला आहे. त्या अर्थी परळी तालुक्यात शहरी व ग्रामिण भागात संभाव्य येणार्‍या कोरोनाच्या तिसर्‍या लोटेच्या अनुषंगाने कोव्हीड-19 च्या प्रतीबंधात्मक उपाय योजना म्हणून परळी तालूक्यातील सर्व व्यापारी किराणा व्यापारी, कापड व्यापारी, सोने-चांदी व्यापारी, आडत व शेती विषयक व्यापारी मेडिकल व्यापारी (दुकानदार), सर्व भाजीपाला व फळ विक्रेते, इतर सर्व प्रकारचे व्यापारी यांनी शनिवार, दि.26/06/2021 व रविवार, दि.27/06/2021 या दोन दिवसात सकाळी 10.00 ते सायं.05.00 वाजे पर्यंत आपली अ‍ॅन्टीजन टेस्ट 1) कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह व 2) लोकनेते गोपीनाथराव मुंडे नट रंगमंदिर येथे करून घ्यावी व अ‍ॅन्टीजन टेस्ट केल्या बाबतचे प्रमाणपत्र हस्तगत करावे अ‍ॅन्टीजन टेस्ट न केल्यास आपली दुकाने सोमवारी दि.28 जून 2021 पासुन अनिश्चित कालावधीसाठी सिल करण्या बाबत तसेच आपल्या विरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी  असे परळीच्या उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसिलदार सुरेश शेजुळ व परळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.अरविंद मुंडे यांनी परळीच्या नागरीकांना आवाहन केले आहे.

Friday, June 25, 2021

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भविष्य.



मेष
श्रीगणेश सांगतात की आज आपणाला थकवा, आळस आणि व्यग्रता जाणवेल. उत्साह वाटणार नाही. प्रत्येक गोष्टीत राग येईल. त्यामुळे कामात बिघाड होई लनोकरी, व्यापाराच्या जागी किंवा घरात आपणामुळे दुःख होणार नाही याची काळजी घ्या. धार्मिक किंवा मंगल कार्यासाठी जावे लागेल.

वृषभ

आज शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल असे श्रीगणेश सांगतात.नवीन कार्याचा आरंभ न करण्याचा सल्ला देतात. खाण्या- पिण्यावर विशेष लक्ष द्या. तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. शक्य असेल तर प्रवास टाळा. आज नियोजीत वेळेत आपले काम पूर्ण होऊ शकणार नाही. योग, ध्यानामुळे मानसिक शांतता मिळू शकेल.

मिथुन

श्रीगणेशांच्या मते आज आपण मनोरंजन आणि आनंदात मग्न राहाल. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत आनंदी वातावरणात दिवस घालवाल. सामाजिक दृष्टया सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. दांपत्य जीवनात सुख मिळेल.

कर्क

श्रीगणेशाच्या कृपेने आजचा दिवस आनंदाचा आणि यशदायक असेल. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात जाईल. महत्त्वाच्या कामावर खर्च होईल. तरीही आर्थिक लाभ होतील असे योग आहेत. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील.

सिंह

आज आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील असे श्रीगणेश म्हणतात. सृजनशीलता विकसित होऊन नवनिर्मिती सुंदर प्रकारे करता येईल संततीकडून आनंददायक बातम्या प्राप्त होतील. मित्रांची भेट आनंद देईल. धार्मिक परोपकाराचे कार्य हातून घडेल.

कन्या

आजचा दिवस आपणाला चांगला नाही असे श्रीगणेशांचे सांगणे आहे. अनेक गोष्टींची काळजी लागून राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरातील व्यक्तींबरोबर विचार जुळणार नाहीत. आईची तब्बेत बिघडेल. कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करा. पैसा खर्च होईल.

तुळ

आज भाग्योदय होईल असे श्रीगणेशांचे सांगणे आहे. भावा- बहिणींशी चांगले संबंध राहतील. धार्मिक यात्रेचे नियोजन कराल. नवीन कार्यारंभास शुभ दिवस आहे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. परदेशातून आनंदाच्या वार्ता येतील. हितशत्रूंवर विजय मिळवाल. सन्मान प्राप्ती होईल.

वृश्चिक

आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. वाणीवर ताबा ठेवा. त्यामुळे कुटुंबात सुख- शांति राहील. विचारांवर नकारात्मक पगडा पडेल. तो दूर करा. धार्मिक कामांसाठी खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी काळ फारसा अनुकूल नाही असे श्रीगणेश सांगतात.

धनू

शारीरीकि आणि मानसिक स्वास्थ्य याकडे लक्ष द्या. ठरलेली कामे करु शकाल. आर्थिक फायदा होईल. प्रवास, तीर्थयात्रा घडण्याची शक्यता आहे. नातेवाईकाकडे एखाद्या मंगल कार्यासाठी उपस्थीत राहाल. स्वकीयांना भेटून आनंद मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. आजचा आपला व्यवहार सामान्य राहील. रुचकर भोजन मिळेल. सामाजिक क्षेत्रात यशकीर्ती मिळेल.

मकर

आज सावधान राहण्याविषयी श्रीगणेश सांगत आहेत. कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढेल. खर्च वाढेल. धार्मिक व सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल व त्यात खर्चही होऊ शकतो. आरोग्याविषयी चिंता राहील. मुलगा आणि नातेवाईक यांच्याशी पटणार नाही. कष्ट करूनच यश मिळेल. मन व्याकूळ होईल. दुर्घटने पासून सावध राहा.

कुंभ

नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. नोकरी धंद्यात फायदा होऊ शकतो. स्त्रीयांकडून कामे होऊ शकतात. आज आपल्यावर लक्ष्मीची कृपादृष्टी आहे. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संतती बरोबर चांगले जमेल. पत्नी आणि पुत्र यांच्याकडून आनंदाची बातमी कळेल. विवाहोत्सुकांसाठी विवाहाचे योग येतील. आपण सहलीची योजना ठरवाल.

मीन

श्रीगणेश आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी सांगतात. नोकरी व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ अधिकारी आपणावर खुश राहतील. त्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. वयस्कर आणि वडील यांचेकडून लाभ होईल. कौटुंबिक आनंदामुळे आपण आनंदी राहाल.

Thursday, June 24, 2021

पंकजाताईंच्या नेतृत्वात भाजपचा राज्यभर चक्काजाम.परळीत खा.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार तीव्र आंदोलन.


* आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा ; तालुकाध्यक्ष सतीश मुंडे,शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांचे आवाहन.

परळी वैजनाथ(प्रतिनीधी)ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी शनिवार दि.२६ जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या सूचनेनुसार  परळी भाजप आंदोलन करणार आहे,खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष सतीश मुंडे आणि शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर स्थगिती आली आहे,सरकारच्या उदासीनतेमुळे झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,ओबीसींच्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.परळी शहरात होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व  खा.डॉ.प्रितमताई मुंडे या करणार आहेत,शहरातील इटके कॉर्नर चौकात सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात होणार असून परळी भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,ओबीसी संघटना आणि समाज बांधव सहभागी होणार असल्याचे श्री.मुंडे आणि लोहिया यांनी सांगितले.

•••

जगदविवेक प्रतिष्ठानच्यावतीने आई या विषयावर आॕनलाईन निबंध स्पर्धाचे आयोजन विजेत्या स्पर्धकास रोख पारितोषिके.

 
बीड ( प्रतिनिधी ) आदर्श मुख्याध्यापिका कै.श्रीमती जगदेवी विवेक स्वामी यांच्या जन्मदिन स्मृतिदिना  निमित्त आई या विषयावर ऑनलाइन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकाने 25 जून रोजी सायंकाळी आठ वाजेपर्यंत आपले निबंध कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त अर्थपूर्ण भाषेमध्ये 98 22 62 85 21 या व्हाट्सअप नंबर वर पाठवायचे आहेत. या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके दिले जाणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाइन प्रमाणपत्र पाठवण्यात येणारआहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकाने सहभाग नोंदवावा असे आवाहन जगद विवेक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
 दर वर्षी दिनांक 25 जून रोजी जगदविवेक प्रतिष्ठानच्यावतीने कै.आदर्श मुख्याध्यापक विवेक सदाशिव स्वामी आणि आदर्श मुख्याध्यापिका जगदेवी विवेक स्वामी यांच्या स्मृतीस अभिवादन करत जन्म दिनाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करून गुणवंत विद्यार्थ्यांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय विद्यार्थ्यांना रोख  पारितोषिक मान्यवरांच्या शुभहस्ते देवून  गौरविण्यात येण्याची परंपरा मागील सात वर्षांपासून सुरू आहे.आदर्श मुख्याध्यापिका जगदेवी विवेक स्वामी यांनी सुरू केलेली ही परंपरा त्यांच्या अकाली मृत्यू नंतर देखील पुढे सातत्याने आयोजित करण्यात येणार आहे. मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे दहावी आणि बारावीच्या  परीक्षा झालेल्या नाहीत, निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करणे शक्य नाही. त्यामुळे या वर्षी आदर्श मुख्याध्यापिका कै. जगदेवी विवेक स्वामी यांच्या स्मृती पश्चात आई या विषयावर ऑनलाइन निबंध स्पर्धेचे खुले आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेमध्ये कोणताही स्पर्धक सहभाग घेऊ शकतो. पहिली ते सातवी पर्यंत बाल गट ,आठवी ते बारावी पर्यंत मध्यम गट आणि बारावीच्या पुढे कोणीही या स्पर्धेत खुल्या प्रवर्गातून सहभाग घेऊ शकतो. प्रत्येक प्रवर्गातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे विजेते काढण्यात येतील.  विजेत्या स्पर्धकांना प्रथम रोख 201 रुपये ,द्वितीय येणाऱ्याला 151 रुपये आणि तृतीय येणाऱ्याला 101 रुपयांचे रोख बक्षीससह  स्मृती प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना ऑनलाइन ने स्मृति प्रमाणपत्र पाठवण्यात येणार आहे. सदरील स्पर्धा जगदविवेक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास विवेक स्वामी आणि  सचिव वैभव विवेक स्वामी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

*आईच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपणाचे आयोजन. 

आदर्श मुख्याध्यापिका जगदेवी विवेक स्वामी यांचे 19 जानेवारी 2021 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात प्रतिवर्षाप्रमाणे त्यांच्या जन्मदिनी सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्याची परंपरा याहीवर्षी जोपासली जाणार आहे. स्मृती दिनाचे औचित्य साधून एका जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याशिवाय ज्या ही व्यक्तींना स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण करायचे आहे, त्यांनी आशीर्वाद निवास, छत्रपती कॉलनी, क्रांतीनगर ,तहसीलच्या पाठीमागे,बीड येथे प्रत्यक्ष येऊन एक झाड घेऊन जायचे आहे. या आयोजनाचा जास्तीत जास्त वृक्ष प्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Sunday, June 20, 2021

परळीत शिवसेना वर्धापन दिन विविध उपक्रमाने साजरा.शिवसेना सामाजिक हित जोपासणारे संघटना-अभयकुमार ठक्कर.

*55 वृक्ष भेट; 55 आरोग्य सेवकांचा सन्मान; 5555 बीज वाटप*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गाने व शिवसेना पक्षप्रमुख तथामहाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सामाजिक हित जोपासणारे व लोकसेवेचे व्रत हाती घेतलेले संघटना आहे असे मनोगत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त नंदागौळ रोडवरील वनराईला 55 वृक्षांची भेट देण्यात आली असून 55 आरोग्य सेवकांचा सन्मान व 5555 बीज वाटप करण्यात आले.

परळी प्रभू वैद्यनाथांच्या भूमित शिवसेना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या आरंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
 त्या नंतर परळी- नंदागौळ येथील वन विभागाच्या वनराईत 55 झाडे लावून वृक्षारोपनाने करत वनरक्षक श्री.राठोड यांना विविध वृक्षाचे (5555)पाच हजार पाचशे पंचावन्न बीज वृक्ष लागवडी साठी देण्यात आले. त्याच बरोबर परळी येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षेत कार्य करणार्‍या 55 कोविड सेवकांना शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार ठक्कर,भारतीय विद्यार्थी सेनेचे बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे,बीड जिल्हा रुग्णालयाचे आर.एम.ओ.डॉ.ढाकणे, उपजिल्हा रुग्णालयाचे  वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख अर्षद,पत्रकार संतोष जुजगर,शहर संघटक संजय कुकडे,मा.उप शहर प्रमुख सतिष जगताप, कवी अनंत मुंडे यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
या वेळी भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा उपप्रमुख मोहन परदेशी, तालुका समन्वयक अमित कचरे, शिवसेना विभाग प्रमुखसंजय सोमाणे, उपशहर प्रमुख किशन बुंदेले, भारतीय विद्यार्थी सेना शहर प्रमुख गजानन कोकीळ,माऊली मुंडे, वैभव जगताप, लक्ष्मण मुंडे,प्रकाश देवकर,योगेश जाधव,सिद्धार्थ गायकवाड,अशोक चव्हाण,देवानंद गोरे, रावसाहेब चव्हाण आदि उपस्थित होते.

Saturday, June 19, 2021

खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील युरीया खताचा प्रश्न सोडवला.अहमदनगर रेल्वे ट्रॅकवरुन बीडसाठी 1200 मे.टन युरीया उपलब्ध.



परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना खरीप हंगामात युरीया खताची टंचाई भासुनये यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी कृषी आयुक्त पुणे यांना पत्र लिहुन अहमदनगर जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या बीड जिल्ह्यातील तालुक्यासाठी खत उपलब्ध करुन देण्याच्या सुचना केल्या होत्या.यानुसार नगर रेल्वे ट्रॅकवरुन बीड जिल्ह्यासाठी 1200 मेट्रीक टन खत उपलब्ध झाल्याने शेतकर्यांना खरीप हंगामासाठी मुबलक युरीया उपलब्ध झाला आहे.युरीयाचा प्रश्न सोडविल्याबद्दल शेतकरी वर्गातून खा.डॉ.प्रितमताईंचे आभार मानले जात आहेत.
  बीड जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी रेल्वेने खताची आयात होते.जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे एकमेव रेल्वे ट्रॅक असल्याने अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या आष्टी,गेवराई,शिरुर कासार,पाटोदा या तालुक्यातील कृषी विक्रेत्यासाठी अडचणीचे ठरत होते.खताच्या अनेक कंपन्यांनी नगर रेल्वेपॉईंटवरुन बीड जिल्ह्यातील पश्चिम भागातील शेतकर्यांसाठी खत पुरवठ्यास मान्यता दिली होती परंतु या प्रक्रियेत अडथळा येत असल्याने वरील तालुक्यातील खत विक्रेते व शेतकर्यांनी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्याकडे युरीया खताचा हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती.सध्या शेतकर्यांचा खरीप हंगाम सुरु असुन जिल्ह्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढल्याने युरीया खताची मागणी अधिक प्रमाणात असल्याचे लक्षात घेवुन जिल्ह्याच्या दबंग खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी कृषी आयुक्त धिरज कुमार यांना पत्र लिहुन अहमदनगर रेल्वे ट्रॅकवरुन बीड जिल्ह्यासाठी खत उपलब्ध होण्यासंदर्भातील अडथळे दुर करुन युरीयाचा अतिरिक्त साठा उपलब्ध करावा असे कळविल्यानंतर बीड जिल्ह्याच्या युरीया पुरवठ्यातील अडथळे दुर होवुन 1200 मेट्रीक टन युरीया उपलब्ध झाला आहे.यामुळे आष्टी,गेवराई,शिरुर कासार,पाटोदा आदी तालुक्यातील शेतकर्यांच्या खताचा प्रश्न मिटला आहे.

भाजप राष्टीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा उद्या पुणे, पिंपरी चिंचवड दौरा ; भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या घेणार बैठका.


* राज्यव्यापी "चक्का जाम" आंदोलनाची ठरविणार रणनिती !

पुणे - (कांतीकारी साथी न्युज) 
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी भाजपच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात २६ जून रोजी चक्का जाम आंदोलन
करण्यात येणार आहे. आंदोलनाची रणनिती ठरविण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हया उद्या रविवारी (ता. २०) पुणे दौर्‍यावर असून त्यांच्या उपस्थितीत उद्या पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

   राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीने येत्या २६ जून रोजी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ओबीसी नेते वेगवेगळ्या जिल्हयाचा दौरा करत असून त्यानुसार  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हया उद्या २० तारखेला पुण्याच्या दौर्‍यावर येत आहेत. उद्या त्यांच्या उपस्थितीत पुणे व पिंपरी चिंचवड येथे भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. पुणे शहर जिल्हयाची बैठक उद्या सकाळी ११.३० वा. भारतमाता अभ्यासिका पर्वती येथे तर दुपारी ४ वा. पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवडची संयुक्त बैठक हाॅटेल कलासागर, कासारवाडी येथे होणार आहे.या बैठकीस जिल्हा पदाधिकारी, आमदार-खासदार (सर्व लोकप्रतिनिधी), जिल्हा व मंडलाचे अध्यक्ष तसेच ओबीसी मोर्चाचे प्रदेश , जिल्हा व मंडलाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकी दरम्यान पंकजाताई मुंडे ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची देखील भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
•••

राज्यातील महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये.


मुंबई ;- मुंबई, पुण्यासह राज्यातील 10 महानगरपालिका आणि 20 नगर परिषदा, नगर पंचायतीच्या निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्याची तयारी सुरू झाली आहे.

या निवडणुका एकसदस्यीस प्रभागरचना पद्धतीनं होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर आणि वसई विरार या महापालिकांसह 65 नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या प्रलंबित निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोगानं केली आहे. अर्थात, कोरोना महामारीची परिस्थिती लक्षात घेऊन याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

कोरोना संसर्गामुळे अनेक महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. राज्यात सध्या कोरोनाची लाट हळूहळू ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्याही कमी होत असून यामुळे पुन्हा एकदा प्रलंबित असलेल्या महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी करण्यात येत आहे.

दुसरीकडे, औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार आणि कोल्हापूर या महापालिकांच्या निवडणुका गतवर्षापासून लांबलेल्या आहेत. या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याची तयारी करण्यात येत आहे.

निवडणुकांबाबत निर्णय झाला, तर महापालिकांना 15 ऑगस्टपर्यंत प्रभागरचना अंतिम करावी लागणार आहे. सध्या लागू असलेल्या कायद्यानुसार राज्य सरकारने एकसदस्यीय प्रभाग निश्चित केलेला आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोध केला आहे. एकसदस्यीय प्रभागामुळे निवडणुकीत गैरप्रकार होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे

लग्नाची मागणी घातली एकीला. लग्न केले दुसरीशी ! डाॕक्टर नवरदेवाचा प्रताप.


परळी वैजनाथ  (प्रतिनीधी) तुमच्या मुलीसोबत लग्न करतो, मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या असे म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्याने परळीतील मुलीसाठी तिच्या कुटुंबीयांकडे मागणी घातली. मात्र साखरपुडा झाला, हुंडा दिल्यानंतर त्याने परस्पर दुसऱ्याच मुलीशी लग्न केल्याच्या आरोपावरून मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून वैद्यकीय अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा येथील शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

येथील सोमेश्वर नगर परिसरातील डॉ. संदीप वसंतराव मंत्रे सध्या लातूर जिल्ह्यातील साकोळ (ता. शिरूर अनंतपाळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, १८ सप्टेंबर २०२० संदीप त्यांच्या घरी आला. मी सध्या वैद्यकीय अधिकारी असून मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या, मी तुमच्या मुलीशी लग्न करतो अशी त्याने मागणी घातली. मुलगा डॉक्टर आहे, स्वतः मागणी घालत असल्याने स्वतःच्या मुलीचे भविष्य चांगले होईल या आशेने वडिलांनी संदीप सोबत मुलीचे लग्न जमवले. २३ सप्टेंबर रोजी दोन्हीकडील काही मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला.

२१ ऑक्टोबर मुलीच्या वडिलांनी ठरल्याप्रमाणे सात लाख रुपये संदीपच्या घरी नेऊन त्याच्या वडिलांकडे सुपूर्द केले आणि लग्न ५ मे २०२१ ला करण्याचे ठरले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी लग्नाची जोरदार तयारी सुरु केली. मंगल कार्यालय बुक झाले, लग्नपत्रिका छापल्या, इतर सर्व साहित्य खरेदी केले. मात्र, २३ मार्चपासून संदीपने त्याचा मोबाईल बंद केला. अखेर ४ एप्रिलला डॉ संदीपने त्याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याचे व्हिडीओ क्लिपमध्ये सोशलमिडीयाचा माध्यमातून सांगून लग्नास नकार दिला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून डॉ. संदीप मंत्रे याच्यावर येथील शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या औरंगाबाद, लातूर विभागातील प्रसिध्दी प्रमुखांच्या निवडी जाहीर.बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रचंड सोळंके यांची निवड.

बीड(प्रतिनिधी )अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या  मराठवाडयातील औरंगाबाद आणि लातूर अशा दोन्ही विभागातील जिल्हा प्रसिध्दी प़मुखांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून बीड जिल्हा प्रशिद्धी प्रमुख म्हणून बीडनेता चे संपादक प्रचंड सोळंके यांची निवड करण्यन्यात आली
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या औरंगाबाद व लातूर विभागातील जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या नेमणुका करण्यातआल्या कार्याध्यक्ष शरद पाबळे आणि सरचिटणीस संजीव जोशी यांनी सदरच्या निवडी जाहीर केल्या आहेत..राज्य प्रशिध्दी प्रमुख अनिल महाजन, उपाध्यक्ष सुरेश नाईकवाडे, प्रमोद माने, विभागीय सचिव प्रकाश कांबळे आणि विशाल साळुंखे यांनी केलेल्या शिफारशीं नुसार ही नावं परिषदेनं नक्की केली आहेत..  एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक यांनी नवनियुक्त प़सिध्दी प्रमुखांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या तर बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रचंड सोळंके यांच्या निवडी चे जेष्ठ संपादक राजेंद्र आगवान, नरेंद्रजी कांकरिया,दिलीपराव खिस्ती, राजेंद्र होळकर शेख तय्यब,साहस अदोडे,परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष चौरे, दत्तात्रय आंबेकर,विलास डोळसे, शेख मज्जीद, व मित्र परिवाराने निवडीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या

आषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा "लाल परी" तून प्रवास अनिल परब यांची माहिती.

मुंबई- आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तीरसात चिंब होऊन, विठू नामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. कोरोनाचे संकट पाहता मा. उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांनी राज्य शासनाच्या वतीने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील १० मानाच्या पालख्यांसाठी एसटीची " लालपरी " धावणार आहेत. हा पालखी सोहळा नेत्रदीपक तसेच वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी महामंडळ " लालपरी" बसेस देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष् ॲड. अनिल परब यांनी दिली

मागील वर्षी प्रमाणे यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान एसटीला मिळाल्याबद्दल ॲड. परब यांनी समाधान व्यक्त करत वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची अशीच संधी मिळो, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. १९ जुलै रोजी या बसेस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थांनाना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आपल्या जिल्ह्यातील संस्थान विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालख्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत असल्याबाबत आश्वस्त करावे, अशा सूचना स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाकडून देण्यात आले आहेत. असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष् ॲड. अनिल परब यांनी सांगितले. या पालख्यांचा मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंतचा प्रवास एसटीच्या बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व बसेस निर्जंतूकीकरण करण्यात येतील. तसेस प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री, ॲड. परब यांनी सांगितले.

कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य :19 जून, 2021.


 

  • मेष
    तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. आजचा दिवस प्रेमाच्या रंगात बुडालेला राहील परंतु, रात्रीच्या वेळी कुठल्या जुन्या गोष्टीला घेऊन तुम्ही भांडण करू शकतात. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. यावेळचा उपयोग तुम्ही आपले शोक पूर्ण करण्यात लावू शकतात. तुम्ही काही पुस्तके वाचू शकतात किंवा आपले आवडते म्यूजिक ऐकू शकतात. तुमचा/तुमची आज खूप चांगल्या मूडमध्ये आहे. तुम्हाला आज सरप्राइझ मिळेल. आज सुट्टीच्या दिवशी मल्टीप्लेक्स मध्ये जाऊन चांगला सिनेमा पाहण्याचा आनंद अजून काय असू शकतो.
    लकी क्रमांक: 6
  • वृषभ
    तणावाकडे दुर्लक्ष करू नका. तंबाखूसेवन आणि मद्यसेवनासारखेच तणाव हाही संसर्गजन्य विकार आहे. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. ज्या नातेवाईकांनी आपल्याला कठीण समयी मदत केली असेल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे हे छोटेसे भावप्रदर्शनदेखील त्यांचा उत्साह वाढवू शकते. कृतज्ञता ही आयुष्याची खुमारी वाढवणारी असते आणि उपकार न मानणे हा दोष असतो. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. व्यस्त दिनचर्येचा व्यतिरिक्त ही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल. रिकाम्या वेळात आज काही रचनात्मक कार्य करू शकतात. आजा नातेवाईक हे तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकेल. दिवस उत्तम आहे आज तुमचा प्रिय तुमच्या कुठल्या गोष्टीवर खूप आणि मनमोकळा हसेल.
    लकी क्रमांक: 5
  • मिथुन
    तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते जितके शक्य असेल तितके या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल – परंतु तुमच्या आजुबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका किंवा तुम्ही एकटे पडाल. तुमच्या जोडीदाराचे मागचे पाच सोशल मीडिया स्टेटस तपासा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमच्या अवतीभवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका. टीव्ही वर सिनेमा पाहणे आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत गप्पा करणे, यापेक्षा उत्तम काय असू शकते? जर तुम्ही थोडा प्रयत्न केला तर, तुमचा दिवस काही याप्रकारे व्यतीत होईल.
    लकी क्रमांक: 3
  • कर्क
    भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसेल – तुमचे अनपेक्षित वागणे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांना गोंधळात टाकेल आणि तुम्हीसुद्धा निराश व्हाल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. मित्रांकडून तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला अधिक आधार मिळू शकेल. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल – म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. आज अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील – ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे दिसते. घराच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तींना आज आपल्या घरात खूप आठवण त्रास देईल. मनाला हलके करण्यासाठी तुम्ही घरच्यांसोबत बऱ्याच वेळेपर्यंत गप्पा करू शकतात.
    लकी क्रमांक: 6
  • सिंह
    यश हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना आपली ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंता नक्कीच होईल परंतु, यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असेल, सहयोगी बनून काळजीपूर्वक परिस्थिती हाताळा. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्त्रोत आहे याचा अनुभव मिळेल. गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. आपल्या आनंदाला व्यक्त करा यामुळे तुमच्याने जोडलेल्या लोकांना ही आनंद होतो.
    लकी क्रमांक: 5
  • कन्या
    तुम्हाला ज्या पद्धतीने जे वाटते त्यावर नियंत्रण ठेवा. ज्या लोकांनी लोन घेतले होते त्यांना त्या कर्जाच्या राशीला चुकवण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे – त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. आपल्या कामापासून आराम घेऊन तुम्ही आज काही वेळ आपल्या जीवनसाथी सोबत ही व्यतीत करू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता, हे व्यक्त करा. मुलांसोबत वेळ कसा जातो कळत नाही हे तुम्हाला आज त्यांच्या सोबत वेळ व्यतीत केल्यावर करेल.
    लकी क्रमांक: 3
  • तूळ
    मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. घरातील सणांचे उत्सवाच वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते ज्या कारणाने तुमचे मन दुखी होऊ शकते आणि तुम्ही बऱ्याच काळ विचार करण्यात घालवू शकतात. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल. व्यावसायिकांना थांबलेल्या योजना परत चालू करण्यासाठी आज विचार केला पाहिजे.
    लकी क्रमांक: 5
  • वृश्चिक
    तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैश्याची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्व ही देऊ शकतात. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. आपल्या उत्तम लेखन सोबत आज तुम्ही कुठल्या अकाल्पनिक उडान घेऊ शकतात.
    लकी क्रमांक: 7
  • धनु
    कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. आपण ज्याची काळजी करतो अशा व्यक्तीशी संवाद न झाल्यामुळे उदासवाणा दिवस. तुमच्या प्रेम जीवनात नवीन वळण येईल. तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अश्यात कुठला ही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. तुमचे घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील परंतु, तुम्ही आपल्या धून मध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते. काहींच्या मते लग्न म्हणजे भांडणं आणि सेक्स, आजा मात्र सगळं शांत आणि प्रसन्न असेल. तुम्हाला वाटेल की, तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हाला समजून घेत नाही म्हणून, तुम्ही त्यांच्यापासून आज दुरी ठेवाल.
    लकी क्रमांक: 4
  • मकर
    तुम्हाला उत्तेजित करणा-या, उल्हसित करणाºया उपक्रमात स्वत:ला गुंतवा, त्यामुळे तुम्हाल बराच आराम मिळेल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखदायक असेल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल – कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. वेळेचा सदुपयोग करणे शिका.जर तुमच्या जवळ रिकामा वेळ आहे तर, काही रचनात्मक करण्याचा प्रयत्न कराल. वेळेला खराब करणे चांगली गोष्ट नाही. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल, तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल. व्यक्ती पैश्यामुळे आपले स्वास्थ्य खराब करू शकतात, आणि नंतर स्वास्थ्यासाठी पैसा- स्वास्थ्य अमूल्य आहे म्हणून, आळस त्याग करून आपल्या शारीरिक सक्रियतेला वाढवणे फायदेशीर राहील.
    लकी क्रमांक: 4
  • कुंभ
    सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात परंतु, तरी ही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या असतील. प्रेमामध्ये जोरजबरदस्ती टाळा. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईझ देऊ शकतात. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही त्यांच्या सोबत वेळ घालवू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज तोडी मोकळीक हवी असेल. घराच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तींना आज आपल्या घरात खूप आठवण त्रास देईल. मनाला हलके करण्यासाठी तुम्ही घरच्यांसोबत बऱ्याच वेळेपर्यंत गप्पा करू शकतात.
    लकी क्रमांक: 2
  • मीन
    एखादा मित्र किंवा जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मन:शांती गमावून बसाल. आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते म्हणून, जितके शक्य असेल याची काळजी घ्या. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. प्रिय व्यक्तीला फुले आणि सुंदर भेटवस्तू देऊन संध्याकाळ प्रणयराधनेत घालवाल. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वत:साठी चांगले कपडे घ्याल. तुमच्या आजुबाजूची माणसं असं काहीतरी करतील, ज्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. आपल्या कामाकडे आज तुमचे चांगले लक्ष असेल. तुमच्या कामाला पाहून आज बॉस तुमच्याशी खुश होऊ शकतात.
    लकी क्रमांक: 9

Friday, June 18, 2021

दोन जातित तेढ निर्माण करणाऱ्या लिपिकास कडक शासन करा.मराठा क्रांती मोर्चाचे पोलिसांना निवेदन.


परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) परळी वैजनाथ येथी महर्षी कणाद विद्यालयाचे लिपिक केशव भांगे यांनी शाळेचे शिक्षक सतीश जाधव यांना अश्लील व जातीयवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी परळी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भांगे यास कडक शासन करून त्याला पायबंद करावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकळ मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, समाज माध्यमात फिरत असलेल्या एका ऑडिओ क्लीप मध्ये मराठा समाजाविरोधात एका अज्ञान व्यक्तीने मराठा समाजाचे नाव घेवून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे भाष्य केले आहे तसेच अक्षेपार्ह भाष्य करून कोणत्याही महिलेला लज्जा निमाण होईल अशा प्रकारची भाषा वापरली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत तरी संबंधित व्यक्ती विरोधात तात्काळ कायदेशिर कारवाई करावी. तसेच संबंधित व्यक्ती ही शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात काम करत आहे हे त्याच्या संभाषणावरून लक्षात येते समाज माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीची शिक्षण संस्था आहे असे प्रचित होते. त्यामुळे हया व्यक्तीची अशा भाषामुळे त्या संस्थेत प्रवेश घेतलेले विदयार्थी विदयार्थीनी यांच्या मनावर परिणाम होवू शकतो त्याच्या या अश्लिल भाषेमुळे त्याच्या संस्थेतील विदयार्थीनी सुरक्षीत असतील की नाही असा प्रश्न समाज मनाला 

पढणे सहाजीक आहे त्यामुळे या संस्थेवर तात्काळ प्रशासक नेमावा. तसेच सदरील ऑडिओ क्लिपमधून सबंधित व्यक्ती ही समोरील व्यक्तीला जिवे मारण्याची धमकी देत आहे. धमकी देत असताना ऑडिओ क्लिीप बारकाईने ऐकली असता एका महिलेचा आवाज येत आहे. यावरून असे प्रतित होते की, सदरील महिला त्या धमकी देणा-या व्यक्तीच्या आसपास उभा आहे. तरीसुध्दा त्या महिलेने सदरील व्यक्तीस बांबवण्यास कसलाच प्रयत्न केल्याचा दिसून येत नाही. म्हणजेच समाजाची अशी धारणा होते की, सदरील महिलासुध्दा या संपूर्ण अॅडिओ क्लिपच्या प्रकारात समाविष्ट आहे. सबब जातिवाचक तेढ निर्माण करणा-या या संबंधित व्यक्तींवर कायदेशिर कारवाई करावी. अन्यथा सकल मराठा समाजातर्फे तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी सकळ मराठा समाजाचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.

ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला शैक्षणिक सवलती द्या - मराठा क्रांती मोर्चा .

* उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली मागणी.

बीड (प्रतिनिधी )दि.१८ मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर समाजात प्रंचड असंतोष आहे यानंतर प्रथमच राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार हे बीड दौऱ्यावर आले असताना मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन समाजाच्या मागण्याचे निवेदन देऊन  चर्चा केली. 
      यावेळी राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी,  9 सप्टेंबर 2020 च्या आगोदर ज्यांच्या नौकर्यात नेमणुका झाल्या आहेत त्यांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात.सारथी साठी भरीव निधी द्यावा,प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजातील मुला मुली साठी यस्तिगृह उभारावे. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला घरी नाही देवुन कर्ज मर्यादा दहा लेखावरून पंचवीस लाख करावी , जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती द्याव्यात यामागण्याचे निवेदन देण्यात आले. वरील मागण्या ह्या योग्य असुन काही दिवसातच या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील असे स्पष्ट आश्वासन अजितदादांनी शिष्टमंडळाला दिले.
      यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे पालकमंत्री धनंजय मुंडे आ.संदिप क्षीरसागर क्रांती मोर्चाचे समन्वयक अशोक हिंगे गंगाधर काळकुटे रमेश चव्हाण सुनील सुरवसे सचिन उबाळे महेश धांडे विजय लव्हाळे विठ्ठल बहीर संतोष जाधव अॅड.शशिकांत सावंत मळीराम यादव शैलेश जाधव राहुल टेकाळे अशोक सुखवसे, जयमल्हार बागल रवी, शिंदे, प्रा. गोपाळ धांडे, संदीप उबाळे भागवत मस्के बालाजी पवार, श्रीकांत बागलाने, रोहन काळे आदि उपस्थित होते.

बीड येथे आरोग्य कर्मचाऱ्याकडुन उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न .पोलिसांनी केला सौम्य लाठीचार्ज.


कोरोना संकटाच्या काळात आम्हाला कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक दिली. मात्र तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होण्याआधीच आम्हाला नोकरीवरुन काढल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेऊन ते उस्मानाबादकडे निघाले असतानाच आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचे काही प्रतिनिधी हे अजित पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, मात्र अचानक आंदोलक गाडी समोर आलेअचानक गाडी समोर आलेल्या आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केली यावेळी आंदोलकांना गाडीच्या बाजूला हटवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुद्धा केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे

बाप रे भयानक ! म्युकरमायकोसिसमुळे तीन मुलांचे डोळे काढावे लागले.


मुंबई  (प्रतिनीधी ) राज्यात म्युकरमायकोसिसच्या आजाराचे संकट किती धोकादायक ठरू शकते याचा पुन्हा एकवार प्रत्यय आला आहे. काही दिवसांपूर्वी मोठ्या वयोगटातील लोकांपुरता मर्यादित असलेल्या म्युकरमायकोसिसने आता लहान मुलांनाही कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत म्युकरसमायकोसिसमुळे नुकतीच तीन लहान मुलांचे डोळे काढण्याची वेळ ओढावली. 

प्राथमिक माहितीनुसार, या तिन्ही मुलांचे वय अनुक्रमे चार, सहा आणि 14 इतके होते. या तिघांच्या शरीरात म्युकरमायकोसिसचा फैलाव झाल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांचे डोळे काढावे लागले. या तिघांपैकी केवळ 14 वर्षांच्या मुलाला मधुमेहाचा त्रास होता. तर मुंबईत उपचार घेत असलेल्या आणखी एका 16 वर्षांच्या मुलाला कोविडमधून बरे झाल्यानंतर मधुमेहाची व्याधी जडल्याचे समोर आले आहे. यामुळे आता मुंबईतील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. म्युकरमायकोसिस हा अत्यंत वेगाने शरीरात पसरतो. अशातच आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

जीव वाचवण्यासाठी डोळे काढण्याची वेळ

16 वर्षांच्या मुलीला कोरोना झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला अगोदरपासून मधूमेह नव्हता. मात्र, वैद्यकीय तपासणीत तिच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसून आले. तिच्या आतड्यात रक्तस्राव होत होता. अँजिओग्राफी केल्यानंतर या मुलीला म्युकरमायकोसिसची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तर चार आणि सहा वर्षांच्या मुलांनाही म्युकरमायकोसिसची बाधा होऊन त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली होती. अखेर या मुलांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना नाईलाजाने त्यांचे डोळे काढण्याचा निर्णय घ्यावा लागला.

भर रस्त्यात काँग्रेस आमदाराच्या नातेवाईकाची हत्या. एकच खळबळ.


नांदेड (प्रतिनीधी ) काँग्रेसचे कार्यकर्ते आणि व्यापारी बाजीराव हंबर्डे यांचा मृतदेह रस्त्यात सापडल्यामुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हंबर्डे हे नांदेडमधील काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांचे जवळचे नातेवाईक होते. बाजीराव हंबर्डे यांच्या हत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विष्णुपुरो भागातील व्यापारी बाजीराव हंबर्डे हे नांदेडमधील काँग्रेसचे कार्यकर्ते होते. शुक्रवारी त्यांचा मृतदेह नांदेडच्या वाघाळा रोडवर आढळला. त्यांच्या मृतदेहाजवळ बाईकही सापडली आहे. बाजीराव हंबर्डे यांच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांची हत्या कोणी केली, हेही अद्याप समजलेलं नाही. बाजीराव हंबर्डे हे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांचे जवळचे नातेवाईक होते. बाजीराव हंबर्डे यांच्या भावाच्या तक्रारीवरुन हत्या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची राजकीय किंवा व्यावसायिक वैमनस्यातून झाली, की अन्य कारणामुळे याचा शोध पोलीस घेत आहेत.

सावधान ! राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस.


मुंबई (प्रतिनीधी ) भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसायट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. सातारा, पुणे आणि रत्नागिरीला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग , रायगड आणि पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूरला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राला ऑरेंज अ‌ॅलर्ट

पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांमध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये विविध ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

19 आणि 20 जूनला महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात रेड किंवा ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

धर्मांतरास विरोध केल्यामुळे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार.

धर्मांतर करून इस्लाम स्विकारायला विरोध केल्यामुळे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची क्रूर घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बलात्काराच्या घटनेतून ही पिडीत मुलगी गरोदर राहिली असून तिने एका मृत बालकाला जन्मही दिला. नाशिक जवळील मालेगाव येथे ही घटना घडली असून ही अल्पवयीन मुलगी मूळची मध्य प्रदेशची रहिवासी आहे. या संपूर्ण घटनेत लव्ह जिहादचाही पैलू असून मुख्य आरोपीने आपली मूळ ओळख लपवून हिंदू नाव धारण करत या पिडीत मुलीशी मैत्री केली होती.

मध्यप्रदेशमधील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कामानिमित्त मालेगाव येथे येऊन स्थायिक झाली होती. तिथे २३ वर्षांच्या माजिद खान या युवकाने स्वतःला मोहित असल्याचे भासवत त्या मुलीशी मैत्री केली. लग्नाचे अमिष दाखवत त्या मुलीचा गैरफायदा घेण्यात आला. त्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मोहित उर्फ माजिद खानकडून धर्मांतरासाठी तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. पण धर्मांतरासाठी तिने नकार दिल्यावर माजिद आणि त्याच्या इतर तीन मित्रांनी मिळून त्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

ही घटना घडल्यानंतर ती पिडीत मुलगी उज्जैन येथे आपल्या बहिणी सोबत राहण्यास आली. या वर्षी एप्रिल महिन्यात पिडीतेच्या पोटात दुखू लागले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यावर ती गरोदर असल्याचे समोर आले. त्या पिडीत मुलीची प्रिमॅच्युअर डिलिव्हरी पार पडली असून तिने एका मृत बाळास जन्म दिला. रुग्णालयात असताना या पिडीत मुलीने रुग्णालयातील एका महिलेला घडलेला सारा प्रकार सांगितला. त्यानंतर त्या महिलेने एका हिंदू संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी आणि पोलिसांची संपर्क साधला.

या विषयात मध्य प्रदेश पोलिसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत तसेच मध्यप्रदेशच्या धार्मिक स्वातंत्र्य कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उज्जैनचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अमरेंद्र सिंह यांनी याविषयी माहिती दिली असून महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने या प्रकरणातील मुख आरोपी असलेल्या माजिद खानला अटक करण्यात आली आहे. पिडीत मुलीच्या सहाय्याने खान याला उज्जैन येथे बोलावण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.