Wednesday, November 30, 2022

राज्य सरकार करणार जि. प. च्या 30 हजार शिक्षकांची मेगा भरती, 'या' महिन्यात होणार 'टेट' परीक्षा.

 

मुंबई (प्रतिनिधी) जिल्हा परिषद शाळांमध्ये 29,600 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या शिक्षक भरतीसाठी फेब्रुवारी-2023 मध्ये शिक्षक पात्रता चाचणी (टेट) होणार असून, निकाल मार्चमध्ये जाहीर केला जाईल. मेरिटनुसार पात्र उमेदवारांना पवित्र पोर्टलद्वारे जूनपूर्वी थेट नियुक्ती दिली जाईल.

राज्यात गेल्या चार वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने लवकरच शिक्षक भरती करण्याचे नियोजन केले आहे.
फेब्रुवारीत होणार 'टेट'

पहिली ते आठवीच्या शाळांवरील शिक्षकांसाठी 'टीईटी', तर नववी ते अकरावीपर्यंत शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टेट’ परीक्षा घेतली जाणार आहे. फेब्रुवारीत ही परीक्षा होईल. त्यासाठी सहा हजारांहून अधिक केंद्रांवर ही परीक्षा होईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.

परीक्षेच्या नियोजनासंदर्भात शालेय शिक्षण विभाग उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. परीक्षेचा निकाल जाहीर होताच, भरती प्रक्रिया सुरु होईल,परंतु त्यासाठी वित्त व नियोजन विभागाचा ‘हिरवा कंदिल’ मिळणे आवश्यक आहे.

काळ आला होता पण...'पुलावरून खाली कोसळला पिकअप; पोलिसांच्या सतर्कतेने चालक सुखरूप.

 कडा (कांतीकारी साथी न्युज) - वेळ आज पहाटे अडीज वाजेची शेवगाववरून कांदा भरून एक पिकअप कडा येथील येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत येत होता. पैठण बारामती रोडवरील कडा नजीक अचानक चालकाचा ताबा सुटल्याने वाहन पुलावरून खाली कोसळले. याच वेळी पेट्रोलिंग करत असलेल्या कडा पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत चालकाल बाहेर काढले. यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. हा प्रसंग पाहून काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचीती आली.

 शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथील सोमनाथ कचरू जाधव हा मंगळवारी रात्री पिकअप ( क्रमांक एम.एच २०,डी.ई.६८९९) मध्ये कांदा गोण्या घेऊन कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पैठण बारामती रोडने येत होता. कडा नजीक येताच चालकाला झोप लागल्याने अनियंत्रित पिकअप पुलाच्या खाली गेले. यात चालक वाहनात अडकून पडला. 

याचवेळी नाईट राऊड पेट्रोलिंग करत असलेले कडा पोलिस चौकीचे हवालदार बाबासाहेब राख, वाहन चालक प्रदिप घोडके यांना हे दृश्य दिसले. त्यांनी लागलीच अपघातग्रस्त वाहनाकडे धाव घेतली. प्रयत्न पूर्वक पोलिसांनी चालकाला सुखरूप बाहेर काढले. पोलिसांच्या सतर्कतेने जाधवचे प्राण वाचले. भल्या पहाटे पोलिस देवाच्या रूपात पुढे उभा ठाकल्याने मला जिवदान मिळाल्याची प्रतिक्रिया चालक सोमनाथ जाधव याने दिली.

मोठी बातमी ! देवस्थान जमीन घोटाळ्यात भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल.


*बीडमध्ये खळबळ: आ. सुरेश धस यांच्या पत्नी, भावाचाही आरोपींत समावेश आहे. 

बीड (कांतीकारी साथी न्युज) आष्टी तालुक्यातील कथितआठ हिंदू देवस्थान जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणी २९ नोव्हेंबरला मोठी घडामोड घडली. भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी प्राजक्ता, बंधू देविदास, मनोज रत्नपारखी , अस्लम नवाब खान यांच्यावर भ्रष्टाचार  प्रतिबंध अधिनियम १९८८, बनावट कागदपत्रे तयार करून कट रचून फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील हिंदू  देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात गुन्हे दाखल करून चौकशी करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे पाठपुरावा करीत आहेत. खाडे यांच्याच याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १८ ऑक्टोबर रोजी राम खाडे यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हे दाखल करण्याचे आदेश लंचला;उचपात प्रतिबंधक विभागाला दि होते. खाडे यांनी आपल्या  तक्रारीत आ. सुरेश धस यांचे नाव घेतलेले असल्याने आ. सुरेश धस यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर  सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवीत आ.सुरेश  धस यांची याचिका फेटाळली आहे. दरम्यान, तक्रारदार राम खाडे यांची १३ जानेवारी २०२२ ची तक्रारच एफआयआर समजून गुन्हा दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते, त्यानुसार २९ रोजी  कलम १३(१)(अ) (ब),१३ (२) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८सह कलम- ४२०,४६५,४६७,४६८,४७१,१२० (ब)१०९ भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे करत आहेत.
आमदार धसांवर असा आहे ठपकाआमदार धस यांनीपदाचा गैरवापर करून इतर आरोपींशी कट करून देवस्थानाच्या इनाम जमीन, शासनाच्या जमीन, सहकार विभागाच्या जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून ते खरे आहेत,असे भासविले. देवस्थानच्या इनाम जमिनी बेकायदेशीर मार्गाने खालसा आदेश करून घेऊन मनोज रत्नपारखी व इतरांच्या नावे करून शासनाची फसवणूक केली. व बेकायदेशीर मार्गाने स्वतः चे व इतरांचे नावाने कोट्यावधी रुपयाची अपसंपदा मिळवली असा ठपका ठेवला आहे.
आमदार धसांवर असा आहे ठपका. 
आमदार धस यांनीपदाचा गैरवापर करून इतर आरोपींशी  कट करून देवस्थानाच्या इनाम जमीन, शासनाच्या जमीन, सहकार विभागाच्या जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून ते खरे आहेत,असे भासविले. देवस्थानच्या इनाम जमिनी बेकायदेशीर मार्गाने खालसा आदेश करून घेऊन मनोज रत्नपारखी व इतरांच्या नावे करून शासनाची फसवणूक केली. व बेकायदेशीर मार्गाने स्वतः चे व इतरांचे नावाने कोट्यावधी रुपयाची अपसंपदा मिळवली असा ठपका ठेवला आहे.

नवाब मलिकांची तुरूंगातून सुटका होणार? जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी.

मुंबई ( प्रतिनिधी)  आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज (बुधवार) मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना आज बेल मिळणार की पुन्हा त्यांची रवानगी जेलमध्ये होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. मलिक सध्या कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, नवाब मलिक हे सरकारमधील मंत्री होते. त्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून ईडीने त्यांना 23 फेब्रुवारीला अटक केली होती. याशिवाय गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदीच्या व्यवहारात नवाब मलिक यांनी आर्थिक गैरव्यवहार केला, असा आरोपही ईडीकडून करण्यात आला. 

यापूर्वी नवाब मलिक यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणी अजून वाढणार हे पाहावे लागणार आहे. सुमारे पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिक यांच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप याप्रकरणात दिलासा मिळाला नाही.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे ईडीच्या कचाट्यातून सुटले असून अनिल देशमुखांना देखील ईडीचा जामीन मिळाला आहे. आता मलिकांना देखील आज सकाळी 11 वाजता मुंबई सत्र न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल. आता नवाब मलिक यांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संतापजनक घटना.! रिपाइंच्या (आठवले) जिल्ह्याध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल महिलेला गरोदर करून, तीला लाथा बुक्क्यांनी मारहाण...


औरंगाबाद (प्रतिनिधी) औरंगाबाद येथून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली असून, एका महिलेला गर्भवती करून.! नंतर तिला मारहाण करीत तिचं गर्भपात केल्याचं सांगण्यात येत आहे. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला असून, त्यांच्यावर औरंगाबादमधील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेमुळे औरंगाबाद शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगू लगलई आहे. घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

सविस्तर माहिती अशी की, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांच्यावर शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात विवाहित महिलेसोबत बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहित महिलेच्या पतीला धमकावून तिला पतीपासून विभक्त केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. तसेच तुझ्या मुलांना सांभाळेल, तुझ्या सोबत लग्न करेल, तुला घर देईल असे आमिष दाखवून शहरातील राजनगर परिसरात रूम घेऊन वारंवार महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संबंधातून सदर महिला गरोदर राहिली.! त्यानंतर महिलेने लग्नासाठी तगादा लावला असता;  रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे याने महिलेच्या पोटात लाथ मारून गर्भपात केला. तू जर कोणाला सांगितले तर तुझ्या मुलांना ठेवणार नाही असे धमकावले. मात्र त्रास असह्य झाल्यावर महिलेने पोलिसात धाव घेतली व महिलेच्या या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून, कांबळे याला तात्काळ अटक केले आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयात हजार केले असता; त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून. या नंतर कांबळे याची पक्षातून पाच वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. तर या घटनेची औरंगाबाद परिसरात जोरदार चर्चा रंगलीय

शिंदे सरकारचा अतिक्रमणासंदर्भात मोठा निर्णय.! गायरान जमिनीवरील एकही घर पडणार नाही?



पुणे (प्रतिनिधी) मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एक-दोन नव्हे तर लाखो नागरिकांना टेंशन देणारा निर्णय म्हणजे.! कोर्टाने दिलेला गायरान आणि वन जमणीवरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय. परंतु, या निर्णयावर तोडगा काढत; राज्य सरकार लवकरच महत्वाचा निर्णय घेण्याचा विचारात असून, गायरान जमिनीतील अतिक्रमणधारकांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.

गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात गायरान जमिनीवरील अतिक्रिमण हटवण्यासंदर्भात गावागावात नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, गायरान जमीनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत असा निर्णय आज घेतला आहे. त्यामुळं राज्यातील सुमारे सव्वादोन लाख कुटुंबांना याचा फायदा मिळणार असून, गायरान जमिनीतील अतिक्रमणधारकांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार गायरान जमीनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात महसूल विभागाने संबंधितांना नोटिसा बजावल्‍या आहेत. परंतु, या गरीबांची घरे निष्कासित करणे  योग्य नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी आग्रहपूर्वक मांडले. त्यांच्या या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत एकाही व्‍यक्‍तीचे अतिक्रमण काढले जाणार नाही असे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तर लवकरच यासंदर्भात राज्‍य सरकार सर्वोच्‍च न्‍यायालयात फेरयाचिका दाखल करणार असल्याचे मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.


औरंगाबादकरांची चिंता वाढली; राज्यातील गोवरग्रस्त 11 शहरांमध्ये औरंगाबादचा समावेश.

औरंगाबाद - मुंबई, मालेगावसह राज्यातील गोवरग्रस्त 11 शहरांमध्ये आता औरंगाबादचा समावेश झाला असून, शहरातील नेहरुनगरची प्रमुख बाधित विभाग म्हणून नोंद झाली आहे. शहरात आतापर्यंत 96 संशयित रुग्ण आढळले असून, 7 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. यामुळे मात्र काहीप्रमाणात शहराच्या चिंतेत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील पालकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. जिल्ह्यातील संशयित रुग्णांमध्ये वाढ झाली असली तरी नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

कोरोनाच्या कचाट्यातून सावरत असतानाच आता राज्यामध्ये गोवर या आजार थैमान घातले आहे. सुरुवातीला मुंबईमध्ये या आजाराची रुग्ण आढळून आली होती त्यानंतर हळूहळू हा आजार इतर शहरांमधे पसरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुलांसाठी शहरातील 40 आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येतीय. पालकांनी आपल्या मुलांना या आजारापासून दूर ठेवायचं असेल तर त्यांनी प्राधान्याने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.

*वडाळ्यात ५ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू. 

मुंबईत गोवरने 15 वा बळी घेतला आहे. वडाळा येथे राहणाऱ्या गोवर संशयित पाच महिन्यांच्या मुलाचा गोवरने मृत्यू झाला. या मुलाला सर्दी, खोकला, ताप, चेहरा तसेच छातीवर पुरळ अशी लक्षणे होती. मुंबईत गोवर रुग्णसंख्या वाढतच असून मंगळवारी दिवसभरात 118 गोवर संशयित रुग्ण आढळले. यामध्ये मुंबईतील एकूण गोवर संशयित रुग्णांची संख्या आता 4 हजार 180 वर पोहोचली आहे. तर गोवर निदान झालेल्यांची संख्या 308 झाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी गोवर संशयित मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील गोवर संशयित मृतांचा आकडा 15 झाला आहे.

*गोवर कशामुळे होतो?

गोवरचा संसर्ग हा नेमका कशामुळे होतो? हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. जेणेकरून त्यापासून बचाव करता येईल. गोवर हा आर एन ए विषाणूजन्य आजार आहे. हा पॅरामिक्सोव्हायरस प्रकारचा विषाणू मानवी शरीराबाहेर तग धरू शकत नाही. गोवराच्या एका रुग्णाकडून इतर बालकांपर्यंत त्याचा प्रसार होतो.

*गोवरची लक्षणे कोणती?

प्रत्यक्ष गोवराची लक्षण दिसून येण्याआधी आणि पुरळ उठण्याच्या सुरवातीच्या काळात हा संसर्गाचा जोर सर्वात जास्त असतो. पुरळ येण्यापूर्वी ४ दिवस व पुरळ उठल्यानंतरचे ४ दिवस संक्रमणाच्या दृष्टींने सर्वात महत्वाचे असतात. या काळात रुग्ण्याचे विलगीकरण आवश्यक ठरते. एकदा गोवर होऊन गेल्यास सहसा परत गोवर होत नाही. शिंका किंवा खोकल्यातून बाहेर पडणारे द्रावकण या विषाणूच्या संसर्गास कारणीभूत असतात.

दोन दिवसांपासून घरी नसलेल्या युवकाचे धक्कादायक कृत्य.ओव्हरटेक करणाऱ्या बसवर धावत्या ट्रॅक्टर मधून घेतली उडी; खाली आदळून जागीच ठार.

माजलगाव (कांतीकारी साथी न्युज) तालुक्यातील शृंगारवाडी फाट्याजवळ दोन ट्रॉल्या घेऊन भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणाऱ्या एसटी बसवर अचानक ट्रॅक्टरमधील युवकाने उडी मारली. यामुळे तो एसटीच्या डाव्या बाजूला धडकून रोडवर आदळला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. गजानन मारोती बनाईत (३२, रा. शुक्लतीर्थ लिमगाव ता.माजलगाव ) असे मृताचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सिरसदेवीहून २ ट्रॉल्या असलेले ट्रॅक्टर कोळसा घेऊन माजलगावकडे जात होते. याच दरम्यान पाठीमागून एक बस ( कल्याण - वसमत,  एम.एच.20 बी.एल.4088 ) ओव्हरटेक करत होती. बस ट्रॅक्टरच्या पुढे निघत असतानाच मागील ट्रॉलीमध्ये बसलेल्या गजानन मारोती बनाईतने अचानक बससमोर उडी मारली. एसटीच्या डाव्या बाजूला समोरील टायरच्या बाजूला तो धडकडा. त्यानंतर तो खाली आदळला. गजाननच्या ओरडण्याने आजूबाजूचे नागरिक बसकडे धावले. मात्र, खाली आदळून डोक्याला पाठीमागून जबर मार लागल्याने गजाननचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान संबंधित ट्रॅक्टर चालकाने तेथून पळ काढला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


Tuesday, November 29, 2022

जागतिक एड्स दिन रॅली व जनजागृती कार्यक्रमांनी होणार साजरा.

बीड ( प्रतिनिधी ) :- 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून सर्वत्र पळाला जातो. यावर्षीचे घोषवाक्य "आपली एकता आपली समानता,एचआयव्हीसह  जगणाऱ्या करिता" हे आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वैयक्तिक, सामाजिक व शासकीय पातळीवर जबाबदारी घेऊन जागरूकता निर्माण करण्याकरता प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय बीड मार्फत जागतिक एड्स दिन व महिना साजरा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 1 डिसेंबर २०२२ ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय,, ग्रामीण रुग्णालय कुटीर रुग्णालय येथे विविध जनजागृती पर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी सकाळी ठीक 08:00 वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रभात फेरीचे उद्घाटन जिल्हाधिकारी व  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते होऊन रॅलीला सुरुवात होणार आहे. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- कारंजा - बलभीम चौक - धोंडीपूरा - माळीवेस - सुभाष रोड - साठी चौक - बस स्टॅन्ड - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने सामाजिक न्याय भवन येथे प्रभात फेरीचा समारोप  होणार आहे.
शहरातील महाविदयालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी व सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन डॉ. सुरेश साबळे जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड व श्री सुहास कुलकर्णी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बीडमध्ये हौशी नाट्य स्पर्धेस प्रारंभ. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. दीपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते झाले उदघाटन.

*एकापेक्षाएक नाट्यांचा रसिकांनी आनंद घ्यावा - बिभीषण चवरे

बीड ( प्रतिनिधी ) :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून ६१ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दि. 28 नोव्हेंबर ते ६ डीसेंबर या कालावधीत सायंकाळी ७ या वेळेत पार पडणार आहेत. या स्पर्धेचे उदघाटन अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. दीपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. केशव भागवत, नाट्यकलावंत प्रवीण वडमारे, दैनिक पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनिल डोंगरे, दिगदर्शक सचिन सोनवणे, कलावंत जतिन वाघमारे, स्पर्धेचे समन्वय
मुकूंद धुताडमल आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य संचालक  बिभीषण चवरे यांच्या नियोजनात्मक भूमिकेतून ६१ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा पार पडत आहे. त्या अनुषंगाणे बीड हे औरंगाबाद केंद्राचे उपकेंद्र असून या केंद्रावर नऊ नाटके सादर होणार आहेत.सोमवारी या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे उदघाटन पार पडले. या स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रकाश खोत, मीनाक्षी केंदे, प्रकाश सप्रे काम पाहणार आहेत. बीड जिल्ह्यातील रसिकांनी या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन उदघाटनावेळी मान्यवरांनी केले आहे. ही राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड केंद्र समन्वयक मुकूंद धुताडम, प्रविण निसर्गंध, प्रवीण राठोड, अक्षय कोकाटे, दिनेश पाटोळे, ऋषिकेश दाभाडे आदी परिश्रम घेत आहेत.

अशी होणार सादर नाटके

मुळाच्या तळाशी,दोन स्पेशल, अजूनही उजाडत नाही, बिहाईन्ड दी कर्टन, गोदो वन्स अगेन, अनाघ्रात, टेक अ चान्स, ही सर्व नाटके यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे रोज सायंकाळी सात वाजता होणार आहेत. या नाटकांचा बीडच्या रसिकांनी अधिकाधिक आस्वाद घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मिल्लिया कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश दहा विद्यार्थ्यांची एमबीबीएस साठी निवड.


बीड ( प्रतिनिधी ) :-  शहरातील अंजुमन ईशाअत ए तालीम संचलित मिल्लीया कनिष्ठ महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांचा देशाच्या विविध वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएस साठी प्रवेश निश्चित झाला आहे. यामुळे महाविद्यालयाने नेहमीप्रमाणे आपली पताका वैद्यकिय क्षेत्रात पुन्हा एकदा डौलाने फडकविली आहे.
   मिल्लीया कनिष्ठ महाविद्यालय कला आणि विज्ञान शाखेत फक्त बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेले महाविद्यालय आहे. येथून दरवर्षी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थी आपण मिळविलेल्या गुणवत्तेवर पुढे जाऊन त्या-त्या क्षेत्रात चांगले नावलौकिक करून समाजात एक जबाबदार आणि यशस्वी नागरिक म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत मिल्लीया कनिष्ठ महाविद्यालयामधून शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यातील अनेक जण विदेशात जाऊन सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत तसेच देशात सुद्धा काहीजण शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत आहेत तर काहींनी आपला स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय चालविला आहे. याशिवाय अभियंता म्हणून ही हजारो विद्यार्थी देश-विदेशात कार्यरत असून ते तिथे आपली सेवा यशस्वीपणे देत आहेत. कला विभागातील शेकडो विद्यार्थी न्यायालयीन क्षेत्रामध्ये वकील म्हणून तर काहीजण न्यायाधीश म्हणूनही कर्तव्यरत आहेत. यंदाही विज्ञान शाखेतील दहा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी वैद्यकीय क्षेत्रात चांगले यश प्राप्त करून एमबीबीएस मध्ये प्रवेश मिळविला आहे. यामधून काही जण महाराष्ट्रात तर काहीजण इतर राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणार आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये इन्शा फिरोज शेख उस्मानिया मेडिकल कॉलेज, हैदराबाद. सय्यद मसरूर फातिमा सय्यद अब्दुल सत्तार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद. सय्यद फैजान सय्यद मोईनुद्दीन वैद्यकीय महाविद्यालय, बदनापूर, जि. जालना. तन्जिला तसलीम शेख नसीर अहेमद वैद्यकीय महाविद्यालय, बदनापूर, जि. जालना. इरम सबा शकील वैद्यकीय महाविद्यालय बदनापूर, जि. जालना. तारीख अहेमद शेख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, उस्मानाबाद. रोशनी मुबारक शेख व्ही. आर.के. वैद्यकीय महाविद्यालय, हैदराबाद. खान आयेशा मसूद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, काजी मुहम्मद वजीरोद्दीन मुहम्मद कलीमोद्दीन व्ही.आय. वैद्यकीय महाविद्यालय, दिल्ली आणि शेख नासेर  मुदस्सीर अहेमद एम.जी.एम. वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद मध्ये नंबर लागला असून हे सर्व विद्यार्थी निवड झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस चे शिक्षण घेणार आहेत. या सर्वांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सलीम बिन अहेमद, सचिव खान सबीहा बेगम, प्राचार्य सय्यद अब्दुल सत्तार, डॉ. शेख समीर, डॉ. फैसल चाऊस, प्रा. जावेद पाशा, सय्यद अब्दुल रज्जाक आणि सर्व शिक्षकगण व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या सर्वांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांना बायोमेट्रिक हजेरीनुसारच वेतन आणि भत्ते.

  • आरोग्य विभाग आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश. 

मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील सरकारी हॉस्पिटल मधील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांना आता बायोमेट्रिक हजेरीनुसार वेतन आणि भत्ते मिळणार आहेत. आरोग्य विभाग आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा निर्णय घेतल्याने आरोग्य विभागात डॉक्टरांना चांगलाच घाम फुटला आहे.

तुकाराम मुंढे यांनी वैद्यकीय अधिका-यांसाठी एक अनोखा फतवा काढला असून, आता डॉक्टरांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही बायोमेट्रिक हजेरीच्या नुसारच त्यांना त्यांचे वेतन आणि भत्ते देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासकीय रुग्णालयांत नेमणूक झालेले डॉक्टर खासगी रुग्णालयात देखील सेवा देत असतात. त्यामुळे हे करत असताना शासकीय रुग्णालयांत उशिरा येणे किंवा सुट्टी घेऊन हजेरी पटावर हजर असल्याचा शेरा मारणे असे प्रकार करण्यात येतात. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बायोमेट्रिक हजेरीनुसार, डॉक्टर व वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतन आणि भत्ते देण्याचा फतवा काढला आहे.

नाहीतर शिस्तभंगाची कारवाई होणार

त्याचप्रमाणे शासकीय सेवेत कार्यरत असणा-या आपल्या कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिका-यांची नावे, खासगी रुग्णालयांची नोंद, अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांची तपशीलवार माहितीसह यादी सदर करावीअसे आदेश देण्यात आले आहेत.तसेच ही पद्धत अंमलात न आणल्यास अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे दांडीबहाद्दर आणि बेजबाबदार अधिकारी आणि डॉक्टरांना चांगलाच चाप बसणार आहे.

कर्तव्यनिष्ठ आय.ए.एस.अधिकारी तुकाराम मुंढें याची पुन्हा बदली.

मुंबई (प्रतिनिधी)  आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मात्र अद्याप त्यांना नवीन पोस्टिंग देण्यात आलेली नाही. कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून मुंढेंची बदली करण्यात आली आहे. कोणत्या विभागात बदली झाली याबाबत अजुनही स्पष्टता नाही.

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. आयुक्त, कुटुंबकल्याण संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावरुन त्यांना पदमुक्त करण्यात आलंय. मात्र, कुठे बदली होणार हे अजून स्पष्ट नाही.

तुकाराम मुंढे यांची बदली झाली आहे, पण अद्याप नव्या जागेवर पोस्टींग नाही. तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा विक्रम झाला आहे. आतापर्यंत 16 वर्षात तुकाराम मुंढेंच्या 20 पेक्षा जास्त वेळा बदली झाली आहे. दोन महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. स्पटेंबर 2022 मध्ये तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात होती. या दोन महिन्यात आरोग्य विभागात शिस्त आणण्याचा मुंढेंचा प्रयत्न होता. मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. दोन महिन्याच्या आत मुंडे यांचा कार्यभार काढला.

आपल्या धडाकेबाज कामांसाठी प्रसिध्द असलेले तुकाराम मुंढे हे 2005 सालच्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली आहे त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. ते ज्या ठिकाणी काम करायचे त्या ठिकाणच्या नागरिकांत त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत होतं.सामान्य लोकांना जरी तुकाराम मुंढेची कार्यशैली आवडत असली तरी सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी मात्र ती अडचणीची ठरत असल्याचं दिसत होतं. सत्ताधारी आणि विरोधकही तुकाराम मुंढेच्या विरोधात एकत्र यायचे. परिणामी तुकाराम मुंढेंची बदली व्हायची. असे असले तरी नव्या ठिकाणी रुजू झालेले तुकाराम मुंढेंनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमध्ये कोणताही बदल केला नाही हे विशेष.

आता मोबाईल नंबर सोबत नाव आणि फोटो कॉलिंगवर दिसणार.

Aadhaar शी जोडले जाणार सर्व मोबाईल नंबर, सरकार नियम आण्याच्या तयारीत; कॉलिंगमध्येही बदल...*

📲 सरकार आणि ट्राय संयुक्तपणे एक नवीन प्रणाली सुरू करणार आहेत, ज्यामध्ये कॉलरचा फोटो त्याच्या मोबाइल नंबरसह दिसेल. यासाठी सरकार मोबाईल नंबर केवायसी प्रणाली लागू करत आहे. यासाठी सरकार दोन प्रकारच्या प्रणाली लागू करू शकते, पहिली आधार कार्ड आधारित आणि दुसरी सिम कार्ड आधारित.

📄 *आधार बेस्ड केवायसी*
ट्रायच्या नवीन प्रणालीमध्ये, सर्व मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडले जातील, जेणेकरून जेव्हा एखादी व्यक्ती कोणाला कॉल करेल तेव्हा समोरच्या व्यक्तीकडे केवळ कॉलरचा मोबाइल नंबर नाही तर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव देखील असेल. क्रमांक द्या. आधार कार्डमध्ये जे नाव लिहिलेले असेल तेच नाव असेल.

✅ *सिम बेस्ड केवायसी*
सिमकार्ड खरेदी करताना दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे सरकार कॉल करणाऱ्या लोकांचा फोटो ॲटॅच करेल. अशा प्रकारे, बनावट लोक ओळखले जाऊ शकतात. म्हणजे सिम खरेदी करताना जो फोटो टाकला होता, तोच कॉलिंगच्या वेळी दिसेल.

⁉️ *असा होणार फायदा*
ट्राय कॉलर आयडी सिस्टीममध्ये कोणीही कॉल केल्यावर त्याचा नंबर आणि नाव दोन्ही स्क्रीनवर दिसतील. अशा परिस्थितीत कॉल रिसिव्ह करण्यापूर्वीच लोकांना कळेल की त्यांना कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव काय आहे. हा नियम लागू झाल्यानंतर कॉल करणारी व्यक्ती आपली ओळख लपवू शकणार नाही आणि अशा परिस्थितीत खोटे बोलणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांना ओळखता येईल.

मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांना भूसंपादनाअभावी खीळ. विभागीय आयुक्तांनी दिले आदेश : भूसंपादन तातडीने पूर्ण करा.

औरंगाबाद (कांतीकारी साथी न्युज) पंतप्रधान कृषी सिंचन योजना व बळीराजा जल सिंचन संजीवनी योजना २०१८ मध्ये मराठवाडा व विदर्भातील अवर्षणग्रस्त भागासाठी आणली. योजनेत मराठवाड्यातील ८३ प्रकल्पांचा समावेश हाेता. त्यातील बहुतांश प्रकल्पांना किरकोळ भूसंपादनामुळे खीळ बसली असून, तातडीने भूसंपादन करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी दिले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, भूसंपादनाशी निगडित विभागातील उपविभागीय अधिकाऱ्यांची केंद्रेकर यांनी बैठक घेतली. बैठकीत त्यांनी विभागातील दोन्ही योजनांतील कामांचा आढावा घेत भूसंपादनामुळे किती कामे खोळंबली आहेत, यावर लक्ष केंद्रित केले.
मागील चार वर्षांपासून मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो आहे. जलसिंचन योजना पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी अडविणे शक्य होईल. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून पंतप्रधान कृषी सिंचन योजना व बळीराजा जलसिंचन संजीवनी योजना राबविण्यात येत आहे. २५ टक्के केंद्र शासन व ७५ टक्के नाबार्डच्या अर्थसाहाय्यातून ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे.
या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावाऔरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड-सोयगावमधील वनगाव पोहरी साठवण, टिटवी साठवण तलाव, बनोटी साठवण तलाव, देवगाव रंगारी प्रकल्पांचे मिळून २.७६ हेक्टर भूसंपादन बाकी आहे. ४१५ हेक्टर भूसंपादन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील पळसखेडा, साेनखेडा, बरबडा, पाटाेदा, खोराड सावंगी, हातवण ७०० हेक्टरचे भूसंपादन बाकी आहे. यातील काही प्रमाणात पुनर्वसन करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील मनीरामखेड, दरेसरसम प्रकल्पांसाठी भूसंपादन पूर्ण झाले आहे. लातूर जिल्ह्यातील चौंडी, वैरागड, बोरसुरी प्रकल्पांचे मिळून ८ हेक्टर भूसंपादन शिल्लक आहे. बीड जिल्ह्यातील सात्रापोत्रा, उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाचे ३ हेक्टर भूसंपादन करणे बाकी आहे.

माहिती अधिकारात मिळवली शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची कोरी सेवा पुस्तिका.

बीड (प्रतिनिधी) माहिती अधिकारातून केवळ शासकीय माहिती प्राप्त होते हे सर्वश्रुत आहे, मात्र त्याही पलिकडे जाऊन गेवराई येथील एका माहिती अधिकार प्रशिक्षक तथा अभ्यासकाने माहिती अधिकारातून राजपत्रित व अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असणारी कोरी सेवा पुस्तिका मिळवली आहे. या कोऱ्या सेवा पुस्तिकेवर माहिती अधिकाराचे शिक्के असून शासकीय दस्त असल्याने ती प्राप्त झाली आहे. कोरी सेवा पुस्तिका मिळत असल्याने विद्यमान किंवा कार्यरत अधिकाऱ्यांची सेवा पुस्तिका मिळण्याचा मार्ग खुला झाला असल्याचे मानले जात आहे.  

गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथील किरण नारायण नंनवरे हे माहिती अधिकार अभ्यासक असून पुणे येथील यशदाचे प्रशिक्षण प्राप्त असलेले अभ्यासक यांनी मुंबई येथील मंत्रालयातील मुख्य सचिवांना माहिती अधिकाराच्या २००५ च्या कलम २ (त्र) किंवा अन्य कलमानुसार शासन सेवेत आल्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणारी सेवा पुस्तिका कोरी स्वरुपात द्यावी अशी मागणी केली. जी माहिती संसदेला किंवा राज्य विधान मंडळाला देण्यास नकार देता येणार नाही ती माहिती कोणत्याही व्यक्तीला देण्यासही नकार देता येणार नाही अशी टीप नंनवरे यांनी सदरील माहिती अधिकारी पत्रावर टाकली होती. प्रारंभी त्यांना नकार देण्यात आला मात्र प्रथम अपिलीय अधिकारी तथा सह सचिव रा.का. धनवाडे यांच्या समोर सुनावणी झाली.नंनवरे यांनी माहिती अधिकारी अधिनियमातील कलम ६ (३) अन्वये हस्तांतरीत करणे किंवा माहिती अधिकार अधिनियमातील कलम २ त्र (३) नुसार माहिती देणे अपेक्षित असल्याचे अपिलमध्ये नमूद केले होते. सुनावनी दरम्यान झालेल्या युक्तीवादानंतर सह सचिव धनवाडे यांनी  किरण नंनवरे यांना कोरी सेवा पुस्तिका निशुल्क उपलब्ध करुन देण्याबबात संबंधितांना आदेशीत केले.

काय असते सेवा पुस्तिकेत ?

शासन सेवेत असणाऱ्यांसाठी सेवा पुस्तिकेला अनन्य साधारण महत्व आहे. या पुस्तिकेचा नमूना शासनाच्या वित्त विभागामार्फत तयार करण्यात येतो. त्याची छापाई पुणे येथील शासकीय मुद्राणालयात होते. शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या राजपत्रित व अरापत्रित शासकीय कर्मचाऱ्यांकरीता एकाच दर्जाचे सेवा पुस्तक वापरण्यात येते. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येक स्वतंत्र सेवा पुस्तिका दिली जाते. त्यामध्ये संबंधित कर्मचारी यांची चौकशी, बदली, दंड यासह इतरबाबी त्यात वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी नोंदी घेतात. त्यामुळे सेवा पुस्तिकेला विशेष महत्व असते.

बालविवाह रोखण्यास गेलेल्या पोलिसांना वधूच्या आईची आत्महत्येची धमकी .पोलिस झाले हैराण.


*पोलिसांनी विचारपूस सुरू केल्यावर लग्न नव्हे तर साखरपुडा आहे, असे सांगितले गेले. मात्र, मांडवात नवीन गादी, पलंग व संसारोपयोगी वस्तू मांडलेल्या होत्या.

बीड (कांतीकारी साथी न्युज) शहरातील काळे गल्ली भागात बालविवाह रोखण्यास गेलेल्या पोलिसांना वधूमातेने आत्महत्येची धमकी दिली. त्यामुळे पोलिस हैराण झाले. अखेर तिला समजावत नियोजित विवाह रोखण्यात आला. २८ नोव्हेंबरला दुपारी हा प्रकार घडला.

बालहक्क कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांना शहरातील काळे गल्लीत १७ वर्षीय मुलीचा हिवरसिंगा (ता. शिरूर) येथील तरुणाशी विवाह लावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून २८ रोजी ते शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. सहायक निरीक्षक महादेव ढाकणे यांनी चार अंमलदार सोबत दिले. त्यानंतर तत्त्वशील कांबळे व पोलिस अंमलदार काळे गल्लीत पोहोचले. तेथे पोलिस येणार असल्याची कुणकुण लागताच सामानाची आवराआवर करून वधू-वरांना पांगविण्यात आले. पोलिसांनी विचारपूस सुरू केल्यावर लग्न नव्हे तर साखरपुडा आहे, असे सांगितले गेले. मात्र, मांडवात नवीन गादी, पलंग व संसारोपयोगी वस्तू मांडलेल्या होत्या. त्यामुळे हा विवाहच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केल्यावर वधूमातेने गोंधळ घालत थेट आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर तिला पोलिस व नातेवाइकांनी समजावले. वधूसह मातेला बीड शहर पोलिस ठाण्यात नेऊन समुपदेशन केले. त्यानंतर अल्पवयीन वधूला बालकल्याण समितीपुढे हजर केले. समितीने मुलीला स्वाधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले.

*ठाण्यात बोलावून समजावले. 

बालविवाह होणार असल्याच्या माहितीवरून अंमलदार पाठवले होते. मुलीच्या आईने गोंधळ घातला; पण नंतर ठाण्यात बोलावून समजावले. शासकीय कामकाजात अडथळा व आत्महत्येचा प्रयत्न तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद होऊ शकतो, असे समजावल्यावर त्या शांत झाल्या.- महादेव ढाकणे, सहायक पोलीस निरीक्षक, बीड शहर ठाणे

माहेरहून पाच लाख रुपये दे नाही तर घटस्फोट दे .हुंड्यासाठी विवाहीतेचा छळ..


*एका विवाहीतेला माहेरहून ५ लाख रुपये आण नाहीतर घटस्फोट देईल अशी धमकी देण्यात आली आहे.

उदगीर (प्रतिनिधी) आजही अनेक गावांमध्ये हुंडा प्रथा सुरू आहे. लग्न झाल्यावर देखील अनेक मुलींकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली जाते. आता देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका विवाहीतेला माहेरहून ५ लाख रुपये आण नाहीतर घटस्फोट देईल अशी धमकी देण्यात आली आहे. या घटनेत ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील अनुसया राहुल देवर्षे (बोडके) यांचा कर्नाटकातील खेरडा येथील राहुल सुदाम देवर्षे यांच्यासोबत २४ मे २०१० रोजी यांचा विवाह झाला. विवाहात त्यांच्या वडिलांनी सासरच्या मंडळींना ५ लाख रुपये, दोन तोळे सोने आणि लग्नाचा सर्व खर्च करून दिला होता. लग्नाला एक महीना होत नाही तोच, सासरच्या मंडळींची वागणूक बदलली. त्यांनी अनुसया यांना त्रास द्यायला सुरुवात केली. तु खूप काळी आहेस, तुझ्या वडलांनी कमी हुंडा दिला. दुसरी असती तर जास्त हुंडा मिळाला असता असे तिला बोलू लागले.

सुरू असलेला त्रास त्यांनी माहेरी सांगितला. त्यानंतर त्यांच्या वडीलांनी गावातील काही माणसांसह मध्यस्ती करून सांगितले होते की, माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही. शक्य होतं तितकं मी केलं आहे. काही दिवसांनी महिलेला पुन्हा सासरच्या मंडळींनी त्रास द्यायला सुरूवात केली. यावेळी ५ लाख द्यायचे नसतील तर घटस्फोट दे असे त्यांना सांगितले. तसेच तिला मारहाण करण्यात आली.

त्यामुळे महिलेने लातुरमधील  महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दिली गेली. त्यांनी वाढवणा पोलिस ठाण्यास पत्र पाठवून सदर घटनेची दखल घेण्यास सांगितले. यावर पीडितेच्या तक्रारीवरून पती राहुल सुदाम देवर्षे , दीर योगेश, नणंद, सासू विमलबाई यांच्यासह आणखीन दोघांविरुध्द वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबाजोगाईतील कुख्यात गुंड मोहन मुंडे हर्सूल कारागृहात स्थानबध्द.


अंबाजोगाई (कांतीकारी साथी न्युज) व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी मागणाऱ्या अंबाजोगाईतील कुख्यात गुंडावर एमपीडीए नुसार कारवाई केली आहे. त्यास २८ नोव्हेंबरला ताब्यात घेऊन २९ रोजी पहाटे औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात स्थानबध्द करण्यात आले.

मोहन दौलत मुंडे (२९,रा.क्रांतीनगर, अंबाजोगाई) असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुध्द केज, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात खंडीण मागणे, दिवसा व रात्री घरफोडी करणे, शिवीगाळ करुन जीेवे मारण्याच्या धमक्या देणे, दरोड्याची तयारी करणे, अवैध शस्त्र बाळगणे अशा स्वरुपाचे आठ गुन्हे नोंद आहेत. त्यापैकी चार गुन्हे न्यायप्रविष्ठ असून चार तपासावर आहेत.  त्याच्याविरुध्द एमपीडीएनुसार(झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) कारवाईचा प्रस्ताव अपर अधीक्षक कविता नेरकर, उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करुन शहर ठाण्याचे पो.नि.बाळासाहेब पवार यांनी पोलीस अधीक्षकांना पाठवला. 

पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी २६ नोव्हेंबरला एमपीडीए कारवाईस मान्यता दिली. त्यानंतर अंबाजोगाई शहर ठाण्याचे पो.नि.बाळासाहेब पवार, स्थानकि गुन्हे शाखेचे पो.नि. सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली २८ रोजी मोहन मुंडे यास ताब्यात घेतले. अंबाजोगाई शहर ठाण्यात हजर करुन नंतर त्याला बंदोबस्तात हर्सूल कारागृहात पाठवले. गुन्हे शाखेचे हवालदार अभिमन्यू औताडे, अंबाजोगाई शहर ठाण्याचे पो.ना.वाडकर, गोरे यांचा या कारवाईत सहभाग होता.

* प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही गुन्हे.

अंबाजोगाई शहरातील व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावल्याचे प्रकरण अलीकडेच गाजले होते. गंभीर गुन्हे करत असल्याने पोलिस त्याच्यावर वॉच ठेऊन होते. दरम्यान, २२ सप्टेंबर २०२२ रोजी त्याच्या प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली होती. मात्र, यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट गुन्हे करत सुटला होता.

भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल पदावरून हकालपट्टी करा - स्वराज्य संघटनेची मागणी.

गेवराई (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल पदावर नियुक्त झालेपासून महाराष्ट्र राज्य, महापुरूष व महाराष्ट्र राज्याची अस्मिता यांबाबत वारंवार वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्ये करीत आहेत. 
आपल्या भाषणांतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून त्यांनी महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाची विटंबना केली आहे. नुकतेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अत्यंत अवमानकारक वक्तव्य करून महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनेशी खेळ केलेला आहे. 
यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत पातळीहीन वक्तव्य करून या महान दाम्पत्याच्या कार्याची अवहेलना केली आहे. 
महोदय, आम्ही आपल्या माध्यमातून माननीय राष्ट्रपती महोदया व माननीय पंतप्रधान महोदय यांना कळवू इच्छितो की, कोश्यारी यांना वेळीच आवर घालून महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून त्यांची ताबडतोब हकालपट्टी करावी. अन्यथा महाराष्ट्रातील जनतेच्या भावनेचा मोठा उद्रेक होऊ शकतो.सदर निवेदनाची दखल घ्यावी व भगतसिह कोश्यारी यांना तात्काळ राज्यपाल पदावरून हटवावे अन्यथा महाराष्ट्रात जनआंदोलणाच्या माध्यमातून जे काही परिणाम होतील यास सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व आपण आपले शासन प्रशासन  असेल याची नोंद घ्यावी असे निवेदन स्वराज्य संघटनेच्या वतीने गेवराई तहसील कार्यालयात देण्यात आले.
या निवेदनावर स्वराज्य संघटनेचे बीड जिल्हा निमंत्रक तसेच छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल चाळक, मुक्तराम मोटे,सुदाम मोरे,महेश पवार,अनिकेत नाटकर,अभिषेक जामकर,अमोल मोटे,अलीम सय्यद,सोमनाथ डोळस,गोकुळ जंगले,अभिषेक नाटकर,सचिन मोटे,सूरज घोडके, लक्ष्मण मोटे,जयराम काळे,दत्ता गिरी  आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा मुरारी रजेवर .


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुभाष देसाई यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार होती. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी होणार होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा मुरारी रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सुनावणी पुन्हा कधी सुरू होईल हे अद्याप स्पष्ट नाही.

लिखित बाजू मांडण्याचे दिले होते निर्देश-
एक नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही पक्षकारांना निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, दोन्ही पक्षकार संयुक्तपणे लिखितपणे आपली बाजू न्यायालयात मांडतील. त्याशिवाय, त्याला जोड असणारे कागदपत्रे देखील जोडतील. जेणेकरून एक समान मुद्दे तयार होतील. येत्या चार आठवड्यात ही लिखित बाजू सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. घटनापीठासमोर उपस्थित होणारे अथवा निर्णय घेण्यासाठी जे मुद्दे मांडण्यात येतील ते घटनापीठासमोर संयुक्तपणे सादर करण्यात येतील.
थोडक्यात मुद्दे
* स्पीकरच्या विरोधात अविश्वास नोटीस दाखल केली असेल तर उपाध्यक्षांना आमदारांना अपात्र करण्याचे अधिकार राहतो का? नेबम रेबिया जजमेंट नुसार.
* अपात्रता प्रलंबित असताना विधानमंडळातील कामकाज वैध आहे का? त्याचं काय स्टेट्स आहे.
* जर स्पीकरने अपात्र घोषित केले तर ज्या दिवशी आमदारांनी शिस्तभंग कारवाई केली त्या दिवशी लागू होते की ज्या दिवशी अपात्र केले त्या दिवसापासून.

* अध्यक्षाला नेता/व्हीप ठरवण्याचा अधिकार आहे का? याचा 10व्या अनुसूचीवर पक्षांतर बंदी कायद्यावर काय परिणाम होतो का?


* पक्षाच्या अंतर्गत निर्णय यात न्यायालयाने लक्ष घातले पाहीजे का?
* राज्यपालाचे एखाद्या पक्षाला सरकार स्थापन करण्यास आमंत्रित करण्याचे काय अधिकार आहेत. असे अधिकार चॅलेंज करता येतात का? निवडणूक आयोगाबाबत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 27 सप्टेंबरला निर्णय दिला आहे.
* स्प्लिटच्या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोगाला काय अधिकार आहेत. निवडणूक आयोगाचे कार्यक्षेत्र किती मोठे आहे.

Monday, November 28, 2022

शाळेत जाण्यासाठी पालक रागवले म्हणून 14 वर्षीय मूलीने पाच वर्षीय चुलत बहिणीचा बाथरूममध्ये कोंडून ब्लेडने गळ्यावर वार करत केली हत्या.


ईश्वरी रमेश भोसले वय 7 वर्षे असं मयत चिमुकलीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जालना शहरातील चौधरी नगर भागात एका घरातील बाथरूममध्ये मुलीचा गळा कापल्याची घटना घडली आहे.असा फोन पोलिसांना आला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत जखमी मुलीला संतकृपा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. यावेळी ईश्वरीच्या हातावर व गळ्यावर जखमा असल्याचे पाहायला मिळाले. तसेच तिच्या चेहऱ्यावर देखील वार करण्यात आले होते. दरम्यान रुग्णालयात जाताच ईश्वरीचा मृत्यू झालेला होता.सोमवार दि.28नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ईश्वरी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती. यावेळी तिच्या मागोमाग आलेल्या चुलत बहिणीने बाथरूमचा आतून दरवाजा लावून घेतला. त्यानंतर ईश्वरीच्या गळ्यावर आणि हातावर वार केले, यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर बाथरूममध्ये सर्वत्र रक्तच-रक्त पाहायला मिळत होते. अल्पवयीन आरोपी मुलीने ही हत्या का केली याबाबत अजूनही कोणतेही माहिती समोर आलेली नाही.दरम्यान
ईश्वरी भोसले वय 7 वर्षे ही मुलगी युकेजीच्या वर्गामध्ये खरपुडी रोडवरील एका इंग्रजी शाळेत शिक्षण घेत आहे. ईश्वरीचे आई-वडील शेतकरी असून त्यांनी तिला शिक्षणासाठी जालना येथे चौधरीनगरात राहणाऱ्या काका गणेश भोसले यांच्याकडे शिक्षणासाठी ठेवले होते. त्यामुळे ती आपल्या चुलत्याकडेच राहत होती. ईश्वरीच्या काकाची रक्तलघवी तपासणी लॅब घनसावंगी तालुक्यात असल्याने दररोज ते जालना येथून येणे-जाणे करतात. आज सोमवारी सकाळी ईश्वरी शाळेत जाणार होती. 8 वाजेच्या सुमारास ईश्वरी ही अंघोळीसाठी करण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.ईश्वरी अंघोळीसाठी जाताच अल्पवयीन आरोपी मुलगी देखील बाथरूममध्ये घुसली. तिने आधी दरवाजा आतमधून बंद करून घेतला. त्यानंतर तिने ब्लेडने ईश्वरीच्या गळ्यावर, हातावर, मानेवर वार केले. ईश्वरीच्या किंचाळण्याच्या आवाजाने काकू आणि अन्य लोकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी मुलीने आधी बाथरूममधील रक्त धुवून काढलं आणि त्यानंतरच दार उघडले. पोलिसांनी अल्पवयीन आरोपी मूलीस ताब्यात घेतले असून खूनाचा गून्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी विधानसभा मतदारसंघातील धरणाचे पाणी शेतकऱ्यांना कधी मिळणार ;- वसंत मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे सर्व धरणे भरलेले आहेत त्यामध्ये बीड जिल्हा अंतर्गत परळी विधानसभा मतदारसंघातील खरीप पिकासाठी पाणी सोडण्या संदर्भात कोणताच निर्णय झालेला नाही असा आरोप ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला . सर्व शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या केलेल्या आहेत. ‌महाराष्ट्र सरकारने पालकमंत्री लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे कर्मचारी यांच्यावर जबाबदारी ४ नोव्हेंबरला २०२२ ला शासनाने आदेश दिलेले आहेत .परंतु जिल्हास्तरावर कालवे  दुरुस्ती, करून जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अजूनही प्रशासकीय पातळीवर हालचाल दिसत नाही. सिंचन व्यवस्थापन समितीने सदरचे कालवे दुरुस्ती व सिंचन निधी यासंदर्भात यंत्रणेने कडून कारवाई झाली नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला. बहुतांश धरणे भरल्यामुळे शेतकरी आनंदात असून रब्बीला पाणी सुटेल अशी अपेक्षा आहे , परंतु लोकप्रतिनिधी ,पालकमंत्री , जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे संबंधित अधिकारी बीड जिल्ह्यातील निष्क्रिय आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणावर पाणी धरणात असूनही शेतीसाठी उपयोगी नाही त्यामुळे नाराजीचा सूर आहे. शेतकरी पाणीपट्टी भरायला तयार असूनही जलसंपदा विभागाकडून कारवाई करण्यात येत नाही.कालवा सल्लागार समितीच्या बैठक होत नाही, खूप मोठ्या प्रमाणावर विटभटयामुळे  कालवे तोडफोड केलेले आहेत, शेतकऱ्यांची परळी विधानसभा मतदारसंघात रब्बीच्या पिकासाठी पाण्यासंदर्भात मागणी आहे कारण वाण, कासारवाडी, धर्मापुरी, दैठणा दौंडवाडी, अंबलवाडी,भंडारवाडी, चांदापूर, धरण भरलेले असून इतर छोटे मोठे धरण भरलेले आहेत परंतु पाण्याचे नियोजन नसल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांना रब्बीला पाणी मिळते का नाही हा प्रश्न खरा उपस्थित झालेला आहे,यावर काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे पाणी सोडण्यासंदर्भात रब्बीसाठी तात्काळ नियोजनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे, त्यावर शासनाकडून क्रमांक: संकीर्ण_२०२२प्र. क्र. ४४६/२२सिंवय( कामे) दि. १७/ ११/ २०२२ ने आदेश मा.कार्यकारी संचालक गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांना दिलेले आहेत. तात्काळ अंमलबजावणी  शासन स्तरावर कारवाई करून अहवाल सादर करण्यासंदर्भात कळविले आहे.परंतु जलसंपदा विभागाकडून आज तागायत कसली हालचाल झालेली नाही, त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळते का नाही? त्यास जबाबदार लोकप्रतिनिधी व कर्मचारी आहेत असा आरोप काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केला .

परळी शहरातील भीम नगर येथील बुद्ध विहाराचं बांधकाम केव्हा होणार :- प्रेम जगतकर.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) परळी शहरातील भीम नगर येथील नियोजित बुद्ध विहाराचे बांधकाम केव्हा होणार अशी मागणी वंचित बहुजन युवा  आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी केली आहे. 
याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील भीम नगर येथे गेल्या तीन वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करून माजी सामाजिक न्याय मंत्री तथा आमदार यांनी दलितांच्या मतावर डोळा ठेवून थाटात उद्घाटन केले त्याला आज तीन वर्षे होताना दिसत आहे तरीपण या कामाचे साधे मोजमाप किंवा काम झालेले नसून फक्त येणाऱ्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर डोळा ठेवून व दलितांचे मतदान घेण्यासाठी फक्त हा विटा आटापिटा असून त्याचाच एक भाग म्हणून पांगरी येथील नियोजित बुद्ध विहाराचे उद्घाटन होत आहे की काय असेही प्रसिद्धीपत्रक म्हटले आहे परळी शहरातील नियोजित बुद्ध विहारा च्या जागेची कशी दुर्दशा झाली आहे ते प्रत्यक्ष दर्शनी छायाचित्रही आम्ही प्रकाशित करीत आहोत तरी भीम नगर येथील ही नियोजित बौद्ध विहाराचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावेत अन्यथा लवकरच जन आंदोलन करण्यात येईल असाही इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांनी दिला आहे

हेळंब येथे खंडोबा मंदिरात तीन दिवसशीय यात्रोत्सव आजपासून प्रारंभ.पालखी सोहळा, वाघ्या मुरळी,कुस्त्यांची दंगलीसह विविध कार्यक्रम.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मौजे हेळंब येथील ग्रामदैवत श्री.खंडोबा  यात्रेस मंगळवारी प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने रविवारपासून मंदिर परिसर दुमदुमू लागला आहे. 
     हेळंब येथे 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बोरणा नदीकाठी बोरणाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे.  या निमित्त मंगळवारी दुपारी १ वा. श्री खंडोबाची पालखी मिरवणुक निघणार आहे. रात्री १२ वाजता शोभेची दारु उडवून अतिषबाजी केली जाणार आहे व २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे. बुधवारी रात्री ८ ते १२ दरम्यान वाग्या मुरळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी , दि.1 डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार आहेत. जंगी कुस्त्यासाठी प्रथम पारितोषिक ५,००१/- ठेवण्यात आले आहे.
     हेळंब येथे जागृत असे श्री.खंडोबाचे मंदिर आहे. चंपाषष्ठी निमित्त हेळंब येथे मंगळवार पासुन तीन दिवशीय यात्रेस प्रारंभ होत आहे. यात्रेची तयारी जय्यत करण्यात आली आहे. विविध खेळणी साहित्याचे दुकाने गावात थाटण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातुन खंडोबाच्या दर्शनासाठी हेळंब मध्ये पन्नास हजारोंच्यावर भाविक दाखल होणार आहेत.हेळंब येथील श्री खंडोबा मंदिर हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी यात्रेला असंख्य भाविक भक्त दर्शन येतात. हेळंब गावापासून श्री खंडोबाचे अतिशय पुरातन मंदिर आहे भव्य दीपमाळ लक्ष वेधून घेते चंपाषष्ठी निमित्त दरवर्षी तीन दिवसीय यात्रा भरते यात्रेत राहट पाळणे विविध प्रकारचे अन्नपदार्थांची दुकाने साहित्याची दुकाने लावली जातात यात्रेला भाविक हजेरी लावतात.
    नवस केला की पावतो अशी श्रद्धा आहे त्यामुळे भाविक नवस बोलतात फळ मिळाल्यास ते नवस पूर्ण करतात. यासाठी पंचक्रोशीतील व ग्रामस्थ कितीही बाहेर असले तरी यात्रेनिमित्त ते दर्शनासाठी आवर्जून येतात. मुंबई, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद आणि अनेक राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात.  खंडोबा मंदिर हे जागृत देवस्थान आहे. चंपाषष्ठीला  तीन दिवशीय यात्रा भरते, मंगळवारी हेळंब येथील श्री हनुमान मंदिरापासुन श्री खंडेरायाच्या मुर्तीची मिरवणुक वाजत गाजत निघते, एक किलोमिटर अंतरावर असलेल्या खंडोबा मंदिरात ही पालखी येते, पुन्हा ही पालखी गावातुन जाते. या पालखी सोहळ्यात हेळंब व परिसरातील ग्रामस्थ उत्साहाने सहभागी होतात. बुधवारी सायंकाळी हेळंब येथे वाघ्या मुरळ्याचा कार्यक्रम घेण्यात येतो व गुरुवारी कुस्त्याच्या स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. तीन दिवशीय यात्रेत परळी तालुक्यातील राज्यातील अनेक ठिकाणाहुन भक्त सहभागी होतात व खंडोबाचे मनोभावे दर्शन घेतात. या यात्रेची ग्रामस्थांनी जोरदार तयारी पूर्ण केली आहे.  तीन दिवसीय यात्रेत दर्शनासाठी परळी व परिसरातील ग्रामीण भागातुन भक्त मोठ्या प्रमाणात येतात. हेळंबच्या गावकरी मंडळाच्या वतीने भव्य यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो. या यात्रा उत्सवात भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

*श्री खंडोबा यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम. 

 श्री खंडोबा मंदिर हे भव्य दिव्य आहे. खंडोबा मंदिरात प्राचीन काळापासून यात्रा भरते. मंदिरात लक्षवेधी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या यात्रेची ग्रामस्थांनी जोरदार तयारी केली आहे. चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी नागदिव्ये घेऊन भाविक खंडोबा मंदिरात व देवासमोर नागदेवे पाजळून मानाचे पाच व ताट भर दिपोत्सव साजरा करतात.  सर्व मंदिर दिपत्सोवाने उज्जवलुन खंडोबाची आराधना करतात.दिवसभर मंदिर परिसरात गावातील व परिसरातील भाविक  तळीभांडार उचलणे, ओटी भरणे, भंडारा खोबरे उधळणं आदि कार्यक्रमास सुरुवात करतात व रात्री १० वाजता श्रींचा अश्वरूपी मूर्तीसह सवाद्य छबिना मिरवणूक काढून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात येते. यावेळी हलगीच्या तालावर खंडोबाचे वारू शिव मल्हार येळकोट. येळकोट घे च्या जय जयकारात बेभान होऊन  नाचतात हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

*घरोघरी तळी भंडारा . 

भाविक आपल्या घरी चंपाषष्ठी दिवशी. देवाच्या ताब्यांचे कोंटुबाची पुजा करून. वाग्यांचे भरीत, बाजरीची रोडगे, काद्यांची पात इत्यादी पदार्थांचा भरीताचा व नैवेद्य ठेऊन पाच वेळा सदानंदाचा येळकोट येळकोट जय चा गजर करून. तळी भंडारा कार्यक्रम होतो व नवीन वागीं व कांदा खाणास प्रारंभ होतो.

*खंडेरायाला खोबर व भंडाऱ्याची उधळण. 

खंडोबाला चंपाषष्टी दिवशी तालुक्यातील सर्व भाविक खंडोबा मंदीरात येऊन. सदानंदाचा येळकोट येळकाेट जय मल्हार चा गजरात खोबर भंडाराची उधळण होते. खोबर व भंडारा मंदिरावर उधलेला भक्तजन प्रसाद म्हणून घेतात. व आपल्या कपाळावर भंडारा लावतात. अशी माहिती भाविक ग्रामस्थांनी दिली आहे.

वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत श्रमदान. समाज बांधवांचा पुढाकार.साप्ताहिक श्रमदानातून स्मशानभूमीचा परिसर होत आहे स्वच्छ.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  परळी शहरातील वैद्यनाथ मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेली कैलास धाम या वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत समाज बांधवांच्या वतीने दिनांक 20 नोव्हेंबर पासून सामुहिक श्रमदान केले जात असून 27 नोव्हेंबर रोजी दुसर्‍या रविवारी सुद्धा 35 पेक्षा अधिक समाज बांधवांनी एकत्र येवून दोन तास श्रमदान करून परिसर स्वच्छ केला आहे.
’साथी हाथ बढाना’ या ओळीप्रमाणे परळी वीरशैव लिंगायत समाज एकत्र आला असून या सर्वांनी हातात हात देत वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत या रविवारीही स्वच्छ केली. श्रमदान करून स्मशानभूमीचा संपूर्ण कायापालट करण्याचा युवकांचा संकल्प असून या परिसरात वाढलेली झाडे झुडपे, गाजर गवत आज नष्ट करण्यात आले.
 स्मशानभूमीतील अडगळीत गेलेली अर्धा ते पाऊन एकर एवढी जागा जेसीबी मशिनद्वारे मोकळी करण्यात आली आहे. मागील आठवड्यापासून प्रत्येक रविवारी येथे श्रमदान केले जात असून त्यातून हा परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्याचे काम चालू आहे. पुढच्या आठवड्यातही असे श्रमदान केले जाणार असून नागरिकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन समाज बांधवांनी केले आहे.
*मानवतेचा संदेश*
वैद्यनाथ मंदिराच्या मागील बाजूस कैलास धाम ही स्मशानभूमी असून या परिसरात मागील काही दिवसापासून झाडे झुडपे वाढल्याने बकाल अवस्था निर्माण झाली होती. वास्तविक पाहता मृत व्यक्तीला येथे चिर विश्रांती दिली जात असल्याने हा परिसर स्वच्छ व्हावा अशी सर्वांनाच अपेक्षा असते. सार्वजनिक कामात पुढाकार घेण्यापेक्षा सल्ले देण्यावर नेहमीच अनेकांचा भर राहिलेला आहे. परंतू आधी आपण करावे आणि मग जगास सांगावे या उक्तीप्रमाणे समाज बांधवांनी एकत्र येत मानवतेचा विशाल संदेश दिला आहे.

पिक विमा कार्यालयात तोडफोड स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक.

अमरावती (कांतीकारी साथी न्युज)    अमरावती जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा काढला. परंतु, पीक विम्‍याची रक्‍कम मिळाली नाही. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून पीज विमा कार्यालयाची तोडफोड केली. 
प्रधानमंत्री पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा करून अल्प रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली. तर हजारो शेतकरी अद्यापही पीक विमापासून वंचित आहेत. त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने अमरावती येथील राणा कॉम्प्लेक्समधील प्रधानमंत्री पिक विमा कार्यालयात जाऊन कंपनीला जाब विचारला.

खुर्च्याची तोडफोड

योग्य प्रतिसाद सकारात्मक उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कपिल पडघान यांनी आक्रमक पवित्रा घेत पिक विमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्याची तोडफोड केली. यावेळी आठ दिवसात जर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम मिळाली नाही. तर पिक विमा कार्यालय पेटवून देण्याचा इशारा देण्यात आला. तर यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पिक विमा कंपनीच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी पदमुक्त होण्याच्या चर्चामध्ये. तथ्य नसल्याचं राजभवनाकडून माहिती.


*भगत सिंह कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याचे संकेत दिल्याची माहिती समोर येत होती.


मुंबई : राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी गेल्या काळापासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आहेत. विरोधकांनी तर त्यांना हटवण्यासाठी आंदोलनं सुरु केली आहे. याचा पार्श्वभूमीवर राज्यपालांनी स्वत: पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. मात्र या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं राजभवनाकडून स्पष्टीकरण आलं आहे.

राज्यपाल यांच्याबाबत माध्यमांमध्ये येणारी बातमी चुकीची असल्याचे स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आले आहे. 

राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यातील वातावरण तापलं आहे. यावरुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत होती. राज्यपालांना हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरु आहेत.

राज्यपालांच्या वक्तव्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले. भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. दरम्यान शिंदे गटानेही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती यांनीही राज्यपालांविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे.


स्टेअरिंगला हिसका देऊन खुनाच्या आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न; जीप उलटून ४ पोलिस जखमी.

बीड (कांतीकारी साथी न्युज) खून प्रकरणात कोठडीत असलेल्या आरोपीने घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी नेताना धावत्या जीपमध्ये चालकाला हिसका दिला. यानंतर जीप उलटून चार पोलीस, दोन पंच व आरोपी असे सात जण जखमी झाले. पाटोदा- मांजरसुंबा महामार्गावरील ससेवाडी फाट्याजवळ २८ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

रोहिदास विठ्ठल निर्मळ (रा. मुळूकवाडी ता. बीड) असे आरोपीचे नाव आहे. २६ रोजी सकाळी शेतीवादातून त्याने चुलते बळीराम मसाजी निर्मळ (७५) यांचा कोयत्याने सपासप वार करून खून केला होता. त्याने चुलती केशरबाई बळीराम निर्मळ यांच्यावरही हल्ला केला.वाद सोडविण्यासाठी आलेल्या इतर दोघांना देखील मारहाण केली होती. याप्रकरणी रोहिदाससह त्याचे वडील विठ्ठल आणि आई कौसाबाई निर्मळ यांच्यावर नेकनूर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २६ रोजीच विठ्ठल व कौसाबाई यांना तर २७ रोजी रोहिदासला बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्या आई- वडिलांना  न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती तर रोहिदासला एक दिवसाची कोठडी सुनावली होती. 

दरम्यान, २८ रोजी आरोपी रोहिदास निर्मळला घेऊन नेकनूर पोलीस जीपमधून (एमएच २३ एफ-१११४) मुळूकवाडीला घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी जात होते. सोबत दोन सरकारी पंच होते. मधल्या सीटवर बसलेल्या आरोपी रोहिदास निर्मळ याचे दोन्ही हात पोलिसांनी पकडून ठेवलेले होते.दरम्यान, ससेवाडी फाट्यावर त्याने आपले डोके चालक व सहायक उपनिरीक्षक चंद्रकांत देशमुख यांच्या डोक्यावर आदळले. त्यामुळे त्यांच्या हाताला झटका बसला. यावेळी रोहिदासने स्टेअरिंगला हिसका दिल्याने जीप रस्त्याखाली उतरून उलटली. 

यात सहायक निरीक्षक शेख मुस्तफा, सहायक उपनिरीक्षक चंद्रकांत देशमुख, अंमलदार सचिन मुरूमकर, बाबासाहेब खाडे, पंच म्हणून गेलेले नेकनूर ग्रामपंचायतचे कर्मचारी सय्यद फारेज सय्यद रहेबाज व संदीप काळे हे जखमी झाले. शेख मुस्तफा यांच्या खांद्याला व डोक्याला दुखापत असून आरोपी रोहिदास निर्मळ याच्या डाव्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. सर्व जखमींवर बीडमध्ये खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत, आरोपीला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

एसपी, एएसपींची भेट

या घटनेनंतर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी खासगी दवाखान्यात जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी डॉक्टरांकडून माहिती घेत आवश्यक त्या सर्व तपासण्या व उपचार करण्यास सांगितले.

भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात राजकीय वातारवरण तापलं; शिवसेनेचा ठाकरे गट 'राज्यपाल चले जाओ' आंदोलन करणार.

 

मुंबई :- राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात शिवसेनेचा ठाकरे गटाने आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत असल्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून 'राज्यपाल चले जाओ' आंदोलन करण्यात येणार आहे. 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. तसेच विरोधी पक्षाकडून राज्यपालांना पदावरून हटविण्याची मागणी केली जात आहे.

राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांना दिल्लीतून देखील बोलावणं आलं होतं. त्यानंतर राज्यपालांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलंलं वादग्रस्त वक्तव्य भोवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचदरम्यान, शिवसेनेचा ठाकरे गट राज्यपालांच्या विरोधात आणखी आक्रमक होणर आहे.

राज्यात राज्यपालांकडून वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्यात त्यांच्या विरोधात आक्रमक आंदोलने झाली. त्यानंतरही राज्यपालांच्या वक्तव्यावरून झालेला वाद थांबायचा नाव घेईना. राज्यपालांच्या विरोधात आणखी आक्रमक होत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून 'राज्यपाल चले जाओ' आंदोलन करण्यात येणार आहे. 'राज्यपाल चले जाओ' आंदोलनानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पदावरून हटविण्यात येणार का, हे पाहावे लागणर आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल?

'तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले.

औरंगागबाद येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केद्रींय मंत्री नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डी. लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.

धक्कादायक नाशिकमधील अत्याचार पीडितांचा आकडा वाढला.! ज्ञानदीपच्या संस्थाचालकाकडून आणखी 7 मुलींच लैंगिक शोषण केल्याचे उघड...


नाशिक (प्रतिनिधी) राज्यात मागील दिवसांपासून चर्चेत असलेलं नाशिक अत्याचार प्रकरणात.! आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. संस्थाचालक हर्षल बाळकृष्ण मोरे याने आणखी सात मुलींवर अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले.

म्हसरुळच्या मानेनगर येथे द किंग फाउंडेशन ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रम असून, याचे संस्थाचालक हर्षल बाळकृष्ण मोरे याने मुलींवर अत्यचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली असतं; यात आणखी एक खुलासा पोलिसांना केला आहे. आणखी सात मुलींवर अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले. यातील ५ मुली आश्रमातील असून, सटाणा येथील त्याच्या राहत्या घरी शिक्षणासाठी ठेवलेल्या २ मुलींवरही त्याने अत्याचार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर यानंतर पोक्सो कायद्यांतर्गत त्याच्यावर ५ गुन्हे दाखल केले.

आधार आश्रमातील पत्र्याच्या खोलीत रात्री बोलावून मोरेने आदिवासी अल्पवयीन मुलीला हातपाय दाबून देण्यास सांगितले. त्यानंतर पॉर्न फिल्म दाखवून ‘तू माझे काम केले नाही तर तुला होस्टेलमधून काढून टाकेल’ अशी धमकी देत अत्याचार केला. त्यानंतर पोलिसांनी आश्रमातील १३ मुलींकडे चौकशी केल्यानंतर यातील ५ व सटाण्यातील राहत्या घरी शिक्षणासाठी ठेवलेल्या २ मुलींवर अत्याचार केल्याचे उघड झाले. 

धक्कादायक बाब म्हणजे मागील 10 दहा वर्षांपासून हा नराधम शोषण करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आश्रमाची इमारतही भाडेकरारावर घेतली आहे. मालक मुंबई येथील रहिवासी असून, इमारत मालकाला जबाबासाठी बोलावण्यात आले आहे. संशयित मोरेची सासू आश्रमात मुलींची व्यवस्था सांभाळते. त्याची पत्नी मालेगाव येथे वास्तव्यास आहे. पोलिसांकडून सासूची व मदतनीस महिलेची चौकशी केल्यानंतर संशयिताकडून गेल्या १० वर्षांपासून आश्रमातील अनेक मुलींचे शोषण सुरू असल्याची धक्कादायक माहिती महिलांनी दिली. यावरून पोलीस पुढील तपास करत असून, यात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.

Sunday, November 27, 2022

सुदर्शन न्युज चॅनेल चे सर्वेसर्वा कट्टर हिंदूत्ववादी सुरेशजी चव्हाण यांनी घेतले वैद्यनाथाचे दर्शन करणार कॉरिडॉर साठी दिल्लीत पाठपुरावा.


*हिंदूवीर चव्हाण के यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन व कॉरिडॉरसाठी सोडला संकल्प. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) प्रखर हिंदूवादी व्यक्तिमत्व तथा पत्रकार हिंदू वीर चव्हाण के यांनी आज देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले व कॉरिडॉरसाठी संकल्प सोडला. परळी येथील प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर व्हावे यासाठी दिल्लीत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले. 

काशी विश्वनाथ, उज्जैनच्या धर्तीवर पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथे प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर व्हावे यासाठी आता थेट दिल्ली दरबारी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य हिंदू वीर सुरेश चव्हाणके यांनी परळीत केले.त्यांच्यासोबत श्यामजी महाराज होते.यावेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रधानमंत्री कार्यालय, सांस्कृतिक खाते, पर्यटन खाते आदी विभागात परळी वैजनाथ कॉरिडोरसाठी मदत करू. पण, त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा मुद्देसूद मसुदा स्थानिक व जिल्हा प्रशासनाने त्वरित करावा असे प्रतिपादन त्यांनी केले. धार्मिक कॉरिडॉरसाठी प्रधानमंत्री हे नेहमीच आग्रही आहेत. महाराष्ट्रीयन असल्याच्या नात्याने प्रभू वैद्यनाथाचा भक्त म्हणून मी स्वतः दिल्लीत यासाठी पाठपुरावा सुरेश चव्हाणके म्हणाले.

दोन गटात तुंबळ हाणामारी.! पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल.

केज (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिंदी येथे दोन गटात क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली असून पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात पंचायत समितीचे माजी सभापती संदीप जाधव पाटील यांचाही समावेश आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील शिंदी येथील यशवंत आंनदराव जाधव यांनी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:१५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी खरेदी केलेली नवीन गाडी क्रमांक एमएच ४६ -झेड ८५५८ हिची पुजा करण्यासाठी गावातील रेणुकामाता देवीचे मंदीरात गेले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या चुलत भावाचा मुलगा शशीकांत धर्मराज जाधव,असे दोघे मंदीरात गेले होते.तेथील गुरव सज्जन राजाभाऊ गुरव यांचे हस्ते नवीन गाडीची पुजा केली.पुतण्यास नवीन गाडी शिंदी चौकात घेवून जाण्यास सांगीतले व ते पायी शिंदी चौकात आले.तेव्हा तेथे त्यांचे मित्र भेटले.त्यांना त्यांनी शिंदी चौकातील प्रकाश माळी यांचे हाँटेलमध्ये चहा घेतला.तो पर्यत गाडी चौकाच्या पुढे पंन्नास फुट अंतरावर उभी केली होती. ते हॉटेल मधुन गाडीकडे जात असताना ८:३० वाजता त्यांची गाडी आडवुन त्यांच्या डाव्या हाताला धरुन गोवींद सुधीर जाधव पाटील याने त्याच्या हातातील लोखंडी पाईप पाठीतमारला.माजी सभापती संदीप संजय जाधव पाटील,सुधीर चंद्रसेन जाधव पाटील यांनी मिळुन तुम्ही देवीचे आम्हाला न विचारता नारळ का फोडलास? या कारणाची कुरापत काढुन चापटाबुक्याने लाथाने मारहाण करुन शिवीगाळ केली.कुटुंबाला जीवच मारुन टाकतो.अशी धमकी दिली.त्यावेळी त्यांचा पुतण्या शशीकांत हा भांडण सोडविण्यास आला असता त्याला पण चापटा-बुक्याने लाथाने मारहान करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
यशवंत आंनदराव जाधव यांच्या तक्रारी वरून गोवींद सुधीर जाधव पाटील,संदीप संजय जाधव पाटील,सुधीर चंद्रसेन जाधव पाटील सर्व रा.शिंदी यांचे विरुद्ध फिर्याद आहे केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर गोवींद सुधीर जाधव पाटील यांनी केज पोलिस ठाण्यात अशी तक्रार दिली आहे की, दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता ते गावातील चौकात सुभाष जाधव यांचे हॉटेल समोर रस्त्यावर उभा होते. त्यावेळी गावातील यशवंत अनंतराव जाधव व शशीकांत धर्मराज जाधव हे दोघेजण आले.त्यांनी गावातील ८:३० वाजता गुरव सज्जन राजेभाऊ गुरव यांचे भांडणामध्ये तुम्ही का सोडवासोडव केलीस?अशी कुरापत काढुन त्या दोघांनी मिळुन त्यांना गच्चीला धरुन चापटाबुक्याने लाथाने मारहान केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.त्यावेळी भांडणाचा आवाज ऐकुन वडील सुधीर चंद्रसेन जाधव आणि भाऊ संदीप संजय पाटील हे येवुन भांडण सोडवित असताना सुर्यकांत यशवंत जाधव, रमाकांत धर्मराज जाधव हे त्यांचे मोटारसायकलवर येवुन रमाकांतने त्यांना धरुन खाली पाडले. सुर्यकांतने त्याचे हातातील लोखंडी पाईपाने त्यांच्या पाठीत मारुन मुक्का मार दिला.चौघांनी मिळुन शिवीगाळ करुन चापटाबुक्याने लाथाने व लोखंडी पाईपाने मारहाण करुन जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
या प्रकरणी गोविंद सुधीर जाधव पाटील यांच्या फिर्यादी वरून यशवंत अनंतराव जाधव, शशीकांत धर्मराज जाधव, सुर्यकांत यशवंत जाधव आणी रमाकांत धर्मराज जाधव सर्व रा.शिंदी ता. केज यांचे विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

खाजगी ट्रॅव्हल्समध्ये लाखोंचा गुटखा. १७ लाखाचा मुद्देमाल हस्‍तगत.

धुळे (प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी नाशिक येथे ट्रॅव्हल बसला आग लागल्याच्या घटने दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी ट्रॅव्हल बसमधून गुंगीकारक पदार्थांची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याचा मुद्दा उघडकीस आणला होता. त्यानंतर धुळ्यात खाजगी ट्रॅव्हल्समधून गुटख्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.
 खाजगी ट्रॅव्हल बसमधून अवैधपणे गुटखा पान मसाला त्याचबरोबर नशेच्या वस्तू वाहतूक केली जात असल्याची घटना पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. धुळे  शहरातील चाळीसगाव रोड परिसरामध्ये खाजगी ट्रॅव्हल्समधून गुटख्‍याची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती.

१७ लाखाचा मुद्देमाल हस्‍तगत

माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता त्या दरम्यान संबंधित माहिती मिळालेली ट्रॅव्हल्स पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तात्काळ ट्रॅव्हल्स बस अडवून तपासणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व पानमसाला पोलिसांना तपासा दरम्यान आढळून आला. या कारवाईदरम्यान जवळपास 17 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून ट्रॅव्हल्स चालक व वाहकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विधानसभा अध्यक्ष आणि मंत्र्यांना न्यायालयाचा संतप्त सवाल.! गुजरात निवडणुकीत जाणं तुमचं अधिकृत काम आहे का?


मुंबई  (प्रतिनिधी)  देशात सध्या गुजरात निवडणूकिंच वारं जोरात वाहत असून, देशातील विविध राज्य  आणि महाराष्ट्रातील अनेक मंत्री व लोकप्रतिनिधी या निवडणुक प्रचाराच्या कामात व्यस्त आहेत. राज्यातील असेच काही मंत्री व लोकप्रतिनिधी हे महाराष्ट्राच्या कारभारला काहीसा थांबा देऊन, गुजरात निवडुकीत व्यस्त झाले आहेत. मात्र यावर  मुंबई विशेष न्यायालयानं तीव्र शब्दात ताशेरे ओढले असून, कोरोना काळातील टाळेबंदीदरम्यान वाढीव वीज बिलाचा मुद्द्यावरून आंदोलन केल्याप्रकरणी महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा न्यायलायन चांगलच झापलं आहे.

न्यायालयाने म्हणटले आहे की, एखादा खटला न्यायप्रविष्ट असताना गुजरात निवडणुकीच्या कामासाठी जाणं हे तुमचं अधिकृत काम आहे का?, असा संतप्त सवाल न्यायालयानं सभापती आणि मंत्र्यांना उद्देशून केला आहे. तसेच आणखी किती दिवस अनुपस्थितीत राहणार आहात? अशी विचारणाही त्यांच्या वकिलांकडे न्यायालयानं केली आहे. 

सावधान ! लम्पी स्किन रोगामुळे ५८२ पेक्ष्या जास्त जनावरांचा मृत्यू.! शेतकऱ्यांच पशुधन धोक्यात.


सोलापूर (प्रतिनिधी) लम्पी आजाराने सोलापूर जिल्ह्यात ५८२ पेक्ष्या जास्त जनावरांचा मृत्यू झाल्यानं पशुपालकांची चिंता वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यात ७ लाख ४५ हजार ३२४ गाय वर्ग जनावरे आहेत. त्यातील बाधित गावांची संख्या ७५८ इतकी आहेत. बाधित पशुधन संख्या १० हजार ३५८ असून, ४ हजार ५८ पशुधन बरे झाले आहे. मृत पशुधन संख्या ५८२ पेक्ष्या इतकी आहे.

सध्या बाधित असणारे पशुधन ५ हजार ७१८ आहे. अत्यवस्थ पशुधन २९३ आहेत. करमाळा तालुक्यातील बाधित जनावरे असणारे ईपी सेंटर वीट, राजुरी, सावडी, केडगाव, भिलारवाडी, भाळवणी, करमाळा, हिसरे, केम, गुळसडी, बोरगाव, उत्तर वडगाव, करंजे, साडे, हिंगणी, गौंडरे आणि झरे ही आहेत.

लम्पी’ जनावरांच्या आजारामुळे अफवांचा बाजारदेखील भरत आहे. त्याचा विपरीत परिणाम दुग्ध व्यवसायावर झाला. गैरसमजुतीतून गायीच्या खुल्या दुधापासून ग्राहक दुरावा ठेवून आहेत. त्यामुळे विक्री न होणाऱ्या दुधाचे करायचे काय, असा प्रश्न पशुपालकांपुढे निर्माण झाला. अगोदरच जनावरांमधील ‘लम्पी’ आजारामुळे पशुचालक चिंतेत असताना आता अफवांमुळे दुध विक्री होत नसल्याने त्यांना दुसऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराने ५८२ पेक्ष्या जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक मृत्यू माळशिरस तालुक्यात १९९ जनावरे मृत झाली असून, त्या खालोखाल करमाळा तालुक्यातील १६८ जनावरांचा समावेश आहे. करमाळा तालुक्यात सप्टेंबर महिन्यापासून जनावरांना लम्पी स्किनचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला एक दोन असणारी बाधित जनावरांची संख्या वाढत गेली. यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.