प्रधानमंत्री पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा करून अल्प रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकली. तर हजारो शेतकरी अद्यापही पीक विमापासून वंचित आहेत. त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने अमरावती येथील राणा कॉम्प्लेक्समधील प्रधानमंत्री पिक विमा कार्यालयात जाऊन कंपनीला जाब विचारला.
खुर्च्याची तोडफोड
योग्य प्रतिसाद सकारात्मक उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कपिल पडघान यांनी आक्रमक पवित्रा घेत पिक विमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्याची तोडफोड केली. यावेळी आठ दिवसात जर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम मिळाली नाही. तर पिक विमा कार्यालय पेटवून देण्याचा इशारा देण्यात आला. तर यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पिक विमा कंपनीच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
No comments:
Post a Comment