Sunday, August 31, 2025

अंबाजोगाई तालुक्यातील धक्कादायक घटना, सुगावच्या तरुणाची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या.

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या सुगाव गावातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी  एका तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या  केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत धक्कादायक घटना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनातून कोणताही तोडगा निघत नसल्याने आलेल्या नैराश्यातून नितीन माणिकराव चव्हाण या तरुणाने बीड जिल्ह्यातील सुगाव गावात आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येची माहिती देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सुगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नितीन चव्हाणने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे कळताच मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेले सुमारे 70 ते 80 तरुण तातडीने सुगाव गावाकडे परत निघाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत आंदोलनादरम्यान जीव गमवावा लागल्याची ही तिसरी दु:खद घटना आहे.

अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे गाड्यांच्या मार्गात बदल. दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाची माहिती.

नांदेड (प्रतिनिधी) हैद्राबाद मंडळातील गोदावरी नदी परिसरात बासर-नवीपेट (Basar – Navipet) दरम्यान (कि.मी. 432/10 ते 433/3) पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर गेल्यामुळे रेल्वे वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी खालील गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत.

मार्ग बदल (Diversions):

 1. 17663 रायचूर – परभणी • दिनांक : 30.08.2025

 बदललेला मार्ग : विकाराबाद – परळी – परभणी 

  वगळलेले थांबे : लिंगमपल्ली (LPI), सिकंदराबाद (SC), मलकाजगिरी ), बोलाराम, मेडचल, मुद्खेड , अंकन्नपल्ली, कामारेड्डी निजामाबाद , नवीपेट , बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा 

 2. 17406 आदिलाबाद – तिरुपती (क्रुष्णा एक्सप्रेस )

 दिनांक : 30.08.2025

 बदललेला मार्ग : मुद्खेड – नांदेड (– परभणी – परळी – विकाराबाद- सिकंदराबाद - चित्तूर 

वगळलेले थांबे : उमरी, धर्माबाद), बासर, निजामाबाद , कामारेड्डी , अंकन्नपल्ली (AKE), बोलाराम 

प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना वरील बदलांचा विचार करावा. अधिक माहितीसाठी रेल्वे हेल्पलाईन क्रमांक अथवा अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा.

— दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड मंडळ

दक्षिण मध्य रेल्वे – नांदेड मंडळ

बुलेटिन क्र. 27 (30.08.2025)

 अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे गोदावरी पूल (बसर–नवीपेट) दरम्यान रेल्वे वाहतूक प्रभावित.

 मार्ग बदल (Diversion)

 17663 रायचूर – परभणी (30.08.2025) : विकाराबाद – परळी – परभणी मार्गे वळविण्यात आली आहे.

(लिंगमपल्ली, सिकंदराबाद, मलकाजगिरी, बोलाराम, मेडचल, कामारेड्डी, निजामाबाद, बसर, धर्माबाद, उमरी, मुद्खेड, नांदेड, पूर्णा थांबे वगळले)

 17406 आदिलाबाद – तिरुपती (30.08.2025) : मुद्खेड – नांदेड – परभणी – परळी – विकाराबाद – सिकंदराबाद – चारलापल्ली मार्गे वळविण्यात आली आहे.

(उमरी, धर्माबाद, बसर, निजामाबाद, कामारेड्डी, अक्कनपेट, मिरजापल्ली, मेडचल, बोलाराम थांबे वगळले)

रद्दबातल गाडी (Cancellation)

 77646 नांदेड – निजामाबाद (30.08.2025) पूर्णपणे रद्द.

 प्रवासी अधिक माहितीसाठी रेल्वे हेल्पलाईन अथवा अधिकृत संकेतस्थळ तपासा.

अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाने दिली आहे.

अवैधरित्या गांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्यास पोलिसांनी सापळा रचून केले गजाआड.29 किलो 334 ग्रॅम गांजा जप्त.


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) अवैध रित्या गांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्यास सातारा पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. या कारवाईत पोलिसांनी 5 लाख 92 हजार 80 रुपये किंमतीचा 29 किलो 334 ग्रॅम गांजा, एक दुचाकी असा एकूण 6 लाख 7 हजार 80 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी शनिवार, 30 ऑगस्ट रोजी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहु कडूबा मोरे (25 वर्ष), रा. सिंदोण असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचे नाव आहे. परमेश्वरानंद उर्फ गोट्या दहिहांडे असे फरार आरोपीचे नाव आहे. सातारा परिसरातील अहिल्याबाई होळकर चौकात एक जण दुचाकीवर गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, उस्मानपूरा विभागाचे सहाय्यक आयुक्त मनिष कल्याणकर, सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शैलेंद्र देशमुख, गोविंद एकिलवाले, निर्मला राख, दिलीप बचाटे, उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, सहाय्यक फौजदार अण्णासाहेब सातदिवे, पोलिस अंमलदार जगदिश खंडाळकर, दिगंबर राठोड, महेश गोले, पुरुषोत्तम दायमा, सुनिल बेलकर, हमिद पठाण, दिपक शिंदे, दिनेश भुरेवाल, संदिप चिंचोले, सुनिल पवार, गंगाधर धनवटे अविनाश कवाळे आदींच्या पथकाने सापळा रचून लहु मोरे याला अहिल्याबाई होळकर चौकातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने सदरील गांजाचा साठा गेवराई ब्रुद्रक परिसरातील नगदेश्वर गड, महादेव मंदिर जवळून आणला असल्याची कबूली दिली.पोलिसांनी गेवराई बुद्रक परिसरातील नगदेश्वर गड येथे छापा मारुन दोन गोण्यात भरुन ठेवलेला गांजा जप्त केला. चौकशीरदरम्यान गांजाचा हा साठा परमेश्वरानंद उर्फ गोट्या दहिहांडे याचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्या लहु मोरे, परमेश्वरानंद उर्फ गोट्या दहिहांडे यांच्याविरुध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावठी कट्टा बाळगुन दहशत माजविणा-या इसमास केले जेरबंद.


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) गणेशोत्सव दरम्यान शांतता राहावी काही अनुचित प्रकार घडणार नाही याकरीता रेकाॅर्डवरील गुन्हेगार तपासणीचे आदेश पोलिस अधिक्षक डाॅ.विनयकुमार राठोड यांनी दिले आहे. गंगापुर हद्दीत नवीन कायगाव भागात गुन्हेगार यांचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेंडाळा ते गंगापुर रोडने एक इसम गावठी कट्टा घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांना माहिती मिळाली असता संशयीत नामें महेश मारुती जाधव, वय 27, राहणार दहेगाव बंगला, ता.गंगापुर, हा मोटारसायकलवर येताच शिताफिने पकडून अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात एक गावठी कट्टा ज्याची किंमत 30 हजार रुपये व एक मोटारसायकल किंमत 40,000 असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित आरोपींविरोधात गंगापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदरील कार्यवाई पोलिस अधिक्षक डाॅ.विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधिक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपुत यांचे नियोजनात सपोनि पवन इंगळे, पोह वाल्मिक निकम, शिवानंद बनगे, अशोक वाघ, पोअं महेश बिरुटे, अनिल काळे, संजय तांदळे यांनी केली आहे.

ग्रामीण मुलीचे वैद्यकीय शिक्षणातील यश सर्वांसाठी प्रेरणादायी.NEET 2025 मध्ये यशस्वी झालेल्या कु.मधुरा तिळकरीचा गौरव.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी शहरातील कु. मधुरा संदीप तिळकरी हिने NEET 2025 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या परिवारासह शहराचेही नाव उज्ज्वल केले आहे. तिचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा येथे एम.बी.बी.एस. या कोर्ससाठी प्रवेश निश्चित झाला आहे. या यशाचा आनंद व्यक्त करत आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, परळी वै यांच्या वतीने तिचा उत्साहवर्धक सत्कार करण्यात आला.
सत्कार कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक महादेव इटके, आर्ट ऑफ लिव्हिंगचे ज्येष्ठ प्रशिक्षक श्री. सुदाम कापसे, श्री. शिरीष चौधरी, सौ. रेणुका चौधरी, कु. मधुरा महादेव इटके, श्री. संदीप तिळकरी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्री. संजयभैया सेवलकर यांनीही उपस्थित राहून कु. मधुरा हिच्या मेहनतीचे व जिद्दीचे मनापासून कौतुक केले.
यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक महादेव इटके म्हणाले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील मुलीने वैद्यकीय क्षेत्रात दाखल होणे हा आनंदाचा विषय असून, हे यश सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कु. मधुरा हिने आपली अभ्यासातील प्रामाणिकता, चिकाटी व शिस्तीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. पुढील वैद्यकीय शिक्षणातही ती निश्चितच उत्कृष्ट यश संपादन करून समाजसेवेसाठी आपले योगदान देईल,” असे प्रतिपादन श्री इटके यांनी केले.
कु. मधुराच्या या यशामध्ये तिचे वडील आदर्श शिक्षक श्री. संदीप तिळकरी यांचा विशेष मोलाचा वाटा आहे. त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी सातत्याने योग्य मार्गदर्शन केले तसेच अभ्यासातील शिस्त, वेळेचे नियोजन आणि प्रामाणिक परिश्रम यांचे महत्व समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, “मुलीने मेहनत आणि शिस्त यावर विश्वास ठेवून हे यश मिळवले आहे. पुढे ती डॉक्टर म्हणून समाजसेवेत कार्य करेल, हीच आमची अपेक्षा आहे.”
यासोबतच काका श्री. दीपक तिळकरी, काकू सौ. वर्षा दीपक तिळकरी आणि भाऊ चि. सोहम यांनीही अखंड पाठबळ दिले. त्यांच्या प्रेरणेने आणि सहकार्यानेच मधुराने हे स्वप्न साकार केले.
कार्यक्रमाच्या शेवटी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने कु. मधुरा हिला उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पालक, नातेवाईक व शिक्षकांनीही तिच्या या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला.

Thursday, August 28, 2025

गुन्हेगारी तपासामध्ये तंत्रज्ञानाचा वापर बीड पोलिसांकडून ‘डीपआय’ ॲप लाँच: गुन्हेगारांचा डेटा आणि तपासाची दिशा एका क्लिकवर.


बीड (प्रतिनिधी) गुन्हेगारी तपासामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करत बीडपोलिसांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. बीड पोलिसांनी ‘डीप आय’ नावाचे एक मोबाईल ॲप तयार केले आहे, ज्यात गुन्हेगारांच्या माहितीपासून ते सर्व गुन्ह्यांच्या अद्ययावत माहितीपर्यंत सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे खून, दरोडा, मारामारी किंवा चोरी यांसारख्या गुन्ह्यांच्या तपासात काही अडचण आल्यास, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या ॲपद्वारे पोलिसांना योग्य दिशा दाखवणार आहे. असे ॲप तयार करणारे बीड पोलिस हे महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात पहिले ठरल्याचा दावा केला जात आहे.

ॲपची मदत काय होणार?

‘डीप आय’ ॲप पोलिसांचा तपास अधिक जलद आणि कार्यक्षम बनवेल. या ॲपमध्ये सर्व गुन्हेगारांची माहिती, त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे आणि फोटो उपलब्ध असतील. गुन्ह्याचा प्रकार आणि घटनास्थळाची माहिती दिल्यावर ॲप त्यासारख्या इतर गुन्ह्यांचा डेटा पोलिसांसमोर ठेवेल. यामुळे पोलिसांना कमी वेळात अधिक माहिती मिळवता येईल.

कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

डीप आय’ ॲप यशस्वीपणे वापरण्यासाठी सर्व पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात ॲप कसे वापरावे, गुन्हेगारांचा डेटा कसा अपडेट करावा आणि ‘एआय’च्या मदतीने तपासाची दिशा कशी ठरवावी, हे शिकवले जाईल.

१७ सप्टेंबरला होणार लाँच?

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १७ सप्टेंबर रोजी लाँच होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील पोलिस दलासाठी हा एक पथदर्शी (पायोनियर) उपक्रम ठरेल.

कॉल आणि डेटाचे विश्लेषणही होणार.

हे ॲप केवळ गुन्हेगारांच्या डेटापर्यंत मर्यादित नाही. यात कॉल ॲनालिसिस (सीडीआर), कॉल रेकॉर्ड ॲनालिसिस आणि गुन्ह्याशी संबंधित फोटो यांचेही विश्लेषण करता येणार आहे. हे तंत्रज्ञान पोलिसांना आरोपींच्या फोन कॉलचा तपशील, लोकेशन आणि इतर डिजिटल पुरावे एकत्र करून तपासाला अधिक अचूक दिशा देण्यास मदत करेल. यामुळे अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करणे सोपे होईल.

तपासाची गती वाढेल.

डीपआय ॲप हे गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरेल. या ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे तपासाची गती वाढेल आणि पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य दिशा मिळेल. यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे होईल.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड

दारूच्या नशेत पैशांचा वाद विकोपाला, मित्राची हॉटेलमध्येच कोयत्याने वार करत हत्या.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील अविनाश शंकर देवकर (वय ३५) याचा पैशाच्या वादातून खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी स्वराज कारभारी पौळ याला अवघ्या सहा तासांत अटक केली आहे. दरम्यान, मयतावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

अविनाश देवकर, आरोपी स्वराज पौळ आणि त्यांचा मित्र सलमान मुस्तफा शेख हे अंबाजोगाईतील एका हॉटेलमध्ये दारू पित बसले होते. त्यावेळी अविनाश आणि स्वराज यांच्यात पैशांवरून जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर अविनाश बाजूच्या केबिनमध्ये गेला असता, स्वराजने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यात तो जागीच ठार झाला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सलमान शेखलाही दुखापत झाली. या घटनेनंतर सलमानने तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना माहिती दिली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी वेगाने सूत्रे हलवली. सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआरच्या मदतीने पोलिसांनी आरोपी स्वराजचा माग काढत त्याला पकडले. दरम्यान, अविनाशची आई अंजना शंकर देवकर यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याला जाण्यापूर्वीच बेड्याआरोपी स्वराज पौळला पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक केली. लातूरहून पुण्याला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, पोलिसांनी तुळजापूर-सोलापूर महामार्गावर सापळा रचून त्याला रात्री दीड वाजता ताब्यात घेतले.

अतिवृष्टीने पीकांचे नुकसान.मात्र पंच नाम्यास विमा कंपनीचा नकार.बीडमध्ये शेतकऱ्यांना फटका.


बीड (प्रतिनिधी) राज्य सरकारने चालू खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या निकषांमध्ये बदल केल्याचा मोठा आर्थिक फटका बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. जिल्ह्यात १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यात सहभागी होण्यास विमा कंपनीने स्पष्ट नकार दिला आहे. आमची जबाबदारी केवळ पीक कापणी प्रयोगांचे निरीक्षण करण्यापुरतीच मर्यादित असल्याचे पत्र आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने तहसील प्रशासनाला दिले आहे.

विमा कंपनीने फिरवली पाठ.

काही दिवसांपूर्वी गेवराईच्या तहसीलदारांनी, एनडीआरएफच्या निकषांनुसार होणाऱ्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यात विमा कंपनीने सहभागी व्हावे, यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीला पत्र दिले होते. यावर उत्तर देताना कंपनीने म्हटले आहे की, ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आमची जबाबदारी केवळ पीक कापणी प्रयोगांचे सह-निरीक्षण करण्यासाठी मनुष्यबळ पुरवण्यापुरती आहे. एनडीआरएफच्या द्वारे आयोजित नुकसान मूल्यांकन सर्वेक्षणात आमचा सहभाग योजनेच्या कक्षेबाहेर आहे.’ कंपनीच्या या भूमिकेमुळे ऐन संकटाच्या काळात शेतकऱ्यांना कोणाचा आधार घ्यावा, असा प्रश्न पडला आहे.

निकष का बदलले?

२०२२ पासून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ १ रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती, त्याचा विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार भरत होते. मात्र, बीडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस पीक विमा भरल्याची प्रकरणे समोर आली होती. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने २०२५ च्या खरीप हंगामापासून योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल केले आहेत. मात्र, या बदलांची व्यापक माहिती शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे निकष बदलल्याने आता शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यात पावसाने मोठे नुकसान.

एकीकडे विमा कंपनीने हात वर केले असताना, दुसरीकडे जिल्ह्यात १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने मोठे संकट ओढवले आहे. १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. कृषी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे सुरू केले असून ते आता अंतिम टप्प्यात आहेत. पंचनाम्यानंतरच नुकसानीची निश्चित आकडेवारी समोर येणार आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे बाधित गावे ४९ असून नुकसानग्रस्त शेतकरी ३,४०७ आहेत. जिल्ह्यातील नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार २,०४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्याने पुराच्या पाण्यामुळे २ व्यक्तींचा मृत्यू झाला होता.

शेतामध्ये काम करत असताना धापेवाडा परिसरात वीज पडून आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू.

नागपूर (प्रतिनिधी) धापेवाडा येथे27 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी सुमारे 3:15 वाजता, शेतामध्ये काम करत असताना वीज पडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात वंदू प्रकाश पाटील, त्यांच्या मुलगा ओम प्रकाश पाटील आणि निर्मला रामचंद्र पराते यांचा समावेश आहे. ही घटना त्यांच्या कुटुंबासाठी प्रचंड धक्कादायक ठरली आहे, कारण आता या कुटुंबात फक्त 16 वर्षांची मुलगी राहिलेली आहे. 
घटना घडताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ गमे, अनुग्रह तिडके, सुमित भाऊ गमे व जितेंद्र भाऊ कोल्हे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून मृतदेह सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
परिसरातील लोक या दुर्दैवी घटनेने भावविभोर आहेत. स्थानिक प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकरी व नागरिकांना पावसाळ्यात वीजेच्या धोक्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Wednesday, August 27, 2025

शेतातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 9 लाखाचा मुद्देमाल जप्त.




आष्टी (प्रतिनिधी) तालुक्यातील धामणगाव शिवारातील शेतामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी police raid छापा मारून बारा जुगारी ताब्यात घेतले तर तब्बल नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल अंभोरा पोलीसांनी जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या धामणगाव येथील शेतामध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना सोमवारी मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा police raid मारला. यावेळी पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले. यावेळी जुगाऱ्या कडून रोख रक्कम, दुचाकी,मोबाईल व जुगारीचे साहित्य असा एकूण 8 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये gambling prevention act अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे, यांच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा पोलिसांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय सोपान येवले करीत आहे.

आष्टीला दिवाणी न्यायालय!सिंदफणा नदीवर बॅरेज.मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय.


मुंबई (प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ९ महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीमध्ये जलसंपदा, कामगार, सहकार, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग यासाठी मोठे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाचा फायदा पुण्यासह नागपूर, अमरावती आणि बीड जिल्ह्याला होणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेमके काय निर्णय झाले?

१) बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव , ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर (का) टाकळगाव (हिंगणी) (ता. गेवराई) या तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा विस्तार आणि बॅरेजमध्ये रुपांतरण करण्याच्या कामास मान्यता देण्यात आली. (जलसंपदा विभाग)

२) राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यास मान्यता देण्यात आली. (कामगार विभाग)

३) पुणे जिल्ह्यातील राजगड सहकारी साखर कारखाना लि. अनंतनगर निगडे, (ता. भोर) या साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मार्जिन मनी कर्जास मंजुरी तसेच संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सुमननगर, ता शेवगाव, अहिल्यानगर या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मुदती कर्ज शासन हमीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली. (सहकार विभाग)

४) पुणे जिल्ह्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना लि. चिंतामणीनगर, मु. पो. थेऊर (ता. हवेली) या कारखान्याच्या जमीन विक्रीस मान्यता देण्यात आली. (सहकार विभाग)

५) नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पास मान्यता, प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास, प्रकल्पाच्या आखणीस आणि भूसंपादनाकरीता मान्यता देण्यात आली. (सार्वजनिक बांधकाम विभाग)

६) बीड जिल्ह्यात आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापन होणार त्यानुषंगाने न्यायीक अधिकारी आणि कर्मचारीवृंद यांची पदे निर्मिती आणि या न्यायालयासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. (विधि व न्याय विभाग)

७) महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली. (विधि व न्याय विभाग)

८) विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्रे आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबविणार आहे. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

९) नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी वापरासाठी लिलावाव्दारे-प्रिमियम अथवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनी बाबत विशेष योजनेला आणखी एक वर्षाकरिता मुदतवाढ करण्यात आली. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

Tuesday, August 26, 2025

परळीतील सक्रीय समाजसेवक व व्यापारी - : शिवकुमार केदारी

वीरशैव लिंगायत समाजातील सक्रीय कार्यकर्ते म्हणून परिचित असणारे श्री. शिवकुमार केदारी यांचा वाढदिवस बुधवार, दि. २७ ऑगस्ट रोजी  आहे. समाजहितासाठी झटणारे, सर्वांशी आपुलकीने संवाद साधणारे व प्रसंगी अन्यायाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परळी शहरात सर्वपरिचित आहेत.

श्री. केदारी यांनी आपल्या कार्यातून समाजजीवनात ठसा उमटवला आहे. वीरशैव लिंगायत समाजाच्या विवाह सोहळ्यांना दिशा मिळावी यासाठी त्यांनी परळी लिंगायत वधूवर गटासह २०० पेक्षा जास्त गटांमध्ये सक्रिय भूमिका निभावली आहे. या माध्यमातून आतापर्यंत तब्बल ९७ विवाह यशस्वीरीत्या जुळवून आणण्याचा मान त्यांच्या वाट्याला आला आहे.
सामाजिक कार्यामध्ये त्यांनी वीरशैव विकास प्रतिष्ठान, परळीचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली असून, शहरातील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीच्या देखरेखीमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे. श्रमदानातून व समाजबांधवांना सोबत घेऊन स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.भारत देशावर जेव्हा कोरोना महामारीचे संकट आले, तेव्हा सर्वसामान्य कुटुंबांचे जगणे कठीण झाले. त्या कठीण काळात शिवकुमार केदारी यांनी वीरशैव लिंगायत समाजाच्या माध्यमातून शेकडो गरीब व होतकरू कुटुंबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदत पोहोचवली.
त्यामुळे अनेक गरजूंच्या घरांमध्ये दिलासा व आशेचा किरण निर्माण झाला. हा त्यांचा कार्यातील एक उल्लेखनीय अध्याय मानला जातो.
शहराच्या सामाजिक जीवनात अन्याय व गैरप्रकारांविरोधातही त्यांची भूमिका ठळक आहे. हिंद नगर भागातील अवैध दारू विक्री विरोधात त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. त्यानंतर संबंधित भागातील अवैध धंदे बंद करण्यात प्रशासनाला यश आले.
व्यवसाय क्षेत्रात केदारी कुटुंबीयांची परंपरा विशेष आहे. मागील ४० वर्षांपासून त्यांचे वडील परळी शहरातील पहिले “सुरभी बॅग सेंटर” सुरू करून सर्व प्रकारच्या बॅग विक्री व्यवसायाला प्रारंभ केला. आजही हा व्यवसाय केदारी कुटुंबीयांनी जपला असून परळीत त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
वैयक्तिक जीवनातही श्री. शिवकुमार केदारी यांनी आपल्या मुलांना शिक्षणाची भक्कम दिशा दिली आहे. त्यांच्या दोन्ही मुली इंजिनिअरिंग पदवीधर असून IT कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. मुलगा प्रणव हा इंजिनिअरिंग झाल्यानंतर सध्या हैदराबाद येथील सी-डॅक (CDAC) संस्थेत उच्च शिक्षण घेत आहे.
समाजहितासाठी सतत तत्पर राहणारे, कोरोनाकाळात गरीबांना आधार देणारे, शमशानभूमी संवर्धनात योगदान देणारे, कुटुंबवत्सल आणि व्यापारी क्षेत्रात आदर्श निर्माण करणारे असे जनतेचा आधारवड म्हणजे शिवकुमार केदारी. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
                   *लेखक*
               * किरण शिंदे *
               परळी वैजनाथ

आता लाडक्या बहिणीची होणार ई-केवायसी त्या शिवाय पडणार नाहीत बहिणी च्या खात्यात 1500 रुपये.

मुंबई (प्रतिनिधी) राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन सध्या जोरदार गदारोळ सुरू आहे. योजनेच्या लाभार्थी महिलांची कसून छाननी सुरू असताना दररोज नवीन बोगस लाभार्थी समोर येत आहेत.अलीकडेच, लाडकी बहीण योजनेतून 26 लाख 34 हजार बोगस महिलांनी लाभ घेतला असल्याचे समोर आले होते. यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र लाडक्या बहिणींचे नियम डावलून जे लाभ घेतात त्यांचे धाबे दणाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आता फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे. ई-केवायसी करुन फेरपडताळणी केली जाणार आहे. यामुळे आणखी काही बोगस लाभार्थींची माहिती समोर येईल. जर तुम्ही हे वेळेत केलं नाही तर तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत.
त्यामुळे आता सर्व महिलांना ई-केवायसी करावे लागणार आहे. ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच योजनेत पुढचा लाभ मिळणार आहे, लवकरच ही प्रोसेस सुरु केली जाईल. राज्य सरकारकडून ई-केवायसीच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याची कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे.
दरम्यान, जून महिन्यापासून जवळपास 26 लाख महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेत 2 कोटी 63 लाख महिलांनी लाभ घेतला आहे. त्यापैकी आता फक्त 2 कोटी 41 लाख महिलांना लाभ मिळणार आहे.
दरम्यान वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त आहे.कुटुंबात सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी आहेत
कुटुंबात आयकर भरतात, माजी/सध्याच्या आमदार-सांसद किंवा उच्चपदस्थ सरकारचे अधिकारी आहेत.
कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे. (ट्रॅक्टर वगळता)
ज्या महिलांना इतर योजनांअंतर्गत दरमहा लाभ उपलब्ध आहे, अशा महिलांना वगळणार.
ज्या महिला लग्नानंतर महाराष्ट्र सोडून इतर राज्यात स्थलांतरीत झाल्या त्यांना योजनेतून वगळलं जाईल.
निवडणुकीपूर्वी सरसकट महिलांना लाभ देणाऱ्या सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. आता छाननीच्या नावाखाली लाखो महिलांना योजनेतून वगळण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान, बोगस माहिती देऊन लाभ घेणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचारी महिलांवर होणारी कारवाई आणि योजनेची पुढील दिशा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. .

किराण्याची उधारी मागितल्याच्या कारणा वरून दुकानदाराला धारदार शास्त्राने मारहाण.

गेवराई (प्रतिनिधी) किराण्याची उधारी मागितल्याच्या कारणावरून दुकानदाराला धारदार शास्त्राने मारहाण केल्याची घटना बंगालीपिंपळा गावात घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी दुकानदार याच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
बंगाली पिंपळा दादासाहेब बबनराव तळतकर हे रविवारी सकाळी साडेआठ सुमारास आपल्या किराणा दुकानात असताना सिद्धार्थ बंडु माने हा तेथे आला. त्याने पाण्याची बाटली मागितली असता दुकानदार तळतकर यांनी ‘तुझ्या चुलत्याकडे माझी 900 रुपयांची उधारी आहे, ती आधी जमा कर.’ असे म्हणताच सिद्धार्थ माने संतापला.त्याने दुकानदार तळतकर यांना शिवीगाळ करून दुकानाबाहेर खेचले व चापट मारली. इतक्यात त्याचा चुलता सुधीर माने हा हातात धारदार `कत्ती घेऊन आला. दादासाहेब तळतकर यांच्या मानेवर व कानामागे कत्तीने वार करून गंभीर दुखापत केली.या वेळी तळतकर यांचा भाऊ गणेश तळतकर याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याही उजवा हातावर कत्तीचा वार करून जखमी केले. भगवान माने याने लाकडी काठीने तळतकरच्या पाठीवर मारहाण केली, तर मधुकर (बंडु) माने हा लोखंडी कोयता घेऊन आला आणि शिवीगाळ करू लागला.गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करून दुकानदार तळतकर व त्याचा भाऊ यांना सोडवले. जखमींना तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी सिद्धार्थ बंडु माने, सुधीर भगवान माने, भगवान बापुराव माने आणि मधुकर उर्फ बंडू माने सर्व रा. बंगाली पिंपळा यांच्याविरुद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला.आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक काही काळ तणाव.


बीड (प्रतिनिधी) ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करून गाडीवर दगडफेक झाल्याची घटना आज दुपारी साडेपाच वाजेच्या दरम्यान गेवराईमध्ये छत्रपती शिवाजी चौकात घडली. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती असून यामुळे हाके आणि पंडित समर्थक समोरासमोर येऊन काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या सहकाऱ्यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्या समर्थनाथ गेवराईमध्ये बॅनर लावले होते. यावरून बीड दौऱ्यावरील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार पंडित यांच्यावर टीका केली. त्यानंतर आज बीडकडे जात असताना छत्रपती शिवाजी चौकात हाके थांबले होते. यावेळी आमदार पंडित समर्थक अचानक आक्रमक झाले. त्यांनी हाके यांच्यावर हल्ला चढवला, मात्र पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली. त्यानंतर हाके आणि पंडित समर्थक समोरसमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत हाके यांना बीडच्या दिशेने पुढे रवाना केले. 

जेथे पुतळा जाळला तेथेच हल्ला.

आमदार पंडित यांच्यावर टीका केल्याने रविवारी याचा चौकात हाके यांचा पुतळा जाळण्यात आला होता. त्यानंतर आज कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्याच चौकात पोहचले होते. चौकात खाली उतरून कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलत असतानाच हाके यांच्यावर आमदार पंडित यांचे कार्यकर्ते धावून आले. हाके यांच्या गाडीवर चढून हल्ला करण्यात आला. मात्र, पोलिस आणि हाके समर्थकांनी वेळीच धाव घेतली. हाके यांना गाडीत बसवून तेथून रवाना करण्यात आले. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

हाके समाजात तेढ निर्माण करत आहेत.

समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे कुटिल कारस्थान हाके बीड जिल्ह्यात येऊन करत आहेत. अतिशय खालच्या पातळीवर माझ्यावर टीका करण्यात आली. यावर मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आज माझ्या सहकाऱ्यांनी हाके यांच्या क्रियेवर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या सहकाऱ्यांनी जरांगे यांचे समर्थनार्थ बॅनर लावले तर काय अडचण आहे. - विजयसिंह पंडित, आमदार, गेवराई

मुख्यमंत्री सुरक्षित नाहीत, आमचे काय.

मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका करण्यात येत आहे. मुंबईकडे मोठा लोंढा निघाला आहे, परिस्थिती कठीण आहे. माझ्या गाडीवर हल्ला करण्यात आला.- लक्ष्मण हाके, ओबीसी नेते

Monday, August 25, 2025

जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा.



बीड (प्रतिनिधी)  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता पुन्हा एकदा आंदोलन सुरू होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आता मुंबईत मोर्चा निघणार आहे. यासाठी बीडमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला 'चलो मुंबईची' घोषणा केली. आता मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय परतायचे नाही. गुलाल उधळूनच परत यायचे असा निर्धार यावेळी जरांगे पाटील यांनी केला.  पाटील यांनी यावेळी राज्य सरकारवर टीकाही केली. 

"आम्ही शांतपणे मुंबईला जाणार आणि शांततेत मराठा आरक्षण घेणार, समाजावर आलेले संकट मोडून काढणार.  मराठा समाजाच्या सभेमध्ये डीजे वाजवू दिला नाही, पण यापुढे बीडमध्ये कुठेही डीजे वाजवू देणार नाही हे नक्की. सत्ता येत असते, ती बदलत असते हे लक्षात ठेवा असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

"बीडमध्ये आमच्या सभेमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात , जरा थांबा, आम्ही मुंबईत येतोय. त्यावेळी काय करायचे ते करा असे थेट आव्हान मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिले. जर सरकारने आम्हाला आरक्षण दिले. आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही मुंबईला कशाला येऊ?, असेही जरांगे पाटील म्हणाले.

'संकट आता मोडून काढायचे' 

जरांगे पाटील म्हणाले, गडबड घोटाळा करु नका. त्यामुळे मराठा समाजावर संकट घोंघावतेय. ते संकट आता मोडून काढायचे आहे. तुमच्या आणि माझ्या भावनांचा सत्ताधाऱ्यांनी वापर करुन घेतला. मराठ्यांची ताकद मोठी आहे, पण आपण विचारांनी चाललो नाही. त्यामुळे आपल्या मुलांचे नुकसान झाले. प्रत्येकाने आपला वापर केला. उभ्या पिढ्यांचे वाटोळे झाले. यापुढे आपण विचारांनी चालायचे.  जीव गेला तरीही मागे हटणार नाही, ,गुलाल उधळूनच परतायचे, असेही पाटील म्हणाले.

सोहम विशाल बुद्रेचा मुंबईतील नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये MBBS प्रवेश.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळीकरां साठी अभिमानाची बातमी! शहरातील सुप्रसिद्ध पेढा विक्रेते विशाल बुद्रे यांचा सुपुत्र सोहम विशाल बुद्रे याने वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. मुंबईतील नामांकित एच. बी. टी. कूपर मेडिकल कॉलेज, जुहू येथे त्याचा एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित झाला असून या यशामुळे परळीकरांचा अभिमान उंचावला आहे.
लहानपणापासून अभ्यासू वृत्तीचा असलेला सोहम याने कठोर परिश्रम, चिकाटी आणि ध्येयवादी प्रयत्नांच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परळी शहरात आनंद व्यक्त केला जात असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सोहम बुद्रे याचे प्राथमिक शिक्षण चंपावती विद्यालय बीड  येथे झाले. त्यानंतर त्याने अकरावीपर्यंत माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालयात व बारावीचे शिक्षण के एस के महाविद्यालयात पूर्ण केले. शैक्षणिक जीवनात सतत उत्कृष्टता राखणारा सोहम हा लहानपणापासूनच अभ्यासात अगदी हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. सोहम विशाल बुद्रेच्या या यशामुळे त्याचे कुटुंब, नातेवाईक तसेच परळी शहरभरातून कौतुकाची दाद दिली जात आहे.

ह.भ.प.जनाई महाराज कोकाटे यांचे रांजनी कारखाना येथे कीर्तन नवयुवक गणेश मंडळ, रांजणी आयोजित अखंड हरिनाम सप्ताह.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):नवयुवक गणेश मंडळ, रांजणी ता.कळम जि.धाराशिव यांच्या वतीने सुरू असलेल्या भव्य अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा एक विशेष आकर्षण म्हणजे रविवार, दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी : श्री बी.बी.ठोंबरे  साहेब यांच्या स्मरणार्थ महाप्रासाद स्थळ, रांजणी, ता.कळम, जि.धाराशिव येथे  सुप्रसिद्ध भागवताचार्य तथा शिवपुराण कथा प्रवक्त्या बाल कीर्तनकार ह.भ.प. जनाई महाराज कोकाटे यांचे कीर्तन होणार आहे.
या दिवशी संध्याकाळी होणाऱ्या कीर्तनासाठी परिसरातील भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भक्तिमय वातावरणात होणाऱ्या या कीर्तन सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
कार्यक्रमानुसार दररोज पहाटे काकडा, दुपारी  हरिपाठ, सकाळी प्रवचन, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी कीर्तन आणि रात्री हरिपाठ-आरती असा भक्तिमय क्रम सुरू असून सर्वत्र आध्यात्मिक उर्जा अनुभवायला मिळत आहे.

ओबीसी प्रवर्गात आणखी 29 जातींचा समावेश होणार !केंद्र सरकारकडे शिफारस


मुंबई (प्रतिनिधी) राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. यासाठी त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

दरम्यान त्यासाठी 29 तारखेला जरांगे पाटील हे मुंबईत धडक देणार आहेत. मात्र त्या आधी राज्य सरकार ओबीसी समाजाबाबत महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

राज्याच्या ओबीसी जातींच्या महाराष्ट्राच्या यादीत आता नव्या जातींचा समावेश करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे शिफारशीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. राज्य सरकारने मान्यता दिल्यास हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे जाणार आहे.

राज्यात ओबीसी जातींची यादी खूप मोठी आहे. यामध्ये अनेक जाती आहेत. उपजाती आहेत. आता राज्यातील अन्य जातींचा राज्याच्या ओबीसी जातींच्या यादीत समावेश करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने यावर प्रस्ताव मंजूर केल्यास तो प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. यामध्ये 29 जातींचा समावेश करण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे.

बीड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर.


बीड (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या 12 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार बीड जिल्हा परिषदेच्या 61  निवडणूक विभाग आणि त्याअंतर्गत  निर्वाचक गणात गेवराई-18, माजलगाव-12, वडवणी-04, बीड-16, शिरुर कासार-08, पाटोदा-06, आष्टी-14, केज-14, धारुर-06, परळी-12 आणि अंबेजोगाई-12 अशा एकूण जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या 122 निर्वाचक गणासाठी  निवडणूक प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

त्यानुसार आज दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. ही अधिसूचना बीड जिल्हाधिकारी कार्यालय, बीड जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, सर्व तहसील कार्यालये आणि सर्व पंचायत समिती कार्यालयांतील फलकांवर नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध असेल. सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचे अवलोकन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

Saturday, August 23, 2025

मोठी बातमी! बीड जिल्ह्यात ६, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ४ नवीन एमआयडीसींचा प्रस्ताव.


छत्रपती संभाजीनगर  (प्रतिनिधी) विभागातील प्रस्तावित ११ नवीन एमआयडीसींचा विकास करण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे. यात ६ एमआयडीसीबीड जिल्ह्यात, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सटाणा, अंबेलोहळ, आरापूर आणि सिल्लोड या ४ नवीन एमआयडीसींचा समावेश आहे. जालना येथे नव्याने अतिरिक्त जालना नावाने आणखी एक एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली आहे. यापैकी सिल्लोड एमआयडीसीला मात्र शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असल्याने ही एमआयडीसी बारगळण्याचे चिन्हं आहे.

आशिया खंडातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेले औद्योगिक शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरने १९८०च्या दशकात ओळख निर्माण केली होती. ऑरिक सिटींतर्गत दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअरच्या (डीएमआयसी) शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात पिरॅमल फार्मा, एनएलएमके, ह्योसुंग इंडिया, टाेयोटा-किर्लोस्कर मोटार्स, फुजी इन्फोटेक, ओएरलिकॉन बालझर्स, कोल्हार ग्रुप, पर्किन्स, एथर एनर्जी, जेएसडब्ल्यू, लुब्रिझोल, कॉस्मो आणि वॉरेन रेमेडीज आदी मोठ्या कंपन्यांनी गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ऑरिकमध्ये आता औद्योगिक भूखंड शिल्लक नाही. वाळूज, शेंद्रा आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतही पूर्णपणे भरलेली आहे. आगामी कालावधीत येणारे उद्योग मराठवाड्यालाच पसंती देण्याची शक्यता लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात एकूण ११ नवीन औद्योगिक वसाहती प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

कोणत्या एमआयडीसी प्रस्तावित आणि किती हेक्टरछत्रपती संभाजीनगर जिल्हा

सटाणा एमआयडीसी-सरकारी जमीन २८.८९ हेक्टर, खासगी जमीन १०९.९२ हे. एकूण- १३८.८१.

संयुक्त मोजणी झाली. जमिनीच्या दरासंदर्भात शेतकऱ्यांसोबत प्राथमिक बैठक झाली. दुसरी बैठक लवकरच.---------------------------

अंबेलोहळ (ता. गंगापूर) एमआयडीसीसरकारी जमीन- ३.४० हे., खासगी जमीन- १६७.०९ हे. एकूण १७०.०९ हेक्टर.

जमीन निवड समितीची पहाणी झाली. एमआयडीसीचा प्रस्ताव स्थानिक प्रादेशिक कार्यालयाने महामंडळाकडे पाठविला.---------------------------------

आरापूर एमआयडीसीसरकारी जमीन- ९.६० हेक्टर, खासगी क्षेत्र- ७५२.४३ हेक्टर., एकूण- ७६२.०३ हेक्टर. शासनाकडून मंजुरी. शासनाने संबंधित जमीन क्षेत्र एमआयडीसी नोटिफाइड म्हणून अधिसूचनेतून जारी केले. लवकरच भूसंपादन आणि शेतकऱ्यांसोबत जमीन दरासंदर्भात वाटाघाटी.

-------------------------सिल्लोड एमआयडीसी

एकूण जमीन २९०.९१ हेक्टर. सर्वाधिक खासगी जमीन. चारपैकी तीन गावांतील शेतकऱ्यांचा एमआयडीसीसाठी जमीन देण्यास विरोध.--------------------------------------------------

जालना टप्पा २ एमआयडीसी.

जालना टप्पा २ करिता सरकारी जमीन २२.५० हेक्टर, खासगी ३४६.५९ हेक्टर. एकूण ३६९.१४ हेक्टर. स्थळ पहाणी झाली. जमीन क्षेत्र एमआयडीसी नोटिफाइड करण्यात आले. अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर.

-----------------------------------बीड जिल्हापिसेगाव (ता. केज) -सरकारी जमीन १६ हेक्टर. प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित.

----------------------------कामखेडा (बीड)सरकारी जमीन ८२.४७ हेक्टर. भूनिवड समितीची पहाणी झाली. प्रस्ताव मंजुरीसाठी एमआयडीसी मुख्यालयास सादर.----------------------------------------

आष्टी- पिंप्रीसरकारी जमीन १८.३५ हेक्टर. खासगी २७.४५ हेक्टर. एकूण ४५.८० हेक्टर. उच्चाधिकार समितीची मंजुरी. सर्वेक्षण करण्यात आले.

----------------------------------सिरसाळा टप्पा २ (परळी वैजिनाथ)सरकारी जमीन ५० हेक्टर. उच्चाधिकार समितीची मंजुरी.-------------------

कळवटी, लमान तांडा (अंबाजोगाई)जमीन ८० हेक्टर. कार्यकारी अभियंता यांचा अहवाल येणे बाकी आहे.

----------------------------वडवणी एमआयडीसीजमीन ५० हेक्टर, भूमिअभिलेख आणि एमआयडीसी यांची संयुक्त मोजणी करणे बाकी.

एकुलत्या एक मुलाने घरातच संपवलं आयुष्य .झोपेतून उठताच आईला बसला धक्का.


आष्टी (प्रतिनिधी) : घराच्या समोरील पडवीत गळफास घेऊन एका तरुणाने जीवन संपविल्याची घटना बीडसांगवी येथे शुक्रवारी घडली. अविनाश बापू दिवटे (२३) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील अविनाश बापू दिवटे हा तरूण नेहमीप्रमाणेच जेवण करून घरात झोपला होता. शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान आईला जाग आली. यावेळी घराच्या समोरील पडवीत दोरीच्या साह्याने गळफास घेतलेला मुलाचा लटकलेला मृतदेह नजरेस पडताच त्यांना धक्काच बसला. अविनाश एकुलता एक मुलगा होता. त्याने जीवन कोणत्या कारणाने संपवलं हे अद्याप समजू शकले नाही. मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सरकारी वकिलाने न्यायालयाच्या आवारात केली आत्महत्या लिपिकासह न्यायाधीशां वर गुन्हा दाखल.


वडवणी (प्रतिनिधी) : येथील सरकारी वकील विनायक लिंबाजी चंदेल (वय ४७, रा. इंदेवाडी, जि. परभणी) यांनी २० ऑगस्ट रोजी वडवणी न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात दोन दिवसांनंतर गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी एका न्यायाधीशांवर आणि लिपिकावर मनमानी कारभार, वारंवार अपमान करून मानसिक छळाचा आरोप केल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजित चंदेल (१९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जून २०२५ पासून वडवणी कोर्टातील नवनियुक्त न्यायाधीश रफीक शेख व लिपिक आण्णासाहेब तायडे हे त्यांना मानसिक त्रास देत होते. अपमानित करणे, मनमानी काम करणे यामुळे ते सतत चिंताग्रस्त होते. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे विश्वजित याने म्हटले आहे. 

कुटुंबीयांनी समजावले, पण...

९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या वेळी विनायक चंदेल यांनी कुटुंबीयांना हा त्रास सांगितला होता. तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी, विशेषतः आजोबांनी त्यांना समजावले होते की, ‘तू टेन्शन घेऊ नकोस, तुझी बदली होईल किंवा त्यांची बदली होईल.’ मात्र, त्रास कमी झाला नाही. 

आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी

  • पोलिसांनी मृतदेहाची झडती घेतली असता, विनायक चंदेल यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत त्यांनी न्यायाधीश रफीक शेख आणि क्लार्क तायडे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते.
  • तसेच त्यांनी न्याय मिळवण्यासाठी मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई यांना विनंती केली होती. सर्वोच्च न्यायालयातही त्यांनी ई-मेलद्वारे ही माहिती दिली आहे. चिठ्ठीतील हस्ताक्षर आणि सही आपल्या वडिलांचीच असल्याचा दावा विश्वजित चंदेल यांनी केला आहे.

Friday, August 22, 2025

बेपत्ता महिला होमगार्ड चा मृतदेह पांगरी च्या नाल्यात आढळला घातपाताचा संशय.

बीड (प्रतिनिधी) बेपत्ता झालेल्या महिला होमगार्ड चा मृतदेह पांगरी च्या पुढे नाल्यात आढळून आल्याने खळबळ माजली असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. अयोध्या राहुल व्हरकटे (वय २६) असं मयत महिलेचं नाव आहे.
पांगरीच्या पुढे असलेल्या एका नाल्यात अयोध्या यांचा मृतदेह आढळून आला आहे.घटनास्थळी शिवाजीनगर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे टीम पोहोचली आहे. दरम्यान अयोध्या यांच्या मृत्युमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. मयत महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याला शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.अयोध्या व्हरकटे बेपत्ता झाल्याबाबत शिवाजीनगर ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. दोन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. वासनवाडीच्या पुढे पांगरी जवळील एका नाल्यात अयोध्या यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे आता पोलिसांनी एका महिलेस ताब्यात घेतलं असून त्या महिलेची चौकशी देखील सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे . या घटनेमागे हत्येचा संशय व्यक्त करण्यात येतं असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

परळी तालुक्यातील रत्ननगर तांड्यात तरुणाची कौटुंबिक वादातून डोक्यात कोयत्याने वार करून हत्या


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील रत्ननगर तांड्यात एका तरुणाची कौटुंबिक वादातून डोक्यात कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री जळगव्हाण ता.परळी येथे घडली. अतिशय निघृणपणे खून करून डोके पुर्णतः ठेचण्यात आल्याचे दिसून येत आहे. ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत तरुणाचे नाव भीमरावशिवाजी राठोड असून, आरोपीचे नाव अनिल चव्हाण आहे, जो घटना स्थळावरून फरार झाला आहे. दरम्यान मयत भिमराव राठोड हे आरोपी अनिल चव्हाणचे मेव्हणा असून कौटूंबिक वादातूनच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, अनिल बाबासाहेब चव्हाण वय 30 वर्ष, रा.रामनगर तांडा आणि पप्पु उर्फ भीमराव शिवाजी राठोड वय 26 वर्ष, रा.रामनगर तांडा, ता. परळी यांच्यात घरगुती वाद सुरू होता.हा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता आणि यावरून अनिल चव्हाणने भीमरावला संपवण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी अनिलने भीमरावला रत्ननगर तांड्यात बोलावले. या भेटीत दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला. बाचाबाची झाली आणि नंतर हाणामारीत रूपांतर झालं. या हाणामारी दरम्यान अनिलने जवळच असलेला कोयता उचलून भीमरावच्या डोक्यात अनेकदा वार केले. यात भीमराव गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण घटनास्थळावरून फरार झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिस ठाण्याचे सपोनि. गोरखनाथ दहिफळे, सोनवणे, देशमुख, तौर, मुंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी अनिल चव्हाणच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत.
या हत्येच्या घटनेमुळे रत्ननगर तांडा आणि आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक आणि शेजारी घाबरलेले आहेत. पोलिसांनी येथील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे आणि घटनास्थळी अधिक सुरक्षाबळ तैनात केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने सखोल तपास सुरू केला आहे. आरोपीच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज, शेजाऱ्यांचे जबाब आणि मोबाइल लोकेशन यांचा आधार घेतला जात आहे. तसेच पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने हाताळत अनिल चव्हाणला लवकर पकडण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

Thursday, August 21, 2025

ज्येष्ठ पत्रकार सर्वोत्तम गावरस्कर यांचा भव्य नागरी सत्कार.सत्काराला उपस्थित राहण्याचे मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन.

बीड (प्रतिनिधी)  बीड जिल्ह्याचे सुपुत्र ज्येष्ठ संपादक सर्वोत्तम गावरस्कर अण्णा यांना मराठी पत्रकार परिषदेचा नागोजीराव दुधगावकर स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जालना रोडवरील हॉटेल अन्वीता येथे पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्यासह सर्व सन्माननीय संपादक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे माजी विभागीय सचिव दिलीप खिस्ती, विभागीय सचिव रवी उबाळे, विभागीय समन्वयक सुभाष चौरे ,राज्य कार्यकारणी सदस्य विलास डोळसे जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर, जिल्हा सरचिटणीस सुभाष सुतार, जिल्हा कोषाध्यक्ष धनंजय आरबुणे ,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संजय हंगे, हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक दत्ता आंबेकर ,जिल्हा समन्वयक अभिमान्यु घरत, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत राजहंस, सचिन पवार,अविनाश कदम, जुनेद बागवान, दिलीप झगडे, संजय रानभरे, गौतम बचुटे ,कादर मकरानी , तालुका अध्यक्ष दत्ता आजबे, मधुकर तौर, जालिंदर नन्नवरे ,अजय जोशी, हरीश यादव, विजय आरकडे, सतीश सोनवणे, प्रशांत लाटकर आदींनी केले आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्याची तपासणी. कागदपत्रे अपुरी चुकीची अपलोड केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार


बीड (प्रतिनिधी) शालार्थ आयडी घोटाळ्याची तपासणी करण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्वच शिक्षकांना 30 ऑगस्ट पर्यंत कागदपत्र अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये काही कागदपत्र अपुरी किंवा चुकीची अपलोड झाल्यास थेट शिक्षक ते उपसंचालक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे बोगस शिक्षकात खळबळ उडाली आहे

शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार ७ जुलै २०२५ नंतर शालार्थ आयडी आदेश मिळवणाऱ्या सर्वच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, वैयक्तिक मान्यता आदेश व शालार्थ आयडी आदेश पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया विभागीय शिक्षण उपसंचालक आणि मंडळ अध्यक्षांच्या स्तरावरून केली जाणार आहे. त्याआधी १८ नोव्हेंबर २०१६ ते सात जुलै २०२५ या काळात मंजूर झालेल्या मान्यतांची माहिती मुख्याध्यापक व प्राचार्यांना अपलोड करावी लागणार आहे.

तर, सात नोव्हेंबर २०१२ ते १८ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत शालार्थ आयडी आदेश प्रसिद्धच केलेले नसल्याने त्या काळातील नियुक्ती आदेश, रुजू अहवाल व वैयक्तिक मान्यता अपलोड करावी लागणार आहे. प्रत्येक प्रकरणाची पडताळणी विभागीय स्तरावरून केली जाणार असून कागदपत्रे उपलब्ध नसल्यास संबंधित प्रकरणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुनावणीद्वारेच निर्णय घेण्यात येणार आहे.

यात सर्वांत गंभीर बाब म्हणजे वैयक्तिक मान्यतेत जर अनियमितता आढळून आली, तर संबंधित मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यावरच फौजदारी कारवाई होणार आहे. शासकीय अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आता अस्वस्थ झाले आहेत.


लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱी टोळी जेरबंद. संशयास्पद वर्तन केल्याने प्रकार उघडकीस.


वडवणी (प्रतिनिधी) : लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीला वडवणी पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्वर रोमन (रा. वडवणी) नावाच्या तरुणाचे लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने या टोळीने त्याच्याकडून १ लाख ७० हजार रुपये घेतले होते. लग्नानंतर वधूच्या नातेवाइकांनी संशयास्पद वर्तन केल्याने हा प्रकार उघडकीस आला.

ज्ञानेश्वर यांचे लग्न जालना जिल्ह्यातील ‘राधा’ नावाच्या मुलीसोबत ठरले. या बदल्यात टोळीने २ लाख रुपयांची मागणी केली होती; पण, तडजोडीअंती १ लाख ७० हजार रुपये दिले गेले. लग्नानंतर मुलीची आई न येता, तिला घेण्यासाठी सोमेश वाघमारे आणि प्रियंका बाफना आले. त्यांच्या बोलण्यावर संशय आल्याने ज्ञानेश्वर आणि त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना थेट वडवणी पोलिस ठाण्यात नेले.

सहायक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांनी चौकशी केली असता, हा लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी असल्याचे समोर आले. ज्ञानेश्वर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नऊ आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.

दोन महिन्यांत दुसरी कारवाई.

वडवणी पोलिसांनी अशा प्रकारची दोन महिन्यांतील ही दुसरी कारवाई केली आहे. यापूर्वी, उपळी येथील एका ऊसतोड मजुराची याच पद्धतीने ३ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. त्यावेळीही संशयास्पद वर्तन लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता, ही फसवणूक करणारी टोळी असल्याचे उघड झाले होते. यावरून, लग्नासाठी स्थळ शोधणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अशी आहेत आरोपींची नावे.

महादेव जनार्दन घाटे (रा. उपळी ता.वडवणी), कैलास बाबाराव दळवी, जनार्दन प्रल्हाद थोरात (रा. रिसोड, जि. वाशिम), वनमाला मुन्ना शर्मा, राधा मुन्ना शर्मा (रा. कन्हय्यानगर, जालना), माधुरी फराज खान, सोमेश सुनील वाघमारे (रा. रमाबाई नगर, रेल्वे स्टेशन जुना जालना), प्रियंका ललितकुमार बाफना (रा. न्यू मोढा रोड, जालना) व एका अनोळखी महिलेचा आरोपींमध्ये समावेश आहे. यातील नवरी राधासह प्रियंका आणि सोमेश या तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

सरकारी वकिलाच्या मृत्यूवर कुटुंबीयांचा आरोप आत्महत्या नसुन घातपात.पोलिसां च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.


बीड (प्रतिनिधी) वडवणी येथील न्यायालयात सरकारी वकील व्ही. एल. चंदेल (रा. इंधेवाडी, जि. परभणी) यांनी आत्महत्या केली असली तरी, हा प्रकार घातपात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. चंदेल यांच्या मुलाने वडिलांवर मानसिक छळ आणि कामाचा ताण असल्याचा दावा केला असून, न्याय मागण्याच्या ठिकाणीच वडिलांनी हे पाऊल उचलल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. तर चंदेल यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवर मौन बाळगल्याने आणि कोणतीही कारवाई न केल्याने वडवणी पोलिस वादात सापडले आहेत.

मयत चंदेल यांचा मुलगा विश्वजित याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘कोणताही व्यक्ती घरात किंवा एकांत ठिकाणी आत्महत्या करतो, पण माझ्या वडिलांनी न्याय मागण्याच्या ठिकाणी आत्महत्या केली. त्यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटनुसार योग्य ती कारवाई उच्च पातळीवर झाली पाहिजे.’ वडिलांना सतत मानसिक त्रास, तणाव आणि ऑफिसचा मोठा दबाव जाणवत होता, असेही त्याने नमूद केले. वडिलांसोबत शेवटचे बोलणे परवा रात्री झाले होते, असेही त्याने स्पष्ट केले.मयत चंदेल यांचे आतेभाऊ आनंदराव कच्छवे यांनी तर या घटनेला ‘ठरवून केलेला घातपात’ असे संबोधले. ‘वकील साहेब अत्यंत इमानदार होते. वकिली पेशात इमानदारीला महत्त्व नसते, त्यामुळे हा प्रकार घडला असावा,’ असा आरोप त्यांनी केला. पोलिसांच्या कार्यवाहीवरही त्यांनी संशय व्यक्त केला. ‘घरातून कुणीही पोहोचण्याआधीच पोलिसांनी डेथ बॉडी काढली आणि पंचनामा केला,’ असे त्यांनी म्हटले. तसेच, ‘सुसाईड नोटची सत्यता आम्हाला अजूनही माहीत नाही, त्यात बदल केला असावा,’ असा संशयही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, मयत चंदेल यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

वेळ पडली तर उपोषण करू.

या घटनेचा निषेध करत कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी लढा देण्याचा निर्धार केला आहे. ‘याची सीबीआय चौकशी व्हावी, या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. गरज पडल्यास, योग्य न्याय मिळेपर्यंत आम्ही उपोषण करू,’ असा इशाराही कच्छवे यांनी दिला आहे.

वर्षा व्हगाडे येणार अडचणीत.

सरकारी वकील चंदेल त्यांच्या खिशामध्ये निघालेल्या सुसाईट नोट संदर्भात वडवणी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांना विचारणा केली असता गुन्हा दाखल झाल्यावर त्या संदर्भातली तुम्हाला माहिती देऊ असे सांगत त्यांनी पुन्हा माहिती देण्यास टाळाटाळ केली. पोलिसांवर कुटूंबियांनी आरोप केल्याने ठाणेदार असलेल्या व्हगाडे या देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात सद् भावना दिन संपन्न.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात सद्भावना दिन उत्साहात साजरा करण्यात आला या  निमित्त महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी सामूहिक शपथ (प्रतिज्ञा) घेतली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अतुल दुबे, प्रा.यु.एन.फड , प्रा.पी.पी. तिडके मॅडम, प्रा.ए.ए.मुंडे मॅडम, प्रा.एस. के.अपार मॅडम, एस.बी. अष्टेकर, व्ही .एन.शिंदे, यु.पी.जगताप यांचा सह विद्यार्थी दिसत आहेत.

सौंदाळा ग्रामपंचायतची मानव हक्क संरक्षण समिती जाहीर.

अहिल्या नगर (प्रतिनिधी) अहिल्या नगर जिल्ह्यातील सौंदाळा ग्रामसभा ही मानव अधिकार संरक्षण समिती स्थापन करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामसभा ठरली आहे ग्रामसभेने ग्रामीण मानव अधिकार संरक्षण समिती स्थापन करण्याचा संकल्प केला ठरावानुसार समिती मानवी हक्क उल्लंगणाशी संबंधित तक्रारीचे निराकरण करण्यासाठी SHRC अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करेल 
अहिल्या नगर जिल्ह्यातील सौंदाळा ग्रामसभा ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामसभा ठरली आहे जी गाव पातळीवर मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मानवाधिकार संरक्षण समिती स्थापन करते . ग्रामसभेने ग्राम मानवाधिकार संरक्षण समिती स्थापन करण्याचा ठराव केला राज्य मानव अधिकार आयोगाच्या चौकटीत ग्रामीण भागात अशा समित्या स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्देशानुसार हे पाऊल उचलण्यात आल्याचे गावचे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले ठरावानुसार समिती मानवी हक्क उल्लंघनाशी संबंधित तक्रारीची निराकरण करण्यासाठी हक्क आणि कर्तव्याबद्दल जागरूकता पसरविण्यासाठी आणि कायदेशीर उपाय कसे मिळवायचे याबद्दल नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी SHRC अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करेल 
 निवडलेले प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते महिला शिक्षक अपंग व्यक्तींसह 11 सदस्यांचा समावेश असलेले सदस्य पोलिस आणि इतर एजन्सीशी सहकार्य करून उल्लंघनाचे निराकरण करेल आणि सुधार आवश्यक उपाययोजनांची शिफारस करेल ठरावानुसार सरपंच अध्यक्ष म्हणून काम करतील तर तर गावात मानवी हक्क संरक्षणाचे प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित  करण्यासाठी प्रशिक्षण घेणे जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे आणि अधिकाऱ्यांशी समन्वय साधने हे या ठरावात समितीला बंधनकारक आहे 

ग्रामसभा या प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये तळागाळातील लोकशाही संस्था आहेत ज्या मानवी संरक्षणास प्रोत्साहन देऊन पंचायतीचे प्रभावी कामकाज सुचित करतात प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी मध्ये लोकांचा सहभाग वाढवणे अशी कर्तव्य ग्रामसभेत अपेक्षित आहेत

Wednesday, August 20, 2025

वडवणी न्यायालयातील घटनेने खळबळ सरकारी वकिलाने घेतला गळफास!


वडवणी (प्रतिनिधी) वडवणी येथील न्यायालयातील सहाय्यक सरकारी वकील पीपी चंदेल यांनी कोर्ट रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे सकाळी कोर्ट उघडल्यानंतर ही घटना निदर्शनास आली.

जानेवारी 2025 रोजी चंदेल यांचे सहाय्यक सरकारी अभियंता या पदावर नियुक्ती झाली होती अवघ्या सात-आठ महिन्यात त्यांनी आपले जीवन का संपवले याबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

बुधवारी सकाळी न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर वकील मंडळी आणि कर्मचारी न्यायालयात आले तेव्हा चंदेल यांचा मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला.

डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे - प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे.

मुंबई  (प्रतिनिधी)  १४ सप्टेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली होत असुन या राज्यव्यापी अधिवेशनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यात डिजिटल मिडिया परिषदेचे जाळे निर्माण करण्याचं काम आम्ही घेतलं आहे. राज्यातील जवळपास 30 जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यकारिणीच्या निवडी जाहीर केल्या गेल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यांत सुध्दा डिजिटल मिडिया परिषदेच्या जिल्हा पदाधिकारी निवडी संदर्भात यंत्रणा उभी केली गेली आहे. महत्वाचे म्हणजे या राज्यव्यापी अधिवेशनात परिषदेशी जोडल्या गेलेल्या या पत्रकारांना एकत्र करून डिजिटल माध्यमांची तांत्रिक माहिती देणे, तसेच परस्पर सुसंवाद, येणाऱ्या अडचणी यांची चर्चा करणे हा या अधिवेशनाचा उद्देश असल्याच्या सुचना परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांनी दिल्या आहेत.14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता एकनाथ रंगमंदिर क्रांती चौक येथे मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून डिजिटल मिडिया विश्वातील मान्यवरांची व्याख्यानं देखील आयोजित केली आहेत. तसेच उत्कृष्ट युट्यूब आणि पोर्टल चालविणाऱ्या दहा संपादकांचा अधिवेशनात सन्मान करण्यात येणार आहे. सबस्क्राईबर्स, व्ह्यूवर्सची संख्या, तांत्रिक बाजू, बातम्यांची निवड आणि लोकांचे प्रश्न उत्तम पध्दतीनं मांडणा-या संपादकांची निवड करून त्यांचा गौरव केला जाईल.
डिजिटल मिडिया परिषदेची अद्याप राज्य कार्यकारिणी झालेली नाही.अधिवेशनात राज्य कार्यकारिणी सुध्दा निवडली जाणार असल्याचे मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांनी आदेशीत केले आहे. डिजिटल मिडियाला सरकारने जाहिराती देण्याचा निर्णय घेतला असला तरी या जीआर मध्ये युट्यूब चँनल्स तसेच न्यूज पोर्टलचा उल्लेख  केला गेला नाही. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून देत त्यांना जाहिराती मिळाव्यात असा प्रयत्न केला जाणार असल्याचे तसेच डिजिटल पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी यासाठी देखील सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असून अधिवेशनात तसे ठराव मांडले जाणार आहेत. 
प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे अनेक प्रश्न अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने मार्गी लावले आहेत.त्याच प्रमाणे डिजिटल मिडियाला भेडसावणारे प्रश्न हाती घेऊन डिजिटल मिडिया परिषद त्यांचा पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांनी सुध्दा आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वांसोबत संपर्क साधावा व सर्वांना सोबत घेऊन 
जिल्हास्तरीय कार्यकारिणी, तालुका स्तरावर असलेल्या कार्यकारिणी मधील पदाधिकारी व सदस्यांनी या महत्वपूर्ण असलेल्या राज्यव्यापी अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन देखील डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.

Saturday, August 16, 2025

बीडमध्ये जोरदार पाशसाची हजेरी मांजरा प्रकल्प तब्बल 80 % भरला, धाराशिव लातूरसह बिदर प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना.


बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांजरा प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. प्रकल्प तब्बल 80 टक्क्यांपर्यंत भरला असून, पुढील दोन दिवसांत आणखी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बीड, लातूर, धाराशिव आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाटबंधारे विभागाने याबाबतचे पत्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

पूरस्थितीचा इशारा

जर धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागला, तर मांजरा नदीच्या पात्रालगतच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे बीड, लातूर, धाराशिव आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाटबंधारे विभागाने याबाबतचे पत्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

गावकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

नदीकाठच्या गावकऱ्यांनी अनावश्यक धोका न पत्करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अशी विनंती करण्यात येत आहे. विशेषतः पूरकाठावरील शेती, जनावरांचे चारण तसेच घरांची सुरक्षितता याकडे ग्रामस्थांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाऊस अजूनही कायम

हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मांजरा प्रकल्पातील पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. .

गेल्या दोन दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे बीड मधील धनेगाव येथे असलेल्या मांजरा प्रकल्पात पाणीसाठा 80 टक्क्याच्या वर पोहोचलाय. मांजरा धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या 18 तासातच या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात 22 टक्के इतकी मोठी वाढ झालीय. 15 ऑगस्ट रोजी दुपारी या धरणात 57 टक्के असलेला पाणीसाठा 16 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता थेट 80 टक्क्यावर पोहोचला आहे. यामुळे आता पुढील दोन वर्षापर्यंत परिसरातील पाणी प्रश्न मिटला आहे. बीड जिल्ह्यात असलेल्या मोठ्या प्रकल्पापैकी मांजरा एक असून याच मांजरा धरणातून बीड, लातूर,धाराशिव जिल्ह्यातील 22 गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच या धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनासाठी देखील वापरण्यात येते.

पावसामुळेपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 

बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथाळा, साळेगाव,मोगरा, गावासह परिसरातील तब्बल पंधरा गावात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. मध्यरात्री झालेल्या पावसाने शेताला तळ्याचे स्वरुप आले आहे. परिसरातील शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेले आहेत. तर अनेक नद्या ओसंडून वाहत आहेत. नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने माजलगाव तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यां च्या शालार्थ’ची २०१२ पासूनची कागदपत्रे ऑनलाइन; शिक्षण विभागाच्या निर्णयाचे परिणाम काय?


पुणे (प्रतिनिधी) राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यतांची कागदपत्रे आता डिजिटाइज केली जाणार आहेत. त्यानुसार २०१२ ते २०२५ या काळातील कागदपत्रे शालार्थ संकेतस्थळावर ३० ऑगस्टपर्यंत अपलोड करावी लागणार असून, वैयक्तिक मान्यतेमध्ये अनियमितता असल्यास फौजदारी कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे आता शालार्थ आयडीची सत्यासत्यता स्पष्ट होणार आहे.

नुकतेच नागपूर येथे बोगस शालार्थ आयडीचे प्रकरण उघडकीस आले. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीच्या शालार्थ आयडी मान्यतेसंदर्भात सुधारित कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता शालार्थ आयडी प्रक्रियेत ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्याबाबतचे, तसेच २०१२ ते २०२५ या कालावधीतील कागदपत्रे डिजिटाइज करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत.

दिनांक ७ जुलै २०२५ किंवा त्यानंतरच्या शालार्थ आयडी आदेश प्रकरणात वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी आदेश प्रसिद्ध करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ आयडी आदेश प्रत, नियुक्ती आदेश, रुजू अहवाल शालार्थ संकेतस्थळावर विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय अध्यक्ष यांच्या स्तरावरून अपलोड करावेत. त्यापूर्वी १८ नोव्हेंबर २०१६ ते ७ जुलै २०२५ या काळातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी प्रदान केल्यानंतर संबंधित वैयक्तिक मान्यता आदेश प्रत, शालार्थ आयडी आदेश प्रत, संबंधित खासगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश, संबंधित कर्मचाऱ्याचा रुजू अहवाल शालार्थ संकेतस्थळावर अपलोड करण्याबाबत डीडीओ १, मुख्याध्यापक-प्राचार्य स्तरावरून कार्यवाही करणे अनिवार्य असेल. तसेच ७ नोव्हेंबर २०१२ ते १८ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत शालार्थ आयडी आदेश प्रसिद्ध केलेले नाहीत. या कालावधीतील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याचा खासगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश, रुजू अहवाल आणि वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावेत, असे नमूद करण्यात आले आहे.

पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने विवाहितेची आत्महत्या.

आष्टी (प्रतिनिधी) : पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने एका २२ वर्षीय विवाहितेने तान्ह्या बाळाला घरी सोडून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आष्टी तालुक्यातील खिळद येथे गुरुवारी सकाळी समोर आली आहे. स्वाती नंदू नागरगोजे-गर्जे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घुगेवाडी (ता. पाटोदा) येथील नंदू नागरगोजे यांचा विवाह काही महिन्यांपूर्वी खिळद (ता. आष्टी) येथील स्वाती गर्जे यांच्यासोबत झाला होता.

Friday, August 15, 2025

यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.प्राचार्य अतुल दुबे यांच्या हस्ते ध्वजारोहन.

 
परळी वैजनाथनाथ (प्रतिनिधी)   शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय परळी वैजनाथ येथे प्राचार्य.अतुल दुबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून  79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
 15 ऑगस्ट 2025 दिन हा भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून  याच अनुषंगाने भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा म्हणजे घर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत दिनांक 13, 14 व 15 ऑगस्ट रोजी  नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य.अतुल दुबे यांच्या हस्ते करून 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रा.ए.ए. मुंडे मॅडम,प्रा.यु.एन.फड,प्रा.एस.आर.कापसे,प्रा.पी.पी.तिडके मॅडम,प्रा.के.एच.जायभाये, प्रा.डि.व्ही.उंबरे मॅडम, प्रा.ए.एन.खाकरे, प्रा.ए.डी.शेख ,प्रा.एस.के.अपार मॅडम एस.बी.अष्टेकर, व्ही.एन.शिंदे,जी. व्ही.कांबळे , यु.बी.जगताप,ए.बी.जगतकर यांच्या सह प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.