वीरशैव लिंगायत समाजातील सक्रीय कार्यकर्ते म्हणून परिचित असणारे श्री. शिवकुमार केदारी यांचा वाढदिवस बुधवार, दि. २७ ऑगस्ट रोजी आहे. समाजहितासाठी झटणारे, सर्वांशी आपुलकीने संवाद साधणारे व प्रसंगी अन्यायाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परळी शहरात सर्वपरिचित आहेत.
श्री. केदारी यांनी आपल्या कार्यातून समाजजीवनात ठसा उमटवला आहे. वीरशैव लिंगायत समाजाच्या विवाह सोहळ्यांना दिशा मिळावी यासाठी त्यांनी परळी लिंगायत वधूवर गटासह २०० पेक्षा जास्त गटांमध्ये सक्रिय भूमिका निभावली आहे. या माध्यमातून आतापर्यंत तब्बल ९७ विवाह यशस्वीरीत्या जुळवून आणण्याचा मान त्यांच्या वाट्याला आला आहे.
सामाजिक कार्यामध्ये त्यांनी वीरशैव विकास प्रतिष्ठान, परळीचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली असून, शहरातील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीच्या देखरेखीमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे. श्रमदानातून व समाजबांधवांना सोबत घेऊन स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.भारत देशावर जेव्हा कोरोना महामारीचे संकट आले, तेव्हा सर्वसामान्य कुटुंबांचे जगणे कठीण झाले. त्या कठीण काळात शिवकुमार केदारी यांनी वीरशैव लिंगायत समाजाच्या माध्यमातून शेकडो गरीब व होतकरू कुटुंबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदत पोहोचवली.
त्यामुळे अनेक गरजूंच्या घरांमध्ये दिलासा व आशेचा किरण निर्माण झाला. हा त्यांचा कार्यातील एक उल्लेखनीय अध्याय मानला जातो.
शहराच्या सामाजिक जीवनात अन्याय व गैरप्रकारांविरोधातही त्यांची भूमिका ठळक आहे. हिंद नगर भागातील अवैध दारू विक्री विरोधात त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. त्यानंतर संबंधित भागातील अवैध धंदे बंद करण्यात प्रशासनाला यश आले.
व्यवसाय क्षेत्रात केदारी कुटुंबीयांची परंपरा विशेष आहे. मागील ४० वर्षांपासून त्यांचे वडील परळी शहरातील पहिले “सुरभी बॅग सेंटर” सुरू करून सर्व प्रकारच्या बॅग विक्री व्यवसायाला प्रारंभ केला. आजही हा व्यवसाय केदारी कुटुंबीयांनी जपला असून परळीत त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
वैयक्तिक जीवनातही श्री. शिवकुमार केदारी यांनी आपल्या मुलांना शिक्षणाची भक्कम दिशा दिली आहे. त्यांच्या दोन्ही मुली इंजिनिअरिंग पदवीधर असून IT कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. मुलगा प्रणव हा इंजिनिअरिंग झाल्यानंतर सध्या हैदराबाद येथील सी-डॅक (CDAC) संस्थेत उच्च शिक्षण घेत आहे.
समाजहितासाठी सतत तत्पर राहणारे, कोरोनाकाळात गरीबांना आधार देणारे, शमशानभूमी संवर्धनात योगदान देणारे, कुटुंबवत्सल आणि व्यापारी क्षेत्रात आदर्श निर्माण करणारे असे जनतेचा आधारवड म्हणजे शिवकुमार केदारी. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
*लेखक*
* किरण शिंदे *
परळी वैजनाथ
No comments:
Post a Comment