Saturday, February 29, 2020

परळी तालुक्यातील 2019 चे उर्वरीत गावांचे अतीवृष्टी अनुदान त्वरीत दयावे-श्रीकांत पाथरकर.

परळी वैजनाथ ;(प्रतिनीधी )परळी तालुक्यात 2019 मधील खरीप हंगामात अतीवृष्टी झालयाने शेतक-यांचे पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळस तलाठयां मार्फत पंचनामे करण्यात आले होत. परंतु अद्यापही तालुक्यातील बहादुरवाडी, वानटाकळी तांडा, वाका, हाळम,खामगाव,सेलु,सबद्राबाद,वानटाकळी, माळहिवरा, आदी 9 गावांतील शेतक-यांचे खरीप अनुदान जमा झाले नाही तरी या 15 दिवसात शासनाने अनुदान त्वरीत जमा करावे अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी जिल्हाधीकारी व तहसिलदार याना केली आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतिने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांनी दिला.

Friday, February 28, 2020

राज्यात होणार ओबीसींची स्वतंत्र जनगणना? विधानसभेत सर्वपक्षांचे एकमत.

मुंबई(विशेष प्रतिनिधी),दि.28 -ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही सबंध महाराष्ट्राची व देशाची मागणी आहे. देशातील एकूण लोकसंख्येत ५४ टक्के ओबीसी आहेत. मात्र, असे असूनही एक नागरिक म्हणून ओबीसींच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात की नाही याची माहिती उपलब्ध नाही. यासाठी ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज सभागृहात केली.ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी या राज्य सरकारच्या मागणीचे केंद्र सरकारकडून आलेल्या नकारात्मक उत्तराचे विधानसभा अध्यक्षांनी सभागृहात वाचन केले, त्यावेळी भुजबळ यांनी सभागृहात स्वतंत्र ओबीसी जनगणनेबाबतची आपली मागणी उपस्थित केली.
यावेळी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी समाजाची वेगळी जनगणना करावी अशी मागणी केली.गेल्या कित्येक वर्षांपासून ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी करण्यात येत आहे. २०१० साली गोपीनाथ मुंडे, शरद पवार व समीर भुजबळ यांनी स्वतंत्र ओबीसी जनगणनेची मागणी केली होती. मात्र अजूनही या प्रस्तावाला मान्यता मिळालेली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे या स्वतंत्र ओबीसी जनगणनेच्या मागणीत कोणतंही राजकारण न करता या मागणीच समर्थन करावं. व ही जातनिहाय जनगणना करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांनी एकत्र यावं अशी मागणीही भुजबळ यांनी सभागृहात केली
या मागणीला विरोधकांनीही समर्थन दिले. यावेळी विधानसभेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, १९९० पासून ओबीसी समाजाच्या जनगणेची मागणी होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव दिला होता, अनेक मुख्यमंत्र्यांनीही प्रस्ताव दिला होता. त्यावर नरेंद्र मोदींची सही होती, देशात 54 % ओबीसींची संख्या असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ओबीसी जनगणना होणे आवाश्यक आहे असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांना जात नसते पण नरेंद्र मोदी हे स्वत: ओबीसी समाजाचे आहेत. छगन भुजबळांनी केलेली मागणी योग्य आहे. ओबीसींची वेगळी जनगणना व्हायलाच हवी. वंचितांच्या मदतीसाठी त्याची आवश्यकता आहे. हा राजकारणाचा प्रश्न नाही.आज आपल्याकडं मनुष्यबळ आहे. कम्प्युटरसारखं तंत्रज्ञान असताना जातीनिहाय जनगणनेला नेमकी काय अडचण असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला.
ओबीसी मंत्री विजय वड्डेटीवार यांनीही राज्यातील विविध जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण कमी असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.सोबतच 27 टक्याचे आरक्षण 19 टक्यावर आणून 52 टक्के ओबीसींची कुचंबणा करण्यात आल्याचे सांगितले.सोबतच 90 टक्के ओबीसी अधिकारी कर्मचारी हे पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असल्याचे सांगितले.
“देशाचे पंतप्रधान स्वत: ओबीसी आहेत”-
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही चर्चेत सहभागी होत ओबीसीच्या वेगळ्या जनगणनेला भाजपचा पाठिंबाच आहे. त्यासाठी पंतप्रधानांकडे धोरणात्मक प्रस्ताव घेऊन जाऊ असे विचार मांडले.ओबीसी जनगणेला आमचे समर्थन आहे, हा धोरणात्मक निर्णय आहे, पंतप्रधान योगायोगाने ओबीसी असल्याने आपण सर्वांनी पंतप्रधानांकडे जाऊन जातनिहाय जनगणनेची मागणी करु, लवकरच पंतप्रधानांना भेटू असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. तसेच विरोधी पक्षनेते फडणवीस आपल्यासोबत आहेत, ओबीसी जनगणनेला त्यांची साथ आहे, केंद्राची साथ नसली तरी आपण महाराष्ट्रात ओबीसी जनगणना करुन देशाला दाखवून देऊया. महाराष्ट्र हे जगातील पहिले राज्य आहे, ज्यामध्ये शाहू महाराजांनी वंचित घटकांना पहिल्यांदा आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणले असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.

रस्ताच प्लाॕट दाखवुन बनावट कागदपत्रे तयार करून खरेदी-विक्रीचा केला व्यवहार.

*परळी नगर नगरपरिषदेचा अजब कारभार  चौकशी न करताच नांवनोंदणीची कारवाई.*

* प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा-प्रा.पवन मुंडे*  

परळी वैजनाथ, (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्र.13 मधील पंचवटी नगर भागात बनावट कागदपत्रे तयार करून चक्क वाहतुकीच्या रस्त्यावरच भुखंड (प्लॉट) दाखवून त्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून विशेष म्हणजे या बोगस भुखंडाच्या नावनोंदणीची कोणतीही चौकशी न करता नगर पालिकेने कारवाई सुरू केल्याने पालिकेचा गलथानपणाही पुढे आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी केली आहे.
या प्रकरणी प्रा.पवन मुंडे यांनी पत्रकारांना सांगितले की, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रभाग क्र.13 मधील पंचवटीनगर भागातील पंचवटीनगर ते साईनगर या रस्त्यावर मालकीचा प्लॉट दाखवून त्याची सुमारे दोन लाख रूपयाला विक्री करण्याचा प्रकार गणपत भगवान कोरे (रा.स्नेहनगर) यांनी केला आहे. यासाठी तयार करण्यात आलेली सर्व कागदपत्रे बनावट आहेत. हा प्लॉट 24 डिसेंबर 2019 ला जावेद खान पिता लतीफ खान पठाण (रा.पेठ मोहल्ला परळी) यांना विकला असून  त्यापोटी पन्नास हजार रूपये देवून ताब्यासह इसार पावती करण्यात आली आहे. यासाठी साक्षीदार म्हणून नवनाथ दगडोबा गुरव व बाळासाहेब नारायण मुंडे (रा.दादाहरी वडगाव) यांनी काम पाहिले आहे. विशेष म्हणजे हा प्लॉट परळी सहकारी हौसिंग सोसायटी स्नेहनगर परळी या संस्थेच्या मालकीचा दाखवला गेला आहे. यासाठी बनावट प्रमाणपत्रही इसार पावतीला जोडले आहे. हा प्लॉट स्नेहनगर हौसिंग सोसायटीचा नसल्याचा खुलासा संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी लेखी पत्राद्वारे केला आहे. पंचवटीनगर ते साईनगर हा रस्ता सर्व्हे नंबर 499 मध्ये आहे. तो वाहतुकीचा रस्ता आहे. याची नोंद सिटी सर्व्हे, नगरपालिका व इतर संबंधितांकडे आहे. असे असतानाही रस्त्यावरच मालकीचा प्लॉट दाखवून त्याची इसार पावती करणे हा अजब प्रकार गणपत कोरे यांनी बनावट कागदपत्रे तयार करून केला असल्याचा आरोप नगरसेवक  प्रा.पवन मुंडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे या प्लॉटची खरेदी करणारे जावेद खान पिता लतीफ खान पठाण यांनी प्लॉटच्या नांवनोंदणीसाठी परळी नगर पालिकेकडे 12 फेब्रुवारी 2020 ला इसार पावतीच्या छायांकित प्रती जोडून अर्ज दाखल केला आहे. पालिका प्रशासनाने कोणतीही शहानिशा न करता या प्लॉटच्या नांवनोंदणीसाठी जाहीरनामा स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्धीला दिला आहे. इसार पावतीवर नावनोंदणी करण्याचा अजब प्रकार पालिकेने केला असून यासाठी मोठा आर्थिक व्यवहार पालिकेच्या संबंधित अधिकार्‍याने केला  असावा. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी केली आहे. हा प्रकार पालिकेला दिशाभूल करणारा असेल तर पालिकेने संबंधित खरेदी-विक्री करणार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा  दाखल करावा अशी मागणी प्रा.मुंडे यांनी केली आहे.
*परळी सहकारी हौसिंग सोसायटी स्नेहनगर या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांनी दिलेल्या लेखी खुलाशात 499 या सर्व्हेनंबर संस्थेची जागाच नाही असे स्पष्ट करून खरेदी-विक्रीच्या व्यवहाराबाबत 21 मार्च 2018 ला संस्थेचा ठराव झाल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडले आहे. हे पूर्णपणे दिशाभूल करणारे व खोटे असल्याचे संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांनी लेखी खुलाशात स्पष्ट केले आहे.*

Thursday, February 27, 2020

सी.ए.ए., एन.पी.आर. व एन.आर.सी. कायद्याच्या विरोधात परळीत २०३ जणांचे सामूहिक मुंडन .

परळी (प्रतिनिधी)  :  संविधान संरक्षण समिती परळी च्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाच्या ३२ व्या दिवशी २६ फेब्रुवारी २०२० रोजी परळी येथील संविधान संरक्षण भूमी ( शाहीन बाग ) तळ या ठिकाणी सायंकाळच्या सत्रात सी.ए.ए. एन.पी.आर. व एन.आर.सी. कायदा व दिल्ली येथील झालेल्या जातीय हिंसाचाराच्या निषेधार्थ २०३ युवकांनी तोंडावर काळ्या फिती लावून सामूहिक मुंडन करून केंद्र सरकारच्या अन्याकारक धोरणा विरूध्द म. गांधी यांनी दाखवलेल्या अहिंसेच्या मार्गाने निषेध केला. संविधान संरक्षण समिती परळी चे अध्यक्ष पी.एस.घाडगे, मुफ्ती अश्फाक, अनंत इंगळे, फुले-आंबेडकरी अभ्यासक इंजि.भगवान साकसमुद्रे, जी.एस. सौंदळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सांस्कृतिक कार्यवाहक मनोहर जायभाय यांनी या आंदोलनात सोबत असल्याचे सांगितले. यावेळी अनिस चे बीड जिल्हा अध्यक्ष प्रदीप चव्हाण, प्रा.विलास रोडे, जाबेर खान पठाण, सय्यद समद, अ. रहेमान खुरेशी, शकील ईनामदार, मोईन नवाब, हाफेज जफर, काझी अलीशान, नजीर अहमद, राजा खान, हाजी बाबा, लाला खान, शेख शमू, शेख शरीफ, विकास वाघमारे आदींची उपस्थिती होती. यावेळी इंजि.भगवान साकसमुद्रे म्हणाले की, भारताचे संविधान व लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी जे-जे करावे लागेल ते-ते करण्याची सर्वांनी तयारी ठेवावी. दिल्लीत घडवून आणलेल्या जातीय हिंसाचाराच्या विरोधात आम्ही लोकशाही मार्गाने भारतीय संविधान कलम १९ (ब) च्या मूलभूत अधिकाराअंतर्गत प्रत्येक नागरिकाला शांततेत एकत्रित येऊन विरोध करण्याचा अधिकार आहे. वर्तमान काळात NPR (एन.पी.आर.) व जनगणना हे एक नसून वेग-वेगळे आहेत. आपल्या देशात सन १८८१ पासून २०१० पर्यंत दर १० वर्षाला जनगणना होते. परंतु (सी.ए.ए.) CAA २००३ नियमांतर्गत पहिल्यांदा २०१० मध्ये जनगणना व NPR (एन.पी.आर.) एकत्रित केला गेला. NPR (एन.पी.आर.) हि NRC (एन.आर.सी.)  आणि NIRC ची पहिली पायरी आहे. NPR (एन.पी.आर.) च्या संकलित माहितीचा वापर केवळ आणि केवळ NRC (एन.आर.सी.) साठीच होतो. म्हणून NPR (एन.पी.आर.) मधील वडिलांचा व आजोबांचा जन्म तारीख आणि जन्म ठिकाण च्या माहितीचा उपयोग देशाला नाही. हे केवळ प्रत्येक नागरिकाला नाहक त्रास देऊन हतबल करण्याचा प्रयत्न आहे. या काळ्या, त्रासदायक व अनावश्यक कायद्याच्या विरोधात जनआंदोलन मोठ्याप्रमाणात उभे करून संविधान विरोधी (सी.ए.ए.) CAA २००३, सी.ए.ए.२०१९, एन.पी.आर., एन.आर.सी. कायदा रद्द करण्यास जनरेठ्याने भाग पाडु असे यावेळी ते म्हणाले. परळी येथे २०३ युवकांनी केलेल्या सामूहिक मुंडनात इमरान खान, तहसीन नवाब, सय्यद अझहर, एजाज मौजान, शेख अजीम, सलीम राज, तखीं खान, मुरसलींन खान, असलम राज, शेख अश्फाक, ए.पी.रज्जाक, फैसल कुरेशी, सय्यद अथहर, शेख अझहर, मोहसीन सर, बुड्या भाई, मुजाहेद, सैय्यद समीर, शेख परवेज, सय्यद माजेद, मजास इनामदार, जहीर बाबा, अकबर शेख, मोईज इनामदार, मोईज राज, मुबीन नवाब यांच्या सह २०३ जणांनी सामूहिकरीत्या मुंडन केले.
चौकट- शिव जयंती निमित्त महा रक्तदान, महाशिवरात्र निमित्त फळे व पाण्याचे वाटप, शिव जयंती, म. गांधी पुण्यतिथी, रमई जयंती, मौलाना आझाद पुण्यतिथी, गाडगे बाबा पुण्यतिथी, संत सेवालाल जयंती सह विविध सामाजिक व राष्ट्रीय उपक्रम घेण्यात आले आहे व जो पर्यंत हा संविधानद्रोही कायदा रद्द होत नाही तो पर्यंत जगातील सर्वात मोठी लोकशाही वाचवण्यासाठी व संविधानाला अबाधित ठेवण्यासाठी यापुढे देखील आंदोलनस्थळी वेगवेगळ्या पद्धतीने संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन सुरुच राहिल -  पी एस घाडगे

परळी अंनिसच्या शाखा अध्यक्षपदि जी.एस. सौंदळे तर कार्याध्यक्षपदि शौकत पठाण यांची निवड.

परळी वैजनाथ;- (प्रतिनिधी) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळी च्या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी जी.एस.सौंदळे कार्याध्यक्ष शौकत पठाण तर उपाध्यक्षपदी दासु वाघमारे यांची निवड करण्यात आली.
अंनिस चे बीड जिल्हा अध्यक्ष प्रदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चे राज्य सहकार्य वाहक प्रा. मनोहर जायभाये यांच्या मुख्य उपस्थितीत दि.26/02/2020 रोजी जिजामाता गार्डन येथे नूतन कार्यकारणी निवडण्यात आली यावेळी विकास वाघमारे यांनी मागील वर्षभरातील अहवाल सादर केला.
या प्रसंगी जिल्हा कार्यकारणी वरील प्रा. विलास रोडे, वैजनाथ कळसकर यांनी शहरातील उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर केली
प्रधान सचिव -विकास वाघमारे,उपाध्यक्ष-रणवीर चक्रे, कायदेविषयक सल्लागार-अॅड. बुद्धरत्न उजगरे, विविध उपक्रम- नवनाथ दाणे, वैज्ञानिक जाणीवा- भैय्यासाहेब आदोडे, बुवाबाजी संघर्ष कार्यवाहक- प्रा. दशरथ रोडे व शंरण मस्के, वार्तापत्र विभाग-अशोक मुंडे, संस्कृतिक अभिव्यक्ति-रानबा गायकवाड, प्रकाशन वितरण- राहुल घोबाळे, युवा कार्यवाहक-महादेव आजले व योगेश मुंडे, महिला कार्यवाहक सुकेशनी नाईकवाडे रॉय, प्रशिक्षण कार्यवाहक-ब्रह्मानंद कांबळे व आदेश पैठणे, निधी संकलन-अनंत इंगळे, मानसिक आरोग्य-गोपाळ आघाव, जातीअंत प्रकल्प-संजिबv राॅय, मिडीया व्यवस्थापन बाबा शेख आदींची निवड करण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शक प्रेमनाथ कदम रानबा गायकवाड उपस्थित होते.

Wednesday, February 26, 2020

मराठी राजभाषा दिनानिमित्त परळी म.सा.प.शाखेच्या वतिने काव्य मैफीलीचे आयोजन;- चंदुलाल बियाणी

परळी , दि . ( प्रतिनिधी )
परळी म . सा .प शाखेच्या वतीने दि.२७/०२/२०१९ रोजी सायं ५:००वा मराठवाडा साथी सभागृह येथे ‘मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘विशेष ‘काव्यमैफीली ‘चे आयोजन करण्यात आहे.तरी बहुसंख्य रसिक श्रोत्यांनी या काव्य मैफलीचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन म . सा .प. चे अध्यक्ष चंदुलाल बियाणी , सचिव प्रा .डॉ .राजकुमार यल्लावाड, उपाध्यक्ष अरुण पवार , कार्याध्यक्ष अनंत मुंडे , कोषाध्यक्ष प्रा . संजय आघाव , प्रा . मधू जामकर,आबासाहेब वाघमारे गुरुजी, भवानराव देशमुख , प्रा . प्रकाश कोपार्डे , प्रा . अर्चना चव्हाण , प्रा . सुलभा वाघमारे , रंगनाथ मुंडे , सिद्धेश्वर इंगोले , डॉ . मधुसूदन काळे , नितीन ढाकणे , मुक्तविहारी ऊर्फ केशव कुकडे, प्रा . अरूण चव्हाण, प्रा .डॉ . नयनकुमार विशारद , प्रा .रा. ज . चाटे, लक्ष्मण लाड , बालाजी कांबळे, प्रा .डॉ. राजाभाऊ धायगुडे , प्रा .डॉ . बापू घोलप ,बंडू आघाव , चेतना गौरशेट्टे , अॅड . दत्तात्रय आंधळे , गणगोपलवाड गणपत ,डॉ .नेरकर , सुनिता कोमावार,किरण आटोळकर , विजया दहिवाळ , योगेश पुल्ले , वसंत राठोड ,प्रा . अमर आल्दे आदींनी केले आहे .

नागापुर वाण धरणातीन अवैध पाणी चोरी रोखण्यासाठी चार विद्युत डि.पी.जप्त. महसुल, पाटबंधारे, नगर परिषद, एम.एस.ई.बी. व ग्रामीण पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई .

परळी वैजनाथ ;(प्रतिनीधी ) परळी शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वाण धरणावर अवैधरित्या विद्युत मोटारी लावुन अनेक शेतकरी पाण्याचा उपसा करत आहेत या पाणी चोरी करणार्‍या शेतकर्‍यांविरोधात महसुल विभाग, पाटबंधारे विभाग, परळी नगर परिषद, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ व परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने यापुर्वी दोन वेळेस धरणातील मोटारी काढुन व कार्यवाहीची तंबी देवुनही अनेक शेतकरी पाणी चोरी करतच असल्याचे निदर्शनास आल्याने आज या संयुक्त पथकाने ज्या डि.पी.वरुन या विद्युत मोटारी द्वारे पाणी उपसा होत होता. त्या चार विद्युत डी.पी.च खाली उतरविल्याने आता शेतकर्‍यांना पाणी चोरी करताच येणार नाही. सदरील कार्यवाही तहसिलदार डॉ.बिपीन पाटील व परळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.नागापुरच्या वाण प्रकल्पात सध्या परळीकरांना वर्षभर पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक आहे. परळीकरांना वर्षभर पाणी पुरवठा करण्यासाठी वाण प्रकल्पावरील अवैद्यरित्या पाणी चोरी थांबविण्यासाठी महसुल विभाग, पाटबंधारे विभाग, परळी नगर परिषद, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ व परळी ग्रामीण पोलीस ठाणे यांचे संयुक्त पथक परळीचे तहसिलदार डॉ.बिपीन पाटील व परळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले आहे.या पथकाने यापुर्वी 26 डिसेंबर 2019 रोजी व दि.3 जानेवारी 2020 रोजी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली असता पाणी चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. पाणी चोरी करणार्‍या 30 ते 35 शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारी वाण प्रकल्पातुन काढुन संबंधित शेतकर्‍यांना अवैद्यरित्या पाणी उपसा न करण्याच्या सुचना दिल्या होत्या तर कांही शेतकर्‍यांचे पाईप या पथकाने कट करुन विद्युत मोटार जप्त केली होती. तरीही अनेक शेतकरी पहिल्या सारखेच पाणी चोरी करत असल्याचे प्रशासनाला समजल्या वरून आज बुधवार दि.26 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी या पथकाने मोठी धडक कार्यवाही करून ज्या डी.पी.वरुन विद्युत मोटारी द्वारे हे शेतकरी अवैधरित्या पाणी चोरी करत होते सदरील चार डी.पी.च खाली उतरवुन घेण्यात आल्या. त्यामुळे आता शेतकर्‍यांना पाणी चोरी करता येणार नाही व परळीकरांना येणार्‍या उन्हाळ्यात पाणी पुरेल. या धडक कार्यवाहीचे परळीकरांतुन स्वागत होत आहे.
या पथकात पाटबंधारे विभागाचे बिट प्रमुख आर.एस.मुंडे, परळी नगर पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे, परळी नगर पालिकेचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख वामनराव जाधव तसेच नगर पालिकेचे सिद्धेश्वर घोंगडे, बालाजी डहाळे, समाधान समुद्रे, ज्ञानोबा रोडे, भास्कर ताटे, नन्हु चक्रे तसेच महसुलचे नागापुर सज्जाचे तलाठी शेख सलीम, एम.एस.ई.बी.चे उत्तम देवकर व परळी नगर पालिकेचे 15 ते 20 मजुर आदी जवळपास 30 ते 35 जणांच्या संयुक्त पथकाने सहभाग घेतला होता.
दरम्यान वाण धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव असल्याचेे तहसिलदार डॉ.बिपीन पाटील व परळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी सांगितले

वराह चोरीच्या कारणा वरूण दोन गटात हाणामारी.

परळी वैजनाथ;- (प्रतिनिधी)
परळी येथील संत भगवानबाबा चौक येथुन वराह घेऊन जाण्याच्या कारणावरूण दोन गटात फिल्मस्टाईल हाणामारी झाली याप्रकरणी एका गटाकडून फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
परळी शहरात अनेकजण वराह मोकळे सोडुन मालकी हक्क गाजवतात.यामुळे काहीजण इतरांची वराह चोरुन नेवुन विक्री करण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत.आज मंगळवार दि.25 रोजी शहरातील भगवानबाबा चौक परिसरात काहीजण वराह चोरुन नेत असल्याचे वराह मालक केशव पद्मा जाधव यांच्या निदर्शनास आले व त्या ठिकाणी केशव जाधव व सटवा तुकाराम जाधव .सखाराम तुकाराम जाधव.बालाजी रमेश गायकवाड.रमेश मंचक गायकवाड.राजाभाऊ मंचक गायकवाड यांच्या गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकणातील दोन्ही गट परळी शहर पोलिस दाखल झाले असुन केशव पद्मा जाधव यांच्या फिर्यादीवरुन सटवा तुकाराम जाधव व इतराविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात कलम 323,324,143,147,504,506,भादंवि सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खा.शरद पवार,मा.खा.उदयनराजे भोसले ना.रामदास आठवलें यांना राज्यसभेची उमेदवारी ?

मुंबई : (प्रतिनीधी ) राज्यातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणुक होत असून,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.तर शिवसेना आणि कॅांग्रेसकडून कोणाला संधी दिली जाते याची उत्सुकता आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाने आज देशातील राज्यसभेच्या ५५ जागांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर केला असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे.कॅांग्रेसचे हुसेन दलवाई,अमर साबळे ( भाजप) रामदास आठवले,संजय काकडे ( भाजप पुरस्कृत),शरद पवार आणि माजीद मेनन ( राष्ट्रवादी),राजकुमार धूत ( शिवसेना) या ७ राज्यसभा सदस्यांची मुदत २ मार्च रोजी संपत आहे.या ७ जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणुक होत आहे.त्यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि तर भाजपकडून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आणि साता-याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.शिवसेना, राष्ट्रवादी,भाजप आणि कॅांग्रेसकडून कोणाला संधी दिली जाते याची उत्सुकता असली तरी उमेदवारीसाठी आत्तापासूनच लॅाबिंगला सुरूवात झाली आहे. येत्या ६ मार्चला राज्यसभेच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १३ मार्च ही अंतिम मुदत असून, १६ मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. १८ मार्च ही तारिख उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून २६ मार्चला सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान पार पडेल. त्याच दिवशी ५ वाजता मतमोजमी करण्यात येईल. सध्याचे संख्याबळ पाहता ही निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tuesday, February 25, 2020

परळीचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक मा.श्री. बाजीराव धर्माधिकारी यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड.


परळी वैजनाथ;-(प्रतिनिधी ) ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली   परळीच्या सामाजिक, राजकीय शैक्षणिक, सर्वधर्मीय,क्रीडा, कला,अर्थ आदी सर्व क्षेत्रात सक्रियपणे व आपल्या विशेष शैलीने काम करणारे तसेच विकासात्मक कामातून कारकिर्दीत यशस्वीपणे परळीचे नगराध्यक्ष ठरलेले बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची सिनेट मेंबरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर परळीला बहुमान मिळाला आहे. 
   परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा  विद्यमान सदस्य बाजीराव प्रकाशराव धर्माधिकारी यांची शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, सहकार आदि विविध क्षेञांमध्ये भरीव कार्य व एक उपक्रमशील नगरसेवक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा च्या अधिसभेवर (सिनेट) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा-2016 च्या कलम 28 पोटकलम 2 खंड Y अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थेमधून नियुक्ती करावयाच्या सदस्य म्हणून बाजीराव धर्माधिकारी यांची अधिसभा सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या बाबत चे नियुक्ती पत्र विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू प्रा. साधना पांडे यांनी प्रदान केले आहे. या नियुक्तीच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर परळीला बहुमान मिळाला आहे. या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. 
      दरम्यान या नियुक्ती नंतर प्रतिक्रिया देताना बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी यांनी सांगितले की, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणे सकारात्मक काम करत आलो आहे. विद्यापीठाच्या अधिसभा प्राधिकरणाच्या सदस्य पदी झालेली नियुक्ती आनंददायी असुन या माध्यमातून जी जबाबदारी वाट्याला येईल ती पार पाडण्याचा प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले तसेच या नियुक्तीबद्दल  ना.धनंजय मुंडे, आ.सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेस  डॉक्टर सेल चे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे,नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे, गटनेते वाल्मिक कराड, सर्व सन्माननीय न. प. सदस्य, सदस्या, मुख्याधिकारी आरविंद मुंडे  आदींचे आभार मानले आहेत.

सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतूनच विधानसभेत विधेयक मंजूर.

मुंबई: ( प्रतिनीधी ) सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास राज्यपालांनी नकार दिल्यानंतर आज विधानसभेत सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. विधानसभेत आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं असून त्यामुळे थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय रद्दबातल होणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लोकप्रिय निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. त्याचाच एक भाग म्हणून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय ठाकरे सरकारने रद्द केला होता. त्याला भाजपने विरोधही केला होता. मात्र जनतेतून सरपंच म्हणून थेट निवडून आलेली व्यक्ती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही, अशा तक्रारी आल्या कारणानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारनं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडण्याच्या निर्णयाचा अध्यादेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र कोश्यारी यांनी या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने राज्यपाल विरुद्ध सरकार असा वाद निर्माण होण्याचे चिन्हे दिसत होती.
*सरपंचाची निवड जनतेतून नव्हे तर ग्रामपंचायत सदस्यांमधून*
मात्र, राज्यपालांच्या या भूमिकेवर सरकारने अत्यंत सावध भूमिका घेत मोघम प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून करण्याचं विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलं. त्याला आवाजी बहुमतानं मंजूर करण्यात आलं .

राज्यसभेच्या 55 जागेसाठी २६ मार्चला निवडणूक होणार.

मुंबई (प्रतिनीधी )दि.25ः- एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या ५५  जागा रिक्त होणार आहेत. या जागांसाठी २६  मार्च रोजी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी करून ही निवडणूक जाहीर केली आहे.
१७  राज्यातील ५५  सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या तारखांना या जागा रिक्त होणार आहेत. ६  मार्च रोजी या निवडणूकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. १३  मार्च रोजी नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. तसेच २६  मार्च रोजी मतदान घेतले जाईल.
राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मोतीलाल वोरा तसेच भाजपचे माजी केंद्री मंत्री विजय गोयल यांचा कार्यकाळ संपणार आहे.

निष्क्रीय राज्यशासनाच्या विरोधात परळीत भाजपाच्या वतिने एल्गार आंदोलन.

परळी वैजनाथ;-(प्रतिनीधी ) 
विश्वासघातकी राज्यसरकारच्या विरोधात परळी भाजपाच्या वतिने उपविभागीय कार्यालया समोर तिव्र आंदोलन करण्यात आले.प्रारंभी शिवाजी चौक येथील छ.शिवाजी महारांना वंदन करुन या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
उपविभागीय कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हणाले आहेत की
शेतक-यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती.या महाविकास आघाडी सरकारने अवकाळीग्रत शेतकरयांना प्रति हेक्टरी ८ हजार रुपये पेक्षा एकही रुपयाची अधिक मदत दिलेली नाही. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करु, अशा घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. म्हणुन परळीसह राज्यात निष्क्रीय शासनाच्या विरोधात परळीत उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर भाजपाचे एल्गार आंदोलन करण्यात आले.
बीड जिल्ह्याचा रबी पीक विमा भरणा करण्यासाठी शासनाने एजन्सी नेमलीच नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परळीच्या वाण घरणातील शहराला आरक्षित पाण्याच्या व्यतिरिक्त असणारे पाणी शेतकन्यांना देण्याची तात्काळ सोय करावी. परळी शहर व परिसरात होणारे राखेचे प्रदूषण थांबविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी. परळी शहर व तालुक्यात वाढलेल्या गुन्हेगारीवर आळा घालुन गुंडावर कडक कारवाई करावी. परळी- अंबाजोगाई रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे. जाणीवपुर्वक आमच्या सरकारने दिलेल्या विकास कामाना स्थगिती दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचा भाजपा परळी शहर व तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत.
महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाआघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मशुल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपुर्ण देश हादरून गेला आहे. अॅसिड हल्ला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बलात्कार महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला, तरुणी, मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करीत आंदोलन करण्यात आले.याआदोलनात भाजपा राज्य सरचिटणीस राजेश देशमुख ता.अध्यक्ष सतिष मुंडे  शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,विनायकराव गुट्टे ,अशोक जैन,निळकंट चाटे,महादेव इटके,उत्तम माने,राजाभाऊ ओझा, अश्विन मोगरकर,आदीनी सहभाग घेतला.

Monday, February 24, 2020

परळीत सापडलेल्या नवजात अर्भकाचे खा. सुप्रियाताई सुळे व ना.धनंजय मुंडे यांनी स्वीकारले पालकत्व.


*'शिवकन्या' असे केले नामकरण...*

परळी वैजनाथ ;-दि. २४(प्रतिनीधी ) परळी शहरात रात्री ८ च्या सुमारास नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला रेल्वे पटरीजवळ काटेरी झुडुपात टाकून दिल्याचा धक्कादायक व संतापजन प्रकार समोर आल्यानंतर परळीचे आमदार तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या मुलीचे पालकत्व स्वीकारले आहे. घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त करतच ना. मुंडे यांनी खा. सुप्रियाताई  सुळे यांच्या मदतीने या मुलीचे पालकत्व स्वीकारत, महाशिवरात्री महोत्सवादरम्यान हा प्रकार घडला असल्याने या नवजात मुलीचे 'शिवकन्या' असे नामकरण केले आहे.
सदरील स्त्री जातीचे नवजात अर्भक काटेरी झुडपात टाकण्यात आले असल्याचे समजते, रात्री ८ च्या सुमारास मुलीच्या रडण्याचा आवाज परिसरातील नागरिकांनी ऐकल्यानंतर हा प्रकार समोर आला. हा निर्दयी प्रकार नेमका कोणी केला हे अजून समजू शकले नाही; मात्र या प्रकाराची माहिती मिळताच परळी शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाचा पोलिस तपास घेत असून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी या बाबीची तात्काळ दखल घेत या मुलीचे पालकत्व स्वीकारून पुढील उपचाराची सोय केली आहे.
ना. मुंडे यांच्या वतीने जि. प. गटनेते अजय मुंडे व डॉ. संतोष मुंडे तसेच गटनेते वाल्मिक अण्णा कराड हे परळी उपजिल्हा रुग्णालयात हजर असून पुढील परिस्थिती हाताळत आहेत. या नवजात 'शिवकन्येला' जीवदान मिळावे म्हणून डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
हा प्रकार ऐकताच आपले मन खिन्न झाले असून सदर मुलीची मी व खा. सुप्रियाताई पूर्ण जबाबदारी घेत आहोत. तिची तब्येत सुरळीत होताच तिला पुण्यातील सर्व सोयीयुक्त बालकाश्रमात हलवण्यात येईल, तसेच पुढील संगोपन, शिक्षण ते अगदी लग्नासहित या बालिकेची सम्पूर्ण जबाबदारी आमची असेल असे ना. धनंजय मुंडे यांनी कळविले आहे.
  या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा ना. धनंजय मुंडे यांच्यातील संवेदनशीलतेचा प्रत्यय आला आहे.

राज्यात ८ ठिकाणी शुल्क नियामक समित्यांची स्थापना .पालक व शिक्षण संस्थाना दिलासा.

मुंबई : (प्रतिनीधी ) राज्यातील सर्व पालकांच्या व खाजगी शिक्षण संस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शुल्क नियामक समित्या ८ विभागीय ठिकाणी व एका पुनरीक्षण समितीच्या स्थापनेस शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी तातडीने मान्यता दिली.
राज्यातील खाजगी शिक्षण संस्थामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये व संबधित शिक्षण संस्थामध्ये शाळेच्या शुल्कावरून वारंवार वाद निर्माण होत असतात. पालक संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांच्याकडे दाद मागत मात्र ही प्रकरणे निकाली निघण्यास विलंब लागत असे. यावर कायदेशीर पद्धतीने व विनाविलंब तोडगा काढण्यासाठी व दोन्ही पक्षांना न्याय देण्यासाठी सक्षम व कायदेशीर यंत्रणेची अत्यंत आवश्यकता होती. यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम पारित केला आहे.या अधिनियमान्वये राज्यातील ८ शैक्षणिक विभागांसाठी ८ विभागीय समित्या व राज्य स्तरावर एक पुनरीक्षण समिती स्थापन करण्याची तरतूद आहे. त्यानुसार या समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या विभागीय समित्या सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली काम करतील. या समितीचे पदसिद्ध सचिव प्रादेशिक शिक्षण उपसंचालक असतील, तर पुनरीक्षण समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश असतील तर शिक्षण संचालक(माध्यमिक व उच्च माध्यमिक) हे पदसिद्ध सचिव म्हणून काम पाहतील.खाजगी शाळेतील शुल्काबाबत त्या त्या विभागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संबंधित विभागीय समितीकडे दाद मागता येईल.त्यामुळे राज्यातील पालक व शिक्षण संस्था यांना मोठा दिलासा मिळाला आहे.सद्यस्थितीत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षते खाली पुनरीक्षण समितीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पुनरीक्षण समिती व प्रत्येक शैक्षणिक विभागासाठी एक याप्रमाणे आठ विभागीय शुल्क नियामक समित्या आपले कामकाज लवकरच सुरू करणार आहेत.

Sunday, February 23, 2020

शनैश्वर प्रतिष्ठान च्या वतीने शनीमंदिर जिर्णोध्दारासाठी ६ लाख ११ हजार रुपयांची देणगी .


परळी वैजनाथ दि.२३(प्रतिनिधी) येथील शनैश्वर प्रतिष्ठान व तेली युवक संघटनेच्या वतीने वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनिमंदिराच्या जिर्णोध्दारासाठी ६ लाख ११ हजाराची आर्थिक मदत देणगी स्वरूपात देण्यात आली.
शनैश्वर प्रतिष्ठान व तेली युवक संघटनेच्या वतीने ७ एप्रिल२०१९ मध्ये राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातील काही रक्कम जमा झालेली होती. येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या शनिमंदिराचा जिर्णोध्दार गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. शनैश्वर प्रतिष्ठानच्या वतीने ही शिल्लक रक्कम ६ लाख ११ हजार रुपये या जिर्णोध्दारासाठी शनीमंदिर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष शिवा लांडगे, चंद्रकांत उदगीरकर यांना देण्यात आली. यावेळी शनैश्वर प्रतिष्ठान व तेली युवक संघटना, वधू वर परिचय मेळावा समितीचे अध्यक्ष, सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीला मोठं धक्का .दोन माजी आमदारांसह ४५ पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ.


महाराष्ट्राच्या राजकारणात भल्या – भल्या नेत्यांना पराभवाची धूळ ज्यांच्या उदयामुळे चाखावी लागली.त्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला खिंडार पडले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून भारिप-बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीमध्ये काम केले. आता पक्षातून विश्वासार्हता संपल्याने या दोन्ही पक्षात असलेल्या पदांचा सामूहिक राजीनामा देत असल्याचे पत्र माजी आमदार हरिदास पंढरी भदे, बळीराम सिरस्कार यांच्यासह ४५ पदाधिका-यांनी शनिवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडे दिले आहे.
वंचित बहुजन आघाडीला आयोगाची मंजुरी मिळाल्याच्या अवघ्या ४० दिवसांतच पक्षाला भगदाड पडले आहे. लोकसभा, विधानसभा तसेच काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी दरम्यान काही प्रकरणांवरून पक्षातील काही नेत्यांमध्ये खदखद होती. ती या राजीनाम्या च्या रूपाने बाहेर आली आहे.
राजीनामा पत्र राष्ट्रीय अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर यांच्या नावे देण्यात आले आहे. त्या पत्रावर अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे, बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार, वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे महासचिव नवनाथ पडळकर, विधानसभा निवडणुकीतील उमेदवार इम्रान पुंजाणी, देखरेख समिती प्रमुख अर्जून सलगर, हनुमंत वाघे, बुलडाणा लोकसभा संपर्क प्रमुख प्रा. सदानंद माळी, बापुसाहेब हटकर यांचा समावेश आहे.
तर जालना माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल रौफ, चंद्रकांत जानराव, औरंगाबाद लोकसभा संपर्क प्रमुख मुकुंद सोनवणे, नागपूर धनगर युवक अध्यक्ष रमेश पाटील, पुरुषोत्तम डाखोडे-नागपूर, अशोक जंगले-महाड, दिनकर नागे-अकोला, बिसमिल्ला खान-बार्शीटाकळी, विशाल पोळे-यवतमाळ, शेखर बंगाळे-सोलापूर,, शिवाजीराव ढेपले- निफाड, विनायक काळदाते-नाशिक, ज्ञानेश्वर ढेपले-नाशिक, सदाशिव वाघ-नाशिक, गणेश ढवळे-नागपूर, सुरेश मुखमाले-वाशिम, राजू गोरडे-वर्धा, संगीता तेलंग, सुनीता जाधव-इशान्य मुंबई, सागर गवई-मुंबई, प्रशांत चव्हाण, संजय आहेर, प्रकाश तुकाराम, के.एम.देवळे, देवेंद्र धोटे, भाऊराव गो-हाणे, विजय घावट, तुकाराम बघेल, सुमेध पवार, संदेश वानखडे-इशान्य मुंबई, संतोष इंगळे, अविनाश लोंढे, इश्वर शिंदे-भांडूप, आकाश सुरळकर-पवई, नागोराव शेंडगे-नांदेड, संतोष जानकर-पुणे, गणपत कुंदलकर-येवला, सुनील चिखले-निफाड आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

बीड महामार्ग पोलीसांनी मांजरसुंबा घाटात 1कोटी रू. चा गुटखा जप्त केला .

 बीड — ( प्रतिनीधी ) मांजरसुंबा जवळील तुळजाई हॉटेल जवळ उभा असलेल्या कंटेनर मध्ये गुटखा असल्याची गुप्त माहिती महामार्ग पोलीसांना मिळताच त्यांनी त्वरित कारवाई करत कंटेनरची तपासणी केली असता त्यात एक कोटी रुपयाचा गुटखा आढळून आला याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर जप्त केला असून दोन जणांविरुद्ध अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यान्वये नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धुळे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना महामार्ग पोलिसांना मांजरसुंबा घाटा जवळील हॉटेल तुळजाई समोर गुटखा घेऊन जाणारा कंटेनर असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या बरोबरच हा कंटेनर रहदारीला अडथळा येईल असा उभा करण्यात आला होता. गुप्त माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी या कंटेनरची झाडाझडती घेतली असता त्यात विमल कंपनीचा एक कोटी रुपयाचा पान मसाला व सुगंधी तंबाखू आढळून आली. महामार्ग पोलिसांनी कंटेनर क्र. एच आर 84 — 76 88 ताब्यात घेऊन नेकनूर पोलिसांच्या हवाली केला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक रवींद्र कुमार पाल रा. दिल्ली तसेच बिट्टू कमल पाल यांना ताब्यात घेतले आहे. हा माल दिल्लीहून कर्नाटकाकडे नेण्यात येत होता नेण्यात येत होता. याप्रकरणी पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे सह आयुक्त दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास नेकनूर पोलीस ठाण्याचे पीआय पुंडगे हे तपास करत आहेत. ही कारवाई
महामार्ग पो.उप.नि गिते सोबत पो.ह विजय जाधवर, गणेश दुधाळ , पो.ना अनिल तांदळे, विलास ठोंबरे, अशोक सोनवणे, मारुती म्हैत्रे , लक्ष्मण मुंडे, भागवत बिक्कड , पो. काँ सुदाम वनवे, विकास थोरात, फुलचंद जाधव, अल्ताफ शेख यांनी केली.

आ.रोहित पवार शिर्डीच्या साई संस्थानचे अध्यक्ष होणार ?

पुणे : (प्रतिनीधी ) राज्यातील सत्ता बदलानंतर धार्मिक संस्थांवरील नेमणुकांची चर्चा सुरू झाली असून साई संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार वर्णी लागण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.
पंढरपूर देवस्थान समिती, शिर्डीचे साई संस्थान व मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्ट या तीन प्रमुख संस्थांवरील राजकीय कार्यकर्त्यांच्या नेमणुका येत्या काळात होणार आहेत. 
आघाडीतील तीन पक्षांच्या वाटपात सिद्धीविनायक ट्रस्ट शिवसेनेकडे, पंढरपूर देवस्थान समिती कॉंग्रेकडे तर साई संस्थान राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धविनायक ट्रस्टवर अभिनेते आदेश बांदेकर यांची नेमणूक फडणवीस सरकारच्या काळात झाली होती.
त्यामुळे या पदावर बांदेकर यांनाच कायम यांना कायम ठेवण्यात येणार असल्याचे समजते. शिर्डी संस्थानवर आमदार रोहित पवार यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा नगर जिल्ह्यात सुरू आहे. 
शिर्डी संस्थानवर सध्या कुणीही विश्‍वस्त नाही. युती सरकारच्या काळातील विश्‍वस्त मंडळ सध्या अस्तित्वात नाही. संस्थानच्या घटनेप्रमाणे विश्‍वस्तांची संख्या सध्या 15 इतकी आहे. त्यात वाढ करून ही संख्या 25 पर्यंत नेण्याचा विचार सुरू आहे. सत्ता बदल झाल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी तसेच नगरमधील थोरात-विखे-पाटील यांचे अनेक समर्थक विश्‍वस्त होण्यासाठी इच्छुक आहेत. 
विश्‍वस्तपदासाठी नगर मधून शिवसेनेकडूनही काहीजण इच्छुक आहेत. पंढरपूर देवस्थान समिती कॉंग्रेसच्या वाट्याला आली असून कॉंग्रेसकडून देवस्थान समितीच्या अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागणार याचीही उत्सुकता आहे.

Saturday, February 22, 2020

बायको देता का बायको चित्रपटाच्या अभिनेता आणि दिग्दर्शकास बेदम मारहाण


बायको देता का बायको!’ या मराठी सिनेमाचा अभिनेता, दिग्दर्शकावर अज्ञात तरुणांनी अचानक जीवघेणा हल्ला केला. दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अभिनेता सुरेश ठाणगे व दिग्दर्शक धनंजय यमपुरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बीड येथील आशा सिनेफ्लेक्सच्या आवारात शनिवारी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली. अभिनेत्री श्वेता कुलकर्णी हिने प्रसंगावधान राखल्याने ती थोडक्याच बचावली.
बीड येथील आशा सिनेफ्लेक्स चित्रपट गृहात ‘बायको देता का बायको!’ सिनेमाचा शो सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांसोबत धम्माल करण्यासाठी सिनेमाचे अभिनेता, अभिनेत्री आणि दिग्दर्शक आले होते. या दरम्यान, सिनेमागृहाच्या आवारात अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यामध्ये चित्रपट अभिनेते सुरेश ठाणगे व निर्माते धनंजय यमपुरे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी अभिनेत्री श्वेता कुलकर्णी हिने बचावासाठी तेथून पळ काढल्याने ती थोडक्यात बचावली. हल्लेखोरांनी आशा सिनेफ्लेक्सच्या आवारात फर्निचरची तोडफोडही केली, मारहाण कारणारे कोण होते याचा शोध घेतला जात आहे.

परळी-अंबाजोगाई रस्त्याच्या कामाला कसलीही स्थगिती नाहीआठवडाभरात प्रत्यक्ष कामाला सुरूवात का.अभियंता;- स्वामी


* नागरीकामधील उलट- सुलट चर्चेला विराम.

परळी दि. 22. : ( प्रतिनीधी ) परळी-अंबाजोगाई (पिंपळा धायगुडा) या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला कसलीही स्थगिती नसुन येत्या आठवडाभरात प्रत्यक्ष या कामाला सुरूवात होणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग लातूर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.स्वामी यांनी सांगितले आहे.
परळीतील मौलाना आझाद चौक परळी ते पिंपळा धायगुडा ता. अंबेजोगाई या रस्त्याच्या कामाचे भूमीपुजन 25 जानेवारी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.
या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या जुन्या कंत्राटदाराचा जुना करार रद्द झाल्याशिवाय नविन कामाला सुरूवात करता येत नाही. जुना करार रद्द करण्याची प्रक्रिया व नविन कराराची प्रक्रिया दिल्ली येथे अंतिम टप्प्यात असुन ती बुधवार पर्यंत पुर्ण होऊन लगेचच प्रत्यक्ष या रस्त्याच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे स्वामी यांनी सांगितले.
या रस्त्याचे काम अतिशय जलद गतीने व चांगल्या क्वालिटीचे करण्याबाबत श्री.धनंजय मुंडे हे आग्रही असुन डिसेंबर 2020 अखेर हे काम पुर्णत्वास येईल असा विश्वास स्वामी यांनी व्यक्त करून कामाला स्थगिती मिळाल्याच्या कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवु नये असे आवाहन केले आहे.
या कामासाठी ए.जी. कन्स्ट्रक्शन्स व राजेंद्रसिंग भल्ला इन्फ्रास्ट्रक्चर औरंगाबाद या कंत्राटदारांची नव्याने नेमणूक करण्यात आली असून 99.99 कोटी रुपयांच्या या कामास पूर्ण होण्यासाठी अंदाजे 18 महिने एवढा कालावधी अपेक्षित आहे.
या रस्त्यामध्ये 10 मीटर रुंदीचा मुख्य काँक्रिट रस्ता व दुचाकींसाठी स्वतंत्र 1.5 मीटर रस्ता दोन्ही बाजूंनी अशा प्रकारची अद्ययावत सुविधा त्याचबरोबर आवश्यकतेनुसार पथदिवे, दुभाजके, बसथांबे, गटारे, शेतीसाठी पाईपलाईन आदींचेही बांधकाम करण्यात येणार आहे.
पूर्वीच्या कंत्राटदारांच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक वर्षे हा रस्ता रखडून होता, यासाठी नागरिकांनी अनेक आंदोलने देखील केली होती. ना. धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षात असतानाही या गोष्टींचा पाठपुरावा केला होता. तसेच निवडणुकीतही आपण या रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढू असा शब्द परळीकरांना दिला होता. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून त्यांनी रखडलेल्या या महामार्गाचे काम नव्याने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दलही दिलगीरी व्यक्त केली असून थोड्याच महिन्यांत नागरिकांना होणारा त्रास बंद होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Friday, February 21, 2020

तब्बल ५९ वर्षानंतर येणार 'हा' योग; यंदाची महाशिवरात्र असणार विशेष.


या वर्षी २१ फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. महादेवाचे भक्त यादिवशी निरनिराळ्या प्रकारे शंकराची पूजा करत असतात. मात्र यंदाची महाशिवरात्र खास असणार आहे. कारण यावर्षी महाशिवरात्रीला विशेष योग जुळून आला आहे. महाशिवरात्रीला यावर्षी 'शश योग' आला आहे. ज्योतिषींच्या म्हणण्यानुसार हा योग तब्बल ५९ वर्षानंतर आला आहे. त्यामुळे भक्तांसाठी ही विशेष पर्वणी असणार आहे. याआधी हा योग १९६१ ला आला होता.  
*काय आहे 'शश योग'*
काही ज्योतिषींच्या म्हणण्यानुसार शश योग या महाशिवरात्रीच्या दिवशी असणार आहे. यादिवशी शनि आणि चंद्र हे मकर राशीत, गुरु धनू राशीत, बुध कुंभ राशीत तर शुक्र मीन राशीत असणार आहे. हा योग साधना करण्यासाठी आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी विशेष असतो असं जोतिष्यांचं म्हणणं आहे.  
या योगामध्ये विशेष दान-पुण्य करण्याचही महत्व आहे. त्यामुळे भक्तांना महादेवाची विशेष कृपा मिळवण्याची संधी असणार आहे असं देखील जोतिष्यांचं म्हणणं आहे. तसंच यादिवशी सर्वार्थ सिद्धी योगही असणार आहे. महादेवाचा रुद्राभिषेक या यादिवशी करून भक्तांना विशेष लाभ मिळवण्याची संधी असणार आहे.  
*काय असेल शिवपूजेचा मुहूर्त *
सुर्योदयाच्या वेळी असलेल्या तिथीनुसार यावर्षी महाशिवरात्र २१ फेब्रुवारीला असणार आहे. शिवपूजेचा मुहूर्त २१ फेब्रुवारी संध्याकाळी ५.२० वाजता पासून २२ फेब्रुवारी संध्याकाळी ५.०२ वाजता पर्यंत असणार आहे.
*कशी कराल शिवपूजा* 
महाशिवरात्रीला महादेवाचा अभिषेक दूध, पाणी, मध इत्यादि पदार्थांनी अभिषेक करणं शुभ मानलं जातं. महादेवाला बेलपत्र, धोत्र्याचे फूल आणि फळं हे अर्पण करावे. तसंच आरती करून महा मृत्युंजय मंत्राचा जप करावा, असं जोतिषी सांगतात.

Thursday, February 20, 2020

महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतिने याञा महोत्सवाचे आयोजन .

परळी वैजनाथ दि.20 (प्रतिनिधी):-
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचे अयोजन करण्यात आले असुन बुधवार दि.19 ते 23 फेब्रुवारी 2020 च्या दरम्यान वैद्यनाथ मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्र यात्रा महोत्सवाची तयारी पुर्ण झाली आहे. महाशिवरात्री निमित्त  वैद्यनाथाच्या दर्शनासाठी गुरुवारी पासुनच राज्य व परराज्यातुन भाविकांची रेलचेल सुरु झाली आहे.  वैद्यनाथ मंदिराच्या पायर्‍यावर लोखंडी बॅरिकेट्स उभारण्याचे काम पुर्ण झाले असुन ऊनापासुन बचाव व्हावा म्हणुन भव्य मंडप टाकण्यात आला आहे. मंदिरात रंगरंगोटी करुन विद्युत रोषणाई करुन करण्यात आली आहे.
    21 फेब्रुवारी  रोजी महाशिवरात्र असल्याने वैद्यनाथ मंदिरात हजारों भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणुन धर्म दर्शन मध्ये पुरुष व महिलांच्या  स्वतंत्र रांगा लावण्यात येणार आहेत.  दि.21 शुक्रवार रोजी रात्री 6 ते 8 या वेळेत वैद्यनाथ विश्वस्त कमेटीच्यावतीने बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या शुभहस्ते श्री स  रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. या अभिषेका नंतर भाविकांना अभिषेकास परवानगी देण्यात येणार आहे. अभिषेकासाठी एका आवर्तनास शंभर रुपये व सपत्नीक दीडशे रुपये असतील.  
  दि.22 रोजी  रोजी  परिसरातील सर्व शिव भक्तांना दर्शन मंडप येथे महाप्रसादाची व्यवस्था दुपारी 12 ते 4 दरम्यान करण्यात आली आहे.
    दि 23 रोजी  सायंकाळी 5 वाजता श्री वैद्यनाथाची पालखी सवाद्य मिरवणुकीने निघेल सायं.6 वा. देशमुखपारा जवळ सुप्रसिध्द गायक पंडित धनंजय म्हसकर व प्राजक्ता काकतकर मुंबई  यांचा भक्तीगीत व अभगवाणीचा कार्यक्रम होणार आहे. अंबवेस येथे रात्री 9 वाजता शोभेचे दारु उडविण्यात येईल. त्यानंतर गणेशपार, नांदुरवेस, गोपनपाळे गल्ली येथे कलावंताची हजेरी होईल. नंतर अंबवेस, भोईगल्ली मार्गे रात्री मिरवणुकीने पालखी मंदिरात परत येईल.
दि.24 सोमवार रोजी  सकाळी 10 ते 1 वैद्यनाथ मंदिरात मानाची बिदागी वाटपाचा कार्यक्रम होईल. याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा परळीचे तहसीलदार डॉ.विपिन विलासराव पाटील व सचिव राजेश भाऊसाहेब देशमुख आणि विश्‍वस्त मंडळाने केले आहे.
*परळी परिसरातील शिवभक्तासाठी विशेष दर्शन व्यवस्था*
    परळी परिसरातील शिवभक्तांना विनामूल्य दर्शन सुलभ व्हावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.दि 21 शुक्रवार रोजी रात्री 10 वा.पासुन 12 पर्यंत पासच्या  रांगेतून विनामूल्य स्वतःचे ओळखपत्र, आधार कार्ड, मतदानकार्ड, पॅन कार्ड, इत्यादी दाखवून पासच्या रांगेतून परळी  परिसरातील शिवभक्तांना दर्शन घेता येणार आहे.ज्या भाविक-भक्तांना पास पाहिजे असेल त्याना दर्शन पासचे शुल्क शंभर रुपये ठेवण्यात आले आहे.

दै.मराठवाडा साथी हे सांस्कृतिक .धार्मिक चळवळ चे केंद्र आहे.तर वारकरी संप्रदायाचे मुखपत्र-रामायणार्य ढोक महाराज

.
परळी (प्रतिनिधी)
येथून प्रसिद्ध होणारे दै.मराठवाडा साथी हे नुसते वृत्तपत्र नसून सांस्कृतिक चळवळीचे केंद्र आहे. वारकरी मंडळाच्या व संप्रदायात घडणाऱ्या साऱ्या घटना मराठवाडा साथीच्या माध्यमातून तालुक्यापर्यंत नव्हे तर जिल्हाभर पोहचतात. मी गेल्या 10-15 वर्षापासून दै.मराठवाडा साथी परिवाराचा सदस्य आहे. मराठवाडा साथी हे वारकरी मंडळाचे मुखपत्र आहे असे गौरवोदगार रामायणाचार्य ह.भ.प.रामवराव महाराज ढोक नागपुरकर यांनी दाऊतपुर येथे सुरू असलेल्या श्रीराम कथेत बोलत होते.
यावेळी अ.भा.वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे व तालुका सचिव ह.भ.प.विश्वास महाराज पांडे, दाऊतपुरचे सरपंच श्रीकांत फड, पत्रकार संतोष जुजगर.पत्रकार बालाजी ढगे आदी उपस्थित होते.

जातनिहाय जनगणनेसाठी हजारों ओ.बी.सीं.चा रस्त्यावर एल्गार.


अन्यथा ७० कोटी ओबीसींना सांभाळणे कठिण-इंजि.ढोबळे
गोंदिया,दि१९ (प्रतिनीधी ) भारतीय राज्यघटनेने ओबीसी प्रवर्गाला संवैधानिक अधिकार देत या प्रवर्गाला मागावसर्गीय असा दर्जा दिला. मात्र आजपर्यंतच्या प्रत्येक सरकारांनी ओबीसी प्रवर्गाला त्यांचे अधिकार बहाल करण्याकरिता प्रयत्न केले नाही. जेव्हा – जेव्हा या प्रवर्गाने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेकरिता आंदोलनात्मक पवित्रा घेतला. तेव्हा-तेव्हा सत्ताधारी मंडळीने हे आंदोलन दाबण्याकरिता प्रयत्न केले. ओबीसी समाज हा भोळा आहे. हा समाज आता जागृत होत आहे. आता या समाजातील नागरिकांना आपले अधिकार कशामुळे मिळू शकले नाही, हे त्यांना कळले आहे. जेव्हा पर्यंत ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करून त्यांची आकडेवारी समोर येत नाही, तेव्हापर्यंत या समाजाला आपले अधिकार मिळणार नाहीत. ओबीसी प्रवर्ग देशात ६० टक्क्यांच्यावर आहे. आम्ही निवडून देतो त्या प्रतिनिधींनी आणि सरकारने आता ओबीसींचा अंत पाहू नये. आता आंदोलन म्हणजे दानपेटी झाली असून आमच्याकरिता मतदान म्हणजे मंदीर झाले आहे. या प्रवर्गातील ७० कोटी जनतेने आपल्या मनात ठाणले तर सत्ताही आमची राहिल आणि कायदेही आमचेच चालतील. यापुढे नेतेमंडळी आणि सरकारांने ओबीसींच्या हिताचे बोलले तरच त्यांचेही हित आहे, असे परखड मत ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि. प्रदीप ढोबळे यांनी मांडले.
ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी राष्ट्रीय महासंघ, ओबीसी सेवा संघाच्या वतीने ओबीसी जनगणनेकरिता जिल्ह्यात ५ फेब्रुवारीपासूनु जनजागृती चेतना यात्रा काढण्यात आली होती. त्या यात्रेचा समारोप आज(दि.१९) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी येथील प्रशासकीय भवनासमोर करण्यात आला. दरम्यान जात निहाय जनगणना व्हावी, यासाठी हजारोच्या संख्येत आलेल्या ओबीसी समाज बांधवांनी भव्य रॅली काढून शासन विरोधात एल्गार पुकारला.त्यावेळी इंजि.ढोबळे मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. खुशाल बोपचे, मार्गदर्शक ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. प्रदीप ढोबळे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे होते. अतिथी म्हणून सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. बी. एम. करमकर,अमर वराडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे, अधिकारी-कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके,ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,सभांजी बिग्रेडचे क्रांती ब्राम्हणकर,युवा स्वाभीमानचे जितेश राणे,आपचे पुरुषोत्तम मोदी, पुष्पा खोटेले,कैलास भेलावे, माजी जि.प. सभापती वाय.टी.कटरे, वाय. टी. कटरे, एस. यू. वंजारी, सुनील भरणे,सविंधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे, निलम हलमारे,राजेश चांदेवार,राधेलाल पटले,जिवन लंजे,अवामे मुस्लीमचे  आदी उपस्थित होते.
इंजि.ढोबळे पुढे म्हणाले की, महात्मा गांधींनी लढलेली स्वातंत्र्याची लढाई राजकीय होती. त्यातून आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. त्या लढ्यात सर्वात अधिका ओबीसी प्रवर्ग होता. मात्र या प्रवर्गाला अद्यापही सामाजिक स्वातंत्र्य मिळाले नाही. ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गाला न्याय द्यावयाचा असेल तर सर्वात आधी न्यायव्यवस्थेत या प्रवर्गांचे प्रतिनिधी जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी ओबीसी समाजाला अद्याप त्यांचे अधिकार का मिळाले नाहीत. जनगणनेचे फायदे, अन्याय कुणामुळे आणि कशामुळे झाला यावर सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष व राजकीय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे यांनी संसदेत ओबीसी खासदारांची कशाप्रकारे दिशाभूल करण्यात येते यावर मार्गदर्शन केले. संचालन मनोज मेंढे, सुनील पटले यांनी केले. आभार राजीव ठकरेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या आधी सुमारे ५०० दुचाकी आणि २० चारचाकी वाहनांवरून जिल्हाधिकारी कार्यालय ते जयस्तंभ चौक दरम्यान रॅली काढण्यात आली. सभेच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या छायाचित्राला माल्यार्पण करण्यात आले. यशस्वितेकरिता शिशीर कटरे, लक्ष्मण नागपुरे, गणेश बरडे, विलास चव्हाण, सावन डोये,महेंद्र बिसेन, कैलाश भेलावे,पप्पू पटले, सी. पी. बिसेन, विजय फुंडे, आनंदराव कृपाण, सुनील भोंगाडे, रवी भांडारकर, कमल हटवार, हरीष ब्राम्हणकर, विनायक येडेवार, दिनेश हुकरे, मनोज डोये, मनोज शरणागत, गुड्डू कटरे, संजीव रहांगडाले, राजू चामट, उद्धव मेहेंदळे, राधेशाम भेंडारकर,भुमेश्वर चव्हाण,गौरव बिसेन,चौकलाल येडे,माधव तरोणे,दादा संग्रामे,शैलेष बहेकार,कृष्णा बहेकार,भुमेश शेंडे,नरेंद्र शिवणकर,सुरेंद्र मेंढे,अमृत शरणागत आदींनी सहकार्य केले.
रॅलीने वेधले लक्ष
यात्रेच्या समारोप प्रसंगी जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ओबीसी समाज बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. दरम्यान कार्यक्रमाच्या आधी दुचाकी ½व चारचाकी वाहनांवरून जिल्हाधिकारी कार्यालय ते जयस्तंभ चौक दरम्यान रॅली काढण्यात आली. सभेच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांच्या छायाचित्राला माल्यार्पण करण्यात आले.
आमदारांनी दिले आश्वासन
कार्यक्रम स्थळाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनीधींना आमंत्रीत करण्यात आले होते. त्यातील गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी हजेरी लावली. विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठरावाला आपण समती दर्शविली होती. ओबीसी प्रवर्ग अद्यापही मागासलेला आहे. पंतप्रधान मोदी यांना मी ओबीसींच्या स्वतंत्र जणगणनेकरिता पत्र लिहीणार असून जेव्हा केव्हा ओबीसींच्या मागण्यांचा विषय येईल, तेव्हा मी ओबीसींसोबत असल्याचे आश्वासन दिले.
*या आहेत मागण्या *
राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जनगणना करण्यात यावी, नोकरीत आरक्षण देण्यात यावे, शासकीय नोकरीत एससी, एसटी प्रवर्गातल रिक्त पदे विशेष भरती अभियान राबवुन भरण्यात यावी, खासगी उद्योगात ओबीसी, एसटी, एमटी यांना लोकसंख्येनुसार आरक्षण देण्यात यावे, एससी, एसबीसी विद्यार्थ्यांसारखीच ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, नॉनक्रिमिलेअरची अट रद्द करण्यात यावी, एससी,  एसटी,  शेतक-यांसारख्या ओबीसी शेतक-यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा, ओबीसी कर्मचा-यांना प्रमोशनमध्ये आरक्षण देण्यात यावे, आरक्षण कायद्याची अंमलबजावणी न करणा-या अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, संविधानाविरोधी शिक्षण कायदे थांबविण्यात यावे.

भाजपच्या माजी मंत्र्यांच्या चौकशीचे अहवाल महाविकास आघाडी जाहीर करणार.?


मुंबई :- ( प्रतिनीधी ) येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरू होणा-या राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात भाजपची कोंडी करण्याची रणनिती महाविकास आघाडी सरकारने आखली आहे. यासाठी भाजपचे माजी मंत्री प्रकाश महेता, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख यांच्या विरोधातील आरोपांच्या चौकशीचे अहवाल सभाग्रहात मांडण्यात येणार असल्याची माहिती जेष्ठ मंत्र्याने दिली.
राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील प्रकरणे बाहेर काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी ताडदेव, मुंबई येथील एम. पी. मिल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रकरणी विकासकाला लाभदायी ठरेल, असा निर्णय घेतल्याचा आरोप आहे.हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लोकायुक्तांकडे चौकशी सोपविली होती. या प्रकरणाची ऑक्‍टोबर 2018 मध्ये लोकायुक्तांची चौकशी पूर्ण झाली मात्र अहवाल अद्याप बाहेर आलेला नाही. चौकशी अहवाल विधीमंडळात मांडण्याचे आश्‍वासन फडणवीस यांनी दिले असतानाही या आश्‍वासनाची पूर्तता झालेली नाही.
पुण्याच्या भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन खरेदीच्या आरोपाप्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात निवृत्त न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांच्या आयोगाने चौकशी केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची समांतर चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही केली आहे.
माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख व अन्य नऊ जणांनी 2000 साली होटगी रोडवर 50 लाख रुपयांमध्ये दोन एकरचा भूखंड विकत घेतला होता. विकास आराखड्यानुसार या जागेवर आरक्षण होते. 2001 मध्ये महापालिकेने जागेवर आरक्षण असल्याचे सांगत देशमुख यांच्या बंगल्याच्या बांधकामाला परवानगी नाकारली होती. यानंतर 2004 मध्ये देशमुख यांनी महापालिकेत प्रतिज्ञापत्र दिले होते. यानुसार महापालिकेने सशर्त परवानगी दिली होती. जुलै 2012 मध्ये या जागेवर एक मजली बांधकाम झाले. नोव्हेंबर 2011 मध्ये अग्निशमन दलाने संबंधित जागेवर फायर स्टेशनची आवश्‍यकता असल्याचा दावा केला. हे प्रकरणही चांगलेच गाजल्याने भाजपला कोंडीत पकडण्यासाठी राज्यसरकारने निर्णय घेतल्याचे जेष्ठ मंत्रयाने सांगितले.
चिक्की घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या माजी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्‍लिनचिट देत या प्रकरणाची फाईल बंद केली आहे. अंगणवाडीतील मुलांसाठी पोषण आहार आणि इतर वस्तूंसाठी नियमबाह्य पद्धतीने कंत्राटे दिले असल्याचा आरोप मुंडे यांच्यावर होता. मुंडे यांनी नियम डावलून एकाच दिवशी 24 कोटींची कंत्राटे देणे, ई-निविदा प्रक्रिया न राबवणे, गरजेपेक्षा अधिक वस्तू खरेदी करणे आदी आरोप पंकजा मुंडेंवर होते. हा सगळा घोटाळा 206 कोटी रुपयांचा असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रकरणाचाही खुबीने वापर करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्याचे सांगण्यात आले.

Tuesday, February 18, 2020

आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा डाव.;- ना.बाळासाहेब थोरत .


मुंबई : - (प्रतिनीधी ) एल्गार परिषदेचा
 तपास केंद्र सरकारने ज्या घाई गडबडीने एनआयएकडे दिला, त्यावरून हा निर्णय काळजी वाढवणारा आहे. पुरोगामी, दलित, आंबेडकरीवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे यातून स्पष्ट दिसत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
एल्गारच्या तपासावर बोलताना थोरात पुढे म्हणाले की, हे व्यासपीठ पुरोगामी विचारांचे होते. तिथे कवी, साहित्यिक, विचारवंत यांनी आपले विचार मांडले. सत्ताधारी पक्षाच्या विचारधारेविरोधात विचार मांडले म्हणून त्यांच्यावर करावाई करणे चुकीचे आहे. हा पुरोगामी, आंबेडकरवादी विचार दाबण्याचा प्रयत्न आहे. कोणी काही वेगळे वागले असेल, कोणाविरोधात काही पुरावे असतील तर आम्ही त्यांचे समर्थन करत नाही. परंतु एकूणच या प्रकरणाचा तपास ज्यापद्धतीने एनआयएकडे देण्यात आला त्याचा वेळ, काळ पाहिला तर सर्वच संशायस्पद वाटते.
याआधी पुरोगामी विचारांच्या दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांच्या हत्या करून त्यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न झाला. आता केंद्रातील भाजप सरकार पुरोगामी, आंबेडकरवादी विचार मांडणा-या ‘एल्गार’वर कारवाई करुन या विचारांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. एकूण सर्व परिस्थिती पाहता संशयाला जागा असून देशभरातून यावर चिंता व्यक्त केली जात आहे, असेही थोरात म्हणाले.

ह.भ.प.इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळ फासू ;- तृप्ती देसाई


अहमदनगर ;- (प्रतिनीधी ) कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असे विधान ओझर येथे झालेल्या किर्तनात त्यांनी केलं. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी आज नगरमध्ये आल्यानंतर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन इंदुरीकर महाराजांविरोधात लेखी तक्रार दिली. त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी गुन्हा दाखल न झाल्यास इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.
येत्या दोन-तीन दिवसांमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर आम्ही अकोले येथे त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या तोंडाला काळं फासू असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. नगरमध्ये येऊ देणार नाही, असा इशारा मला दिला होता. पण प्रत्यक्षात कुणीही आडवं आलं नाही. अडवणार म्हणणारे पेड कार्यकर्ते असावेत. त्यांचा काही तरी लाभ होत असावा, त्यामुळे ते आमचा विरोध करत असल्याचं देसाई यांनी सांगितलं आहे. दरम्यान, तृप्ती देसाई यांची गाडी सुप्यावरून जात असताना काही वारकऱ्यांनी त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवले.
दरम्यान, मुख्यमंत्री, अनेक मंत्री तसेच काही राजकारणी मंडळी इंदुरीकर महाराजांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांने हे बंद करावे, अन्यथा त्यांनाही मंत्रालयात कोंडून घेऊन अद्दल घडवू, असं त्या म्हणाल्या. इंदुरीकर महाराज महिलांबद्दल जे काही बोलत आहेत, त्याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिले आहेत, त्यावर कारवाई व्हावी. आम्हाला नगरमध्ये येऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. प्रत्यक्षात कुणीही आडवे आले नाही. अडवणार म्हणणारे पेड कार्यकर्ते असावेत. त्यांचा काही तरी लाभ होत असावा, त्यामुळे ते आमचा विरोध करीत आहेत, असंही त्या म्हणाल्या.
सम विषम वक्तव्यामुळे वादात अडकलेल्या कीर्तनकार इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांनी केली होती. त्यासाठी त्या आज (ता. १८ ) अहमागनगरच्या पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी रवाना झाल्या होत्या. तेव्हा, शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी ‘नगरमध्ये येऊन दाखवाच’ असं आव्हान देसाईंना दिलं होतं.
भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांना नगर जिल्ह्यात पाय ठेवून दाखवाचं, असं आव्हान दिलं होत. स्मिता आष्टेकर यांच्या या आव्हानामुळे तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता होती. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी स्मिता आष्टेकर यांना अहमदनगर सुपा टोल नाक्याजवळ ताब्यात घेतलं.
दरम्यान, तृप्ती देसाई अहमदनगरला येण्यापूर्वीच इंदोरीकर महाराजांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. परंतु नुसती माफी मागून काही होणार नाही, इंदोरीकरांवर गुन्हा दाखल व्हावा, गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं देसाईंनी सांगितलं.

गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव;- मा.ना.पंकजाताई मुंडे


मुंबई दि. १८( प्रतिनीधी)   परळीत गुंडागर्दी, हफ्तेखोरी ,माफिया राज करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर ,गुन्हे दाखल झाल्यावर मग ‘गय करणार नाही ‘अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण ..गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव..असल्याची टीका पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

परळी शहरात सोमवारी दुपारी भरदिवसा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अमर देशमुख या व्यापाऱ्यास काठी आणि रॉडने बेदम मारहाण केली. मारहाण करणारा आरोपी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्र्यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे.या मारहाणीच्या निषेधार्थ आज परळी बंदची हाक देण्यात आली होती. याप्रकरणी पालकमंत्र्यांनी दिलेल्या हास्यास्पद स्पष्टीकरणाचा पंकजाताई मुंडे यांनी समाचार घेत यावर ट्विट करून संताप व्यक्त केला आहे.

परळीत गुंडागर्दी, हफ्तेखोरी ,माफिया राज करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर ,गुन्हे दाखल झाल्यावर मग ‘गय करणार नाही ‘अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण ..गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव..हे खपवून घेतलं जाणार नाही..शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय जनतेने केलेलं बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली..सर्वत्र खेद आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे..अशी टिका पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

परळी सराफा व्यापा-याला बेदम मारहाण प्रकरणी . गुंडगिरीविरूध्द भाजप आक्रमक.


*अशी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही – राजेश देशमुख*

*पालकमंत्र्यांच्या वरदहस्तामुळे गुंडगिरीला बळ, आता गुन्हा दाखल झाल्याचे श्रेय घेऊ नये – सतीश मुंडे*

*गुंडगिरी प्रवृत्तीनी सर्व सामान्य नागरिकांना नाकी नऊ आणले – लोहिया*

परळी दि. १८( प्रतिनीधी ) मागील पाच वर्षात शांत असलेल्या परळी शहरात गुंडगिरीने पुन्हा डोके वर काढले आहे, एका ड्रायव्हरचे अपहरण करून मारहाण केल्याच्या घटनेनंतर सोमवारी पालकमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून सराफा व्यापारी व त्याच्या सहका-याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. वारंवार होणा-या अशा घटनांमुळे शहरातील शांतता भंग पावली असून सर्व सामान्य नागरिक दहशतीखाली वावरत आहे, पोलिसांनी गांभिर्याने लक्ष देऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केली आहे.
शहरातील गणराया ज्वेलर्सचे मालक अमर देशमुख व त्यांच्या एका सहका-याला सोमवारी सकाळी बेदम मारहाण करण्यात आली, मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांचेवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करणारे लोक राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असून पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत.
*शांततेला गालबोट*
मागील पांच वर्षात पंकजाताई मुंडे यांच्या कार्यकाळात परळी शहर शांततेत गुण्या गोविंदाने नांदत होते, व्यापारी सुरक्षित होते, त्यांनी कुणालाही पाठिशी घातले नव्हते त्यामुळे असे प्रकार घडत नव्हते परंतु आता परिस्थिती एकदम उलटी झाली आहे. गेल्या दोन तीन महिन्यात व्यापारी व सर्व सामान्य नागरिकांना कुठल्या ना कुठल्या कारणावरून टार्गेट केले जात आहे. मागील आठवड्यात एका ड्रायव्हरचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण झाली, त्यानंतर मतदारसंघातील बर्दापूर येथे एका शेतक-यांला मारहाण झाली आणि आता शहरातील व्यापा-याला लक्ष्य केले गेले. शांततेला गालबोट लावण्याचे प्रकार सत्ताधारी मंडळीकडूनच होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
*भाजप आक्रमक*
परळीत गुंडगिरी वाढली आहे, अशा प्रवृत्ती खपवून घेतल्या जाणार नाहीत असे भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख यांनी म्हटले आहे. पालकमंत्र्यांच्या वरदहस्तामुळे गुंडगिरीला बळ मिळत आहे मारहाण करणा-या गुंड त्यांच्या पक्षाचे आहेत त्यामुळेच वारंवार असे प्रकार घडत आहेत. याप्रकरणात पोलिसांनी मदत करून गुन्हे दाखल केले आहेत पण आता पालकमंत्र्यांनी याचे श्रेय घेऊ नये असे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी म्हटले आहे तर अशा प्रवृत्तींमुळे सर्व सामान्य नागरिक व व्यापारी त्रस्त झाले असून नाकी नऊ आले असल्याचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, शहरातील वाढत्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला त्यांनी दिला आहे

सराफा व्यापाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ परळीत कडकडीत बंद.दुपार नंतर बंद मागे .

परळी : - (प्रतिनीधी ) येथील सराफ व्यापारी अमर वसंतराव देशमुख व गोविंद देशमुख यांच्यावर सोमवारी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संभाजी ब्रिगेडच्या परळी तालुका शाखेच्यावतीने शहर बंदचे आवाहन करण्यात आले. या आवाहनास व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शहरातील बाजारपेठ दुपारपर्यंत कडकडीत बंद होती.
सोमवारी ( दि. १७ ) जागेच्या आर्थिक व्यवहारातून सराफा व्यापारी अमर देशमुख व गोविंद देशमुख या भावांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते गणेश दिलीप कराड व अन्य पाच जणांनी हल्ला केला. त्यामुळे शहरातील व्यापारी भयभीत झाले आहेत. याप्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या परळी तालुका शाखेने केली आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गणेश कराड यांच्यासह पाच जणांविरुद्ध खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात मंगळवारी सकाळपर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. मात्र, आरोपींना 48 तासाच्या आत अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिले आहे. तसेच १२ वीच्या परीक्षा सुरु असल्याने दुपारी 12 नंतर बंद मागे घेण्यात आल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे देवराव लुगडे यांनी दिली आहे.

ह.भ.प.इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची प्रतिक्रिया.


अहमदनगर;- (प्रतिनीधी ) कीर्तनकार निवृत्ती देशमुख (इंदुरीकर) यांनी “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असे विधान ओझर येथे झालेल्या किर्तनात त्यांनी केलं. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
याच पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांवर सिंधुताई सपकाळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबाबत त्या अहमदनगर मध्ये माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘इंदुरीकर हे चांगले व्यक्ती आहेत,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘बोलण्याच्या भरात त्यांच्याकडून बोललं गलं असेल असं मत सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळांनी व्यक्त केलं आहे. तसेच दोन तासांच्या कीर्तनातून एखादा शब्द चुकीचा जाऊ शकतो,’ असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इंदुरीकर महाराजांचं समर्थन केलं आहे.
दरम्यान, या वादावर संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी टीका केली आहे.’कीर्तन, प्रवचनाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. त्यात इंदुरीकरांचं कीर्तन बसत नाही. त्याचबरोबर त्यांचे विनोदही कमी दर्जाचे असतात. तसेच इंदोरीकरांवर चर्चा यापूर्वीच व्हायला हवी होती. कीर्तन, प्रवचनाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. त्यात इंदोरीकरांचं कीर्तन बसत नाही. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकोबा यांचा तर आपण इंदोरीकरांसारखं कीर्तन करताना विचार करू शकत नाही.असे परखड मत डॉ. मोरे यांनी मांडले आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी एस.आय.टी मार्फत करणार.;- ना.अनिल देशमुख


मुंबई: - (प्रतिनीधी ) भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेबाबतचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे दिला असला तरी याचा तपास एसआयटी मार्फत करण्यात यावा यासंदर्भात कायदेविषयक सल्ला घेवून पावले उचलली जातील अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली.या बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हि माहिती दिली.भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेबाबतचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे देण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.त्यानंतर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली.केंद्र सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला असला तरी याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे असे सांगून यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.कलम ६५ नुसार केंद्राला एनआयएकडे तपास देण्याचा अधिकार आहेत. परंतु याबाबत केंद्राने राज्य सरकारला विश्वासात घ्यायला हवे होते. कलम १० नुसार समांतर चौकशी करण्याचा अधिकार हा राज्य सरकारकडे असतो. त्यामुळे कायदेविषयक सल्ला घेतल्यानंतर भीमा कोरेगाव आणि एल्गार प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची पावले उचलली जाणार असल्याचे देशमुख म्हणाले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद नाहीत परंतु भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास वेगळा कसा व्हायला हवा याचा विचार सुरु असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेल्यानंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आज या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाली.आज झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी या प्रकरणाची जाहीर वाच्यता करण्याऐवजी जे काही म्हणणं आहे, विचार आहेत ते मांडले जातील किंवा त्याची चर्चा मुख्यमंत्र्याकडे केली जाईल असेही स्पष्ट केले.

आज पासून बारावीच्या परीक्षाला सुरूवात .

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा आज, १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. राज्यभरात एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यासंदर्भातली माहिती देणारी पत्रकार परिषद बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी घेतली.

परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण १५,०५,०२७ विद्यार्थ्यांपैकी ८,४३,५५२ विद्यार्थी तर ६,६१,३२५ विद्यार्थिनी आहेत. राज्यभर एकूण ३,०३६ परीक्षा केंद्रे आहेत.

परीक्षेला बसलेले शाखानिहाय विद्यार्थी –

विज्ञान – ५,८५,७३६कला – ४,७५,१३४
वाणिज्य – ३,८६, ७८४
व्होकेशनल – ५७,३७३
एकूण – १५,०५, ०२७

Monday, February 17, 2020

मुंबई जीएसटी भवनच्या इमारतीला मोठी आग.



मुंबई:(प्रतिनीधी ) गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आगी लागण्याचं सत्र सुरूच असून आज पुन्हा एकदा अशाच दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. माझगावमध्ये जीएसटी भवनच्या इमारतीला मोठी आग लागली आहे. आगीचं वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
आग लागलेल्या इमारतीत जीएसटी कार्यालयाशिवाय सरकारच्या अन्य विभागाचीही कार्यालयं आहेत. इमारतीच्या आठव्या व नवव्या मजल्यावर ही आग लागल्याचं कळतं. दोन्ही मजल्यावरील कर्मचाऱ्यांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं आहे. आगीमुळं सर्व्हर रूमचं कुठलंही नुकसान झालं नसल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार पक्षाची बैठक सोडून तातडीनं घटनास्थळी पोहोचले आहेत.
अग्निशमन दिलेल्या माहितीनुसार, ही आग 'लेव्हल तीन'ची आहे. एका मजल्यावरील लागलेली ही आग आता तीन मजल्यांपर्यंत पसरली आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. जीएसटी संदर्भातील कागदपत्रं आगीतून वाचवण्याचं आवाहन अग्निशमन दलापुढं आहे.

Sunday, February 16, 2020

खेड-शिवापूर टोल नाक्यावर आंदोलकांचा रास्ता रोको.

पुणे : (प्रतिनीधी )
खेड-शिवापूर टोल नाका पुणे जिह्यातून हटविण्याच्या मागणीसाठी आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर रास्ता रोको केला.
टोलनाक्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून कोल्हापुरहून पुण्याकडे येणाऱया वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. खेड-शिवापूर टोल नाक्यावर तासन्तास वाहतूक कोंडी होती. त्यामुळे स्थानिकांसह वाहन चालकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा टोल नाका पुणे जिह्यातून इतर ठिकाणी हलविण्यात यावा, अशी मागणी खेड-शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीने केली आहे.
सकाळपासूनच हा टोलनाका हटवण्यासाठी पुण्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी खेड-शिवापूर टोलनाक्यावर प्रचंड रास्तारोको केला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 1600 पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे. दोन्ही बाजुची वाहतूक कापूरहोळमार्गे वळविण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

ह.भ.प.इंदुरीकर महाराजांनी किर्तन करायाचे का शेती हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .;- तृप्ती देसाई


समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी होते असे वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु असतानाच माध्यमांमध्ये सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे महाराज व्यथित झाल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यांच्यावर गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु असतानाच त्यांनी या सर्व वादावर  किर्तनात आपली प्रतिक्रिया दिली आहे.“दोन तासांच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन” असं इंदुरीकर म्हणाले आहेत. “यूट्यूबवाले काड्या करतात. यूट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु सांगतो चॅनल संपतील पण मी नाही”, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले. या किर्तनात इंदुरीकरांनी सर्व प्रकरणाचा रोष यूट्यूब चॅनलवर व्यक्त केला.
एका बाजूला मिडिया तर दुसऱ्या बाजूला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीने महाराजांच्या विरोधात रान पेटविले आहे. तृप्ती देसाई यांनी पुन्हा एकदा महाराजांवर हल्लाबोल केला असून, आपला देश धर्मानुसार आणि पुराणानुसार चालत नाही. तो संविधानानुसार चालतो. इंदोरीकर महाराजांनी कीर्तन करायचे की, शेती करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असल्याचे म्हंटल आहे.
मात्र शेती करताना तरी इंदोरीकर महाराजांनी शेतात कामासाठी येणाऱ्या महिलांसोबत व्यवस्थित बोलावे. त्यांनाही जर अपमानास्पद बोलाल तर स्वतःच्या शेतातही काही दिवसांनी काम करता येणार नाही. अशी तुमची गत होऊ शकते, अशी टीकाही यावेळी देसाई यांनी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ‘महाराष्ट्र देशा’ शी बोलताना इंदुरीकरांच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘ कोणताही कीर्तनकार, प्रबोधनकर आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला एक दिशा देत असतो. मात्र इंदुरीकर महाराज आपल्या प्रबोधनातून महिला मुलींवर उपहासात्मक आणि अपमानास्पद टीका करत असतात. आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. या परंपरेतून त्यांनी चांगले विचार समाजात रुजवायला पाहिजेत. मात्र प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी संतांचा विचार मांडला पाहिजे असं म्हटलं आहे.’
पुढे बोलताना त्या म्हणाल्या,तसेच इंदुरीकरांनी आपल्या कीर्तनातून स्त्री – जन्माचा विचार समाजात रुजवायला पाहिजे. त्याचबरोबर पुरुषांमध्ये हि स्त्रियांचा सन्मान आणि आदर राखण्याचा विचार मांडायला हवा. स्त्री जन्माची धुरा त्यांनी समाजात रुजवणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्यावर टीका झाली म्हणून त्यांनी कीर्तन सोडण्याची गरज नाही.असे ही म्हाणाल्या .

Saturday, February 15, 2020

नगरमध्ये कडेकोट बंदोबस्तात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन.


नगर ;- (प्रतिनीधी ) हभप इंदुरीकर महाराज देशमुख वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या असताना आज नगर येथे खासगी बंदोबस्तात त्यांना कार्यक्रमाच्या स्थळी आणण्यात आले. खासगी सुरक्षारक्षकांच्या मदतीने महाराजांचे कीर्तन पार पाडले. यावेळी मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती.
गेल्या आठवड्यामध्ये मुलगा- मुलगी या वक्तव्यावरून महाराज वादात सापडले होते. इंदुरीकर महाराज यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्या कार्यक्रमाच्या नंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले.  प्रशासनाच्यावतीने त्यांना केलेल्या वक्तव्याबद्दल नोटीस बजावण्यात आली होती. अनेक संघटनांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची  मागणी सुद्धा केलेली होती.
त्यांचे कीर्तन होणार की नाही, अशी त्यांच्या भक्तांमध्ये कुजबुज सुरू झालेली होती. आज नगर येथील भिंगार या गावातील श्री शुक्लेश्वर मंदिरामध्ये त्यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. त्यांच्या बंदोबस्तासाठी खासगी बॉक्सर नियुक्त करण्यात आले होते. व बंदोबस्तात त्यांना कीर्तनाच्या स्थळी आणण्यात आले. बघ्यांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणावर  झालेली होती. दरम्यान यावेळी कीर्तन सुरू असताना कोणती शूटिंग करू नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या.