मला कुणाच्याही परवानगीची गरज लागत नाही’ अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला प्रत्युत्तर दिलं आहे. मला पसंत असलेल्या रस्त्याने मी जाईन. माझ्या रस्त्याशी मी तडजोड करणार नाही असेही पवार म्हणाले.
पंढरपूरला मी नेहमी जात असतो, प्रसिद्धी करत नाही. पहाटे लवकर जाऊन विठ्ठलदर्शन घेत असतो, असं पवारांनी सांगितलं. विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला जायचं असतं. माऊलींच्या दर्शनाला आळंदीला जायचं असतं. तुकोबांच्या दर्शनाला देहूला जायचं असतं, पण यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे कोणी सांगितलं की तुम्हाला परवानगी नाही, तर त्यांना वारकरी संप्रदायाचे विचारच समजले नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला.
मी इथे मनात कोणताही हेतू ठेवून आलेलो नाही. पंढरपूर, देहू, आळंदी, तुळजापूर अशा ठिकाणी मी नेहमी जातो. पण कोणतंही प्रदर्शन करण्याचा माझा हेतू नसतो. मी पंढरपूरला अनेकदा जाऊन आलो, ते कोणाला माहितही नसेल. कारण पहाटे चारला वगैरे मी येऊन गेलो. राजकारणात आम्ही आहोत म्हणजे अखंडपणे प्रसिद्धीशिवाय आम्हाला काही दिसत नाही, असा गैरसमज आहे. पण त्या गैरसमजाकडे मी जात नाही आणि जाऊ इच्छित नाही’ अशा शब्दात पवारांनी वारकरी परिषदेला सुनावलं.
No comments:
Post a Comment