Sunday, October 31, 2021
डॉ.संतोष मुंडे यांच्याकडुन कराड कुटुंबियाचे सांत्वन.
Wednesday, October 20, 2021
गेवराईत गुटख्याच्या गोदामावर छापा १७ लाखच्या मुद्देमालासह पाच आरोपी ताब्यात.
*नेहमीप्रमाणे गुटखा पकडला अन मुळे आबा पळाला !

बीड - (प्रतिनिधी) जिल्हा पोलिस अधीक्षक आर रामस्वामी यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी स्थापन केलेल्या पथकाने चकलांबा हद्दीत विक्री होणाऱ्या गुटख्याच्या गोदामावर छापा घातला,नेहमीप्रमाणे गुटखा पकडला मात्र त्याचा जो मुळमालक आहे तो मुळे आबा पोलिसांना काही सापडला नाही .पोलिसांनी अनेक कारवाया (दाखवण्यासाठी का होईना) केल्या,गुटखा पकडल्याचा दाखवले मात्र याचा व्यापार करणारा किंग गुटखा माफिया मुळे आबा अजूनही पोलिसांना सापडलेला नाही .छापा घालणारे किंवा घालण्याचा आदेश देणारे कोणी ना कोणी त्याच्याकडून होणारी लक्ष्मीदर्शन मुळे उपकृत झाले असावेत त्यामुळेच हा माफिया खुलेआम फिरतो आहे .
दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 18.00 वाजता चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील उमापूर गावा लगतच्या मारुतीचीवाडी या वस्तीजवळ आरोपी नामे सोपान विठ्ठलराव भोसले यांच्या शेतामध्ये असलेल्या गोडाऊन मध्ये आयशर टेम्पो MH 11 M 4553 यामधून गुटखा उतरून गोडाऊन मध्ये काही इसम साठा करत असताना छापा मारला असता पाच इसमांना जागीच पकडण्यात आले.
त्यामध्ये 1)अजित अशोक पाटणे रा. उमापूर (गुटका मालक) 2) विठ्ठल विष्णू काठोळे रा. नामलगाव फाटा, बीड (टेम्पो चालक) 3) सुदाम बाबासाहेब काठोळे रा. नामलगाव फाटा,बीड (लेबर) 4) रामेश्वर विष्णू कातकडे रा. उमापूर (लेबर ) 5) नवनाथ अशोक राऊत रा.उमापुर (लेबर) आणि टेम्पो व गोडाऊनमधील एकूण 12 लाख 3 हजार 800 रुपये किमतीचा गुटका, सोबतचा आयशर टेम्पो 5 लाख रुपये किमतीचा जुनाअसा एकूण 17,03,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चकलांबा पोलिस ठाणे मध्ये जागीच पकडलेले 5 आरोपी आणि आयशर टेम्पो मालक, गुटख्याचा भागीदार मालक नामे बाळू बाबुराव बहिरवाळ उर्फ बाळू गुजर, गोडाऊन भाड्याने देणारे गोडाऊन चे मालक सोपान विठ्ठलराव भोसले असे 8 आरोपी विरुद्ध भादवि कलम 328, 272, 273,34 सह मोटार वाहन कायदा 130(3)/177 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे
Monday, October 18, 2021
माझी नाराजी काँग्रेस पक्षावर नसून पक्षातील स्वार्थी गटबाज नेत्यांवर आहे - राजकिशोर मोदी.
Sunday, October 17, 2021
परळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाने वेधले लक्ष. ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुष्पवृष्टीने स्वागत.
*असंख्य हिंदूंच्या कार्यामुळेच अयोध्येतील श्रीराम मंदिर उभे राहत आहे – शरद हेबाळकर
प्परळी वैजनाथ ;- (प्रतिनिधी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे घेण्यात येणाऱ्या वार्षिक उत्सवांपैकी एक असलेल्या विजयादशमी उत्सव 17ऑक्टोबर रविवार रोजी शहरातील औद्योगिक वसाहतीच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन परळी वैजनाथ शाखेतर्फे करण्यात आले होते.विजयादशमी उत्सवानिमित्त शहरात पथसंचलन करण्यात आले.पथसंचलनानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून शरद हेबाळकर (अखिल भारतीय इतिहास संकलन समिती, उपाध्यक्ष) अंबाजोगाई यांची उपस्थिती होती.
1982 पासून सुरू असलेल्या कार्याचे फळ म्हणूनच आज अयोध्येतील श्रीराम मंदिर होत आहे.यामध्ये हजारो साधूंना, रामभक्तांना बलिदान द्यावे लागले.संघटन रोजच्या शाखेतून चालते,संघाचे कार्य परिस्थिती निरपेक्ष आहे.असे शरद हेबाळकर यावेळी म्हणाले त्यांनी संघाच्या कार्याची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर वेरुळे,जिल्हा संघचालक प्रा.उत्तम कांदे,तालुका संघचालक डॉ.अजित केंद्रे व उपस्थित स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजाला वंदना केली.या महोत्सवसाठी परळी तालुक्यातील स्वयंसेवक तथा राष्ट्रप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परळीत या वर्षी विजयादशमी उत्सवानिमित्त भव्य पथसंचलन करण्यात आले.घोष पथकाने सर्वांचे लक्ष वेधले तर संचलनादरम्यान राष्ट्रप्रेमींनी ठिकठिकाणी भगव्या ध्वजाचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले.हे पथसंचलन औद्योगिक वसाहत सभागृह येथुन सुरू होऊन पुढे नाथ चित्र मंदिर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक,विद्यानगर,शंभू महादेव मंदिर,श्री गजानन महाराज मंदिर परिसर,जलालपूर रोड मार्गे औद्योगिक वसाहत येथे या संचलनाची सांगता करण्यात आली.या संचलनासाठी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Friday, October 15, 2021
अ.भा.वारकरी मंडळाच्या वतीने कु.प्रतीक्षा मुंडे व प्रा.सौ.चेतनाताई गौरशेटे यांचा सत्कार करण्यात आला.
Thursday, October 14, 2021
ताई भक्तांनाही दोन वर्षापासून बोलायचंय.ब्रम्हगाव ते सावरगाव घाट रस्त्यावर ओतलेले चार कोटी कोणी गिळले ?
Wednesday, October 13, 2021
थकीत वेतन मिळणार ! एस.टी.च्या कर्मचार्यांची दिवाळी गोड होणार.
परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या 93 हजार कर्मचार्यांचा थकीत वेतनाचा प्रश्न सुटला आहे. लवकरच एसटी कर्मचार्यांना सप्टेबर महिन्याचे वेतन देण्यात येईल. थकीत वेतन मिळणार असल्याने एसटी कर्मचार्यांची दिवाळी चांगली जाणार आहे.
ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे, या करीता गाव ते शाळा दरम्यान वाहतुकीची मोफत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ’मानव विकास कार्यक्रम’ अंतर्गत योजना राबविली जाते. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी दिला जातो.
या योजनेतंर्गत एसटी महामंडळाच्या बस वाहतूकीच्या खर्चापोटी राज्य शासनाकडून सन 2013-14 पासून रक्कम देणे प्रलंबित होते. तसेच इंधन किमतीची दरवाढ, चालनीय किलोमीटर तफावत, चालक आणि वाहक यांचे वेतनवाढ,
बसेसच्या देखभाल व दुरुस्तीचा वाढीव खर्च आदी विचार करुन पुर्वलक्षी प्रभावाने 2013-14पासून वाढीव दराने अनुदान देण्याबाबत मंत्री परब यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांची वेळोवेळी बैठक घेऊन एसटी महामंडळास एकूण 428 कोटी 88 लाख 62 हजार 200 इतका निधी मंजूर करुन घेतला.
तो निधी देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन मे, 2021 महिन्यात पहील्या टप्यातील 197 कोटी 58 लाख 40 हजार रुपायांच्या अनुदानाची रक्कम यापर्वीच एसटी. महामंडळाला मिळाली आहे.
दरम्यान, दुसर्या टप्प्यातील 231 कोटी 30 लाख 22 हजार 200 रूपयांचा निधी एसटी महामंडळाला देण्याबाबत निर्देश संबंधित विभागाला राज्य शासनाने दिले आहेत. या निधीमधून एसटी कर्मचार्यांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वेतन मिळणार असल्यामुळे आता एसटी कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे एसटी कर्मचार्यांमधून स्वागत केले जात आहे.
पंकजाताई मुंडे, खा.डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी घेतले योगेश्वरी देवीचे दर्शन.
मराठा आरक्षणप्रश्नी खा.छत्रपती संभाजी राजे पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर !

मुंबई – मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकार जाणीवपूर्वक लांबवत आहे, दिलेली मुदत संपल्याने आपण रायगडापासून पुन्हा नव्याने राज्याचा दौरा येत्या 25 ऑक्टोबर पासून करणार असल्याची घोषणा खा छत्रपती संभाजी राजे यांनी केली .
येत्या 25 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी दौरा करणार आहे. रायगडपासून या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. राज्य सरकारने आश्वासन देऊनही काहीच केलं नाही. सारथीचा एक मुद्दा सोडला तर इतर मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले.
राज्य सरकार राज्याची जबाबदारी पाळत नाही. सरकारला अल्टिमेटम दिला होता. पण त्यांनी आश्वासन पाळलं नाही. आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही, आता आणखी काय चर्चा करायची?, असा उद्विग्न सवालही त्यांनी केला. तसेच कुणी टीका करतयं त्याकडे मी लक्ष देत नाही. टीकाकारांना विनंती आहे त्यांनी आपला वेळ समाजासाठी द्यावा, असं ते म्हणाले.
मराठा आरक्षणाची मशाल चुकीच्या व्यक्तीच्या हातात असल्याची टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी मतभेद असल्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावली. सातारा गादी आणि कोल्हापूरच्या गादीमध्ये कोणताही मतभेद नाही. उदयनराजे नेमकं काय म्हटले हे मला माहीत नाही, असंही ते म्हणाले.
एकतर्फी प्रेमातून आठवीच्या मुलीची निर्घुण हत्या…दोघांना अटक…पुण्यातील धक्कादायक प्रकार.
मिळालेल्या माहितीनुसार हत्या झालेली मुलगी इयत्ता आठवी वर्गात शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईकच आहे. या आोरपीसोबत अन्य दोन व्यक्ती होते. हत्येआधी मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी तिचा नातेवाईक तसेच इतर दोघे तिच्याकडे आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली. यातच अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला.
“तथापि, आम्ही दोन आरोपींना पकडण्यात यशस्वी झालो, जे अल्पवयीन आहेत, तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे,” तो म्हणाला. जावरे म्हणाले की, आरोपी 22 वर्षीय शुभम भागवत हा मुलीचा दूरचा नातेवाईक आहे आणि तिच्या घरी राहायचा. तो म्हणाला की ‘तो मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडला असल्याने, मुलीच्या पालकांनी त्याला घर सोडण्यास सांगितले होते.’
पोलीस उपायुक्त (झोन -5) नम्रता पाटील यांनी सांगितले की, त्यांना घटनास्थळावरून खेळणीच्या बंदुकीसारखे दिसणारे पिस्तूल सापडले. पाटील म्हणाले की, पोलीस त्याच्या सत्यतेची चौकशी करत आहेत. त्याचवेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार, जे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, यांनीही या घटनेचा निषेध केला आहे आणि पोलिसांना या प्रकरणी त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे.
Friday, October 8, 2021
*दिव्य ज्योति जाग्रति संस्थान द्वारा आयोजित सात दिवसीय श्री राम कथेचा लाभ घ्या.*
Thursday, October 7, 2021
मोठी बातमी! महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राचा अलर्ट.
कोरोनाचं आव्हान अजूनही संपुष्टात आलेलं नाही. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रित करण्यात आपण काही प्रमाणात अपयशी ठरल्याचं म्हणू शकतो. आपल्याला निरंतर प्रयत्न करण्याची गरज आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम आणि कर्नाटकात दहा हजारांपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आढळले आहेत, असं आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.
भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर . महाराष्ट्रातून 'या' नेत्यांना संधी.
नव्या राष्ट्रीय कार्यसमितीत 50 विशेष आमंत्रित आणि 179 स्थायी सदस्य असणार आहेत. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेतील नेते, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रीय मोर्चांचे अध्यक्ष, प्रदेश प्रत्रारी, सह प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आदींचा समावेश करण्यात आला आहे.
कार्यकारिणीत 309 सदस्य
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण 309 घोषित सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यकारिणीत मनेका गांधी आणि लखीमपूर हिंसेवरून योगी सरकारला आरसा दाखवणारे वरुण गांधी यांना स्थान देण्यात आलं नाही. मात्र, मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन आणि रविशंकर प्रसाद यांना कार्यकारिणीत घेण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातून कोण?
राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा समावेश करण्यात आला आहे. तर, राष्ट्रीय सचिव म्हणून महाराष्ट्रातून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे यांचा समावेश कायम आहे. तर विशेष निमंत्रितांमध्ये सुधीर मुनंगटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणींचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून सुनील वर्मा, हिना गावित, यांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश करण्यात आला आहे. राज्य प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांना कायम ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून सीटी रवी, ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैय्या यांची नियुक्ती कायम ठेवली आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र
नितीन गडकरी
पीयूष गोयल
प्रकाश जावडेकर
डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
चित्रा वाघ
राष्ट्रीय सचिव
विनोद तावडे
सुनील देवधर
पंकजा मुंडे
विशेष निमंत्रित
सुधीर मुनंगटीवार
आशिष शेलार
लड्डाराम नागवाणीं
राष्ट्रीय प्रवक्ते
सुनील वर्मा
हिना गावित
माजी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
राज्य प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील
महाराष्ट्राचे प्रभारी
सीटी रवी,
ओमप्रकाश धुर्वे
जयभान सिंग पवैय्या
घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी सणासुदीच्या काळात वारंवार खंडित वीजपुरवठ्या मुळे नागरिक हैराण..!
Wednesday, October 6, 2021
नवरात्रोत्सवात व्रत-उपवास व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसे फायदे देतात.
Tuesday, October 5, 2021
वनपरिक्षेत्र परळी अंतर्गत श्री.केदारी महाराज विद्यामंदीर,नंदनज येथे वन्यजीव सप्ताह साजरा.
Monday, October 4, 2021
बीड नगरपरीषदेच्या सचित्र विकासकामांचे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते उद्घाटन:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर.
प्रभाग 13 मधील "दोस्ती टी हाऊस ते वडरवाडा" रोड चे रखडलेले काम तात्काळ चालू करा.अन्यथा न. प. कार्यालया समोर धरणे आंदोलन. प्रा पवन मुंडे.
Sunday, October 3, 2021
परळी-अंबेजोगाई आकाशवाणी एफ एम केंद्र निर्मितीसाठी अतिरिक्त महासंचालक आकाशवाणी-दुरदर्शन मुंबई यांच्याकडून प्रसारभारतीकडे तातडीने प्रस्ताव दाखल होणार.
गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवणा-या जिल्हापरिषद कार्यालयातच शौचालयासाठी पाणी नाही, आंदोलनासाठी बकेटभर पाणी विकत घ्यावे लागले:-डाॅ.गणेश ढवळे
विश्वास नागरे पाटील हे महाविकास आघाडीचे माफीया ;- किरीट सोमाय्या.
नवी दिल्ली :- महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोपांची राळ उठवून खळबळ उडवून देणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता थेट सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावरच निशाना साधला आहे. विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडीचे माफिया आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
किरीट सोमय्या आज दिल्लीत आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना सोमय्या यांनी हा आरोप केला आहे. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे ठाकरे सरकारचे माफिया म्हणून काम करत आहेत. पाटील यांनी गैरकायदेशीरपणे मला घरात कोंडून ठेवले. सीएसटी स्टेशनच्या बाहेर कोंडून ठेवलं. ते सूचना देत होते. ते सीनियर पोलीस अधिकारी आहेत.
एज्युकेटेड अधिकारी आहेत. परमबीर सिंग 100 कोटींच्या वसुलीत सहभागी झाले. यांचा एसीपी 50 लाखांची सुपारी घेतो. अन् नांगरे-पाटील हे माफिया सारखे वागत आहे, अशी टीका सोमय्या यांनी केली.
