Tuesday, August 31, 2021
दिव्य ज्योति जागृती संस्थानच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव 2021 उत्साहात साजरा.
*खासदारावर उपोषण करण्याची वेळ अणु नका - खा डॉ प्रितमताई मुंडे. *डॉ खा प्रितमताई मुंडे यांच्या साक्षीने नगरसेवक प्रा पवन मुंडे यांचे उपोषण मागे!
Saturday, August 28, 2021
दोन बहिणींचा नदीत बुडून मृत्यू ; राक्षसभुवन शनीचे येथील दुर्दैवी घटना.
नेहा धर्मराज कोरडे ( वय ९ वर्ष ) व अमृता धर्मराज कोरडे ( वय ८ वर्ष ) असे मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत . घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिस ठाण्यात नवनिर्वाचित सहायक पोलिस निरीक्षक भास्कर नवले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मुलींचे मृतदेह पाण्याबरोबर काढले . तसेच घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले .
वाळू माफियांना महसुल,पोलीसांचा आर्शिवाद.पुढारी अन अधिकाऱ्यांना प्रशासन सोलून काढणार का?

बीड - (प्रतिनीधी) वाळूच्या माध्यमातून गोदापात्राची चाळणी करून आपलं उखळ पांढर करून घेणारे पुढारी आणि अधिकारी यांच्यातील मिलीभगत कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.नूतन जिल्हाधिकारी शर्मा यांच्यामुळे का होईना एसपी राजा रामस्वामी यांना गोदापात्रात जावं लागलं.जर कलेक्टर आणि एसपी गेल्यावर सहा सात हायवा सापडत असतील तर महसूल अन पोलीस विभागाचे अधिकारी अन कर्मचारी झोपा काढतात का?अशा कामचुकार अन पैसे खाऊवर काही कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
बीड जिल्ह्यात गेवराई,माजलगाव, परळी,आष्टी ,शिरूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो .त्या त्या तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे बगलबच्चे कार्यकर्ते हे वाळूच्या धंद्यात असतात.हा सर्वांनी नदी पात्राची पूर्ण चाळणी केली आहे .
विशेषतः सगळ्यात जास्त वाळू ज्या गेवराई तालुक्यातील गोदापात्रात भेटते त्याठिकाणी शिवसेना असो की भाजप अथवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्याच पक्षाच्या स्थानिक लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी,सरपंच यांनी हातात हात घालून लुटण्याचा उद्योग केल्याचे दिसून येते .
गोदापात्र खरडून साफ करण्याचे पाप ज्यांनी ज्यांनी केले आहे ते कधी गेवराईचे आमदार,मंत्री,जी प सदस्य,नगराध्यक्ष राहिलेले आहेत.त्यामुळे येथे येणारा तहसीलदार असो की पोलीस उपअधीक्षक अथवा पोलीस निरीक्षक प्रत्येक जण या पुढाऱ्यांच्या दरबारात जाऊन मुजरा करतात अन आपला हिस्सा घेऊन गप्प बसतात.
या तालुक्यात कोणालाही वाळू उपसा करायचा असेल तर मोठ्या” युद्धात”जित हसील करावी लागते किंवा मग “विजय” मिळवून आपणच सिंह असल्याचे दाखवून द्यावे लागते.हा सगळा प्रकार बिनबोभाट सुरू आहे,कारण तलाठी,मंडळ अधिकारी, ग्रामसेवक ,नायब तहसीलदार, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी ,पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सपोनि असे सगळेच यामध्ये सहभागी असतात.
दोन दिवसांपूर्वी नूतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी वाळूपट्यात जाऊन कारवाई केली,याचा अर्थ लिलाव नसताना वाळू उपसा सुरू आहे,मग हे पोलीस अन स्थानिक महसूल प्रशासनाला दिसत नाही का.जर अशा लोकांच्या निगराणीत हे प्रकार होत असतील तर मग या अधिकाऱ्यांवर दंडात्मक अन निलंबनाची कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी दाखवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे .
कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशि भविष्य !
मेष
श्रीगणेशाच्या कृपेने आजचा दिवस आपणाला अनुकूल असेल.शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल. आज आपणावर लक्ष्मीची कृपादृष्टी राहील. कुटुंबीयांसमवेत आनंद आणि उत्साहात वेळ जाईल. आईकडून लाभ होण्याचे संकेत गणेशजींकडून दिले जात आहेत. मित्र आणि संबंधितांमुळे घरातील वातावरण आनंदी राहील.
वृषभ
श्रीगणेश आज आपणाला सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. आज घडणार्या घटनांमुळे आपण काळजीत पडाल. श्रीगणेशाच्या मते आपले स्वास्थ्य बिघडेल आणि डोळ्याचे विकार बळावतील. घरातील व्यक्तींचा विरोध आणि रुसवा याला तोंड द्यावे लागेल. आज सुरू केलेले काम अपूर्ण राहील. अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल व कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल. दुर्घटनेपासून सावध राहा.
मिथुन
श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस आपणाला लाभदायक आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिच्या दृष्टिने योग्य दिवस. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. मित्रांकडून लाभ होईल. कुटुंबातही मुलगा, भाऊ व पत्नी यांच्याकडून लाभ होण्याचे संकेत आहेत. स्वादिष्ट भोजनाचे योग आहेत. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. संततीकडून आनंदी वार्ता समजतील. नोकरी-व्यवसायात लाभ होईल. उत्पन्न वाढेल. वैवाहिक सुख लाभेल.
कर्क
आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल आहे असे श्रीगणेशांना वाटते. प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढतीचे योग. अधिकार्याबरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. कुटुंबियाबरोबर मनमोकळ्या गाप्पा. गृहसजावटीकडे लक्ष जाईल. कामासाठी बाहेर जावे लागेल. आई बरोबर चांगले संबंध राहतील. सरकारी लाभ होतील. स्वास्थ्य चांगले राहील.
सिंह
मध्यम फल देणारा दिवस. पूर्वनियोजित कामासाठी आपले प्रयत्न चालू राहतील. व्यवहार न्यायपूर्ण असेल. आज धार्मिक तसेच मंगल कार्यात तुम्ही मग्न रहाल असे श्रीगणेश पाहताहेत. धार्मिक प्रवास घडतील. आज आपली वृत्ती रागीट असेल, म्हणून श्रीगणेश सावध करत आहेत. परदेशात राहणार्या नातलगांच्या बात- म्या समजतील. संतती व उद्योगधंदा यातील कटकटी मुळे दिवस अशांत जाईल.
कन्या
नवीन कामाचा शुभारंभ करण्यास दिवस उत्तम असल्याचे श्रीगणेश सांगतात. प्रकृतीची काळजी घ्या. बाहेरचे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. स्वभाव रागीट बनेल म्हणून बोलण्यावर संयम ठेवा. कुटुंबियांशी चर्चेतून मतभेद होणार नाहीत, याची काळजी ध्या. पाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खर्च वाढतील. सरकार विरोधी कृत्यापासून दूर रहा. वादात पडू नका.
तुळ
श्रीगणेश सांगतात की आपला आजचा दिवस आनंदात जाईल. प्रियकरासोबत प्रेमालाप होईल. मित्रासोबत प्रवासातून आनंद मिळेल. नवीन वरमालंकारांची खरेदी होण्याचे योग आहेत. तन-मन तंदुरुस्त राहील. मान-सम्मान मिळेल. मिष्टान्न, भोजन व वैवाहिक सुखाची प्राप्ती होईल.
वृश्चिक
घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील. योग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होईल. आजारी माणसांच्या आरोग्यात सुधारणा. शत्रूवर मात होईल. उत्तम सहकार्य सहकार्यांकडून मिळेल. स्त्रीवर्गाशी ओळखी होतील. माहरहून बातम्या येतील, असे श्रीगणेश पाहताहेत. धनलाभ होईल. कामे पूर्ण होतील.
धनू
आज प्रवास न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. संततीचे आरोग्य आणि अभ्यास या विषयी चिंतेने मन व्याकूळ होईल. कामे अपूर्ण राहिल्याने निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवा. कलासाहित्याकडे मनाचा कल राहून विविध कल्पना सुचतील. बौद्धिक चर्चेपासून दूरच राहा. प्रियजनांसाठी आजचा दिवस रोमांचक आहे.
मकर
श्रीगणेश पाहताहेत की, आज आपली मनःस्थिती व आरोग्य काही चांगले असेल. कौटुंबिक कटकटीमुळे मन दुःखी होईल. उत्साह आणि आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील. छातीसंबंधी आजार होऊ शकतो. झोप येणार नाही. मानहानी होऊ शकते. पाण्यापासून सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. मानसिक उद्वेग आणि एकंदरीत प्रतिकूलता यामुळे दिवस चिंतेत जाईल.
कुंभ
आज आपणास मनाने हल्के हल्के वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. घरात भावंडांबरोबर काही आयोजन कराल. त्यांच्याबरोबर वेळ आनंदात जाईल. मित्रांच्या व आप्तांच्या भेटी होतील. जवळच्या ठिकाणी सहलीसाठी जाल. विरोधकावर मात कराल. भाग्य वाढेल. वैवाहिक जिवनात आनंद प्राप्त होईल.
मीन
श्रीगणेश आज आपल्याला खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देत आहेत. रागावर व वाणीवर ताबा ठेवा नाहीतर मन दुःखी होईल. पैशाचे, देण्याघेण्याचे व्यवहार सावधतेने करा. मन व शरीराचे आरोग्य मध्यम राहील. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मनात नकारात्मक विचार आणू नका व खाण्यापिण्यावर संयम ठेवा.
Friday, August 27, 2021
दिव्य ज्योति जागृती संस्थानचा श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव ऑनलाईन. घरात बसूनच पाहता येईल कार्यक्रम आणि करता येईल पुजा.
Tuesday, August 24, 2021
भुयारी गटार योजनेच्या नावाखाली फोडलेले रस्त्याच्या ठिकाणी त्वरित नवीन रस्ते करा अन्यथा 30 ऑगस्ट रोजी नगरपालिका समोर करणार आमरण उपोषण.- प्रा पवन मुंडे
दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या जन्माष्टमी कार्यक्रमाचे दिल्लीवरून थेट प्रक्षेपण.भाविकांनी लाभ घ्यावा.
कास्ट्राइब माफसू कार्यकारिणी उपाध्यक्षपदी प्रवीण बागडे यांची निवड.
Friday, August 20, 2021
नगर परिषद,नगर पंचायत निवडणुकीचा डिसेंम्बर अखेर रणसंग्राम !
बीड – राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत च्या प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने गुरुवारी दिले आहेत .त्यामुळे या वर्षाखेरीस नगर परिषद निवडणुकांचा बिगुल वाजणार हे निश्चित झाले आहे .जिल्ह्यातील पाच नगर पंचायत आणि सहा नगर पालिकेच्या निवडणुकांमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे .
मुदती संपणाऱ्या व नवनिर्मित नगरपरिषदा, नगरपंचायतींची व्यापकता विचारात घेता प्रभाग रचना वेळेवर अंतिम करणे सुकर व्हावे म्हणून प्रारूप प्रभाग रचनेची कार्यवाही सुरु करणे आवश्यक आहे. शासनाने १२ मार्च, २०२० रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अधिनियम, २०२० अन्वये सर्व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पध्दती लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असेल.
तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिध्द केलेली लोकसंख्येची अलिकडची आकडेवारी म्हणजेच सन २०११ ची लोकसंख्या विचारात घ्यावयाची आहे. त्यानुसार सदस्य संख्या निश्चित करून तितक्या प्रभागांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्यात यावा. परिस्थिती लक्षात घेता प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी विचारात घेता व निवडणुका मुदत समाप्तीपूर्वी पार पाडणे शक्य व्हावे, यासाठी सध्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा. सदर कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही ही दिनांक २३ ऑगस्टपासून सुरू करण्यात यावी. कच्चा आरखडा तयार होताच आयोगाला तात्काळ सादर करावे असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना दिले आहेत
बीड जि. प. चे सिओ म्हणून अजित पवार कारभार सांभाळणार.अजित कुंभार यांचि बदली.
बीड - (प्रतिनीधी) बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी जात पडताळणी विभागाचे अजित पवार हे बीडला येत आहेत .कुंभार यांची बृहन मुंबई महापालिकेचे सहआयुक्त म्हणून रुजू होतील .
गेल्या तीन वर्षा पासून बीड जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणारे अजित कुंभार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अजित पवार हे येत आहेत .कुंभार यांची बीड येथील कारकीर्द अत्यंत चांगली राहिली आहे .कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कार्यामुळे बीड जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येण्यास मदत झाली होती. नियोजन व उत्कृष्ट कार्य जिल्हा कधीच विसरणार नाही कोरोना संकट काळात दोन्ही लाटेत त्यांनी उत्कृष्ट कार्य करून वेगळी छाप निर्माण केली होती.
भारतीय जनता पार्टी की जन आर्शीवाद यात्रा में कोरोना नियमों का उल्लंघन, 7 एफआईआर दर्ज.

मुबई: (संवाददाता) भारतीय जनता पार्टी की जन आर्शीवाद यात्र को लेकर उद्धव ठाकरे सरकार सख्त नजर आ रही है. दरअसल, बीजेपी की इस यात्रा के वक्त कोविड-19 प्रोटोकॉल का उल्लंघन के आरोप में 7 एफआईआर दर्ज की गई हैं. हालांकि अभी पुलिस ने इस पूरे मामले में किसी की गिरफ्तारी नहीं की है.
मिली जानकारी के मुताबिक, कोविड-19 प्रोटोकॉल के उल्लंघन के आरोप में मुंबई के विले पार्ले, खेरवादी, माहिम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर और गोवांडी पुलिस थाने में कार्यकर्ताओं के खिलाफ एफआईआर दर्ज की गई है. बताया जा रहा है कि इस यात्रा में बीजेपी के भारी संख्या में कार्यकर्ता शामिल हुए. यात्रा में कई कार्यकर्ताओं के चेहरे पर मास्क नहीं दिखा. साथ ही सोशल डिस्टेंसिंग का पालन भी नहीं किया गया था. जिसका कोरोना प्रोटोकॉल के तहत करना जरूरी है.
वहीं, नियमों के उल्लंघन को देखते हुए मुंबई पुलिस ने बीजेपी कार्यकर्ताओं के खिलाफ एफआईआर दर्ज की है. मुंबई के एक थाने के अधिकारी ने मामले की जानकारी देते हुए बताया कि, इन लोगों ने जन आर्शिवाद यात्रा निकालने के लिए पुलिस से अनुमति भी नहीं ली. उन्होंने बताया कि, पुलिस ने इन कार्यकर्ताओं के खिलाफ आईपीसी की धारा-188, 269, 270 के तहत मुकदमा दर्ज किया है.
बता दें, केंद्रीय मंत्री कपिल पाटिल के समर्थन में इस यात्रा को निकाला गया था जिसमें सैकड़ों कार्यकर्ता शामिल थे. बीते महीने मोदी सरकार में शामिल किए गए मंत्रियों को बीजेपी अध्यक्ष ने जनता से जुड़ने का निर्देश दिया था. जिसके तहत जन आर्शीवाद यात्रा का आयोजन किया गया है
बलात्काऱ्यांसाठी कठोर अशा शरीयत सारखा कायदा लागू करा - प्रा.ताज मुलानी.
सरपंचांनी पोळा मिरवणूक मार्ग केला स्वच्छ.सौ.वत्सलाबाई कोकाटे यांचा विशेष उपक्रम.
कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशिभविष्य !
मेष – घर, कुटुंब आणि संतती यांच्या संबंधी आज आपणाला आनंद आणि संतोषाची भावना राहील. आज आप्त, इष्ट आणि मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार- धंद्यासंबंधी प्रवास होईल आणि त्यात लाभ होईल.व्यवसायात लाभ, मान आणि प्रतिष्ठा मिळेल.
वृषभ – व्यापार्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्या वार्ता आपणाला भावविवश बनवतील.
तूळ – श्रीगणेश सांगतात की आज आपण खूप भावनाशील बनाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या तब्बेतीची काळजी राहील. यात्रा- प्रवासासाठी काळ योग्य नाही.
धनु – द्विधा मनःस्थिती आणि घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्त्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही असे श्रीगणेश सांगतात. घरातील व्यक्तींचे गैरसमज होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे लागतील.
कुंभ – कोणाला जामीन राहणे, पैसे देणे- घेणे करू नका असे श्रीगणेश सांगतात. खर्च वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता. कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा.
Thursday, August 19, 2021
आज पत्रकारांसाठी राजयोगाद्वारे सुखशांती शिबिराचे आयोजन.- वैभव स्वामी
राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती परळीच्या वतीने आर्ट अॉफ लिव्हींगच्या मराठवाडयातील पहील्या ज्ञानमंदीर उभारणीस पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते देणगी सुपूर्द. ;- चेतन सौंदळे
कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशीभविष्य - 19 ऑगस्ट 2021; कन्या राशीसाठी चिंतेचा अन् मीनसाठी लाभाचा दिवस.
मेष
आज आपण आपला संताप काबूत ठेवा. कोणत्याही कामात व्यत्यय यायला हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव जाणवेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही... आणखी वाचा
वृषभ
कायपूर्तीला विलंब आणि शारीरिक अस्वास्थ्य यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा बोझा वाढेल त्यामुळे मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. नवे काम आज सुरू न करण्याचा सल्ला... आणखी वाचा
मिथुन
शारीरिक आणि मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र आणि कुटुंबीयां समवेत प्रवास किंवा पार्टीचाबेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. भारी वस्त्रे, स्वादिष्ट भोजन आणि वाहनसुख मिळेल... आणखी वाचा
कर्क
आज आपणाला यशाचा आणि आनंदाचा दिवस जाईल. कुटुंबातील व्यक्तीं समवेत घरात सुख- समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल. स्त्री वर्गांशी आनंदी बातचीत कराल... आणखी वाचा
सिंह
लेखन आणि साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा आपणाला मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयात यश आणि प्रिय व्यक्तींशी सुसंवाद आपले मन आनंदित करेल. स्त्री वर्गाकडून अधिक सहकार्य मिळेल... आणखी वाचा
कन्या
आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. तब्बेत बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील. घरातील व्यक्तींशी पटणार नाही. त्यामुळे घरात शांतता राहणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
तूळ
शुभ वा धार्मिक कार्यानिमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळे घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल. कामानिमित्त बाहेर जावे लागेल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. नवीन कार्य सुरू करू शकाल... आणखी वाचा
वृश्चिक
कुटुंबात कलह वा द्वेषाचे प्रसंग येऊ नयेत या विषयी दक्ष राहा. कुटुंबातील व्यक्तींबरोबर गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. मनात येणारे नकारात्मक विचार हद्दपार करा अशी सूचना. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील... आणखी वाचा
धनु
आज आपण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राखाल. आर्थिक लाभ होतील. तीर्थयात्रा कराल. सगेसोयरे व मित्रांच्या येण्याने मन खुश राहील. दांपत्य जीवनात जवळीक आणि गोडी राहील. मान- मरातब वाढेल... आणखी वाचा
मकर
आज सावधानतेने वागण्याचा सल्ला. कठोर परिश्रमानंतरही कमी यश मिळाल्याने मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल. घरगुती वातावरण पण शांत नसेल. तब्बेतीची तक्रार राहील. दुर्घटनेपासून सावध राहा... आणखी वाचा
कुंभ
आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवातही करू शकाल. नोकरी- व्यवसायात लाभ प्राप्ती. स्त्री मित्र आपल्या प्रगतीत मदत करतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे... आणखी वाचा
मीन
नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठ पदाधिकार्यांकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे आज आपणाला अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल. व्यापार्यांना व्यापारवृद्धी होईल आणि उर्वरित रक्कम प्राप्त होईल... आणखी वाचा
Tuesday, August 17, 2021
कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशि भविष्य !
मेष
श्रीगणेश सांगतात की आज सांसारिक बाबी विसरून आध्यात्मिक गोष्टींत संपर्क साधाल. गूढ, रहस्यमय विद्या आणि गाढ चिंतनशक्ती आपला मानसिक भार हलका करील. आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी चांगला योग आहे. बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही. हितशत्रू आपली हानी करतील. नवीन कार्य सुरू करू नका.
वृषभ
श्रीगणेश कृपेने आपल्या जीवनसाथीच्या जवळीकीचे सुख प्राप्त होईल.कुटुंबीयांसमवेत सामाजिक समारंभासाठी बाहेर फिरणे किंवा सहलीला जाणे घडेल. त्यामुळे वेळ आनंदात जाईल. शरीर आणि मनाला प्रसन्न वाटेल. सार्वजनिक जीवनात यश आणि कीर्ती मिळेल. व्यापारी आपल्या व्यापारात विकास करू शकतील. भागीदारीत लाभ होईल. अचानक धनलाभ होईल. विदेशातून वार्ता मिळतील.
मिथुन
अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे, असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील. स्वास्थ्य राहील. कामात यश आणि कीर्ती लाभेल. इतरांशी बातचित करताना रागावर ताबा ठेवा आणि मितभाषी राहा म्हणजे मतभेदाचे प्रसंग उद्भवणार नाहीत. धनप्राप्ती होईल. आवश्यक तेवढाच खर्च कराल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. नोकरदारांना लाभ होईल.
कर्क
शांतपणाने दिवस घालवा असे श्रीगणेश सांगतात. कारण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उद्विग्नता राहील. पोटदुखीचे विकार बळावतील. अचानक पैसा खर्च होईल. प्रेमिकांमध्ये वादविवाद झाल्यामुळे रुसवे- फुगवे होतील. भिन्न लिंगीय व्यक्तीचे आकर्षण किंवा कामुकता आपणाला संकटात टाकेल. त्या दृष्टीने लक्ष द्या. नवीन कार्यारंभ अथवा यात्रा न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.
सिंह
श्रीगणेश सांगतात की मानसिक अस्वस्थता राहील. कुटुंबीयांशी मतभेद होतील. जमीन, घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करायला दिवस योग्य नाही. नकारात्मक विचारांमुळे निराशा येईल. जलाशय धोकादायक ठरू शकतात. नोकरीत स्त्री वर्गापासून जपून राहा.
कन्या
विचार न करता साहस करण्यापासून सावधानतेचा इशारा श्रीगणेश देतात. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. भाऊ- बहिणींशी ताळमेळ जुळेल. मित्र आणि स्नेह्यांशी संवाद घडतील. गूढ, रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. आणि त्यात सिद्धी प्राप्त होईल. विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांचा जोमाने प्रतिकार करावा लागेल.
तुळ
आज मानसिकता नकारात्मक राहील. रागाच्या भरात वाणीवर संयम राहणार नाही. त्यामुळे कुटुंबीयांशी मतभेद होतील. नाहक खर्च होईल. तब्बेत बिघडेल. मनात ग्लानी निर्माण होईल. अनैतिक प्रवृत्तीकडे न वळण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येतील.
वृश्चिक
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता वाटेल. कुटुंबातील व्यक्तींशी वागण्यात दिवस आनंदात जाईल. मित्र व स्नेही यांच्याकडून भेटवस्तू मिळतील प्रिय व्यक्तींशी सुसंवाद साधण्यात यश मिळेल. मंगल कार्याला उपस्थिती लावाल. धनलाभ आणि प्रवासाचे योग आहेत. दांपत्य जीवनात प्रसन्नता अनुभवाल.
धनू
आज रागामुळे कुटुंबातील व्यक्ती आणि इतर लोकांशी संबंध दुरावतील. आपले बोलणे व वागणे भांडणाचे कारण ठरेल. दुर्घटनेपासून जपा. आजारावर खर्च होईल. न्यायालयीन कामकाजात दक्षतेने पाऊल उचला, असे श्रीगणेश सांगतात. निरुपयोगी कामांवर आपली ताकत खर्ची पडेल.
मकर
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तींशी मुलाखत रोमांचक बनेल. विवाहोत्सुक व्यक्तींच्या समस्या किरकोळ प्रयत्नांनी सुटतील. व्यापार्यांना धंद्यात आणि नोकरदारांसाठी नोकरीत उत्पन्न वाढेल. गृहस्थीजीवनात आनंद राहील. नव्या वस्तूंची खरेदी होईल.
कुंभ
प्रत्येक काम सरळपणे होईल आणि त्यात यश मिळेल. नोकरी- व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सरकारी कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील. वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतील. तब्बेत चांगली राहील. मानसिक उत्साह जाणवेल. बढतीचे आणि धनप्राप्तीचे योग आहेत. गृहस्थीजीवन आनंदी राहील आणि मानप्रतिष्ठा वाढेल.
मीन
भीती आणि उद्विग्नता यातून दिवसाची सुरुवात होईल. शरीरात आळस आणि थकवा जाणवेल. कोणतेच काम पूर्ण न झाल्याने निराशा पैदा होईल. नशिबाची साथ नाही असे वाटेल. कार्यालयात अधिकारी वर्गाशी काम करताना जपून वागण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. संतती हे आजच्या चिंतेचे कारण राहील. अकारण पैसा खर्च होईल.
जनआर्शिवादयात्रेत भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पंकजाताई मुंडे कार्यकर्त्यांनवर रागावल्या.
बीड (प्रतिनीधी) भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे या आपल्या कार्यकर्त्यांवर भडकल्या आहेत. पंकजा मुंडे जनआशीर्वाद यात्रेसाठी उपस्थित होत्या, त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, यातील काही घोषणा ऐकून पंकजा मुंडे खूप रागावल्या. पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है, या घोषणेवर पंकजा मुंडे यांनी थेट बाहेर येऊन कार्यकर्त्यांना इशारा दिला.
अशा अंगार भंगार सारख्या गलिच्छ घोषणा कुणी देत असेल, तर मी त्याला आयुष्यात भेटणार नाही, मुर्ख कुठले, तुमच्या अशा वागण्याने त्रास होतो, अशांना मी कधीच भेटणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
Monday, August 16, 2021
श्रावणी रामेश्वर कोकाटे हीचा वाढदिवस साजरा .
संगम ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच वच्छलाबाई कोकाटे यांच्या हास्ते ध्वजारोहन संपन्न.
माऊली पंढरीनाथ मुंडे यांचा संगम ग्रामस्थांच्या वतीने सत्कार.
Sunday, August 15, 2021
परळीचा हिरा सौरभ नावंदे दिल्लीत राष्ट्रीय युवा पुरष्काराने सन्मानित.
Saturday, August 14, 2021
बीड जिल्ह्यातील दुकाने आता रात्री 10 पर्यंत सुरू राहणार.जिल्हधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे नवीन आदेश.

बीड ( प्रतिनिधी ) ब्रेक द चैन अंतर्गत जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी आज नवीन आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील दुकाने रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. सदर आदेशाची दि.15 ऑगस्ट पासून अंमलबजावणी होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आजच्या आदेशात म्हटले आहे की,
उपहारगृहे खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने खालील अटीच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे .
i ) उपहारगृह / वारमध्ये प्रवेश करताना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहिल क्याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहिल ,
ii ) उपहारगृह बारमध्ये काम करणार आचारी , वालपे , व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचान्यांसह सर्व कर्मचान्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पुर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह / चारमध्ये काम करू शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहिल . ml ) वातानुकूलित उपहारगृहाबार असल्यास , वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहिल .iv ) प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहिल . 1 ) उपहारगृह बारमध्ये विहित शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी . vi ) उपहारगृह ) बारमध्ये निजतुकीकरणाची तसेच सनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहिल उपरोक्तनुसार उपहारगृहे / यार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री १०.०० वा . पर्यंत मुभा देण्यात येत आहे . DISTRIC S COM उपहारगृह / वारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री ९ .०० वाजेपर्यंत घ्यावी . मात्र पार्सल सेवा २४ तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .
2. दुकाने - जिल्हयातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री १०.०० वा . पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन कर्मचान्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल.
3.शॉपिंग मॉल जिल्हयातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १०.०० वा . पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . तथापि , शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणान्या सर्व नागरिकांचेही कोबिड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील .
4. जिम्नॅशिअम , योगसेंटर , सलून - स्या वातानुकुलित तसेच विनावातानुकूलित जिम्नॅशिअम , योगसेंटर , सलून स्मा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १०.०० वा . पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . तथापि , उक्त संस्था वातानुकूलीत असल्यास , वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील .
5. इनडोअर स्पोटर्स - इनडोअर स्पोटर्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोबिड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवस झालेले असणे आवश्यक राहील तसेच , या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील . या ठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन , टेबलटेनिस , स्क्वंश , पैरलल बार , मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे .
6. कार्यालय / ओद्योगिक / सेवा विषयक आस्थापना - सर्व शासकीय / निमशासकीय आस्थापनाचे कर्मचारी , बैंक कर्मचारी , रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पूर्ण करण्यात यावे , ii . ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचान्यांचे व व्यवस्थापनाचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे ज्या आस्थापना वरील कर्मचान्यांना धरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनाच्या व्यवस्थापनानी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी कार्यालयात काम करणे आवश्यक असल्यास कर्मचान्यांच्या गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे . तसेच खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या २५ टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील .
7. जिल्हयातील सर्व मैदाने , उद्याने , स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील . iii . 63 1 . ii . iii . iv . LECT 8. विवाह सोहळे खुल्या प्रांगणातील / लॉन वरील किया बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण / लॉन मंगल कार्यालय / हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोथिंड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पानन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे . खुल्या प्रांगण / लॉन मध्ये होणान्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किया लॉन क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल , बंदिस्त मंगल कार्यालय / हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादित असेल . मात्र कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी विडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्याला तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक राहिल्न , या निबंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल / कार्यालयावर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल . मंगल कार्यालय / हॉटेल / लॉन व्यवस्थापन / भोजन व्यवस्थापन / बैंडपथक / भटजी / फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधीत सर्व सलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील .
9. सिनेमागृहे ब मल्टिप्लेक्स - जिल्हयातील सिनेमागृह / नाट्यगृह , मल्टिप्लेक्स ( स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील .
10. धार्मिक स्थळे जिल्हयातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील .
11. आंतरराज्य प्रवास - ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना , बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल , अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पुर्वाची आरटीपीसीआर चाचणी निगेटीक किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहिल . V. तसेच मो SANCE OF
12 कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे . यास्तव गर्दी / जमाव टाळण्यासाठी वाढदिवस , राजकीय , धार्मिक , सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम , निवडणूक प्रचार सभा , रॅली . मार्च , इ . बरील निबंध कायम राहतील ,
13. मेडीकल ऑक्सीजनधी उपलब्धता मर्यादीत असल्याने , जर राज्यातील रुग्णसंख्या वाढल्यास व कोवीड रुग्णांच्या उपचारासाठी प्रतिदिन 700 मे . टन किंवा त्यापेक्षा जास्त ऑक्सीजन लागत असल्यास संपूर्ण राज्य शासनाकडुन जिल्हयात तात्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करून त्यानुसार कठोर निबंध लागू करण्यात येतील .
14. जिल्हयातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की , मास्कचा वापर हातांची स्वच्छता , शारिरीक अंतराचे पालन , इतरत्र थुकण्यास प्रतिबंध , इ . सर्व निबंधाचे पालन करणे अनिवार्य राहिल .
*सदैव स्मरणात आदरणीय तुपरे गुरूजी*
Friday, August 13, 2021
खा.सुप्रियाताई सुळे व मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानांच्या मशीन)चे होणार वाटप ; शिबीरास उपस्थित राहावे- डॉ. संतोष मुंडे
Thursday, August 12, 2021
बीड जिल्ह्यातील पाचशे ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक आणि बीडीओ ना नोटीस !!

बीड – पंचायत समिती मध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची उचलबांगडी थेट न्यायालयाने केल्यानंतर प्रशासन जागे झाले .बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील तब्बल पाचशे ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत .एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटिसा बजवल्याने खळबळ उडाली आहे .
बीड जिल्ह्यात परळी,बीड,अंबाजोगाई, केज,माजलगाव, वडवणी, शिरूर,धारूर,गेवराई, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यात 2010 ते 2020 या दहा वर्षात जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या पाचशेहून अधिक ग्रामसेवक ग्रामरोजगार सेवकांना त्या त्या तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. यात संबंधित ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरप्रकाराचा उल्लेख असून त्यावर तात्काळ खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या नरेगाच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यासोबतच ज्या कामाच्या ऑडिटनंतर काम नियमबाह्य झाले असल्याचे पुढे आले होते. त्याच ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवक तसेच रोजगार सेवकांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस दिल्या आहेत यानंतर या नोटिशीला तीन दिवसात उत्तर मागितले आहेत.
नरेगाच्या कामामध्ये घोटाळ्याच्या तक्रारी होणे ही काही नवी बाब नाही मात्र या संदर्भामध्ये प्रशासनाकडून वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही म्हणूनच अखेर राजकुमार देशमुख यांनी यासंदर्भात न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. विशेष म्हणजे याच कामात तपासणीत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची बदली करा असा आदेश काढला होता.
बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यात म्हणजे गेवराई, आष्टी, पाटोदा,शिरूर,केज, धारूर, माजलगाव, अंबाजोगाई, परळी आणि वडवणी या अकरा ही तालुक्यातील पंचायत समिती मार्फत या ग्रामपंचायत सरपंच ग्राम रोजगार सेवक आणि ग्रामसेवकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याची की पहिलीच वेळ असावी.