* शहरातील सर्वच बँकेच्या एटीएमला सुरक्षा प्रदान करा.ग्राहकांची मागणी.
परळी वैजनाथ (प्रतिनीधी) नाथ चित्रपट मंदिर समोरील एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला असुन तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे हि नुकसान केल्याची घटना घडली आहे
या घटनेने एटीएमची सुरक्षा रामभरोसे असल्याचे सिद्ध झाले असुन या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावे अशी मागणी जनतेतुन
होत आहे.शहरातील नाथ चित्र मंदिर समोर एस बी आय स्टेट बँकेचे एटीएम मशिन आहे. हे एटीएमचे मशीन फोडण्याचा प्रयत्न चोरट्या कडुन काल मध्यरात्री करण्यात आला असून एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरेची तोडफोड करण्यात आली आहे.
शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून आर्थिक नुकसान नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी परस्पर वर्तविला अाहे. सदरची घटना मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचा अंदाज असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे याचा मागोवा घेतला जात आहे. घटनास्थळी परळी शहर पोलिस चे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सपोनि अशोक खरात, पीएसआय मोहन जाधव, भताने, घटमल इतर कर्मचार्यांनी धाव घेतली.
मात्र एसबीआयच्या एटीएम मशिनची सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणिवर
आला असुन या एटीएम मशिनच्या सुरक्षेसाठी एसबीआयने आता तरी सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी बँकेचा एटीएमने व्यवहार करणाऱ्या ग्राहकाकडुन होत आहे.
No comments:
Post a Comment