परळी वैजनाथ (प्रतिनिधी) covID-19 च्या या विकट परिस्थितीमध्ये चला सकारात्मक ऊर्जेने स्वत:ला पोषित करूया सर्वश्री आशुतोष महाराज जी द्वारा संस्थापित व संचालित दिव्य ज्योति जाग्रति संस्थान (डीजेजेएस) श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव-२०२१च्या निमित्ताने संभवामि युगे युगे या विषयावर आधारित एक विशेष सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. कार्यक्रमाचे प्रिमियर डीजेजेएस यूटयूब (Youtube) २९ आणि ३० ऑगस्ट २०२१ ला दोन भागामध्ये केले जाईल. भाग-१ २९ ऑगस्टला सकाळी १० ते ११.३० आणि रात्रि ९ ते १०.३० वा, भाग-२ ३० ऑगस्ट २०२१ ला सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत सोबतच जन्माष्टमीच्या रात्रि ९ ते १२ वाजे पर्यंत संपुर्ण कार्यक्रम प्रस्तुत केला जाणार आहे. ज्याचे समापन भगवान श्रीकृष्णांच्या भव्य आरतीने केले जाईल.
डीजेजेएस जन्माष्टमी महोत्सव विशेषातीविशेष आहे. कारण हा कार्यक्रम केवळ भगवान श्रीकृष्णांची मटकी फोड लीला व भजन संकीर्तन या पुरतीच सीमित नसुन रोमांचकारी नृत्य-नाटिका संगीतमय प्रस्तुती व ज्ञानवर्धक आध्यात्मिक प्रवचनांचा अद्वितीय संगम आहे. दिव्य गुरू श्री आशुतोष महाराज जींच्या ब्रम्हज्ञानी शिष्यांद्वारा प्रस्तुत नृत्य-नाटिका, ज्या आपल्याला पुन्हा द्वापर युगात घेऊन जातील तर दुसरीकडे गुरूदेवांच्या ब्रम्हज्ञानी संन्यासी शिष्यांद्वारा आध्यात्मिक प्रवचन आपल्याला श्रीकृष्ण लीलांमध्ये निहित शाश्वत ज्ञानाची आजच्या सामाजिक परिवेशामध्ये जी उपयोगिता आहे त्याच्याशी परिचित करवुन देतील.
दिव्य ज्योति जाग्रति संस्थान गेल्या तीन दशकांपासून दरवर्षी हा महोत्सव केवळ मात्र बाह्य
स्वरूपामध्येच नाही तर त्यामध्ये निहित वास्तविक भावनेनेच साजरा करीत आहे. या भव्य आयोजनामध्ये लाखो दर्शक सम्मिलित होतात. डीजेजेएस च्या प्रतिनिधींनी सांगितले की भगवान श्रीकृष्णांप्रति समाजामध्ये व्याप्त मिथ्या धारणा आणि भ्रामक कल्पनांना दूर करने व श्रीमद् भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांद्वारा दिल्या गेलेले आध्यात्मिक प्रयोगात्मक विज्ञान - ब्रम्हज्ञानाशी लोकांना परिचित करण्याच्या उद्देशाने गुरूदेव सर्वश्री आशुतोष महाराज जींनी स्वत: या कार्यक्रमाला आकारा दिला आहे.
विषय संभवामि युगे युगे श्रीमद् भागवत गीतेमध्ये वर्णीत सज्जानांचे कल्याण व दुष्टांच्या विनाशा करिता पृथ्वीवर ईश्वर अवतरणाच्या सार्वभौमिक उद्घोषणेवर आधारित आहे. हा कार्यक्रम अवतार वादाच्या विभिन्न पैलुंवर चर्चा करेल आणि सोबतच श्रीमद् भागवत गीतेचे सार मानव समाजाला अवगत करवून त्यांना ईश्वरीय साक्षात्काराकरिता प्रेरित करेल. दिव्य ज्योति जाग्रति संस्थानच्या विभिन्न कार्यक्रमाच्या विलक्षणतेमध्ये जी प्रमुख विशेषता आहे ती म्हणजे स्वयंसेवेची भावना (सेवाभाव) हा भव्य कार्यक्रम नाव, प्रसिध्दी आणि धन प्राप्तीच्या इच्छेने प्रेरित प्रशिक्षित कलाकारांद्वारा नाही तर श्री आशुतोष महाराजजींचे निस्वार्थी व ब्रम्हज्ञानी युवा शिष्यांद्वारा प्रस्तुत केला जाणार आहे. जो केवळ मात्र एकाच भावनेने प्रेरित आहे आणि ती भावना आहे, आपल्या गुरूदेवांच्या श्री चरणांमध्ये सेवा अर्पित करणे, हे आयोजन कोणत्या विशेष वयोगटासाठी सीमित नसुन हा कार्यक्रम प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. हा एक असा कार्यक्रम आहे जो आपण आपल्या परिवारावोबत बघु शकता आणि जीवनोपयोगी गुट आध्यात्मिक शिक्षा प्राप्त करू शकतो. या भव्य कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी डीजेजेएस युट्यूब (Youtube) चैनल www.youtube.com/djisworld ला लगेच सब्सक्राइब करा.
No comments:
Post a Comment