परळी वैजनाथ (प्रतिनिधी) युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे घेण्यात येणार्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी सौरभ सुभाष नावंदे यांची निवड करण्यात आली आहे. सौरभ नावंदे परचुंडी ता.परळी वैजनाथचे रहिवाशी आहेत.
सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी सुभाष नावंदे व औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदेे यांचा मुलगा सौरभ नावंदे यांना 2017-18 वर्षासाठीचा राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे 12 ऑगस्ट रोजी विज्ञान भवन येथे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. सौरभ नावंदे हा तरूण मागील अनेक वर्षापासून युवा क्षेत्रात काम करीत असून यापूर्वीही त्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ब्रिगेडीअर सुंदर सिंह यांनी नव्या पुरस्काराची आज घोषणा केली आहे. सौरभ नावंदे यांचे कनिष्ठ बंधू सर्वेश सुभाष नावंदे यांनाही यापूर्वी एअर विंग बेस्ट कॅडेट सिनियर गोल्ड मेडल पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला असून युवा क्रिकेटपटू भूषण नावंदे यांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा क्रिकेटर म्हणून इंग्लंड कौंटी क्रिकेट खेळण्याचा बहुमान प्राप्त आहे. सौरभ नावंदे हा निवृत्त क्रीडा अधिकारी सुभाष नावंदे यांचा मुलगा तसेच प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे व परळी येथील संगम जि.प.शाळेचे मुख्याध्यापक अशोक नावंदे यांचा पुतण्या आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment