Friday, December 31, 2021

भाजपा युवा मोर्चाच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी चंद्रकांत देवकते यांची निवड.


* पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र .

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यात मोठा जनसंपर्क असलेले धडाडीचे कार्यकर्ते चंद्रकांत देवकते यांची भाजपा युवा मोर्चाच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी नियुक्ती पत्र देऊन देवकते यांचा सत्कार केला. या निवडीबद्दल देवकते यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
        वडखेलचे माजी सरपंच म्हणून देवकते यांनी उत्कृष्ट काम केले आहे. भाजपमध्येही गेल्या अनेक वर्षापासून ते सक्रीय आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांचा शहरी आणि ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.
        चंद्रकांत देवकते यांच्या निवडीबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
      दरम्यान आपण पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असुन त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवू असे प्रतिपादन चंद्रकांत देवकते यांनी केले आहे.

परळीत जुगार अड्यावर पंकज कुमावत यांच्या पथकाचा छापा मटका घेणारे बुकी एजंटसह 114 आरोपीवर गुन्हा दाखल.



बीड (प्रतिनिधी) परळी शहरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घालत तब्बल सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी केलेल्या या कारवाईत जवळपास 114 आरोपींवर गुन्हा दाखल केला असून वीस आरोपींना अटक केली आहे .

गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील अवैध धंद्यावर छापे घालून धाक निर्माण केलेल्या सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना मिळालेल्या बातमीनुसार परळी शहरातील हनुमान नगर येथे पत्र्याच्या शेड मध्ये गुजराचा अड्डा सुरू होता.या ठिकाणी पोलिसांनी छापा घातला तेव्हा आरोपी नामे विलास पावडे, सुरेश तरडे ,बालासाहेब मुंडे ,संतोष साळुंके ,राम बदने,प्रल्हाद काळे, प्रेमचंद आव्हाड यांनी काही इसम हनुमान नगर परळी येथेशिवाजी जाधव यांचे पत्र्याचे सेड मधील रूम मध्ये काही इसम एकत्र बसून जुगाराचा अड्डा तयार करून त्यामध्ये कल्याण मटका, मधूर नाईट व मधूर डे जुगाराचे आकडे मोबाईलवर घेऊन जुगाराच्या पट्ट्या छाटीत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी रात्री साडेनऊ वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी 20 इसम जागीच मिळून आले त्यांचे ताब्यात नगदी व कल्याण मटका, मधूर डे मधूर नाईट मटका जुगाराचे साहित्य असा एकूण 1लाख 13310 रुपयांचा मुद्देमाल नगदी व मोबाईल , साहित्य मिळून आले वरील आरोपीचे मोबाईलवर आकडे देणाऱ्या इसमांची माहिती घेऊन नावे निष्पन्न करून एजंट बुक्की मालक असे एकूण एकूण 114 आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे परळी शहर येते कलम 4, 12 अ महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे

Thursday, December 30, 2021

रेमडीसविर इंजेक्शनचा काळाबाजार जिल्ह्यात वापरलेल्या रेमडीसविर ची माहिती पोलिसांनी मागवली !



जिल्ह्यात वापरलेल्या रेमडीसविर ची माहिती पोलिसांनी मागवली !

बीड -(प्रतिनिधी) जिल्ह्यात मार्च ते जून 2021 या काळात किती रुग्णांना रेमडीसविर इंजेक्शन देण्यात आले.ते कोठून उपलब्ध केले गेले,कोणत्या डॉक्टर ने सांगितले होते यासह इतर माहिती तातडीने उपलब्ध करून देण्याचे फर्मान पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांना दिल्याने इंजेक्शन चा काळाबाजार करणाऱ्या एसीएस राठोड सह खाजगी डॉक्टर लोकांचे धाबे दणाणले आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली असताना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली होती.त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय आणि कोविड केयर सेंटर आणि खाजगी रुग्णालयात देखील कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली होती.

खाजगी रुग्णालयात रेमडीसविर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा रुग्णालयाची होती.मात्र मोठ्या प्रमाणात रेमडीसविर चा काळाबाजार झाला. विशेषतः या सगळ्यामध्ये एसीएस डॉ सुखदेव राठोड यांच्यासह स्टोर किपर अजिनाथ मुंडे,गणेश बांगर,रियाज आणि नितीन चव्हाण यांच्यावर आरोप झाले.

या सगळ्यांवर पोलिसात तक्रार देखील झाली.पोलिसांनी अनेकवेळा चालढकल केल्यानंतर अखेर या लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले.हेडक्वार्टर न सोडण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान आता जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात मार्च ते जून 2021 दरम्यान किती रुग्ण ऍडमिट होते.आणि त्यातील किती रुग्णांना रेमडीसविर इंजेक्शन देण्यात आले.त्यानी ते कोठून उपलब्ध केले या बाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी पोलिसांनी केली आहे.

पत्रकारांसाठी 1 जानेवारी रोजी बारकुल हॉस्पिटल येथे मोफत हृदयरोग तपासणी .

बीड (प्रतिनिधी) ;- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 1 जानेवारी रोजी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.अनिल बारकुल सर यांच्या हॉस्पिटल मध्ये पत्रकारांसाठी विनामूल्य हृदयरोग तपासणी आणि बीपी, शुगर तपासणी करण्यात येणार आहे. या आरोग्य सुविधेचा लाभ पत्रकारांनी घ्यावा असे आवाहन पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या नेतृत्वाखाली दर्पणदिनाचे औचित्य साधून पत्रकार संघाच्या माध्यमातून यावर्षी आरोग्यावर दर्पण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  सद्यस्थितीत हार्ट संदर्भात अनेक समस्या निर्माण होत आहेत. मानसिक दडपण, आर्थिक ताण, अवाजवी काम, अवेळी जेवण, अति जागरण आदी प्रकाराने हार्ट संदर्भातील समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर बीपी आणि शुगर याचे रुग्ण देखील मोठ्या संख्येने वाढत आहेत. या व्याधीने पत्रकारांना भविष्यात ग्रासले जाऊ नये, त्यांना योग्य वेळी, योग्य मार्गदर्शन आणि वेळीच उपचार व्हावेत या उद्देशाने बीड शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिल बारकुल हे स्वतः पत्रकारांसाठी विनामूल्य तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय बीपी आणि शुगर देखील विनामूल्य तपासण्यात येणार आहे. सदरील विनामूल्य हार्ट संदर्भातील तपासणी, ईसीजी, बी पी, शुगर विनामूल्य तपासणी फक्त पत्रकारांसाठी असून शनिवार दिनांक 1 जानेवारी रोजी सकाळी 10.30 ते 12.30 या दरम्यानच सदरील मोफत तपासणी शिबिर पत्रकार संघाच्या पुढाकारातून आयोजित केलेली आहे. वेळेच्या नंतर आलेल्या पत्रकारांना या संधीचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ बीड जिल्ह्यातील पत्रकारांनी 1 जानेवारी रोजी नियमित दिलेल्या वेळेतच घ्यावा असे आवाहन पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.


'' सोमवारी मोफत नेत्ररोग तपासणी
स्वर्गीय झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमसेठ खटोड यांच्या पुढाकारातून आनंदऋषीजी नेत्रालय, व्हिजन सेंटर, जालना रोड, बीड. येथे सोमवार दिनांक 3 जानेवारी रोजी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी विनामूल्य नेत्र तपासणी शिबिर पत्रकार संघाच्या पुढाकारातून आयोजित केले आहे. या तपासणीमध्ये जर कोणास चष्मा लागला तर अत्यल्प दरामध्ये त्यांना चष्मा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याच बरोबर जर डोळ्या संदर्भात कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज पडली तर ती देखील अत्यल्प दरामध्ये योग्य त्या ठिकाणी उपचार करून देण्यासाठी पत्रकार संघ पुढाकार घेणार आहे.,,

रणरागीनी ग्रामीण विकास पत्रकार संघाचा दामिनी पत्रकार भुषण पुरस्कार सौ.वर्षा मगर यांना जाहीर .


परळी वैजनाथ ;- परळी येथील कांतीकारी साथी च्या मुख्यसंपादक सौ.वर्षा मगर यांना रणरागीनी ग्रामीण विकास पत्रकार संघ (वाकोडी ) अकोले च्या वतिने देण्यात येणारा  यावर्षीचा दामिनी पत्रकार भुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
रणरागीनी ग्रामीण विकास पत्रकार संघ गेल्या तीन वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रातील पत्रकारांच्या कार्याचा सर्वे करून या पुरस्काराची निवड करत असते यावेळी या पुरस्कारासाठी कांतीकारी साथीच्या मुख्यसंपादक सौ.वर्षा मगर यांची निवड केली आहे
गेल्या आठ वर्षापासून निर्भिड नि;पक्ष पत्रकारीता व विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सौ.वर्षा मगर यांच्या कार्याची  दखल घेत रणरागीनी ग्रामीण विकास पत्रकार संघाने त्यांची निवड केली आहे.
सौ.वर्षा हनुमंत मगर यांना यापुर्वी ही जिजाऊ रत्न पुरस्कार शिवप्रेरणा पुरस्कार , सावित्रीबाई फुले आदर्श महिला पुरस्कार मिळालेले आहेत.पत्रकारीतेतील विशेष कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन 6 जानेवारी रोजी दर्पण दिनी विशेष कार्यक्रमात विशेष मान्यवरांच्या हास्ते सन्मानीत करण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतिने सांगण्यात आले.

Wednesday, December 29, 2021

भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जागेत जुगार अड्डा. 47 आरोपी,आलिशान गाड्या, मोबाईल जप्त.



बीड - (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीच्या जागेवर सुरू असलेल्या पत्याच्या आलिशान क्लबवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घातला.तब्बल 47 आरोपींसह कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या तत्कालीन जिल्हाप्रमुख चे नाव गुटखा तस्करी मध्ये आले होते,आता भाजप जिल्हाध्यक्ष यांच्या जागेत सुरू असलेल्या पत्याच्या क्लबवर धाड पडल्याने उडदा माजी काळे गोरे काय निवडावे निवडणारे अस म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.

बीड शहरापासून जवळ असलेल्या चराटा रोडवर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीच्या जागेत आलिशान असा पत्याचा क्लब सुरू असल्याची माहिती गुप्त बतमीदाराकडून पोलिसांना मिळाली.गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील गुटखा,मटका,वाळू चे धंदे करणारे पंकज कुमावत यांनी आपल्या पथकासह या ठिकाणी रात्री उशिरा छापा घातला.

यावेळी तब्बल 47 जुगारी या ठिकाणी जुगार खेळताना आढळून आले.प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी 25 ते 30 चारचाकी आलिशान गाड्या मिळून आल्या.फॉरचूनर, इंडिव्हर,स्कार्पिओ अशा गाड्या,महागडे मोबाईल या कारवाईत पोलिसांनी जप्त केले.

एसकोर्ट क्लब या नावाने येथे सावंत आणि घोडके नावाचे लोक हा क्लब चालवत होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही जागा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीची आहे.पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

जागा मालक असलेले मस्के यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर देखील पंकज कुमावत यांनी गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर सेनेच्या प्रमुखांनी खांडे यांच्या पदाला स्थगिती दिली होती.आता भाजप जिल्हाध्यक्षाच्या जागेत सुरू असलेला जुगार अड्डा उद्धवस्त झाल्याने त्यांचे पक्षश्रेष्ठी काही कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tuesday, December 28, 2021

बीड जिल्हा रुग्णालयावर प्रशासनाची वचक राहिली नाही. पुन्हा रुग्णालायातील ब्रदरला मारहाण.




बीड- बीड जिल्हा रुग्णालयात डॉक्टर आणि स्टाफ यांना मारहाणीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.चार दिवसांपूर्वी ब्रदर ला मारहाणीचा प्रकार ताजा असतानाच सोमवारी रात्री पुन्हा एकदा दुसऱ्या ब्रदर ला मारहाण झाली आहे.जिल्हा रुग्णालयात नोकरीवर असलेले सुरक्षा रक्षक आणि पोलीस काय बघ्याची भूमिका घेतात का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

बीड जिल्हा रुग्णालय म्हणजे कोणीही यावे अन दादागिरी करून जावे असा प्रकार झाला आहे.जिल्हा रुग्णालयात प्रशासन कार्यरत आहे की नाही असा प्रश्न पडावा अशा घटना वारंवार घडत आहेत.जिल्हा रुग्णालयात गेल्या महिनाभरात ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची तिसरी घटना सोमवारी घडली.

चार दिवसांपूर्वी प्रशांत सुकाळे या ब्रदर ला संतोष थोरात आणि सात ते आठ जणांनी मारहाण केली होती.त्यानंतर सोमवारी ड्युटीवर असलेले ब्रदर विश्वंभर अरसुले यांना कोतवाल गल्ली भागातील एक रुग्ण ज्याच्या हाताला गंभीर जखम झाली होती त्याने व त्याच्या मित्राने मारहाण केली.

जिल्हा रुग्णालयात एका खाजगी सुरक्षा रक्षक कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.या कंपनीने नियुक्त केलेले रक्षक हे सीएस किंवा एसीएस यांचा राउंड असला की पुढे पुढे करतात,नंतर मात्र चहापाणी अन टपरीवर दिसतात.तर आवारात असलेल्या पोलीस चौकीतील पोलीस नेमके कुठे असतात हे त्यांनाच माहीत.

एका महिन्यात तीन तीन कर्मचाऱ्यांना मारहाणीचा प्रकार घडल्यावर सुद्धा सीएस डॉ सुरेश साबळे का गप्प आहेत हे न उलगडणारे कोडे आहे.त्यांच्यावर नेमका कोणाचा दबाव आहे का हे देखील कळायला मार्ग नाही.एकूणच जिल्हा रुग्णालयात मारहाणीचे वाढते प्रकार पाहता प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे.

बीड जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या सहा नगर परिषदेवर प्रशासक नियुक्त केले जाणार.


बीड जिल्ह्यातील. बीड, अंबाजोगाई, माजलगाव, परळी, गेवराई व धारूर या मुदत संपणाऱ्या सहा नगर परिषदेसाठी आता प्रशासक नियुक्त केले जाणार आहेत.यामुळे नगरपरिषद निवडणूक लढवण्यासाठी आतुर झालेल्या इच्छुकांना आता आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.
 
नगर परिषद निवडणूक प्रक्रिया आगामी दोन, तीन महिन्यात पार पडणार होती, मात्र पुन्हा एकदा जगभर पसरलेल्या साथरोग कोव्हिड-19 च्या राज्यात झालेल्या संक्रमनामुळे सार्वत्रिक निवडणुकांसाठीची प्रकिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याचे तसेच मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही वेळ लागणार असल्याचे स्पष्ट करत मुदत संपल्यानंतर संबंधित स्थानिक संस्थांमध्ये प्रशासक नियुक्त करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
 
 या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने 27 डिसेंबर रोजी शासन निर्णय घेत मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यातील 45 नगर परिषद व 2 नगर पंचायतची मुदत संपताच प्रशासक नेमण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, माजलगाव,परळी, गेवराई व धारूर या सहा नगर परिषदेची मुदत संपताच तिथे प्रशासक नियुक्त करावा लागणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर वर्तमानपत्रे शेअर करायला बंदी. उच्च न्यायालयाने दिले हे आदेश !



नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने व्हॉट्सअ‍ॅपला नवे निर्देश दिले आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपवर वर्तमानपत्रांच्या ऑनलाईन एडिशन अर्थात ई-वर्तमानपत्रे शेअर करणारे ग्रुप बंद करण्यात यावेत, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली होती. व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मेसेजिंग अ‍ॅपवर पोस्ट होणारा मजकूर आणि त्याची सत्यासत्यता या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीमुळे लागू होणाऱ्या निर्बंधांचीही जोरदार चर्चा झाली. त्यानंतर आता या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं व्हॉट्सअ‍ॅपला हे निर्देश दिले आहेत.

ई-वर्तमानपत्रे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर
“बेकादेशीरपणे आणि त्यासंदर्भातले अधिकार नसतानाही अशा प्रकारे ई-वर्तमानपत्रे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर करण्यास मनाई करण्यात आली आहे”, असं न्यायमूर्ती संजीव नरूला यांनी आदेशामध्ये नमूद केलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर २४ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने निर्देश दिले.

* ग्रुपची माहिती न्यायालयात

या याचिकेमध्ये एकूण ८५ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची माहिती दिलेली आहे. तसेच, याशिवाय असे अनेक ग्रुप असतील जिथे ई-वर्तमानपत्रे बेकायदेशीररीत्या शेअर केली जातात, असंही याचिकेत म्हटलं आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी २ मे २०२२ रोजी होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपला हवे होते न्यायालयाचे आदेश!
काही वर्तमानपत्रांनी यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कोणतेही अधिकार नसताना अशा प्रकारे ई-वर्तमानपत्रे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर केली जात असताना त्याविरोधात त्यांनी दाद मागितली होती. यासंदर्भात न्यायालयाचे आदेश सादर करा असं व्हॉट्सअ‍ॅपकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. वाचकांना या पद्धतीने दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करावी लागते. तसेच, वर्तमानपत्रांचा खप वाढण्यासाठी देखील ही बाब महत्त्वाची ठरते. वाचक निश्चित असे शुल्क भरून ई-वर्तमानपत्रांचं हे सबस्क्रिप्शन घेत असतात. यामध्ये वाचकांना ई-वर्तमानपत्र डाऊनलोड करण्याचा किंवा ते इतरांना पाठवण्याचा अधिकार नसतो”, असे याचिकेमध्ये नमुद केले आहे.

Sunday, November 28, 2021

एस.टी.कर्मचारी आंदोलन दोन आंदोलनकर्त्या एस टी कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली.


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्यानंतर अनेक कर्मचारी आज कामावर रुजू झाले आहेत. लाल परी पुन्हा एकदा रस्त्याने धावताना दिसून आली. असं असलं तरी अनेक कर्मचारी अजूनही शासनात विलीनीकरण करा या मागणीवर ठाम आहेत. कामावर रुजू व्हावे यासाठी कर्मचाऱ्यावर दबावतंत्राचा वापर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. या दबावतंत्राचा वापर केल्यामुळे बस चालक बबन चव्हाण वय 55 वर्षे यांचा रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापूर्वी अर्धा तास आधी शितल त्र्यंबक कांबळे( वय 35 वर्ष) नामक महिला वाहकाची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांचाही अचानक रक्तदाब वाढला गेला. त्यामुळे त्यांना चक्कर आली. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे शासन आणखी किती कर्मचाऱ्यांचे बळी घेणार आहे असा प्रश्न विचारला जाऊ लागला असून दबावतंत्राचा वापर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करू नये अशी मागणी होऊ लागली आहे.

नगर पंचायत निवडणुकीसाठी शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांचा तीन तालुक्यात दौरा.


* पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे-जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव.

नगरपंचायत निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत त्यानुसार जिल्ह्यातील पाच नगरपंचायत निवडणुका होणार आहेत यापैकी शिरुर केज आणि वडवणी या तीन तालुक्यात शिवसेना नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे दिनांक 29 नोव्हेंबर सोमवार रोजी झंझावाती दौरा करणार असून शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात व्यापक बैठका आणि चर्चा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहेत वरील निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या माध्यमातून स्वबळावर निवडणूक लढवण्या संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी विचारविनिमय होणार आहे सोमवारी सकाळी 11 वाजता शिरूर सायंकाळी 5 वाजता केज आणि रात्री 8 वाजता वडवणी असा दौरा आयोजित करण्यात आला असून सर्व तालुका व जिल्हा पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, शिरूर तालुकाप्रमुख किरण चव्हाण,केज तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे,वडवणी तालुकाप्रमुख संदीप माने यांनी केले आहे

आजचे राशीभविष्य काय आहे, जाणून घ्या.कसा असेल आजचा दिवस.


मेष:-

आनंदी भावना वाढीस लागेल. धार्मिक कार्यात सहकार्य कराल. व्यवसायात नवीन बादल होतील. त्याचा नंतर फायदा मिळेल. आरोग्य बाबत जागरूक रहा.


वृषभ:-

कामात क्षुल्लक अडचणी येतील.नोकरवर्गा कडे लक्ष ठेवा. कौटुंबिक बाबतीत चालढकल करू नका. शेजारी सहकार्य करतील. सकारात्मक विचार करा.


मिथुन:-

जुनी कामे पूर्ण होतील. नवी गुंतवणूक कराल. कौटुंबिक दुरावा वाढू शकतो. वाहन विषयक अडचणी येऊ शकतात. घाई घाईने निर्णय घेऊ नका.


कर्क:-

अध्यात्माविषयी ओढ वाढेल. भौतिक सुखसोयी वाढतील. विवेक बुद्धीने कामे करा. इतरांच्या उणिवा काढू नका. अभिमान वाढू शकतो.


सिंह:-

मौल्यवान गोष्टी पासून लाभ होईल. गरीबांना मदत कराल. लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. कार्य क्षमतेत वाढा होईल. अध्यात्मात रस घ्याल.


कन्या:-

तुमचा प्रभाव वाढेल. दिवस मनाप्रमाणे घालवाल. अनावश्यक खर्चा सामोरे येतील. मनाला येईल तसे वागाल.. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

तूळ:-

मेहनतीमुळे तब्येत नरम राहील. चार चौघात संयमाने वागाल.. कुटुंबाकडून चांगली बातमी मिळेल. तुमच्या जबाबदारीत वाढ होईल. लोक तुमचे कौतुक करतील.


वृश्चिक:-

आजचा दिवस संमिश्र आहे. पोटाच्या तक्रारी जाणवतील. अनावश्यक खर्च होतील. त्यामुळे मन खट्टू होईल. मंगल कार्यालयात सहभाग घ्याल.


धनू:-

सामाजिक उपक्रमात वेळ घालवाल. भौतिक गोष्टीत फार अडकू नका. मन जवळच्या माणसापाशी मोकळे करा. आरोग्याकडे लक्ष ठेवा. रखडलेले पैसे मिळतील.


मकर:-

स्वत:चे निर्णय क्षमता वापरा. सामाजिक वादात अडकू नका. खर्च फायदेशीर ठरेल. परोपकाराची भावना जोपासाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.


कुंभा:-

नवीन संकल्प कराल. आध्यात्मिक आवड जोपासाल. घरात तुमच्या आमचे कौतुक होईल. कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. आवडते छंद जोपासाल.


मीन:-

नसत्या चिंता करू नका. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. बढतीसाठी प्रयत्न करा. बोलण्यातून प्रभाव पाडाल. नातेवाईकांची गाठ पडेल

नविन कोरोना व्हयरस व्हेरिएंटमुळे राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता.


मुंबई (प्रतिनिधी ) दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे एकच खळबळ माजली आहे.

जगातले सर्वच देश सतर्क झालेत. कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग वाढू नये यासाठी कडक पावलं उचलण्यात येत आहेत. महाराष्ट्रातही सरकारनं नवीन नियमावली जारी केली आहे. राज्यातलं सरकारही सतर्क झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतून सुरु असणाऱ्या विमान सेवेवर बंद घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यामुळे आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातल्या कोरोना परिस्थितीवर तसंच नव्या व्हेरिएंटमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतील. या बैठकीस राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित असतील.

Saturday, November 27, 2021

वैजनाथ मंदिर धमकी प्रकरणी दोन आरोपींना अखेर अटक.


परळी वैजनाथ ;- वैद्यनाथ मंदिर  विश्वस्त कमीटीस आलेल्या ५० लाख खंडणी  धमकीच्या प्रकारचा पोलिसांनी कसून तपास केला. शनिवारी बीड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली. श्वानपथकही बोलावण्यात आले होते. पत्रात उल्लेख असलेल्या नावाबाबत पोलिसांनी नांदेड येथे जाऊन दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. एक व्यक्ती विमा प्रतिनिधी असून एकजण बांधकाम व्यावसायिक आहे. दहशतवाद विरोधी पथकाने त्या आरोपींची चौकशी केली असता आमच्यासोबत खोडसाळपणा केला गेला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुढील दोन दिवसांत आमची कोर्टाची तारीख असून, त्यांच्याशी वाद चालू आहे त्याच व्यक्तींनी आमच्या नावाचा वापर करून पत्र लिहिले असल्याचा आरोपही ताब्यात घेतलेल्या दोघांनी केला आहे. ताब्यात घेतलेल्या लोकांकडून अधिकची माहिती घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

संविधानामुळेच महिला प्रत्येक क्षेत्रात आपले आस्तित्व निर्माण करू शकल्या.स्वातंत्र्य,हक्क आबाधित ठेवु शकल्या. - सौ.वर्षा मगर

 

परळी वैजनाथ ;- येथील कांतीकारी साथी,आईसाहेब जिजाबाई  सेवा संस्था,व जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या वतिने संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .भारत सरकारने 2015 पासून सर्व सामान्य लोकांना संविधानाचे महत्व समजण्याच्या हेतूने संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ असून त्याच्या माध्यमातून सर्व भारतीय जनतेस अमूल्य असे अधिकार प्रदान केले असून या दिवसाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीत केलेल्या योगदानाची आठवण करण्यासाठी स्मरण करण्यासाठी कांतीकारी साथी, आईसाहेब जिजाबाई सेवा संस्था,व जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या वतीने दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन आभिवादन करण्यात आले . व संविधान प्रास्तविकेचे वाचन करण्यात आले.यावेळी कांतीकारी साथीच्या मुख्यसंपादक. आईसाहेब जिजाबाई सेवा संस्थेच्या अध्यक्षा जय महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षा सौ.वर्षा मगर महिलाना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.यावेळी झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व सभासद संघटनेच्या सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

राज्यपाल, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे २६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन.


मुंबई, दि. 27 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून 13 वर्षापूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवान तसेच एनएसजी कमांडोजना आपली श्रद्धांजली वाहिली.

भावपूर्ण वातावरणात झालेल्या कार्यक्रमात पोलीस बँड तुकडीने ‘सलामी शस्त्र’ वाजविले. यावेळी सर्व मान्यवरांनी तसेच गणवेशातील अधिकारी व पोलीस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली. त्यानंतर राज्यपालांनी तेथे उपस्थित हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली.

कार्यक्रमाचे आयोजन मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले होते. यावेळी पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, पोलीस महासंचालक संजय पाण्डे व मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी देखील हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच सेवा निवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित होते.


राज्यातील २७ हजार १३८ सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर.


प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोनामुळे गेले सुमारे दीड वर्षांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. शासनाने या निवडणुकांवरील स्थगिती उठवून या निवडणुका १ सप्टेंबरपासून घेण्याबाबत शासन निर्णय जारी केला. त्यानुसार प्राधिकरणाने ३१ डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील एकूण एकूण ४५ हजार ४०९ सहकारी संस्थांचा ६ टप्प्यांचा समावेश असलेला ‘जिल्हा निवडणूक आराखडा’ तयार केलेला आहे. प्राधिकरणाने सप्टेंबरपासून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील अनुक्रमे ४ हजार ३६२ व १२ हजार ७२९ अशा एकूण १७ हजार ९१ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत.
* तिसऱ्या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांची निवडणूक

आता तिसऱ्या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन केलेले असून त्यामध्ये १८ हजार ३१० कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांचा, तर उर्वरित ८ हजार ८२८ सहकारी संस्थांमध्ये साखर कारखाने, इतर पतसंस्था, नागरी सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्या, सहकारी दूग्ध संस्था आदींचा समावेश आहे.

*१६ बँकाच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्या

प्राधिकरणाने राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी १६ बँकाच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. तर शासनाने नाशिक, नागपूर, सोलापूर, बुलढाणा आणि उस्मानाबाद अशा पाच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर असेल त्या टप्प्यावर पुढे ढकललेल्या आहेत. रायगड तसेच जालना या दोन २०२२ या वर्षात निवडणुकीस पात्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाने अद्याप सुरू केलेल्या नाहीत.

*४ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची बाब न्यायप्रविष्ठ

गोंदीया, भंडारा, चंद्रपूर या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची बाब मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. तर वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसंदर्भात उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश पारीत केलेले आहेत. याशिवाय पुणे, मुंबई, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या ४ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीची बाब न्यायप्रविष्ठ असून लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुका तातडीने घ्याव्यात असे आदेश
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकींच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल होत्या. या अनुषंगाने न्यायालयाने कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यापूर्वी राज्यातील निवडणुकीस पात्र सर्व कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुका तातडीने घ्याव्यात असे आदेश १८ नोव्हेंबर २०२१ रोजी दिले. त्यानुसार आता प्राधिकरणाने निवडणुकीस पात्र २६६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची सुरु केलेली निवडणूक प्रक्रिया रद्द केली असून तिसऱ्या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांची निवडणूक प्रकिया घोषित केली आहे.

* अधिकारी, कर्मचाऱ्यांचीदेखील नियुक्ती करण्याच्या सूचना

या संस्थांच्या निवडणूका घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक असल्यामुळे शासनाच्या इतर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचीदेखील नियुक्ती करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या आहेत. या संस्थांच्या निवडणूका मुदतीत पार पाडण्याच्यादृष्टीने निवडणूकीस पात्र संस्थांनी प्रारुप मतदार यादी व आवश्यक निवडणूक निधी संबंधीत जिल्हा, तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. ही सर्व निवडणूक प्रक्रिया ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकांचे संचलन, अधीक्षण व निर्देशन करण्याची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर सोपवलेली आहे. यामध्ये २५० व त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्था वगळण्यात आलेल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून संविधान दिन साजरा.




नाशिक :- (प्रतिनिधी) सामाजिक विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था येवला इकरा अरबी मदरसा स्कुल येवला यांच्या वतीने येवले शहरातील विंचूर चौफुली येथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात भारतीय संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अर्जुन कोकाटे, प्राचार्य बी व्ही गमे, विकी भैया बिवाल, विशाल सोनार,महेंद्र पगारे,जनसेवक डॉ.शेरुभाई सादिकभाई मोमीन, अजहर शाह ,अश्विनी जगदाळे शबिस्ता पिंजारी, नुसरत शेख, असद अन्सारी आदी उपस्थित होते प्राचार्य अर्जुन कोकाटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले मदरशांमध्ये भारतीय संविधान दिन साजरा होतोय आणि विद्यार्थी त्याला उत्तम असा प्रतिसाद देत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे असे मनोगत प्राचार्य अर्जुन कोकाटे यांनी व्यक्त केले. समाजसेवक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष विकी भैया बिवाल विशाल सोनार. शेरूभाई मोमीन यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मिठाई व अल्पोहार चे वाटप केले व मदरसा शाळेचे त्यांनी कौतुक केले. इकरा शाह, सारा शेख, रूमेजा मोमीन, या विद्यार्थिनींनी संविधान उद्देशिकेचे यावेळी वाचन केले व कार्यक्रमाची सांगता केली प्रास्ताविक शेरूभाई मोमीन यांनी केले व आभार अझहर शाह यांनी मानले यावेळी विविध मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.

वैद्यनाथ मंदिर आर डी एक्स ने उडवू'.विश्वस्तांना आलेल्या पत्राने खळबळ.



परळी वैजनाथ  (प्रतिनिधी):
आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे.मला तातडीची गरज भागविण्यासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन अशी धमकी असलेल्या कथित ड्रग्स माफियाच्या धमकीच्या पत्राने २६ नोव्हेंबर रोजी एकच खळबळ उडाली. संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर परळी येथे आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी राज्य व पर राज्यातून भाविक येतात. मार्च २०२० पासून हे मंदिर कोविडमुळे बंद ठेवण्यात आले होते. महिनाभरापूर्वी मंदिरे उघडण्याचा निर्णय झाल्याने हे मंदिर भाविकांसाठी खुले झाले.
सध्या मंदिरात भाविकांची गर्दी आहे. शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर सचिव राजेश देशमुख हे मंदिरात आले असताना टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहत होते. यातील एक पत्र व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) या नावाने आले होते. ते त्यांनी वाचून पाहिले अन् त्यांना धक्काच बसला. रतनसिंग रामसिंग दख्खने, रा.काळेश्वर नगर, विष्णूपुरी, नांदेड या पत्त्यावरुन हे पत्र आले आहे.

महिलांचे स्वातंत्र्य, हक्क ,आबाधित फक्त संविधानामुळेच -- प्रा. बालाजी जगतकर


* संविधान के सन्मान में एकल महिला संघटना मैदान में...

बीड प्रतिनिधी/भारत सरकारने 2015 पासून सर्व सामान्य लोकांना संविधानाचे महत्व समजण्याच्या हेतूने संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ असून त्याच्या माध्यमातून सर्व भारतीय जनतेस अमूल्य असे अधिकार प्रदान केले असून या दिवसाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीत केलेल्या योगदानाची आठवण करण्यासाठी एकल महिला संघटनेच्या वतीने दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुण सुरूवात, कोर्ट,तहशिल,पंचायत समिती, नगर रोड मार्गे स.मा.गर्गे   वाचनालया पर्यंत महिलांची रॅली काढण्यात आली, या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व मार्गदर्शन  बीड अक्षरधामचे संपादक प्रा.बालाजी जगतकर, भागवत वैध यांचे  संविधानावर मार्गदर्शन करणार आहेत  स.मा.गर्गे वाचनालय सभागृहात मान्यवारांची विचार व्यक्त करून  समारोप करण्यात आला, या रॅलीत बीड शहरातील बहुसंख्य सामाजिक संस्था, संघटना, युवक, महिला व विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते एकल महिला संघटनेच्या वतीने रुक्मिणी नागापुरे, मंगल कानडे, सरस्वती कळसकर, शिल्पा पंडित, संगिता मेटे, शोभा वाघराळ, भाग्यश्री तिडके, मीरा करांडे, मनीषा पवार, संगिता जाधव, रेश्मा सावंत, आस्विनी इतापे, अनिता राऊत, आस्विनी वीर, अलका हटवटे, आकुसा सापते, उल्फा लोखंडे,सपना ताई, गोदावरी घोलप, सपना आहिरे, कौशल्या कळसुले, कुशिवरता घोलप, असमा सय्यद, शेख अशाबी यांनी सविधान रॅलीत सहभागी घेतला.

जाणुन घ्या आजचे राशिभविष्य ! कसा असेल तुमचा दिवस.



मेष- आज पूर्ण दिवस आपणास शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने कमी यश मिळेल त्यामुळे हताश होण्याची वेळ येईल.

वृषभ – श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास आणि मनोबल यांसह पूर्ण कराल आणि त्यात सफलताही मिळवाल.वडिलांच्या घराण्याकडून तुम्हाला काही लाभ होईल.

मिथुन – नवीन योजना सुरु करायला आज उत्तम दिवस आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची कृपादृष्टी मिळण्याचे योग आहेत.

कर्क – आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. म्हणून मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. कोणाबरोबर गैरसमजातून मतभेद होतील.

सिंह – भरपूर आत्मविश्वास आणि दृढ निर्णयशक्ती याच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्मय घेऊन पूर्ण कराल. समाजात मानप्रतिष्ठा वाढेल. वडील तसेच भावनाप्रधान लोकांचा सहयोग प्राप्त होईल.

कन्या – शारीरिक अस्वस्थते बरोबर मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांबरोबर मतभेद होतील.

तूळ- आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्ट्या तुम्ही आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांच्या भेटी, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल.

वृश्चिक – आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान- सन्मान उचांवेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल.

धनु – शरीरात थकवा, उबग आणि बेचैनी राहील. स्वास्थ्य साधारण असेल. मन चिंतित असेल. प्रवास करू नका अशा श्रीगणेशांचा सल्ला आहे. संततीविषयी चिंता निर्माण होईल.

मकर – खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केले तर तब्येत खराब होईल असे श्रीगणेश सांगतात. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल.

कुंभ- भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यासह प्रणय आणि रोमांस आजचा आपला दिवस रंगवून टाळतील. भिन्नलिंगी व्यक्तीसोबत परिचय वाढेल व मित्रता बनेल.

मीन- घरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे तुम्ही आत्मविश्वासपूर्वक चांगल्या प्रकारे कराल असे श्रीगणेश सांगतात. आज आपल्याला संताप आणि बोलणे यावर संयम ठेवावा लागेल

Friday, November 26, 2021

शिरूर कासार तालुक्यातील सिंदफणा नदीपात्रातील अवैध वाळुउपसा उपविभागीय आधिकारी आणि तहसिलदाराच्या आशिर्वादाने सुरूच, वाळुसाठ्यावर कारवाईसाठी प्रधान सचिव महसुल व विभागीय आयुक्तांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर



बीड जिल्ह्यात वाळु माफिंयावर छापेमारी आणि वाळु वाहतूक करणा-या गाड्या जप्त होत असतानाच शिरूर कासार तालुक्यातील उपविभागीय आधिकारी नामदेव टीळेकर आणि तहसिलदार श्रीराम बेंडे यांच्या आशिर्वादाने मौजे निमगांव (मा)व मौजे. नांदेवली भागातील वाळुतस्करांनी उपविभागीय आधिकारी व तहसिलदार यांच्याशी संगनमताने सध्या सिंदफना नदीपात्रातील अवैध वाळुउपसा सुरूच असून आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सुद्धा त्याठीकाणी १५०-२०० ब्रास वाळुसाठा पडुन आहे तो वाळुसाठा जप्त करण्यात यावा आणि संबधित आधिका-यांचे मोफाईल काॅल डिटेल्स (सीडीआर)तपासल्यास आपणास सर्व पुरावे हाती लागतील त्यामुळेच संबधित प्रकरणात जबाबदार महसुल व पोलीस प्रशासनातील पोलीस कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी गौणखनिज विभाग जि.का.बीड यांच्यामार्फत प्रधान सचिव महसुल व विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना केली आहे. 

वाळमाफिया व महसुल प्रशासनातील आधिकांच्या साटेलोट्यामुळे सामाजिक कार्यकर्ते यांचा जीव धोक्यात 

सिंदफना नदीपात्रातील अनाधिकृत वाळु उपसा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अशोक कातखडे यांनी तक्रार केल्यानंतर त्याची माहीती महसुल प्रशासनातील आधिका-यांमार्फत वाळुमाफियां पर्यंत ताबडतोब पोहचते आणि मग तक्रारदाराच्या जिवीताला धोक उत्पन्न होतो याविषयी जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार केल्यानंतर सुद्धा काहीच फरक पडत नसुन आजही वाळु उपसा चालुच आहे. 

राष्ट्रवादी काॕग्रेस चे सर्वेसर्वा खा.शरद पवार साहेब दिल्लीला रवाना . राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.

 

मुंबई ;- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आज दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.मुंबईतील नियोजित सर्वच कार्यक्रम सोडून ते राजधानी दिल्लीत जात आहेत. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीतच आहेत. त्यामुळे, पवारांच्या दिल्ली दौऱ्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सातत्याने अस्थीर करण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकारकडून होत असल्याचा आरोप सत्ताधारी नेते करत आहेत. मात्र, काहीही झालं तरी हे सरकार 5 वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल अशी ग्वाही महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार आणि शिवसेने नेते खासदार संजय राऊत यांच्याकडून देण्यात येते. मात्र, पहाटेच्या शपथविधीमुळे राजकारणातील अनिश्चितता सातत्याने वेगळ्या चर्चा घडवून आणते. आता, शरद पवार अचानक दिल्लीला रवाना झाल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.आगामी काळात होत असलेल्या 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांसंदर्भात हा दिल्ली दौरा आहे का, आणखी काही वेगळेच कारण आहे, याची चर्चा होत आहे.

कोरोनामुळे मृत झालेल्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत मिळणार ; नागरिकांनी सानुग्रह सहाय्य प्रदान अनुदानाचा लाभ घ्यावा-डॉ. संतोष मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने त्या संदर्भातील जीआर काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाणार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळणार आहे. तरी नागरिकांनी सानुग्रह सहाय्य प्रदान अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे. 
        गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे लाखो लोकं बाधित झाले आहेत तर मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने त्या संदर्भातील जीआर काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाणार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. याने केंद्राला आदेश दिले होते. ही मदत नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यानुसार ही मदत मिळवण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाथार्थ्याच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास  50,000 रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार आहे. कोरोनामुळे  व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात च्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला  समजण्यात येईल. जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोरोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरीही ही मदत देणार आहे. कोरोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू 30 दिवसाच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल. जी व्यक्ती कोरोनामुळे बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात किंवा घरामध्ये झालेला आहे. त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 च्या कलम 10 खाली Medical Certificate of Cause of Death (MCCD) हे Form 4 व 4 A मध्ये नोंदणी प्राधिकाऱ्याला निर्गमित केले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल. Medical Certificate and of Cause of Death (MCCD) मध्ये “कोव्हिड- 19 मुळे मृत्यू" याप्रमाणे नोंद नसली तरीही  अटीची पूर्तता होत असल्यास, ती प्रकरणे  50,000 रुपये मदत देण्यात येईल. नातेवाईकांना ही मदत मिळवण्यासाठी राज्य सरकारने विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज दाखल करताना अर्जदाराने  स्वतःचा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक,  अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील,  मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम,  मृत्यू प्रमाणपत्र, इतर  नातेवाईकाचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र देणे आवश्यक आहे. कोणाला मिळणार मदत? 1) राज्यात जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50,000 रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार आहे. 2) कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात क्लिनिकल डायग्नीसिसच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला समजण्यात येईल. जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोरोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरीही ही मदत देणार आहे.3) कोरोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू 30 दिवसाच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल. 4) जी व्यक्ती कोरोनामुळे बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात किंवा घरामध्ये झालेला आहे. त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रक जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 च्या कलम 10 खाली मेडिकल सर्टीफिकेट ऑफ कॉज ऑफ डेथ 4 व 4 मध्ये नोंदणी प्राधिकाऱ्याला निर्गमित केले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल. 5) मेडिकल सर्टीफिकेट ऑफ कॉज ऑफ डेथमध्ये कोव्हिड- 19 मुळे मृत्यू याप्रमाणे नोंद नसली तरीही अटीची पूर्तता होत असल्यास, ती प्रकरणे 50,000 रुपये मदत देण्यात येईल. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळणार आहे. जिल्हा तसेच तालुका व गाव पातळीवर सर्व नागरिकांनी सानुग्रह सहाय्य प्रदान अनुदानाचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.

करुणा मुंडे यांनी घेतली वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची भेट !


मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांची मुंबई येथील पक्ष कार्यालयात भेट घेतली. यावेळी करुणा मुंडे यांनी त्यांच्यावरील कौटुंबिक अन्यायाची सविस्तर माहिती दिली. महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार व अन्याय या बाबतीत इथली व्यवस्था गंभीर नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. "करुणा मुंडे यांच्या बाबतीत दबावाचं राजकारण केले जात असल्याचे दिसत असून आवश्यकता पडल्यास वंचित बहुजन आघाडी करूणा मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील" असे मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, महिला आघाडीच्या महासचिव अरुंधती शिरसाठ, महिला आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य रोहिणीताई टेकाळे आदी उपस्थित होते.

कोरोनाचा नवा व्हेरियंट ठरणार डोकेदुखी ! केंद्र सरकार झाले अलर्ट.



कोरोनाचा नवा व्हेरियंट ठरणार डोकेदुखी !


नवी दिल्ली- कोरोनाचे संकट आता कुठे कमी होत असल्याचे चित्र असताना काही देशांमध्ये नवा व्हेरियंट आढळून आल्याने चिंता वाढली आहे.भारताने देखील परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी केल्यानंतरच त्यांना देशात प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत.

हा नवा व्हेरिअंट सापडल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. गुरुवारी केंद्राने सर्व राज्य सरकारांना परदेशातून विशेषतः या तीन देशांतून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन देखील या व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘NCDC कडून अशी माहिती देण्यात आली आहे की, कोविड-19 चा नवीन व्हेरिएंट B.1.1529 ची बोत्सवानामध्ये 3, दक्षिण आफ्रिकेत 6 आणि हाँगकाँगमध्ये 1 रुग्णाची नोंद झाली आहे.’ शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा नवा व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात म्युटेशन करू शकतो.

डॉ. टॉम पीकॉक, इम्पीरियल कॉलेज लंडनमधील विषाणूशास्त्रज्ञ, यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या ट्विटर अकाउंटवर नवीन व्हेरिएंट (b.1.1.529)ची माहिती दिली होती. तेव्हापासून इथर शास्त्रज्ञही या नव्या व्हेरिएंटचा शोध घेत आहेत. प्रोफेसर एड्रियन पुरेन, NICD चे कार्यवाहक कार्यकारी संचालक म्हणतात की, ‘दक्षिण आफ्रिकेत एक नवीन पॅटर्न सापडला आहे. आमचे तज्ञ नवीन पॅटर्न समजून घेण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत. लवकरच या व्हेरिएंटविषयी अधिक माहिती मिळेल.

सतत रुप बदलण्यामुळे WHO सोबतच शास्त्रज्ञांचे टेन्शन वाढले आहे. 30 पेक्षा जास्त वेळा रूप बदलणे ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. दुस-या लहरीमध्ये, डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंट्सचे असेच उत्परिवर्तन झाले आणि ते घातक ठरले. सर्वात चिंतेची बाब म्हणजे सध्याची लस या प्रकाराविरूद्ध प्रभावी आहे की नाही, याचा अभ्यास केला जात आहे. यास वेळ लागू शकतो. अशा स्थितीत तोपर्यंत या प्रकाराने मोठे रुप घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, WHO च्या तांत्रिक सल्लागार गटाने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत या नवीन प्रकारावर विचारमंथन होणार आहे. WHO म्हणते की या प्रकारावर अधिक संशोधन आवश्यक आहे. आपण अधिकाधिक लोकांना कोरोनाची लस मिळवून देणे हे सर्वात महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्याचा सामना करता येईल

Thursday, November 25, 2021

कोरोना लस विषाणूचा संसर्ग पूर्णपणे थांबवू शकत नाही – WHO प्रमुख.



जिनिव्हा – लस कोरोना विषाणूविरूद्ध सर्वात प्रभावी शस्त्र मानली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम यांच्या म्हणण्यानुसार ही लस जीव वाचवत असली तरी, कोरोना विषाणूचा संसर्ग पूर्णपणे रोखणे शक्य नाही.

डब्ल्यूएचओच्या महासंचालकांच्या म्हणण्यानुसार, लसीचा डोस घेतल्यानंतरही, मास्क घालणे आणि सामाजिक अंतर यासारखी आवश्यक खबरदारी चालू ठेवावी लागेल. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सर्व खबरदाऱ्या वगळण्याची चूक करू नका यावर त्यांनी भर दिला. टेड्रोस यांच्या म्हणण्यानुसार, लसीचा डोस दिल्यानंतरही, आवश्यक सूचना घेणे सुरू ठेवा जेणेकरून तुम्हाला इतर कोणाकडूनही संसर्ग होऊ नये आणि स्वतः संसर्ग पसरू नये.त्च्या

 म्हणण्यानुसार, अनेक देश आणि समुदायातील लोक असे गृहीत धरत आहेत की जर लसीचा डोस दिला गेला असेल तर आता कोरोना विषाणू संसर्गाचा वेग थांबेल, पण हा एक भ्रम आहे. ते म्हणाले की, गेल्या आठवड्यात कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे आणि त्यामुळे झालेल्या मृत्यूंपैकी 60 टक्क्यांहून अधिक युरोपमधील आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. टेड्रोस म्हणाले की, डेल्टा प्रकार येण्यापूर्वी, लसीने संसर्गाचे प्रमाण 60 टक्क्यांनी कमी केले होते, परंतु डेल्टा प्रकारामुळे ते 40 टक्क्यांनी घसरले.

जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम जानेवारीपासून भारतात सुरू झाला आहे आणि आतापर्यंत येथे 119 कोटी डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत (आज 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत) 79 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत.


एस.टी.कामगारांच्या आंदोलनाच्या नेतृत्त्वात उभी फूट.

मुंबई ; एसटी कामगारांच्या आंदोलनाच्या नेतृत्त्वात उभी फूट पडली आहे. आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्र्यांनी केलेल्या पगारवाढीनंतर आझाद मैदानातील आंदोलन स्थगित करण्याची घोषणा गुरुवारी केली.

मात्र आंदोलन स्थगित करण्याऐवजी या दोन्ही नेत्यांनाच आम्ही आझाद मैदानातून आझाद करत असल्याची प्रतिक्रिया अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तसेच आंदोलकांसह विलिनीकरण होईपर्यंत संप सुरुच ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.

एसटी कामगारांच्या आंदोलनाच्या नेतृत्त्वात उभी फूट

परिवहन मंत्र्यांनी केलेली पगारवाढ ही ऐतिहासिक असून एसटी कामगारांच्या आंदोलनाचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, आझाद मैदानात एसटी कामगारांना मी घेऊन आलो होतो. सरकारने केलेल्या विनंतीनंतर लोकांचे हाल होऊ नयेत म्हणून मैदानात आंदोलन स्थगित करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संपकरी एसटी कामगारांना आधार देण्यासाठी आपण आलो होता. संपाचे नेतृत्त्व कामगार करत होते, त्यामुळे पुढील निर्णय त्यांनीच घ्यावा, अशा शब्दांत पडळकर यांनी मैदानात न जाता विधानभवनाबाहेरूनच काढता पाय घेतला.

ही आझाद मैदानाऐवजी विधानभवनाबाहेरूनच आपली भूमिका जाहीर केली. ते म्हणाले की, कामगारांनी केलेल्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत सरकारला सळो की पळो करून सोडले. म्हणूनच कामगारांना भरघोस वेतनवाढीसह इन्सेटीव्ह मिळवून देता आला. यापुढेही कामगारांच्या पाठिशी ठाम उभे राहू. मात्र तूर्तास विद्यार्थ्यांचे हाल पाहून आझाद मैदानातील आंदोलन स्थगित करत आहोत. सरकारने दोन पाऊले पुढे आल्यावर आपणही एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे. विलिनीकरणात न्यायालयाने दिलेली तांत्रिक मुदत आड येत असल्याने कामगारांनी थोडा विचार करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

संप सुरु ठेवण्याचा निर्धार

दरम्यान, संपकरी कामगारांच्या बाजुने न्यायालयात लढणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र दोन्ही आमदारांना आझाद मैदानातून आझाद करत असल्याचे म्हणत संप सुरु ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सदावर्ते म्हणाले की, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे संप चिरडण्यासाठी फोडाफोडीचे तंत्र वापरत आहेत. मात्र कामगार या परीक्षेत पास झाले असून सरकार नापास झाले आहे.

विलिनीकरण हा संविधानिक हक्क असून कारागृहातील कैद्यांना मिळणाऱ्या पगाराप्रमाणे वेतनवाढ कामगारांना नको आहे. न्यायालयातील तांत्रिक मुद्द्याकडे बोट दाखवून सरकार पळ काढत आहे. न्यायालयाने गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास वेळेआधी निर्णय घेण्याची मुभा दिलेली आहे. त्यासाठी सरकारला केवळ एक अध्यादेश काढावा लागणार आहे. त्यामुळे विलिनीकरण केल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही. तसेच सरकारने कठोर कारवाई केली, तर त्यास न्यायालयात उत्तर देऊ असा पवित्राही सदावर्ते यांनी यावेळी स्पष्ट केला आहे

राज्याचे हिवाळी आदिवेशन यावेळी नागापुर ऐवजी मुंबईतच घेण्याचा राज्यमंत्रीमंडळाचा निर्णय






   


.   राज्याचे हिवाळी अधिवेशन यावेळी नागपूरऐवजी मुंबईतच घेण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्यावर झालेली शस्त्रक्रिया, विधान परिषद निवडणूक या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन  नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचे ठरत आहे. विरोधी पक्षांकडून होणारा आरोपांचा मारा थोपविण्यासाठी नागपूरऐवजी महाविकास आघाडी सरकारला मुंबई अधिक सुरक्षित वाटते आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

एका वरिष्ठ मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार २२ डिसेंबरपासून एक आठवडा हे सत्र करण्याचे कॅबिनेट बैठकीत ठरले आहे. याआधी झालेल्या पावसाळी अधिवेशनात हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्येच होईल, असे म्हटले जात होते. पण प्रत्यक्षात आता मुंबईतच हे अधिवेशन होणार आहे.

अर्थात, यासंदर्भातील अधिकृत निर्णय हा २९ नोव्हेंबरला विधिमंडळ कामकाज समितीच्या माध्यमातून घेतला जाईल. या समितीने चर्चा केल्यानंतर हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होईल, याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. याआधी हे अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार असे ठरले होते. मात्र आता काही स्थानिक निवडणुका, विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अधिवेशनाचे ठिकाण बदलण्यात आले आहे. २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे.

खरेतर, हे अधिवेशन नागपुरातच व्हावे अशी विरोधी पक्षांची अपेक्षा आहे, पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला मात्र हे अधिवेशन मुंबईत व्हावे असे वाटते आहे.

१ डिसेंबर पासुन सुरू होणार पहिली ते चौथीचे वर्ग.राज्यमंत्रीमंडळाचा निर्णय.


मुंबई  :- पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या आधीच पाचवीपासूनचे पुढचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आता पहिली ते चौथी हे वर्ग देखील सुरू करण्यात आले असल्यामुळे आता राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात लवकरच आवश्यक ती करोना नियमावली जाहीर करण्यात येईल, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पहिली ते चौथी या वर्गातील मुले लहान असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर असणार आहे. शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाला यासंदर्भातले योग्य ते आदेश देण्यात येणार आहेत. “ग्रामीण भागात ५वी ते १२वी तर शहरी भागात ८वी ते १२वीच्या शाळा-महाविद्यालये सुरू झाली होती. त्यानंतर ग्रामीण भागात १ली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू केली होती. त्याची फाईल मुख्यमंत्र्यांना मंजुरीसाठी पाठवली होती. आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

“राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात पहिलीपासून बारावीपर्यंत सर्व वर्गांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. आगामी काळात या वर्गांसाठी लागू करावयाच्या नियमावलीबाबत टास्क फोर्ससोबत चर्चा केली जाईल. विद्यार्थ्यांच्या पालकांशी, शिक्षकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण वातावरण कसं दिलं जाईल, याची काळजी घेतली जाईल”, असं देखील वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती देताना नमूद केलं. “मुलांचं कुठेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची काळजी घेतली जाईल. मुलांना एकत्र बसून शिक्षण घेण्याची आवश्यकता तज्ज्ञांकडून व्यक्त केली गेली आहे. त्यानुसार चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे”, असं देखील वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Monday, November 8, 2021

परळीतील उद्योजक अजय लुंकड यांची आत्महत्या नव्हे.मुलानेच केला खून . शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न.


परळी वैजनाथ  :( प्रतिनिधी) - येथील उद्योजक अजय शांतीलाल लुंकड रा. विद्यानगर, परळी यांचा मृतदेह सोमवारी (दि.०१) राहत्या घरी आढळून आला होता. त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा जवाब त्यांच्या मुलाने नोंदवला होता. मात्र, त्यांनी आत्महत्या केली नसून, त्यांचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाल्याने शहरात खळबळ उडाली एकच आहे. याप्रकरणी शहर ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. तपास यंत्रणा गतिमान होताच स्वतःच्या मुलानेच पोलीसांकडे दिली कबुली. सिद्धार्थ ला पोलीसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले असता, त्याच्याकडून आश्चर्यकारक स्वतःच्या वडिलांबद्दल टिप्पणी केली. त्याने सांगितले की, मला प्रेमाच्या बदल्यात प्रेमच मिळायला हवे होते.पण , तसे होत नव्हते. माझ्या मोठ्या भावाला आर्किटेक्चर करण्यासाठी खूप पैसा लावला. मला कॉम्पुटर इंजिनिअर शिक्षणासाठी औरंगाबादला ठेवले. परंतु , माझे सर्व मित्र औरंगाबादचे असूनदेखील ते पुण्यात शिकतात. माझे बाबा माझ्याशी मोट्या भावाच्या तुलनेत कमी लेखत असत. लॉकडाउनच्या काळात त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. तपासात बऱ्याच काही गोष्टी विसंगत वाटल्याने पोलिसांना त्याच्यावर सुरुवातीपासूनच संशय वाटत होता. या खुनामागे याहीपेक्षा काही वेगळे कारण आहे का? अशा अनेक पैलूवर हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे हे मोठ्या चतुराईने या प्रकरणाचा उलघडा करत आहेत. शहर पोलीस स्टेशन चे कर्मचारी साहेबराव पल्लेवाड यांच्या फिर्यादी वरून  भादंवि ३०२ व पुरावे नष्ट करणे असा गुन्हा नोंद झाला आहे.  तसेच परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ हे  तपास करीत आहेत.