Friday, July 31, 2020

बीडच्या कोविड रुग्णालयाचीआ.विनायक मेटें कडून आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार.

* हॉस्पिटल बंद ठेवणार्‍या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करा -के.के. वडमारे 

बीड (प्रतिनीधी )- बीड शहरासह जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयचा मनमानी कारभार सर्वजण पाहत आहेत एरवी कुठलाही आजार कुठलाही रोग आला तर रुग्णांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारणारे खाजगी डॉक्टर आज हॉस्पिटल बंद करून रुग्णांची पिळवणूक करत रुग्णांना जाणीवपुर्वक मानसिक त्रास देत आहेत त्यामुळे काल जिल्हाधिकारी यांना व्हाट्सऍप मेसेजवर माहिती देऊन संबंधित रुग्णालय न उघडणार्‍या खाजगी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते के.के. वडमारे यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी आपण आंदोलन छेडणार असल्याचेही वडमारे यांनी म्हटले आहे. 
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सर्व खाजगी  डॉक्टरांना हॉस्पिटल बंद का आहेत? याचा जाब विचारावा व जे हॉस्पिटल बंद आहेत अशा डॉक्टरांवर ते कारवाई का करत नाहीत? सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालय उघडे ठेवणे अत्यावश्यक असून नागरिकांना विविध आजारांची लागण होते तर काहींना गंभीर आजार असते अशा वेळी नागरिकांनी कोणाकडे जायचे? काही डॉक्टर रुग्ण त्यांच्या रुग्णालयात गेल्यानंतर ते सरळ-सरळ सरकारी दवाखान्याचा मार्ग दाखवतात. मात्र उपचार करण्याचे दायित्व ते दाखवत नाहीत. यामुळे रुग्ण अडचणीत सापडलेले आहेत. काहीजण अशी परिस्थिती पाहून रुग्णालयात जाणेही टाळत असल्याने त्यांचे आजार गंभीर होत आहेत. दुसरीकडे शस्त्रक्रियाही थांबलेल्या आहेत. या सर्व बाबींसंदर्भत जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याशी वॉटस्ऍपवर संपर्क साधून त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन पाठवलेले आहेत. शहरातील जे रुग्णालय सुरू नसतात अशा रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याचे के.के. वडमारे यांनी म्हटले आहे. दरम्यान डॉक्टरांनी आपला मनमानीपणा न थांबवल्यास १५ ऑगस्ट रोजी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा वडमारे यांनी दिला.

नेकनूरमध्ये जुगार अडड्यावर छापा सात आरोपींसह ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

नेकनूूर (प्रतिनीधी )- कोरोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी देशासह जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही काही जण नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे अवैध धंदे चालवत आहेत. काल नेकनूर हद्दीतील एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने धाड टाकत ५६ हजार ८५० रुपयांच्या मुद्देमालासह सात आरोपी ताब्यात घेतले. ही कारवाई पथकप्रमुख सपोनि. आनंद कांगुणे व त्यांच्या टिमने केली. जमावबंदी व संचारबंदी काळात बीड जिल्ह्यामधील अवैध धंद्यांची माहिती काढून त्यांच्यावर केसेस करण्याचे व अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. काल पथकप्रमुख आनंद कांगुणे यांना नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच त्यांनी प्रदीप मशिनरी स्टोअर्सच्या बाजुला नांदूरफाटा (ता. बीड) येथे विकास गुलाब कोल्हे हा मोकळ्या जागेत काही इसमांना घेऊन तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवताना आढळून आला. या जुगार्‍यांमध्ये विकास गुलाब कोल्हे (वय २८, रा. पांढर्‍याची वाडी ता. बीड), रविंद्र ज्ञानोबा भोसले (वय ३९, रा. खर्डेवाडी), रुपेश दत्तात्रय भोसले (रा. खर्डेवाडी), दिगांबर उत्तम भोसले (बुरंडवाडी ता. केज), बापू विठ्ठल भोसले (विडा ता. केज), उत्तरेश्‍वर अच्यूत भोसले (रा. बुरंडवाडी), बाबुराव एकनाथ केंगर (वय ३०, रा. खर्डेवाडी) यांना ताब्यात घेतले असून या वेळी रोख रक्कम २५ हजार ८५० रुपये व ३१ हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल, असा एकूण ५६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील सातही आरोपींच्या विरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात कलम १२ (अ) सह कलम १८८, २६९, २७० भा.दं.वि. सह कलम ५१ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि. आनंद कांगुणे, पो.ना. झुंबर गर्जे, पो.ना. गहिनीनाथ गर्जे, पो.शि. गोविंद काळे, अन्वर शेख यांनी केली.

हनी ट्रॅपमध्ये मुख्य आरोपी असलेला पोलीस नाईक कैलास गुजर सापडेना !



बीड:- केज तालुक्यातील एका वीटभट्टी चालकाशी लगट करून त्याला जाळ्यात ओढत त्याच्याकडून पंधरा लाख रूपये उकळण्याचा डाव फसल्यानंतर पोलीसांनी एकाला अटक केली होती. त्यानंतर त्याच्या सहा साथीदाराला पोलीसांनी अटक केली. मात्र या हनी ट्रॅपमध्ये मुख्य आरोपी असलेला आष्टी पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक कैलास गुजर हा अद्यापही फरार आहे. सहा आरोपीला दुसर्‍या वेळेस न्यायालयात हजर केले असता उद्यापर्यंतत त्यांना पीसीआर देण्यात आला आहे. 
केज तालुक्यातील टाकळी येथील एका वीटभट्टी चालकाला जाळ्यात ओढून त्याच्याकडून पंधरा लाख उकळण्याचा प्रयत्न करणारेच पोलीसांच्या जाळ्यात अडकल्याची घटना रविवार दि.२६ जुलै रोजी उघडकीस आली होती. यावेळी पोलीसांनी एका आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याचे सहा साथीदारही पोलीसांनी विविध ठिकाणावरून पोलीसांनी उचलले. यापुर्वीही या महिलेवर फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. मात्र या हनी ट्रॅपचा मुख्य आरोपी असलेला पोलीसच पोलीसांना गेल्या सहा दिवसापासून सापडला नाही. अन्य सहा आरोपीला उद्यापर्यंत पीसीआर मिळालेला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय राऊत हे करत आहेत. 

शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्यासाठी तब्बल एक वर्ष वाट बघावी लागणार .


बीड (प्रतिनीधी )-शिक्षकांचे प्रश्‍न मागील सरकार आणि हेही सोडवताना दिसत नाही. २० टक्के अनुदान असणार्‍या शिक्षकांना वेतन आयोगापोटी वर्षाला फक्त साडेसात हजार रुपये इतकाच हप्ता मिळणार असताना सुद्धा अगदी भीक लागल्यासारखे यावर्षीचा साडेसात हजार रुपये हप्ता देण्यासाठी तब्बल एक वर्षभर थांबण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिलेले आहेत. 
   २० टक्के आणि विनाअनुदानित शिक्षकांचे कोणतेही प्रश्‍न विद्यमान सरकार सोडवत नाही. शिक्षण विभागाचे मंत्री, आमदार आणि सचिव हे आमच्या हातात काही नसून सर्वस्वी अर्थविभागाच्या अंतर्गत येणारे प्रश्‍न आहेत, असे सांगून हात झटकून मोकळे होत आहेत. शंभर टक्के अनुदान घेणार्‍या शिक्षकासोबत २० टक्के अंशत: अनुदान उचलणार्‍या शिक्षकांनासुद्धा तुटपुंज्या पगारीतून मार्च २०२० चा पगार ७५ टक्के काढर्‍याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. असे असताना त्यात भरीस भर म्हणून २० टक्के अनुदानित शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा जो फरक मिळणार आहे त्या फरकाची रक्कम पाच वर्षात समान हप्त्यात देण्याचे आदेश सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर शिक्षण विभागाने दिले होते. गेल्या वर्षी जून आणि जुलै महिन्यामध्ये या सातव्या वेतन आयोगाचा साडेसात हजार रुपयांच्या वेतनाचा पहिला हप्ता दिल्यानंतर दुसरा हप्ता या वर्षीच्या जून आणि जुलैमध्ये देणे क्रमप्राप्त असताना सुद्धा यांना सुद्धा सर्वांसोबत निकष लावत केवळ साडेसात हजार रुपयांचा देण्यात येणारा हप्ता तब्बल एक वर्षभर शिक्षण विभागाने पुढे ढकलला आहे.

उपविभागीय आधिकारी नामदेव टिळेकर यांची कारवाई वाळुचा हायवा पकडला.

गेवराई (प्रतिनीधी ):- उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर हे आज सकाळी औरंगाबादला जात होते. बागपिंपळगाव जवळ त्यांना अनाधिकृतपणे वाळु घेवून जाणारा हायवा निदर्शनास आल्यानंतर सदरील हायवा ताब्यात घेवून स्वत: हायवा गाडीत बसून गेवराई तहसीलला आणला. या प्रकरणी संबंधिता विरोधात कारवाई करण्यात आली. गेवराई तालुक्यातून अनाधिकृत वाळुचा उपसा सुरूच आहे. 
गेल्या काही महिन्यापासून गेवराई तालुक्यात वाळु माफियांनी धुमाकूळ घातला. रात्री अपरात्री वाळुचा उपसा करून चोरट्या मार्गाने वाळु नेली जाते. आज सकाळी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर हे काही कामा निमित्त औरंगाबादला जात होते. बागपिंपळगाव येथे त्यांना वाळु घेवून जाणार हायवा दिसून आल्यानंतर त्यांनी हायवा ताब्यात घेवून स्वत: त्यांनी गाडीत बसून सदरील गाडी तहसील कार्यालयात आणली. याप्रकरणी संबंधिताविरोधात कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये राखी टपालासाठी टपाल कार्यालये रविवार 2 जुलै रोजी सुरु राहणार.

                                                                                                                         
बीड  (प्रतिनीधी)  :- राखीचा सण येत्या 3 ऑगस्ट 2020 (सोमवारी) असल्यामुळे महाराष्ट्र पोस्टल सर्कलने 2 ऑगस्ट रविवारी रोजी  सर्व वितरण पोस्ट कार्यालयामध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे. प्राधान्य क्रमाने व वेळेत राखी टपाल वितरण करण्यासाठी लोक स्पीड पोस्ट सेवा वापरु शकतात, असे आवाहन डाक विभाग बीड यांनी  प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.  
      राखी हा सण भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचा उत्सव आहे. ज्यात भावनिक  भावनिक असक्ती आहे. दरवर्षी राखी टपाल हाताळण्यासाठी टपाल विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षीदेखील राखी टपाल महाराष्ट्र राज्य पोस्टल सर्कलमधील पोस्ट ऑफिसवर बुक करावेत.
     राखी टपालाची प्रधान्य क्रमानुसार बुकिंग प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व पोस्ट ऑफीसमध्ये करण्यात आली असून राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर मुंबई व नवी मुंबई येथेही सुरु करण्यात आले आहेत.
    यावर्षी हा सण अधिक महत्व गृहीत धरत आहे. कारण त्यांची शहरात राहणा-या भावडांना विविध निर्बंधामुळे सणासाठी भेट घेता येणार नाही. कदाचित त्यांचे भाऊ-बहिणी कंन्टमेट झोन किंवा सीलबंद इमारतीमध्ये राहत असतील या कोविड काळात, पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्रधान्य दिले आहे. तसेच स्पीड पोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात आनंद होईल, अशी घोषणा देऊन  आनंद मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 
       
                                                 
                                                                  

एटीकेटी व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करा ;- सत्यजित तांबे

मुंबई : (प्रतिनीधी ) महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मुंबई राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यासाठी साकडे घातले व एटीकेटी व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण  करण्यात यावे आदी मागण्या यावेळी प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने यावेळी करण्यात आल्या.
ऑनलाइन किंवा मिश्र पद्धतीची परीक्षा अथवा ओपन बुक परीक्षा देण्याचा पर्याय गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही पद्धत अन्यायकारी असल्याचे  बहुतांश  ग्रामीण भागातील विद्यार्थी बोलून दाखवत आहेत. पुस्तके बघून परीक्षा देण्याचा पर्याय देखील फार व्यवहार्य नाही,कारण बहुतांश विद्यार्थ्यांकडे संदर्भग्रंथ,पाठ्यपुस्तके अथवा नोट्स नाहीत.या सर्व परिस्थितीचा सारासार विचार करत बहुतांश राज्यांनी परीक्षा प्रक्रिया राबवण्यास  असमर्थता दर्शवली असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने आपला निर्णय  जबरदस्ती लादणे म्हणजे घटनेने आखून दिलेल्या संघराज्यीय चौकटीचा अवमान करण्यासारखे आहे ,असे मत तांबे यांनी यावेळी मांडले.मागील चार महिन्यांपासून विद्यापीठ आयोगाने परीक्षांबाबत काहीही स्पष्टता दिली नाही.त्यामुळे विद्यार्थी तणावाखाली आहेत असेही तांबे म्हणाले.
अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात, मागील सत्रातील मिळवलेल्या सरासरी गुणांच्या आधारे अंतिम सत्राचे गुणांकन करावे.हे करताना देशभरातील सर्व विद्यापीठांनी युजीसीने ठरवून दिलेली समान प्रक्रिया राबवावी जेणेकरून पुढचा गोंधळ होणार नाही,बहुतांश विद्यापीठांनी परीक्षा विद्यार्थ्यांकडून घेतली असल्याने ती फी विद्यार्थ्यांना परत केली जावी. महाविद्यालये परत कधी खुलणार याबाबत अनिश्चिती असल्याने नवीन सत्राची फी घेऊ नये.लॉकडाऊन मुळे आर्थिक अडचणी वाढल्याने पुढील सत्राची फी भरण्यापासून दिलासा द्यावा.निकालाची जी प्रत आहे त्यावर कोणताही शेरा मारला जाऊ नये. अन्यथा हा निकाल विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर मनोबल खच्ची करणारा असतो.एटीकेटी व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण  करण्यात यावे अशा मागण्या युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आल्या.जे विद्यार्थी कोरोना महामारीच्या काळात विद्यापीठाच्या वा कॉलेजच्या सूचनेनुसार कामे करत आहेत,या विद्यार्थ्यांना कमवा व शिका या योजने अंतर्गत मानधन देण्यात यावे. विद्यापिठातील पीएचडी,डॉक्टरेट चे संशोधक अथवा विद्यार्थ्यांचे कोरोना काळात रखडलेले मानधन (फेलोशिप) लवकरात लवकर देण्यात यावे.या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देत युवक काँग्रेस हि शेवटपर्यंत विद्यार्थ्यांसोबत उभी राहील अशी ग्वाही यावेळी तांबे यांनी दिली.

१ ऑगस्टपासून आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. दिड लाखाहून अधिक प्रवेश क्षमता;-ना.नवाब मलिक

मुंबई : (प्रतिनीधी ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रीया केंद्रीयभूत ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार असून दिनांक १ ऑगस्टपासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत,अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.तथापी,आयटीआय महाविद्यालये कधी सुरु होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या नियमास अनुसरुन नंतर माहिती जाहीर करण्यात येईल, सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु करीत आहोत,असे त्यांनी सांगितले.
प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे १४ वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात. यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत, असे मंत्री  मलिक यांनी सांगितले.कौशल्य विकास राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, दहावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण इच्छूक विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत आयटीआयसाठी अर्ज करावा. राज्यातील प्रत्येक युवकास कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर रोजगार देण्याचा शासनाचा निर्धार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठीही विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नाऊमेद न होता शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन राज्यमंत्री  देसाई यांनी केले आहे.
राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय आयटीआय आहे. ३५८ तालुक्यात ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ९२ हजार ५५६ इतकी आहे. आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था,अनुसूचित जाती व नवबौध्दांसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी २ स्वतंत्र संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे. याचबरोबर राज्यात ५६९ खाजगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता ५३ हजार २७२ आहे. शासकीय आणि खाजगी ९८६ आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता १ लाख ४५ हजार ८२८ विद्यार्थी इतकी आहे.

अमरावती – ९० संस्था आणि १७ हजार ९८४ प्रवेशक्षमता, औरंगाबाद – १३३ संस्था आणि १९ हजार २६४ प्रवेशक्षमता, मुंबई – १०८ संस्था आणि २० हजार १२४ प्रवेशक्षमता, नागपूर – २४१ संस्था आणि २८ हजार १३६ प्रवेशक्षमता, नाशिक- २१८ संस्था आणि २९ हजार ५०० प्रवेशक्षमता, पुणे – १९६ संस्था आणि ३० हजार ८२० प्रवेशक्षमता आहे.आयटीआय प्रवेशासंबंधीत नियम, प्रवेशासाठी उपलब्ध जागा, आवश्यक दस्तऐवजांची माहिती व संपूर्ण प्रवेश कार्यपध्दती, याबाबत विस्तृत माहिती समाविष्ट असलेली माहिती पुस्तिका, प्रवेशाचे वेळापत्रक, शासकीय आयटीआय मधील वसतीगृहांची उपलब्धता, मागील तीन वर्षात प्रवेश देण्यात आलेल्या उमेदवारांना व्यवसाय अभ्यासक्रम व संस्थानिहाय इयत्ता दहावीमध्ये प्राप्त झालेले प्रवर्गनिहाय महत्तम व किमान गुण, दिव्यांग विद्यार्थ्यांची व्यवसाय अभ्यासक्रम निहाय पात्रता, जिल्हानिहाय कौशल्याचा अभाव दर्शविणारा अहवाल  व्यवसाय प्रशिक्षण पुतिपुर्ती योजनेची माहिती व कार्यपध्दती इत्यादींबाबतची माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना  आवाहन करण्यात येते की, प्रवेश नियमावली काळजीपुर्वक वाचून प्रवेशासाठी अर्ज करावा.
इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येते. तसेच इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून २ वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या २ भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येते.

रेशनच्या तांदळाच्या काळाबाजाराची सी.आय.डी. मार्फत चौकशी.


मुंबई : (प्रतिनीधी ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करत राज्यातील नागरिकांना अन्न, धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर विशेष पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेऊन कारवाई देखील करण्यात येत आहे.त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील मौजे सोनेगाव स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या अवैध व्यवहाराबाबत तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर ४१० कट्टे भरलेला तांदूळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची सी.आय.डी. मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
राज्यातील एकही नागरिक अन्न, धान्यांपासून वंचित राहणार नाही यासाठी राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. तसेच या काळामध्ये अन्न,धान्याचा काळाबाजर करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या पथकातील पोलीसांनी जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथून गुजरातला जाणारा स्वस्त धान्य दुकानातील २४ टन भरलेला तांदळाचा ट्रक पकडला होता. या तांदळाच्या अवैध विक्री व्यवहाराची तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर ४१० कट्टे भरलेला तांदूळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला आहे. या तांदळाच्या काळाबाजार व अवैध विक्री व्यवहाराची चौकशी सी.आय.डी. मार्फत करण्यात येणार असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल. त्यामुळे राज्यातील गैर व्यवहारांना आळा बसणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे.

Thursday, July 30, 2020

विद्यार्थ्यांची रोग प्रतिकार शक्ती, शारिरीक व मानसिक स्वास्थ्य यासाठी योग साधना उपयुक्त--मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार.

*जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य विभागाचा विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम   
*१ ते १४ ऑगस्ट या कालावधीत योगा, प्राणायाम व पोषक आहार यांचे तज्ञाव्दारे मार्गदर्शन फेसबुक लाईव्ह.
                             
बीड,;-::-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सूरु असलेल्या लॉकडाऊनमूळे दिनांक 22 मार्च पासुन राज्यात सर्व आस्थापनाच्या शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांची रोग प्रतिकार शक्ती चांगली राहावी त्यांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे व शरीरातील ताणतणाव निघुन जावा यासाठी योग साधना अत्यंत उपयुक्त आहे सर्व शिक्षक, पालकांनी या उपक्रमात आपल्या विद्यार्थ्यासह सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. 
स्कुल फ्रॉम होम उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन सुरु राहावे यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात विद्यार्थी, पालक व सर्वसामान्य नागरिक यांचे आरोग्य उत्तम ठेवणे व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी योग साधन अत्यंत उपयुक्त आहे असे आरोग्य व शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. 
विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासा सोबतच त्यांची शारिरीक व मानसिक क्षमतांचाही विकास होणे महत्वाचे आहे. यासोबतच कोव्हिड 19 या साथरोगामुळे उद्भवलेल्या एकंदर परिस्थितीत ताणतणाव दुर करणे व निरोगी राहाणे आवश्यक आहे म्हणुनच दिनांक 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2020 या कालावधीत दररोज सकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व नागरिक यांच्या साठी योगा, प्राणायाम व पोषक आहार यांचे तज्ञाव्दारे मार्गदर्शन फेसबुक लाईव्हचे माध्यमातुन करण्यात येणार आहे.
सदरील उपक्रम शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड या फेसबुक पेजवर वरील वेळेत लाईव्ह केला जाणार आहे. सकाळी 6.30 वा राष्ट्रगीताने योगसत्राची सुरुवात होईल त्यानंतर 10 मिनिटे वॉर्मअप व सूर्यनमस्कार केला जाईल. यानंतर 25 ते 30 मिनिट योगा व प्राणायाम केला जाणार आहे. तर योग शिबीरा दरम्यान ठराविक सत्रात कोरोना काळातील आहार या विषयावर आहार तज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे या उपक्रमामुळे आपल्या सर्वांची प्रतिकार क्षमता वाढणार आहे.
शारिरीक सुदृढतेस मदत होणार आहे. तरी जिल्हयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी नियमित सहभागी होऊन कोरोना लढाईत सहभाग नोंदवावा असे शिक्षणाधिकारी (प्रा) अजय बहिर यांनी  कळविले आहे.
सदरील उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पालकांच्या उपस्थितीमध्ये व मार्गदर्शकाच्या सुचनेनुसार सहभाग घ्यावा तसेच नियोजित वेळेला उपाशी पोटी सैलसर कपडे परिधान करुन चटई अथवा बस्कर पट्टीचा आसनासाठी वापर करावा.

*वेळापत्रक*
1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट
सकाळी 6.30 ते 7.30
राष्ट्रगीत -52 सेकंद,
योगा- 20 मिनिट, 
प्राणायाम,-20 मिनिट,
योगशिक्षक-विकास गवते, 
सहशिक्षक, हेमंत बडवे, सहशिक्षक 
सकस आहार मार्गदर्शन-10 मिनिट-डॉ.सावित्री कचरे, NRC आहारतज्ञ, शासकीय जिल्हा रुग्णालय बीड.
विदयार्थ्यांनी योगाभ्यास आपपल्या घरी व पालकांच्या उपस्थितीतच करावयाचा आहे तसेच एखादे आसन अथवा क्रिया विद्यार्थी/ पालकांस अवघड वाटत असेल अथवा त्रास होत असेल तर ती टाळावी असे नमूद केले आहे.

जिल्ह्यात लाॅकडाऊनचा कालावधीत वाढ मनाई जमावबंदी आदेश 31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लागू--जिल्हाधिकारी राहुल रेखावार.

*जिल्ह्यात काही नवीन बाबींना अटी व शर्तीसह 5 आॅगस्ट पासून परवानगी.

बीड,:-राज्यात दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लाॅकडाऊनचा कालावधी वाढवलेला आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहितेच्या कलम 144 (1)(3)अन्वये मनाई , जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असून हे आदेश दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लागू राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

तसेच राज्य शासनाचे आदेशानुसार खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.सदर आदेशानुसार  काही बाबींना  पुढील अटी व शर्तीसह दिनांक 05 आॅगस्ट 2020 रोजी पासून जिल्ह्यामध्ये परवानगी देण्यात आली आहे 

1. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सस यांना चित्रपटगृह व्यतिरिक्त सकाळी 09.00 वा. ते सायंकाळी 7.00 वा पर्यंत कोवीड -19 विषयक सर्व नियमांचे पालन करणेचे अटीवर दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी पासून चालू ठेवण्यास परवानगी असेल, तसेच मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स मधील फूड कोर्ट/ रेस्टॉरंटस यांना फक्त घरपोच सेवा होम डिलेव्हरी साठी परवानगी असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांनी असे नगरपालिका, नगरपंचायती यांनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहील.

2. Covid-19 विषयक बंधने पाळून खुल्या जागा व्यायामासाठी या आधी अमलात असणाऱ्या नियमाप्रमाणेच वापरता येतील.

3. कार्यालय तसेच शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी यांना अशैक्षणिक कामासाठी जसे उत्तरपत्रिका तपासणी /निकालपत्र घोषित करणे, संशोधन क्षेत्रातील वैज्ञानिक, ऑनलाइन शिक्षण विषयक कामे इत्यादी करता येतील व यासाठी संस्था उघडता येतील.

4. खुल्या जागा मध्ये सामूहिक क्रीडा व्यतिरिक्त खेळ जसे की जिम्नॅस्टिक, टेनिस, बॅडमिंटन व मल्लखांब यांना दिनांक 5 ऑगस्ट 2020 पासून covid-19 विषयक सर्व नियमांचे पालन करण्याची अटीवर परवानगी असेल. तसेच जलतरणिका चालू करणेस ही बंदी कायम राहील.

5. सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक करणारे व्यक्तींनी गाडीतील एकूण प्रवाशांच्या संख्येत विषय खालील प्रमाणे व्यवस्थापन करावे.
1. दुचाकी:- 1 चालक+1 प्रवासी हेल्मेट व मास्कसह
2.तीनचाकी :- 1चालक + 2 प्रवासी सर्व व्यक्ती मास्कसह
3.चारचाकी:-1 चालक+3 प्रवासी सर्व व्यक्ती मास्कसह 

वरील या बाबींना ५ आॅगस्ट २०२० पासून परवानगी आहे. 

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897.दि.13 मार्च पासून लागू करून खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ)नुसार नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे मुक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
 यापूर्वी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 (1)(3) दिनांक 31 जुलै 2020 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले होते त्या मध्ये वाढ करुन 31आॅगस्ट 2020 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू करण्यात आले आहे 

परळी तालुक्यात कोरोनाचा कहर काही थांबेना .आज नव्याने 17 रुग्णाची भर.


परळी वैजनाथ ;- परळी शहर व तालुक्यातील दि.29 जुलै रोजी 57 कोरोना संशयीताचे स्वॕबचे नमुणे घेण्यात आले होते.त्या 57 पैकी 17 कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आल्याने तालुक्यात आज कोरोनाचा धमाकाच झाला आहे.या वाढत्या कोरोना संसर्गामुळे  पुन्हा एकदा शहर व तालुका लाॕकडाउन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आज राञी आरोग्य प्रशासनाने जाहिर केलेल्या अहवालात शहरात  15  तर ग्रामीण भागातील 2 असे एकुण 17 कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत.
शहरातील 39 वर्षीय पुरुष बँक कॉलनी, 35 वर्षीय पुरुष  विद्यानगर, 20 वर्षीय पुरुष टीपीएस कॉलनी, 33 वर्षीय पुरुष परळी,27 पुरुष वर्षीय टी एस कॉलनी,45 वर्षीय महिला आयोध्यानगर, 43 वर्षीय पुरुषपरळी वैजनाथ,24 वर्षीय महिला परळी वैजनाथ, 65 वर्षीय पुरुष माणिक नगर,21वर्षीय पुरुष परळी वैजनाथ, 38 वर्षीय पुरुष परळी वैजनाथ,35 वर्षीय पुरुष परळी वैजनाथ, 40 वर्षीय पुरुष परळी वैजनाथ,35 वर्षीय महिला तहसील कार्यालय, 21 वर्षीय पुरुष हमालवाडी तर तालुक्यातील जलालपुर येथील 54 वर्षीय महिला व धर्मापुरी येथील 45 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.                          

गेवराई कडकडीत बंद.उपविभागीय अधिकार्‍यांनी घेतला आज आढावा.पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट.

गेवराई (प्रतिनीधी )- बीड जिल्ह्याभोवती कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. गेवराईमध्ये ४४ रुग्ण आढळून आल्यानंतर शहरात संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी ८ ऑगस्टपर्यंत शहर बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज गेवराई शहर कडकडीत बंद होते. उपविभागीय अधिकारी टिळेकर यांनी बंद बाबतचा आढावा घेत काही सूचना प्रशासकीय अधिकार्‍यांना दिल्या. ज्यांना प्राथमिक लक्षणे आढळतील, अशा लोकांनी न घाबरता आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी संजय कदम यांनी केले आहे.  दरम्यान पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार व अतिरिक्त पोलिस अधीक्षक कबाडे यांनी शहराला भेट दिली. 
 ६ ऑगस्टपर्यंत गेवराई शहर बंद करण्याचा निर्णयजिल्हाधिकार्‍यांनी घेतल्यानंतर आज सकाळपासून शहर कडकडीत बंद आहे. अत्यावश्यक सेवांची सहा शासकीय कार्यालये वगळता महसूल, पोलिस, ग्रामविकास, नगरविकास, कृषि व आरोग्य, गेवराई शहरातील सर्व शासकीय व खासगी आस्थापना बंद राहतील. वरील सहा विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्राद्वारे शहराअंतर्गत प्रवास करू शकतील. गेवराई शहरातील नागरिकांना इतर जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाहीत. परंतु अत्यावश्यक वैद्यकीय पाससाठी गेवराई शहरातील नागरिकांनी ऑनलाईन अर्जुुु. र्लेींळव१९ाहिेश्रळलश.ळप या संकेत स्थळावर पास प्राप्त करता येईल. आज शहरात कडकडीत बंद होते. उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी बंद बाबतचा आढावा घेत संबंधित विभागाला काही सूचना केल्या आहेत. ज्या नागरिकांना प्राथमिक लक्षणे आढळून येतील त्या नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांनी केले आहे.

नेकनूर अनिश्‍चित काळासाठी बंद.कुटीर रुग्णालयातील सर्व रुग्णांचे घेतले स्वॅब.

नेकनूर (प्रतिनीधी ) बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली अहे. कुटीर रुग्णालयातील एक महिला कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने सदरील या कर्मचार्‍याचा अनेक ठिकाणी संपर्क आल्याने अनिश्‍चित काळासाठी नेकनूर हे गाव बंद करण्यात आला आहे. रुग्णालयातील सर्व कर्मचार्‍यांचे स्वॅब काल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 
 नेकनूर येथे आतापर्यंत पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  या रुग्णांपैकी एक रुग्ण कुटीर रुग्णालयातील महिला कर्मचारी आहे. सदरील महिला कर्मचारीचा अनेक ठिकाणी संपर्क आल्याने नेकनूर अनिश्‍चित काळासाठी जिल्हाधिकारी यांनी आजपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व गाव कडकडीत बंद आहे. बंदची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली असून रुग्णालयातील ८९ कर्मचार्‍यांचे स्वॅब काल तपासणीसाठी पाठवलेले आहेत. या स्वॅबच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे

सिरसाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी नगदी रकमेसह सोन्याचे दागिने पळविले.

परळी वैजनाथ (प्रतिनीधी )- धारूर तालुक्यात असलेल्या फकीर जवळा येथे घरफोडीची घटना घडली असून चोरट्यांनी घरातील नगदी रकमेसह सोन्याचांदीचे दागिने असा एकूण २ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
अरुण शिवाजी पवार हे कामानिमित्त वडवणी येथे गेले होते. त्यांच्या घरी त्यांची पत्नी व इतर सदस्य होते. अज्ञात चोरट्यांनी परवा रात्री घरातील नगदी १ लाख ५२ हजार व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घरात चोरी झाल्याचे पवार यांच्या पत्नीच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पती अरुण पवार यांना दिली. पवार यांनी सिरसाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे

* वैद्यकीय शिक्षण विभागाचा शासन आदेश जारी.सदस्यांमध्ये आ. संजय दौंड, सौ. जयश्री साठे, डॉ. मधुसूदन काळे, विलास सोनवणे, रणजित लोमटे आदींचा समावेश.

मुंबई - : अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाची नव्याने स्थापना करण्यात आली असून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ना. मुंडे यांच्या सह १० अशासकीय व ५ शासकीय अशा १५ सदस्यांचे हे अभ्यागत मंडळ रुग्णांना आणखी चांगल्या व वेळेवर उपचाराच्या सोयी मिळाव्यात यासह रुग्णालयातील अन्य सोयी सुविधांसाठी काम करणार आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्रालयाच्या वतीने अभ्यागत मंडळ पुनर्रचनेचा शासन निर्णय आज (दि. २९) रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
या शासन निर्णयानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे अध्यक्ष असलेल्या हा अभ्यागत मंडळामध्ये अंबेजोगाई येथील आ. संजय दौंड, सौ जयश्री पृथ्वीराज साठे, सौ. समीना खालेद चाउस, परळी येथील डॉ. मधुसूदन काळे, अंबेजोगाई येथील श्री. विलास सोनवणे, डॉ. हनुमंत चाफेकर, श्री. रणजित लोमटे, श्री. कचरू सारडा, तसेच पत्रकार गजानन मुडेगावकर हे दहा अशासकीय सदस्य असतील.
तसेच या अभ्यागत मंडळामध्ये शासकीय सदस्य म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभागीय आरोग्य उपसंचालक, अंबेजोगाई नगर पालिकेचे आरोग्य समितीचे अध्यक्ष, एक कर्मचारी प्रतिनिधी आणि अभ्यागत मंडळाचे विभाग प्रमुख असे पाचजण शासकीय पदसिद्ध सदस्य म्हणून काम पाहतील.
रुग्णालयास प्राप्त होणाऱ्या शासकीय व इतर निधीचा योग्य विनियोग होऊन त्याचा पुरेपूर वापर सुविधांसाठी आवश्यकतेनुसार व्हावा याचे व्यवस्थापन करण्यासाठी, जनतेच्या तक्रारी सोडवून त्यांना योग्य उपचार वेळेत मिळवून देण्यासाठी, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती, वर्तन आदींचे नियमन करणे, रुग्णालय परिसर तपासणी, कामकाजाचा आढावा, रुग्णालयास प्राप्त होणाऱ्या देणग्या व त्याचा योग्य विनियोग, यांसह आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी करून रुग्णालयात सुसज्जता व सुसूत्रता आणणे हे या अभ्यागत मंडळाचे प्रमुख उद्दिष्ट असते.

*रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाउन होणारा खर्च टाळता यावा हेच उद्दिष्ट - धनंजय मुंडे*

दरम्यान कोविड १९ चा जिल्ह्यात प्रसार सुरू झाल्यापासून अतिशय सतर्क आणि दक्ष राहून बीड जिल्ह्यातील आरोग्यसुविधांसाठी कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून देऊन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या काही दिवसात दक्ष पालकाची भूमिका बजावली आहे. 

स्वाराती महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत. स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय हे मोठी क्षमता असलेले रुग्णालय असून, येथील एमआरआय मशीनचा प्रश्न नुकताच मार्गी लागला आहे. येणाऱ्या काळात इथे परिपूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून गंभीर आजारांवरील रुग्णांना मोठ्या शहरात लाखो खर्चून उपचार घ्यावे लागतात, हे थांबवणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे ना. धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटले आहे.

Wednesday, July 29, 2020

माध्यमिक शालांत परीक्षेत ससाणे. वीर .गवळी.धसे.वासनिक.शरणागत यांचे नेत्रदीपक यश.

बीड (प्रतिनिधी)संपूर्ण जगभर कोरोणाने धुमाकूळ घातल्या नंतर खूप उशिराने दहावीचे निकाल लागले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्य दहावी बोर्डाचे निकाल मध्ये, बीड जिल्ह्यातील अनेक गुणवंत विद्यार्थी त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे त्यांची नावे पुढील प्रमाणे परिवारातील पाल्यांनी यश संपादन केले आहे  त्यामध्ये  कु.कृतिका किरण ससाने 91% संस्कार विद्यालय बीड, चि.सुशांत सुभाष 90.40%, चंपावती विद्यालय बीड, चि.आपूर्व मोहन गवळी 90% चंपावती इंग्लिश स्कूल बीड, कु. कांचना अनंत धसे 85% चंपावती इंग्लिश स्कूल बीड, कु.मृणाली प्रशांत वासनिक 79.21%, तुलसी इंग्लिश स्कूल बीड प्रशांत विश्वनाथ शरणागत 41% यांनी दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे, त्यांच्या अभ्यासाची सुनियोजित वेळा पञक तयार करून त्यांनी हे यश संपादन केले आहेत शाळेतील मुख्याध्यापक, गुरुजन वर्गाने सांगून दिलेल्या अभ्यासाच्या योग्य पद्धतीने केल्या मुळे या विद्यार्थ्यांना उत्तुंग झेप घेतली आहे, घरातील अभ्यासासाठी असलेले आई वडीलांचे अभ्यास योग्य पोषक वातावरण देखील महत्त्व असतं असं या विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितले, कठोर परिश्रम दहा/दहा तास अभ्यास केल्या नंतर आशा यश संपादन केले जाऊ शकते, त्यांच्या पुढील शैक्षणिक कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत व त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन वर्षा होत आहे.

कनिष्ठ महाविद्यालय हिन्दी अध्यापक संघाच्या सदस्यपदी प्रा.हरिष मुंडे यांची निवड .


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील वैद्यनाथ महाविद्यालयातील हिन्दी विभागाचे प्रा.हरिष मुंडे यांची नुकतीच कनिष्ठ महाविद्यालय हिन्दी अध्यापक संघ महाराष्ट्र राज्य औरंगाबाद विभागाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. 
    यानिवडीबाबत प्रा.हरिष मुंडे राज्य अध्यक्ष प्रा.डॉ. मिलींद कांबळे यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. प्रा.हरिष मुंडे वैद्यनाथ महाविद्यालयात हिन्दी विषयाचे प्राध्यापक आहेत. विद्यार्थी प्रिय व मनमिळाऊ स्वभाव असणारे प्राध्यापक मुंडे यांच्या या निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 
   हिन्दी राष्ट्र भाषेचा प्रचार आणि प्रसार तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील हिन्दी भाषा संदर्भात निर्माण होणाऱ्या प्रश्नावर आपण संघटनेच्या मार्फत काम करू असे ते म्हणाले. प्रा.हरिष मुंडे यांचे प्रा.पी.ए.कराड, प्रा.नारायण पाळवदे, प्रा.मनोज. फड, प्रा.अरूण ढाकणे, प्रा.रविकांत कराड व सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.

राज्यातील विज ग्राहाकांनसाठी खुशखबर 20 ते 30 टक्के वीज बिलात मिळणार सुट !

मुंबई – राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या वाढीव वीज बिलात 20 ते 30% सूट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 93% वीज ग्राहकांना वीज बिल सूट दिल्यानंतर फायदा होणार आहे. वीज बिल सूट देण्यासाठी जानेवारी ते मार्चमधील वीज युनिटचा विचार केला जाणार असून वीज बिल सूट देण्याबाबत राज्य सरकार MERC ला प्रस्ताव देणार आहे.
दरम्यान MERC ने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर राज्यातील एकूण 73 लाख घरगुती वीज ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. वाढीव वीज बिलांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बैठक घेतली. या बैठकीला ऊर्जामंत्री नितीन राऊत, अनिल परब उपस्थित होते. या बैठकीत वीज बिलात सूट देण्याबाबत MERC ला प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.         

गेवराई-बीड महामार्गावर अज्ञात चोरट्यांकडून एसबीआयचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न.

* सायरन वाजल्याने प्रयत्न फसला चोरट्यांनी ठोकली धूम.

गेवराई (प्रतिनीधी ) अज्ञात चोरट्यांनी गेवराई- बीड या राष्ट्रीय महामार्गावरील माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या कार्यालया शेजारील एस.बी.आय बँकेचे एटीएम मशीन फोडून पैसे लांबविण्याचा प्रयत्न करीत असताना सायरनचा आवाज झाल्याने त्यांचा प्रयत्न फसला व चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना मंगळवार दि.२८ रोजी मध्यरात्री घडली.
गेवराई-बीड या राष्ट्रीय महामार्गावर माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या कार्यालयाच्या शेजारी एस.बी.आय बँकेचे एटीएम मशीन बसविण्यात आले होते. मंगळवार दि.२८ रोजी मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनचे शटर उघडून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीन फोडताच सायरनचा आवाज झाल्याने चोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही एटीएम मशीन फोडण्याचा दुसरा प्रकार असून या आधी सुध्दा काही अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन फोडले होते. दरम्यान ते अज्ञात चोरटे येथील सिसीटिव्ही मध्ये कैद झाले असताना त्याचा अजून त्यांचा शोध लागला नाही तोच हा दुसरा प्रकार घडला असून हा प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक एटीएम मशीन जवळ सुरक्षारक्षक नेमने आवश्यक आहे. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

जिल्हारूग्णालयातील कोविड वार्डातला कोरोना बाधीत आरोपी पळाला .

* सात दिवसांपासून कोविड रुग्णालयात घेत होता उपचार.

बीड (प्रतिनीधी )ः-जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या लक्षणीय वाढत असताना जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढेल, अशी घटना आज सकाळी उघडकीस आली. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी कोरोना बाधीत आढळल्याने त्याला जिल्हा रुग्णालयाच्या कोविड वॉर्डात उपचारासाठी २२ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. गेल्या सहा दिवसांपासून तो त्या ठिकाणी उपचार घेत होता मात्र काल रात्री त्याने उपस्थित पोलिस गार्डाची नजर चुकवून पळ काढला. आज सकाळी जेंव्हा कोरोना बाधीत आरोपी पळून गेल्याची माहिती उघड झाली तेव्हा पोलिस प्रशासनासह आरोग्य प्रशासन हादरून गेले. गार्ड असताना आरोपी पळून गेल्याने एकीकडे संताप व्यक्त होत असतानाच दुसरीकडे हा बाधीत असल्यामुळे तो आता किती जणांच्या संपर्कात येईल आणि कोरोना संसर्ग किती प्रमाणावर वाढविल याची धास्ती आरोग्य प्रशासनाला आहे. याआधीही निगेटिव्ह आलेला रुग्ण क्वॉरंटाईन सेंटरमधून पळून गेला होता. बाधीत  असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रयत्नांची परिकाष्ठा करत आहेत. 
केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथील पुजार्‍याची हत्या करुन फरार झालेल्या ईटकूर ता.कळंब येथील ५५ वर्षीय आरोपीच्या कळंब येथून पोलीसांनी मुसक्या अवळून न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आले होते. या वेळी   न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. कोठडीत ठेवण्याअगोदर कोरोना टेस्ट करणे बंधनकारक असल्याने त्या आरोपीची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्या वेळी २२ जुलै रोजी कोरोना बाधीत आढळून आल्याने त्याला मुख्यालय पोलिसांमार्फत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. गेल्या सहा ते आठ दिवसांपासून सदरच्या आरोपीवर बीडच्या कोविड रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्याच्या बंदोबस्तासाठी दोन गार्ड ठेवण्यात आलेले होते. काल रात्री मात्र खुनाच्या गुन्ह्यातील आणि कोरोना बाधीत असलेल्या या आरोपीने आपला रंग दाखवला आणि दोन्ही गार्डांची नजर चुकवून त्याने कोविड रुग्णालयातून पळ काढला. तो अद्याप मिळून आला नाही. एक तर तो खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातला आरोपी आणि त्यात तो कोरोनाबाधीत असल्याने पोलिस प्रशासनासह आरोग्य प्रशासनाची या घटनेने झोप उडवून टाकली असून हा आरोपी आता बाहेर किती जणांना भेटणार, कोरोना संसर्ग किती वाढवणार याची चिंता वाढली असून सदरच्या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिस प्रयत्नांची परिकाष्ठा करत असल्याचे सांगण्यात येते. यंत्रणेकडून खबर्‍यामार्फत माहिती घेणे सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर.राज्याचा निकाल ९५.३० टक्के, पुन्हा मुलींचीच बाजी!!

   
मुंबई / पुणे :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल एकूण ९५.३० टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. याही वेळी मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.


 विद्यार्थीनी - ९६.९१ टक्के
विद्यार्थी - ९३.९० टक्के 
यंदाही राज्यात मुली अव्वल
सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा
सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२.७३ टक्के
मागील वर्षापेक्षा १८ टक्क्यांनी निकाल वाढला

कोकणाने मारली बाजी पुन्हा एक नंबर
विभाग 

पुणे  ९७.३४
औरंगाबाद  ९२.००
नागपूर ९३.८४
नाशिक ९३.७३
मुंबई   ९६.७२
कोल्हापूर ९७.६४
लातूर ९३.९
अमरावती ९५.१४
कोकण ९८.७७
नागपूर ९३.८४

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज जाहीर झाला आहे. हा निकाल आज दुपारी १ वाजता पाहू शकणार आहात. 

मार्च २०२० मध्ये दहावी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादीत केलेले गुण पुढील संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. ही माहितीची प्रत / प्रिंट घेता येईल. www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com, www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

या ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांने संपादीत केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन http://verification.mh- ssc.ac.in स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी गुरुवार ३० जुलै २०२० ते शनिवार ८ ऑगस्ट २०२० पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरुवार ३० जुलै २०२० ते मंगळवार १८ ऑगस्ट२०२० पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट  कार्ड, क्रिडेट कार्ड, युपीएल, नेटबँकिंगद्वारे भरता येईल.

मार्च २०२०परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असे त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
मार्च २०२० च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस सर्व विषयासह प्रविष्ठ होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी / गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या जाहीर करण्यात आले .

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पार्थ पवार उतरणार का?

पुणे – पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार सारंग पाटील यांनी माघार घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा सुरु होती. याबाबत राष्ट्रवादीने स्पष्टीकरण दिलं असून पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पार्थ पवार उतरणार नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. या पराभवाला सामोरे गेल्यानंतर पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रीय होताना दिसत आहेत. त्यामुळे ते ही निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. परंतु राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण आल्याने या चर्चेला आज अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या निवडणुकीत पार्थ पवार पदवीधर मतदारसंघातून नशीब आजमवणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या, मात्र हे वृत्त राष्ट्रवादीने फेटाळून लावले आहे.

Tuesday, July 28, 2020

बकरी ईद निमित्त बीड नगर परिषदेची शहरातील कुर्बानीसाठी तात्पुरत्या 6 ठिकाणांना परवानगी.


बीड (प्रतिनिधी) बकरी ईद असल्यामुळे दि 01 आॅगस्ट 2020 रोजी सालाबाद प्रमाणे याही वर्षी ईद निमित्त नागरिक दिनांक 01.08.2020 रोजी नियमा नुसार कुर्बानी योग्य प्राण्यांची कुर्बानी देतात यासाठी नगर परिषदेने शहरातील विविध भागात तात्पुरते कुर्बानीसाठीची 6 ठिकाणे निश्चित केलेले आहेत तथापी सध्या शहरामध्ये कारोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्यामुळे नगर परिषदेने ठरवून दिलेल्या कुर्बानीच्या ठिकाणी कुर्बानी साठी उपस्थित असणाऱ्या सर्व कसाई यांची कोरोना विषाणु ची चाचणी/तपासणी करून घेणे आवश्यक आहे ज्या योगे विषाणुचा प्रादुर्भाव होणार नाही तसेच शासनाने दिलेल्या आदेश निर्देशाची काटेकोर पणे आमलबजावणी करावी तात्पुरत्या कुर्वानीच्या ठिकाणी व समन्वय अधिकारी पुढील प्रमाणे नियुक्त करण्यात आलेले आहेत.

 1.खाँजानगर मोमीनपुरा- राजु बजार प्र.स्वच्छता निरीक्षक, 9370767476 2.आमेर कॉलणी मोमीनपुरा राजु वंजारे प्र.स्वच्छता निरीक्षक, 9370767476

3.कुरेशी मोहल्ला मोमीनपुरा राजु बंजारे प्र.स्वच्छता निरीक्षक 9370767476 

4.चाऊस गल्ली . रूपकांत जोगदंड स्वच्छता निरीक्षक 9272919193 

5.रोशन पुरा एकमिनार मस्जीद जवळ- रूपकांत जोगदंड स्वच्छता निरीक्षक 9272919193

 6.शहिनशाह नगर पटेल यांच्या घराच्या पाठीमागे - श्री प्रशांत ओव्हाळ प्र.स्वच्छता निरीक्षक

 तरी नागरिकांनी समन्वय अधिकारी यांच्याशी संपर्क करून कुर्बानी साठीची वेळ निश्चित करून घेवून कोणत्याही प्रकारे नियमाचे उल्लघंन होणार नाही याची दक्षता घ्यावी.तसेच शहरातील सर्व कसाई यांनी जिल्हाशासकीय रूग्णालय यांच्याशी संपर्क करून कोबीड-19 ची चाचणी/तपासणी करून घ्यावी असे आवाहनमुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुटे नगर परिषद बीड यांनी केले आहे.

कोविड रूग्णासाठी उपलब्ध बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन.


बीड (प्रतिनीधी )- जिल्ह्यातील खाजगी रुग्णालय आणि शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये उपलब्ध असणार्‍या बेडची माहिती नागरिकांना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असून  सदर कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. नागरिकांनी कोणत्या्‌ही रुग्णालयात दाखल होण्यासाठी काहीही अडचण येत असल्यास याबाबत माहिती साठी नियंत्रण कक्षात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे .
त्यासाठी नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून जिल्ह्या रुग्णालयाचे डॉ सचिन आंधळकर आहेत. कक्षात नियुक्त शिक्षकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांचे नाव , शाळेचे नाव आणि मोबाईल क्रमांक आदी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी )चा निकाल उद्या दुपारी १ वाजता अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार.


मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल उद्या (बुधवार, २९ जुलै) जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर केला जात असल्याचे कळवण्यात आले आहे.

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक, कोल्हापूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या (बुधवार) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्ष आमचे संगोपन तुमचे ही मोहीम.भारतीय विद्यार्थी सेनेचा उपक्रम.

परळी वैजनाथ ; (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्ष आमचे संगोपन तुमचे हि मोहीम भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने राबवण्यात येत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत असून या निमित्त शिवसेना मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांत खैरे,बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव,भारतीय विद्यार्थी सेना/युवा सेना कार्यकारणी सदस्य अंकित प्रभु शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर,भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांच्या उपस्थितीत भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने वृक्ष आमचे संगोपन तुमचे या मोहीमेची सुरुवात परळी शहरातील विद्यालयाच्या शिक्षक आर.जी.निला सर,बंडू आघाव सर,
ए.एन.जाधव सर, प्रा.जगदिश कावरे सर यांना वृक्ष भेट देऊन आणि जिरगे नगर या ठिकाणी वृक्षा रोपण करत करण्यात आली.
या वेळी शिवसेना मा.उप शहर प्रमुख सतीश जगताप,भारतीय विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख मोहन परदेशी,शिवसेना उप शहर प्रमुख किशन बुंदेले,भारतीय विद्यार्थी सेना तालुका समन्वयक अमित कचरे,शहर प्रमुख,गजानन कोकिळ,शहर समन्वयक प्रसन्ना दहिवाळ, माऊली मुंडे, राहुल तिडके, बाळासाहेब सातपुते,योगेश घेवारे,बालाजी क्षीरसागर,लक्ष्मण मुंडे, सिद्धर्थ गायकवाड हे उपस्थित होते.

आपल्या आर्थिक कामाचे नियोजन आत्ताच करा. आॕगस्टमध्ये बँका तब्बल १२ दिवस राहणार बंद !!

परळी वैजनाथ ;(प्रतिनिधी) ऑगस्टमध्ये अनेक राष्ट्रीय व स्थानिक सण उत्सव असल्यामुळे बँका जवळपास १२ दिवस बंद राहणार आहेत. या सुट्या लक्षात घेऊन नागरिकांना आपल्या आर्थिक कामांचे नियोजन करावे लागणार आहे. स्थानिक पातळीवरील सुट्यांनुसार, यात काही राज्यांत बदल होईल.
ऑगस्टमध्ये बकरी ईद, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, स्वातंत्र दिन, गणेश चतुर्थी, मुहर्रम आणि हरतालिका तीज असे अनेक सण-उत्सव आहेत. यातील काही सण-उत्सवांना राष्ट्रीय सुट्या असतात. तर काही सण-उत्सवांना प्रादेशिक-स्थानिक पातळ्यांवर सुट्या असतात. याशिवाय या महिन्यात पाच रविवार आले आहेत.

त्यातच दुसरा आणि चौथा शनिवार म्हणून ८ आणि २९ ऑगस्ट रोजी सुट्या असतील.
ऑगस्टमधील सण, उत्सवांच्या सुट्या

१ ऑगस्ट शनिवार बकरी ईद
(राजपत्रित सुटी)
३ ऑगस्ट सोमवार रक्षाबंधन
(स्थानिक सुटी)
११ ऑगस्ट मंगळवार गोकुळाष्टमी
(स्थानिक सुटी)
१२ ऑगस्ट बुधवार गोकुळाष्टमी
(राजपत्रित सुटी)
१५ ऑगस्ट शनिवार स्वातंत्र्य दिन (राजपत्रित सुटी)
२१ ऑगस्ट शुक्रवार तीज-हरतालिका (स्थानिक सुटी)
२२ ऑगस्ट शनिवार गणेश चतुर्थी
(स्थानिक सुटी)
३० ऑगस्ट रविवार मोहर्रम
(राजपत्रित सुटी)
३१ ऑगस्ट सोमवार ओनम
(स्थानिक सुटी)
रिझर्व्ह बँकेच्या कोष्टकानुसार १ आॅगस्ट रोजी बँका चंदीगड, पणजी आणि गंगटोक वगळता देशातील सर्व शहरांत बंद राहतील.


जिरेवाडी येथील कोरोना बाधित महिलेचा आज मृत्यू.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील ( 66) वर्षीय महिलेचा अंबाजोगाई येथे आज मंगळवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
परळी तालुक्यातील जिरेवाडीची 66 वर्षीय महिला दि.19 जुलै रोजी कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आली होती.पाॕझिटिव्ह आढळुन आल्याने अंबाजोगाई येथे त्या महिलेवर उपचार चालु असताना तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.परळी तालुक्यात आज पर्यत कोरोनाने 4 जणांचा मृत्यू झाला आहे.असून बीड जिल्ह्यातील कोरणा मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 27 वर पोहोचली आहे.

Monday, July 27, 2020

बीडमधून सुरू झालेले इझीटेस्ट ई-लर्निंग अँप राज्यातील अकरावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना खुले.ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले उदघाटन.


बीड (दि. २७) ---- : अकरावी - बारावी मध्ये प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे कोरोनाच्या काळात नुकसान होऊ नये या उद्देशाने बीड जिल्हा परिषद व अभिनव आयटी सोल्युशन्स पुणे यांनी संयुक्तरित्या तयार केलेले इझिटेस्ट हे ई - लर्निंग अँप आज राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत खुले करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते एक वेबिनार द्वारे या अँपचे उदघाटन करण्यात आले.
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अकरावी - बारावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळून त्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळावेत यासाठी ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पुढाकार घेत बीड जिल्हा परिषद व पुणे येथील अभिनव आयटी सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे अँप जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिले होते. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी या अँपद्वारे मोफत ऑनलाईन धडे घेतले.
आज या अँपचे राज्यस्तरावर लोकार्पण करण्यात आले. राज्यातील कुठल्याही विद्यार्थी - शिक्षकांना आता या अँपद्वारे ऑनलाईन शिक्षण घेता - देता येणार आहे. यावेळी ना. मुंडे यांच्यासह आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, वेबिनारच्या माध्यमातून अभिनव आयटी सोल्युशन्सचे श्री. भुतडा तसेच विविध विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
इझिटेस्ट या अँपमध्ये बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी अभ्यासक्रमाला अनुसरून तयार केलेले ऑनलाईन लेक्चर्स युट्युबच्या माध्यमातून अपलोड केले जातात तसेच ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या प्रश्न - शंकांचे समाधान करण्यात येते.
या अँपला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेत आता हे अँप राज्यातील अकरावी बारावी मध्ये प्रवेश घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत खुले करण्यात आले आहे. शिक्षकांनी नवनवीन संकल्पना राबवून या अँप मध्ये अकरावी बारावीचा अभ्यासक्रम सुकर करावा तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून या अँपचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी केले आहे.

*असे आहे अँप*

इझिटेस्ट हे अँप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून यामध्ये तब्बल ७०० तासांची रेकॉर्डिंग असलेले ऑनलाईन वर्ग (classroom) पद्धतीने विषय पाठनिहाय अपलोड केलेले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील शिक्षकांनीच हे पाठ अत्यंत अभिनव पद्धतीने तयार केलेले आहेत. 
कुठल्याही अँड्रॉइड मोबाईल फोनमध्ये हे अँप डाउनलोड करून अकरावी - बारावीच्या विद्यार्थ्यांना आता मोफत धडे व प्रश्नोत्तरे मिळवता येणार आहेत. 

अँप ची लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=ezee.abhinav.ezeetest

पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे शेतक-यांचा विमा भरण्याचा प्रश्न सुटला !खामगांव,मालेवाडी आले प्रधानमंत्री विमा पोर्टलवर.शेतक-यांनी विमा भरण्यास केली सुरवात.


परळी दि. २७ ------- पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून तालुक्यातील मालेवाडी, खामगांव ही गांवे आता प्रधानमंत्री विमा पोर्टलमध्ये समाविष्ट झाली आहेत. गावातील शेतक-यांनी या पोर्टलवर  विमा भरायलाही सुरूवात केली आहे. दरम्यान, पंकजाताई मुंडे यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल  दोन्ही गावच्या शेतक-यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
  मालेवाडी व खामगांव ही गांवे तेथील ग्रामस्थांच्या मागणीवरून पंकजाताई मुंडे यांनी मंत्री असताना  परळी तालुक्यात समाविष्ट करून घेतली होती. तालुक्याचे ठिकाण बदलल्याने या गावांना केंद्राच्या गॅझेटमध्ये येण्यासाठी विलंब लागला.  प्रधानमंत्री पीक योजनेतंर्गत विमा भरण्यासाठी या गावातील शेतक-यांना मात्र यामुळे मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत होते. शेतक-यांनी ही अडचण पंकजाताई मुंडे यांच्या कानावर घातली असता त्यांनी गेल्या आठवडयात जिल्हाधिकारी रेखावार यांना दूरध्वनी करून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय पातळीवर लगोलग हालचाली केल्या आणि काल या दोन्ही गावाचा समावेश प्रधानमंत्री विमा पोर्टलमध्ये झाला. शेतक-यांनी या पोर्टलवरून विमा भरायला सुरवातही केली आहे. शेतक-यांच्या मदतीला धावून येत विम्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल खामगावचे सरपंच श्रीराम बडे, ग्रा. प. सदस्य विश्वास बडे, मालेवाडीचे सरपंच भूराज बदने व शेतक-यांनी पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.
••••

श्रावण महिण्यात पहिल्यांदाच भाविकांनसाठी प्रभू वैद्यनाथाचे मंदिर बंद.

परळी वैजनाथ : श्रावणात पहिल्यांदाच परळीतील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर बंद
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने देवाला देखील सोडलेलं नाही. परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे  असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मंदिर श्रावणात पहिल्यांदाच भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. इतिहासात पहिल्यांदाच वैद्यनाथ मंदिर बंद करण्यात आल्याने भाविकांमध्ये नाराजी दिसून आली. मध्यरात्री मुख्य पुजाऱ्याकडून वैद्यनाथाची पूजा करण्यात आली. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी व तिसऱ्या सोमवारी विशेष महत्त्व असते देशभरातून इथे भाविक येतात. मात्र कोरोना महामारीमुळे  मंदिर बंद करण्यात आल्याने भाविकांनी मंदिराच्या बाहेरूनच पूजा करत दर्शन घेतले. एकंदरीत वर्षानुवर्षे गर्दीने फुलून निघणारे वैद्यनाथ मंदिर आज मात्र शांत व सुनेसुने  दिसून आले.

मा.ना.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त. विजय खोसे यांची मानवतावादी सद् भावन.


परळी वैजनाथ ;-महाराष्ट्र राज्य च्या माजी ग्राम विकास मंत्री तथा महिला बाल मंत्री बीड जिल्ह्याच्या भाग्यविधाता लोकनेत्या मा.ना. पंकजाताईसाहेब मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मा.श्री विजयकुमार खोसे यांनी  मानवतावादी सद् भावनेचे दर्शन घडविले त्यांनी व त्याच्या सहकार्यानी  बार्शी येथील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल  येथे
 यांच्या वतिने येथील  रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले.यावेळी बोलताना विजयकुमार खोसे म्हाणाले लोकनेते कै .ना.गोपीनाथ मुंडे साहेब मा.ना.ताईसाहेब .खा.डाॕ प्रितमताई मुंडे यांच्या विचारांचा मानव सेवेचा वसा पुढे चालवताना आनंद होतो .

Sunday, July 26, 2020

बीड जिल्ह्यात आतापर्यंतची विक्रमी शासकीय कापूस खरेदी. ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ जुलै पर्यंत मुदतवाढ आणि प्रक्रिया.




* जिल्ह्यातील एकूण ८० हजार ४९९ शेतकऱ्यांचा  २१ लाख २३ हजार ६६४ क्विंटल कापूस खरेदी.

बीड , दि. २६::-जिल्ह्यात 2019-20 मध्ये आतापर्यंतची विक्रमी ८० हजार ४९९ शेतकऱ्यांच्या २१ लाख २३ हजार ६६४ क्विंटल कापूसाची खरेदी करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत शेतकर्‍यांच्या सुरक्षेच्या कारणांमुळे काळजी घेऊन पावसाळा सुरु झाल्या नंतर देखील वाढीव मुदत देण्यात आली होती बीड जिल्ह्याची कापूस खरेदी प्रक्रिया  23 जुलै 2020 रोजी मुदतीअखेर पूर्ण करण्यात आली आहे.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे  यांच्या मार्गदर्शन आणि निर्देशानुसार जिल्ह्यात जास्त संख्येने ग्रेडर नियुक्त करण्यात आले आणि खरेदी प्रक्रिया करण्यात आली .
कृषी उत्पन्न बाजार समितीकडे 24 हजार 921 शेतकऱ्यांनी  नोंदणी केली होती. तसेच नोंदणी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना 1 ते 3 जून 2020 या कालावधीत नोंदणीची संधी देण्यात आली होती. त्या कालावधीत 3365 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. अशी एकूण 28 हजार 286 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शिवाजी बडे यांनी दिली. 
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ व कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत कॉटन फेडरेशनने एकूण 14 खरेदी केंद्रावर 26 जिनिंग फॅक्टरी मध्ये व सी.सी.आय एकूण 2 खरेदी केंद्रावर 10 जिनिंग फॅक्टरीमध्ये कापूस खरेदी केलीे 
 कापूस खरेदी केंद्रावरील वाहनांची गर्दी कमी करणे, खरेदी सुरळीतपणे होणे, शेतकऱ्यांना केंद्रावर जास्त दिवस ताटकळत उभे राहण्याची वेळ येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी, बीड यांचे मार्फत उपाय योजना राबविण्यात येऊन 5 ते 13 मार्च 2020 या कालावधीत सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची प्राथमिक नोंदणी करण्यात आली होती 
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या 19 जून 2020 आदेशाने नोंदणी केलेल्या व अद्याप कापूस विक्रीसाठी न दिलेल्या 12 हजार 413 शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष कापूस शिल्लक पाहणी साठी तलाठी , ग्रामसेवक यांचेमार्फत पंचनामे करण्यात आले  त्यात 3407 शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष कापूस शिल्लक असल्याचे पंचनाम्यात आढळून आले होते  .
सर्व बाजार समित्यांनी त्यांच्याकडे नोंदणी झालेल्या व शिल्लक कापूस आढळून आलेला सर्व शेतकऱ्यांना मेसेज दिलेले आहेत. व त्यांना देण्यात आलेल्या मुदतीपर्यंत त्यांच्याकडील कापूस खरेदीसाठी टोकन देऊन त्यांचे कडील कापूस खरेदी करण्यात आला,  बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना दिलेली मुदत संपली.
यापुढे कापूस विक्रीसाठी शेतकरी शिल्लक नाहीत, असे कळविले आहे. व त्यानुषंगाने जिल्ह्यातील कॉटन फेडरेशनच्या सर्व कापूस खरेदी केंद्रांत 23
 जुलै 2020 पासून खरेदी पूर्ण केलीे. प्र. विभागीय व्यवस्थापक,दि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या. विभागीय कार्यालय, परळी वै. जिल्हा बीड यांनी हंगाम 2019-2020 मधील covid-19 चे प्रादुर्भाव नंतरची शासकीय कापूस खरेदी चे कामकाज संपुष्टात आल्याचा नोंद घेण्यात आलेली असून, 
बीड जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदी 23 जूलै 2020 पासून बंद ठेवण्यात येत असून त्यास परवानगी देणेबाबत 21जुलै 2020 रोजीच्या पत्रान्वये मा. जिल्हाधिकारी, बीड यांना विनंती केलेली आहे. तसेच केंद्र प्रभारी, भारतीय कपास निगम लि. केंद्र, बीड यांनी 18 जुलै 2020 रोजी पर्यंत तर केंद्र प्रभारी, भारतीय कपास निगम लिमिटेड केंद्र गेवराई यांनी दि.14 जुलै रोजी पर्यंत शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी करण्यात आला 
 प्राथमिक नोंदणी केलेल्या एकूण 28 हजार 286 शेतकऱ्यांपैकी  प्रत्यक्ष कापूस शिल्लक असल्याचे आढळून आलेल्या आणि अद्याप कापूस खरेदी बाकी असलेल्या सर्व 3080 शेतकऱ्यांना कापूस केंद्रावर आणण्यासाठी संदेश देण्यात आले होते .
 कापूस विक्रीसाठी आणण्यासाठीच्या बाजार समिती मार्फत देण्यात आलेल्या  23 जुलै 2020 रोजी अखेर मुदत पूर्ण झाली असल्याने 
प्र. विभागीय व्यवस्थापक,दि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित, विभागीय कार्यालय परळी-वैद्यनाथ जिल्हा बीड व केंद्र प्रभारी, सी.सी.आय. बीड /गेवराई यांनी ते या हंगामातील कापूस खरेदी बंद करण्यात येत असल्याचे संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीना कळविले
००००

पत्नीच्या खुनाची शिक्षा झालेला पॅरोलवर असलेल्या आरोपीची गळफास घेवून आत्महत्या.

* पत्नीच्या खून प्रकरणी औरंगाबादच्या जेलमध्ये भोगत होता शिक्षा.
 
गेवराई ;- (प्रतिनीधी ) एक महिन्याच्या पॅरोलवर असलेल्या एका कैद्याने आज दुपारी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील जातेगाव गावखोर तांडा येथे घडली. सदरील कैदी पत्नीच्या खुनातील शिक्षा औरंगाबादच्या जेलमध्ये भोगत होता. दोन दिवसात त्याला जेलमध्ये हजर व्हायचे होते त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. भरत ताराचंद पवार ( रा. जातेगाव गावखोर तांडा. वय 26 वर्षे) याने आपल्या पत्नीचा खून केलेला आहे. या प्रकरणी त्याला शिक्षा झाल्याने त्यास हार्सुल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तो एक महिन्यापूर्वी पॅरोलच्या सुट्टीवर आला होता. ही सुट्टी एक महिन्याची होती. त्याची मुदत दोन दिवसाने संपत असल्याने त्याला जेलमध्ये हजर व्हायचे होते मात्र त्याने आज दुपारी कॅनॉल शेजारी असलेल्या एका उंबराच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी तलवाडा पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. ठाण्याचे पीआय उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अमलदार खाडे हे पुढील तपास करत आहे.

मा.उद्धव ठाकरे साहेब तुम्ही खुदा बनू नका, लॉकडाऊन वाढवू नका- अॕड प्रकाश आंबेडकर.


पुणे,दि.२६ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपण कोरोनामुळे होणारा मृत्यू दर आटोक्यात आणू, असे म्हटले आहे. त्यावर उद्धवजी तुम्ही खुदा बनू नका,अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे
ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे,भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही,ते कोरोनाने नाही तर रोजगार बुडाल्याने मरतील. त्यामुळे तुम्ही लॉकडाऊन वाढवू नका,अस ही मागणी ही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
              
 भारतात 40 टक्के नागरिक कोरोनाने बाधित होतील असे अमेरिकेच्या हाफकीन संस्थेने सांगितले होते. पण एकाच आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, भारतात कोरोना पसरणार नाही. भारतातील नागरिकांची प्रतिकारशक्ती चांगली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे म्हणणे खरे ठरले असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले
 बुद्धाने एक सत्य वचन सांगितले आहे की, माणूस जन्माला आला तर त्याला मृत्यू हा निश्चित आहे, त्यामुळे शासनाला विनंती आहे की, देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या कामाला लागावे तरच माणसं जगतील अन्यथा उपासमारीने मरतील. अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की आपण लॉकडाऊन वाढवु नका. असेही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणाले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

आरोग्य विभागात मुलाखत न घेता १७ हजार जागांची भरती करणार;-ना.राजेश टोपे


औरंगाबाद : राज्यावर कोरोनाचे संकट असतानाच बेरोजगार तरूणांना  मोठा दिलासा मिळणार आहे.सध्या असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागात मुलाखतीशिवाय  १७ हजार जागा लवकरच भरणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यावर कोरोनाचे संकट असताना नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या बेरोजगार तरूणांना दिलासा देणारी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.औरंगाबाद मधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले आरोग्यमंत्री टोपे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.राज्याच्या आरोग्य विभागात मुलाखतीशिवाय १७ हजार जागा लवकरच भरल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आरोग्य विभागात आता मुलाखतीशिवाय कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. मेरिटवर थेट भरती करण्याला परवानगी मिळाली आहे आणि राज्यात १७ हजार जागा लवकर भरल्या जाणार आहेत असे टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले.

दूध दरवाढीसाठी महायुतीकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक-आ. विनायक मेटे


बीड (प्रतिनीधी )- महायुतीकडून राज्यभरातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना वाढीव १० रुपये लिटरमागे दरवाढ व भुकटीला ५० रुपये प्रति किलो अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी यापूर्वी दूध पिशव्या जिल्हाधिकारी व तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवून आंदोलन पुकारण्यात आले होते. या मागणीची दखल राज्य सरकारने घेतली नसल्याने महायुतीकडून १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा महायुतीकडून  करण्यात आली आहे. शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांनी याबाबत माहिती दिली आहे.    महायुतीचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आ विनायक मेटे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. १ ऑगस्ट रोजी राज्यभरात हे दूध आंदोलन पेटणार असून दूध उत्पादक शेतकर्‍यांनी त्या दिवशी दूध संघाला दूध विकायचे नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे. दूध रस्त्यावर ओतणे, नासाडी करणे असे प्रकार न करता गोरगरिबांना दूध मोफत वाटण्यात येणार असल्याचे आ मेटे म्हणाले. राजू शेट्टी यांचे आंदोलन हे राज्य सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात आलेला आहे. दुधाला प्रति लिटर १० रुपये दरवाढ व भुकटीला ५० रुपये अनुदान द्यावे ही मुख्य मागणी आंदोलनाची असणार आहे. जे दूध संघ यामध्ये सहभागी होणार नाहीत त्यांच्या वाहनांची हवा सोडून दिली जाणार असल्याचे महायुतीकडून जाहीर करण्यात आले आहे. या आंदोलनात सर्व दूध उत्पादक शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महायुतीच्या वतीने आ विनायक मेटे यांनी केले आहे.

विटभट्टी चालकाशी महिलेनीलगट.करताना बनविला व्हीडीओ व मागितली दहा लाखाची खंडणी.

* केज तालुक्यात हनी ट्रॅपचा पर्दाफाश
एकास केले जेरबंद, सहा आरोपी 
फरार आरोपीत दोन महिलांचा सहभाग .

* तरुणाला जाळ्यात ओढून १० लाखांच्या
खंडणीसाठी ठेवले होते डांबून घरी बोलावून जबरदस्तीने अश्‍लील व्हिडिओ काढले.व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली होती धमकी .

बीड  (प्रतिनीधी )- विटभट्टी चालकास भ्रमणध्वनीवरून तुमच्याकडून विट खरेदी करायची आहे, असे म्हणत महिलेने त्यास मांजरसुंबा येथे बोलवले. तेथून त्याला थेट आष्टी येथे घेऊन जात एका घरामध्ये ठेवले. त्याचवेळी सदरच्या महिलेने आपल्या अन्य साथीदारांना बोलवून त्याला मारहाण करत स्वत:सोबत लगट करण्यास भाग पाडून त्याचे चित्रीकरण करत १५ लाख रुपये दे नसता ही चित्रफिती व्हायरल करील, अशी धमकी दिली. विटभट्टी चालकाने आपल्या घरी दहा लाख रुपये तयार ठेवण्याचे सांगितले. महिलेचा साथीदार पैशे घेण्यासाठी त्या विटभट्टी चालकासोबत थेट केज तालुक्यातील टाकळी गावात पोहचला. मात्र या वेळी विटभट्टी चालकाच्या नातेवाईकांना संशय आला आणि ‘हनी ट्रॅप’चे बिंग फुटले. या प्रकरणी थेट नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून यातील एका आरोपीला पकडण्यात आले असून इतर आरोपी फरार आहेत. आरोपींमध्ये दोन महिलांचा सहभाग आहे. 
आष्टी येथील एका महिलेने भ्रमण ध्वनीवरून नितीन रघुनाथ बारगजे (रा. टाकळी ता. केज) या तरुणास फोन केला. तुमच्याकडून विटा खरेदी करायच्या आहेत, असे म्हणत सदरील तरुणास मांजरसुंबा येथे बोलावून घेतले. या ठिकाणीत त्यांच्यामध्ये विट खरेदी संदर्भात बोलणी झाली. माझ्या सोबत कोणी नाही, मला पाटोद्यापर्यंत सोडा, अशी विनवणी महिलेने नितीन बारगजे यांच्याकडे केली. त्यानुसार बारगजे पाटोद्यापर्यंत सोडण्यास गेले. या ठिकाणाहून पुन्हा महिलेने विनवणी केली, मला आता माझ्या आष्टी गावी सोडा, असे म्हटले, त्यानुसार बारगजे यांनी महिलेस घरी सोडले. घरी गेल्यानंतर महिलेने चहापाण्याचा आग्रह केल्यानंतर नितीन बारगजे याने चहा घेतला. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने बारगजे यास एका रुममध्ये कोंडले आणि महिलेने जबरदस्तीने लगट केली. त्याचा व्हिडिओ महिलेच्या साथीदारांनी काढला. हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करू, असा दम देत त्यास मारहाण करत १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यानुसार १० लाख रुपये देतो, त्यासाठी माझी शेती विकतो, अशी विनवणी बारगजे यांनी केल्यानंतर त्या महिलेने पैशासाठी बारगजे यांच्यासोबत एकास मोटारसायकलवर केज येथे पाठविले. केज येथे आल्यानंतर बारगजे यांनी आपल्या मित्र परिवाराकडे दहा लाख रुपये हात उसने मागितले. अचानक दहा लाख रुपये कशाला हवेत? असा प्रश्‍न काही मित्रांना पडल्यानंतर यात काही तरी काळंबेरं आहे असा संशय त्यांना आला. बारगजे आणि त्याच्या मित्रांनी प्लॅनिंग केली. आपल्या सोबत आलेल्या व्यक्तीस विश्वासात घेत ‘तुमचे अन्य लोक पैशासाठी बोलवा, व्हिडिओ क्लिप डिलिट करून प्रश्‍न कायमचा मिटवा, तुमचे पैसे देऊन टाकू’, असे म्हटल्यानंतर संबंधिताने आपले साथीदार केजमध्ये बोलवून घेतले. तिघे जण स्कॉर्पिओमध्ये आले. या घटनेची माहिती केज पोलिसांना तत्पूर्वीच देण्यात आली होती. त्यानुसार नितीन बारगजे याच्याकडून खंडणी वसूल करणार्‍या शेखर पाठक यास पोलिसांनी अटक केली. अन्य आरोपी मात्र फरार झाले. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात नितीन बारगजे यांच्या फिर्यादीवरून आरोपी कैलास गुजर, प्रशांत श्रीखंडे, योगेश मुटकुळे, वैभव पोकळे, शेखर वेदपाठक, सुरेखा शिंदे, सविता वैद्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी डीवायएसपी राहूल धस, नेकनूर पोलिस ठाण्याचे एल.व्ही. केंद्रे यांनी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत हे करत आहेत. या प्रकरणातील एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे विजय गोसावी आणि त्यांच्या टिमने ताब्यात घेतला.

Saturday, July 25, 2020

श्रीमती सरूबाई शिवाप्पा नावंदे यांचे निधन.अशोक नावंदे यांना मातृशोक.

परळी वैजनाथ;- (प्रतिनिधी) श्रीमती सरूबाई शिवाप्पा नावंदे रा.परचुंडी ता.परळी वैजनाथ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 100 वर्षाच्या होत्या. आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांच्या त्या मातोश्री होत.
परचुंडी येथील जेष्ठ नागरिक श्रीमती सरूबाई नावंदे यांचे शनिवार दि.25 जुलै रोजी निधन झाले. रविवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिवावर परचुंडी ता.परळी वैजनाथ येथे अंत्यविधी होणार आहेत. त्या 100 वर्षाच्या होत्या. विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. संस्कारशिल कुटूंबाचा त्या आधारवड होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांच्या त्या मातोश्री होत्या. औरंगाबाद येथील प्रसिद्ध प्रेस छायाचित्रकार भीमाशंकर नावंदे यांच्या त्या काकु होत.

हाउसिंग सोसायटी मधील कोरोना बाधीत बेजवाबदार व्यक्ती गल्लीबोळात फिरला.


* फुलेनगरमध्ये हातात दगडे घेवून हुसकावून लावला.

अंबाजोगाई (प्रतिनीधी) बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत चाललेला असताना नागरिक मात्र बेशिस्तपणे वागत असल्याचा अनुभव पदोपती येत असून अंबाजोगाईत तर हाऊसिंग सोसायटीमधील एक कुटूंब रात्री बाधीत आढळून आले. त्याची माहिती प्रशासनाने त्या कुटंबाला दिली. तरीही त्या कुटूंबातील एक व्यक्ती आज सकाळी हाऊसिंग सोसायटीतच नव्हे तर अन्य गल्लीमध्ये फिरत राहिला. फुले गल्लीतील तरूणांनी त्याला ओळखले आणि हातात दगडे घेवून त्याला हुसकावून लावले तेव्हा तो तेथून निघून गेला. या कुटूंबाला आज दुपारी १२ वाजता रूग्णालयात घेवून गेल्याचे सांगण्यात येते. तोपर्यंत तो व्यक्तीने बेजबाबदारपणे शहरातल्या गल्लीबोळात फिरत होता.
गेल्या चार पाच दिवसापूर्वी हाऊसिंग सोसायटीमध्ये एक वृध्द कोरोनाबाधीत निघाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यूही झाला. त्यामुळे त्याच्या कुटूंबातील लोकांचे स्वॅब घेण्यात आले. त्या घरातील सुमारे सात लोक बाधीत म्हणून अढळले. रात्री जेव्हा या लोकांचा स्वॅब अहवाल आला आणि ते बाधीत असल्याचे दिसून आले. तेव्हा प्रशासनाने रात्रीच त्यांना याबाबत माहिती दिली. परंतू रात्रीच त्या सर्व बाधितांना रूग्णालयात दाखल केले गेले नाही. आज सकाळी या कुटूंबातील बाधीत व्यक्ती घराबाहेर पडतो, गल्लीबोळामध्ये मोबाईलवर बोलत हिंडतो, विशेष म्हणजे त्याला आपण बाधीत आहोत हे माहित आहे, हाऊसिंग सोसायटीसह तो अन्य गल्लीमध्ये फिरत असताना फुले नगर भागात जेव्हा तो येतो तेव्हा तेथील लोक त्याला ओळखतात, बाधीत असताना हा हिंडत आहे याचा राग त्या लोकांना येतो. हातात दगडे घेवून त्याला जेव्हा विरोध करतात तेव्हा तो तिथून निघून जातो. प्रशासन त्याच्यासह त्याच्या कुटूंबियांना घेवून जातात. असा बेजबाबदारपणा बाधीतांकडून तर होतच आहे तसे लोकही शासन प्रशासन व्यवस्थेने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करत नाहीत त्यामुळे जिल्ह्यात कोरोना आपले हातपाय पसरवतो.

स.पो.नी.विजय गोसावी यांची जुगार अड्यावर धाड .१७ जुगारी घेतले ताब्यात.

बीड (प्रतिनीधी )ः- सध्या जुगार अड्यावर पोलीसांनी धाड सत्र सुरू केले असून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर पोलीस लक्ष ठेवून आहे. वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे तिर्रट नावाचा जुगार खेळवला जात असल्याची माहिती स्थानीक गुन्हा शाखेला मिळताच या ठिकाणी सपोनी विजय गोसावी यांनी धाड टाकली असता.१७ आरोपीसह ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई काल ५ वाजता करण्यात आली. 
पोलीसांनी दिलेल्या माहिती नूसार वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे काही जुगारी तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखेला मिळताच पोलीसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता यामध्ये उमेश भाऊराव पांडव यांचे मोकळ्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगारी सुग्रीव शेषेराव घोलप, अप्पासाहेब गोवींद वाघमारे, दिलीप सुदाम घोलप, शेख युसूफ उर्फ कालू शेख वजीर, मोतीराम रामभाऊ शिंगारे, मिथून मरिदास शिंगारे, प्रल्हाद संदीपान घोलप, नितेश भाऊराव पांडव, उमेश भाऊराव पांडव, अर्जुन उत्तमराव घुगे,सदाशिव संभाजी गलांडे, विभीषण बाबूराव घुगे सर्व रा.चिंचवण ता.वडवणी, सर्जेराव गणपत राठोड, भीमराव बाबूराव काकडे दोन्ही रा. हरीशचंद्रप्रिंपी ता.वडवणी, अरुण उत्तमराव सोनार, रा.पिंपळखेड ता.वडवणी असे सर्व तिर्रट नावाचा जुगार खेळत असतांना मिळून आले. यामध्ये जुगारी १ ते १७ यांच्याकडून ८५ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहीत्य जप्त करण्यात आले. त्यांच्या विरुध्द वडवणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६८,२०२० कलम १८८,२६९, २७०,भादवी सह कलम ५१ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे सह कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, डिवायएसपी श्रीकांत डिसले, पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी विजय गोसावी यांच्यासह विष्णु रोकडे, तुळशीराम जगताप, नरेंद्र बांगर, संतोष म्हेत्रे, सखाराम पवार, चालक अविनाश घुंगरड यांनी केली.

परळी येथील आस्तित्वात नसलेल्या इंग्रजी शाळेचे नाव शिक्षण विभागाच्या अनुदानाच्या यादीत चौकशीचे आदेश .

बीड (प्रतिनीधी ) राज्य सहकार इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अल्पभुधारक, अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील २५ टक्के मुलांसाठी वार्षिक १७ हजार रूपये अनुदान देते. प्रत्येक वर्षी बीड जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांना हे अनुदान मिळते. याही वर्षी इंग्रजी माध्यमांच्या संस्थाचालकांनी शाळेमध्ये शिकत असलेल्या मुलांपैकी २५ टक्के मुलांना १७ हजाराचे अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केले. मात्र बीड जिल्ह्यातील परळी येथील अस्तित्वात नसलेल्या एका इंग्रजी शाळेचे नाव अनुदानासाठी शिक्षण विभागाकडे आल्यानंतर हि बाब चाणक्ष शिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर घडत असलेला प्रकार सीईओ कुंभार यांच्या लक्षात आणुन दिला. त्यांनी तात्काळ या सर्व बाबीची चौकशीसाठी उपशिक्षणाधिकारी काळम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली.
बीड जिल्ह्यामध्ये इंग्रजी शाळेमध्ये अल्पभुधारक आणि अनुसूचित जाती जमातीच्या २५ टक्के मुलांना प्रवेश देण्याची प्रक्रियाही ऑनलाईन राबवली जाते. मात्र असे असतानाही या विभागाचा कारभार बघणारे रणदिवे आणि विस्तार अधिकारी चोपडे हे अनेक घोळ घालत असलेल्या तक्रारी शिक्षण विभागाला आलेल्या आहेत. गेल्या दहा वर्षापासून दोन्ही अधिकारी येथे ठाण मांडून आहेत. रणदिवे हे कंत्राटी कर्मचारी मात्र त्यांचा रूबाब नियमीत अधिकार्‍यापेक्षा जास्त आहे. प्रत्येक वर्षी मार्च महिन्यामध्ये २५ टक्के मुलांच्या अनुदानाचा प्रस्ताव प्रत्येक संस्था आणि शाळेकडून मागवला जातो. या मुलाचे आधारकार्ड प्रवेशासाठी लिंक केलेले असते. त्यामुळे अनियमीतपणा होण्याची शक्यता कमी असली तरी यावर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून या  २५ टक्के मुलांना १७ हजार रूपये अनुदान देण्यासाठी जे प्रस्ताव शिक्षण विभागाला आले त्यामध्ये परळी येथील अशा शाळेचे नाव होते की ती शाळा चालू नाही. अशा अस्तित्वात नसलेल्या आणि बंद शाळेचा अनुदानच्या मागणीसाठी आलेला प्रस्ताव प्रभारी शिक्षणाधिकारी बहिर यांच्या लक्षात आला. अस्तित्वात नसलेल्या शाळेचा प्रस्ताव अनुदानासाठी येत असेल तर यामध्ये काय काय चुका झाल्य असतील? एखाद्या शाळेमध्ये ऑनलाईन द्वारे झालेले प्रवेश, आणि अस्तित्वात असलेले प्रवेश यामध्ये काही गोंधळ आहे का? या सर्व बाबीची तपासणी करण्यासाठी आणि यातील दोषी अधिकारी कोण आहेत? हे शोधून काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार यांनी उपशिक्षणाधिकारी काळम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे. मात्र ऑनलाईन कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पुढील चौकशी करण्यासाठी शाळा सुरू होवू देणे ही वाट बघावी लागेल आणि मगच सत्य समोर येईल अशी माहिती याच चौकशी समितीचे काळम पाटील आणि प्रभारी शिक्षणाधिकारी बहिर यांनी सांगितली आहे.