* शहरात दहा ठिकाणी कंटेनमेंट झोन.
अंबाजोगाई (प्रतिनीधी )- अंबाजोगाई शहरात कोरोना ने आता आघाडी घेण्यास सुरुवात केली असून आज एकदम सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहर भयभीत झाले आहे. आतापर्यंत शहरात दहा ठिकाणी कँटमेंट झोन लागू करण्यात आले असून रात्री पॉझिटिव्ह आलेल्या हाऊसिंग सोसायटी येथील नव्वद वर्षीय कोरोनाग्रस्त वृद्ध इसमाचा आज पहाटे मृत्यू झाला आहे.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहर सुरक्षित आहे म्हणून आनंदात वावरणार्या येथील नागरिकांना कोरोनाने दे धक्का म्हणत सुरवात केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अंबाजोगाई शहरात आनंद नगर, मोरेवाडी शिक्षक कॉलनी, संत कबीर नगर,कैकाडी गल्ली,देशपांडे गल्ली, सातपुते गल्ली, रविवार पेठ,आदर्श कॉलनी,होसिंग सोसायटी, विमल सृष्टी असे दहा भागा मध्ये कँटमेंट झोन लागू करण्यात आले आहे त्या पैकी आनंद नगर मधील कँटमेंट झोनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे पहिला रुग्ण निघाल्या पासून चौदा दिवसाच्या आत दुसरा रुग्ण निघाला नाही तर त्या कँटमेंट झोन मध्ये शिथिलता देण्यात येते मात्र चौदाव्या दिवशी देखील कँटमेंट झोन मध्ये दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास त्या दिवशी पासून पुन्हा त्या कँटमेंट झोन ची मुदत पुन्हा चौदा दिवस वाढवली जाते असे शासनाचे नियम आहे शहरातील काही कँटमेंट झोन मध्ये आती हुशार तर काही झोन मध्ये तळीराम मोठ्या प्रमाणात राहत असल्याने ते कँटमेंट झोन कित्ती दिवसा पर्यंत राहतील हे सांगणे कठीण झाले आहे काही कँटमेंट झोन मधील आती हुशार नागरिक व तळीराम तेथे तैनात करण्यात आलेल्या पोलीस कर्मचारी नगर परिषद कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांना न जुमानता कँटमेंट झोन मधून बाहेर निघून आती हुशार शहरभर फिरतात तर तळीराम नशेत तरर होऊन पुन्हा आपल्या घरी परततात असे प्रकार घडू लागल्याने शहरातील ईतर नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही आज पर्यंत अंबाजोगाई शहरात सव्वीस जणांना कोरोना ची लागण झालेली आहे तसेच काही खाजगी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार करून त्यांना ऐनवेळी स्वा रा ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे प्रकार सुध्दा शहरातील काही खाजगी रुग्णालयात घडले आहे मात्र त्या रुग्णालयांना सील सुद्धा करण्यात आले नसल्याचे पाहून हे काय प्रकार आहे असा प्रश्न देखील शहरात निर्माण झाला आहे.
No comments:
Post a Comment