गेवराई;- (प्रतिनीधी ) तालुक्यातील तलवाडा येथील रहिवासी असलेले शेख रशीद शेख कोंदन यांची मुलगी शेख तस्लिम वय वर्षे २१ हिचा विवाह मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे शेख आयाज शेख लालाभाई रा. चकलांबा याच्याबरोबर दहा महिन्यापूर्वी झाला होता. काही महिन्यांपूर्वी सासरकडील मंडळी तिला वाहन व प्लॉट घेण्यासाठी पाच लाख रुपये आण म्हणून तिचा शारिरीक व मानसिक छळ करत होते. तिने हि बाब वडिलांना सांगितली असता गरीबी परिस्थिती असताना देखील त्यांनी तीन लाख रुपये देण्याचे कबूल करून पन्नास हजार रुपये दिले होते. परंतु उर्वरित रक्कम न दिल्याने तिचा वारंवार छळ सुरू असल्याने तिने अखेर छळाला कंटाळून मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी नवरा आयाज लालाभाई शेख, दीर रियाज लालाभाई शेख व सासु हमीदा लालाभाई शेख यांच्या विरोधात मयत मुलीचे वडील शेख रशीद शेख कोंदन रा.तलवाडा यांच्या फिर्यादीवरून कलम ३०६,४९८ अ, ३२३,५०४,५०६,३४ भादंवि नुसार मंगळवारी रात्री चकलांबा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिच्या पतीला तात्काळ अटक केली आहे. या घटनेविषयी अधिक तपास पोलिस करत आहेत.
No comments:
Post a Comment