Thursday, December 31, 2020

अनोळखी पुरूषाचे सडलेल्या अवस्थेत प्रेत.चेहरा अॕसीड टाकुन जाळलेला. परिसरात खळबळा.


पिंपळ्वंडी - (प्रतिनिधी) पाटोदा तालूक्यातील अंमळनेर पोलीस ठाण्याअंतर्गत गंभिर स्वरुपाचे गुन्हे वाढत असुन बुधवार दिनांक ३० रोजी दुपारी तीनच्या दरम्यान एक पुरुष जातीचे प्रेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलीस ठाण्याअंतर्गत डोंगरकिन्ही येथे नुकताच गोळीबार झाला होता, सदरील प्रकरण ताजे असतानाच आज दूपारी पेट्रोलपंपासमोर अरुण पोकळे यांच्या शेतातील बांधावर झाडा-झूडपात एक पुरूष जातीचे सडलेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले आहे. दुपारी तीनच्या सुमारास गणेश अनिल पोकळे या मुलाने सदरील प्रेत पाहिल्यानंतर त्याने ही घटना सुरेश पोकळे यांना सांगितली त्यानंतर सुरेश पोकळे यांनी तात्काळ अंमळनेर पोलीस ठाण्यात संपर्क करून घटना कळवली.

पोलिसांनी तात्काळ आपल्या सर्व टिमसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदरील प्रेत हे तीन दिवसापूर्वीचे असल्याचा पोलीसांचा अंदाज आहे. सदरील पुरुषाचा खून करून त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी चेहऱ्यावर केमिकल टाकुन चेहरा विद्रूप करण्यात आला आहे. साधारणपणे सदरील पुरुष हा ४० ते ४५ वयाच्या दरम्यानचा दिसून येत आहे. डोक्यावर, गळ्यावर गंभिरस्वरुपाचे वार दिसून येत असल्याने खुन करुन चेहरा जाळल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सदरील ईसमाच्या अंगावर पिवळसर रंगाचा फुल भायाचा शर्ट, आणि काळसर व पांढऱ्या रंगाची पँन्ट आहे.
तसेच जबड्याच्या वरील भागातील दातांना तार ( पिन ) लावण्यात आलेली आहे. पायात पँरागाँन कंपनीची काळी चप्पल, गळयात गमजा, हातात काळा दोरा असे वर्णन आढळून आले आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी विजय लगारे, स.पो.नि.श्यामकुमार डोंगरे, तसेच विषेश पथक बीड व आष्टीचे ढवळे, सोनवणे, देवकते, शेळके आदिंनी भेटी देऊन अज्ञात ईसमाचा शोध लावण्यासाठी कशोशीने प्रयत्न सुरु केले आहेत. आसपासच्या पोलीस ठाण्यात एखादी मिसींग दाखल आहे का?याचीही माहिती घेतली जात आहे. सदरील घटना दोन-तीन दिवसापूर्वी घडलेली असल्यामुळे प्रेताची दुर्गंधी येत होती. घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी कागदे, बडे, तसेच गाडे, पवार आदिंनी शवविच्छेदन केले. फौजदार अमन सिरसाट, देविदास आवारे, आर्सुळ, आघाव, खोले, गुंडाळे, भालसिंग, घोशीर आदि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. खुनी पुरुष नेमका कोण असावा यासाठी अंमळनेर पोलीस बारकाईने तपास करीत असून लवकरच या खुनाचा उलगाडा होईल अशा विश्वास अंमळनेर पोलांसांनी व्यक्त केला आहे.
सदरील खुन अनैतिक संबाधातून झाला की, शेतीच्या वादातुन कि, आणखी ईतर कारणामुळे झाला याचा उलगाडा प्रेताची ओळख पटल्यावरच होणार आहे. तत्पूर्वी मात्र वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. एकंदरीत अंमळनेर येथे सापडलेल्या प्रेतामुळे खळबळ उडाली आहे.

सावधान ! बीड जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा 35 वर पोहचला.


बीड -जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा बुधवारी 35 वर पोहचला ,विशेष म्हणजे यात एकट्या बीड तालुक्यातील 23 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत,त्यामुळे बीड करांनी काळजी घेण्याची गरज आहे .

बीड जिल्ह्यातील शिरूर,धारूर, पाटोदा आणि वडवणी या चार तालुक्यातील पॉझिटिव्ह चा आकडा शून्य असताना देखील इतर सात तालुक्यातील आकडा 35 वर गेला आहे .परळी ,माजलगाव, केज,गेवराई या तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण तर बीड 23,आष्टी 2 आणि अंबाजोगाई मध्ये 6 रुग्ण आढळून आले आहेत .

Wednesday, December 30, 2020

पत्रकार बालाजी ढगे व कृष्णा विर्धे यांच्या समयसुचकतेमुळे राष्ट्रीय पक्षी मोराला मिळाले जीवदान.

* मोरावर उपचार करून वन विभागाला केले सुपूर्द.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळीतील नांदुरवेस गल्लीतील रहिवाशी श्री. कृष्णा विर्धे  यांच्या निवासस्थानी भारताचा  राष्ट्रीय पक्षी मोर मंगळवार दि.29 डिसेंबर रोजी दुपारी जखमी अवस्थेत आढळला. त्यावेळी विर्धे परिवाराने त्या मोराच्या जखमाला मलम पट्टी केली व त्यांनी    पत्रकार बालाजी ढगे यांना संपर्क साधला.  बालाजी ढगे यांनी तात्काळ येऊन  वनविभाग अधिकारी श्री जाधव साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वन विभागातील दोन कर्मचारी तात्काळ पाठवून त्या मोरावर उपचार सुरू केले. दरम्यान राष्ट्रीय पक्षी मोर वन अधिकारी  यांच्याकडे देण्यात आला  असून तो आता सुखरूप असल्याचे सांगितले. दरम्यान पत्रकार बालाजी ढगे व कृष्णा विर्धे यांनी राष्ट्रीय पक्षी मोराचे प्राण वाचविल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे .
परळी येथील नांदुरवेस भागातील मुक्त पत्रकार कृष्णा विर्धे यांच्या निवासस्थानी आज बुधवार दि.30 डिसेंबर रोजी जखमी अवस्थेत असणारा राष्ट्रीय पक्षी मोर अचानक दाखल झाला. श्री.विर्धे यांनी त्यांचे मित्र पत्रकार बालाजी ढगे यांना दुरध्वनी करून बोलावून धेतले. श्री.ढगे यांनी वन विभागातील अधिकारी श्री.जाधव यांना दुरध्वनी केला असता त्यांनी दोन वन अधिकारी तात्काळ पाठवून मोरावर उपचार सुरू केले. पत्रकारांच्या समयसुचकतेमुळे मोराला जीवदान मिळाले असून वन अधिकार्‍यांकडे सुपूर्द केले आहे.

परळी तालुक्यात सात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक अर्ज भरण्यासाठी परळी तहसिल कार्यालयात गर्दी.



परळी वैजनाथ  : राज्यातील ३४ जिल्ह्यांत असणाऱ्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रीक निवडणूकांचा कार्यक्रम सुरू आहे. ३० डिसेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. दुपारी ३ वाजेवरून अर्ज भरण्यासाठी ५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच परळी तहसिलच्या प्रांगणात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ईच्छुक उमेदवारांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईनमध्ये अर्ज भरण्यास अडथळे येत असल्याने ऑफलाईन अर्जही स्विकारण्यात येत आहेत.
परळी तालुक्यातील मोहा, सरफराजपूर, वंजारवाडी, लाडझरी, भोपला, रेवली, गडदेवाडी या सात ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, ज्याची मतमोजणी तद्नंतर १८ जानेवारी रोजी होणार आहे. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी परळी तहसिल कार्यालयात ईच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती. तालुक्यातील मोहा ग्रामपंचायत ११ सदस्य, गडदेवाडी ७, सरफराजपूर ७, रेवली ९, भोपला ७, वंजारवाडी ७, लाडझरी ९ अशा एकूण ५७ जागांसाठी निवडणूक होत आहे. थेट जनतेतून सरपंच निवड होणार नसल्यामुळे सदस्यांमधूनच निवडूण येण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. सरपंचपदाचे घोषीत केलेले आरक्षण रद्द केले असून, निवडणूकीच्या नंतर आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे. एकूण उमेदवार किती रिंगणात उतरतील याबाबत सविस्तर माहीती अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतरच मिळू शकणार आहे.

जालना जिल्ह्यात फक्त 577 हॉटेल्सची नोंदणी. प्रशासनाचे दुर्लक्ष.

* 14 लाख लोकसंख्या असलेल्या आणि फक्त शहराची लोकसंख्या चार लाख असताना सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयात मात्र फक्त 577 हॉटेल आणि रेस्टॉरंटची नोंदणी झाली आहे. याचा अर्थ संपूर्ण जिल्ह्यात किती अनधिकृत हॉटेल आहेत, याचा अंदाज येतो.

जालना - ( प्रतिनीधी) 14 लाख लोकसंख्या असलेल्या आणि फक्त शहराची लोकसंख्या चार लाख असताना सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयात मात्र फक्त 577 हॉटेल आणि रेस्टॉरंटची नोंदणी झाली आहे. याचा अर्थ संपूर्ण जिल्ह्यात किती अनधिकृत हॉटेल आहेत, याचा अंदाज येतो.जालना : संपूर्ण जिल्ह्यात फक्त 577 हॉटेल्सची नोंदणी

* अशी असते वर्गवारी

हॉटेल किंवा रेस्टॉरंट हे एकच नाव आहे. मात्र ज्या प्रतिष्ठानला जे नाव हवे ते दिले जाते. वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या व्यवसायिकांना दरवर्षी दोन हजार रुपये परवाना फी घेऊन त्यांना परवाना देण्यात येतो. अशी जिल्ह्यामध्ये 390 हॉटेल आणि रेस्टॉरंटची नोंदणी आहे. तर, ज्यांची वार्षिक उलाढाल बारा लाखापेक्षा कमी आहे त्यांच्याकडून दरवर्षी 100 रुपये फी आकारून फक्त नोंदणी केले जाते. असे 187 हॉटेल्स नोंदणीकृत आहेत.

* विनापरवाना व्यवसाय करणाऱ्याला होऊ शकतो दंड

सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासनाचा परवाना न घेता कुठेही खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या अधिकार सहाय्यक आयुक्त अन्न प्रशासन यांना आहे. त्यानुसार ते अशा व्यावसायिकांवर जिल्हा न्यायालयात खटला दाखल करू शकतात. आणि कायद्याच्या तरतुदीनुसार सहा महिन्यापर्यंत शिक्षा (जेल )किंवा पाच लाख रुपयापर्यंत दंडही ही होऊ शकतो.

*परवाना घेणे व्यावसायिकांच्या फायद्याचे

अन्न प्रशासनाचा परवाना घेणे खरेतर व्यवसायिकांच्या फायद्याचे आहे .कारण एखादी दुर्घटना घडली तर मदत मागण्याचा अधिकार त्या व्यवसायाला प्राप्त होतो. तसेच संबंधित व्यवसायाचा विमा काढण्यासाठी देखील विमा कंपनी आधी या परवान्याची मागणी करते . हा परवाना नसल्यामुळे पुढे विमा कंपनी देखील विमा उतरवत नाही .त्यामुळे दुर्घटना घडल्यास कोणतीही नुकसान भरपाई या व्यवसायीकाला मिळत नाही .मात्र अन्न प्रशासनाचा ससेमिरा मागे लागू नये या भीतीने हे व्यावसायिक आपली नोंदणी करत नाहीत.

* हे आहे मनुष्यबळ

सहाय्यक आयुक्त अन्न प्रशासन कार्यालयात एक आयुक्त आणि चार अन्नसुरक्षा अधिकारी असे एकूण पाच कर्मचाऱ्यांच्या जागा आहेत .त्यापैकी सहाय्यक आयुक्त हे पद सध्या रिक्त आहे आणि त्यांचा प्रभारी पदभार औरंगाबाद येथील आयुक्तांकडे देण्यात आलेला आहे. चार अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांपैकी एक जागा रिक्त आहे. उर्वरित तीन अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांवर जालना जिल्ह्याचा डोलारा चालू आहे.

* दिवाळीदरम्यान 40 नमुने तपासणीसाठी

दिवाळी दसऱ्याच्या तोंडावर खाद्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. दरम्यान यंदा कोरोनाचा मोठा परिणाम सणांवर झाला. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील 39 खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते आणि ते औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. मात्र आतापर्यंत या नमुन्यांचा अहवाल या प्रशासनाला प्राप्त झालेला नाही.

धक्कादायक! मुंबईत ऑन-ड्यूटी पोलीस कॉन्स्टेबलनं गोळी झाडून केली आत्महत्या.


 

* मुंबई पोलिसांत खळबळ, आत्महत्येचे कारण गूलदस्त्यात.

मुंबई वार्ता :- (प्रतिनीधी) पोलिसांच्या जीवनांत कोणत्या वेळी काय वादळ निर्माण होईल किंव्हा वरिष्ठांच्या दबावतंत्राने केंव्हा त्यांचा मानसीक तोल जाईल याचा नेम नसतो अशीच एक मुंबईतील पोलिस विभागातून धक्कादायक बातमी समोर आली असून एका पोलीस कॉन्स्टेबलने ड्युटीवर असताना पोलीस स्टेशनमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

सखाराम भोये असं आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सखाराम भोये या पोलिस कर्मचाऱ्यानं ड्युटीवर असताना आपलं आयुष्य संपवलं आहे. सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आली. सखाराम भोये हे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले. पोलीस कर्मचाऱ्यानं एवढे टोकाचं पाऊल का उचललं असावं याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉस्टेबल गोळी झाडून आत्महत्या करतो. या घटनेने मुंबई पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

Tuesday, December 29, 2020

जिल्हा आरोग्य विभागाने केला खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांचा गौरव.


बीड,दि. 29 :- (जि.मा.का)  राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम बीड यांच्या अंतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र बीड मार्फत जिल्हयातील 130 खाजगी डॉक्टरांना प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात आले. कोरोना सारख्या कठीण काळात सन 2020 या कालावधीत एकूण 584 क्षयरुग्ण शोधण्यासह निदान करण्यात जिल्हयातील खाजगी डॉक्टरांनी  एकाचवेळी आरोग्य विभागाला खुप सहकार्य केले त्याबद्दल मंगळवार, दि. 29 डिसेंबर 2020 रोजी दु. 12.30 वाजता एकाचवेळी 130 खाजगी डॉक्टरांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. त्यासंदर्भात प्राथमिक स्वरुपाचा कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. बीड यांच्या दालनात बीड शहरातील 15 खाजगी डॉक्टरांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.आर.गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आर.बी. पवार व आएमए बीडचे अध्यक्ष डॉ. अनिल बारकुल, डॉ. निपटे वै.अ., डॉ. शिंदे वै.अ. डॉ. पांगरीकर, डॉ. तोष्णीवाल, डॉ. तिडके, डॉ. ओत्सवाल, डॉ. गुंजकर, डॉ.जोशी, डॉ. वाघमारे, डॉ. शेख, डॉ. काळे, डॉ. ठोंबरे, डॉ. कोकाटे, डॉ. सवासे, महेश काळे व जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्या.- राष्ट्रवादी युवक काॕग्रेस.

वरोरा:- ( प्रतिनीधी) राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या असे निवेदन तहसीलदार वरोरा मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व गृहमंत्री याना देण्यात आले . औरंगाबाद जिल्ह्यातील पोलिस स्टेशन मध्ये  मेहबूब शेख यांच्यावर एका युवतीने अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे . तक्रारीत ज्या तारखिंचा उल्लेख केला त्या दिवशी मेहबूब शेख मुंबई इथे होते व त्या बाबत सोशल मीडियावर  शेअर केलेले पुरावे देखील आहे . ज्या मुलींनी तक्रार केली त्या मुलीशी फोनवर अथवा प्रतक्षात बोलणे देखील झाले नाही. या बाबत पुरावे आढळल्यास मी स्वतः राजकीय सन्यास घेत कायद्यानुसार शिक्षा भोगायला तयार असल्याची ग्वाही शेख यानी दिली . या सर्व प्रकरणावरून हा राजकीय षडयंत्र आहे व सूडबुद्धीने केलेले हे आरोप असल्यामुेच तत्काळ मागे घ्यावे असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस वरोरा तर्फे देण्यात आले . तहसील कार्यालय बाहेर निषेध नोंदविण्यात आला . या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे, पंकज मांडवकर, सहिल पानतावणे, ऋषिकेश कुडे, विनोद कोठारे, रंजीत कुडे, रोशन भोयर, विजय कुडे, कुणाल गौळकर, विलास कुडे, राहूल कुडे, सोपान कुडे, आकाश हीवरकर, सूरज उरकुडे, संकेत वानखेडे व कार्यकर्ते उपस्थित होते .

राखीव जागेवर निवडणूक लढवणा-या उमेदवारांना दिलासा.आज व उद्या म्हणजेच २९ व ३० डिसेंबर रोजी ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे धनंजय मुंडे यांचे सर्व जात पडताळणी समित्यांना निर्देश.


पुणे (दि. २९) -- : ग्राम पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडालेली असताना, जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे आज २९ डिसेंबर व उद्या ३० डिसेंबर असे दोनही दिवस राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज सुद्धा स्वीकारावेत असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. 

ना. मुंडे यांच्या निर्देशानुसार बार्टीमार्फत याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. 

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वेग मंदावल्याने तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपत आली असल्याने ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारावेत याबाबत राज्यभरातून विनंती व तक्रारी करणारे फोन मेसेज येत होते, त्यामुळे तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जाची पोहोच पावती मिळावी, गैरसोय होऊ नये याकरिता २९ व ३० डिसेंबर असे दोन दिवस अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ठिकठिकाणी समितीने अर्जाची संख्या लक्षात घेत अर्ज स्वीकारण्याची खिडकी/कक्ष वाढवावेत व कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करावे. या दोन्ही दिवशी आलेले सर्व अर्ज दाखल करेपर्यंत कार्यालय सुरू ठेवावीत तसेच ऑफलाईन दाखल केलेल्या अर्जाची माहिती दि. ०१ जानेवारी पर्यंत बार्टीकडे लेखी स्वरूपात कळवावी असे आदेश राज्यातील सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रत महाआघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता, ठाकरे सरकारला धोका - रामदास आठवले


* शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे केले आवाहन, वंचितला एनडीएत येण्याचे दिले निमंत्रण.


औरंगाबाद  दि. 29 (प्रतिनीधी) महाविकास आघाडीत युपीएच्या अध्यक्षपदावरुन वाद सुरु आहे. शिवसेना युपीएच्या घटकपक्ष नसताना शिवसेनेचे नेते संजय राऊत हे शरद पवारांना युपीएच्या अध्यक्षपद देण्याची मागणी पुढे करत आहे. यामुळे शिवसेना व काँग्रेसमध्ये खळखट्ट्याक होईल. काँग्रेसला ही मागणी कदापिही मान्य होणार नाही. यामुळे काँग्रेस शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढू शकते म्हणून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळेल व भाजपाला सरकार बणवण्याची संधी पुन्हा मिळेल असे भाकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना एनडिएत येण्याचे निमंत्रण दिले. वंचितला लोकसभेत जास्त मते मिळाली पण एकही खासदार निवडून आला नाही फायदा एमआयएमचा झाला, विधानसभेत मते कमी मिळाली. म्हणून सोबत एनडीएत येण्याचे आठवलेंनी आंबेडकरांनी यावे असे निमंत्रण दिले. दिल्लीत सुरु शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांना त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. कृषी कायद्यात संशोधन करण्यासाठी सरकार तयार आहे. शेतकरी नेत्यांसोबत सरकारची चर्चा सुरू आहे. कायदे रद्द करण्याची मागणी संविधानानुसार योग्य नाही. मोदी सरकारने शेतकरी हितामध्ये हे कायदे बणवले पण काही पक्ष व संघटना गैरसमज पसरवत आहे. शेतकऱ्यांबद्दल सरकारला सहानुभूती आहे असे आठवले यांनी सांगितले.
राज्यात पक्ष बांधणीसाठी दौरा सुरु केला आहे. आगामी महापालिका, ग्रामपंचायत निवडणुकीत जसे शक्य होईल भाजपा सोबत आरपीआय असेल. पक्ष अंतर्गत निवडणूक घ्यायची आहे. 50 लाख सदस्य नोंदणीचे लक्ष ठेवले आहे. राज्य सरकारने भूमीहीनांना पाच एकर शेती द्यावी. मागासवर्गीयांनी विविध महामंडळाकडून घेतलेले कर्जमाफी करावी. अशा विविध मागणीसाठी आरपीआयच्या वतीने आंदोलन केले जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेत आठवलेंनी दिली.
यावेळी पप्पु कांबळे, बाबुराव कदम, ब्रम्हानंद चव्हाण, डॉ. विजय गायकवाड, कांतीकुमार जैन, मिलिंद शेळके, संजय बनसोडे, संजय ठोकळ, किशोर थोरात, बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवसरमल, नागराज गायकवाड, प्रकाश गायकवाड, मधुकर चव्हाण उपस्थीत होते .

सोनपेठ तालुका ग्रामपंचायत निवडणूक.ऑफलाइन नामनिर्देशन पत्र स्वीकारणे दिनांक 30 डिसेंबर 2020 वेळ 5:30 पर्यंत.



सोनपेठ (प्रतिनीधी ):-सोनपेठ तालुक्यातील 39 ग्रामपंचायत निवडणुकीचा उमेदवाराचा अर्ज स्विकृती मा.राज्य निवडणूक आयोगाने (offline) आँफलाईन अर्ज स्वीकारणेची परवानगी दिलेली आहे.तसेच जात पडताळनी चा अर्ज देखील आँफलाईन स्विकारली जानार आहेत.दि.30.12.2020 रोजी संध्याकाळी 5.30 pm वाजेपर्येंत ऑनलाइन किंवा (offiline) आँफलाईन फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी स्वीकारतील अशी खुशखबर दिली.तरी इच्छुकांनी वेळेत नामनिर्देशनपत्र आवशक त्या सर्व कागदपत्रसह दाखल करावे.अशी अधिक्रत माहीती डॉ.आशिषकुमार बिरादार, तहसीलदार सोनपेठ यांनी दिली.

जिल्हातील सातही कारखाण्यावर होणार ऊसतोड महिला, बालकांची आरोग्य तपासणी.

बीड : जिल्ह्यात असलेल्या ऊसतोड कामगार महिला व त्यांच्या मुलांची आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. यासाठी जिल्ह्यातील सातही साखर कारखान्यांवर शिबीर घेतले जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी तालुका आरोग्य अधिकार्‍यांना पत्रही काढले आहे.

जिल्ह्यातील हजारो ऊसतोड मजूर परजिल्ह्यातील कारखान्यावर गेलेले आहेत. त्यांची जातानाच आरोग्य तपासणी करण्यात आली होती. तसेच आता बीड जिल्ह्यातील माजलगाव 2, परळी 1, गेवराई 1, धारूर 1, केज 1 व अंबाजोगाईतील 1 अशा सातही साखर कारखान्यावर काम करणार्‍या ऊसतोड महिलांची व त्यांच्या मुलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष शिबीर घेण्याच्या सुचना केल्या आहेत. याबाबत तात्काळ नियोजन करून तारीख व अहवाल कार्यालयास कळविण्यासही डॉ.पवार यांनी सांगितले आहे. या शिबीरासाठी 15 हजार रूपयांचे अनुदान आहे. याअंतर्गत किरकोळ आजार असलेल्या महिला, बालकांवर तात्काळ उपचार करून औषधी दिली जाणार आहेत. गंभीर आजार असणार्‍यांना ग्रामीण, उपजिल्हा अथवा जिल्हा रुग्णालयात रेफर केले जाणार आहे. तसे नियोजनही आरोग्य विभागाने केले आहे. यासाठी रुग्णवाहिकांचीही व्यवस्था असणार आहे. जास्तीत जास्त महिला, बालकांसह पुरूषांनीही या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने डॉ.पवार यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी केले आहे.

Monday, December 28, 2020

गंगाखेड नवा मोंढ्यातील व्यापाऱ्याचा गोदामावर धाडी,रेशनचा ३५ टन तांदूळ जप्त,धान्य माफिया रेशन दुकानदार हादरले.



गंगाखेड ;- कोरोना कोव्हिड काळातील सर्वसामान्य जनतेला मोफत वाटपासाठी आलेल्या रेशन धान्याचा काळाबाजार करण्यासाठी शहरातील मोंढ्यातील दोन गोदामात साठविलेल्या धान्यावर परभणी पोलिस विशेष पथकाने धाड टाकून ३५ टन तांदूळ जप्त करीत दोघाना अटक करण्यात आल्याने सदरील व्यापाऱ्याना रेशनचे धान्य पुरवठा करणाऱ्या धान्य माफिया रेशन दुकानदाराचे धाबे दणानले आहे.

कोरोना कोव्हिडचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लाँकडाऊन करीत सर्वसामान्य जनतेसाठी रेशनचा माध्यमातुन रेशनकार्ड धारकासह परराज्यातील मजुराना प्रति व्यक्ती पाच किलो मोफत तांदुळ वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले होते.गंगाखेड शहर सह तालुक्यात १६३ रेशन दुकानदारानी मोफत वाटप तांदळावर मोठ्या प्रमाणात डल्ला मारत रेशन कार्ड धारकाना देण्यात येणाऱ्या पाच किलो ऐवजी तीन किलोच वाटप करून मापात पाप केले तर रेशन कार्ड धारक शासकीय नोकरदार प्रतिष्ठित व्यापारी नागरिक यांचाही धान्यावर डल्ला मारला याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी तहसिल प्रशासनाचा पुरवठा विभागाकडे आजही धुळखात पडलेल्या आसून पुरवठाधिकारी यांनी रेशन दुकानदार यांचीच पाठराखण केल्याने सातत्याने रेशन धान्याचा काळा बाजार ही नित्याची बाब बनली आहे. गंगाखेड शहरातील मोंढा भागात मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ आला असून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी दिला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक दडस फौजदार विश्वास खोले,पोलीस कर्मचारि सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ,यशवंत वाघमारे, राहूल चिंचाने, शंकर गायकवाड़,अजहर पटेल, विष्णु भिसे, दिपक मुदिराज आदींच्या पथकाने रविवारी मिळालेल्या माहितीची खातरजमा करत मोंढा परिसरातील दोन गोदामात बेकायदेशीर ठेवलेला रेशनचा तांदूळ पथकाने दोन व्यापाऱ्याचा गोदामावर धाडी टाकून ६ लाख १२ हजार ५०० रुपये किंमतीचा ३५ टन तांदूळ जप्त केला. तेथील पोत्यांची तपासणी केली त्यावेळी त्यात रेशनचा तांदूळ असल्याचे निष्पन्न झाले.सर्व पोत्यांची पाहणी करित मोजदाद केली त्यावेळी तब्बल तो ३५ टन रेशनचा तांदूळ असल्याचे निदर्शनास आले.पथकाने तेथील एक वाहन जप्त केले.ज्यात तांदळाची ने-आण करण्यासाठी वापरले जात होते. यावेळी पथकाने तेथील दोघांना ताब्यात घेतले याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून ६ लाख १२ हजार ५०० रुपयांचा ३५ टन रेशनचा तांदूळ,३ लाख ५० हजार रुपयांचे वाहन असा एकूण ९ लाख६३ हजार५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येउन दोघाना ताब्यात घेतल्याने कार्यवाहीचा भितीने धान्य माफिया रेशन दुकानदार यांचे धाबे दणानले आहे.

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त घरीच अभिवादन करा.


विनम्र आवाहन -भीमराव आंबेडकर.

 मुंबई (प्रतिनिधी)आपल्या पूर्वजांच्या 1/1/1818 रोजीच्या शौर्य दिना निमित्त दरवर्षी 1 जानेवारी रोजी राज्यातून / देशभरातून लाखों भीम अनुयायी व जनता भीमा कोरेगाव (पुणे) येथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी येत असतात, या शौर्य दिनाचे व्यवस्थापन / नियोजन अनेक वर्षापासून भारतीय बौध्द महासभा । समता सैनिक दल आणि भीमा कोरेगाव विजय स्तंभ सेवा संघ च्या सहयोगाने करीत असतो. मात्र यावर्षी कोरोना महामारीचे संकट आले आहे ते अद्याप टळले नाही, कोरोनावरची लस अद्याप आलेली नाही. आता जगात दुसरी लाट आली असल्यामुळे कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेवून तमाम भीम अनुयायांना व जनतेला खालीलप्रमाणे विनम्र आवाहन करण्यात येत आहे. सर्व भीम अनुयायी व जनतेने विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव (पुणे) न येता, आपल्या स्थानिक ठिकाणी असलेल्या ( उदा. शहर, गाव, वार्ड, परिसर, बुद्ध विहार, स्मारक इत्यादी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी विजय स्तंभाच्या फोटोस पुष्पहार अर्पण करुन, विनम्र अभिवादन करावे. या अभिवादनाचे फोटो सोशल मिडियावर, व्हाट्सअॅप ग्रुपवर पाठवावेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणुन अभिवादन करताना, प्रत्येकाने शासनाच्या । स्थानिक प्रशासनाच्या सुचनेनुसार मास्क लावून, फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी आवाहनानुसार कोणतीही सभा होणार नाही, फक्त समता सैनिक दलाची मानवंदना होईल. या मानवदनेसाठी व व्यवस्थेसाठी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे निवडक केंद्रीय वरिष्ठ पदाधिकारी व केवळ पुणे जिल्ह्यातील (पूर्व व पश्चिम) समता सैनिक दलाचे निवडक सैनिक यांची पोलिस, प्रशासन याना सहकार्य करण्याकरिता नेमणूक करण्यात येणार आहेत. तरी, भीम अनुयायांनी व जनतेने भीमा कोरेगाव ( पुणे) येथे न येता, वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून, डॉ. बाबासाहेब आबेडकर यांना आपल्या स्थानिक ठिकाणी, घरीच अभिवादन करावे, ही नम्र विनंती पत्रका द्वारे केली आहे.

आ.संदिप क्षीरसागरांच्या खांद्यावर तैलीक महासभेच्या युवक अध्यक्षाची जबाबदारी.



* सर्वांना सोबत घेत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहिल-आ.संदिप क्षीरसागर
 
बीड :  महाराष्ट्रक प्रांतिक तैलीक महासभेच्या युवक अध्यक्षपदी सर्वानुमते बीडचे आमदार संदिप भैय्या क्षीरसागर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रांतिक तैलीक महासभेतील पदाधिकार्‍यांनी आ.संदिप क्षीरसागर यांच्या खांद्यावर तैलीक महासभेच्या युवक अध्यक्षाची जबाबदारी देवून ज्या संघटनेच्या उभारणीसाठी स्व.काकूंनी देशभरात काम केलं त्या संघटनेत मला काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो. पुढील काळात समाज बांधवांना सोबत घेवून राज्यभर समाजाचे प्रश्न समजावून घेत ते सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहिल अशी ग्वाही आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली आवार दि.27 डिसेंबर रोजी पुणे येथील साहित्यीक विजय तेंडुलकर सभागृहात महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या पदाधिकार्‍यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे अध्यक्ष खा.रामदासजी तडस साहेब, महासचिव डाॅ. भूषण कर्डीले, कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, कोषाध्यक्ष गजानन शेलार, सहसचिव बळवंत मोरघडे, सहसचिव संजू शेलार, आबासाहेब बागुल यांच्यासह महाराष्ट्र प्रांतिक महासभेच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. या महासभेच्या बैठकीत सर्वानुमते बीडचे आ.संदिप क्षीरसागर यांची महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या युवक अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी निवड झाल्यानंतर बोलतांना आ.संदिप क्षीरसागर म्हणाले की, तैलीक महासभेचे अध्यक्ष खा.रामदासजी तडस साहेब यांनी युवक अध्यक्षपदाबाबत विचारना केल्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना तैलीक संघटनेत काम करण्याबाबत विचारना केली मार्गदर्शन मागितलं. आदरणीय पवार साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता तैलीक महासभेत काम करा, समाजाचे प्रश्न सोडवा असा आदेश दिल्यानंतर तैलीक महासभेच्या बैठकीला उपस्थित राहिलो आहे. युवक अध्यक्ष या पदावर माझी निवड केल्याबद्दल अध्यक्ष खा.रामदासजी तडस साहेब, महासचिव डाॅ.भूषणजी कर्डीले यांच्यासह सर्व पदाधिकार्‍यांचे आभार मानतो. महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभेतील सर्व युवक बांधवांना माझी विनंती राहिल आपण मला साथ द्यावी, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्व मिळून एकतेच्या सुत्राने काम करूया, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहुया अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी तैलीक महासभेच्या महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातील पदाधिकार्‍यांची उपस्थिती  होते .

* पवार साहेबांनी सांगितलं,कोणतंही पद घ्या, समाजाचे प्रश्न सोडवा!

महाराष्ट्र तैलीक युवक महासभेचे अध्यक्षपद स्विकारण्याबाबत महाराष्ट्राचे अध्यक्ष खा.रामदासजी तडस यांच्याकडून बोलवणं आल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांना महाराष्ट्र तैलीक युवक महासभेचे अध्यक्षपद स्विकाराणे बाबत मार्गदर्शन मागितले. आदरणीय पवार साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता समाजाचे प्रश्न महाराष्ट्र तैलीक महासभेच्या माध्यमातून कोणतंही पद घ्या समाजाचे, प्रश्न सोडवा,जिथे गरज लागेल; तेथे हक्काने सांगा अशी सूचना केल्यानंतर आ.संदिप क्षीरसागर यांनी रविवारी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र तैलीक महासभेच्या बैठकीत महाराष्ट्र तैलीक युवक अध्यक्षपद स्विकारले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील तैलीक महासभेतील सर्व पदाधिकार्‍यांनी सर्वानुमते आ.संदिप क्षीरसागर यांची निवड केली आहे.

Sunday, December 27, 2020

पंकजाताई मुंडे यांची मध्यप्रदेशातही भूमिपुत्रांशी ऋणानुबंधाची घट्ट नाळ.

भोपाळ (म.प्र.) - भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची लोकप्रियता आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांशी असलेली ऋणानुबंधाची नाळ किती घट्ट आहे, याचा प्रत्यय मध्यप्रदेशातही पहायला मिळाला.

   झाले असे की, महाराष्ट्रातील साता-याचे रहिवासी असलेले भूमिपुत्र आएएस अधिकारी डाॅ. सुदाम खाडे (आयुक्त, जनसंपर्क) हे गेल्या पंधरा वर्षांपासून भोपाळ येथे कार्यरत आहेत. पंकजाताई मुंडे मध्यप्रदेशच्या सह प्रभारी झाल्यानंतर पहिल्यांदाच भोपाळ येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर डाॅ. सुदाम खाडे यांनी त्यांना आग्रहपूर्वक घरी येण्याचे निमंत्रण दिले. क्षणाचाही विलंब न लावता पंकजाताई यांनी हे निमंत्रण स्विकारले. डाॅ. खाडे व त्यांच्या पत्नी सौ. खाडे यांनी त्यांचे कौटुंबिक स्वागत केले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मनमोकळ्या गप्पांमध्ये  लोकनेते मुंडे साहेबांच्या सहवासातील आठवणींना डाॅ. खाडे यांनी उजाळा दिला. खाडे कुटुंबाच्या  स्वागताने पंकजाताईही भारावून गेल्या. बाहेरच्या राज्यात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील भूमिपुत्रांशी, आपल्या माणसांशी असलेले ऋणानुबंध इतक्या दूरवरही त्यांनी जपल्याचे या भेटीवरून लक्षात येते.

राष्ट्रीय महामार्गावर दुभाजक कशासाठी?अपघाताला जबाबदार कोण? हाॅटेल व्यावसायिक, रस्ते बांधकाम विभाग कि बेजबाबदार नागरीक? :- डाॅ.गणेश ढवळे

बीड तालुक्यातील मांजरसुंभा येथिल राष्ट्रीय महामार्गावर हाॅटेल कन्हैय्या समोर राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापुर क्रमांक 52 वरील दुभाजक तोडुन त्याठिकाणी मातीचा रॅम्प तयार केलेला दिसला.याठिकाणी वाहने बेकायदेशीर रित्या इकडून तिकडे जात वाहतुक नियमांची पायमल्ली करताना दिसली.यावेळी हाटेल व्यावसायिक यांना विचारल्यानंतर केवळ आजच्या लग्नामुळे केलेले आहे,आज संध्याकाळी काढून टाकतो ऊद्या सकाळी तुम्हाला दिसणार नाही.

सविस्तर माहितीसाठी:- 
राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापुर  कन्हैय्या बीड रोड हाॅटेल समोर लग्नाची घाई गडबड..राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक तोडलेले,मातीचा कृत्रिम रॅम्प तयार केलेला, वाहने अर्ध्यामधुनच ईकडून तिकडे जाताहेत,जर दुभाजकच तोडायचा असेल तर बांधलाय कशासाठी?
दुर्दैवाने भरधाव वेगात धावणा-या वेगाने अपघात जर झाला तर याला जबाबदार कोण??
यापूर्वीच बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय मा. नितिनजी गडकरी यांना लेखी तक्रार केल्यानंतर काही काळापुरता हा रॅम्प हटवण्यात आला होता.परंतु आज पुन्हा त्याठिकाणी रॅम्प केलेला आढळून आला....आता पुन्हा एकदा लेखी तक्रार करावी लागणार...

आपण बेजबाबदार नागरीक कुणाचा तरी घात करणार:- डाॅ.गणेश ढवळे 

जरी हाॅटेल व्यावसायिक यांनी दुभाजक तोडुन रस्ता तयार केला असेल, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आधिकारी, कर्मचारी यांनी दुर्लक्ष केले असले तरी जबाबदार नागरीकांनी वाहतुकीचे नियम  पाळले पाहिजेत, दुर्घटना टाळल्या पाहिजेत, दुस-यांवर जबाबदारी टाकणे टाळले पाहिजेत. अन्यथा केवळ आधिकाराची अपेक्षा करायची आणि कर्तव्याचे पालन करायचे नाही हे चालणार नाही. 

एक जानेवारीला मराठा आरक्षण जनजागृती महामेळावा.

औरंगाबाद : मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिध्द करुन ईएसबीसी मध्ये घटनात्मक आरक्षण मिळण्यासाठी 58 मोर्चे काढले. अनेकांनी 42 तरुणांनी बलिदान दिले. असे असताना समाजाच्या आरक्षणास स्थगिती मिळाली आहे. ती स्थगिती उठविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. आता ईडब्ल्युएस चांगले असल्याचा दावा करण्यात येत आहेत. या ईडब्ल्युएसला मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे विरोध करण्यात येत आहे. याच संदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी एक जानेवारीला औरंगाबादेत राज्यव्यापी मराठा आरक्षण जनजागृती महामेळावा घेण्यात येणार आहेत. अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केरे म्हणाले, ईडब्ल्युएस मराठा समाजाला कधीच मान्य राहणार नाही. एसईबीसी आरक्षण टिकावा नसता, ओबीसीतून आरक्षण मिळावे, अशी भुमिका घेण्यात आली होती. न्यायालयान एसईबीली मराठा आरक्षणाचा कायद्यावर शिकेमोर्तब केले होते. तेव्हा न्यायालयाने राज्य सरकारला ओबीसी प्रवर्गातील जातीचा सर्व्हे करुन निर्णय घेण्यात यावा असा आदेश असताना राज्य सरकारने काहीच कारवाई केली नाही. असे विविध मुद्दे मांडले. मराठा क्रांती मोर्चातर्फे पुढील दिशा ठरविण्यासाठी एक जानेवारीला जनजागृती मेळावा घेण्यात येणार असल्याचेही केरे म्हणाले.

एकनाथ खडसेनां ईडीची नोटीस. पण भोसरीतला भुखंड पत्नीने पाच कोटीला घेतला !- एकनाथ खडसे.


एकनाथ खडसे हे आज सायंकाळी वैयक्तिक कामानिमित्त जळगावात आलेले होते. त्यांनी आपल्या मुक्ताई निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडीच्या नोटिशीबाबत स्पष्टीकरण देत संभ्रम दूर केला. आपल्याला आजच भोसरीतील भूखंड प्रकरणी ईडीची नोटीस मिळाल्याचे त्यांनी सांगितले. खडसे पुढे म्हणाले की, भोसरी एमआयडीसीतील भूखंडाचा व्यवहार माझ्या पत्नीच्या नावाने झाला आहे. तसेच तो व्यवहार पाच कोटी रुपयाचा असुन रेडिरेकनर दराप्रमाणे त्याची खरेदी करण्यात आली आहे. त्यात माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. आता याच भूखंडाच्या संदर्भात मला ईडीने नोटीस बजावली आहे. याच प्रकरणाची यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, आयकर विभाग तसेच न्यायमूर्ती झोटिंग समितीकडून चारवेळा चौकशी झाली आहे. प्रत्येक वेळी आपण आवश्यक ती माहिती व कागदपत्रे सादर केली आहेत. त्यानुसार मला क्लीन चिट देखील मिळाली आहे. आता ईडीकडून पाचव्यांदा या प्रकरणाची चौकशी होणार आहे. आताही मी चौकशीला सामोरा जाणार आहे. ईडीला पण आधीच्या यंत्रणांप्रमाणे सहकार्य करू, असे एकनाथ खडसें यांनी सांगितले.

२६ जानेवारीपासून मराठा आरक्षणा साठी रस्त्यावर उतरणार !


* ई.डब्ल्यू.एस.आरक्षणावर मराठाक्रांती मोर्चा आक्रमक.

औरंगाबाद ;- येत्या २६ जानेवारी पासून मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार, असलेल्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चानं औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत केली आहे.

२५ जानेवारी रोजी मराठा आरक्षणा बाबतची स्थगिती नाही उठली तर २६ जानेवारी या तारखेपासून तिव्र स्वरूपात आंदोलन करणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या वेळी देण्यात आला आहे. राज्य सरकार आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्धार प्रामुख्याने या वेळी करण्यात आला. १ ते २५ जानेवारीपर्यंत राज्यभर आंदोलनाची पार्श्वभूमी तयार करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.दरम्यान शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी मात्र राज्य सरकारने घेतलेल्या ईडब्ल्यूएस निर्णयाचे स्वागत केले आहे.

Saturday, December 26, 2020

इंग्लंडवरुन आलेल्या प्रवाशांच्या विशेष सर्वेक्षणात १६ जण कोरोना पॉझिटिव्ह.

मुंबई, दि.२६: इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला करोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक २५ नोव्हेंबर २०२० नंतर राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे, या संदर्भातील तपशील असा: आज पर्यंत ११२२ प्रवाशांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली. 
यापैकी १६ प्रवाशी कोरोना बाधित आढळून आले आहेत. 
( त्यात नागपूर – ४, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी -३, पुणे -२ आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड प्रत्येकी १) अशी संख्या आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात येत आहेत. 
बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आजवर शोधण्यात आलेल्या ७२ निकट सहवासितांपैकी २ निकट सहवासित करोना बाधित आढळले आहेत.

संगम येथे पशुसंवर्धन व लाळया खुरखुत रोगाचे लसीकरण शिबीर संपन्न.सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांच्या माध्यमातून शिबीराचे आयोजन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
परळी तालुक्यातील मौजे संगम येथे पशुसंवर्धन व लाळया खुरखुत रोगाचे लसीकरण शिबीर संगमच्या सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांच्या माध्यमातून आज शनिवार दि.26 डिसेंबर रोजी संपन्न झाले.
संगम येथे पशुसंवर्धन शंभर  गाय, बैल, म्हैस,यांच्या कानात बिल्ले मारण्याचा उपक्रम व  लाळ्या खुरखुत रोगाचे लसीकरण शिबीर  आज शनिवार दि.26 डिसेंबर रोजी शेतकर्‍यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी डॉ. पि.एल.आघाव यांंनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन  लाभले.
परळी जवळील संगम येथे पशुसंवर्धन उत्साहात संपन्न  झाले. गावातील शेतकर्‍यांनी आपआपली गाय, बैल, म्हैस हनुमान मंदिरासमोर जनावरे घेऊन प्रत्येक जनावरांच्या कानात बिल्ले मारल्ले.संगमच्या सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांच्या पुढाकारातुन शिबिर आयोजित करण्यात आले होते. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पि.एल.आघाव यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. काळदाते व डॉ. ज्योतिबा मुंडे,बोंडारे व गावातील शेतकरी यांनी परिश्रम घेतले व यशस्वी शिबिर केले असल्याचे सरपंच कोकाटे यांनी या वेळी सांगण्यात आल्या असल्याचे सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांनी सांगितले व सर्व डॉक्टर टिमचे व शेतकरी बांधवांचे आभार अ.भा.वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांनी मानले.

गंगाधरअप्पा नावंदे यांचे दुःखद निधन.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) गंगाधरअप्पा शिवाप्पा नावंदे यांचे आज शनिवार दि.26 डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते 67 वर्ष वयाचे होते.गंगाधरअप्पा नावंदे यांच्यावर उद्या रविवार दि.27 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता परचुंडी ता.परळी येथे   अंत्यविधी होईल.
परळी तालुक्यातील परचुंडी येथील रहिवाशी गंगाधरअप्पा शिवाप्पा नावंदे यांचे आज शनिवारी दुःखद निधन झाले. आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांचे ते जेष्ठ बंधू होत. गावातील धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. त्यांच्या निधनाने या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन व दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान गंगाधरअप्पा शिवाप्पा नावंदे यांच्यावर उद्या रविवार दि.27 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता परचुंडी ता.परळी येथे   अंत्यविधी होईल. नावंदे कुटूंबियांच्या दुःखात दैनिक कांतीकारी साथी परिवार सहभागी आहे.

मराठा आरक्षणात राज्य सरकारकडून घोडचुका-आ.विनायक मेटे

* मराठा आरक्षणासंदर्भात आघाडी सरकारने घोडचुका करून ठेवल्या आहेत. नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झाली त्यांची परिस्थिती काय? शैक्षणिक प्रवेशाचे काय? यासंदर्भात कुठलाही स्पष्ट उल्लेख या आरक्षणामध्ये नाही, असा आरोप आ. विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

जालना - मराठा आरक्षणासंदर्भात आघाडी सरकारने घोडचुका करून ठेवल्या आहेत. नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झाली त्यांची परिस्थिती काय? शैक्षणिक प्रवेशाचे काय? यासंदर्भात कुठलाही स्पष्ट उल्लेख या आरक्षणामध्ये नाही. या सर्व प्रकाराकडे लक्ष देण्याचे सोडून अशोक चव्हाण राजकारण करण्यात गुंग आणि मग्न आहेत, असा आरोप शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा आ. विनायक मेटे यांनी केला आहे.

आ. विनायक मेटे काही वेळासाठी जालन्यात थांबले होते त्यावेळी ईटीव्हीशी बोलताना आ. मेटे म्हणाले की, सरकारने आरक्षण दिले असले तरी राज्य शासनाने यामध्ये मोठ्या घोडचुका करून ठेवलेल्या आहेत. नोकर भरतीमध्ये कोणत्या कोट्यातून आरक्षण दिलं जाणार आहे? शैक्षणिक प्रवेशाचे काय? याचा स्पष्ट उल्लेख नाही. या घोड चुका सरकार करीत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे आणि हे सरकार हा संभ्रम वाढवण्याचे काम जाणीवपूर्वक करत आहे. खरे तर या सर्व बाबींचा स्पष्ट उल्लेख करायला हवा होता. मात्र तो न करता अशोक चव्हाण राजकारण करण्यातच गुंग आहेत. त्यामुळे आठ लाखांची मर्यादा असली तरीही यापूर्वी भरती झालेल्या सर्वांना ईडब्ल्यूएसमधून नियुक्त्या दिल्या पाहिजेत.अन्यथा सरकारने कितीही अध्यादेश काढले तरी त्याचा उपयोग होणार नसल्याचेही मेटे यांनी सांगितले.

* मराठा आरक्षणाबाबत बोलताना विनायक मेटे

पूर्वीच्या सरकारचे कौतुक -


यापूर्वीच्या सरकारने काय केले? असे विचारले असता फडणवीस सरकारने आरक्षण देण्याचे काम केले. महामंडळांना मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि शिक्षणाची फी प्रतिपूर्ती त्यांनी केली आहे. सारथी सारख्या संस्थेलाही त्यांनी उभे करण्याचे काम केले. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण हे मराठा समाजाची दिशाभूल करत असून घराघरात भांडणे लागतील, अशा पद्धतीचे निर्णय घेत आहेत. मराठा समाजाच्या विकासासाठी एकही काम केले नसल्याचा आरोपही आमदार विनायक मेटे यांनी केला.

खा.प्रीतम मुंडे यांनी घेतला खा.सुप्रिया सुळेंचा समाचार.दिले जशात तसं उत्तर.


facebook sharing button
twitter sharing button
whatsapp sharing button
बीड  :- सुप्रिया सुळे म्हणाल्या, शेतकऱ्यांना पैसे नको, न्याय हवा, या वक्तव्याला प्रितम मुंडेंनी जशास तसं उत्तर दिलं आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना न्याय तर दिलाच आहे मात्र त्याच बरोबर पैसा, त्यांच्या उत्पादनाला हमीभाव आणि शेतकऱ्यांची सुरक्षा देण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे, असा टोला खासदार प्रीतम मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.

भाजपचे आज (शुक्रवार) राज्यभर शेतकरी संवाद अभियान सुरु आहे. या अभियानाअंतर्गत भाजपचे विविध नेते राज्यभर तसंच देशभरात कार्यक्रम घेऊन कृषी कायद्यांचं महत्त्व पटवून देत आहेत. बीडमधल्या संवाद अभियानामध्ये सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रीतम मुंडे यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला. शेतकरी आंदोलनाला आज 30 दिवस पूर्ण झाले तरी शेतकऱ्यांचं म्हणणं केंद्र सरकार ऐकून घेत नसल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचा मान करत नाही. सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही. शेतकऱ्यांना पैसे नकोत. न्याय हवा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

“केंद्रातील सरकार असंवेदनशील आहे. गरीब शेतकऱ्यांचा हे सरकार सन्मान करत नाही. शेतकऱ्यांवर अन्यायच करत आहे. जे धोरण सरकारने आणलं आहे. त्यावर योग्य चर्चा करण्याची गरज आहे, असं सांगतानाच देशात अस्वस्थता वाढत आहे. शेतकरीही अस्वस्थ आहेत. त्यांना पैसे नको आहेत. त्यांना न्याय हवा आहे. सर्व काही पैशाने विकत घेता येत नाही. माणसाचा स्वाभिमान तर नाहीच नाही”, असं सुप्रिया म्हणाल्या. मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय आणि नेहमीच राहील. शेतकऱ्याला त्याचा मालाचा योग्य मोबदला देण्यासाठी आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी कृषी कायदे आणले मात्र विरोधक या कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“मोदी सरकारचे कृषी कायदे म्हणजे शेतकऱ्यांना संरक्षण देणारे कृषी कायदे आहेत. सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोधकांनीअभ्यास करावा. कंत्राटी शेती करताना काही वाद झाले तर शेतकऱ्यांना कोर्टात जाता येणार आहे, हे या कायद्यात आहे. तसंच एमएसपी कुठेही रद्द होणार नाही, बाजार समिती बरखास्त केल्या जाणार नाही, हे या कायद्यात असूनही विरोधक शेतकऱ्यांना खोटं सांगून भडकवण्याचं काम करत आहेत”, अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली

मांडवा तिर्थक्षेञ श्री.काळभैरव देवस्थान याञा उत्सव साधेपणाने साजरा होणार.


 * सोशल डिस्टन्स ठेवून दर्शन व पाच मानकरी यांच्या उपस्थिती पालखी सोहळा.

परळी वैजनाथ-(प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे मांडवा येथील तिर्थक्षेञ श्री.काळभैरव देवस्थानचा परंपरीक याञा उत्सव या वर्षी कोव्हिड १९ मुळे अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मांडवा ग्रामस्थांनी घेतला आहे,याञे निमित्ताने होणारी धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत तसेच कुस्त्यांच्या दंगली भरविण्यात येणार नसल्याचे देखील ग्रामस्थांनी जाहीर केले आहे.
दर वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला परंपरागत पध्दतीने मोठ्या उत्साहाने साजरा होणारा  तिर्थक्षेञ श्री.काळभैरव देवस्थानचा तिन दिवसीय याञा उत्सव करण्यात येतो. येथे दर्शनासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील मथुरा लभाण समाजाचे भक्त हजारोच्या संख्येने तिन दिवसीय मुक्कामी येत असतात.मोठ्या प्रमाणात खेळण्याची दुकाने तसेच विविध धार्मिक कार्यक्रम ,महापुजा व पालखी मिरवणूक काढण्यात येत असते तसेच कुसत्यांच्या दंगली भारवण्यात येतात.

या वर्षी कोव्हीड १९ मुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासना कडून नागरिकांना आरोग्य विषयक सुचना व जमाबंदी आदेश देण्यात आले आहेत. मा.जिल्हाधिकारी साहेब बीड व पोलिस प्रशासन ,आरोग्य विभाग यांनी दिलेल्या सुचनेचे पालन करून श्री.काळभैरव मंदिर परिसरात निरजंतुकीकरण करण्यात आले आहे.तसेच भक्तांनी दर्शन घेते वेळी तोंडाला मास्क बांधने बंधनकारक असणार आहे , हताला सँनेटाईजर वापरण्याचा सुचना देण्यात आली आहे. दर्शनासाठी गर्द होणार नाही व सुरक्षित शारीरिक अंतर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.शासनाच्या सर्व नियमाच्या आधीन राहून याञा उत्सव साधेपणाणे विधीवध महापुजा करून करण्यात येईल व पालखी मिरवणूक पाच मानकरी यांच्या उपस्थिती संपन्न होईल, याञा उत्सवा निमित्ताने होणारे विविध धार्मिक कार्यक्रम रद्द केले आहेत.तसेच कुस्त्यांच्या दंगली रद्द करण्याचा निर्णय मांडवा ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पञकाद्वारे जाहीर केला आहे.

दैनिक झुंजार नेताचे प्रतिनीधी अनंत कुलकर्णी यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार जाहीर.


परळी वैजनाथ-(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषद परिषदेच्या वतिने देण्यात येणारा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवाकार्य पुरस्कार परळी येथील झुंजार नेताचे पत्रकार अनंत कुलकर्णी यांना जाहीर झाला असुन या पुरस्काराचे येरमाळा ता.कळंब येथे दि.31 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार आहे.
राज्यात मागील अनेक वर्षांपासून व्यसनमुक्त चळवळ सक्षम व्हावी या चळवळीतुन एक दिवस व्यसनमुक्त राष्ट्र,सशक्त राष्ट्र घडो या राष्ट्रहिताच्या ध्येयाने महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषद कार्यरत आहे.व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी या कार्यक्रमात अनेक संस्था,व्यक्ति, पत्रकार इतर काम करत आहेत.सदर लोकांनी केलेल्या कार्याची दखल घेत परिषदेच्या वतीने आयोजक डॉ.संदिप तांबारे उस्मानाबाद ,अजय शेरकर बीड हे राज्यातील नामवंत व्यक्तीनां राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार देऊन गौरवित असतात.यावर्षीच्या पुरस्कारासाठी दैनिक झुंजार नेता च्या माध्यमातून व्यसनमुक्त साठी लेख, परळी ग्रामीण भागात सामाजिक भागातील युवकांना व्यसनापासुन दुर ठेवण्यासाठी सतत कार्यशिल असणारे व समाजात सलोखा कायम रहावा यासाठी आपल्या वृत्तांकन व लेखाद्वारे जनजागृती करणारे परळी पत्रकार संघाचे माजी शहराध्यक्ष अनंत कुलकर्णी यांच्या या कार्याची दखल घेवुन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सामाजीक क्षेत्रात सतत सहभाग असणारे अनंत कुलकर्णी यांना हा पुरस्कार जाहिर झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

परळीतील जुने प्रतिष्ठित व्यापारी नारायण गोविंदराव शिवगण (साळी) यांचे निधन.


परळी वैजनाथ - शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नारायण गोविंदराव शिवगण (साळी) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.आज शुक्रवार दि.25 डिसेंबर रोजी दुपारी 2.40 वा. त्यांची प्राणज्योत मालवली,मृत्यूसमयी ते 90 वर्षांचे होते.

स्वाती नगर मधील रहिवासी असलेले नारायण गोविंदराव शिवगण त्यांच्या मितभाषी स्वभावामुळे सर्वदूर परिचित होते.त्यांच्या पश्चात 5 मुले 1 मुलगी नातवंडे,सुना असा परिवार आहे.नारायण शिवगण यांच्या पार्थिवावर शनिवार दि.26 रोजी सकाळी 8 वा वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.अंत्ययात्रा राहते घर स्वाती नगर,नाथ टॉकीज समोर येथून निघेल.कांतीकारी साथी परिवार शिवगण यांच्या दु;खात सहभागी आहे.

Friday, December 25, 2020

राजा उदार नाही तर उधार झाला ! - देवेंद्र फडणवीस


ते पुढे म्हणाले की, “सरकारमध्ये शेतकऱ्यासंदर्भात बोलणारं कोणी नाही. शेतकऱ्याचा विचार कऱणारं कोणी नाही. पाच वर्ष सातत्याने आम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय़ घेतले. अतिवृष्टी, दुष्काळ, पीक रोग प्रत्येकासाठी आम्ही पैसा दिला. शेतकऱ्यावर जेव्हा कधी संकट आलं तेव्हा आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो. पण आज सरकार शेतकऱ्यांकडे ढुंकून पहायला तयार नाही. शेतकऱ्यांचा साधा विचारही केला जात नाही.”

“आमच्या शेतकऱ्यांना सहा आणि आठ हजार रुपये घोषित केले आणि ते देखील पोहोचले नाहीत. शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे,” असा संताप फडणवीसांनी व्यक्त केला.

“आपल्याला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणतात….आमच्या कर्जमाफीच्या नावावर नावं ठेवत यांनी घोषणा केली. आमची कर्जमाफीची योजना संपलीच नव्हती. आम्ही निवडणूक झाल्यावर पुन्हा सुरु करु असं सांगितलं होतं. आमच्या योजनेमध्ये ४२ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला. यांच्या योजनेत फक्त २९ लाख शेतकऱ्यांना झाला. आज शेतकऱ्यांसाठी एकही योजना नाही,” अशी टीका यावेळी फडणवीस यांनी केली

तोतया पत्रकाराने लुटले वृत्तपत्र विक्रेत्याला. भरदिवसा रहदारीच्या चौकात घडली घटना.


चंद्रपूर : ( प्रतिनीधी)   शहरात मागील काही दिवसांपासून लुटमारीच्या घटनेत वाढ होत आहे, नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे पोलीस प्रशासन आवाहन करीत आहे, या गुन्ह्यात अल्पवयीन बालकांचा समावेश आहे.

नगीनाबाग येथील मच्छिंद्र वाळके हे वर्तमानपत्र वितरणाचे काम करतात, 22 डिसेंम्बरला वाळके हे वर्तमानपत्र वितरण व वसुली करून सकाळी 10.30 च्या सुमारास अरविंदनगर चौकात उभे असतांना 25 ते 30 वयोगटाचा 1 युवक आपल्या दुचाकी वाहन क्रमांक mh34 0532 ने त्यांच्याजवळ येत म्हणाला की तू वाहतुकीचा नियम मोडला, तुझ्यामुळे मी पडलो असतो, मी चंद्रपुरातील स्थानिक वृत्त वाहिनीचा पत्रकार आहे असे म्हणत तू पोलीस स्टेशनला चल असे म्हणू लागला, मी काही केलं नसल्याचे त्या युवकाला म्हणालो असता तो काहीही न ऐकण्यास तयार नव्हता अखेर मी माझी मोटारसायकल काढत चल म्हटलं ठाण्यात मात्र त्या युवकाने माझ्या गाडीवर बस असे म्हणत साधारणतः 200 मीटर अंतरावर नेले असता त्याने आपली दुचाकी थांबवित आपण इथेच सेटलमेंट करू असे म्हणत माझ्या खिशातील 6 हजार 500 रुपये जबरदस्तीने काढून घेत तो निघून गेला.
घडलेल्या या प्रकाराची वाळके यांनी रामनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता पोलिसांनी 392 अंतर्गत गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

या घटनेत जर पैसे घेणारा स्थानिक वृत्त वाहिनीचा पत्रकार असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करायला हवी, मात्र कुणी पत्रकाराच्या नावावर असे कृत्य करून पत्रकारांना बदनाम करीत असेल तर ते योग्य नाही, घटना परिसरात अनेक सीसीटीव्ही कॅमेरे लागले असून पोलिसांनी ते तपासून चौकशी करायला हवी, नाहीतर अश्या घटना भविष्यात घडतच राहतील

सारथीची मराठा संशोधक विद्यार्थी मुलाखत यादी जाहीर!


पुणे,- सारथी संस्थेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती 2020 कार्यक्रमात सारथी संस्थेच्या वतीने राज्यभरातील अधिछात्रवृत्ति 2020 जी प्रक्रिया सुरू करावी म्हणून संशोधक विध्यार्थी वर्गाने अनेक वेळा निवेदन देऊन शासना कडे मागणी केली होती.जालना येथे राज्य स्तरीय मराठा जागरण परिषदेत संशोधक विद्यार्थी वर्गाने समस्या मराठा आरक्षणाचे जेष्ठ अभ्यासक आणि सर्वोच्च न्यायालयातील मराठा समाजाच्या वतीने असलेले मुख्य हस्तक्षेप याचीका कर्ते राजेंद्र दाते पाटील यांना लक्षात आणून देण्याचे काम विद्यार्थी वर्गाच्या वतीने
संशोधक छात्र योगेश बहादुरे यांनी सविस्तर सांगितल्या या सर्व बाबी आणि समस्या अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी समजून घेतल्या नंतर त्यांनी एक सविस्तर निवेदन राज्य शासनाच्या समान्य प्रशासन विभागाचे प्रमुख किशोर राजे निंबाळकर यांना देऊन दिवाळी पूर्वीच्या कार्यकाळात सातत्याने पाठ पुरावा केला व मागणी केली होती की, राज्य शासनाच्या वतीने मराठा विद्यार्थी वर्गाला अधिछात्रवृत्ती सुरु झालेली असुन सारथी संस्थे मार्फत शैक्षणीक वर्ष 2020 साठी
जानेवारी महिन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले गेले होते ते विद्यार्थी संशोधकांनी भरले सुद्धा होते परंतु या बाबत सारथी कडुन पात्र संशोधक विद्यार्थी वर्गाच्या मुलाखती घेणे बाकी आहे म्हणुन या विद्यार्थी वर्गाचे नुकसान होऊ नये म्हणुन त्यांना मुलाखती साठी बोलावणे क्रमप्राप्त आहे.
विद्यार्थी वर्गाची ही समस्या निवेदन देऊन अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी राज्य शासनाच्या समान्य प्रशासन विभागाचे प्रमुख किशोर राजे निंबाळकर यांना दिली असता ही बाब त्यांनी तात्काळ सारथी संस्थेचे कार्यकारी संचालक अशोक काकडे यांना व्हिडीओ कॉल द्वारे संपर्क करून तात्काळ कागद पत्रे तपासुन संशोधक विद्यार्थी वर्गाला मुलाखती साठीची यादी प्रसिद्ध करण्याचे सांगुन यु जी सी च्या नियमा प्रमाणे एम फील व पी एच डी संशोधन अधीछात्र वृत्ती नोंदणी केलेल्या तारखे पासुन मंजूर करता येते किंवा कसे हे सुद्धा तपासावे त्यानुसार बहुसंख्य विद्यार्थी वर्गाला अधी छात्रवृत्ती मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली असुन काही विद्यार्थी वर्गाच्या हजेरी बाबतचा अहवाल दाखल केला जाणे बाकी असुन तो दाखल झाल्यावर उर्वरित विद्यार्थी वर्गाला सुद्धा त्याचा लाभ होणार आहे या मध्ये अद्याप अकस्मित खर्च, शैक्षणीक साहित्य, संशोधन केंद्राला भेटी साठीचा खर्च, वाढीव घरभाडे, लॅपटॉप देणे या वरील अंतीम निर्णय होणे बाकी असुन ही बाब सुद्धा अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी किशोर राजे निंबाळकर यांचे निदर्शनास आणून दिली आहे.दिनांक 23 डिसेंबर 2020 रोजी सारथी संस्थेने सदर विद्यार्थी वर्गाची मुलाखती साठीची यादी प्रसिद्ध केली असल्यामुळे सर्व त्रुटी दूर करून व अपेक्षीत सर्व कागद पत्रे सारथी संस्थे कडे 15 जानेवारी 2021 पर्यंत दाखल करावेत असे सारथी संस्थेने कळविले असून संशोधन छात्रारांच्या वतीने जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांचे मुळे न्याय मिळाल्या बद्दल त्यांचे विशेष आभार मानन्यात येत असल्याचे संशोधक छात्र योगेश बहादुरे यांनी सांगितले आहे

हिंगणघाट आगारात बसेसचा तुटवडा.बर्‍याच गावांपर्यंत अद्याप बस पोहचलीच नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.





हिंगणघाट - (प्रतिनिधी)हिंगणघाट आगारात बसेसचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याने ग्रामिण भागातील फेर्‍यांवर त्याचा परिणाम झाला असुन विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन वंचित रहावे लागत आहे.
 परिवहन मंडळाच्या हिंगणघाट आगाराच्या माध्यमातुन नागपूर,वर्धा ईत्यादीसह राज्यातील मोठ्या शहरासोबतच हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील ग्रामिण भागातील प्रवासी वाहतुक संचालित केल्या जाते.कोरोनामुळे संचारबंदी लागल्याने मागील नऊ महिन्यापर्यंत परिवहन मंडळाची प्रवासी वाहतुक बर्‍याच कालावधीपर्यंत बंद होती.आता जनजीवन सुरळीत झाले असुन महत्वाचे म्हणजे शाळा सुरु झाल्याने प्रवाशांसोबत विद्यार्थ्यांनाही हिंगणघाटकडे धाव घ्यावी लागत आहे.परंतु परिवहन मंडळाच्या हिंगणघाट आगारात बसेसची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याने ग्रामिण भागात बससेवा अद्याप पर्यंत पुर्णपणे पोहचु शकलेली नसल्याने प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे.कारण ग्रामीण भागातील नागरीक शहरात येण्यासाठी प्रवासी वाहणांचा आधार घेतांना दिसतात. परंतु प्रवासी वाहनाला अव्वाच्या सव्वा पैसे मोजणे  पासधारक विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य होऊ शकत नाही.आनलाईन शिक्षणात मोबाईल व नेटवर्क अभावी शिक्षणाचा खेळखंडोबा झालेला असतांनाच आता प्रवासाच्या सोई अभावी शिक्षणापासुन वंचित रहावे लागत आहे. अशातच अद्यापर्यंत हिंगणघाट पासुन चिकमोह,वणी,जांगोना,परडा,डोंगरगाव,करुड पवनगाव ईत्यादी अनेक गावांपर्यंत बससेवा पोहचु शकलेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
 बारा बसची कमतरता - आगार व्यवस्थापक नेवारे
   हिंगणघाट आगारात सध्या जवळजवळ बारा बसेसची कमतरता असल्याने आम्ही पुर्ण फेर्‍या चालवु शकत नसल्याचे परिवहन मंडळाच्या हिंगणघाट आगाराचे व्यवस्थापकवारे यांनी सांगीतले.
प्रत्यक्षात हिंगणघाट आगारात ७२ बसेस होत्या.त्यातील १० मालवाहू वाहणे बनली.आठ बस पासिंगसाठी गेल्या असुन ईतर बंद स्थितीत आहेत.सध्या हाताशी ५० बसेस असुन त्यांच्या माध्यमातुन ५६ सेड्युल चालविण्याच्या आम्ही प्रयत्नात असल्याचे पुढे बोलतांना नेवारे म्हणाले.तसेच कोणतीही फेरी चालवतांना आम्हाला उत्पंनाचाही विचार करावा लागत असला तरीही विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ग्रामिण भागातील पुर्ण फेर्‍या चालु करण्याच्या प्रयत्नात आम्ही असल्याचेही त्यांनी सांगीतले.

वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या चोरी प्रकरणात राष्ट्रवादीच्या नगरसेविका पतीचा हात !

* परळीत गुन्हा दाखल, तो पोलिसांच्या तावडीतून निसटला पण इतर सहकारी अटकेत.

परळी वैजनाथ - वैद्यनाथ साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या चोरी प्रकरणामागे राष्ट्रवादीच्या एका नगरसेविका पतीचा हात असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या नगरसेवकाचा कसून शोध घेत असून काल तो पोलिसाच्या तावडीतून निसटला, मात्र त्याच्या इतर चार सहका-यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेले चारपैकी तिघे परळीतील व एक लातूरचा असल्याचे समोर आले आहे.
वैद्यनाथ साखर कारखान्यातील स्टोअर गोदाम व वर्कशाॅप गोदामातून नुकतेच संगणक संच, माॅनिटर, काॅपर मटेरियल, बिअरिंग, ब्रास मटेरियल, बुश राऊंड असे विविध साहित्य चोरटयांनी लंपास केले होते, ज्याची किंमत सुमारे ३७ लाख ९४ हजार ९१४ इतकी होती. कारखान्याचे लिपीक खदीर शेख यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी भादवि ४६१,३८० कलमान्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय होता, त्यावरून पोलिसांनी रमेश उर्फ पिंटू माणिक काळे, सलाऊद्दीन गफार सय्यद, मोशीन गौस काकर (सर्व रा. परळी) व मुतजीन मुनीर शेख रा. लातूर यांना अटक केली.
या चोरी प्रकरणी पोलिसांनी अजीज इस्माईल उर्फ मंगलदादा शेख रा. परळी याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मंगलदादा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती आहे. आतापर्यंत त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत. वैद्यनाथ कारखान्यातील चोरीमागे त्याचा हात असल्याने पोलिसांनी त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. काल शोध घेताना पोलिसाच्या तावडीतुन तो निसटला पण त्याच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे. पोलिस मंगलदादाच्या मागावर असून त्याला लवकरच अटक करू असे पोलिसांनी सांगितले.

भीमा कोरेगावसह अकरा गावामध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी पर्यंत प्रवेश व जमावबंदी.


 पुणे : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाच्या ठिकाणी १ जानेवारी रोजी लाखो नागरिक येत असतात. पण यंदा करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा भीमा कोरेगाव सह अकरा गावामध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ पर्यंत नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. असे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आज काढले आहे. भीमा कोरेगावमध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभास १ जानेवारी रोजी दरवर्षी लाखोंचा जनसमुदाय येत असतो. मात्र यंदा करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वर्षभरामध्ये आपण सर्व सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले आहे. हे लक्षात घेऊन, भीमा कोरेगावच्या आसपास भागातील लोणीकंद, पेरणे, तुळापूर, बकोरी,वढू खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या गावांमध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ सकाळी सहा वाजेपर्यंत बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या कार्यक्रमाचे प्रसारण १ जानेवारीला दिवसभर दूरदर्शन आणि समाज माध्यमांवर केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

दरम्यान ३१ डिसेंबरला होणाऱ्या एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होणार नाही असं वाटत होतं. मात्र त्याचवेळी ही परिषद होईल अशी घोषणा करण्यात आली होती. तसंच यासाठी पुणे पोलिसांकडे परवानगीही मागितली होती. पुणे पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला देशभरातले अनुयायी येत असतात. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका सौ.शमीम राजमोहंमद शेख यांचा संगम येथे सत्कार.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा आदर्श शिक्षिका सौ.शमीम राजमोहमंद शेख यांचा आज गुरूवार दि.24 डिसेंबर रोजी परळी तालुक्यातील मौजे संगम येथे सत्कार करण्यात आला.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा आदर्श शिक्षिका सौ.शमीम शेख यांनी आज गुरूवारी संगम येथील सरपंच सौ.वच्छालाबाई कोकाटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसगी कोकाटे  परिवाराच्या वतीने शेख यांचा संगमच्या सरपंच सौ.वच्छालाबाई कोकाटे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सौ.ज्योती रामेश्वर कोकाटे, आशा कार्यकर्ती संघटनेच्या तालुकाध्यक्षा सौ.वर्षा बबनराव कोकाटे, सौ.डॉ. नेहा अर्षद शेख ,डॉ.अर्शद शेख, बबन कोकाटे, अ.भा.वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, December 24, 2020

कुलकर्णी-आयचित विवाह सोहळा साधेपणाने साजरा.कोरोना नियमांचे वर्‍हाडींनी केले पालन.


परळी वैजनाथ-(प्रतिनिधी)चि.बालाजी प्रसाद कुलकर्णी परळी व चि.सौ.कां.अक्षदा जयतिर्थाचार्य आयचित रा.गंगाखेड यांचा विवाह सोहळा आज परळी येथे उत्साहपूर्ण व तेवढयाच साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी विवाह कार्यक्रमातील अनावश्यक खर्चाला टाळा देण्यासोबतच कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या शासकिय नियमांचे पालन वर्‍हाडी मंडळींनी केले. 
परळी येथील प्रसाद कुलकर्णी यांचा मुलगा चि.बालाजी आणि गंगाखेड येथील जयतिर्थाचार्य यांची सुकन्या चि.सौ.कां.अक्षदा यांचा विवाह सोहळा परळी येथे आज पार पडला. यावेळी वर्‍हाडी मंडळींनी तोंडावर मास्क बांधण्यासेाबतच सुरक्षित अंतर व आवश्यक असलेल्या सर्व नियमांचे पालन केले. वधु आणि वर या दोन्ही कुटूंबियांनी विवाह कार्यक्रमावर अतिरिक्त खर्च कमी करून अत्यंत साधेपणाने हा विवाह सोहळा पार पाडला. उपस्थित पाहुण्यांनी दोन्ही कुटूंबियांचे साधेपणाने विवाह केल्याबद्दल अभिनंदन केले व नवदांम्प्त्यांना शुभाआशिर्वाद दिले.

महामंडळावर आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाला स्थान द्यावे. डॉ. राजन माकणीकर.


मुंबई ;-- (प्रतिनिधी) महामंडळ वाटपा वेळी महाविकास आघाडी सरकारला आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाचा विसर पडायला नको, अन्यथा आगामी निवडणुकीत आघाडीची बिघाडी करायला वेळ लागणार नाही असा टोला डॉ. राजन माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना लगावला.

विधानसभा व लोकसभेला काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत युती करून निवडनुक लढवून मताधिक्याने काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला निवडून आणण्यात आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाची म्हत्वापूर्ण भूमिका बजावली आहे.

कुठल्याही अतिशर्थी ना ठेवता बिनशर्त आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाने आघाडी सरकारला मदत करून सत्तेत बसवले आहे. सत्तेतील घटक पक्ष या नात्याने सत्तेत भागीदारी असूनही कोणता अट्टाहास धरला नाही. 

डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मागणीचा सूर येत असून महामंडळ वाटप करतांना आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाचा विसर पडू नये. 

आंबेडकरी जनतेत प्रचंड लोकप्रियता मिळवत असलेले युवा नेते कनिष्क कांबळे व त्यांचा पक्ष भविष्यातील सत्तांतरणाच्या दिशेने वाटचाल करत असून नवी ताकत पक्षाला लाभत आहे.

विधान परिषदेवर घेत असलयाचे सांगून यादीत नावे फिरवून शेवटी निराशा हाती दिली, महामंडळाच्या बाबतीत तर पुनरावृत्ती घडली तर महापालिकेच्या राजकारणाचे चित्र नक्कीच बदलेल आणि महाघाडीच्या सरकारला हार पत्करावी लागेल.

यामुळे महामंडळ वाटप करतांना युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या नावाचा विसर पडता कामा नये अन्यथा महापालिकेत आघाडी ची बिघाडी करण्यात आरपीआय कमी पडणार नाही याची नोंद घेण्याचा इशाराही यावेळी राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी दिला.

सदर विषयी लवकरच राष्ट्रीय उपाध्यक्ष व प्रवक्ता वसंत कांबळे यांच्या नेतृत्वात कॅ. श्रावण गायकवाड, भाई शिवा राठोड, डॉ. राजन माकणीकर, प्रदेशद्याक्ष हरिभाऊ कांबळे, राज्य निरीक्षक बळवंत पाटील आदींचे शिस्तमंडल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचीही माहिती डॉ माकणीकर यांनी दिली.