Tuesday, December 15, 2020

बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने एस टी कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन.



  • चंद्रपूर बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने संतप्त झालेल्या एस. टी कर्मचाऱ्यांनी  दुपारी 3 ते 6 ह्या कालावधीत आंदोलन सुरू करून 3 तास बस वाहतुक थांबविली असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने मागील 3 दिवसांपासुन कर्मचाऱ्यांनी विभागीय आगार प्रमुखांकडे तक्रार दिली होती. त्याचप्रमाणे प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे देण्यात आली होती.

परंतु ह्या रास्त मागणीवर वरिष्ठ अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला व कामगार नेत्यांनी चंद्रपूर बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या मागणीसाठी बस फेर्‍या थांबविण्याची हाक दिली. त्यामुळे चंद्रपूर बस स्थानकावर आलेल्या बस तिथेच अडकून पडल्या. बाहेरून येणार्‍या आणि पुढे जाणार्‍या बस मधिल प्रवाशांना त्यामुळे अडकून पडावे लागले त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याची जाणिव ठेवणे गरजेचे होते. परंतु असे झाले नसल्याने प्रवाशांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली असल्याचे समजले आहे.

वाहक व चालकांनी मागण्या मान्य होत पर्यंत कामकाज थांबविण्याचा निर्णय घेतला. जवळपास 3 तास बस वाहतुक खोळंबल्या नंतर प्रशासनाला जाग आली. त्यानंतर आगार व्यवस्थापक सचिन डफले, महामंडळाच्या चंद्रपूर विभागातील महिला अधिकारी रंजु घोडमारे, कामगार अधिकारी के. आर. बेलवे, सुरक्षा अधिकारी कानफाडे ह्यांनी बस स्थानकावर जाऊन कामगार नेत्यांशी चर्चा करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्याचे मान्य केल्यानंतर बस फेर्‍या पूर्ववत सुरू करण्यात आल्या.

सदर आंदोलन करतेवेळी एस टी कर्मचारी संघटनेचे काही नेते तसेच काही कर्मचारी दारू पिऊन असल्याचे कळले असुन दारूच्या नशेत असलेल्या ह्या कर्मचाऱ्यांनी बस स्थानकाच्या आवारात असलेल्या डिझेल पंपाजवळ गोंधळ घातल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे हे विशेष. या वेळी सुरक्षा अधिकारी व इतर अधिकारी असतांना सुद्धा व दारू तपासणी यंत्र असताना सुद्धा तपासणी का करण्यात आली नाही. तसेच घटनेच्या 24 तासानंतर रामनगर पोलिसात तक्रार का दाखल केली?हे संशयास्पद आहेत. कर्मच्या ऱ्यांना वाचविणण्यासाठी तर उशीरा तकार दिली असावी.त्याचप्रमाणे अचानक झालेल्या ह्या आंदोलनामुळे प्रवाशांना खोळंबून राहावे लागले त्याचप्रमाणे महामंडळाचे बर्‍याच प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असुन ह्याची जबाबदारी कुणाकडे असा प्रश्न निर्माण होत आहे.

बस स्थानकावर गोंधळ घालणे तसेच अचानक बस वाहतुक अडवून धरल्याबद्दल कामगार नेत्यांविरुद्ध एस टी प्रशासनाने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. असुन पोलिसांनी अजूनपर्यंत कामगार नेत्यांवर कुठलीही कारवाई केली नसल्याचे कळले आहे. S T प्रशासन लवकरच कारवाही करणार का???

No comments:

Post a Comment