बीड (प्रतिनिधी )केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंञालया अंर्तगत कार्य करणा-या नेहरू युवा केंद्र संगठन तर्फे जिल्हयात युवकासाठी उत्कृष्ट सामाजिक कार्य करणा-या एका संस्थेला जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्टीय स्तरावर विशेष युवा मंडळ पुरस्कार देउन गौरविण्यात येते.
या करिता सर्वञ प्रसिध्दी देउन रजिष्टर्ड संलग्न मंडळी कडून दि. 11 डिसेंबर 2020 पर्यंत जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी रू.25000/- (पंचवीस हजार व प्रमाणपञ) अर्ज मागविण्यात आले होते परंतु अंतिम दिनांका नंतरही पुरेसे प्रस्ताव प्राप्त न झाल्यामुळे सदर अर्ज मागविण्याकरीता गुरूवार, दि. 24 डिसेंबर 2020 पर्यत मुदतवाढ देण्यात येत आहे.
इच्छुक पाञ संस्थांनी आपला नमुन्यातील अर्ज आवश्यक जोडपञासोबत गुरूवार दि. 24 डिसेंबर 2020 पर्यंत नेहरू युवा केंद्र, दिप एजन्सी,नगर रोड, बीड, फोन नं. 02442-22769 बीड येथे कार्यालयीन वेळेत आणून द्यावेत. अर्जाचा नमुना तथा अधिक माहीतीसाठी नेहरू युवा केंद्राच्या वरिल पत्यावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, बीड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment