गोंदिया (प्रतिनीधी) : तालुक्यातील दांडेगाव येथील श्री समर्थ एज्युकेशन सोसायटीचे सचिव स्व.जगन्नाथ पटले यांची लोकमान्य टिळक विद्यालय मुंडीपार (भडंगा), श्री समर्थ हायस्कूल चिखली व श्री समर्थ हायस्कूल दांडेगाव या तिन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी बनावटी दस्तावेज तयार करून स्वतःच्या हितासाठी सोसायटी व सरकारची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. स्वयंघोषित अध्यक्ष व सचिवाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे अशाप्रकारे जिल्ह्यातील 53 शाळामंध्ये भरती झालेली असून त्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व संस्थापकांचीही सखोल चौकशी केल्यास मोठ्याप्रमाणात घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे.मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यासारखा हा गोंदिया जिल्ह्यातील घोटाळा उघडकीस येऊ शकतो,त्यातही यामध्ये सर्वच राजकीय पक्षाचे लोक सहभागी असल्याने कुणीच ओरडायला तयार नाही.
27 फेब्रुवारी 2017 ते 10 फेब्रुवारी 2020 पर्यंत श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी दांडेगावचे स्वयंघोषित अध्यक्ष व सचिवाने लोकमान्य तिलक विदयालय, मुंडीपार (भडंगा), श्री समर्थ हायस्कूल चिखली व श्री समर्थ हायस्कूल दांडेगावच्या मुख्याध्यापकांद्वारे बनावटी दस्तावेज तयार केले व स्वतःच्या हितासाठी सोसायटी व शासनाची फसवणूक केली. सन 2012 पासून शासनाद्वारे शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, दोन स्वयंघोषित अध्यक्ष व सचिव यांनी तीन शिक्षकांची फसवी भरती केली. दोन शिक्षकांना शाळांमध्ये नियुक्ती देण्यात आली तर एकाला नियुक्ती देण्यात आली नाही. सचिव जगन्नाथ पटले यांचा मृत्यू झाला असतानाही त्यांच्या नावाची बनावटी स्वाक्षरी करून तीन शिक्षकांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पाठविण्यात आला होता.
माजी शिक्षण सभापती रमेश शोभेलाल अंबुले (46) रा. दांडेगाव यांच्या तक्रारीवरून गंगाझरी पोलिसांनी भादंविच्या कलम 420, 465, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बंसू कोडापे करीत आहेत.
No comments:
Post a Comment