Tuesday, July 5, 2022

कृषी दुकानदारांकडुन शेतकऱ्यांची लिंकिंग च्या नावाने लुट.कृषी अधिकार्‍याचे साफ दुर्लक्ष.


हिमायतनगर :(प्रतिनीधी) तालुक्यात व शहरात काही कृषी सेवा केंद्र दुकानातून गेल्या एप्रिल,मे,जून महिन्यापासून शेतकऱ्यांना रासायनिक खते बी-बियाणे यांच्या सोबत इतर दुय्यम कंपनीचे देऊन मोठ्या प्रमाणात लिंकिंगचे सर्रास प्रकार दिवसाढवळ्या चालू असून या गंभीर प्रकाराकडे कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर,तालुका कृषी अधिकारी साफ दुर्लक्ष होत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलल्या जातआहे.याकडे जिल्हाअधीक्षक कृषीअधिकारी   रवीशंकर चलवदे नांदेड,जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ.तानाजी चिमण शेट्टे, जिल्हा मोहीम अधिकारी जी. एन. हुंडेकर जिल्हा परिषद नांदेड यांचे तालुक्यातील कार्यरत अधिकारी व कर्मचारीं वर्गाची पाठ राखणीमुळे शेतकरी वर्गावर लिंकिंगंच्यां प्रकारामुळे दररोज भरडला जातो आहे.लिंकिंगमुळे व्यापारीवर्गाची चांदी तर शेतकऱ्यांची माती होतआहे.उपविभागीय कृषीअधिकारी किनवट येथील डी.एम.तपासकर हे येथील मौजे सिरपल्ली रहिवासी आहेत.तर प्रभारी तालुका कृषी अधिकारी शहरातील बालाजी शेन्नेवाड,तर कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती येथील पुंडलिक माने हे मौजे पोटा बु.रहिवासी असून त्यांना शहर व तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांची विशेष अशी ओळख असल्याने साहेब आपल्याच गावचे आहेत.काय भियांचेआहे?म्हणून येथील काही कृषी सेवा चालक मोठ्या प्रमाणात खते,बी बियाणे लिंकिंग करणे,खते बी-बियाणे आगाऊ भावात शेतकऱ्यांना देणे,खतामध्ये दुय्यम खते सोबत देणे,खते बियाणे चढ्या भावाने विक्री करणे,असे सर्रास प्रकार गेल्या एप्रिल,मे,जून महिन्यापासून शहर व तालुक्यात असे प्रकार चालू असताना हिमायतनगर हदगावचे आमदार माधवराव पाटील,खासदार हेमंत पाटील हिंगोली यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध झालेले खते बी-बियाणे यांच्या शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे जिल्ह्यातील जबाबदार अधिकारी,कर्मचारी यांना खडेबोल बोलून नियमानुसारच खते बी-बियाणे देण्यात यावेअन्यथा दोषींवर कारवाईचा बडगा उगारला काय?असा सवाल ही उपस्थित होत आहे.यामुळे शेतकरी वर्गातून संबंधित कृषीअधिकारी व कृषी सेवा चालकांत आर्थिक मिलीभगत असल्याने,त्यांच्यातं कारवाईची,परवाना निलंबनाची भीती नसल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात लिंकिंगचे प्रकार चालू असल्याने दिवसाढवळ्या शेतकरी बांधवांची या ठिकाणी फसवणूक व लुट होतांना तालुक्यातील जनता व शेतकरी उघड्या डोळ्यांनी बघतअसल्याचे चित्र तालुक्यात दिसून येतआहे.नांदेड जिल्हा भरारी पथकांकडुनआता प्रयत्न एका ही कृषी दुकानांवर कारवाई नाही हे मात्र विशेष आहे.

Monday, July 4, 2022

ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात शिवाजीराव (दादा) पंडित यांनी केला हरिनामाचा गजर.


बीड (प्रतिनिधी) माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांनी नातेपुते जवळील धर्मापुरी येथे ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात दर्शन घेऊन हरीनामाचा गजर केला. आपल्या वयाचा आणि  प्रकृतिचा विचार न करता मोठ्या आनंदाने ते पालखी सोहळ्यात सहभागी झाले. पंडित परीवाराकडून सालाबादा प्रमाणे दिल्या जाणाऱ्या वारकरी पंगतीतही ते सहभागी झाले. यावेळी हरिनामात ते तल्लीन झाले. 

धर्मापुरी येथे पालखी सोहळ्यातील श्री क्षेत्र संगमेश्वर संस्थानचे ह.भ.प.नामदेव महाराज यांच्या दिंडीला भेट दीली

यावेळी त्यांनी सर्व वारकऱ्यांना पंगत देऊन त्यांच्या सोबत दिंडीत सहभाग घेतला. यावेळी हरीनामाचा गजर करीत आनंदी जिवनासाठी हरीनामाचे पारायण करणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या प्रसंगी त्यांच्या सोबत प्रकाश सुसकर, बंडू मोहिते, रघुनाथ मोहळकर, श्री भोपळे आदी उपस्थित होते.



अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवत डॉक्टरने केला लैगिंक अत्याचार.


मंगळवेढयाच्या ग्रामीण भागात एका 9 वर्षीय मुलीस खाऊसाठी पैशाचे आमिष दाखवून वाईट उद्देशाने दवाखान्यात नेवून तीच्यावर बळजबरी अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणी एका खाजगी डॉक्टरविरूध्द गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी डॉक्टर हरिप्रसाद पत्की (रा.सलगर बु.)  याला तात्काळ गजाआड केले आहे.पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील 9 वर्षीय मुलगी दि.2 रोजी दुपारी 1.30 वा. खाजगी शिकवणीला जात असताना तीला बोलावू

खाऊसाठी पैशाचे आमिष दाखवून दवाखान्यात नेवून जबरी संभाेग केला असल्याची फिर्याद पिडीत मुलीच्या वडिलांनी पोलिसात दाखल केल्यावर डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी सलगर येथे जावून रातोरात आरोपीस गजाआड केले आहे. या घटनेने त्या डॉक्टरच्या कृत्याबाबत संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त होत आहे

घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपीस अद्दल घडविण्यासाठी चांगला चोप दिल्याचीही चर्चा आहे. आरोपीविरूध्द भा.दं.वि.376 अ,ब,बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण,व अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील या करीत आहेत.

पेट्रोल व डिजेलचे भाव कमी होणार ? नवनियुक्त मुख्यमंत्री यांची घोषणा.


नवनियुक्त मुख्यमंत्री यांनी विधानसभेत विशेष अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी मोठी घोषणा केलीय. विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरकार बहुमत चाचणी मध्ये यशस्वी झालं. आणि या सरकारला बहुमत पडलं त्यानंतर हे सरकार आता इथून पुढे टिकणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका केली यामध्ये माजी उपमुख्यमंत्री असतील. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेप्रति असणाऱ्या एकनिष्ठतेबद्दल वक्तव्य केलं. यामध्ये ते भाऊक देखील झाले पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की, कशा पद्धतीने ते कारभार करणार आहेत कशा पद्धतीने ते या राज्याचे सेवा करणार आहेत.


विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बराच गोष्टींवरती नजर टाकली. ते बऱ्याच गोष्टींबद्दल बोलले त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सध्या मी मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्षा चालकाचे हे सरकार आहे असं म्हणून हिणवलं. मात्र व्यावसाय करणं हे चुकीचं नाहीये सुरुवातीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील चायवाला म्हणून हिणवलं जात होतं. त्यांच्या व्यवसायावरनं त्यांना डवचला जात होत. मात्र व्यवसाय करणं चुकीचं नाही असं त्यांनी म्हटले हे सरकार प्रत्येकाचा आहे हे सरकार सर्वसामान्य जनतेचा आहे हे सरकार तुमचं आमचं सर्वांचं आहे असं म्हणत त्यांनी सर्वसामान्यांना जसा निर्णय हवा आहे अशी घोषणा केली आहे. जेणेकरून सर्व सामान्यांना ही घोषणा दिलासादायक आहे सर्वसामान्यांना येत्या काळामध्ये याचा फायदा होणार आ

सध्या इंधनाचे दर हे गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे आणि सर्वसामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री लागली आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंधनावरती नजर टाकली या इंधनावरती त्यांनी बातचीत केली आहे. ते म्हणतात की तेलाच्या किमती वाढल्यावर देखील महाराष्ट्राने व्हॅट कमी केला नव्हता. तेव्हा त्यांनी कमी करू अशी घोषणा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्यास मदत होईल असा आशावाद आपल्याला व्यक्त करायला हरकत नाहीये. आत्ताचे सरकार येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारी इंधनाचे दर कमी करेल अशी आशा आता निर्माण झाली आहे.

स्मशानभूमीवर अतिक्रमण करणारावर गुन्हा दाखल करण्याचे तहसिलदारांचे आदेश.




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : वडखेल येथील हटकर समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण केल्यामुळे शेतावर प्रेत जाळावं लागल्याचे दखल घेत परळी तहसिलदार सुरेश शेजूळ यांनी अतिक्रमण करणारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आता गटविकास अधिकारी संबंधित अतिक्रमण कराणारावर   कधी गुन्हा दाखल करणार याकडे वडखेल ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. 
    वडखेल येथील स्मशानभूमीवर अतिक्रमण केल्यामुळे शेतावर प्रेत जाळण्याची वेळ गावक-यांवर आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने परळी तहसिलदार यांच्या कडे तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच तहसिलदार यांनी गटविकास अधिकारी यांना संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. गटविकास अधिकारी यांच्या आदेशावरून तलाठी दिगंबर साबने आणि ग्रामसेवक ताटे यांनी वडखेल येथे जाऊन पाहणी केली असता याच जोडगोळीने जे अतिक्रमण हटविले होते,  तेथे पुन्हा अतिक्रमण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. येथे लावण्यात आलेली झाडेही तोडण्यात आलेली आहेत. ग्रामपंचायतीने स्मशानभूमीच्या बांधकामासाठी खोदलेला पायाही बुजवून टाकल्याचे तलाठी आणि ग्रामसेवकाच्या निदर्शनास आले आहे. एवढे सर्व निदर्शनास आल्यानंतर आता गटविकास अधिकारी संबंधित गाव गुंडावर कधी गुन्हा दाखल करणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रेम विवाह झालेल्या पतीने चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेस जीवे मारण्याचा प्रयत्न.

केज (प्रतिनीधी) चारित्र्यावर संशय घेत आणि माहेरहुन पैसे घेऊन ये म्हणून केज येथे विवाहितेस तिच्या नवऱ्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न विवाहितेच्या फिर्यादीवरून नवरा, सासू-सासरा आणि इतर दोन नातेवाईक अशा पाच जणांविरुद्ध दाखल केला असून नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील लखनौ येथील अंकिता हिचा केज तालुक्यातील जोला हे.मु. महात्मा फुले नगर केज येथील दीपक बबनराव ढाकणे याच्या सोबत सहा वर्षा पूर्वी सन२०१६ मध्ये प्रेम विवाह झालेला आहे. त्यांना दीड वर्ष वयाची मुलगी आहे.दरम्यान दीपक हा सैन्य दलात नोकरीस होता. लग्न झाल्यानंतर दिपक याने नोकरीवरून घरी राहिला. तो पुन्हा नोकरीला गेला नाही.लग्न झाल्यानंतर अंकिता व दीपक हे दोघे लखनौ येथे राजाजी पुरम येथे भाड्याच्या घरामध्ये एकत्र राहिले. त्यानंतर सन २०१८ मध्ये ते केज येथील फुलेनगर येथे राहण्यास आले. लग्नापासून दीपक हा काही कामधंदा करीत नव्हता.लग्न झाल्यापासून थोड्या थोड्या कारणावरून त्यांच्या भांडण होत असत.दीपक हा काही काम धंदा करीत नसल्याने तो त्याची पत्नी अंकिता हिला तिच्या माहेराहून पैसे आणावयास सांगत असे.ती आई वडील यांच्याकडे माहेरी लखनौ येथे अधून मधून जाऊन ब्युटी पार्लरचे काम करून आणि आई-वडिलांकडून मिळतील तेवढे पैसे आणून पुन्हा दीपककडे येत असे. दीपक तिच्याकडे जास्तीचे पैसे तिच्या माहेरून आई-वडिलांकडून आणावयास सांगत असत. सासू सासरे देखील तिला नेहमी तिच्या आई-वडिलाकडून पैसे आणावयास आसत.पैसे न दिल्यास सासू-सासरे यांनी तिला बरेच वेळा हातापायाने मारहाण केली आहे.ती गरोदर असताना देखील तिला मारहाण केली होती.दीपक यांनी वारंवार माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावला होता. परंतु तिचे आई-वडील पैसे देण्यास असमर्थ असल्याकारणाने दीपक व त्याचे आई-वडील यांनी केला त्रास देणे सुरू केले.पती दीपक, सासू राधाबाई व सासरे हे तिला एकदा म्हणाले होते की, जर तू पैसे आणले नाही तर तिच्यावर खोटेआरोप करून जीवे ठार मारून टाकू आणि दीपकला दुसरी बायको करून देऊ. दीपकचे दुसरे लग्न केल्यास दीपकला हुंडा मिळेल.अशी धमकी दिली होती.दरम्यान दि.१ जुलै रोजी सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास अंकिता ही नेहमीप्रमाणे उठून स्वयंपाक घरात असताना किरायादार बळीराम उत्तम घुले याने सकाळी ५:४५ वाजण्याच्या दरम्यान चार्जर मागण्यासाठी दरवाजात उभे राहून विचारत असताना तिची सासू राधाबाई तिथे आली. तिने दरवाजा बाहेरून लावून घेतला बळीराम घुले व तिला घरात कोंडून घेतले.आणि पूर्वी खोटे आरोप करण्याची धमकी दिल्याप्रमाणे अनैतिक संबंध आहेत.असा खोटा आरोप केला. त्यानंतर सासू सासरे यांनी तिला सायंकाळी ठार मारण्याची धमकी देऊन जोला या गावी निघून गेले.दि.२ जुलै शनिवार रोजी सकाळी १०:०० ते ११:०० वाजण्याच्या दरम्यान केज येथील घरी दीपक हा घरी आला. दीपक सोबत त्याचा मामा लकुल बांगर, त्याचा मुलगा नाना बांगर हा देखील सोबत होता. दीपक हा जोरजोरात घराबाहेर उभा राहून आरोळ्या मारू लागला. आणि शिवीगाळ करू लागला तिने घाबरून घराचा दरवाजा उघडत नसल्याने घरावर चढून छतावरून घरात आला. तिला घराच्या बाहेर निघ असे म्हणाला. तसेच त्याने मारहाण करायला सुरुवात केली. घराच्या बाहेर रोडवर येऊन पुन्हा मारहाण करीत घरात घेऊन गेला. दीपक सोबत आलेले लकुल बांगर, व नाना बांगर हे दीपक यास अजून मारहाण करण्यास चिथावणी देत होते. दीपकने तिला घरात नेले व घरातील लाकडी पलंगावर लोटून अंगावर बसून तोंडावर उशी ठेवली. तिला मारून टाकण्याच्या उद्देशाने तोंडावर उशी दाबून जीवे मारण्याचा प्रयत्नात असताना शेजारी राहणारे शिवकांत मुंडे हे घरात आले व त्यांनी त्याच्या पासून सोडविले.अंकिता हिने जुलै रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गु.र.नं.२७२/२०२० भादवि ३०७,४९८,(अ),३२३,३२४,५०४,५०६ आणि ३४ नुसार पती दीपक बबनराव ढाकणे, सासरा बबनराव भानुदास ढाकणे,सासू राधाबाई बबनराव ढाकणे,लकुल बांगर आणि नाना बांगर या पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दीपक यास ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावणीली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे करीत आहेत.

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भविष्य .कसा जाईल आपला दिवस.


मेष
आपल्या मर्जी प्रमाणे दिवस घालवा. सामुदायिक गोष्टींवर भाष्य करू नका. कौटुंबिक सौख्य जपाल. मुलांची बाजू समजून घ्यावी. जन संपर्कातून काम होईल.

वृषभ
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आवडत्या गोष्टी तुमच्या समोर हजर राहतील. चैन करण्याकडे आपले अधिक लक्ष राहील. मौजमजेला प्राधान्य द्याल. मनातील काळजी दूर साराल.

मिथुन
मानसिक दोलायमानता जाणवेल. स्थिर विचार करावेत. कामात अति घाई करून चालणार नाही. क्षणिक आनंद उपभोगाल. शारीरिक थकव्या बरोबर वैचारिक थकवा जाणवेल.

कर्क
ऐषारामाच्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. दिवस आळसात घालवाल. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो. आर्थिक कामातील कागदपत्रे व्यवस्थित हाताळा. कामसौख्याचा आनंद घ्याल.

सिंह
अडचणीतून मार्ग निघेल. सामाजिक कामात मदतीचा हात पुढे कराल. सर्वांशी सहृदयतेने वागाल. तुमच्या मनाची विशालता दिसून येईल. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर संभवते.

कन्या
कामात विचारपूर्वक पाऊले टाकावीत. भावंडांशी दुराग्रही वागू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. भागीदाराशी सलोखा वाढवावा लागेल. कामातील अडचण दूर होईल.

तूळ
जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. संपर्कातील लोकांकडून मदत मिळेल. पोटाच्या समस्या जाणवतील. छुप्या शत्रूंचा त्रास कमी होईल. हातातील कामात यश येईल.

वृश्चिक
मानसिक अस्वस्थता जाणवेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. नवीन ओळखी होतील. चुकीच्या संगतीत अडकू नका. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल.

धनू
अचानक धनलाभाची शक्यता. आवडते साहित्य वाचायला मिळेल. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांची बाजू समजून घ्यावी. जुन्या कामात वेळ जाईल.

मकर
केलेल्या कामातून समाधान मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. अगदीच गरज असेल तरच प्रवास करावा. चालू कामास गतीमानता येईल. घरातील कामात समाधानी असाल.

कुंभ
कौटुंबिक खर्च आटोपता ठेवावा लागेल. उगाच कोणाशीही वाद वाढवू नका. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. जवळचा प्रवास करावा लागेल. दिवस मजेत घालवाल.

मीन
दिवस कटकटीचा जाऊ शकतो. गोष्टी शांतपणे जाणून घ्याव्यात. रागावर नियंत्रण ठेवावे. घाई-घाईने कोणतीही कृती करायला जाऊ नये. करमणुकीचा आनंद घ्याल

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार 6 महिन्यात कोसळेल, मध्यवर्ती निवडणूकीला तयार राहा - शरद पवार


राज्यात सध्या आलेलं सरकार सहा महिन्यात कोसळू शकते, त्यामुळे मध्यवर्ती निवडणूकीच्या तयारीला लागा, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना दिली आहे.शिंदे सरकारची सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.


आमदारांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की, राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. हे सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आपण विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडल तर मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळें तयारी आत्तापासून करा.


विरोधी पक्षनेते पदी अजित पवार ?

विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती विश्वनीय सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, हसन मुश्रीफ, अजित पवार, धनंजय मुंडे यांची बैठक झाली. यामध्ये अजित पवारांच्या नावावर एकमत झाल्याचं समजतेय. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची शरद पवार यांच्यासोबतची बैठक काही वेळापूर्वी संपली. आमदारांकडून बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आलाय. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

Sunday, July 3, 2022

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत राहुल नार्वेकर विजयी !


मुंबई (प्रतिनीधी) विधानभवनात विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी मतदान झाले. यात भाजपच्या राहुल नार्वेकर यांनी बाजी मारली आहे. त्यांना 164 आमदारांची मतं मिळाली. नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते

चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. राहुल नार्वेकर यांनी 164 मतं मिळाली आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान, महाविकास आघाडीच्या राजन साळवींना 107 मतं मिळाली.  निवड होताच भाजपकडून जय श्री रामाच्या घोषणा दिल्या.  बंडखोर आमदारांकडून जय भवानी, जय शिवाजी..भारत माता की जय..अशा घोषणा देण्यात आल्या. राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मत मिळाली. या राजकीय गदारोळात अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे

राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिलं. तर चेतन तुपे यांनी साळवी यांचा प्रस्ताव मांडला, तर संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिलं. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावे लागणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षांची निवड झाली आहे. शिंदे सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं तर महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणाला राजन साळवी यांना मैदानात उतरवलं होतं. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष होतील हे जवळपास निश्चित होतं

२०१४ मध्ये शिवसेनेकडून राहुल नार्वेकर यांना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत २०१४ मध्येच अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ लोकसभेतून निवडणूक लढवली. ते ३ वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य देखील राहिले आहेत. राहुल नार्वेकर पुढे या पक्षात थांबले नाही तर, 'ज्याचे 'पारडे' जड तिथे राहुल नार्वेकर' असे म्हणत त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. एकंदरीतच शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने राहुल नार्वेकर यांनी सुद्धा शिवसेनेसोबत गद्दारी केली.  आता विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी माजी शिवसैनिक राहुल नार्वेकर आणि एकनिष्ठ शिवसैनिक राजन साळवी यांच्यात थेट लढत झाली. यात त्यांचा विजय झाला.

जगावर कोरोनानंतर मंकीपॉक्सचे संकट ! तब्बल ६७ देशांमध्ये पसरला मंकीपॉक्स व्हायरस!


नवी दिल्ली : कोरोनानंतर आता जगावर मंकीपॉक्सचे संकट वाढले आहे. युरोपमध्ये ३ पटीने रुग्णांची संख्या वाढली आहे. डब्लूएचओने युरोपमध्ये मंकीपॉक्सचा वाढता प्रसार थांबवण्याचे आव्हान केले आहे. गेल्या दोन आठवड्यात रुग्णसंख्या तिप्पट झाली आहे. १५ जूनपासून युरोपमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांत तिप्पटीने वाढ झाली आहे

६ मे रोजी ब्रिटनमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचा रुग्ण आढळला आहे, आतापर्यंत युरोपमध्ये ५,००० हून अधिक रुग्ण आढळली आहेत. इतके रुग्ण ओळखले आहेत. आतापर्यंत ६७ देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील ६,२२९ रुग्णांची टेस्ट झाली आहे. यातील ६,१७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर ५२ रुग्ण संशयास्पद आहेत

युरोपमध्ये मंकीपॉक्सचे ५,२६२, उत्तर अमेरिकेत ६९२, दक्षिण अमेरिकेत ९२, आशियामध्ये ६४, आफ्रिकेत ३५ आणि ओशनियामध्ये १२ रुग्ण आढळले आहेत. मंकीपॉक्सचा १० देशांमध्ये जास्त प्रसार झाला आहे. यामध्ये ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा, नेदरलँड्स, इटली आणि बेल्जियम या देशांचा समावेश आहे

दरम्यान, या आजाराचा प्रसार रोखायचा असेल तर त्वरित आणि समन्वित उपाययोजना करणे आवश्यक आहे. मंकीपॉक्सचे रुग्ण हजारोपर्यंत पोहोचलेले बहुतेक देश युरोपमधील आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला मंकीपॉक्सचे रुग्ण वाढले आहेत या प्रसाराबद्दल चिंता वाटत असल्याचे डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस म्हणाले.

परळी उड्डाणपूल याचिकेसंदर्भात बीडचे जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता व मुख्याधिकारी यांना दंड - उच्च न्यायालयाचा दणका.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर सतत रहदारी जाम होत असल्याने व अपघातांची मालिका सुरूच असल्याने उड्डाणपुलाची दुरुस्ती व अंडरग्राउंड ब्रिज साठी जेष्ठ नेते भास्कर मामा चाटे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. याबाबत न्यायालयात शपथपत्र दाखल करण्याकरिता उच्च न्यायालयाने रेल्वे विभागासह बीडचे जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना आदेश दिले होते. परंतु या तीनही अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले म्हणून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिनांक 20 जून 2022 रोजी च्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी या तिघांचे वैयक्तिक पगारातून प्रत्येकी 5 हजार रुपये दंड वसूल करून सदरचा दंड व याचिकेबाबतची शपथपत्र दिनांक 1 जुलै 2022 पर्यंत दाखल करण्याचे आदेश दिले. यामुळे  सदर अधिकाऱ्यांच्या पगारातून दंड वसूल होणार असून हा दंड कोर्टात जमा होणार आहे. तसेच शिवाजी नगर, आंबेडकर नगर, अशोक नगर, नागसेन नगर,व सर्व परीसरातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने उड्डाणपुलाच्या अंडरग्राउंड व दुरुस्ती बाबत  पुढील कामकाजाबाबत या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी व अंडरग्राउंड ब्रिज साठी रेल्वे विभागाचा यात सहभाग असणार आहे. वरील प्रमाणे दंड केल्यानंतर उपरोक्त अधिकारी जागे झाले असून सदरचे काम लवकर मार्गी लागेल अशी माहिती याचिकाकर्ते  भास्कर मामा चाटे यांनी दिली आहे.
यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर परळीच्या मुख्याधिकारी यांनी उच्च न्यायालयाचा दंड भरुन शपथपत्र दाखल केले आहे.

Saturday, July 2, 2022

स्मशानभुमीची दुरावस्था मृत्युनंतर हेळसांड. उघड्यावर अंत्यसंस्काराची वेळ.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिंडदान आंदोलन.

___
बीड जिल्ह्य़ातील १३९४ पैकी ६३८ गावांमध्ये स्मशानभुमीची सुविधा असली तरी त्याची दुरावस्था असुन ६५६ गावांमध्ये स्मशानभुमीची सोयच नाही. काही ठिकाणी स्मशानभुमीची सोय असली तरी दुरावस्थेत असून शेडच नाही अथवा मोडकळीस दुरावस्थेत असल्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असून काही ठिकाणी रस्ताच नाही तर काही ठिकाणी शेतालगत अंत्यसंस्कार करताना वाद होत आहेत त्यामुळेच जिल्हाप्रशासनाने तात्काळ जिल्हा वार्षिक नियोजन मधुन तसेच २५:१५ मधुन निधीची तरतूद उपलब्ध करून देत स्मशानभुमी बांधण्यात याव्यात या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यासह भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर,सुदाम तांदळे,बलभीम उबाळे,सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन,सय्यद आबेद,शेख मुबीन यांनी दि.४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक पिंडदान आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाप्रशासनाला दिले आहे.
 

जिल्हापरीषदेअंतर्गत ३८२ पैकी केवळ १३५ कामेच प्रगतीपथावर अन्य रखडलेलीच 
___
बीड जिल्ह्य़ातील २०२१ -२२ मध्ये जिल्हापरीषद अंतर्गत ३८२ गावांमध्ये स्मशानभुमीसाठी मंजुरी मिळाली यापैकी १३५ ठिकाणी कामे झाली आहेत तर ईतर ठिकाणची कामे रखडलेलीच आहेत साधरणतः १५० ठिकाणी पत्र्याचे शेड नसल्याने तर ८० ठीकाणी रस्ता नसल्याने तर काही ठिकाणी विजेची सोय नसल्यामुळेच विविध अडचणींचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. 

दलित महिलेचा अंत्यविधी रोखण्याच्या ३ महिन्यात ३ घटना 
____
सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंढे यांच्या कार्यकाळात केज तालुक्यातील सोनेसांगवी (सुर्डी)गावत दलित महिलेचा अंत्यविधी रोखण्याच्या ३ महिन्यात ३ घटना घडल्या होत्या. त्यामुळेच शेतालगत अंत्यसंस्कार केल्यानंतर काही शेतक-यांचा विरोध असतो त्यातुनच तणाव,तंटे निर्माण होतात. व गावामध्ये सामाजिक सलोखा बिघडण्यास कारणीभूत स्मशानभुमीचा अभाव हे एक प्रमुख कारण ठरताना दिसुन येत आहे त्यामुळेच तात्काळ निधी उपलब्ध करून स्मशानभुमी बांधण्यात याव्यात. 

प्रा.शिवराज बांगर यांची एमपीडीएच्या गुन्ह्यातून हायकोर्टाकडून सुटका.


बीड (प्रतिनिधी)येथील वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांची औरंगाबाद खंडपीठाकडून मंगळवारी (दि.28 जून) रोजी निर्दोष सुटका करण्यात आली. हा निकाल न्यायमुर्ती सारंग व्ही कोतवाल, भारत पी. देशपांडे यांच्या पीठाने दिला.
प्रा. बांगर यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ठोंबरे यांनी राजकीय हेतून एमपीडीएचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केला होता. पोलीस अधीक्षक ए.राजा यांनी राजकीय प्रभावाखाली येत हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला. जिल्हाधिकार्‍यांनी 30 डिसेंबर 2021 रोजी या प्रस्तावावर सही करून तो अंतिम केला. त्यानंतर तातडीने प्रा.बांगर यांना शिवाजीनगर पोलीसांनी अटक करून त्यांची रवानगी औरंगाबादच्या हर्सूल जेलमध्ये केली. प्रा.शिवराज बागंर यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर समोर शिवलताताई बागंर, विवेक कुचेकर, यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलनही करण्यात आले होते पंरतु राजकीय दबावाखाली ही कारवाई झाल्याचे निष्पन्न झाले होते.
सुडबुध्दीने झालेल्या कारवाई विरोधात
जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णयाला बांगर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. 27 आणि 28 जून 2022 रोजी या याचिकेवर खंडपीठाने सुनवानी घेतली. सरकारी पक्षाकडून दाखल प्रस्तावात प्रा. बांगर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून ते पिस्टलच्या बळावर लोकांना धमकावतात, त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होत असल्याचे म्हटले होते. त्यावर प्रा. बांगर यांची बाजू मांडताना ज्येष्ठ विधीज्ञ विजयकुमार सपकाळ म्हणाले की हा प्रकार पूर्णपणे राजकीय सुडबुध्दीतून करण्यात आलेला आहे. पोलीसांनी 9 सप्टेंबर 2021 रोजी तयार केलेला प्रस्तावाची विलंबाने म्हणजेच 31 डिसेंबर 2021 रोजी इतक्या उशीराने का अंमलबजावनी झाली. यातील बर्‍याच उणीवा त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर खंडपीठाने त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत पोलीसांना अनेक प्रश्न केले. त्यात प्रस्ताव सप्टेंबर महिन्यात पोलीस अधीक्षकांकडे दाखल असेल तर त्यावर जिल्हाधिकार्‍यांची मंजूरीसाठी तब्बल तीन महिन्यांचा कालावधी का लागला? याचिकाकर्त्यांला कुठल्या गुन्ह्यात अटक करण्यात येत आहे याची साधी कल्पनाही पोलीसांनी का दिली नाही? याचिकाकर्ते पिस्टल वापरत होते या पोलसांच्या जवाबात साक्षीदार कुठेही तशी साक्ष देत नाही. याचिकाकर्त्यांवर जेवढे गुन्हे नोंद आहेत ते पुरेस नसून हे सर्व गुन्हे आपआपसातील भांडणाचे आहेत. त्यात सार्वजनिक शांतता भंग पावत नाही. शिवाय मंत्रालयीन कमिटीकडे जेव्हा याचिकाकर्त्यांने अपिल केले त्यावेळी पोलीसांनी आपले म्हणणे दाखल न करता जिल्हादंडाधिकार्‍यांनी रिप्लाय दिला, यावरही कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले. याचिकाकर्त्यावर दाखल एमपीडीऐ वाईट हेतून करण्यात आलेला असून त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे गंभीर प्रकरणात मोडत नसल्याचे निरीक्षणही हायकोर्टाने नोंदवले. त्यानंतर 28 जून 2022 रोजी त्यांची सुटका करण्याचे आदेश बजावले.
खंडपीठाच्या आदेशानंतर 2 जुलै 2022 रोजी प्रा.बांगर यांची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातून मुक्तता करण्यात आली. प्रा.बांगर यांच्यावतीने ज्येष्ट विधीज्ञ विजयकुमार सपकाळ यांनी काम पाहिले त्यांना अ‍ॅड. शशीकांत शेकडे यांनी सहकार्य केले.

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का ; आमदारांपाठोपाठ 14 खासदारही बंडाच्या पवित्र्यात.


एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि परिणामी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना अद्याप धक्क्यातून सावरलेली नाही . दरम्यान , पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसू शकतो . शिवसेनेच्या संसदीय पक्षात समांतर बंडखोरी होणार असल्याचा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे . त्यासाठी राष्ट्रपतिपदाच्या मतदानाची वाट पाहा , असेही ते म्हणाले .

किमान 14 खासदार शिवसेनेविरोधात बंड करू शकतात . शिवसेनेचे खासदार आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासह आणखी काही खासदारांची शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता असून श्रीकांत यांनी यापूर्वीच आपल्या वडिलांच्या गटातून शिवसेनेतूनफारकत घेतली आहे . किमान 14 खासदार राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानाच्या दिवश bjp उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करू शकतात . हे शिवसेनेच्या भूमिकेपेक्षा वेगळे आहे . यासोबतच हे खासदार शिवसेनेपासून वेगळे होण्याची घोषणाही करू शकतात 

 आता शिवसेनेचे लोकसभेत 19 आणि राज्यसभेत 3 सदस्य आहेत , शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीनंतर फुटीचा परिणाम लोकसभेत दिसून येईल , असे मानले जात आहे . तसेच 14 खासदार शिवसेनेच्या विरोधात बंड करु शकतात .

कोयत्याने गंभीर वार केले प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर - ॲड. तेजस नेहरकर

बीड : फिर्यादी शहादेव महादेव लिंगसे रा. राहेरी ता.गेवराई यांना तपेनिमगाव येथील वाळूघाटावर हायवा टिपर लोडिंग करण्यावरून कोयत्याने मारहाण झाली होती. त्या मारहाण प्रकरणी तलवाडा पोलीस स्टेशनला त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालासाहेब मस्के, अर्जुन वाघ, अंकुश घाडगे सर्व रा. बीड यांच्याविरुद्ध दिनांक 07/06/2022 रोजी गु. र. न.98/2022 पोलीस स्टेशन तलवाडा येथे कलम 307, 324, 504, 34 भा. द. वि. अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अॅड. तेजस सुभाष नेहरकर यांनी आरोपी मार्फत अटकपूर्व जामीन मिळावी म्हणून फौजदारी जामीन अर्ज क्रमांक 532/2022 मा. जिल्हा न्यायाधीश बीड यांच्या कोर्टाने दाखल केला होता. आरोपीच्या वतीने भक्कम बाजूची मांडणी अँड. तेजस नेहरकर यांचा उत्कृष्ट युक्तिवाद ग्राह्य धरून त्या अर्जावर सुनावणी होऊन अटकपूर्व जामीन अर्ज मा. न्यायालयाने मंजूर केला आरोपीच्या वतीने ॲड.तेजस नेहरकर यांनी काम पाहिले.

रविवारी होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवड.शिंदे गट भाजपमध्ये चालु मंथन.


मुंबई - एकनाथ शिंदे सरकारवर विश्‍वासदर्शक ठराव पारीत होण्याआधी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असून यासाठी भाजप आणि शिंदे गटात मंथन सुरू झाले आहे

राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी होणार आहे. यात ३ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार असून ४ जुलै रोजी शिंदे सरकारवर विश्‍वासदर्शक ठरावावर मतदान होणार आहे. यातील सर्वात महत्वाचा घटक हा विधानसभाध्यक्षपद होय. या पदासाठी भाजपतर्फे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव या पदासाठी समोर आले आहे. तर शिंदे गटातर्फे माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यातील आता कुणाची या पदावर वर्णी लागणार याचे उत्तर उद्याच मिळणार आहे

दरम्यान, आगामी काळात शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे विधानसभेचे अध्यक्षपद हे अनुभवी नेत्याकडेच असावे असे शिंदे गट आणि भाजप यांनी ठरविले आहे. या अनुषंगाने राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात येईल असे मानले जात आहे.

केवळ RSS भाजपच्या आदेशामुळे फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं.- खा.शरदजी पवार


पुणे – कालचा दिवस हा केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपुर्ण देशासाठी महत्वाचा ठरला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात जो सत्तासंघर्ष सुरू होता त्याला काल पूर्णविराम मिळाला

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी, महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पाच वर्षे नेतृत्व केलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर बसावं लागण हा मोठा धक्का असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. “फडणवीसांचा चेहरा सांगत होता, ते आनंदी दिसत नाहीत. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी आनंदी मनाने त्यांनी स्वीकारली नाही. RSS च्या संस्कारामुळे फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं”, असं पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत हो

भाजपकडून आदेश आला की तो सर्वोच्च आदेश असतो. मग दिल्लीवरून असो अथवा नागपूरहून- तो पाळावाच लागतो. त्यामुळे फडणवीसांना तो पाळावा लागला. त्यांच्यासाठी तो मोठा झटका होता. एकनाथ शिंदे यांनी बंड करून आमदारांना आपल्या बाजूने केले हेच त्यांचं यश असल्याचे पवार म्हणाले आहेत. फडणवीस यांचा चेहराच नाराज असल्याचे सांगत होता. लोकांमधून निवडून आले असते तर फडणवीसांना शाबासकी दिली असती. भाजपने एकनाथ शिंदे यांना मदत करण्याची जी भूमिका आत्ता घेतली ती अडीच वर्षांपूर्वी घेतली असती तर गेल्या अडीच वर्षात घडले ते घडलेच नसते, असं पवार म्हणाले

पवारांचा फडणवीसांना टोला

नंबर दोनची जागा फडणवीसांनी आनंदाने स्वीकारली असं दिसत नाही. त्यांचा चेहरा सांगत होता, फडणवीस नाखुश होते. नागपूरमध्ये त्यांनी आरएसएसचे स्वयंसेवक म्हणून काम केलंय. तिथे जो आदेश येईल तो पाळावा लागतो. आरएसएसच्या संस्कारामुळे फडणवीसांनी हे स्वीकारलं, दुसरं काही कारण असू शकत नाही, असं पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे एखाद्यावर विश्वास टाकल्यावर त्यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी द्यायची, अशा स्वभावाचे आहेत. उद्धव ठाकरेंनी संघटनेची, विधिमंडळाची जबाबदारी पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्यावर दिली होती, त्याचा हा परिणाम आहे, असं शरद पवार म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांनी ग्रेसफुली राजीनामा दिला. मोठया मनाने राजीनामा दिला. तसेच आमदारांना बाहेर नेणं हे पूर्व नियोजित असल्याचे पवार म्हणाले आहेत. शिवसेना संपुष्टात आली नाही आणि येणार नाही, असंही पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना अपमानित करण्यासाठी उपमुख्यमंत्री पद - प्रकशजी आंबेडकर.

 

पुणे - केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीसांना अपमानित करण्यासाठीच उपमुख्यमंत्री पद दिले, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते पुण्यात बोलत होते. आंबेडकर म्हणाले की, राज्यातील राजकारणात वेगवेगळया प्रकारच्या अभूतपूर्व घडामाेडी घडताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार काेसळले.
नवीन सरकार मध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हाेतील, असे अपेक्षित हाेते. मात्र, आश्चर्यकारकरित्या एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आले आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना अपमानित करण्यासाठीच उपमुख्यमंत्री पद दिले, असे.आंबेडकर म्हणाले, नवीन सरकारचा शपथविधी हा कायदेशीर असून उध्दव ठाकरे यांनी बहुमत न दाखवताच राजीनामा दिला आहे. राज्यपाल यांनी नवीन सरकारला बहुमत सिध्द करा असे सांगितले आहे. त्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येते याबाबत राज्यपाल यांनी हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.

विधिमंडळाचे कामकाज करण्याची अद्याप त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, राज्यपाल हे नवीन सरकारबाबत सकारात्मक आहे. राज्यपाल पद स्वयात्त असून त्यांना अधिकार आहे मात्र त्याचा वापर याेग्यप्रकारे झाला पाहिजे. शिवसेनेने सर्वाच्च न्यायालयात 16 आमदारांचे अपात्रेबाबत याचिका दाखल केली आहे. त्याबाबत 11 जुलै राेजीच निर्णय हाेणार. मात्र, शिवसेनेने त्यापूर्वी राज्यपाल, राष्ट्रपतींकडे जाऊन सांगितले पाहिजे की, बहुमत सिध्द झाल्यावरच इतर विधिमंडळाचे अधिकार मिळतील. बिचारे फडणवीस यांचा केंद्रीय नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला आहे.

फडणवीस जाहीरपणे सांगत हाेते की, मी काेणतेही पद स्विकारणार नाही. मात्र, काही वेळातच त्यांना वरिष्ठांकडून निराेप आल्यानंतर पद स्विकारावे लागले. यावरुन इतके दिवस सुरु असलेली त्यांची तानेशाही संपुष्टात येऊ लागल्याचे दिसून येते. त्यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत.

Friday, July 1, 2022

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्त्यात पुन्हा होणार ‘इतकी’ वाढ..?


सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. सातव्या वेतन आयोगानुसार, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर हा ‘डीए’ 31 टक्क्यांवरून 34 टक्के झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत..

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ‘एआयसीपीआय’ निर्देशांकानुसार (AICPI Index) ठरवला जातो.. एप्रिलमध्ये ‘एआयसीपीआय’ निर्देशांक 127 अंकांवर गेला होता. एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर 7.79 टक्के, म्हणजेच 8 वर्षांच्या उच्चांकावर गेला आहे. याआधी जानेवारी व फेब्रुवारीमध्ये ‘एआयसीपीआय’ निर्देशांकांत घसरण झाली होती.

जानेवारीमध्ये ‘एआयसीपीआय’ निर्देशांक 125.1, तर फेब्रुवारीत 125 अंकावर होता. मार्चमध्ये त्यात एका अंकाने वाढ होऊन तो 126 वर पोहोचला. एप्रिलच्या आकड्यांनुसार, ‘एआयसीपीआय’ निर्देशांक आता 127.7 वर पोहोचला आहे. त्यात 1.35 टक्के वाढ झाली आहे.

मोदी सरकार आजच (ता. 1) केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 वरुन 39 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनात 34,000 रुपयांपेक्षा अधिक वाढ होणार असल्याचे सांगितले जाते..

किती पगार मिळणार..?

मोदी सरकारने ‘डीए’मध्ये 5 टक्के वाढ केल्यास, कर्मचाऱ्याचा मूळ पगार (Basic Salary) 56,900 रुपये असेल, तर महागाई भत्ता 22,191 रुपयांपर्यंत मिळेल. सध्या 34 टक्के दराने कर्मचाऱ्यांना 19,346 महागाई भत्ता मिळतो. त्यात 2,845 रुपयांची वाढ होईल. या हिशेबाने वार्षिक वेतनात 34,140 रुपयांची वाढ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवून मिळतो.. काही दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ झाली होती. त्यामुळे ‘डीए’ 34 झाला होता.. आता त्यात 5 टक्के वाढ झाल्यास, ‘डीए’ 39 टक्क्यांवर जाणार आहे.. देशातील 50 लाखांपेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी व 65 लाख पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.


शिंदे सरकारचा नवा धक्का राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येणाऱ्या 12 सदस्यांची नवी यादी पाठविणार !


मुंबई (प्रतिनीधी) :- एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यांनी शुक्रवारी राज्यपालांकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येणाऱ्या 12 सदस्यांची नवी यादी पाठवण्याचे संकेत दिल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दीड वर्षांपूर्वीच या जागांसाठी आपल्या 12 सदस्यांची नावे पाठवली होती. त्यानंतर त्यांनी अनेकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे ही नावे हातावेगळी करण्याची विनंती केली. पण, राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. आता नव्या सरकारच्या नव्या यादीवर ते कोणता निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चौसाळा जिल्हा परिषद गट जिंकेल-- विवेक कुचेकर


बीड (प्रतिनिधी) सप्टेंबर मध्ये जि, प व पंचायत समितिच्या तसेच ग्रामपंचायत च्या सार्वञिक निवडणूका होत असुन असुन बीड तालुक्यातील चौसाळा जि,प, गटाची व जि, प, गटातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बहुमताने जिंकेल असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बालाघाटाचे युवा नेते विवेक कुचेकर  यांनी व्यक्त केला आहे. 
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकास साधला जातो .
पाणीपुरवठा योजना,पाणंद रस्ते,वस्ती रस्ते,आरोग्य सेवा,शैक्षणिक सेवा याच माध्यमातून चागंले काम केले जाते 
त्यासाठी जिल्हापरिषद ,पंचायतसमिती व स्थानिक ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असायला हवी.सर्वसामान्य लोकांच्या मनावर अधिराज्य करणारे आमदार संदीप (भैय्या)क्षीरसागर व लोकनेते डॉ.बाबु जोगदंड साहेब  यांच्या नेतृत्वाखाली  व योग्य  मार्गदर्शनाखाली चौसाळा जि,प,गटातील सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. 
चौसाळा जि,प,गटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हीच मतदारांची भावना असुन चौसाळा जि,प, गटातील ग्रामपंचायत मध्ये संपुर्णपणे परिवर्तन होणार असुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली जि,प,व ग्रामपंचायत मध्ये सत्ता प्रस्थापित होणार आहे चौसाळा जि,प,गटात लोकप्रिय आमदार संदीप(भैय्या) क्षीरसागर यांनी अनेक विकासाची कामे केली आहेत.आदर्श पालकमंत्री धनंजय मुंडे व लोकप्रिय आमदार संदीप(भैय्या) क्षीरसागर व लोकनेते डॉ.बाबु जोगदंड साहेब  हे बालाघाट व चौसाळा जि,प,गटातील सर्वसामान्य माणसाच्या मनातील दैवत आहेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बालाघाट युवा नेते विवेक कुचेकर  यांनी व्यक्त केले आहे

लिंबागणेश ग्रामपंचायतमार्फत "राष्ट्रीय डाॅक्टर्स दिन डाॕक्टरांची सन्मान करून "साजरा".

____
लिंबागणेश (प्रतिनीधी)  बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश ग्रामपंचायत मार्फत आज दि.१ जुलै रोजी "राष्ट्रीय डाॅक्टर्स दिन "निमित्ताने सरपंच निकिताताई गलधर,युवा नेते स्वप्निल गलधर यांच्या मार्गदर्शनात लिंबागणेश पंचक्रोशीतील आरोग्य सेवा देणा-या डाॅक्टरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आधिकारी डाॅ.रूपाली राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून नेकनुर पोलीस स्टेशन सपोनि शेख मुस्तफा उपस्थित होते.
 यावेळी ग्रामस्थांच्यावतीने  डाॅ.रूपाली राऊत, डाॅ.भारत नांदे,डाॅ.प्रसन्ना कुलकर्णी डाॅ.अभिजित गिरे,डाॅ.प्रतिभा मेंगडे,डाॅ.पल्लवी वाणी यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात आरोग्य सेवा देणारे परिचारीका शिंदे तसेच औषधी दुकानदार,लॅब टेक्निशियन यांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डाॅ.गणेश ढवळे यांनी तर माजी सरपंच बाळासाहेब मुळे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेश ढवळे,समीर शेख,विलास जाधव, जीवन मुळे,तुकाराम गायकवाड पप्पुआवसरे,बाळासाहेब गायकवाड,गणेश लिंबेकर औदुंबर नाईकवाडे,तुकाराम गायकवाड,महादेव बारगजे,यतीन जोशी,अक्षय ढवळे,आहेरकर, एएसआय निकाळजे,पो.ह.राऊत,पो.अं.ढाकणे,पो. ना.डीडुळ आदि उपस्थित होते. 

कोरोना कालावधीत जीव धोक्यात घालून आरोग्यसेवा दिली :-डाॅ.रूपाली राऊत 
____
 शासकीय आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय आधिकारी,कर्मचारी यांनी एकजुटीने कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा दिली ,ग्रामपंचायतने सर्वतोपरी सहकार्य केल्यामुळे मोठ्या महामारीच्या संकटाशी सामना करत आपण यशस्वी झालो,ग्रामस्थांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीतील काही तुरळक घटना सोडल्या तर आपण कोरोनाशी यशस्वी झुंज दिली म्हणावी लागेल. 


डाॅक्टर - रूग्णांमधील सुसंवाद आवश्यक :- शेख मुस्तफा सपोनि नेकनुर पोलीस स्टेशन 
____
सध्याच्या कालावधीत डाटक्टरावरील हल्ले आणि आरोपांच्या संख्येत वाढ झाली असून रूग्णसेवा देणारे दहशतीच्या वातावरणात वावरताना दिसतात, फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाच मोडीत निघण्याची चिन्हे असून डाॅक्टरांनाही प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देत असताना काही समाजकंटकाकडुन जाणीवपुर्वक मानसिक त्रास देण्याच्या हेतुने घटना घडल्याचे आढळते एकंदरीतच रूग्ण आणि डाॅक्टर्स यामधील सुसंवाद घडणे महत्वाचे असून डाॅक्टरांनी दिलेल्या आरोग्य सेवेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डाॅक्टर्स डे आपण साजरा करतो जे अत्यंत आवश्यक आहे. 


सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी श्रीमती दीपा मुधोळ - मुंडे यांची नियुक्ती.


सांगली (प्रतिनिधी) :- सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी श्रीमती दीपा मुधोळ - मुंडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या त्यासंभाजीनगर येथे सिडकोच्या मुख्य प्रशासक (न्यू टाऊनशिप) कार्यरत होत्या. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.मुधोळ - मुंडे यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  म्हणून काम केले आहे. शिक्षण, आरोग्य, स्त्रीभ्रूणहत्या या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात  आले होते. 
                  त्यांनी उस्मानबाद जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. एप्रिल 17 पासून त्या औरंगाबाद येथील राज्य जीएसटी मागीलवेळी न्याया विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरतहोत्या. जीएसटी प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दीपा मुधोळ-मुंडे त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. ई - वे बिल नियमाचे पालन न करणार्‍यांच्या विरोधात त्यांनी धडक कारवाई करीत मोठ्या प्रमाणावर कर वसूल केला होता. सांगलीच्या जिल्हाधिकारी नियुक्ती झाल्याबद्दल सौ.दिपा मुधोळ-मुंडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

महाविकास आघाडीचा नवा विरोधी पक्षनेता कोण ? आक्रमक चेहऱ्याची गरज !

 

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दिल्यानंतर , एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली . त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदं रिक्त झालं  असून , सत्तापरिवर्तनानंतर महाविकास आघाडीकडून कोण नवा विरोधी पक्षनेता असेल याबाबत लागली आहे . उत्सुकता महाविकास आघाडीची सत्ता गेल्याने आता काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात बसावे लागणार आहे , हे निश्चित आहे . सध्याची राजकीय स्थिती पाहता महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे . विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे 51 आमदार आहेत .

तशी एकूण संख्या 53 असली तरी , दोन आमदार तुरुंगात असल्याने आकडा 51 आहेत . शिवसेनेकडे 55 आमदार असले तरी 39 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे वेगळा मार्ग स्वीकारला आहे . काही अन्य 16 आमदार जे उद्धव ठाकरेंकडे उरलेले आहेत , त्यातीलही काही शिंदे गटाकडे येऊ शकतात , त्यामुळे शिवसेना विरोधी पक्षात बसण्याच्या क्षमतेत असेल नसेल अशीच परिस्थिती विधिमंडळातील त्यांची असणार आहे 

 काँग्रेसकडे 44 आमदार आहेत . त्यामुळे सर्वाधिक 51 जागा असलेले विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यालाच जाणार , आता निश्चित हे आहे . मुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेता हे जयंत पाटील आहेत . असे असले तरी , पक्षात दबदबा हा अजित पवारांचाच आहे . उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद ही दोन्ही महत्त्वाची खाती अजित पवारांकडे होती . त्यामुळे अजित पवारांचा दबदबा पाहता त्यांचेही नाव चर्चेत आहे .

मात्र , ते स्वतः हे पद स्वीकारतात किंवा नाही , हा विषय त्यांचा ऐच्छिक आहे . अशा परिस्थितीत मग दुसरा पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जर दुसऱ्या नावाचा विचार करत असेल तरी , त्यात सर्वातअसेल तरी , त्यात सर्वात आघाडीवर जयंत पाटलांचे नाव असू शकते . मात्र , जयंत पाटील यांचा स्वभाव मवाळ असल्याने ,  पक्षनेता हा आक'मक असावा असा जर पक्षाचा विचार झालाच तर , अन्य दुसऱ्या कुठल्या नावावरही शिक्कामोर्तब होऊ शकते .

लोकांनी विश्वास दाखवला आहे, कामातून.गतीमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे




*मंत्रिमंडळ बैठकीनंतर साधला सचिव, अधिकाऱ्यांशी संवाद.

मुंबई  -  लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. आपल्या कामातून शासन प्रशासन गतीमान आहे, हा संदेश देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीस उपस्थित होते. 
मंत्रिमंडळ बैठकीत दि. २ व ३ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनात पहिल्याच दिवशी  विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘आपण नवीन सुरुवात करत आहोत. आपल्यासोबत अनुभवी असे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही. राज्यातील विकास कामे, विविध प्रकल्प यांना गती द्यावी लागेल. विविध समाज घटकांना न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते. शासन आणि प्रशासन ही एका रथाची दोन चाके आहेत.  लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो आपल्याला सार्थ ठरवायाचा आहे. आपल्या कामातून गतीमान शासन प्रशासन आहे. असा संदेश आपण कामांच्या माध्यमातून देऊया. मेट्रोचे प्रकल्प, हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तसेच जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे.’ 
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘आपल्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. गतिशीलतेने आणि निर्णय क्षमतेने महाराष्ट्र पुढे नेऊया.’ 
यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव तसेच सर्व विभागांचे सचिव आदी उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील खरीप हंगाम पीक पाणी पीक विमा तसेच राज्यातील कोरोना प्रादुर्भावाबाबतची परिस्थिती यांचे सादरीकरण करण्यात आले. 
मंत्रालयात आगमन करताच मुख्यमंत्री श्री. शिंदे तसेच उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 
0000

बहमत सिद्ध करण्याची शिंदे सरकारची शनिवारी अग्निपरीक्षा!





मुंबई -  शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली 

 राजभवनात शपथविधीचा सोहळा पार पडला . त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोघांना पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली . माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज शिंदे यांनी शपथ घेतली . बंड पुकारल्यानंतर शिंदे गोव्याहून मुंबईत दाखल झाले .

मुंबईत आल्यावर त्यांनी सागर निवासस्थानी फडणवीस यांची भेट घेतली . त्यानंतर शिंदेआणि फडणवीस राजभवनात दाखल झाले . त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली . दरम्यान राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून आजच शिंदे यांनी शपथ घेतली आहे . तर उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी शपथ घेतली आहे . 

या नव्या सरकारची शनिवारी अग्निपरीक्षा असणार आहे . राज्यपालांनी शिंदे सरकारला शनिवारी बहमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे आता बहुमत चाचणी कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे .