हिमायतनगर :(प्रतिनीधी) तालुक्यात व शहरात काही कृषी सेवा केंद्र दुकानातून गेल्या एप्रिल,मे,जून महिन्यापासून शेतकऱ्यांना रासायनिक खते बी-बियाणे यांच्या सोबत इतर दुय्यम कंपनीचे देऊन मोठ्या प्रमाणात लिंकिंगचे सर्रास प्रकार दिवसाढवळ्या चालू असून या गंभीर प्रकाराकडे कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर,तालुका कृषी अधिकारी साफ दुर्लक्ष होत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलल्या जातआहे.याकडे जिल्हाअधीक्षक कृषीअधिकारी रवीशंकर चलवदे नांदेड,जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ.तानाजी चिमण शेट्टे, जिल्हा मोहीम अधिकारी जी. एन. हुंडेकर जिल्हा परिषद नांदेड यांचे तालुक्यातील कार्यरत अधिकारी व कर्मचारीं वर्गाची पाठ राखणीमुळे शेतकरी वर्गावर लिंकिंगंच्यां प्रकारामुळे दररोज भरडला जातो आहे.लिंकिंगमुळे व्यापारीवर्गाची चांदी तर शेतकऱ्यांची माती होतआहे.उपविभागीय कृषीअधिकारी किनवट येथील डी.एम.तपासकर हे येथील मौजे सिरपल्ली रहिवासी आहेत.तर प्रभारी तालुका कृषी अधिकारी शहरातील बालाजी शेन्नेवाड,तर कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती येथील पुंडलिक माने हे मौजे पोटा बु.रहिवासी असून त्यांना शहर व तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांची विशेष अशी ओळख असल्याने साहेब आपल्याच गावचे आहेत.काय भियांचेआहे?म्हणून येथील काही कृषी सेवा चालक मोठ्या प्रमाणात खते,बी बियाणे लिंकिंग करणे,खते बी-बियाणे आगाऊ भावात शेतकऱ्यांना देणे,खतामध्ये दुय्यम खते सोबत देणे,खते बियाणे चढ्या भावाने विक्री करणे,असे सर्रास प्रकार गेल्या एप्रिल,मे,जून महिन्यापासून शहर व तालुक्यात असे प्रकार चालू असताना हिमायतनगर हदगावचे आमदार माधवराव पाटील,खासदार हेमंत पाटील हिंगोली यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध झालेले खते बी-बियाणे यांच्या शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे जिल्ह्यातील जबाबदार अधिकारी,कर्मचारी यांना खडेबोल बोलून नियमानुसारच खते बी-बियाणे देण्यात यावेअन्यथा दोषींवर कारवाईचा बडगा उगारला काय?असा सवाल ही उपस्थित होत आहे.यामुळे शेतकरी वर्गातून संबंधित कृषीअधिकारी व कृषी सेवा चालकांत आर्थिक मिलीभगत असल्याने,त्यांच्यातं कारवाईची,परवाना निलंबनाची भीती नसल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात लिंकिंगचे प्रकार चालू असल्याने दिवसाढवळ्या शेतकरी बांधवांची या ठिकाणी फसवणूक व लुट होतांना तालुक्यातील जनता व शेतकरी उघड्या डोळ्यांनी बघतअसल्याचे चित्र तालुक्यात दिसून येतआहे.नांदेड जिल्हा भरारी पथकांकडुनआता प्रयत्न एका ही कृषी दुकानांवर कारवाई नाही हे मात्र विशेष आहे.
No comments:
Post a Comment