Saturday, January 30, 2021

परळी तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण ५ फेब्रुवारीला.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी-) महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण दि.४, आणि ५ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. या अनुषंगाने परळी तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीचे आरक्षण ५ फेब्रुवारी रोजी दु. १ वा. काढण्यात येणार आहेत. आरक्षणासाठी संपर्क अधिकारी म्हणून तहसिलदार परळी यांच्याकडे जिल्हाधिकारी बीड यांनी जबाबदारी सोपवली आहे.

बीड जिल्ह्यासाठीचे निर्धारीत करण्या आलेले सरपंच पदाचे आरक्षण दि. ४ आणि ५ फेब्रुवारी
रोजी काढण्यात येणार आहेत. या बाबतचे आदेश जिल्हाधिकारी बीड यांनी दिले असून परळी तालुक्यातील ९० ग्राम्पंचायतीचेरक्षण दु. १ वा. तहसिल कार्यालय, परळी येथे काढण्यात येणार आहे. या अनुषंगाने अनु.जातीसाठी आरक्षीत सरपंच पदे, अनु.जमातीसाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी व खुला प्रवर्ग अशी सरपंच पदाचे आरक्षण होणार आहे. या सर्व वर्गानुसार महिलांचे ५० टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. कुठल्या गावचा सरपंच कोण होणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Friday, January 29, 2021

गर्दी होणार नाही अशारितीने सर्व प्रवाशांसाठी.१ फेब्रुवारीपासून लोकल रेल्वे सेवा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.




*मुंबईतील कार्यालयीन वेळांमध्ये सुधारणा करण्याची देखील विनंती.

मुंबई -- : कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.  यामुळे सर्वाना यातून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वाना सुविधा होईल असेही यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  म्हटले आहे.  
विशिष्ट वेळांच्या मर्यादेत  मुंबईतील लोकल  रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती.  यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते. 
सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्यासाठी गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते, त्यप्र्माने आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी खालीलप्रमाणे ही सेवा उपलब्ध असणार आहे : 
कधी प्रवास करता येईल: सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. 
कधी प्रवास करता येणार नाही: म्हणजेच सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील. 
सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरु करण्याची  आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई व उपनगर परिसरातील कार्यालये व आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांत आवश्यक तो बदल करावा अशी विनंती देखील मुख्य सचिव यांच्या या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.  
या  बाबतीतली सुचना  मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देखील कळविण्यात आली आहे. 

*उपहारगृहे व दुकानांसाठी वेळा*

  मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नाशिकच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा.

 


मुंबई दि २९ : नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. २६ मार्चपासून हे संमेलन नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होत असून ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे आयोजित करण्यात येत असून लोकहितवादी मंडळ, नाशिक यांनी या संमेलनाच्या आयोजनासाठी निमंत्रण दिले आहे.
गेल्या वर्षभरापासून आपण कोविडचा लढा लढत असून परिस्थितीत झपाट्याने सुधारणा होत आहे, या पार्श्वभूमीवर हे साहित्य संमेलन आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन पार पाडले जाईल तसेच या संमेलनामुळे मराठी साहित्य विश्वात परत एकदा उत्साहाचे  वातावरण निर्माण होईल अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करून त्यांनी या संमेलनाच्या आयोजनास आपल्या शुभेच्छाही दिल्या. डॉ जयंत नारळीकर यांच्यासारखा महान खगोलशास्त्रज्ञ तसेच साहित्यिक या संमेलनाच्या अध्यक्षपदी  लाभल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी  आनंद व्यक्त केला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी हे संमेलन डिसेंबर-जानेवारीत होणार होते परंतु कोरोना संकटामुळे मार्चमध्ये घ्यावे लागत आहे अशी माहिती दिली आहे.

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार -2020 प्रवेशिका पाठविण्याकरिता 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ.




मुंबई,दि.29:- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या  स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची मुदत दि.31 जानेवारी 2021 होती. तथापि या प्रवेशिका सादर करण्याकरिता  दि.15 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
            राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने  dgipr.maharashtra.gov.in           
या  संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
0000

विकासक विमल शहा समोर ये दलालांना पुढे करू नकोस - डॉ. राजन माकणीकर.


मुंबई ;-  (प्रतिनिधी) विकासक विमल शहा समोर ये महादलाल व भडवेगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढे करून स्वतःची पोळी भाजून घेऊ नकोस. अन्यथा वंचित झोपडी धारकांसह  तुझ्या घराचा ताबा घेऊ. अशी चेतावणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी दिली आहे.

वेळ आली आहे तुझी व तुझ्या महादलाल तथा मस्तवाल अधिकाऱ्यांना नागडे करण्याची, झोपडीपासून वंचित राहिलेल्यांना सदनिका कश्या मिळत नाहीत हे पाहून घेऊ, कायद्यासमोर तुझ्यासखे छप्पन आडवे झालेत. तू काय चीज आहेस, तुला कायद्याचा व खऱ्या आंबेडकरी वाद्यांचा बडगा दाखवतो. अश्या शब्दात डॉ राजन माकणीकर यांनी एम.आय.डी.सी प्रकल्पात चोरी झाल्याचे सांगून अश्या चोरास नागडे करणार असल्याचे संकल्प व्यक्त केला आहे.
शासनाचा प्रकल्पात भडवेगिरी करून महाभ्रष्टाचार करणारे विकासक व एमआयडीसी अधिकारी दोघांची खैर नाही, वीस वर्षांपूर्वी पात्र केलेल्यांना पुन्हा दस्ताऐवजांच्या आधारावर अपात्र करून सदनिका गळपाटण्याचा विकासाकाचा डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही धडक मोर्चा घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेकडोंना विनालॉटरी सदनिकेत घुसवनार्यांना लवकरच त्यांची जागा दाखवून खरा सूत्रधार शोधण्यासाठी शेकडोंचा हा मोर्चा प्रकल्पाचा कायापालट करेल हे निश्चित.
प्रकल्पात सुरुवातीपासून काम करणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या वंशावळी संपत्तीची चौकशी लावून वीस वर्षपूर्वी कार्ट्रेज विकणारा परप्रांतीय धनदांडगा कसा झाला शासनाच्या प्रकल्पात कशी चोरी केली हे उघड करावयाचे आहे.
मोर्चातुन प्रश्न सुटून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई नाही झाल्यास, पात्र वंचित झोपडीधारकास सदनिका नाही मिळाल्यास, भाडे धनादेश नाही दिल्या आत्मदहनाचा इशाराही डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे दिला आहे.
डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बंजारा सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाई शिवा राठोड आयोजित मोर्चा आंदोलनाचे अध्यक्ष कॅप्टन श्रावण गायकवाड असून नेतृत्व डॉ. राजन माकणीकर करत आहेत, या मोर्चाला पोलीसांनी परवानगी नाकारली असली तरी शेकडोंच्या संख्येने आंदोलन होणार आहे.
पोलिसांच्या माध्यमातून विकासक व महादलाल आंदोलनाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र लोकशाही संविधानिक मार्गाने आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार केला असून आंदोलन होणारच असा ठाम विश्वास डॉ माकणीकर यांनी व्यक्त केला आहे.
आंबेडकरवादी हमारे जेब मे है! म्हणणाऱ्या मनूच्या पिलावळीच्या कानाखाली चपराक देण्यासाठी सज्ज असून अफवांचे पेव फुटले आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन ही डॉ. माकणीकर यांनी केले आहे.

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ गेवराईमध्ये अनोखे आंदोलन.कॉंग्रेसने बैलापुढे वाजवली पिपाणी.


* बैल के आगे बिन बजाना आंदोलन चर्चेत.

गेवराई (प्रतिनीधी ) पेट्रोल, डिझेल, गैस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात मा.खा.रजनीताई पाटील यांच्या आदेशावरून बीड जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ड.श्रीनिवास बेदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅप्टन कृष्णकांत पेट्रोल पंप समोर गेवराई येथे अनोखे प्रतीकात्मक बैल के आगे बिन बजाना आंदोलन बैला समोर पुंगी वाजवून जनतेच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नसलेल्या मुक़्या, बहिर्‍या, आंधळ्या मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी बोलताना बीड जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष ड.श्रीनिवास बेदरे म्हणाले की केंद्रातील मोदी सरकारच्या जनता विरोधी निर्णयामुळे सध्या पेट्रोल,डिझेल, गँस सिलेंडरच्या दरात प्रचंड दरवाढ झाली आहे. यात सातत्याने वाढच होत असुन यांचा फटका बसून सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. वाहनचालकांना, मालवाहतुकदारांना यांचा फटका बसून सर्वत्र महागाई वाढली आहे. सतत होणार्‍या दरवाीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पेट्रोल, डिझेल, गैस सिलेंडर च्या दरवाढी विरोधात देशभरात रोजच आंदोलने चालू आहेत तरीही मुक़्या, बहिर्‍या, आंधळ्या मोदी सरकारवर काहीच फरक पड़त नाही. याचा निषेध करण्यासाठी आज रोजी गेवराई येथे प्रतिकात्मक बैल के आगे बिन बजाना आंदोलन करण्यात आले यामध्ये जसे की बैलासमोर पुंगी वाजवून काही उपयोग नाही,त्याच प्रमाणे मोदी सरकारला काही फरक पड़त नाही असेच दिसत आहे. म्हणून आज हे आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले व इंधन दरवाढ ताबड़तोब मागे घ्यावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी कडूदास कांबळे गेवराई विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष किरण अजबकर,बळीराम गिराम,शेख अलिम,बाळासाहेब आतकरे,विशाल जंगले,राजू पोपळघट,संभाजी अजबकर , निलेश माळवे बालाजी बांडे, प्रवण भरती, आल्टफ शेख, कारण बोरुडे, पाटील राजू, मनुसार भाई, गोटू सावंत,रवी नाईक,शेख शकील,माउली,सोनू भरती, महादेव रोकडे, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक सहभागी झाले होते.

राज्य सरकारचा निर्णय.राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला.


मुंबई (प्रतिनीधी ):- करोनाच्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ठराविक कालावधीनंतर लॉकडाऊनला मुदतवाढ दिली जात असून, राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवला आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनला सातत्यानं मुदतवाढ दिली जात आहे. राज्य सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला असून, तसे आदेश आज काढण्यात आले आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला असून, आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टींवर सुरू राहणार आहेत. तर ज्या सेवांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्या पूर्वीप्रमाणेच बंद असणार आहेत. लॉकडाऊन वाढवताना राज्य सरकारनं यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेश लागू असतील. गेल्या ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे.


Thursday, January 28, 2021

अखेर बीड जिल्ह्यातील वाळू लिलाव जाहीर

.

बीड -- सन 2020 - 2021 या वर्षाकरिता बीड जिल्ह्यातील एकूण एकवीस वाळू घाट लिलावा करिता जाहीर करण्यात आलेले आहेत राज्यस्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरण समिती महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी बीड जिल्ह्यातील 21 वाळू घाटांना पर्यावरण विषयक मान्यता दिलेली असून या 21 वाळू घाटांचे ई टेंडर व इ ओक्शन या पद्धतीने लिलाव करण्यात येणार आहेत या 21 वाळू घाटामध्ये गेवराई तालुक्यातील एकूण 17 माजलगाव तालुक्यातील 03 आणि परळी तालुक्यातील एक अशा 21 वाळू घाटांचा समावेश आहे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या 21 वाळू घाटांचा लिलावाचा कार्यक्रम  प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदरची वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया ई-टेंडर आणि ई-लिलाव या दोन्ही पद्धतीने होणार आहे याकरिता जे निविदा धारक वाळू लिलावात भाग घेऊ इच्छितात ते शासकीय संकेत स्थळ www.mahatenders.gov. in व  e.auction.gov.in संकेतस्थळांवर  निविदा आणि ई-लिलाव याबाबत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात व www.beed.nic च्या वेबसाईट वरती तसेच महाटेंडर च्या वेबसाईट वरती दिलेल्या लीलाव विषयक जाहिरातीच्या तपशिलाचे अवलोकन करून ही निविदा आणि इ लिलाव करिता यामध्ये भाग घेऊ शकतात सदर लिलावाची प्रक्रिया ही 12 फेब्रुवारी 2021 पासून सुरू होऊन प्राथमिक फेरी 23 फेब्रुवारी 2021 पर्यंत असणार आहे या लिलावाच्या प्रक्रियेमध्ये एखादा लिलाव धारक ई-निविदा भरू शकतो व वाळू घाटांची अधिकतम किमतीची बोली तो निविदा द्वारे सादर करू शकतो त्याचबरोबर तो लिलाव धारक लिलावामध्ये लिलावाच्या पद्धतीने ही बोली बोलू शकतो लिलाव धारक ई-टेंडर आणि ई-लिलाव यापैकी एका  पद्धतीने या लिलावात सहभागी होऊ शकतात किंवा ज्यांना दोन्ही पद्धतीने लिलावात सहभाग घ्यावयाचा आहे ते दोन्ही पद्धतीने लिलावामध्ये सहभागी होऊ शकतात या लिलावाच्या प्रक्रियेमध्ये निविदेमध्ये भाग घेतलेल्या सर्व व्यक्ती संस्था इत्यादींच्या निविदेचा तांत्रिक लिफाफा सर्वप्रथम ऑनलाईन उघडण्यात येईल इ लिलाव प्रक्रिया तद्नंतर पूर्ण करण्यात येईल त्यानंतर आर्थिक लिफाफा उघडण्यात येईल आणि तद्नंतर ई-निविदा व इ लिलाव या दोघांमध्ये जी बोलीची रक्कम जास्त असेल त्या रकमेचा लिलाव अंतिम करण्यात येईल सदर लिलावाच्या प्रक्रियेमध्ये प्रथम फेरीमध्ये ई-निविदा अथवा ई लिलाव या दोन्ही प्रकारांनी एकाही निविदा धारकाने अथवा बोली लावणाऱ्याने वाळूचा लिलाव मध्ये सहभाग घेतला नाही तर त्याची दुसरी फेरी 25 फेब्रुवारी पासून ते 8 मार्च पर्यंत असेल दुसऱ्या फेरीतही ही निविदा आणि ई-लिलाव या मार्गाने कोणत्या वाळू घाटाला प्रतिसाद मिळाला नाही तर तिसरी फेरी 12 मार्च पासून ते 23 मार्च पर्यंत असेल मात्र वाळूचे लिलाव कोणत्याही तारखेला झाले तरी लिलावाचा कालावधी हा दिनांक 30 सप्टेंबर 2021 रोजी संपुष्टात येणार आहे वाळू घाटांचे लिलाव झाल्यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर ती महसूल मिळणार आहे त्याचबरोबर अनधिकृत गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीच्या तक्रारी सुद्धा त्यामुळे कमी होऊ शकतील त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील जनतेला वाळू सहजरीत्या उपलब्ध होऊ शकेल त्या अनुषंगाने अधिकाधिक लिलाव धारकांनी व निविदा धारकांनी या ऑनलाईन अशा निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे या लिलावाच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबींची व इतर सर्व पूरक बाबींची माहिती ही बीड जिल्ह्याच्या एनआयसीच्या वेबसाईट वरती त्याचबरोबर शासनाच्या  जटेडर विषयक अधिकृत संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटणारा अट्टल गुन्हेगार गजाआड.



अहमदनगर (प्रतिनीधी)  दि.28 स्वस्तात सोन्याच्या आमिषाने लुटणार्‍या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. पांड्या उर्फ पांडुरंग भोसले असे त्याचे नाव आहे. त्याला कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नाशिक येथील दिनेश दगडू पाटील यांना 10 लाख रुपयांत एक किलो सोने देण्याच्या आमिषाने आरोपी भगीरथ भोसले, हिरू भोसले (दोघे रा.पढेगाव) यांनी 7 जुलै, 2019 रोजी मावळगाव (कोपरगाव) शिवारात बोलावून घेतले.

तेथे मारहाण करून त्यांच्याकडील 10 लाख 74 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी तपासासाठी स्वतंत्र पथक नेमले होते. त्यातील आरोपी पांड्या भोसले पढेगाव येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले आहे.

गुटखा सुगंधी तबांखु विक्रेत्यावर छापा. पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाची कारवाई.


अहमदनगर ( प्रतिनीधी)  दि.28 राज्यामध्ये विक्रीस प्रतिबंध असलेली सुगंधी तांबाखू व त्यापासून अवैधरित्या तयार करण्यात येत असलेल्या माव्याची विक्री करणार्‍यां विक्रेत्यांवर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने छापासत्र सुरू केले कसून नुकतीच कोठला परिसरात छापा टाकून एका मावा विक्रेत्यावर कारवाई केली. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. मावा व्रिकी करणार्‍याचे धाबे चांगलेच दणानले आहेत.

राज्यात सुगंधी तंबाखू विक्रीस बंदी असतानाही नगर शहरात मोठ्या प्रमाणावर सुगंधी तंबाखू व सुपारी पासून बनविलेला मावा तसेच पान मसाल्याच्या पुड्यांची विक्री सर्रासपणे केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. या अवैधरित्या पान मसाला व सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचा बडगा उगारला आहे.

मंगळवारी (दि.26) उपअधीक्षक ढुमे यांना माहिती मिळाली की राज चेंबर्स, कोठला परिसरात मोठ्या प्रमाणावर मावा तसेच पान मसाल्याची विक्री केली जात आहे. या माहितीवरुन उपअधीक्षक ढुमे व त्यांच्या पथकातील पोलिस नाईक गणेश चव्हाण, सचिन मिरपगार, सचिन जाधव, बाबा फसले आदींच्या पथकाने राज चेंबर्स समोर असलेल्या टपरीवर छापा टाकत शाहीद फारुक शेख (वय 21, रा.कोठला मैदान) यास ताब्यात घेतले. 

18 हजार रुपये किंमतीचा सुगंधी तंबाखू पासून तयार केलेला मावा 480 रुपये किंमतीच्या विमल पान मसाल्याच्या पुड्या, 210 रुपये किंमतीच्या हिरा पान मसाल्याच्या पुड्या तसेच पान मसाला व मावा विक्रीतून जमा झालेली 6 हजार 730 रुपयांची रोकड असा एकूण 24 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मावा विक्रेता शाहीद फारुक शेख याच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wednesday, January 27, 2021

परळी वैजनाथ नगरीत सल्लेखना (संथारा) नियामक स्वाध्यायी सुधाकरराव जैन यांच्या अंत्यसंस्कारा साठी लिंगायत व जैन धर्माच्यावतीने घडले एकात्मता व मानवतेचे दर्शन.


* सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे व महावीर संघई यांचा पुढाकार..

वैजनाथ परळी  ( प्रतिनिधी-) जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करून समाजात विद्वेष पसरवण्याची कृती सुरू असल्याचे चित्र एकीकडे तर दुसरीकडे द्वादश ज्योतीर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीत जगत् ज्योती म.बसवेश्वर-भगवान महावीर-राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज,अहमदपुरकर यांच्या विचारांचा वारसा डोळंयासमोर ठेवून समाजा-समाजात पडणा-या दरीवर मैत्रभावातून सलोख्याचे पूलही बांधले जात असल्याची दिलासादायक उदाहरणेही घडत आहेत. सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे व जैन धर्मातील श्रावक महावीर संघई यांच्या पुढाकारातून अंत्यसंस्कारासाठी एकात्मता व मानवतेचे दर्शन घडले.*
*परळी येथील विद्यानगर भागातील औष्णिक विदयुत केंद्रातील सेवानिवृत्त अभियंता तसेच स्वाध्यायी सल्लेखना(संथारा)नियामक श्रावक सुधाकरराव जैन यांचे गुरूवार दि.21जाने.रोजी देहावसान झाले*
*जैन धर्माचरणानुसार त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी परळी शहराच्या ईतिहासात पहील्यांदाच जात,पंथ व धर्मभेद विसरून म.बसवेश्वर-भगवान महावीर-राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मानवता हाच सर्व श्रेष्ठ धर्म या शिकवणीचा स्वीकार करून लिंगायत समाजाच्या आनंदधाम येथील स्मशानभूमीत लिंगायत समाजातील तरूणाईच्या पुढाकाराने जागा उपलब्ध करून देण्यात आली.*
*लिंगायत धर्मामध्ये दफन(पुरणे) तर जैन समाजामध्ये दहन विधीद्वारे अंत्यसंस्कार केला जातो परंतू जैन यांच्या लिंगायत स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारातून एकात्मता व मानवतेचे दर्शन लिंगायत व जैन धर्मातील नागरिकांकडून घडल्याची चर्चा परळी व परीसरातील सर्व समाज बांधवा मध्ये करण्यात येत आहे.*
*या महत्वपूर्ण अंत्यसंस्कारासाठी लिंगायत व जैन धर्मातील चेतन सौंदळे,महावीर संघई,संजय सुरवसे यांच्यासह रमेशअप्पा सपाटे,नंदूअप्पा खानापुरे,सोमनाथ निलंगे,मकरंद नरवणे,संतोष पंचाक्षरी,चंद्रकांत उदगीरकर,जगदीश मिटकर,शिरीष सलगरे,विशाल नरवणे,अतुल खके,दीपक कापसे,बाळू गिरवलकर,वैभव कुरकुट,महावीर महालिंगे,धीरज दुरूगकर,नेमीचंद कुरकुट,राजेयकुमार बेंडसुरे,मोहन संघई यांच्यासह समाज बांधवांनी योगदान दिले.*

बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन बॕगमधील. गळ्यातील सोने चोरणार्‍या महिलांची टोळी गजाआड.


बीड (प्रतिनीधी ):- बसमध्ये गर्दीचा फायदा घेवून बॅगमधील आणि महिलांच्या गळ्यातील सोने चोरणार्‍या महिला टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला असून दोन महिलांना ताब्यात घेतले आहेत.

स्थानिग गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, बसमधील महिला प्रवाशांचे दागिने चोरणार्‍या महिला सोनी चव्हाण, राणी चव्हाण या प्रवाशांचे चोरलेले दागिने विक्री करण्यासाठी व्हेरना कार क्र.एम.एच.१२ जे.यु. ४५०० या गाडीतून गेवराईहून बीडकडे येत असल्याची माहिती मिळताच जालना रोडवरील संगम हॉटेलसमोर पोलीस पथकाने सापळा लावून त्या गाडीला थांबवले असता. त्या गाडीतील चालक गाडी सोडून पळाला. त्यामध्ये सोनी उर्फ पप्पू जावेद चव्हाण रा.नागझरी ता.गेवराई जि.बीड व दुसरी महिला रोहिणी शहादेव चव्हाण रा.बांगरनाला बालेपीर बीड या दोन महिलांना पोलीसांनी ताब्यात घेतले असता. त्यांच्याकडे एक सोन्याचे गंठण, एक पट्टीचे गंठण व एक मनीमंगळसुत्र असे एकूण १ लाख ६५ हजाराचे सोने मिळून आले. याबद्दल पोलीसांनी त्यांना विश्‍वासात घेवून विचारले असता. त्यांनी सांगितले की, हे दागिने त्यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी नेकनूर बसस्थानक, पाच-सहा दिवसापूर्वी मांजरसुंबा ते बीड बस प्रवासात, पंधरा दिवसापूर्वी धारूर बसस्टँड येथे चोरल्याचे सांगितले व दहा ते पंधरा दिवसापूर्वी धारूर ते माजलगाव एस.टी.बस प्रवासात माजलगाव ते तेलगाव बस प्रवासात देखिल काही महिलांच्या दागिने चोरी केल्याचे त्यांनी सांगितले.सदरील कार ही चोरी करण्यास जाण्या-येण्यासाठी घेतल्याचे सांगितले. याबाबत पोलीसांनी चौकशी केली असता नेकनूर पोलीस, पेठ बीड पोलीस, धारूर पोलीस, माजलगावसह आदी ठिकाणी महिलांचे सोने गेल्याच्या तक्रारी दाखल आहेत. पोलीसांनी सदरील सोने व कार असा एकूण ७ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही महिला आरोपींना नेकनूर पोलीसांच्या स्वाधीन केले. त्यांच्यावर कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई स्था.गु.शा.चे पी.आय.भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी यांनी केली.

गुटख्याने भरलेला टेम्पो पकडला.त्या’ टेम्पोत फक्त दहा पोते गुटखा, पेठ बीड पोलीसांची कारवाई संशयाच्या भोवर्‍यात.


बीड (प्रतिनीधी ):- पेठ बीड पोलीसांनी २५ तारखेला गुटख्याने भरलेला टेम्पो पकडला होता. तो थेट कारवाईसाठी ठाण्यात आणण्याऐवजी तेथेच त्याची झाडाझडती सुरू केली. यावेळी टेम्पो चालकाने पोलीसांच्या हातावर तुरी देवून पळ काढला. यानंतर वरिष्ठांनी त्यात लक्ष घातल्याने पोलीसांनी मोकळा टेम्पो पकडून आणला. मात्र पुन्हा वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी पेठ बीड पोलीसांना खडसावल्यानंतर रात्री पोलीसांनी १० पोते गुटखा जप्त केला. त्यामुळे एकूण पोलीसांच्या कारवाईबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

पेठ बीड पोलीसांनी तेलगाव नाका येथे माजलगावहून येणार्‍या टेम्पो क्र.एम.एच.१६ एवाय ८०३५ ला अडवल्यानंतर त्याची झाडाझडती घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर पोलीसांनी तो टेम्पो ठाण्यात आणण्याऐवजी एका लॉन्सच्यापाठीमागे नेला. तेथे बराच वेळ चर्चा झाल्यानंतर टेम्पो घेवून चालक फरार याची माहिती वरिष्ठांना मिळाल्यानंतर पुन्हा पोलीसांनी रिकामा टेम्पो ठाण्यात आणून लावला. त्यानंतर चालक आणि मालकांला पोलीसांनी ताब्यात घेतले. मात्र त्यांनी गुटका लपुण ठेवल्याचे सांगितले. घोडका राजुरी परिसरातील एका खदाणीतून १० पोते गुटखा जप्त केला. त्याची एकूण किंमत १ लाख ३६ हजार रूपये आहे. मात्र सुरूवातीला पोलीसांनी जेंव्हा टेम्पो जप्त केला होता तेंव्हा तो गुटख्याने भरलेला होता. मात्र त्यामध्ये केवळ १० च पोते पोलीसांनी जप्त केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत पोलीसांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे

बीड ग्रामीण पोलीसांची जुगार अड्‌ड्यावर धाड. आठ जणांविरोधात कारवाई.

बीड (प्रतिनीधी ):- घोसापुरी शिवारामध्ये तिरट नावाचा जुगार चालू असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलीसांना झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी धाड टाकली. पोलीसांनी आठ जुगार्‍यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडील २८ हजार ८०० रूपये, ५ मोबाईल, ४ मोटरसायकल जप्त केल्या.
घोसापुरी येथील पकडलेल्या जुगारामध्ये संदिप पालके, मोहम्मद अफजल, मनोज नेवडे, मुबीन खान, रिझवान सिद्दीकी, सुनिल सौदा, रविंद्र जैन, गणेश पवार रा.सर्व बीड यांचा समावेश होता. या जुगार्‍याकडून २८ हजार ८०० रूपये, ५ मोबाईल, ४ मोटरसायकल असा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पीएसआय पवनसिंग राजपुत, रविंद्र जाधव, किशोर राऊत, येडे, म्हेत्रे, ढाकणे यांनी केली. या प्रकरणी पीएसआय पवनसिंग राजपुत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास किशोर राऊत हे करत आहेत.

परळी वैजनाथ आगार बस स्थानकातुन लांब पल्ल्याच्या गाड्या चालू करा - मा.वसंत मुंडे

 
परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) बीड जिल्हातील प्रथम क्रमांकाचे असलेले परळी बसस्थानक आता शेवटच्या क्रमांकावर नाव घेतले जात असुन या बस स्थानकात आगार प्रमुखांनी स्वत: लक्ष देवून बसस्थानक सुधरावे. असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत मुंडे यांनी केले. 
विविध अडचणीसाठी जबाबदारी नावाची दखल राहिली नाही. यामुळे परळी बसस्थानकास उतरती कळा लागली आहे. 15 वर्षापूवी बस स्थानकास 25 लाख उत्पन मिळत होते. त्यावेळेस औरगांबाद विभागा मध्ये सर्वात उत्कृष्ट उत्पन देणारा म्हणुन परळी बसस्थानक नावाजले  जात होते.
परळी आगारात गेल्या काही दिवसात डिझेल मुळे लांब पल्याच्या गाड्या उशीर सुटत होत्या. तसेच लाबपल्यांची परळी-भुसावळ  गाडी वाटर लिकेज व इतर अडचणीमुळे बस स्थानकाच्या बाहेर जावून नादुरूस्तीमुळे परत येत आहेत.  परळी-नागपुर बस वाहन चालकामुळे 2 तास उशीरा सुठुनही परळी आगार प्रमुखांच्या कर्मचार्‍यावर वचक राहिली नसल्यामुळे परळी आगार मोडकळीत आलेले दिसत आहे असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार  नाशिक विभाग यांनी  महाराष्ट्र शासनाकडे तक्रार दिली आहे.

*"अंबाजोगाई येथील बसस्थानकात लांब पल्ल्याच्या बसेस आल्यानंतर चालक-वाहकाला विश्रांती करण्याकरिता विश्रांतीरूममध्ये कोणतीही सुविधा नसल्यामुळे लांब पल्ल्यावरून येणार्‍या ड्रायव्हर (चालक) यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ खंत व्यक्त केली.

Tuesday, January 26, 2021

परळी तालुका पेन्शनर्स असोसिएशन च्या कार्यालयात नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.

परळी वैजनाथ ( प्रतिनिधी)- : 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या  निमित्ताने परळी शहरातील सर्वात जुनी "पेन्शनर्स असोसिएशन" या संघटनेच्या स्वाती नगर येथील कार्यालयात येथील स्थानिक नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
    या ध्वजारोहण कार्यक्रमा प्रसंगी संघटनेच्या कार्यपद्धती, समस्या, अडचणी व उपाय योजना आदी विषयावर संघटनेचे  श्री रंगनाथ खके सर व श्री बालासाहेब गित्ते आदींनी प्रकाश पाडला या  वेळी आपल्या मनोगतात नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी संघटनेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात नवीन सुस्सज इमारत,कार्यालयात पेन्शनर्स ला पूर्णवेळ वाचनालय तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून अत्याधुनिक विद्युत व्यवस्था पुरवू असे सांगून संघटनेच्या विकासासाठी  सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी व्यासपीठावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री हरिभाऊ चव्हाण,विद्यमान अध्यक्ष  श्री रंगनाथ मुंडे,,उपाध्यक्ष सुधाकर आंबेकर आदी जण उपस्थित होते. या कार्यक्रमाला संघटनेचे सचिव सुग्रीव राख,सहसचिव भागीरथी बाई कोठावळे,संचालक अनंतराव मुंडे,रामकीसन गरड, सोपान सिरामे, रंगनाथ खके,शेख अजमोद्दीन म शरीफ,राखमाजी फड,मधुकर ढाकणे आदींची उपस्थिती होती.

प्रजासत्ताक दिनी विविध योजनेचा आढावा विषद करत. ना.धनंजय मुंडे म्हाणाले.वंचित घटकांचा विकास हेच ध्येय !


बीड – ( प्रतिनीधी)  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड चे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी मंत्री मुंडे यांनी राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा विशद करत मान्यवरांचे सन्मानचिन्ह देऊन गौरव केला .

26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जनतेला संबोधीत करताना सांगितले की कोरोनाचे संकट हळूहळू दूर होत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे .जिल्ह्यात चार ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून दोन हजार पेक्षा जास्त डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे .

समाजकल्याण विभागाच्या वतीने वंचित,दिन दलित घटकापर्यंत विकास पोहचवण्याच काम महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे .तळागाळातील शेवटचा माणूस सुखी झाला पाहिजे यासाठी आम्ही काम करत आहोत .

बीड जिल्ह्यात पीकविमा,फळपीक विमा तसेच कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकरी सुखी झाला पाहिजे यासाठी प्रशासन आणि शासन कार्यरत आहे .जिल्ह्यातील वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे .

यावेळी राष्ट्रपती पदक प्राप्त जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांचा मुंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला .तसेच विविध ग्रामपंचायत ,शिक्षक,पोलीस कर्मचारी, विद्यार्थी यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला .

या कार्यक्रमास बीड चे आमदार संदिप क्षीरसागर, आ संजय दौड ,जिल्हाधिकारी आर एस जगताप यांच्यासह अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते .पालकमंत्री मुंडे यांनी ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस दलाची सलामी स्वीकारली .

Monday, January 25, 2021

रंगात रंगला तिरंगा... छोट्या चिरमुरड्यात देश भक्तीची भावना.

 

परळी वैजनाथ  : भारताचा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला साजरा होत असून या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी तयारी सुरू असतांनाच लहान मुलेही देशभक्तीच्या रंगात नान्हून निघाले आहेत. परळी येथील नांदुरवेस गल्लीतील चि.रविशंकर सुरेश बुद्रे या चिमुरड्याने आपल्या चेहऱ्यावर भारताचा तिरंगा ध्वज साकारला आहे.त्याच्या या देशभक्तीतीला कांतीकारी साथी  न्युज चा सलाम. 

सरपंच पदाचे आरक्षण घोषित करण्याची तारीख जाहीर.नवनिर्वाचित सदस्यांकडे विशेष लक्ष.


(कांतीकारी साथी न्यूज)

बीड जिल्ह्यासह राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. मात्र सरपंच पदाच आरक्षण जाहीर झालेले नसल्याने या निवडणुकीत रंगत तर आलीच मात्र राजकीय पक्षाच्या दावेदारी वरून रस्सीखेच देखील पाहायला मिळाली. मात्र आता सरपंच पदाचं आरक्षण 3 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार असे घोषित होताच राजकीय पक्षांनी नवनिर्वाचित सदस्यांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. 

राज्यात 2020 ते 2025 पर्यंत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीचे सरपंच पदाचे आरक्षण 15 डिसेंबर 2020 रोजी जाहीर होणार होते. मात्र राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक व निकाल जाहीर झाल्यावर सरपंच पदाच आरक्षण जाहीर होईल, असा नवा आदेश आल्याने राज्यात 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. 

या निवडणुकीचा निकाल 18 जानेवारी रोजी जाहीर झाला व राजकीय पक्षाची दावेदारी वरून रस्सीखेच सुरू झाली. पण आता 3 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर होणाऱ्या सरपंच पदाच्या आरक्षणानंतर प्रत्येक राजकीय पक्षाची ताकद दिसणार आहे.

यासाठी राजकीय पक्षानी नवनिर्वाचित सदस्यांवर करडी नजर ठेवत राजकीय गतीविधींना जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थावर कुणाचं वर्चस्व राहणार? हे लवकरच पाहायला मिळणार असल्याने सर्वत्र आरक्षणाची उत्सुकता वाढली असल्याचे दिसून येत आहे. गावाच्या विकास होण्याची  बोलीभाषा करतांना दिसत आहे

Sunday, January 24, 2021

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न परळी कार्यकारीणी जाहिर.



* तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे, शहराध्यक्ष जगदीश शिंदे तर कार्याध्यक्षपदी अनंत कुलकर्णी यांची निवड.

परळी वैजनाथ  : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या परळी शाखेची नुतन कार्यकारीणी निवडण्यासाठी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत सर्वानुमते नविन कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी दै.मराठवाडा साथीचे वृत्तसंपादक दत्तात्रय काळे, तर शहराध्यक्षपदी दै.गावकरीचे तालुका प्रतिनिधी जगदीश शिंदे तर दै.झुंजार नेताचे तालुका प्रतिनिधी अनंत कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. तालुका सचिवपदी स्वानंद पाटील तर शहर सचिवपदी प्रा.प्रविण फुटके यांची निवड करण्यात आली. निवडीची सर्व प्रक्रिया समन्वयक धनंजय आरबुने यांनी पार पाडली.

साथी सभागृह येथे आज दि.२४ रोजी अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे व जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर व जिल्हा कार्यकारीणीच्या मार्गदर्शनाखाली परळी शाखेची नविन कार्यकारीणी निवडण्यासाठी बैठक घेण्यात आली. संपादक सतिष बियाणी, संपादक राजेश साबणे, जेष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे, प्रशांत प्र.जोशी, संपादक आत्मलिंग शेटे, मोहन व्हावळे, ओमप्रकाश बुरांडे, प्रा.रविंद्र जोशी, प्रकाश चव्हाण,बालासाहेब फड, विश्वास महाराज पांडे, नरसिंग अन्नलदास आदी जेष्ठांच्या प्रमुख उपस्थितीत या निवडी झाल्या. 

 नविन कार्यकारीणी पुढील प्रमाणे आहे.  तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे, शहराध्यक्ष जगदीश शिंदे, कार्याध्यक्ष अनंत कुलकर्णी, तालुका सचिव स्वानंद पाटील, शहर सचिव प्रा.प्रविण फुटके, तालुका उपाध्यक्ष मिलिंद चोपडे, दिगंबर देशमुख, कोषाध्यक्ष बालकिशन सोनी, संघटक श्रीराम लांडगे, सोशल मीडिया सेल महादेव शिंदे, संभाजी मुंडे, कायदेशिर सल्लागार ॲड.आर.व्ही.गित्ते, ॲड.पी.एम.साताई, वैद्यकीय कक्ष प्रमुख डॉ.राजाराम मुंडे यांची निवड करण्यात आली. उर्वरित पदांची निवड लवकरच करण्यात येणार आहे. नवविर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नविन पदाधिकाऱ्यांचे अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्थ एस.एम.देशमुख व सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. या बैठकीस अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Saturday, January 23, 2021

राष्ट्रवादी युवा नेते अभिजीत कुडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये असंख्य युवकांचा जाहीर प्रवेश.

 
वरोरा ( प्रतिनीधी) वरोरा तालुका मध्ये उखर्डा येथील युवकांचा प्रवेश घेण्यात आला राजमाता अहिल्याबाई होळकर यंग ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष सूरज उरकुडे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्या सोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केला ,अभिजित कुडे यांनी युवकांना मार्गदर्शन केले तालुक्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची शाखा स्थापन करायची आहे असे सांगितले , “गावं तिथे राष्ट्रवादी” अभियान अंतर्गत प्रत्येक गावात राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची शाखा स्थापन करण्यात येणार आहे .या वेळी तालुका उपाध्यक्ष अभिजित कुडे, न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था चे सचिव रोशन भोयर, विजय कुडे, विनोद कोठारे, ऋषिकेश कुडे , प्रमोद कुडे, नगाजी पाचभाई, साहिल पानतावणे, राहूल डोमकावडे , राहूल कुडे, स्वप्नील कुडे, हनुमान नखाते, सोपान कुडे, सचिन कुडे, प्रशांत उरकुडे, शुभम उरकुडे, तुषार ऊरकुडे , निखिल पाचभाई, ऋषिकेश विताडे, जुबेर शेख , योगेश पुसदेकर व राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते,

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटक.२५ टक्के जागांवर इंग्रजी शाळेतील मोफत प्रवेशप्रक्रियेला सुरूवात सन २०२१-२२ संभाव्य वेळापत्रक जाहीर.


* ९ फेब्रुवारी पासून पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार. 



बीड (प्रतिनिधी) शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागांवर इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा ९ फेब्रुवरी पासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. तेव्हा पालकांनी जागृत पणे प्रवेश प्रक्रिया समजून घेऊन आपल्या पाल्याचे अर्ज दी.९ फेब्रुवारी पासून ऑनलाईन पद्धतीने दाखल करावेत असे आवाहन शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केले आहे.
             जिल्ह्यामध्ये शैक्षणीक वर्ष २०२१-२२ या वर्षाकरीता बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत गोरगरिब व गरजु विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची तरतुद केलेली आहे. या कायद्यानुसार खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा (अल्पसंख्याक शाळा वगळून) एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागावर आर्थिक दुर्बल व वंचीत घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे . दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ पासुन या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी २१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी पर्यंत आरटीई  प्रवेशपात्र सन २०२०-२१ च्या Auto Forward केलेल्या शाळांचे आणि नविन शाळांची नोंदणी केलेल्या शाळांचे गटशिक्षाधिकारी यांनी Verification करण्याची प्रक्रिया करण्यात येईल .
              समजतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील गोर - गरीब विद्यार्थ्यांना श्रीमंताच्या मुलांच्या बरोबरीने चांगले शिक्षण मिळावे आणि शिक्षणातील विषमता दूर व्हावी यासाठी आपण मागील सात वर्षा पासून सातत्याने प्रयत्न करत आहोत. मात्र या योजनेत काही अपात्र पालक खोटे कागदपत्र दाखल करत आपल्या पाल्याचे मोफत प्रवेश करून या योजनेत मोठ्या प्रमाणात गैर प्रकार करत आहेत. असे प्रवेश करणाऱ्या पालकांना शिक्षण विभागाने आळा घालत कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. जेणे करून गोर - गरिबांच्या प्रवेशावर हे लोक डल्ला मारणार नाहीत. तसेच या प्रक्रिये अंतर्गत इंग्रजी शाळेत मोफत प्रवेशाचा लाभ घेण्यासाठी पालकांनी आपण राहत असलेल्या भागातील किंवा परिसरातील शाळांची निवड करत ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावेत. ज्या पालकांना आरटीई अंतर्गत आपल्या पाल्यांचे अर्ज दाखल करण्यास मार्गदर्शन अथवा समस्या असल्यास पालकांनी अधिक माहितीसाठी ८१४९५ ९२००५ या क्रमांकार संपर्क साधावा असे मनोज जाधव यांनी म्हंटले आहे . 


*आरटीई प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्र.*

१)आरटीई प्रवेशपात्र सन २०२०-२१ च्या Auto Forward केलेल्या शाळांचे आणि नविन शाळांची नोंदणी केलेल्या शाळांचे BEO यांनी Verification करणे . दिनांक - २१/०१/२०२१ ते ८/०२/२०२१

२)पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे. दिनांक - ०९/०२/२०२१ ते २६/०२/२०२१

३)सोडत ( Lottery ) काढणे. दिनांक - ०५/०३/२०२१ ते ०६/०३/२०२१

४)लॉटरीद्वारा प्रवेश मिळालेल्या निवड यादीतील ( Selection List ) पालकांनी विहीत मुदतीत BEO कडे जावून कागदपत्रांची पडताळणी करणे आणि शाळेत जावून प्रवेश निश्चित करणे .दिनांक - ०९/०३/२०२१ ते २६/०३/२०२१

५)प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे . टप्पा - १
दिनांक - २७/०३/२०२१ ते ०६/०४/२०२१

 ६)प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे . टप्पा - २
दिनांक - १२/०४/२०२१ ते १९/०४/२०२१

 ७)प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे . टप्पा - ३ 
दिनांक - २६/०४/२०२१ ते ०३/०५/२०२१

 ८)प्रतिक्षा यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे . टप्पा - ३
दिनांक - १०/०५/२०२१ ते १५/०५/२०२१





*प्रवेशासाठी खालील विद्यार्थी पात्र ठरू शकतात*

 १ ) ज्या बालकांचे वय ५ वर्ष ११ महिने ते ७ वर्षे २ महिने आहे . २ ) खुल्या प्रवर्गातील ज्या पालकांचे वार्षीक उत्तपन्न १ लाखापेक्षा कमी आहे . ३ ) एसी / एसटी प्रवर्गातील विद्यार्थी . ४ ) दिव्यांग बालके ,अनाथ बालके , विधवा महिलांची बालके , घटस्फोटित महिलांचे बालके वरील सर्व या योजनेसाठी अर्ज करू शकतात .



*प्रवेशप्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे*

*रहिवासी प्रमाणपत्र , आधारकार्ड , मतदानकार्ड , वीजबिल , टेलिफोन बिल , घरपट्टी , वाहन परवाना  वरीलपैकी कोणतेही ओळखपत्र नसल्यास आणि भाड्याने राहत असल्यास नोंदणीकृत करारनामा यापैकी कोणतेही एक . 

*जातीचे प्रमाणपत्र ( वडिलांचे ) : तहसीलदार , उपजिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र . 

*कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला : तहसीलदार , नायब तहसीलदार दर्जापेक्षा कमी नसलेल्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र

*जन्माचा दाखला : ग्रामपंचायत , नगरपरिषद यांचा दाखला , एनएम रजिस्टरमधील दाखला , अंगणवाडी , बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला , आई , वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञपत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन . 

*घटस्फोटित महिला : न्यायालयाचा निर्णय प्रत , घटस्फोटित महिलेचा / बालकांचा आईच्या रहिवासाचा पुरावा , बालक वंचित गटातील असल्यास बालकाची किंवा त्याच्या वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला .

न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला : घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा , घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा / बालकाचा आईचा रहिवासी पुरावा . बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांच्या जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला . 

*विधवा महिला : पतीचे मृत्यू प्रमाणपत्र ,
 विधवा महिलेचा , बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा . बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला .

* अनाथ बालके : अनाथ बालकाच्या बाबतीत अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरली जातील . जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र ग्राह्य धरले जाईल .

*दिव्यांग बालक: जर बालक दिव्यांग असेल तर जिल्हा शल्यचिकित्सक , वैद्यकीय अधीक्षक , अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र .
Attachments area

हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण.

*ज्येष्ठ नेते शरद पवार, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती.

मुंबई, दि. २३ : फोर्ट येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात आज हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी श्रीमती रश्मी ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. निलम गोऱ्हे, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उद्योग मंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, मुंबई आयुक्त इक्बालसिंह चहल, अमित ठाकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. पुतळ्याचे शिल्पकार शशिकांत वडके, वास्तुविशारद रोहन चव्हाण, सल्लागार भुपाल रामनाथकर, अभियंता प्रदीप ठाकरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय दिवस आहे. हा कायम लक्षात राहण्यासारखा क्षण आहे. शिवसेनाप्रमुख मोठे मार्गदर्शक होते. शिवसेनाप्रमुखांचे मार्गदर्शन कायम फायदेशीर ठरणार आहे. शिवसेनाप्रमुखांचे सर्व पक्षातील नेत्यांसोबत ऋणानुबंध होते. आज या समारंभासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले, त्याचा आनंद होत आहे, असे ते म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांच्या या पुतळ्याची उभारणी प्रबोधन प्रकाशनच्या वतीने करण्यात आली आहे. पुतळा ९ फूट उंच असून बाराशे किलो ब्राँझपासून बनविण्यात आला आहे. पुतळा दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर बसविण्यात आला आहे.

00000

Friday, January 22, 2021

परळी नगर परिषद विषय समिती सभापती निवड संपन्न .



* निवडीत नव्या चेहर्यांना संधी स्वच्छता मिस्कीन,बांधकाम आडेपवार,पाणी पुरवठा मुंडे,शिक्षण आंधळे तर महिला बाल कल्याण सभापती शिंदे.

परळी वैजनाथ ;- (प्रतिनीधी) परळी नगरपालिकेच्या आज झालेल्या विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नव्या चेहर्यांना संधी दिली असुन एक वर्षाच्या खंडानंतर शिक्षण सभापती पदाची जबाबदारी गोपाळ आंधळे यांच्याकडे देण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे पीठासन अधिकारी म्हणुन उपस्थित असलेल्या या विशेष बैठकीत सभापतीची निवड करण्यात आली.परळी नगरपालिकेत सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे वर्चस्व असल्याने व नगरपालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येवुन ठेपल्याने आजच्या सभापती निवडीत धनंजय मुंडे हे कुणाला संधी देतात याकडे लक्ष लागले होते आज झालेल्या या निवड प्रक्रियेत न.प.गटनेते वाल्मीक कराड यांच्या उपस्थितीत सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले.प्रत्येक सभापती पदासाठी एकच अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध पार पडल्या.आज झालेल्या या निवडीमध्ये
स्वच्छता सभापतीपदी अन्वर मिस्कीन,पाणी पुरवठा सभापतीपदी उर्मिला गोविंद मुंडे,बांधकाम सभापतीपदी अन्नपुर्णा आडेपवार
महिला व बालकल्याण सभापतीपदी गंगासागर शिंदे तर
शिक्षण सभापतीपदी गोपाळ आंधळे यांची निवड करण्यात आली.

Thursday, January 21, 2021

बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्या पथकाची कारवाई . अंबाजोगाईत जुगार अड्ड्यावर छापा.


* नगदी साडेसात लाख रुपयांसह १८ लाख ५९ हजाराचा ऐवज जप्त

२७ जुगार्‍यांना घेतले ताब्या, अंबाजोगाई शहरासह राज्यभरातून जुगारी आले होते खेळायला.


अंबाजोगाई (प्रतिनीधी )- जिल्हा पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी हरकतमध्ये आल्याचे दिसून येत असून अंबाजोगाई शहरात सुरू असलेल्या झन्नामन्ना जुगार अड्‌ड्यावर एसपींच्या पथकाने छापा मारून नगदी रोख ७ लाख ५७ हजार रुपये जप्त करून जुगार्‍यांच्या तब्बल ११ मोटारसायकली आणि अन्य ऐवज असा एकूण १८ लाखांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. २७ जुगार्‍यांना जेरबंद करण्यात आले असून सदरची कारवाई मोरवाडी शिवारातील शेतात करण्यात आली. तीन टेबलवर प्रत्येकी ९ जुगारी झन्नामन्ना जुगार खेळताना आढळून आले.
अंबाजोगाई शहरात अवैध धंदे सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे विशेष पथक अंबाजोगाईत पाठवले. अंबाजोगाई-लातूर रोडवरील मोरेवाडी शिवारात झन्नामन्ना जुगार सुरू असल्याची माहिती या पथकाला मिळताच रात्री साडेनऊ वाजता पथकाने तिथे धाड मारली. या वेळी तीन टेबलवरील २७ जुगार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी त्यांच्या ११ मोटारसायकली आणि एक चारचाकी वाहनही जप्त केले तर नगदी ७ लाख ५७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य मोबाईल असा एकूण १८ लाख ५९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जुगार्‍यांमध्ये नासेर खान शेरखान, सतीश धोंडीराम चामनर, दत्ता गोविंदराव साखरे, विशाल पंडीतराव चाटे, सय्यद सुल्तान सय्यद दस्तगीर, सचिन बालासाहेब गुळभिले, वाहेद बेग खलील बेग, आनंद जगन्नाथ कदम, पुरुषोत्तम संजय कदम, अक्षय विश्वांभर काळे, निलेश अशोक फड, अहमद इब्राहिम बागवान, अमोल दिलीपराव लोमटे, नितीन उर्फ तुळशीराम पांडुरंग यादव, राम बली निसार, नितेश मधुकर वैद्य, ज्ञानेश्‍वर ऊर्फ माऊली नारायणराव पतंगे, भगवान विठोबा वैद्य, नितीन कैलास साठे, राहूल भगवानराव रेणापुरे, सय्यद इलाही पाशा, देवीदास काशीनाथ चौघुले, गोविंद राजाभाऊ शेप, एजाज शेख फरहाद, अनिल मुकुंदराव पिसाळ, भैरोनाथ सिद्धराम घोगरे, प्रमोद सिद्धराम आप्पा पोखरकर, अशी २७ जुगार्‍यांची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख एपीआय विलास हजारे, आरसीपीचे पो.ना. राऊत, पो.कॉ. बास्टेवाड, मोरे, इनामदार, कोलगवाड, तौर यांनी केली.

ना.धनंजय मुंडेंची परळी उपजिल्हा रुग्णालयास नवसंजीवनी.मुंडेंच्या प्रयत्नातून अद्ययावत एक्स-रे मशीन दाखल.तर ईसीजी मशीन येत्या दोन दिवसात येणार.


परळी वैजनाथ -- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीकरांना दिलेला शब्द पाळला असून, परळी उपजिल्हा रुग्णालयात ना. मुंडेंच्या प्रयत्नातून एचडीएफसी बँकेच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर फंड) माध्यमातून अद्ययावत 100 एमए एक्स-रे मशीन आज (बुधवार) दाखल झाली आहे. तर अद्ययावत ईसीजी मशीन येत्या दोन दिवसात दाखल होणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून परळी आणि परिसरातील सामान्य नागरिकांचे विविध तपासण्यांसाठी सुरू असलेले हाल आता थांबणार आहेत.
धनंजय मुंडे यांनी कोव्हिड विषाणू संसर्गाच्या सुरुवातीपासूनच बीड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थापनास बळकटी देण्यासाठी महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. कोव्हिड अलगिकरण कक्ष, पीपीई किट आदी विविध सामग्री खरेदी, यांसह जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात व्हेंटिलेटर्स उपलब्धी, एमआर आय मशीन, कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळा, प्लाझ्मा थेरपी यंत्रणा आदी विविध आरोग्यविषयक बाबी तातडीने उभ्या करून जिल्ह्यातील जनतेला आरोग्य संजीवनी मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत, तसेच कुठेही निधीची कमतरता भासू दिली नाही. 
परळी येथील उपजिल्हा रुग्णालयातील एक्स-रे मशीन गेल्या अनेक दिवसांपासून मृत अवस्थेत होती, तीच परिस्थिती ईसीजी मशीनची देखील होती. सामान्य नागरिकांना अगदी हाताच्या बोटांचा एक्स-रे जरी काढायचा म्हटलं तर खाजगी रुग्णालयात 400 ते 600 रुपये मोजावे लागतात. मात्र आता हा त्रास कायमचा बंद होणार आहे. 

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी उपजिल्हा रुग्णालयास एचडीएफसी बँकेने त्यांच्याकडील सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर फंड) वापरून एक्स-रे व ईसीजी मशीन उपलब्ध करून दिली आहे. एक्स-रे मशीन आज परळीत दाखल झाली असून, ती येत्या दोन दिवसात कार्यान्वित करण्यात येईल, तर इसीजी मशीन येत्या दोन दिवसात रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुर्मे यांनी दिली आहे; तसेच या दोनही अद्ययावत उपकरणांसाठी डॉ. कुर्मे व समस्त उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने ना. धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

एप्रिल मे मध्ये होणार दहावी,बारावीच्या परीक्षा !


मुंबई – कोरोनाच्या संकटात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना झालेला त्रास लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने मार्चमध्ये होणाऱ्या वार्षिक परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात येणार आहेत,शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली .

इयत्ता १२ वी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ या दरम्यान घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर केला जाईल”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. तर इयत्ता १० वीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ च्या दरम्यान घेतली जाणार आहे. तर या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे

Tuesday, January 19, 2021

पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी यांना मातृशोक.आदर्श मुख्याध्यापिका जगदेवी स्वामी यांचे दुःखद निधन.

 बीड (प्रतिनिधी)  माजी आदर्श मुख्याध्यापिका श्रीमती जगदेवी विवेक स्वामी यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 69 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांनी आपल्या राहत्या घरी दिनांक 19 जानेवारी रोजी सकाळी 6:30 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी येळंबघाट येथे आज दुपारी 1 वाजता शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एक मनमिळावू आणि आदर्श, कर्तव्यनिष्ठ शिक्षिका म्हणून त्या सुपरिचित होत्या. त्या शिवाजी विद्यालयातील शिक्षक विकास स्वामी आणि पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या आई होत्या. 
 मूळ लातूर येथील रहिवासी असलेल्या जगदेवी विवेक स्वामी या विवाह नंतर बीड तालुक्यातील येळंबघाट येथील रहिवासी झाल्या. लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्याने लग्नानंतर सुद्धा त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 1970 साली दहावी आणि पुढे 1975 मध्ये डीएड शिक्षण नेकनूर येथे पूर्ण केले. येळंबघाट येथील त्या पहिल्या महिला शिक्षीका ठरल्या.त्यानंतर मागे वळून न पाहता त्यांनी शैक्षणिक कार्यात स्वतःला झोकून दिले. संस्कार विद्यालय बीड येथे त्या पहिल्यांदा शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर बीड जिल्हा परिषद अंतर्गत 30 डिसेंबर 1976 रोजी त्यांनी जिल्हा परिषद गर्ल्स केंद्रीय प्राथमिक शाळा तलवाडा, तालुका गेवराई येथे पहिल्यांदा जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून शासन सेवेत रुजू झाल्या.सासरची ओढ असल्याने त्यांनी स्वतःच्या सासरी म्हणजे येळंबघाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 22 मे 1977 साली रुजू झाल्या. 1979 पर्यंत त्या येळंबघाट येथे होत्या. पुढे बीड येथील जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल कन्या शाळा येथे 1980 साली रुजू झाल्या. तब्बल 13 वर्ष 1993 पर्यंत त्यांनी जिल्हा परिषद गर्ल्स कन्या हायस्कुल बीड येथे अनेक विद्यार्थिनींना घडवले. त्यानंतर 1993 साली त्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळनेर येथे रुजू झाल्या. पाच वर्ष त्या पिंपळनेर येथे होत्या. याठिकाणी सेवेत असताना 1996 सली जिल्हा परिषदेने त्यांचा आदर्श शिक्षिका म्हणून सर्वप्रथम गौरव केला.यानंतर महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षिका म्हणून त्यांचा विशेष सन्मान केला. पिंपळनेर येथून पुढे बीड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशोक नगर येथे 1998 ते 1999 पर्यंत त्या गांधीनगर शाळेमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा मुख्याध्यापिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुढे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मांजरसुंबा येथे 1999 ते 2003 पर्यंत त्यांनी मुख्याध्यापिका म्हणून उत्कृष्ट कार्य केले. त्यानंतर 2003 मध्ये केंद्रीय प्राथमिक शाळा अजीसपुरा केंद्र अंतर्गत शिवाजीनगर प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून रुजू झाल्या. तब्बल सात वर्ष या शाळेत आदर्श मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी आपली सेवा केली.दिनांक 21 जून 2010 रोजी वयोमर्यादा नुसार त्या शिवाजी नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून सेवानिवृत्त झाल्या. सेवा निवृत्ती नंतर शांत न राहता वाचनाची आवड असल्याने त्यांनी सुखी जीवनाची शिदोरी हे पुस्तक लिहिले.हे पुस्तक वाचकांच्या पसंतीस पडल्याने त्याच्या तीन आवृत्त्या प्रकाशित करण्यात आल्या. दरवर्षी स्वतःचा वाढदिवस हा गाजतवाजत साजरा न करता त्यादिवशी 25 जून रोजी इयत्ता 10 वी आणि 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रकमेसह जगदविवेक प्रतिष्ठान'च्या माध्यमातून सन्मानपत्र,पेन, वही भेट देऊन गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडण्याची परंपरा मागील दहा वर्षापासून अखंडपणे सुरू केली. कोरोना कार्यकाळात सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांना घरी बोलावून कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये रोख रकमेसह सन्मानपत्र देऊन गौरव करण्याची परंपरा कायम जपली. दरवर्षी एका गरजवंत पीडिताला शस्त्रक्रियेसाठी पती विवेक स्वामी आदर्श मुख्याध्यापक यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ मागील सहा वर्षापासून प्रत्येकी दहा हजार रुपये रोख रकमेची मदत देऊन सामाजिक दायित्व पार पाडण्याची परंपरा सुरू केली. सातत्याने वृक्षारोपण, पुस्तक वाटप, रक्तदान अशा परंपरेला प्रोत्साहन देत सामाजिक दायित्व पार पाडण्याची परंपरा अखंडपणे जोपासली. कायम मितभाषी, सदैव हसतमुख, स्वतःचे दुःख इतरांना कधीही न सांगता केवळ सुख वाटणारी वृत्ती आणि स्वभाव यामुळे त्या ज्यांच्या ही संपर्कात आल्या त्यांच्या कायम आपल्याच झाल्या. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी पती आदर्श मुख्याध्यापक विवेक स्वामी असताना त्यांनी शिक्षक संघाच्या माध्यमातून महिलांच्या विविध प्रश्नांवर, शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर शासन दरबारी आवाज उठवण्यासाठी वेळोवेळी पतीसोबत रस्त्यावर उतरून न्याय हक्कासाठी आंदोलन करत एक कणखर शिक्षिका म्हणून संघटनेत देखील आपली वेगळी आदर्श ओळख निर्माण केली. शिक्षक संघटनेच्या पहिल्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी मान मिळवला. शेवटच्या क्षणापर्यंत कायम प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला नावाने हाक मारून गोड स्मित हास्य करत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मागील दोन महिन्यापूर्वी घरामध्ये पडण्याचे निमित्त झाले आणि अंथरुणाला धरले. डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितली असतानासुद्धा घराच्या घरात कायम फिरत स्वतःची कामे स्वतः शेवटपर्यंत शिस्तीने केली. जेवढे स्वतःला करता येईल तेवढे करायचे आपला इतरांना कोणालाही त्रास होऊ नये हे कायम जपले. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन आणि बीड जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षिका म्हणून गौरवले होते त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात आणि सामाजिक कार्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात भाऊ गौरीशंकर गणाचार्य लातूर, बहिण श्रीदेवी, मोठा मुलगा शिवाजी विद्यालयातील माध्यमिक शिक्षक विकास स्वामी आणि दैनिक समर्थ राजयोग चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई मराठवाडा विभागाचे अध्यक्ष वैभव स्वामी तसेच मुलगी आदर्श शिक्षिका वैशाली अशोक पडोळे, धर्माबाद जिल्हा नांदेड, आदर्श शिक्षिका रूपाली श्रीकांत स्वामी लातूर, जावई, नातू नातवंडे, दीर, नणंद, भावजया असा मोठा परिवार आहे. स्वामी परिवारावर कोसळलेल्या दुःखात सांय. कांतीकारी साथी मगर परिवार सहभागी आहे.

Monday, January 18, 2021

बीडमध्ये आपल्या प्रश्नासंदर्भात चर्चा करू-शिक्षणाधिकारी विक्रम सारूक.



*क्रीडा शिक्षक रामकिशन सुरवसे यांचे उपोषण मागे.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) श्री सरस्वती विद्यालयातील माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक यांचे आपल्यासोबत होणारे नेहमीचे गैरवर्तन थांबवावे तसेच सर्व शिक्षकांना न्याय द्यावा या मागणीसाठी क्रीडा शिक्षक रामकिशन सुरवसे यांनी सुरू केलेले उपोषण आज रविवार दि.17 जानेवारी रोजी रात्री 9 च्या सुमारास बीडचे शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांच्या सोबत झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर मागे घेण्यात आले आहे.
 रामकिसन सुरवसे यांनी श्री सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर शंकरराव मिसाळ यांच्या विरोधात तक्रार केली आहे. यात म्हटले आहे की, सेवा जेष्ठता क्रम डावलून मुख्याध्यापक पद मिळवले आहे, शाळेच्या वेळेत शिक्षकांना खासगी कामे लावणे, वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणे, शासनमान्य राजा कर्मचार्‍यांना नाकारणे, मयत सेवकांच्या निवृत्ती वेतनाचा अद्यापही लाभ मिळविणे, जाणीवपूर्वक सेवक व कर्मचार्‍यांचा पगार संयुक्त खात्यात जमा ठेवणे, संस्थेचा वाद न्यायालयात असतांना संचालक मंडळाच्या नावाने कर्मचार्‍यांना धमकवणे, शिक्षक व कर्मचार्‍यांना पीएफ कर्ज नाकारणे, बँकेच्या कर्जासाठी कागदपत्रे न देणे, सेवानिवृत्त शिक्षकांस विलंब लावणे व आर्थिक नुकसान करणे, मार्जितले शिक्षक वगळता इतरांना मानसिक त्रास देणे यांसह अनेक तक्रारी सुरवसे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केल्या आहेत. 
क्रीडा शिक्षक रामकिशन सुरवसे मागील चार दिवसापासून उपोषणावर असून त्यांचे प्रकृती बिघडली होती. या उपोषणाची आज 17 जानेवारी रोजी रात्री 9 च्या सुमारास बीडचे शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांनी दखल घेवून उपोषणस्थळी सुरवसे यांच्याशी संवाद साधला. आपल्या सर्व प्रश्नांवर आपण एकत्र बसून चर्चा करूत, तुम्ही बीडला या, आपण मार्ग काढूत असे आश्वासन शिक्षणाधिकार्‍यांनी दिल्यानंतर सुरवसे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक परळी व अंबाजोगाई मतदारसंघात एकूण 12 पैकी 10 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा.


परळी वैजनाथ (प्रतिनीधी ) -: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे परळी मतदारसंघात पुन्हा एकदा एकेरी वर्चस्व सिद्ध करणारे ग्रामपंचायत निकाल हाती आले आहेत. मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायतींची या पहिल्या टप्प्यात निवडणूक होती, त्यांपैकी 10 ग्रामपंचायतीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली असून उर्वरित 2 ठिकाणी संमिश्र निकाल आले आहेत.

परळी तालुक्यातील रेवली व वंजारवाडी या दोन तर अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती, वाकडी व हनुमंतवाडी या 3 अशा एकूण 5 ग्रामपंचायती आधीच बिनविरोध निवड करण्यात धनंजय मुंडे यांना यश आलेले आहे.

त्यानंतर झालेल्या उर्वरित गावांमधील निवडणुकीत परळी तालुक्यातील लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपुर या 4 गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली असून भोपळा ही एकमात्र ग्रामपंचायत भाजपला राखण्यात यश आले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील एकूण 5 पैकी मूर्ती, वाकडी व हनुमंतवाडी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या असून अंबलवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचेच दोनही पॅनल विजयी झाले आहेत. तर दत्तपुर 7 पैकी 2 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत.

दरम्यान 12 ग्रामपंचायत निवडणुकीत 10 ग्रामपंचतींमध्ये एकहाती विजय मिळवत परळी मतदारसंघातील जनता धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे या निकालांवरून पुन्हा एकदा दिसून येत आहे.

या सर्व विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत धनंजय मुंडे यांच्या जगमित्र या संपर्क कार्यलयात विजयी जल्लोष केला असून, सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे जि. प. गटनेते अजय मुंडे यांनी हार घालून व पेढे भरवून अभिनंदन केले आहे तसेच सर्व विजयी उमेदवारांचे ना. धनंजय मुंडे, जि. प. अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, आ. संजय दौंड, वाल्मिक अण्णा कराड यांनीही अभिनंदन केले आहे.

काकांच्या बाणाने पुतण्या घायाळ. बहुतांश ग्रामपंचायतवर मा.आ.जयदत्त क्षीरसागर यांचे वर्चस्व !


facebook sharing button
twitter sharing buttonबीड –(प्रतिनीधी)  विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सर्वात मोठ्या म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत काका जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्या आ संदिप क्षीरसागर यांना चांगलीच धोबीपछाड दिली आहे .बीड आणि शिरूर तालुक्यातील 35 पैकी 21 ग्रामपंचायतवर काकांनी वर्चस्व मिळवले असून पुतण्याला अवघ्या वर्षभरातच धूळ चारली आहे .

बीड विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतच्या झालेल्या निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी निवडणुकीचे मैदान जिंकले. शिवसेनेने बीड विधानसभा मतदारसंघात अभूतपूर्व मुसंडी मारली. ग्रामिण भागात शिवसेनेचे आणि जयदत्त क्षीरसागरांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. २९ ग्रामपंचायतीपैकी २१ ग्रामपंचायतीवर भगवा डौलाने फडकला.

निडणुकीपूर्वीच बीड मतदारसंघातील ५ ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर बीड मतदारसंघात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध झाले आहे. तसेच शिरूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ४ ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. यामध्ये रायमोहा, टाकळवाडी, व्हरकटवाडी, भानकवाडी यांचा समावेश आहे.

तसेच बीड मतदारसंघात मौज, ब्रम्हगाव, मौजवाडी, मैंदा पोखरी, तिप्पटवाडी, काटवटवाडी, कारळवाडी, निर्मळवाडी, कर्जणी, कोळवाडी, गुंधा, जिरेवाडी, पिंपळगाव घाट, वासनवाडी, वंजारवाडी, गुंदावाडी, वायभटवाडी, बाळसापूर, बेलखंडी पाटोदा, वरवटी, आहेरधानोरा, मानेवाडी, भंडारवाडी या २१ ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे.

Sunday, January 17, 2021

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे Covid-19 लसीकरण मोहीम शुभारंभ .



अंबाजोगाई (प्रतिनिधी) ;-  स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे आमदार श्रीमती नमिता मुंदडा, आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शिवकन्या शिरसाठ , उपाध्यक्ष बजरंग सोनवणे,  महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे यासह विविध मान्यवर आदींच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.


ना.धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या साठी भाजप महिला मोर्चा राज्यभर आंदोलन करणार !


“सामाजिक न्यायासारखं महत्त्वाचं खातं सांभाळणाऱ्या व्यक्तीवर एका महिलेकडून झालेले आरोप पाहता मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगायला हवे होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेण्याऐवजी साधी प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली नाही त्यामुळे सोमवारपासून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे”, असे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी शुक्रवारी जाहीर केले.

“सामाजिक न्याय खात्याचं मंत्रीपद भूषविणाऱ्या व्यक्तीने आपल्या दुसऱ्या महिलेशी असलेल्या संबंधांची कबुली दिली आहे. पहिल्या पत्नीच्या संमतीनेच आपण सदर महिलेशी संबंध ठेवले. तिच्यापासून झालेल्या मुलांना आपले नाव दिले. याची कबुलीही मुंडे यांनी दिली आहे. मंत्रीपदावरील व्यक्ती अशा पद्धतीचे वर्तन करत असेल तर त्यातून समाजाला काय संदेश जातो आहे, याचा विचार करावाच लागणार आहे”, असं खापरे म्हणाले.

मुंडे यांच्याविरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धडपड रेणू शर्मा करत आहे. मुंडेंविरोधात करण्यात आलेल्या आरोपांचे स्वरुप पाहता तसंच या आरोपांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांचा राजीनामा घेणे आवश्यक होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे महिला मोर्चाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे.

“एकीकडे स्त्रीवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती सारखा कायदा आपण करतो. मात्र दुसरीकडे राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांवर महिलेवर अत्याचार केल्याची तक्रार करत आहे. या तक्रारीची कोणत्याही दबावाखाली चौकशी होऊ नये याचीही मुख्यमंत्र्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात येतील”, असेही खापरे यांनी नमूद केले आहे.

परळी तालुक्यातील 7 ग्रामपंचायतील सदस्यांची मतमोजणी उद्या होणार.57 सदस्यांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद.


परळी वैजनाथ ;- परळी तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीची निवडणूक 15 जानेवारीला पारपडली होती.या निवडणुकीची मतमोजणी सोमवार दि.18 रोजी सकाळी 10 वाजल्या पासुन तहसील कार्यालय परळी येथे केली जाणार आहे.57 सदस्यांचे भवितव्य पणाला लागले आहे.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 परळी तालुक्यातील 7 ग्रामपंचायत मतदान पारपडले होते याची मतमोजणी सोमवारी सकाळी 10 वाजल्या पासुन मतमोजणीसाठी टेबल संख्या 4 व एकूण फेऱ्या 2 असणार आहेत.मतमोजणी साठी नियुक्त कर्मचारी 16 नियुक्त करण्यात आले आहेत.
परळी तालुक्यातील मोहा, सरफराजपूर, वंजारवाडी, लाडझरी, भोपला, रेवली, गडदेवाडी या सात ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पारपडली होती. तालुक्यातील मोहा ग्रामपंचायत 11 जागांसाठी 25 उमेदवार, गडदेवाडी 7 जागांसाठी 15 उमेदवार, सरफराजपूर 7 जागांसाठी 14 उमेदवार, रेवली 9 पैकी 8 जागा बिनविरोध झाल्या असून एका जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. भोपला येथे 7 जागांसाठी 14 उमेदवार, वंजारवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे तर लाडझरीत 9 जागांसाठी 22 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.  07 ग्रामपंचायतच्या एकूण 57 जागांसाठी मतदान प्रक्रीया पारपडली होती.