नवी दिल्ली – संपूर्ण जगात कोरोनावरी लसीकरण सुरू आहे. जग लवकरच कोरोनामुक्त होईल अशी आशा असताना एक वाईट बातमी समोर येत आहे. नॉर्वेमध्ये कोरोनावरील लस टोचल्यानंतर तब्बल 23 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतांश वृद्ध रुग्णांचा स्मावेश आहे. नॉर्वेमध्ये 26 डिसेंबर 2020 पासूनच कोरोना लसीकरणास सुरूवात झाली. आतापर्यंत देशात 33 हजारहून अधिक जणांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे.
नॉर्वेमध्ये ज्या लोकांना कोरोनाची लस टोचण्यात आली होती, त्यांची अचानक तब्येत बिघडली. सरकारने दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये वृद्ध आणि आजारी रुग्णांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी लच टोचणे हे आधीच धोकादायक होते असे सरकारने म्हटले आहे.
No comments:
Post a Comment