* वीज बिल ग्राहकांनी आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मेळाव्याचा लाभ घ्यावा ..प्रशांत अंबाडकर.
परळी वैजनाथ ;- लॉक डाऊन च्या काळात परळी तालुक्यातील काही वीज बिल ग्राहकांना अव्वा चे सव्वा वीज बिल आल्याने नागरिक जाम वैतागून गेले होते,
जो तो आपल्याला आलेल्या वाढीव बिलाची तक्रार घेऊन परळी विभागीय कार्यालयात चक्रा मारत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि जेवढी मीटर रिडींग असेल त्या प्रमाणे बील दुरुस्ती साठी जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशावरून अधिक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनावरून परळी उपविभागांतर्गत उद्या दि 6,7, 8 तारखे पर्यंत वीज बिल दुरुस्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या वीजबिल ग्राहकांना जास्थिचे बील आले असेल अथवा वीजबिला संबंधी कोणती तक्रार असेल त्यांच्यासाठी उद्या परळी विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आलेल्या तक्रारींचे जागीच निवारण करण्यासाठी संबंधित बिलविभागाचे कर्मचारी तसेच विभागीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार असून या मेळाव्याचा जास्तीत जास्त वीज बिल ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आव्हान परळी उपविभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर यानी वीज बिल ग्राहकास केले आहे.
No comments:
Post a Comment