२७ जुगार्यांना घेतले ताब्या, अंबाजोगाई शहरासह राज्यभरातून जुगारी आले होते खेळायला.
अंबाजोगाई (प्रतिनीधी )- जिल्हा पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी हरकतमध्ये आल्याचे दिसून येत असून अंबाजोगाई शहरात सुरू असलेल्या झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर एसपींच्या पथकाने छापा मारून नगदी रोख ७ लाख ५७ हजार रुपये जप्त करून जुगार्यांच्या तब्बल ११ मोटारसायकली आणि अन्य ऐवज असा एकूण १८ लाखांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. २७ जुगार्यांना जेरबंद करण्यात आले असून सदरची कारवाई मोरवाडी शिवारातील शेतात करण्यात आली. तीन टेबलवर प्रत्येकी ९ जुगारी झन्नामन्ना जुगार खेळताना आढळून आले.
अंबाजोगाई शहरात अवैध धंदे सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे विशेष पथक अंबाजोगाईत पाठवले. अंबाजोगाई-लातूर रोडवरील मोरेवाडी शिवारात झन्नामन्ना जुगार सुरू असल्याची माहिती या पथकाला मिळताच रात्री साडेनऊ वाजता पथकाने तिथे धाड मारली. या वेळी तीन टेबलवरील २७ जुगार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी त्यांच्या ११ मोटारसायकली आणि एक चारचाकी वाहनही जप्त केले तर नगदी ७ लाख ५७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य मोबाईल असा एकूण १८ लाख ५९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जुगार्यांमध्ये नासेर खान शेरखान, सतीश धोंडीराम चामनर, दत्ता गोविंदराव साखरे, विशाल पंडीतराव चाटे, सय्यद सुल्तान सय्यद दस्तगीर, सचिन बालासाहेब गुळभिले, वाहेद बेग खलील बेग, आनंद जगन्नाथ कदम, पुरुषोत्तम संजय कदम, अक्षय विश्वांभर काळे, निलेश अशोक फड, अहमद इब्राहिम बागवान, अमोल दिलीपराव लोमटे, नितीन उर्फ तुळशीराम पांडुरंग यादव, राम बली निसार, नितेश मधुकर वैद्य, ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली नारायणराव पतंगे, भगवान विठोबा वैद्य, नितीन कैलास साठे, राहूल भगवानराव रेणापुरे, सय्यद इलाही पाशा, देवीदास काशीनाथ चौघुले, गोविंद राजाभाऊ शेप, एजाज शेख फरहाद, अनिल मुकुंदराव पिसाळ, भैरोनाथ सिद्धराम घोगरे, प्रमोद सिद्धराम आप्पा पोखरकर, अशी २७ जुगार्यांची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख एपीआय विलास हजारे, आरसीपीचे पो.ना. राऊत, पो.कॉ. बास्टेवाड, मोरे, इनामदार, कोलगवाड, तौर यांनी केली.

No comments:
Post a Comment