परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी नगर परिषदेच्या विषय समिती सभापती आणि स्थायी समितीच्या सदस्य निवडीसाठी शुक्रवार दिनांक 22 जानेवारी रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथून या बैठकीबाबत असे सुचनापञ न.प.सदस्यांना पाठविण्यात आले आहेत.
परळी नगर परिषदेच्या विषय समिती सभापती आणि स्थायी समिती सभापतींच्या सदस्यांची निवड करण्यासाठी 22 जानेवारी रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. याकरिता सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेपर्यंत सभापतीपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. गरज पडल्यास दुपारी 12 वाजता मतदान होऊन स्थायी समिती सदस्य आणि विषय समिती सभापतींची निवड होऊन ती घोषित केली जाईल नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असल्याने सभापतींच्या निवडी केवळ औपचारिक असून याबाबतची घोषणा गटनेते यांच्या माध्यमातून अधिकृतपणे केली जाऊ शकते उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह सदरची विशेष सभा होणार आहे. सभापतीपदासाठी एकच अर्ज प्रत्येक विषय समितीसाठी आला तर त्याबाबतची घोषणा या बैठकीतच होऊ शकते.
No comments:
Post a Comment