Monday, January 11, 2021

सावधान ! बीड जिल्ह्यातील कावळ्यांना बर्ड फ्ल्यू !


facebook sharing button
बीड - (प्रतिनीधी)  जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात मुगगाव येथे मृतावस्थेत आढळून आलेल्या कावळ्यांना बर्ड फ्ल्यू ची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे .महाराष्ट्रातील मुंबई,ठाणे,दापोली ,परभणी आणि बीड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू असल्याचे समोर आले आहे .

देशात बर्ड फ्ल्यू ची लागण झाल्याच्या बातम्या काही दिवसापासून येत होत्या,दरम्यान गेल्या दोन तीन दिवसात जिल्ह्यातील विविध भागात काही कावळे मृतावस्थेत आढळून आले होते,मुगगाव येथे 22 कावळे सापडल्याने त्यांची तपासणी केली असता त्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचा अहवाल समोर आला आहे .

केंद्र सरकारच्या अहवालानुसार महाराष्ट्रात पाच ठिकाणी बर्ड फ्ल्यू ची लागण झाल्याने पक्षी मरण पावल्याचे या अहवालात म्हटले आहे,त्यामुळे बीड करांनी काळजी घेण्याची गरज आहे 

No comments:

Post a Comment