
कांतीकारी साथी (प्रतिनिधी)
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेले राज्य परिवहन महामंडळ आपल्या कर्मचार्यांसाठी निर्दयी वागणुक ठेवत असल्याचे चित्र स्पष्ट होत असुन अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल कर्मचाऱ्याची चक्क 5 वर्षाची वेतनवाढ रोखण्याची धक्कादायक कामगिरी चंद्रपूर विभागात उघडकीस आली असुन संबंधित सक्षम प्राधिकारी शिक्षा ठोठावत असताना भेदभाव करीत असल्याचा गंभीर आरोप केल्या जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर विभागातील एका आगारात कार्यरत असलेल्या संबंधित चालक वाहक पदावर कार्यरत कर्मचाऱ्याने वाहक म्हणुन कर्तव्य बजावत असताना नजर चुकीने 1 प्रवाशांचे तिकीट व तिकिटाचे पैसे घेतले नाही.
दरम्यान सदर बसच्या तपासणीत हे प्रवासी विनातिकिट आढळून आल्याने सदर वाहकाची विभागीय चौकशी करून त्याची 5 वर्षांची वेतनवाढ रोखण्याचा धक्कादायक निर्णय सक्षम प्राधिकारी ह्यांनी घेऊन तसा आदेश निर्गमित केला.
वस्तुतः जर वाहकाने पैसे घेऊनही तिकीट दिले नसेल तर तो भ्रष्टाचार ठरेल त्यामुळे महामंडळाचे जाणूनबुजून नुकसान करणे हा उद्देश स्पष्ट होतो. परंतु ह्या घटनेतील वाहकाने नजरचुकीने तिकीट दिले नसेल तर त्या कर्मचाऱ्यावर हयगय केल्याबद्दल इतर शिक्षा ठोठावण्यात यायला हवी होती. त्याचप्रमाणे एकाच गुन्ह्यात दोन शिक्षा होण्याचा प्रकार सिद्ध होत असुन प्रवासी तसेच कर्मचारी दोघेही शिक्षा भोगत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येत आहे. ज्या प्रवाश्याने तिकीट घेतले नाही त्याला तिकिटाची रक्कम व त्यावरील दंड भरावा लागतो ह्याचा अर्थ महामंडळाचे आर्थिक नुकसान भरून निघाले असे असुनही थोड्या चुकीसाठी कर्मचाऱ्याची 5 वर्षाची वेतनवाढ रोखणे म्हणजे त्या कर्मचाऱ्याचे जबर आर्थिक शोषण होत असुन कर्मचाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची जाणीव ठेवण्याची गरज आहे.
पूर्वसूचना दिल्याशिवाय अचानक संप पुकारून महामंडळाचे नुकसान करणे तसेच महामंडळाची प्रतिमा मलिन करणे होय आरोपातील कर्मचार्यांना 1 वर्षाची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा देणे व नजरचुकीने तिकीट देण्यात आले नाही म्हणुन थेट 5 वर्षांची वेतनवाढ रोखणे सक्षम प्राधिकारी असलेल्या अधिकाऱ्यांची मनमानी असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हंटले आहे.
"* महामंडळाकडून आलेल्या नियम अटींच्या अधीन राहुन शिक्षा करण्यात येते परंतु जर कर्मचारी निर्दोष असेल व त्याने महामंडळाचे नुकसान करण्याच्या उद्देशाने केलेली कृती नसेल तर नक्कीच विचार केल्या जाईल.
राजेंद्र पाटील
विभागीय नियंत्रक, चंद्रपूर विभाग "*
खुप जुलमी शिक्षा होत आहेत, एसटी च्या अधिकारी लोकां पेक्षा इंग्रज अधिकारी परवडले पण एकच 50/2019 हे परिपत्रक रद्द व्हायला हवे.
ReplyDeleteएसटी चा नियम आहे गाडीत चढत क्षणी पाहिले काम तिकीट घेणे हे तरी सुद्धा वाहक प्रत्यक्ष प्रवापशी आसनावर बसलेल्या ठिकाणी जाऊन तिकीट घेतो तरी सुद्धा काही प्रवाशी तिकीट घेण्याचे जाणून बूजून टाळतात प्रवाशांना चोरी करून सुद्धा सोडलं जात आणि वाहकाला आरोपी म्हणून शिक्षा दिली जाते
ReplyDeleteमहाराष्ट्र राज्य महामार्ग परीवहन महामंडळात शिक्षेची नियमावली नाही हे सरळ सरळ दिसुन येते अधिकारी अधीकार चा गैरवापर करतात त्यांच्यांवर कोणतेही बंधन नाही हे खुप अन्याय कारक आहे.
ReplyDeleteहि शिक्षा आधिकारी लोकासाठी हवी
ReplyDelete