Sunday, January 10, 2021

कार्यकाळ संपलेल्या काही सहकारी संस्थांच्या निवडणूक 31 मार्च पर्यंत लांबणीवर.

राज्यातील मुदत संपलेल्या काही सहकारी संस्थांच्या निवडणूकांना मंत्रीमंडळाने  31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

राज्यातील मुदत संपलेल्या काही सहकारी संस्थांच्या निवडणूका या महिन्यात होतील असं वाटत असतानाच, सहकारी संस्थांच्या निवडणूका लांबवणीवर टाकल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

कोरोनाची परिस्थिती पाहता मंत्रीमंडळानं हा निर्णय घेतलाय 31 मार्च 2021 पर्यंत ही मुदतवाढ असणार आहे.
मात्र न्यायालयाचे निर्देशानुसार घेतल्या जात असलेल्या *मोठ्या सहकारी बँका व सहकारी साखर कारखान्यांच्या* निवडणूका ठरल्याप्रमाणे होतील असे ही श्री.पाटील यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment