Sunday, April 30, 2023

छ.शिवाजी महाराज कामगार सेनेच्या पाठपुरावामुळे नवी मुंबई महानगर पालिके च्या घंटागाडी कामगारांना मिळाला थकीत पगार.


नवी मुंबई (प्रतिनिधी)  छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेच्या पाठपुरावामुळे नवी मुंबई महानगर पालिकेच्या घंटागाडी कामगारांना त्यांचा थकीत पगार मिळाला आहे. यासाठी सर्व कामगारांनी युनियनचे अध्यक्ष संजय पवार आणि नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दिनेश ठाकूर यांचे आभार मानले.
नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी पद्दतीने काम करणाऱ्या काही घंटागाडी कामगारांचे पगार कंत्राटदाराने गेल्या तीन महिन्यांपासून थकवले होते. यामुळे या कामगारांना आर्थिक चणचण भासत होती. याबाबत त्यांनी कंत्राटदार आणि प्रशासनाकडे दाद मागितली मात्र त्यांच्या दादला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कामगार सेनेचे अध्यक्ष संजय पवार यांच्याकडे आपली कैफियत मांडली. संजय पवार यांनी संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दिनेश ठाकूर यांना या कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दिनेश ठाकूर यांनी संबंधित कंत्राटदार आणि पालिका प्रशासनासोबत चर्चा आणि पाठपुरवठा सुरु केला. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून कंत्राटदाराने या कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे दिले आहेत. याबद्दल या कामगारांनी युनियनचे अध्यक्ष संजय पवार आणि नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दिनेश ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

मिरवट येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ.

*ह.भ.प.नारायण महाराज बारटक्के यांच्या ओजस्वी वाणीतून पारायणास सुरुवात. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील मौजे मिरवट येथे गुरुवार दिनांक 27 एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच कलशारोहणाच्या कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला आहे. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ प्रमुख श्री ह भ प नारायण महाराज बारटक्के यांच्या रसाळ व ओजस्वी वाणीतून होत असून गाथा भजन प्रमुख सोपान महाराज गवळी नसगाव जालना हे आहेत तसेच कलश पूजन श्री ह भ प कांतादेव महाराज वडगावकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाची सांगता बुधवार दिनांक 3 मे रोजी होणार आहे.
परळीपासून जवळच असलेल्या मौजे मिरवट येथे गुरुवार दिनांक 27 एप्रिल ते बुधवार दिनांक 3 मे दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कलशारोहणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाटे चार ते पाच काकडा आरती, सहा ते सात विष्णू सहस्त्रनाम ,सकाळी सात ते दहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 11 ते तुकाराम गाथा भजन, दुपारी दोन ते चार भावार्थ रामायण, दुपारी चार ते पाच राम कृष्ण हरी जप, सायंकाळी सहा ते सात तीस वाजता धुपारती रात्री नऊ ते 11 हरिकीर्तन तसेच बारा ते चार हरीजागर असे दैनंदिन कार्यक्रम होत आहेत.
दरम्यान 27 एप्रिल रोजी ह भ प भागवताचार्य दत्ता महाराज बोर्डीकर बोंदरगाव व शुक्रवार दिनांक 28 एप्रिल रोजी ह भ प वैराग्यमूर्ती प्रभाकर महाराज झोलकर भिसेगाव तर 29 एप्रिल रोजी ह भ प भागवताचार्य वैजनाथ महाराज थोरात वडगाव दादाहरी, 30 एप्रिल रोजी ह भ प भागवताचार्य संतोष महाराज वनवे बीड यांचे हरिजागर संपन्न झाले.  1 मे रोजी ह भ प विश्वंभर महाराज उखळीकर, दोन मे रोजी ह भ प भागवताचार्य रूपालीताई सवणे  यांचे किर्तन होणार आहे. 

बुधवार दिनांक 3 मे रोजी दुपारी बारा वाजता कलश स्थापनेचे कीर्तन ह भ प शिवाजी महाराज बोकारे पूर्णा यांचे होणार असून दुपारी एक ते तीन वाजता श्री गुरु सोपानकाका संस्थान परळी येथील ह भ प भागवताचार्य विठ्ठल महाराज उखळीकर यांचे कीर्तन होणार आहे तसेच रात्री नऊ ते अकरा वाजता ह भ प मधुकर महाराज सायाळकर यांचे कीर्तन होईल. या धार्मिक कार्यक्रमास पंचक्रोशीतील नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्य तसेच भाविक भक्तांनी या ज्ञानामृत व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई मित्र मंडळ मिरवट व समस्त गावकरी मंडळ मिरवट यांनी केले आहे.

हॉस्पिटलच्या ‘त्या’ खात्याचा गैरवापर नको वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मेडिकल कॉलेजांना सूचना.




मुंबई -(प्रतिनिधी) वैद्यकीय शिक्षण विभागाच्याअखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित रुग्णालयांत असणाऱ्या पीएलए (स्वीय प्रपंजी ) खात्यात कोट्यवधी रुपये रुग्णालयातील विविध शुल्काच्या आधारे जमा होत असतात. या खात्यातील रक्कम काही विशिष्ट कारणासाठी वापरणे अपेक्षित असते. मात्र, काही रुग्णालयांत नियमाचे पालन होत नसल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे विभागाने या खात्यातील निधी वापरण्याबाबत पहिल्यांदाच मार्गदर्शक सूचना सर्व महाविद्यालयांसाठी काढल्या आहेत. तसेच या निधीच्या खर्चाबाबत काही अनियमितता आढळल्यास कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत २३ वैद्यकीय महाविद्यालयाशी संबधित रुग्णालये आहेत. तसेच दंत वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांचा यात समावेश आहे.  या सर्व रुग्णालयांत आणि महाविद्यालयांत पीएलए खाते असते. ज्यामध्ये  महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व इतर शुल्क, सुरक्षा अनामत रक्कम,  जिमखाना शुल्क, विकास निधी, वसतिगृह शुल्क यासोबत रुग्णालयामध्ये जमा होणारे आंतररुग्ण शुल्क, बाह्यरुग्ण शुल्क, प्रयोगशाळा फी जमा होत असते. मात्र, या खात्यातील रक्कम वापरण्यासाठी वित्तीय विभागाने काही नियम आखून दिले आहेत. काही महाविद्यालयांत यांचे पालन न केल्याचे निदर्शनास आले आहे. काही वर्षांपूवी काही महाविद्यालयांच्या अधिष्ठातांनी त्यांना दिलेल्या अधिकारापेक्षा जास्त निधीचा वापर केल्याचे निदर्शनास आले होते. त्याशिवाय योग्य कारण नसतानाही निधी खर्च केला होता. या नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे या सगळ्या गोष्टींना चाप बसेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच रुग्णांचा व विद्यार्थ्यांचा पैसा योग्य कारणासाठी वापरला जाईल.

प्रत्येक महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि रुग्ण संख्येच्या क्षमतेनुसार हा निधी महिन्याकाठी किती वापरावे याचे काही निकष आहेत. काही महाविद्यालयांना महिन्याला ३० लाख ते १० लाख रुपये इतका निधी खर्च करण्याची परवानगी आहेत. मात्र, या खर्चाची अत्यंत गरज असल्यास करावा.

 या खात्यात वेतन, निवृत्ती वेतन व भत्ते या कोणत्याही रकमा या खात्यात ठेवू नये. तसेच ५००० रुपयांवरील सर्व खर्च ईसीएस किंवा एनईएफटी द्वारे करावा. तसेच हे खाते तपासणीकरिता तपासणी पथक निर्माण करण्यात आले आहे. त्यांच्याकडून वेळेच्या वेळी तपासणी करून घ्यावी. 

तसेच या खात्याचे वेळच्या वेळी  ऑडिट करून घेणे. या खात्यासंदर्भातील कुठलीही वित्तीय अनियमितता आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

नवोदयच्या परीक्षेत शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याला गुजराती पेपर बीडमध्ये धक्कादायक प्रकार.

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात नवोदय परीक्षेत जिल्हा परिषदेच्या एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे नवोदयच्या पात्रता परीक्षेला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला गुजराती माध्यमाची प्रश्नपत्रिका आल्याने गोंधळ उडाला आहे. यात पालकांनी विचारलेल्या प्रश्नावर चुकून झालं असं उत्तर शिक्षक आणि मुख्याध्यापक देत आहेत जिल्ह्यातील शिरूर कासार येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय व कालिका देवी विद्यालयात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय पात्रता परीक्षा घेण्यात आल्या. त्यात खोकर मोहा येथील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचा पात्रता परीक्षा फॉर्म भरताना शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला गुजराती माध्यमात फॉर्म भरल्याने संदीप मुळीक नावाच्या विद्यार्थ्याला गुजराती माध्यमाच्या प्रवेशपत्राबरोबर गुजराती माध्यमाची प्रश्नपत्रिका आली. विद्यार्थ्याला शिक्षकांच्या चुकीमुळे तोच पेपर सोडवावा लागल्याचा धक्कादायक प्रकार पालकांमुळे उघडकीस आला.
मुलाला गुजराती भाषेतील पेपर आल्यानं पालकांनी याबद्दल मुख्याध्यापकांकडे विचारणा केली. त्यावर मुख्याध्यापक राम वाघुंबरेंनी उलट उत्तरे दिली. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. कोणाकडे जायचे असेल तिथे जा, अशा उत्तरामुळे पालक पूर्णपणे गोंधळून गेले. गुजराती भाषेतील प्रश्नपत्रिकेमुळे विद्याथ्याचे नुकसान होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक विवंचनेत आहे ज्यावेळेस नवोदयची परीक्षा सुरुवात तिचे फॉर्म भरण्याची वेळ होती, त्यावेळेस शिक्षकांनी निष्काळजीपणा केला. फॉर्म भरताना मराठी माध्यमाऐवजी गुजराती माध्यम लिहिले. त्यामुळे विद्यार्थ्याला गुजराती भाषेतील प्रश्नपत्रिका मिळाली. गुजराती भाषा येतच नसल्याने विद्यार्थ्याला काय करावे तेच कळेना. याबद्दल मुलाच्या पालकांनी मुख्याध्यापकांना विचारले असता, तुम्हाला जिथे जायचे तिथे जा असे उत्तर त्यांनी दिले.
आमच्या प्रतिनिधींनी मुख्याध्यापक राम वाघुंबरे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी शाळेत कर्मचारी वर्ग कमी असल्याचे कारण दिले. या प्रकाराला शिक्षक जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या शाळेत शेकडो विद्यार्थी आहेत. मात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या अगदीच कमी आहे. विद्यार्थ्याला १५ दिवसांपूर्वी हॉल तिकीट मिळाले होते. त्यामुळे त्यांनी हा प्रकार आधीच निदर्शनास आणून द्यायला हवा होता, असं वाघुंबरे म्हणाले.

Friday, April 28, 2023

मा. आ.कै.अण्णाभाऊ गित्ते यांच्या पत्नी श्रीमती सूजानबाई गित्ते यांचे निधन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- शहरातील स्नेहनगर येथील रहिवाशी श्रीमती  सूजानबाई अण्णाभाऊ गित्ते यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी शुक्रवार दि. २८ एप्रिल २०२३ रोजी रात्री ८ वाजता निधन झाले त्याच्या पार्थिवदेहावर शनिवारी दि.२९ एप्रिल २०२३ रोजी सार्वजनिक स्मशानभूमी परळी येथे सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य सैनिक तथा माजी आ.कै..अण्णाभाऊ गणपतराव गित्ते यांच्या त्या पत्नी होत्या. श्रीमती सूजानबाई अण्णाभाऊ गित्ते या मनमिळाऊ व धार्मिक वृत्तीच्या असल्याने सर्वपरिचित  होत्या. त्यांच्या पश्चात 2 मुले,  4 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या बालाजी गित्ते, संजय गित्ते व माजी जि.प.सदस्या गयाबाई कराड यांच्या मातोश्री होत्या.
          त्यांच्या पार्थिवदेहावर शनिवारी दि.२९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार असून अंत्ययात्रा स्नेहनगर येथून निघणार आहे.
           गित्ते कुटुंबियांवर कोसळल्या दुःखात दै. कांतीकारी साथी परिवार सहभागी आहे.

कें नुतन परळी चे केंद्रीय मुख्याध्यापक मोहन कांबळे व जि प प्रा शा वाघबेट शाळेचे मुख्याध्यापक भगवान राठोड यांचा सेवानिवृत्ती निम्मित निरोप समारंभ संपन्न.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जि प कें प्रा शा नुतन परळी चे केंद्रीय मुख्याध्यापक मोहन कांबळे सर व जि प प्रा शा वाघाबेट शाळेचे मुख्याध्यापक भगवान राठोड सर यांचा सेवानिवृत्ती निम्मित कें नुतन परळी सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जि प कन्या माध्यमिक शाळा परळी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं स. परळीचे गटशिक्षणाधिकारी श्रीराम कनाके साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती हिना अन्सारी मॅडम ,नुतन केंद्राचे केंद्रप्रमुख यादव पल्लेवाड, कन्या शाळेचे मुख्याध्यापक शास्त्री कांबळे,सिरसाळा केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक मधुकर घोडके ,तालुका शा पो आ प्रमुख श्री अशोक कराड,साधन व्यक्ती बालासाहेब दहिफळे,जाधव व्ही पी,मुंडे सर आदी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या नंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.सत्कार मूर्ती मोहन कांबळे सर व भगवान राठोड सर यांचा कें नुतन परळीचा वतीने गटशिक्षणाधिकारी श्रीराम कणाके जे शिक्षण वि अधिकारी अन्सारी मॅडम ,केंद्रप्रमुख पल्लेवाड व उपस्थित पाहुण्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अशोक नावंदे सर,बालाजी गुट्टे सर,दिनकर येवतेकर सर, महादेव फड सर,सौदागर कांदे सर,श्रीमती घाडगे मॅडम यांनी सत्कारमूर्ती यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.
जे शिक्षण वि अधिकारी अन्सारी मॅडम ,केंद्रप्रमुख पल्लेवाड यांनी सत्कारमूर्ती श्री कांबळे सर व भगवान राठोड यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. सत्कारमूर्ती मोहन कांबळे सर व भगवान राठोड यांनी सत्काराला उत्तर दिले. अध्यक्षीय समारोपात गटशिक्षणाधिकारी कणाके साहेब यांनी दोघांचेही कार्य अनुकरणीय होते असे सांगून अशा कार्यक्रमाच्या आयोजनातून केलेल्या सेवेचा आनंद मिळतो व आपल्याच माणसांनी केलेला हा सत्कार पुढील आयुष्यात ऊर्जा निर्माण करतो असे सांगून शासनाच्या विध्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना सर्व शाळांनी प्रभावीपणे राबवाव्यात असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक नावंदे सर यांनी तर आभार अनंतराव गव्हाणे सरांनी मानले.राष्ट्रगीत गायना नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .निरोप समारंभास नुतन केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधू भगिनी यांच्यासह अनेक शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नुतन परळी केंद्राच्या सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.

परळी वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023 जाहिर भव्य दिव्य गौरव सोहळ्याचे होणार आयोजन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - दि.वा.सेवा संस्थान,व परळी तालुका पत्रकार संघ यांचे विद्यमानेकिर्तीवंत,यशवंत,नामवंत,प्रतिभावंत,गुणवंत अशा महान रत्न व्यक्तीमत्वास ज्यांचे गत कार्य आदर्श घेण्यासारखे असून त्यांच्या प्रमाणे पुढील पिढी घडावी व एक सुसंस्क्रुत समाजप्रिय नागरिक,सामाजिक कार्यकर्ता घडावा या उदात्त हेतूने समाजातील सर्व क्षेत्रातुन आमच्या श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार समितीने समाजातील त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन,समाजातील विचारवंत,व नागरिकांशी चर्चा करुन सर्वानूमते एकूण 16 रत्न महान व्यक्तींची परळी वै.पंचक्रोशीतील सर्वोच्च अशा श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023 साठी निवड केली आहे,या रत्न गोरवमुर्तीची घोषणा आज करीत आहोत.
1ः  मा.आ.श्री पंडीतराव नारायणराव दौंड
 माजी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र.
2ः  मा.श्री विकासराव रामचंद्र डुबे.
  सामाजिक जेष्ठ नेते.परळीवै.
3ः मा.श्रीमती राधाबाई मोहनलाल बियाणी.
* धर्म व संस्कार *परळीवै.
4ः मा.श्री.विष्णुपंत सुभानराव सोळंके.
* सामाजिक कार्य * नागापूर 
5ः  मा.श्री.शिवाजीदादा दत्तोपंत कुलकर्णी.
 * सामाजिक कार्य * अंबाजोगाई.
6ः मा.श्री.गणपत अप्पा शंकर अप्पा सौदंळे.
* जेष्ठ पत्रकार* परळीवै.
7ः मा.श्री.सय्यद हनिफ सय्यद करिम उर्फ बहादूरभाई.
*सामाजिक कार्य व उद्योजक.परळी.वै.
8ः मा.श्री.वाल्मिकराव बाबुराव कराड.
* निष्ठा व संघटन * पांगरी ता.परळीवै.
9ः मा.श्री.संदिप सुभाषराव टाक.
 * प्रतिष्ठीत व्यापारी.* मोढां मार्केट.परळीवै.
10ः मा.श्री.गोपालसेठ बन्सीलाल सोमाणी.
* धर्म आणी उद्योजक.* परळीवै.
11ः मा.श्री.सुंदरराव पांडुरंगराव गित्ते.
 * सरपंच व युवा नेता*
  नंदागौळ ता.परळीवै.
12ः मा.सौ.गोदावरीताई राजाराम मुंडे.
* सरपंच व सामाजिक नेत्या.*
 टोकवाडी.ता.परळीवै.
13ः मा.सौ.सुरेखाताई विजयकुमार मेनकुदळे.
 * धर्म आणी संस्कार *
 परळीवै.
14ः मा.श्री.बाजीराव प्रकाशराव धर्माधिकारी.
* मा.नगराध्यक्ष व युवा नेते.
  परळीवै.
15ः मा.श्री.अनिकेत द्वारकादास ल़ोहिया.
* जलव्यवस्थापन व सामाजिक नेते.*
 अंबाजोगाई.
16ः मा.श्री.रमाकांतराव अनंतराव जोशी.
* शिक्षण व्यवस्थापन व कोव्हिड योध्दे.परळीवै.
   या महान गौरवमुर्तींचा गौरव सोहळा,श्री वैद्यनाथ रत्न पुरस्कार 2023 व शाल,श्रीफळ,सन्मानपत्र देऊन अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते व उपस्थीती मध्ये मे 2023 मध्ये परळीवै.येथे भव्य दिव्य गोरव करण्यात येणार आहे.
   पुरस्कार गौरव सोहळा व श्री कुलस्वामिनी दिनदर्शिका 2023- 24 ची तयारी अंतीम टप्यात असून लवकरात लवकर सोहळ्याची तारिख घोषित करण्यात येईल.असे आवाहन आज परळीवै.येथे झालेल्या पत्रकार परिषदे मध्ये पत्रकार श्री दिपक वांजरखेडे मुख्य संयोजक व पत्रकार श्री बालकिशन सोनी अध्यक्ष तालुका पत्रकार संघ परळीवै.व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

वादळीवाऱ्यासह पावसात अडकलेल्या शेतकऱ्यावर वीज कोसळली, जागीच मृत्यू


केज (प्रतिनिधी) : तालुक्यातील केळगाव शिवारात आज दुपारी (दि. २८) १२  वाजेच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसात वीज अंगावर कोसळून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बिभीषण आण्णासाहेब घुले ( 50) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

शेतकरी बिभीषण आण्णासाहेब घुले हे आपल्या शेळ्या शेतात चारत होते. दुपारी 12 वाजता वातावरण बदलून मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस सुरु झाला. दरम्यान, अचानक घुले यांच्यावर वीज कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्च्यात पत्नी, 1 मुलगा, 3 मुली असा परिवार आहे. घटनास्थळी पोलीस नाईक राजू गुंजाळ यांनी भेट दिली असून पंचनामा करून पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

तसेच गुरुवारी मध्यरात्री 1 वाजेच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसात काळेगावघाट शिवारात महालिंग शिवलिंग तांगडे यांच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळून एक बैल ठार झाला आहे, तर एक बैल होरपळला. तलाठी सोनुने आणि पशुधन विकास अधिकारी डॉ दीक्षांत जोगदंड आणि पशुधन पर्यव्यक्षक यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन मयत बैलाची उत्तरीय तपासणी करून पंचनामा केला आहे.

Thursday, April 27, 2023

सोशल मीडियाचा प्रभावी वापर; हरवलेल्या ८२ वर्षीय वृद्धेची अन् नातेवाईकांची झाली भेट.


*सोशल मिडीयाच्या प्रभावी वापराने अवघ्या दोन तासांत वृद्धेची माहिती मिळून नातेवाईकांची भेट झाली. 

दिंद्रुड (प्रतिनिधी): नातेवाईकांच्या भेटीसाठी बसने मुंबईहून माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे निघालेली ८२ वर्षीय वयोवृद्ध महिला दोन दिवसांपूर्वी हरवली होती. मात्र, सोशल मिडीयाच्या प्रभावी वापराने या ८२ वर्षीय वृद्धेची अन तिच्या मुलाची आज सकाळी भेट झाली. रमाबाई बाबुराव पाटील असे वृद्ध महिलेचे नाव आहे. सोशल मिडीयाच्या प्रभावी वापराने अवघ्या दोन तासांत वृद्धेची माहिती मिळून नातेवाईकांची भेट झाली. 

रमाबाई पाटील या १९८० साली दिंद्रुडहून मुंबईला राहायला गेल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी दिंद्रुड येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी रमाबाई पनवेल येथून बसने माजलगावकडे निघाल्या. माजलगाव गाडीत बसलेल्या रमाबाई मात्र दिंद्रुडला पोहचल्याच नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोधा शोध केली मात्र त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे मोबाईल नसल्याने संपर्क करण्यात अडचण आली.

दरम्यान, मुंबई येथील कामोठा पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांना गुरुवारी सकाळी रमाबाई आढळून आल्या. पोलिसांनी माहिती विचारली असता त्यांस सांगता आली नाही. मात्र, त्यांच्याजवळ पनवेल ते माजलगाव व माजलगाव ते दिंद्रुड असे एसटी बसचे तिकीट सापडले. या तिकिटावरून कामोठा पोलिसांनी दिंद्रुड पोलिसांशी संपर्क साधला. दिंद्रुड पोलिसांनी रमाबाई यांच्या नातेवाईकांचा शोध सुरु केला. याबाबत पोलिसांनी स्थानिक पत्रकारांना माहिती दिली. 

दिंद्रुड येथील पत्रकार संतोष स्वामी, नवनाथ कांबळे, गणेश काटकर यांनी सोशल मीडियाचा माध्यमातून अवघ्या दोन तासांत रमाबाई यांच्या दिंद्रुड येथील नातेवाईकांचा शोध लावला. योगेश राडकर व अमोल नागापुरे या नातेवाईकांनी लागलीच त्यांच्या मुलाचा व मुलीचा संपर्क देत पत्ता सांगितला. त्यानंतर पोलिसांनी मुलगा प्रशांत पाटील याच्यासोबत संपर्क केला. कामोठा पोलिसांनी रमाबाई यांना मुलाकडे सोपवले. पाटील परिवाराने कामोठा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल आगलावे, दिंद्रुड पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल बालाजी सूरेवाड तसेच दिंद्रुड  येथील पत्रकारांचे आभार व्यक्त केले.

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पोलिसाच्या टिप्परने पोलिसालाच उडविले, प्रकृती चिंताजनक.


*बीड शहरातील घटना : वाळू टाकून परत भरधाव वेगात जाताना दुचाकीला दिली धडक. 

बीड (प्रतिनिधी) : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने पाेलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला धडक दिली. यात हा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून खासगी रूग्णालयात मृत्यूशी झुंज दत आहे. ही घटना गुरूवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास बीड शहरातील नगर नाका येथे घडली. दरम्यान, हे वाळूचे टिप्पर एका पोलिस कर्मचाऱ्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. ते सध्या शिवाजीनगर पोलिसांनी ठाण्यात नेले आहे.

कृष्णा रूपणर असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मागील दहा दिवसांपूर्वी रूपनर हे अमरावतीवरून बीडला बदलून आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ते सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. गुरूवारी दुपारी ते जेवणासाठी घरी जात होते. याचवेळी विना क्रमांकाच्या भरधाव आलेल्या टिप्परने रूपनर यांच्या दुचाकीला (एमएच ४४ एक्स ०३७३) धडक दिली. यात पाच ते दहा फुटापर्यंत दुचाकी फरटत नेली. यात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यानंतर वाहतूक शाखेचे सहायक फौजदार सोडगिर व त्यांच्या पथकाने त्याला आपल्या वाहनातून रूग्णालयात दाखल केले. रूपनर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. धडक देणारा टिप्पर पोलिसांनी शिवाजीनगर ठाण्यात नेला आहे.

अवैध वाळू वाहतूक कधी थांबणार?रूपनर यांना धडक दिलेल्या टिप्परमधील वाळू खाली करून ते भरधाव वेगाने मिनी बायपास रोडने जात होते. यातच पोलिस कर्मचाऱ्याला धडक दिली. त्यानंतर चालक पसार झाला. दरम्यान, यापूर्वीही अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांनी अनेकांचा जीव घेतलेला आहे. आता ही मालिका कधी थांबणार? प्रशासनाला कारवाई करण्यासाठी आणखी किती लोकांचा बळी घ्यायचा आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रकरण मिटविण्यासाठी दबाव.

अपघातातील टिप्परवर कसलाही नंबर नसला तरी सूत्रांच्या माहितीनुसार ते पोलीसाचेच असल्याचे सांगण्यात आले. हे प्रकरण वाढू नये, यासाठी जखमी कर्मचाऱ्यावर दबाव आणला जात आहे. गुन्हा दाखल न करता सर्व खर्च देऊ, असे प्रलोभण दिले जात आहे. तसेच एका वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यानेही नियंत्रण कक्षाला हे प्रकरण मिटल्याची नोंद घ्या, असा संदेश दिल्याची माहिती आहे.

पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड.१ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त.६ जण ताब्यात.

बीड (प्रतिनिधी) : बीडच्या अमळनेरमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने छापा मारला. यावेळी  पथक प्रमुख विलास हजारे यांच्या टीमने केलेल्या कारवाईत ६ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. 
बीडच्‍या अमळनेरमध्‍ये अनेक ठिकाणी जुगार अड्डे चालविले जात असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर धाड टाकण्याची कारवाई केली आहे. जुगार अड्ड्यावर टाकलेल्‍या छाप्‍यात
 पोलिसांनी ६ जुगाऱ्यांना अटक केली आहे. तसेच कारवाईत १ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बीडच्या अमळनेर पोलीस ठाण्यात जुगारी आजिनाथ भाऊ फरताडे (रा. पांढरवाडी ता. पाटोदा), नामदेव माणिक जाधव (रा.चिंचोली), विठ्ठल किसन पवार (रा. शिंदेवाडी ता.पाथर्डी, जि. अहमदनगर), राजू गजेंद्र जाधव (रा.चिंचोली ता.पाटोदा), सुग्रीव बाजीराव मिसाळ (रा. डागाचीवाडी ता.पाटोदा), तुकाराम भीमराव गायकवाड (रा.कोतन, ता.पाटोदा) या जुगाऱ्यांसह क्लबचा मालक सुरेश अरुण पोकळे यांच्याविरोधात कलम 12 (अ )महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाला कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या 'त्या' शाळेची अखेर मान्यता रद्द

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंगर पट्ट्यात असलेल्या वडझरी गावातील संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रम शाळेत. बोगस विद्यार्थी दाखवून शासनाची फसवणुक केल्याचा प्रकार महाराष्ट्रासमाेर आला होता. त्याची दखल घेत चाैकशी झाली. दरम्यान चाैकशीअंती शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. शासनाच्या अनुदानावर डल्ला मारणाऱ्या संस्था चालकांना चांगला धडा मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. 
वडझरी येथील संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रम शाळेत सुरु असलेले विविध याेजनांच्या विषयीचे गैरप्रकार बीडच्या जनतेसह राज्यात समाेर आला. काल्पनिक विद्यार्थी दाखवून बोगस पटसंख्यांची नोंद असाे अथवा विविध याेजनेत प्रचंड अनियमितता असाे. सर्व गाेष्टींची गंभीर दखल प्रशासनाने घेतली. त्यानंतर या संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली.

याच शाळेतील शिक्षकांसह सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी संस्थेत सुरु असलेल्या चुकीच्या प्रकाराची तक्रार दिली होती. तसेच त्यांनी वेळोवेळी आंदोलन देखील केले.दरम्यान काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सीईओ अजित पवार यांनी शाळेचे मुख्याध्यापक वनवे प्रविण लिंबाजी यांना निलंबित केले होते.

आता महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी अजित जगताप यांनी या शाळेची मान्यताच रद्द केलीय. त्यामुळं शासनाच्या अनुदानावर डल्ला मारणाऱ्या संस्थाचालकांमध्ये चांगलीचं खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! परळीतील लेंडेवाडी शिवारात रेल्वेरुळाजवळ आढळला परप्रांतीय महिलेचा मृतदेह.


*मृतदेहाजवळ एक पर्स सापडली असून त्यात एक मोबाईल आणि ओळखपत्र सापडले आहे. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : येथील लेंडेवाडी शिवारातील रेल्वेरुळाजवळ.आज सकाळी 23 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. ओळखपत्रावरून महिला परराज्यातील असल्याचे समजते. 

मृत महिलेच्याजवळ एक बॅग आढळून आली आहे. बॅग ( पर्स) मध्ये एक मोबाईल व पॅन कार्ड सापडले आहे. पॅन कार्डवरून त्या महिलेचे नाव हरीनी एटी असे असून वय 23 असल्याची माहिती परळी ग्रामीण  पोलिसांनी दिली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव टोले, पोलीस कॉन्स्टेबल घरत, परतवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.  दरम्यान, पर्समध्ये सापडलेल्या मोबाईलवरून महिलेच्या नातेवाईकांचा पोलीस शोध घेत आहेत. महिलेचे मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.  

मी सांगूनही ट्रॅक्टर सोडले नाही. आमदारांच्या पीएकडून पोलिसाला शिवीगाळ.


*पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीची चावी घेत, चल आमदार साहेबांकडे, मी कोण आहे तर सांगतो, असे म्हणत अरेरावी केली.

बीड (प्रतिनिधी) : मी सांगितलेले ट्रॅक्टर का सोडले नाहीस, असे म्हणत आष्टीतील राष्ट्रवादीचे आ.बाळासाहेब आजबे यांच्या पीए ने पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. तसेच दुचाकीची चावी काढून घेत त्यांना कर्तव्यावर जाण्यापासून रोखले. ही घटना २५ एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथे घडली. याप्रकरणी पीए विरोधात अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुनिल पारखे असे या पीएचे नाव आहे. 

२३ एप्रिल रोजी अंमळनेर ठाण्याचे पोलिस कर्मचारी जालिंदर बनसोडे यांनी एक ट्रॅक्टर पकडला होता. तो सोडण्यासाठी पारखे यांनी कॉल केला होता. तरीही ट्रॅक्टर न सोडल्याने २५ एप्रिल रोजी सकाळी त्यांनी पिंपळवंडीत आल्यावर बनसोडे यांच्यासोबत हुज्जत घातली. त्यांच्या दुचाकीची चावी घेत, चल आमदार साहेबांकडे, मी कोण आहे तर सांगतो, असे म्हणत अरेरावी केली. दरम्यान, पीए सुनिल पारखे यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. शेती कामासाठी जाणारे ट्रॅक्टर पकडले तेव्हा अंमळनेर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना बोललो होतो. मी या कर्मचाऱ्याला ओळखतही नाही. आपण आमदारांचा पीए आहोत, हे खरे असल्याचेही ते म्हणाले.

Wednesday, April 26, 2023

बीड जिल्हा परिषद विभागाच्या औषधी भांडारमध्ये कर्मचाऱ्याचा राड.फार्मसी ऑफिसरच्या केबिनची तोडफोड.


बीड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद विभागाच्या औषधी भांडार विभागात क्षयरोग कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याने राडा केला. फार्मसी ऑफिसरच्या केबीनच्या काचा फोडण्यासह इतर साहित्याचीही तोडफोड केली. ही घटना बुधवारी पाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात नोंद झालेली नाही.

जिल्हा रूग्णालयाच्या पाठिमागील बाजूस जिल्हा परिषदेचे औषधी भांडार आहे. येथे कोट्यवधी रूपयांची औषधी साठा असतो. बुधवारी ५ वाजेच्या सुमारास क्षयरोग विभागातील एक कंत्राटी कर्मचारी तेथे आला. त्याने शिपायांसह फार्मासिस्ट सोबत वाद घातले. त्यानंतर आतमध्ये जात फायबरच्या दरवाजावर लाथा मारून तो वाकविला. 

तेथून फार्मसी ऑफिसर योगेश जोशी यांच्या कक्षाच्या दरवाजाचा काचा फोडल्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी भांडार विभागात धाव घेतली. सर्व परिस्थितीचा आढावाही घेतला. परंतू सायंकाळी ७ वाजेपर्यंत याप्रकरणात बीड शहर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली नव्हती.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला. २२ हजार ५६२ मतदार निवडणार बाजार समित्या तील कारभारी.

बीड (कांतीकारी साथी न्यूज विशेष) : बीड जिल्ह्यात नऊ बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये अनेक मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ९ बाजार समित्यांच्या १६२ संचालक पदांसाठी निवडणूक होत असून यात २२ हजार ५६२ मतदार बाजार समित्‍यांमधील कारभारी निवडून देतील.
बीड जिल्ह्यातील ९ बाजार समित्यांच्या १६२ संचालक पदांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कडा बाजार समिती बिनविरोध झाली. त्यामुळे आता ८ बाजार समित्यांची निवडणूक येत्या २८ व ३० एप्रिलला होत आहे. यासाठी २२ हजार ५६२ मतदार बाजार समित्यांचे कारभारी  निवडणार आहेत. त्यामुळे कोण कुठं बाजी मारणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नेत्‍यांची प्रतिष्‍ठा पणाला

परळीत मुंडे बहीण भावांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर बीडमध्ये क्षीरसागर काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागलीय. यामध्ये सर्वपक्षीयांकडून जयदत्त क्षीरसागर यांनी चितपट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर गेवराईमध्ये राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित आणि भाजपचे आमदार लक्ष्मण पवार, शिवसेना नेते बदामराव पंडित यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. माजलगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

शिक्षण क्षेत्रातून धक्कादायक घटना.!नाट्यशास्त्र विभागातील प्राध्यापकाने विद्यार्थिनीवर केला अत्याचार.


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) रा ज्यात पुन्हा: एकदा शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून, या नराधक गुरूने सर्व हद्दच पार केल्याचं समोर आलं आहे. सदर घटना हि, छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली असून, शहरातील एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सहाय्यक प्राध्यापकानेच बलात्कार केल्याची घटना आहे. वसतिगृहात राहणे सुरक्षित नसल्याचे सांगत; एका नराधम  सहाय्यक प्राध्यापकाने पीडित विद्यार्थिनीला घरी पेईंग गेस्ट म्हणून नेले . मात्र घरी राहण्यासाठी नेऊन तिच्यावर सहाय्यक प्राध्यापकाने बलात्कार केला. विशेष म्हणजे या कृत्यात सहाय्यक प्राध्यापकाच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सहाय्यक प्राध्यापक आणि त्याच्या पत्नीने संगनमताने माझ्यावर बेशुद्ध पडेपर्यंत अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप पीडित मुलीने केला आहे.

अशोक गुरप्पा बंडगर असे नराधम आरोपी सहाय्यक प्राध्यापकाचे नाव असून, तो नाट्यशास्त्र विभागात नोकरीला आहे. तर या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात बंडगर पती-पत्नीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पीडिता बाहेरील जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर शहरात शिक्षणासाठी आली होती, आणि तिने शहरातील एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. यादरम्यान एका सर्व्हिस कोर्सनिमित्त तिची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक अशोक गुरप्पा बंडगरसोबत ओळख झाली होती. तर विद्यापीठाबाहेरील महाविद्यालयाची विद्यार्थिनी असूनही बंडगरने मार्गदर्शन, सल्ला देण्याच्या बहाण्याने तिच्याशी जवळीक वाढवायला सुरुवात केलो. या काळात त्याने मी तयार करत असलेल्या चित्रपटात तुलाही काम करण्यासाठी संधी देतो, असे म्हणत आणखी जवळीक निर्माण केली.

पुढे आणखी जवळीक वाढवण्यासाठी; या नराधमाने पवित्र नात्याचा आधार घेत.! हे घाणेरड कृत्य केलं.  

काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीला बाहेर खोलीवर राहणे अशक्य झाल्याने तिने होस्टेलचा शोध सुरु केला. मात्र तिने निवडलेले होस्टेल सुरु झाले नसल्याने तिच्या राहण्याची अडचण होऊ लागली. त्याचदरम्यान तिची विद्यापीठ परिसरात बंडगरची भेट झाली आणि बोलता-बोलता तिने हा प्रकार त्याला सांगितला. यावेळी  बंडगरने तिला वडिलकीच्या नात्याने घरी चल, असे सांगून घरी नेले. त्याच्या पत्नीनेही पीडितेला, 'होस्टेल सुरक्षित नसतात, तू आम्हाला मुलीसारखीच असून, पेईंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी आग्रह केला. मुलीचा दर्जा दिल्याने मोठ्या विश्वासाने पीडिता पेईंग गेस्ट म्हणून बंडगर दाम्पत्याकडे राहायला लागली. मात्र पुढे काही दिवसांनी बंडगरने तिच्या जवळ जाण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याचे वागणे विचित्र वाटल्याने पीडितेने त्याला अनेकदा दूर राहण्यास सांगितले. दरम्यान पीडित मुलीवर घराची सर्व आर्थिक जबाबादारी देऊन, नंतर बंडगरने चोरीचा आळ घेऊन जुलैमध्ये तिच्यावर अत्याचार केला. पुढेही धमकावत वारंवार अत्याचार करत राहिला. हा सर्व प्रकार पीडितेने त्याच्या पत्नीला सांगितला. मात्र, 'मला मुलगा नाही. तू आता माझ्या पतीसोबत लग्न कर. आम्हाला मुलगा हवा आहे,' असे म्हणत बंडगरच्या पत्नीनेही तिला धमकावले. तसेच बंडगरची पत्नीदेखील पतीच्या कृत्याला समर्थन देत गेली. धक्कादायक म्हणजे जानेवारी 2023 मध्ये दोघे पती-पत्नीने त्यांच्या खोलीत नेऊन पीडित मुलीवर बेशुद्ध पडेपर्यंत अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान मुलीची प्रकृती बिघडल्याचे कळल्यानंतर पीडितेचे वडील आणि बहिणीने तिला गावाकडे नेले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आणि  विद्यापीठ प्रशासनाने पीडितेला बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितल्यानंतर मंगळवारी यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वसई-विरार महापालिका मुख्यालया समोर (ठाकरे) शिवसेनेचा ठिय्या ! पाणी आरोग्यासह अन्य समस्यांवर शिवसैनिक पुन्हा आक्रमक.

विरार (प्रतिनिधी) - नियोजनाच्या अभावामुळे शहरात उद्भवणारी पाणीटंचाई आणि सामान्य वसई-विरारकरांना मिळत नसलेल्या आवश्यक आरोग्य सुविधा याविरोधात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने मंगळवारी दुपारी वसई-विरार महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पाणी, आरोग्य आणि अन्य समस्यांवर संतप्त शिवसैनिकांनी पालिका आयुक्तांना जाब विचारला.

वसई-विरार शहराची लोकसंख्या आजघडीला 24 लाखाच्या घरात आहे. या लोकसंख्येला 350 एमएलडी इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत शहराला 230 एमएलडी इतका पाणीपुरवठा होत आहे. शहराला सूर्या धरण प्रकल्प योजनेतून 185 एमएलडी, उसगाव धरणातून 20 एमएलडी, पेल्हार धरणातून 14 एमएलडी आणि फुलपाडा पाणी योजनेतून 1.5 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय महापालिकेला खोलसापाडा-1 व खोलसापाडा-2 धरण योजनेतून 70 एमएलडी पाण्याची प्रतीक्षा आहे.
प्रत्यक्षात हा पाणीसाठी पुरेसा आहे. केवळ नियोजनाचा अभाव व महापालिकेकडून होणारा अपुरा  पाणीपुरवठा यामुळे शहरात पाणीटंचाई उद्भवत आहे. शहरातील बहुतांश इमारतींना पाणी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी मोटर लावून पाणी खेचले जात जात असल्यानेच सामान्य नागरिकांना या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अशा मोटरधारकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी या वेळी केली.

वसई पश्चिमेकडील सर डी. एम. पेटिट रुग्णालय, नालासोपारा पूर्वेकडील विजयनगर-तुळींज रुग्णालय, महापालिकेची 21 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, 9 दवाखाने यांच्यामार्फत वसई-विरार महापालिका वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या सोबतच जिल्हा परिषदेतील सोपारा, नवघर, निर्मळ, आगाशी, चंदनसार आणि कामण ही सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शासकीय रुग्णालये पालिकेकड़े हस्तांतरित करण्यात आली तर याचा फायदा नागरिकांना होऊन त्यांना वैद्यकीय सेवा वेळेवर आणि जलद उपलब्ध होईल, अशी अपेक्षा वसई-विरारकरांनी व्यक्त केली होती.

ही रुग्णालये पालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी वसई शिवसेनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. त्याआधीही आरोग्य केंद्रांच्या हस्तांतरणासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात यावेत, अशी विनंती करण्यात आलेली होती. मात्र आजपर्यंत ही रुग्णालये पालिकेकडे हस्तांतरित झालेली नाहीत. जवळपास दोन हजार कोटींचे बजेट असलेल्या वसई-विरार महापालिका रुग्णालयांत कोणत्याच आवश्यक सुविधा मिळत नाहीत. शहरात सामान्य नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसल्याने मुंबई-ठाणे येथे जावे लागत आहे. त्यामुळे  वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ड` अंतर्गत येणाऱ्या नालासोपारा-आचोळे आरक्षण क्रमांक- 455 व सर्व्हे क्रमांक- 6 येथील प्रस्तावित सुसज्ज दोनशे खाटांचे रुग्णालय व वसई येथील सर. डी. एम. पेटीट रुग्णालयाच्या जोड इमारतीचा प्रस्ताव होता.

नालासोपारा-आचोळे आरक्षण क्रमांक- 455 व सर्व्हे क्रमांक- 6 येथील प्रस्तावित सुसज्ज दोनशे खाटांच्या रुग्णालयाच्या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने माहे सप्टेंबर 2021 मध्ये करण्यात आले होते. या कामासाठी वसई-विरार महापालिकेने 15 कोटी 82 लाख रुपये इतक्या निधीची तरतूद केलेली आहे. या रुग्णालयाच्या कामासाठी कार्यादेशही काढण्यात आलेले होते. तसेच वसई येथील सर डी. एम. पेटीट रुग्णालयातील जोड इमारतीचे भूमिपूजन माहे नोव्हेंबर 2020 मध्ये तत्कालिन पालकमंत्री यांच्या हस्ते झाले होते. या कामासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद पालिकेने केलेली आहे. मात्र या दोन्ही इमारतींचे काम अद्याप मार्गी लागलेले नाही. त्यामुळे वसई-विरारकरांच्या आरोग्य सुविधांकरता मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करणार असल्याचे शिवसैनिकांच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. या समस्यांचे निरसन व्हावे, याकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महानगरपालिका मुख्यालयावर दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी ‘धडक मोर्चा` काढण्यात आलेला होता.

जलवाहिनी जोडणी असूनही सामान्य नागरिकांना होत नसलेला सुनियोजित पाणीपुरवठा, पैसे भरूनही मिळत नसलेल्या जलजोडण्या, पालिकेच्या शाळा उपलब्ध नसतानाही पालिका वसूल करत असलेला शिक्षण कर, आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, शहरात होत असलेली वाहतूक कोंडी, जाहिरात धोरण नसल्याने अनधिकृत बॅनर, फलक आणि होर्डिंग यामुळे शहराचे होत असलेले विद्रुपीकरण, फेरीवाला धोरणाअभावी शहरात वाढत असलेले फेरीवाले आणि त्यांच्याकडून होत असलेली बेकायदा हफ्ता वसुली,  पालिकेच्या आरक्षित जागांवर झालेले अतिक्रमण, आरक्षित जागांचे पालिकेकडे होत नसलेले हस्तांतरण, नालेसफाई-गटारसफाई योग्य पद्धतीने व वेळत होत नसल्याने वसई-विरार शहरात दरवर्षी उद्भवत असलेली पूरस्थिती यासोबतच प्रशासकीय काळात पालिकेच्या विविध विभागांत बोकाळलेला अनिर्बंध भ्रष्टाचार याबाबत आपल्यासोबत मोर्चादरम्यान ऊहापोह करण्यात आलेला होता.

मात्र तब्बल चार महिन्यांचा कालावधी उलटूनही यातील बहुतांश समस्यांबाबत  महानगरपालिकेच्या वतीने कोणतीही ठोस कार्यवाही/कारवाई करण्यात आलेली नसल्यानेच या ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली.

मोटर लावून पाणीचोरी होत असलेल्या बार, रेस्टॉरंट व अन्य आस्थापनांविरोधात तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. तर फेरीवाल्यांविरोधात आजपासूनच कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

दरम्यान पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, उपजिल्हाप्रमुख दिलीप पिंपळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, पालघर जिल्हा महिला आघाडी प्रमुख तथा माजी नगरसेविका किरणताई चेंदवणकर, वसई विधानसभा संघटक विनायक निकम,वसई तालुका प्रमुख राजाराम बाबर, उपतालुका प्रमुख अनिल चव्हाण, गिरीश देवाशी, मनीष वैद्य, जनार्दन म्हात्रे, सुनील भालेकर, उदय जाधव, प्रदीप सावंत, किशोर पाटील,संतोष टेबवळकर , नम्रता वैती, भारती गावडे, सिद्धेश जोगळे, भूमिश सावे, प्रतीक जाधव, संजय गुरव, गणेश भायदे,राज सिंह अन्य शिवसैनिक या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते...!
जय महाराष्ट्र..!🚩🙏🏻

Tuesday, April 25, 2023

पुणे-लातूर-पुणे रेल्वे सेवा सुरू होणार. सोलापूर, उस्मानाबाद, लातूरकरांना मोठा दिलासा.

पुणे (प्रतिनिधी) : लातूर रेल्वे गाडीला असलेला प्रवाशांचा प्रतिसाद पाहून पुणे रेल्वे विभागाकडून पुणे-लातूर-पुणे अशी नवीन गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे मुख्यालयास पाठविण्यात आला आहे. पुणे-लातूर रेल्वे सेवा सुरू झाल्यास सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
पुण्यातून लातूरला जाण्यासाठी बिदर एक्स्प्रेस, नांदेड एक्स्प्रेस आणि हैदराबाद एक्स्प्रेस अशा गाड्या आहेत. यातील दोन गाड्या रात्री आहेत. तर, हैदराबाद एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस हडपसर टर्मिनलवरून सकाळी सुटते. या गाड्यांना खूपच गर्दी असते. त्यामुळे लातूरला जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

लातूर मार्गे जाणाऱ्या गाड्यांना नेहमीच गर्दी असल्यामुळे नागरिकांकडून लातूर विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती. पण, रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे कोच उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा सुरू केली जात नव्हती. पण, आता रेल्वेचे कोच उपलब्ध झाल्यामुळे आणि नागरिकांच्या मागणीचा विचार करता पुणे विभागाने लातूरसाठी रेल्वे सोडण्याचा निर्णय केला आहे.
मुख्यालयाकडून या प्रस्तवाला मंजूरी मिळाल्यास पुणे स्थानकातून दररोज सकाळी सात वाजता लातूरसाठी रेल्वे रवाना होणार आहे. दुपारी एक वाजता ती लातूर येथे दाखल होईल. त्यानंतर लातूरवरून दुपारी दोन वाजता पुण्यासाठी रवाना होणार आहे. ही रेल्वे सेवा सुरू झाल्यास दररोज पुण्याला येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

माजलगाव शहरातील त्या वादग्रस्त सर्व्हे नंबरची मोजणी सुरू. कागदावरील शासकीय जमीन खुली होण्याची जनतेची अपेक्षा.


माजलगाव (प्रतिनिधी): शहरातील बायपास रोड (आझाद चौक) परिसरातील सर्व्हे नं. ३७०, ३७१, ३७२ या वादग्रस्त सर्व्हे नंबरची शासकीय मोजणीस अखेर भूमिअभिलेख कार्यालयाकडून सोमवारी दुपारी १२ वाजता सुरुवात झाली आहे. या सर्व्हे नुंबरमध्ये शासनाची १३ एक्कर ३४ गुंठे जमीन असून त्यातील केवळ ३७ गुंठे जमीन ताब्यात आहे, तर उर्वरित १३ एक्कर जमिन अनेक भूमाफियांनी गिळकृत केलेली आहे.

या तीनही सर्वे बाबत मागील १०-१२ वर्षात वादग्रस्त असून खाजगी मोजण्यांमध्ये कुठलेही क्षेत्र कुठेही काढल्या जावुन येथे असणा-या शासनाच्या जमीनीला देखील धक्का पोहचवला आहे. नगर परिषदेने वारंवार मागणी करुनही भुमिअभिलेख कार्यालयाकडुन टाळाटाळ होणारी शासकिय मोजणी अखेर सोमवारी दुपारी १२ वाजता सुरू झाली आहे. या मोजनिमधून हेराफेरी करणाऱ्यांचे पाप समोर येणार असल्याने अनेकांचे धाबे दणानले आहेत.

१३ एक्कर ३४ गुंठे पैकी शासनाची १ एक्करच जमिन ताब्यात

सर्व्हे नंबर ३७०, ३७१, ३७२ मध्ये शासन व माजलगाव नगर परिषदची १३ एक्कर ३४ गुंठे जमीन आहे. त्यापैकी सर्व्हे नं.३७२ मध्येच केवळ ३७ गुंठे नगर परिषदच्या ताब्यात असल्याचे बोलले जाते तर उर्वरित १२ एक्कर ३७ गुंठे जमीन गायब आहे.

अशी आहे सर्व्हे नं. प्रमाणे शासकीय जमीन

सर्व्हे नं. ३७० मध्ये ४ एक्कर आहे, त्यात केवळ ३७ गुंठे जमीन नगर परिषदेच्या ताब्यात आहे. त्यातील १ एक्कर ३ गुंठे जमीन गायब आहे. सर्व्हे नं.३७१ मध्ये ७ एक्कर ३४ गुंठे व सर्व्हे नं.३७१ मध्ये २ एक्कर ही जमीन गायब आहे.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत शिवसेना ठाकरे गट आघाडी तून बाहेर.


*शिवसेना ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन आम्ही आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे.

उदगीर (प्रतिनिधी)  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकाणी धुमाकूळ घातल आहे. अनेक राजकीय पक्षांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आपले उमेदवार रींगणात उतरवले आहे.बाजार समितीच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असताना लातूरच्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीच्या निवडणूकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. 

वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, लातूरच्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष ठाकरे गटाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच ठाकरे गटाने गंभीर आरोप करत महाविकास आघाडीच्या प्रचारातून स्वतःला वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे.

 निवडणुकीसााठी अनपेक्षित आघाडी अस्तित्वात आली. यात शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीतून वगळण्यात आले. निवडणुकीत शिवसेनेकडून २ जागांसाठी मागणी करण्यात आली होती. परंतु उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी झालेल्या राजकीय घडामोडी मध्ये शिवसेनेला वगळण्यात आले. सोमवारी दुपारी उदगीर येथे शिवसेना ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना अलिप्त राहणार असल्याचे जाहीर केले.

दुर्दैवी घटना! एका दिवसावर रिटायरमेंट असलेल्या प्राध्यापकाचा अपघाती मृत्यू .

नाशिक (प्रतिनिधी) नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाट्याजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे.  पिकअप आणि अल्टो कारच्या अपघातात एका दिवसावर सेवा निवृत्ती असलेल्या प्राध्यापकाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रामदास माधव शिंदे असे अपघातात मृत्यू झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.अपघाताने परिसरात हळ-हळ होत आहे.   

वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, नाशिकसह जिल्ह्यात अपघातांच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा परिसरात असताना दिंडोरीकडे येणारी पिकअप आणि अल्टो कार यांची समोरासमोर जोरदार धडक बसली. त्याचवेळी पिकअपच्या मागून येणारी मोटरसायकल अल्टो कारला येऊन धडकली.

अपघातात प्राध्यापक शिंदे यांच्या डोक्याला आणि छातीला जबर मार लागला. त्याचबरोबर पिकअप चालक सागर पेलमहाले आणि विठ्ठल पागे हे सुद्धा जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्राध्यापक शिंदे यांना जबर मार लागल्याने आणि रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्राध्यापक रामदास शिंदेवणी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. कार्यकाळ संपल्याने ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी शिंदे हे नाशिकवरुन वणीकडे आपल्या अल्टो कारने निघाले होते. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

व्यवसायाच्या वादातून दोन गटामध्ये तुफान हाणामारी करत कट्ट्यातून गोळीबार.

नगर (प्रतिनिधी)   अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील वॉर्ड नं. २ मध्ये दोन गटामध्ये तुफान राडा झाल्याची बातमी समोर अली आहे. व्यवसायाच्या वादातून दोन गटामध्ये तुफान हाणामारी करत कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. सदर घटनेत तीन ते चार जण जखमी झाले आसून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. 

वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये व्यवसायाच्या वादातून दोन गट आमने-सामने आले. यात दोघा - तिघांना बेदम मारहाण करण्यता आली. यातील एका गटातील एकाने गावठी कट्टा काढत गोळीबार केला. सुदैवाने कुणाला गोळी लागली नसली तरी परिसरातील वातावरण मात्र तणावाचे होते.

घटनेची माहिती कळताच पोलिसांनी फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दोन्ही गटातील तरूणांची धरपकड सुरू केली. पोलिसांना या प्रकरणी एकास ताब्यात घेतले असून जखमी असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. शहरात काही भागात तणावाचे वातावरण पसरल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

चोरट्यांनी महिलांच्या डोक्यात दगडाने लोखंडी रॉडने केला हल्ला. घटनेत २ महिला गंभीर जखमी.

वडवणी (प्रतिनिधी) : बीडमध्ये चोरट्यांचा मोठा सुळसुळाट सुटला आहे. रात्री घरात फक्त महिला असल्याचा फायदा घेत दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र महिलांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला. यावेळी चोरट्यांनी महिलांच्या डोक्यात दगडाने हल्ला केला त्यामुळे या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
वडवणी तालुक्यातील देवडी येथे मध्यरात्री ही घटना घडली आहे. दे दोन चोरटे आधी शिवाजी अच्युतराव आगे यांच्या घराच्या गेटचे लॉक तोडून आतमध्ये शिरले होते. यावेळी त्यांनी घरातील सर्वजण एका रूममध्ये झोपल्याचा अंदाज घेतला आणि दाराला बाहेरून कडी लावली. दुसऱ्या घरात आत प्रवेश करून शोधाशोध घेतली असता त्यांना त्या ठिकाणी काहीच सापडले नाही.
त्यानंतर चोरट्यांनी शेजारील चंद्रकांत नामदेव झाटे यांच्या घरामध्ये प्रवेश केला, यावेळी घरामध्ये पुरुष माणसे कोणीच नाही याचा फायदा घेत घरातील कपाटात शोधाशोध केली. ही गोष्ट घरातील महिलांच्या लक्षात आली. कोणीतरी आपल्या घरात प्रवेश करून कपाट उघडत आहे, असं महिलांना जाणवलं.
यावेळी मनीषा बाळासाहेब झाटे व सुरेखा अण्णासाहेब झाटे या दोन महिलांनी चोरट्यांना चोरी करण्यास विरोध केला. त्यावेळी त्यांना लोखंडी रॉड व दगड डोक्यात घालून जबर मारहाण करण्यात आली. या दोन्ही महिला जखमी झाल्या आहेत. यावेळी आरडाओरड होण्याचा अंदाज पाहून चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. दरम्यान यातील दोन्ही जखमी महिलांवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या घटनेत चोरट्यांचा शोध घेत आहेत.

कुटुंबीय मंदिरातील सप्‍ताहात मग्न मुलाचा तलावाच्या पाण्यात बुडुन मृत्यू.

बीड (प्रतिनिधी) : बीडच्या बेलेश्वर संस्थान परिसरातील तलावात १० वर्षीय मुलाचा मृतदेह आढळल्याने एकचं खळबळ उडाली. शिवराय अशोक वायभट (रा. पिंपरनई) असं मयत मुलाचे नाव आहे.
 बीड येथील बेलेश्वर मंदिरात तीन दिवसीय सप्ताह सुरू आहे. या सप्ताहसाठी मंदिरात शिवराय व कुटुंबीय आले होते. सप्‍ताहात सुरू असलेल्‍या कार्यक्रमात कुटुंबीय लीन असताना मुलगा तेथून मंदिराच्‍या बाहेर पडला. आपला मुलगा न दिसल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. आजूबाजूच्‍या परिसरात देखील विचारपूस केली. परंतु, मुलगा दिसून आला नाही.

तलावाकाठी कपडे व चप्‍पल

या दरम्यान याच मंदिरा लगत असणाऱ्या तलावाच्या काठावर कपडे व चप्पल आढळली. यादरम्यान गावकाऱ्यांसह नेकनूर पोलिसांनी पाण्यात उतरून पाहिलं असता शिवरायचा मृतदेह मिळून आला. दरम्यान मयत शिवराय नेमकं पोहण्यासाठी तलावात गेला होता की त्याचा घातपात झाला? याचा तपास नेकनूर पोलीस करत आहेत.

मोठी बातमी! जिल्हाधिकाऱ्यांनी काढले पत्रक धाराशिव नव्हे उस्मानाबादच.


*काही दिवसांपूर्वीच उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्यात आलं आहे. मात्र आता पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांकडून पत्रक काढण्यात आलं आहे.

धाराशिव (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वीच उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे. मात्र आता या नामांतरावर आक्षेप घेण्यात येत आहे. उस्मानाबादच्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे. सध्या या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत सरकारी कार्यलयांनी उस्मानाबाद नावात बदल करू नयेत असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. याबाबत एक पत्रक जिल्हाधिकारी कार्यलयाकडून काढण्यात आलं आहे.

कार्यालयीन नावात बदल. 

उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यास केंद्र आणि राज्य शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर काही सरकारी कार्यालयांनी देखील नावात बदल केला होता. मात्र उस्मानाबादच्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे. अद्याप या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना सरकारी कार्यालयांनी जिल्ह्याच्या नावात बदल केल्याची बाब याचिकाकर्त्याच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच पत्रक 

त्यावर उच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत महसूल व इतर विभागाने संबंधित कोणत्याही कार्यालयाच्या नावात बदल करू नये अशी निर्देश दिले आहेत, कोर्टाच्या या आदेशाचा संदर्भ देत जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी 22 एप्रिल रोजी सर्वच विभागांसाठी पत्रक काढले असून, न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावं असं पत्रकात म्हटलं आहे.

Monday, April 24, 2023

वय झाले पण नोकरी मिळाली नाही तत्काळ अनुकंपा भरती करा. उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर कैफियत मांडत निवेदन सादर.


बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अनेक तरुणांची नावे अनुकंपाधारकांच्या यादीत असून, १० ते १२ वर्षांपासून हे तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. काही जणांचे तर वय झाले आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत घ्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील अनुकंपाधारकांनी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्याकडे करीत निवेदन सादर केले.

अनुकंपाधारकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील अनुकंपा सामाईक प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना फेब्रुवारी २०२३ या महिन्यात सर्व विभागांच्या रिक्त पदांचा आढावा घेतला. त्यानंतर अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. जिल्हाधिकारी सामायिक यादीमधून नाशिकमध्ये १२७ अनुकंपाधारकांची नियुक्ती केली आहे. बीड जिल्हा सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादीतील अनुकंपा उमेदवार असून, मागील अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.

रिक्त पदांचा आढावा घ्यावा.

पुणे, कोल्हापूर, नांदेड, परभणी, लातूर, नाशिक व इतर जिल्ह्यांत सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादीतून पात्र उमेदवारांना नोकरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातही सर्व विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत घ्यावे, त्यांच्या वयाचा विचार करता एजबार होण्यापूर्वी सेवेत घ्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील अनुकंपाधारकांनी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्याकडे करीत निवेदन सादर केले.

भूसंपादन मावेजा गैरव्यवहार प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन.


बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भूसंपादन मावेजा वाटपात अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. बनावट दस्तऐवज तयार करून संगनमताने अपहार करून तक्रारी नंतर संचिका गायब करण्यात आल्या आहे. या प्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांच्यासह अव्वल कारकून श्रीनिवास मुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी संबंधित शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन केले.

संचिका गहाळ प्रकरणात संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच चौकशीस जाणिवपूर्वक दिरंगाई केल्याबद्दल चौकशी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावीत करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेख युनुस, शेख मुस्ताक , शेख मुबीन, बलभीम उबाळे, मिलिंद सरपते, बाबासाहेब मेंगडे, गवळण मेंगडे, रावसाहेब मेंगडे, अमोल मेंगडे, भिमराव बांगर, विठ्ठल जाधव, विजय ईगडे आदी सहभागी होते. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, जलसंपदा मंत्री, विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

शासनाची दिशाभूल करत फसवणूक.

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी येथील गट क्रमांक १०० गाव तलाव क्र.५ मध्ये माझ्या जमिनीवर तलाव बांधण्यात आला आहे. तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी व अव्वल कारकून श्रीनिवास मुळे यांनी १ कोटी ४६ लाख रुपये बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची दिशाभूल करत फसवणूक केली. संबंधित प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करून मला मावेजा देण्यात यावा- बाबासाहेब मेंगडे, शेतकरी, मेंगडेवारी, ता. पाटोदा

केज तालुक्यातील कौडगांवात रूजतायेत समताधिष्ठित मुल्यांची पाळेमुळे. सुरुवात होतेय महामानवांची 132 वी सार्वजनिक जन्मोत्सवातुन.


  *महामानवाच्या जयंती उत्सवात पंचक्रोशीतील जनतेने उपस्थित रहावे- युवा जनशक्ती गृप कौडगांव* 

केज (प्रतिनिधी) :- शिव, फुले,शाहू ,आंबेडकर , अण्णाभाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि तो देशभरात ओळखला जातो हे खर आहे आणि याच देशात आणि ह्याच पुरोगामी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यात कवडगाव असे खेडेगाव आहे की जिथे शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्याचे ठरविले जाते ते प्रत्यक्षात उतरवून  जयंती उत्सवात जातीचे बंधणे झुंगारून महापुरुषांना जातीच्या चौकटीत बांधून न ठेवता गावातील गावगाड्यातील सर्व समाज सर्व स्तरातील लोक सहभागी होतात महापुरुषांना मानवंदना देतात आणि हा लोकोत्सव साजरा करतात.
असाच प्रत्यय व तीच भूमिका घेऊन गावातील समविचारी समाजबांधवांनी एकत्रित येऊन ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या थाटामाटात सार्वजनिक आणि नागरी स्वरूपात दोन दिवसीय साजरे करण्याचं नियोजन केलं आणि हे नियोजन हा कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने गावातील गावगाड्यातील लोकांचा एक सण आणि लोकोत्सव ठरणारा आगळा वेगळं नियोजन करून 26एप्रिल ते 27 एप्रिल 2023 या दोन दिवशीय केलं आहे.
एके काळी कौडगाव मध्ये मातंग ,महार विरूद्ध गावातील बाकीचा सर्व जातीय समाज हा संघर्ष नेहमी पहायला मिळायचा काही अपवादात्मक लोकांच्या डोक्यातील जातिय मानसिकतेची किडे वळवळ करून गावात दोन्ही गटात भांडणे व्हायची यात पोलिस केस ,कोर्ट कचेरी होऊन ,ऍट्राॅसिटी ऍक्टनुसार  वर्षात किमान एक तरी गुन्हा नोंद व्हायचा व गावात तणावपूर्ण वातावरण रहायचे परंतू काळाच्या ओघामध्ये परिवर्तनाची नांदी ठरून लोकांच्या मानसिकतेत बदल होऊन एकोप्याची भावना निर्माण झाली आहे 
   त्याला एक मुख्य कारण आहे गेली एक दशक गावामध्ये भीतीच दबावाचं आकसदायी राजकारणाचा प्रवाह वाहत होता आणि या राजकारणाच्या प्रवाहात भरडला जात होता गावातील सर्वसामान्य नागरिक, गावातील लोकांना सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठीची एकप्रकारची मुभाच नव्हती असं जाणिवपूर्वक नमूद करावेसे वाटते.
 लोक भीतीपोटी सार्वजनिक कार्यक्रम करायचे नाहीत याचं मुख्य रोख जात होता गेली दहा वर्षे सत्ता भोगत  असलेल्या राजकारण्यांना आणि त्यांच्या बगलबच्चांना त्याचं कारण असं की सत्ताधारी जरी बाहेरच्या तालुक्यांमध्ये किंवा दुसर्या जिल्ह्यामध्ये राहत असले तर त्यांची बगलबच्चे मात्र गावांमध्ये सतत भांडण लावून देण्याचे आणि गावातील लोकांना त्रास देण्याचे काम करायचे,माजी सत्ताधारी त्यावेळी सरपंचांच्या खुर्चीवर विराजमान असलेल्या सरपंच पती नेहमी बाहेरगावची ,परळी,केज,बीड शहरातील टवाळखोर गुंड प्रवृत्तीचे लोक आणून गावातील लोकांना मोगमी अर्वाच भाषेत धमाकून दहशत निर्माण करायचे ती दहशत निर्माण होऊन  त्यातून गावामध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले होते लोक सार्वजनिक ठिकाणी जास्त थांबायचे नाहीत सार्वजनिक ठिकाणी जास्त वेळ न थांबता आपापले काम करण्यासाठी शेतात निघून जायचे पण म्हणतात ना काळाच्या ओघांत एक ना एक दिवस कोणालाही पडद्याआड व्हावंच लागतं व जणता त्यांना एक ना एक दिवस हिसका दाखवतच असते म्हणून  2023 च्या कौडगाव ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणूकीत  या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकमताने एकत्र येऊन माझी सत्ताधाऱ्यांना इंगा दाखवून त्यांना घरी बसवण्याचं काम या कौडगावतील सुज्ञ जनतेने केलं  तरीही माजी सत्ताधाऱ्यांना पराभव पचनी पडलाच नाही मतदानाच्या दिवशी तर धिंगाना केलाच परंतू निकालानंतरही पोलिसांच्या उपस्थितीत शांतता पूर्ण विजयी मिरवणूकीत मिरवणूकीत सहभागी लोकांना शिविगाळ करून कुरापती काढण्याचं काम केलं होतं परंतू पुढील बाजूच्या व पोलिसांच्या सामंजस्य भूमिकेमुळे वाद पेटला नाही   पण शेवटी जनतेने घरचा आहेर दिलाच हे खरे.
   खऱ्या अर्थाने गावकऱ्यांची कातीनच निघून गेली असल्याची जनभावना सर्वसामान्य लोकांमधून व्यक्त होतं आहे.
ह्याच मोकळ्या वातावरणातून गावातील सर्व स्तरातील लोक विविध उपक्रम , कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपात साजरे करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
 गावात भांडण तंटा नाही लोक  गुण्यागोविंदाने नांदत असून   वेगवेगळ्या कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी साजरे करून गावाचा एकोपा टिकून ठेवण्याचे काम येथील जनता करत आहे त्याचाच एक भाग म्हणून भव्य दिव्य ज्ञानसूर्य डॉ ‌बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जन्मोत्सव साजरा होत आहे आणि ह्याच जन्मोत्सवामधील कार्यक्रमांचा एक भाग म्हणून गावातील मुळ भुमिपुत्र असलेले परंतू विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत राहून आपलं समाजपयोगी योगदान देणार्या मान्यवरांचा नागरि सत्कार करून त्यांना प्रेरणा मिळावी अशाही कार्यक्रमाचं नियोजन दिनांक 26 एप्रिल रोजी करण्यात आले असून प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा नियोजन करून दुसर्या दिवशी सकाळी सार्वजनिक सामुदायिक बुद्धवंदना व ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार असून दुपारी भव्य मिरवणूक निघणार असून त्यानंतर स्नेहभोजनाच कार्यक्रम होऊन रात्री प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होणार आहे तरी या सदर  आगळ्या वेगळ्या कार्यमाला पंचक्रोशीतील हजारो जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा जनशक्ती गृप यांच्या वतीने करण्यात आले आहे.

*-जेव्हा समाजामध्ये समानता एकत्र असण्याची भावना समान विचार समान चेतना लोकांमध्ये एकमेकांबद्दल संवेदना असेल तरच राष्ट्र अधिक समर्थ बनेल ही बाबासाहेबांची समताधिष्ठित राष्ट्र संकल्पना होती हाच विचार आम्ही उराशी बाळगून ह्या वर्षीपासून दरवर्षी शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांची जयंती एकत्रित साजरी करून विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवणार आहोत आणि याची सुरुवात आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची132 वी सार्वजनिक नागरी जयंती उत्सव साजरा करून नव्याने सुरुवात करत आहोत तरी बनसारोळा,होळ जि.प. सर्कल मधील तसेच केज तालुक्यातील आणि पंचक्रोशीतील जनतेला आवाहन करत आहोत की त्यांनी या जयंती उत्सवात सहभागी व्हावे.

       

धारूर घाटातून जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास. गेल्या चार वर्षांपासून घाटाचे रुंदीकरण रखडले. अरुंद रस्त्यामुळे आता पर्यंत ५० बळी.


धारूर (प्रतिनिधी) : शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५४८-सी चे काम करताना धुनकवड पाटी ते धारुर घाटासह शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतच बारा किलोमीटर रस्ता अरुंदच ठेवून फक्त वरवर डागडुजी करण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून हा रस्ता अरुंदच राहिल्याने धारुर घाटाचे रुंदीकरण रखडल्याने हा अपघात मार्ग झाला आहे. आतापर्यंत ५० जणांचे बळी या रस्त्याने घेतले आहेत. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

धारुर शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४८-सी हा खामगाव-पंढरपूर पालखी मार्ग गेल्यावर या परिसरातील या मार्गावरील गावांनी खूप आनंद व्यक्त केला; मात्र या रस्त्याचे काम होताना धुनकवड पाटी ते धारुर शहरातील भारतरत्न डॉ. आंबेडकर चौक हे बारा किलोमीटर रस्त्याचे काम रुंदीकरण न करता आहे त्या रस्त्यावर फक्त डागडुजी करून हे काम आटोपण्यात आले. आरणवाडी साठवण तलावाच्या बाजूने डोंगराचे पायथ्यापासून दोन किलोमीटर रस्ता करण्यात आला. अवघड वळणामुळे हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा रस्ता झाला आहे. धारुर घाटातही तीन किलोमीटरपर्यंत एका बाजूने खोलदरी, अवघड वळणे, खोल दरीच्या बाजूने रोडबरोबर आलेली संरक्षण भिंत यामुळे रस्ता अरुंद बनला आहे. यामुळे या रस्त्यावरून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. वाहन दरीत कोसळणाऱ्या घटना तर नियमित झाल्या आहेत. घाटात अपघाताचे प्रमाण वाढले असून रोजच लहान, मोठे अपघात होत आहेत. आतापर्यंत पन्नासपेक्षा जास्त बळी या घाटाने व अवघड वळण रस्त्याने घेतले आहेत. घाटात नेहमीच वाहतूकही ठप्प होते. चार वर्षे होऊनही एमएसआरडीसीचे अधिकारी घाट रुंदीकरणाकडे मात्र दुर्लक्ष करीत आहेत.

धारुर घाट रुंदीकरण तत्काळ करा.

या रस्त्याने वाहनाची वर्दळ वाढली आहे. धारुर घाट व साठवण तलावाशेजारचा पर्यायी रस्ता अरुंद असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे तत्काळ घाटाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बंडोबा सावंत यांनी केली आहे.

परवानगी मिळताच काम करू.

धारुर येथील घाटातील रुंदीकरणासाठीचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळास पाठविण्यात आला आहे. परवानगी मिळताच हे काम तत्काळ सुरू करण्यात येईल, असे एमएसआरडीसीचे उपअभियंता अतुल कोटेचा यांनी सांगीतले.

पोलिसांचा देखील पाठपुरावा सुरु. 

धारुर घाटात वाहनांची वर्दळ वाढल्याने अपघात होत आहेत. यामुळे वाहनांची कोंडी होत आहे. यामुळे पोलिसांनाही सतत याकडे लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे तत्काळ रुंदीकरण करण्यासाठी संबंधित खात्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे धारुरचे सहायक पोलिस निरीक्षक व्ही. एस. अटोळे यांनी सांगितले.

सावध व्हा ! बाजार समितीला ते गुटखा, जुगार अन् वाळूचा अड्डा बनवतील - याेगेश क्षीरसागर.

बीड (प्रतिनिधी) : आमदार म्हणतात आमच्या घरातील एकही उमेदवार नगरपालिका निवडणूक लढवणार नाही. मात्र आता यांच्या घरात राहिलंच कोण आहे ? जो नगरपालिका निवडणूक लढेल. कुणाला सोडलंचं नाही यांनी त्रास द्यायचा, मग यांच्या सोबत कोण कसं राहील अशी टीका नगरसेवक याेगेश क्षीरसागर  यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर केली. 
नगरसेवक योगेश क्षीरसागर हे बीडमध्ये बाजार समिती निवडणूकीच्या जाहीर कार्यक्रमात बोलत होते. मी अगोदर पासून म्हणत होतो, हे चांगले नाहीत. आता व्हिडिओ व्हायरल होत आहेत असं म्हणत नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी भाऊ संदीप क्षीरसागरांवर टीकास्त्र सोडत धक्काबुक्कीच्या व्हिडिओवर जाहीर भाष्य केलं.

जर यांच्या ताब्यात बाजार समिती गेली तर ते हमालांना देखील सोडणार नाहीत. हमालांकडून देखील 50 रुपये का होईना टक्केवारी घेतील असा सणसणीत टाेला योगेश क्षीरसागर यांनी भाऊ संदीप क्षीरसागरांना लगावला आहे.

ते पुढे म्हणाले, की यांच्यासोबत जे आहेत ते जुगार, गुटखा, वाळूच्या धंद्यावाल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत यांच्या बाहेरच्या गोडाऊनवर कारवाया झाल्या. मात्र यांच्या ताब्यात जर बाजार समिती गेली तर मग बाजार समितीचे एक नंबरचे गोडाऊन गुटख्यासाठी, दोन नंबरचा गोडाऊनमध्ये जुगार अड्डा आणि तीन नंबरच्या गोडाऊनमध्ये वाळूचा स्टॉक असं हे करतील.

त्यामुळे व्यापारी आणि हमाल बांधवांना जगणं मुश्किल होईल असं म्हणत योगेश क्षीरसागर यांनी भाजप, शिंदे गट, ठाकरे गट यांनी एकत्रित मिळून केलेल्या पॅनलवर टीकास्त्र सोडले.

पोलिसांची जुगार अड्डयावर धाड.२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त ७ जणांना अटक.

पिंपळनेर (प्रतिनिधी) : अक्षय तृतीयाला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असतो. यानुसार बीडच्या माळस जवळा गावात पोलीसांनी जुगार अड्डयावर धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत २ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करत ७ जणांना अटक केली आहे.
बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या माळस जवळा फाट्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकली. यामध्ये २ लाख १८ हजारांच्या मुद्देमाल जप्‍त केला आहे. माळस जवळा फाट्यावर हॉटेलच्या शेजारी खुल्या छपरामध्ये नितीन चिंतामण खांडे यांच्या मालकीच्या जुगाराच्या अड्ड्यावर हा छापा मारण्यात आला.

७ जणांना अटक

पोलिसांनी केलेल्‍या या कारवाईत ७ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. यात शेख शकीर शेख दगडू (रा. पिंपळनेर), नितीन चिंतामण खांडे (रा. पिंपळगाव), दिनकर सुदाम माने (रा. पिंपळगाव), दत्तू दुधाची पवार (रा. गंगनाथवाडी), प्रकाश मोतीराम कानडे (रा. रजाकपूर), सय्यद अफसर अब्दुल (रा. माळस जवळा), विठ्ठल साहेबराव कानडे (रा. रजाकपूर) असे पकडण्यात आलेल्या जुगाऱ्यांचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीएनएसच्या वापरात बीड राज्यात प्रथम. पुणे पोलिस राज्यात तळाला. केवळ ३८ टक्के गुण.


पुणे (प्रतिनिधी): देशभरातील गुन्ह्यांची तसेच गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या ‘क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम’(सीसीटीएनएस) प्रणालीच्या वापरात पुणेपोलिस विभाग अगदीच काठावर पास झाला आहे. शहरातील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी तसेच अवघड गुन्ह्यांची उकल करण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होतो. सीसीटीएनएस प्रणालीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून, त्यात पुणे पोलिस राज्यात अगदीच तळाला असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, बीड हे शहर राज्यात प्रथम आले आहे.

देशभरात सीसीटीएनएस ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचा फेब्रुवारी २०२३ चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यात पुणे पोलिसांना ३४२ पैकी केवळ १३० (३८ टक्के) असे सर्वात कमी गुण मिळाले आहेत. बीड पोलिसांनी मात्र ३४२ पैकी ३३५ गुण (९८ टक्के) मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसरीकडे पुणे पोलिसांच्या थोडेसे पुढे पुणे ग्रामीण पोलिस असून, त्यांना ३४२ पैकी १४७ गुण (४३ टक्के) मिळाले आहेत.

गेल्या वर्षी राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने घेतलेल्या सर्वोत्कृष्ट पोलीस घटक स्पर्धेत पुणे पोलीस दलास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. उत्कृष्ट कार्यपद्धती, गुन्हेगारी प्रतिबंध, गुन्ह्यांचा त्वरित तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना प्रोत्साहित करण्यासाठीच्या योजना, अशा निकषांमध्ये पुणे पोलिस अव्वल ठरले होते.

काय आहे सीसीटीएनएस प्रणाली?

देशभरातील गुन्ह्यांची तसेच गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. त्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), गुन्हेगारांची माहिती ऑनलाइन नोंदविली जाते. या यंत्रणेला सीसीटीएनएस प्रणाली म्हणून ओळखले जाते. या प्रणालीमुळे कोणत्याही पोलिसांना देशभरातील गुन्हेगारांची माहिती उपलब्ध होऊ शकते.

७ प्रकारची माहिती भरणे आवश्यक

सीसीटीएनएस प्रणालीमध्ये ७ प्रकारची माहिती भरणे आवश्यक असते. त्यात प्रथम एफआयआर, गुन्ह्यांचा तपशील, गुन्हेगारांची अटक, मालमत्ता तपासणी, मुद्देमाल जप्त, हत्यार जप्ती, कोर्ट निर्णय याची माहिती या प्रणालीवर नोंदविली गेली पाहिजे. याशिवाय बेपत्ता व्यक्ती, मयत अनोळखी व्यक्तींची नोंद, गुन्हेगारी टोळ्या, त्यांचे सदस्य अशा विविध गुन्हेगारांशी संबंधित माहिती या प्रणालीवर भरणे आवश्यक असते.

पुणे पोलिस आयुक्तालयाच्या ३३ पोलिस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आलेल्या सर्व गुन्ह्यांची नोंद सीसीटीएनएसवर करणे आवश्यक असते. यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यातील ५ ते ६ जणांना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अनेकदा बंदोबस्त, शनिवार, रविवार सुट्या यामुळे अनेक पोलिस ठाण्यांमधील गुन्हे तसेच इतर बाबींची सीसीटीएनएसवर नोंद होताना दिसत नाही. त्याचा परिणाम महिन्याच्या प्रगती पुस्तकावर दिसून येतो. सध्याच्या पेंडन्सीमुळे पुणे पोलिसांचा क्रमांक तळाला गेला आहे.

पुणे ग्रामीणही मागेच

पुणे पोलिस आयुक्तालयापाठोपाठ पुणे ग्रामीण पोलिस दलही यामध्ये खूप मागे आहे. विशेष म्हणजे डिसेबर २०२१ मध्ये पुणे पोलिस आयुक्तालयाला ७४ टक्के गुण मिळाले होते. त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण पोलिस दलाला ८४ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर आता पुणे ग्रामीणची ४४ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे

मलनाथपुर येथे ष.ब्र १०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांच्या हस्ते महादेव मंदिर भूमिपूजन संपन्न.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी): मलनाथपुर ता परळी येथे अक्षयतृतीय व महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मुहूर्तावर महादेव मंदिर पायाभरणी भूमिपूजन ष.ब्र १०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांच्या हस्ते व शिवा भरडे महाराज खंडोबा देवस्थान मोगरा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी श्रीगुरूंनी सर्वांना उपदेश करताना महादेव हे आराध्य दैवत असून गावात महादेव मंदिर असावे असे सांगून भक्तीचे विविध मार्ग सांगितले व महात्मा बसवेश्वर यांच्या जन्मोत्सव निमित्त महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.पूजाविधी शिवदास स्वामी यांनी पार पडला.
यावेळी भजनी मंडळ नागापूर यांनी ही सेवा दिली.मंदिरासाठी जागा भरडे परिवाराकडून दान देण्यात आली आहे.यावेळी सरपंच जगन्नाथराव मुसळे वकिलसाहेब,आदर्श शिक्षक अशोक नावंदे,सुभाष रुपनर पाटील,देवराव पत्रावळे, सुभाष नावंदे,वामन माने,श्रीहरी मुसळे,पंढरीनाथ माने, गोविंदराव खडके, माणिक थोरवे,सर्जेराव हेगडकर, मारोती मुसळे, गणपती भांड,बाबासाहेब खडके,बापूराव सलगर,अच्युत माने,निवृत्ती कोरडे, बापूराव कोरडे, शिवाजी खोडवे, बळीराम मस्के,उत्तम मुसळे,कांताराम सलगर,पांडुरंग सलगर,लक्षीमन सलगर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीरशैव समाज मलनाथपुर यांनी परिश्रम घेतले.

Sunday, April 23, 2023

युवा नेते अभिजीत कुडे यांचे कार्य उन्हाळ्याच्या सुट्टीत गावातील मुलांना देत आहेत शिक्षणाचे धडे.

वरोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील Ukharda येथे उन्हाळ्याच्या सुट्टीत मंदिरात गावातील मुलांना शिक्षणाचे धडे दिले जात आहे. लॉक डाऊन मध्ये सर्वांचीच शाळा बंद असताना इथे मंदिरात शाळा सुरू होती. गावातील युवकांनी पुढाकार घेऊन अनेक स्पर्धा  आयोजित केल्या.  सुरळीत शाळा सुरू होती. 
आता पुन्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत मंदिरात शाळा सुरू करण्यात आली. 
 अभिजीत कुडे गावातील चिमुकल्या मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे.  इंग्लिश व्याकरण, मराठी, गणित सर्व प्रकाराचे वर्ग सुरू करण्यात आले.  सायंकाळी 5:30 ते 7 हे वर्ग सुरू आहे.  मोफत शिकवणीला मुलांचा जबरदस्त प्रतिसाद आहे.  अंगणवाडी ते  8 पर्यंत असे  50,54 विद्यार्थी दररोज येत आहे. विविध प्रकारच्या स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहे. 
लॉक डाऊन मध्ये देखील अभिजित नि सर्व नियमांचे पालन करत गावातील मंदिरात शाळा सुरू केली होती.  आता पुन्हा त्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे आपल्या वेळ गावातील मुलांना सत्कार्यासाठी जावा असे त्याला वाटतेच.  मुलांची संख्या वाढली आहे त्यामुळे 2 बॅच करणार. मुलांमधे उत्साह आहे, शिक्षणाची आवड आहे त्यामुळे मला पण आनंद मिळतो..मुलांचे प्रेम मिळत .दिवसातून 1 तास मी गावातील मुलांना शिकविण्यास देत आहे याचे फार समाधान आहे. 4 दिवस झाले वर्ग सुरू आहे.  हनुमान मंदिराच्या हॉल मध्ये चालू आहे.

महाराष्ट्राला पुढील 4-5 दिवस ‘यलो’ अलर्ट, ‘या’ भागात गारपीटीचा इशारा.


मुंबई - महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुढचे चार ते पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला अलर्ट देण्यात आला आहे.

२४ एप्रिल ते २७ एप्रिलपर्यंत या भागांत विजांच्या गडगडाटांसह, वादळी मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, येत्या २ ते ३ दिवसांत विदर्भात मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाट, जोरदार वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
तर उद्या सोमवारी (दि.२४) विदर्भात काही ठिकाणी गारपीटीची शक्यता असल्याचे देखील IMD पुणे, चे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये सांगितले आहे

बापरे! कोरोना काळात झाले तब्बल 20 हजार बालविवाह .बीड जिल्ह्यातील धक्कादायक वास्तव समोर.

बीड (प्रतिनिधी)  : बीड जिल्ह्यात बालविवाहाचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. ज्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना काळात एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास 20 हजारपेक्षा जास्त बालविवाह झाल्याची माहिती बालहक्क कार्यकर्ता तथा सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी दिली आहे. युनिसेफच्या आकडेवारीनंतर हा दावा करण्यात करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड  जिल्ह्यामध्ये वारंवार बालविवाह होत असल्याच्या बातम्या समोर येत असतात. ज्यामुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच पुन्हा एकदा बालविवाहाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास 20 हजार पेक्षा जास्त बालविवाह झाले आहेत. हे सगळे बालविवाह कोरोना  काळात झाल्याचेही समोर आले आहे.

याबद्दल बोलताना तत्वशील कांबळे म्हणाले की, "की बीड जिल्हा प्रामुख्याने ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातून ऊसतोडणीसह इतर कामांसाठी जवळपास दहा ते बारा लाख कामगार लोकं स्थलांतरीत होतात. यामुळं आपल्या किशोर वयात आलेल्या मुलींना आपल्या सोबत कसं घेऊन जायचं ? समाजात दररोज एक ना अनेक घटना घडतात, यामुळे आपल्या मुलींची असुरक्षितता मनात ठेवून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बाल विवाह होत आहेत."

तसेच याबद्दल पुढे बोलताना "जर आज शाळेतील मुलींची संख्या पाहिली, तर अतिशय कमी झालेली आहे. पुर्वी एका शाळेत जवळपास 50 मुली असायच्या. मात्र आता जर पाहिलं तर दहा ते पंधरा मुली एका शाळेत आहेत. त्यामुळे या मुली नेमकं गेल्या कुठं असा प्रश्न देखील, असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, बालविवाहाचे हे धक्कादायक वास्तव चिंतादायक असल्याचेही ते यावेळी म्हणाले आहेत.