बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या माळस जवळा फाट्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकली. यामध्ये २ लाख १८ हजारांच्या मुद्देमाल जप्त केला आहे. माळस जवळा फाट्यावर हॉटेलच्या शेजारी खुल्या छपरामध्ये नितीन चिंतामण खांडे यांच्या मालकीच्या जुगाराच्या अड्ड्यावर हा छापा मारण्यात आला.
७ जणांना अटक
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ७ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. यात शेख शकीर शेख दगडू (रा. पिंपळनेर), नितीन चिंतामण खांडे (रा. पिंपळगाव), दिनकर सुदाम माने (रा. पिंपळगाव), दत्तू दुधाची पवार (रा. गंगनाथवाडी), प्रकाश मोतीराम कानडे (रा. रजाकपूर), सय्यद अफसर अब्दुल (रा. माळस जवळा), विठ्ठल साहेबराव कानडे (रा. रजाकपूर) असे पकडण्यात आलेल्या जुगाऱ्यांचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
No comments:
Post a Comment