Sunday, April 23, 2023

बापरे! कोरोना काळात झाले तब्बल 20 हजार बालविवाह .बीड जिल्ह्यातील धक्कादायक वास्तव समोर.

बीड (प्रतिनिधी)  : बीड जिल्ह्यात बालविवाहाचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. ज्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना काळात एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास 20 हजारपेक्षा जास्त बालविवाह झाल्याची माहिती बालहक्क कार्यकर्ता तथा सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी दिली आहे. युनिसेफच्या आकडेवारीनंतर हा दावा करण्यात करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड  जिल्ह्यामध्ये वारंवार बालविवाह होत असल्याच्या बातम्या समोर येत असतात. ज्यामुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच पुन्हा एकदा बालविवाहाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास 20 हजार पेक्षा जास्त बालविवाह झाले आहेत. हे सगळे बालविवाह कोरोना  काळात झाल्याचेही समोर आले आहे.

याबद्दल बोलताना तत्वशील कांबळे म्हणाले की, "की बीड जिल्हा प्रामुख्याने ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातून ऊसतोडणीसह इतर कामांसाठी जवळपास दहा ते बारा लाख कामगार लोकं स्थलांतरीत होतात. यामुळं आपल्या किशोर वयात आलेल्या मुलींना आपल्या सोबत कसं घेऊन जायचं ? समाजात दररोज एक ना अनेक घटना घडतात, यामुळे आपल्या मुलींची असुरक्षितता मनात ठेवून बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बाल विवाह होत आहेत."

तसेच याबद्दल पुढे बोलताना "जर आज शाळेतील मुलींची संख्या पाहिली, तर अतिशय कमी झालेली आहे. पुर्वी एका शाळेत जवळपास 50 मुली असायच्या. मात्र आता जर पाहिलं तर दहा ते पंधरा मुली एका शाळेत आहेत. त्यामुळे या मुली नेमकं गेल्या कुठं असा प्रश्न देखील, असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, बालविवाहाचे हे धक्कादायक वास्तव चिंतादायक असल्याचेही ते यावेळी म्हणाले आहेत.

No comments:

Post a Comment