अहमदनगरच्या हादगाव येथून धाराशिवला कत्तलीसाठी अवैध जनावरे घेऊन जाणारा टेम्पो, आष्टी शहरातून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी आष्टी शहरातील किनारा चौकात सापळा लावून हा टेम्पो अडवला. यात एकाच टेम्पोत खाली 52 आणि वर फळ्यावर 50 अशी 102 जनावरे दिसून आली. ही जनावरे अक्षरश: एकावर एक दाटीवाटीत होती.
गर्दीमुळे एकमेकांना घासल्याने त्यांना जखमाही झाल्या होत्या. यात काही लहान वासरेही होती. याच दाटीवाटीमुळे टेम्पोमध्येचं 21 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर जनावरांची सुटका करून पोलिसांनी त्यांना कर्जत तालुक्यातील कामधेनूनगर येथील दगडवाडीतील श्री रुक्मिणी माता गोशाळेत दाखल केले.
मात्र अति जखम आणि त्रास झाल्याने यातील 40 लहान वासरे आणि 5 गायी अशा 45 जनावरांचा दोन दिवसांत मृत्यू झाला. तर इतर 36 जनावरांचीही रोगप्रतिकारशक्ती नाजूक असून अन्न, पाणी वर्ज केल्याने त्यांचीही प्रकृती नाजुक आहे.
दरम्यान याप्रकरणी बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात, टेम्पो चालक जलाल शेख वय 23 रा. हादगाव जि. अहमदनगर व टेम्पो मालक फिरोज रशीद शेख रा.धाराशिव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
No comments:
Post a Comment