Sunday, October 29, 2023

परळी तालुक्यातील युवकाची मराठा आरक्षणासाठी आत्महत्या. गळफास लावून जीवन संपवले.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  मराठा आरक्षणासाठी आता तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. काल अंबाजोगाई येथील गिरवली येथे तरुणाने पाण्याच्या टाकीवरून उडी मारत आपले जीवन संपवले होते. ही या घटनेला 24 तास होण्याआधीच परळी तालुक्यातील गोवर्धन येथे एका युवकाने गळफास घेत आपले जीवन संपवण्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मराठा आरक्षणाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. आरक्षणासाठी अनेक युवक आपले जीवन संपवत आहेत. गंगाभीषण रामराव मोरे, वय 33, राहणार गोवर्धन हिवरा या युवकाने घरात गळफास घेत आपले जीवन संपवले. गांगभिषण यांना 3 छोट्या मुली, पत्नी आणि आईवडील असा परिवार आहे. मराठा आरक्षणाची धग आता ग्रामीण भागात वाढतांना दिसत आहे. गोवर्धन येथील घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

सर देवाचे घर कुठे आहे त्यांचा नंबर द्या.... सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या; तर मुलीचे मुख्यमंत्र्यांना हृदयपिळवणारे पत्र.!


हिंगोली (प्रतिनिधी) हिंगोली जिल्ह्या तील एका शेतकऱ्याने सततच्या नापिकी मुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मागील आठवड्यात घडली. तर या घटनेने सदर शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आपले वडील गमवलेल्या मुलीने; हृदयपिळवणारे पत्र ज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहले आहे.

शेगाव खोडके येथील शेतकरी नारायण खोडके यांनी सततच्या नापिकीमुळे आत्महत्या केल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. त्यानंतर इयता आठवीत मध्ये शिक्षण घेत असलेली त्यांची मुलगी किरण खोडके हिने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र पाठवले. ही चिमुकली आपल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी उद्देशुन म्हणते की; तुमचा दसरा चांगला गेला असेल आणि दिवाळी ही चांगली जाईल.! पण आमच्या घरी दसराही नाही आणि दिवाळी ही नाही. आई सतत रडत असते. सोयाबीनला भाव असता तर तुझा बाबा वारला नसता; असे सांगते. घरातुन गेलेला बाबा पुन्हा आलाच नाही. आजीला विचारले तर ती म्हणते बाबा देवा घरी गेले. सर देवाचे घर कुठे आहे त्यांचा नंबर द्या आणि माझ्या बाबाला पाठवा असे भावणिक पत्र मुख्यमंत्री यांना लिहिले.


Friday, October 27, 2023

मराठा आरक्षणासाठी युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

परभणी (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाची मागणी करीत एका 35 वर्षीय युवकाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना आज शुक्रवारी (दि.27) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस कर्मचारी धावत गेल्यामुळे त्याला रोखण्यात यश आले असून मोठा अनर्थ टळला. नवा मोंढा पोलिसांनी युवकास ताब्यात घेतले आहे. त्या युवकाचे नाव आतिश बाबुराव गरड रा.शिवनेरी नगर, जुना पेडगाव रोड, परभणी) असे आहे.

राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना, परभणीमध्ये आतिश गरड या युवकाने आरक्षणाच्या मागणीसाठी, अंगावर पेट्रोल टाकून स्वतः ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे, या मागणीसाठी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते. परंतु वेळीच पोलीस कर्मचारी मोईन खान, शिवा काळे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. घटनेनंतर संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले आहे. परंतु अचानक झालेल्या या प्रकारामुळे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोंधळ उडाला होता. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी, तीव्र घोषणाबाजी करत सरकारचा निषेधही केला. पोलीस निरीक्षक संजय अनमुलवार यांनी त्या युवकाने पेट्रोल भरून सोबत आणलेली प्लास्टिक बाटली ताब्यात घेतली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाच्या उपाध्यक्षपदी डॉ.संतोष मुंडें.

*ना. धनंजय मुंडे यांचे डॉ. संतोष मुंडेंनी मानले विशेष आभार. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानासाठी डॉ. संतोष मुंडेंची उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे व महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या प्रयत्नांतून निवड झाल्याबद्दल डॉ. संतोष मुंडेंनी आभार मानत अजून जोमाने दिव्यांग कल्याण्यासाठी काम करत राहू असा निर्धार व्यक्त केला

सातत्याने ना. धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली समाजातील दिव्यांग, निराधार, विधवा आदी वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी डॉ. संतोष मुंडे हे सातत्याने कार्यरत असतात. आपल्या निवडीबद्दल ना. धनंजय मुंडेंचे विशेष आभार डॉ. संतोष मुंडेंनी मानले.

*कोण आहेत डॉक्टर संतोष मुंडे?*
           मुळचे नाथऱ्याचे असलेले डॉ. संतोष मुंडे हे पेशाने डॉक्टर आहेत. मुळातच समाजकार्याचे बाळकडू आणि सामाजिक सेवेचा वारसा असलेले डॉक्टर कायमच अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी कार्यरत असतात. गेल्या सहा वर्षांपासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. तसेच हिंगोली व परभणी जिल्ह्याचे प्रभारी आहेत. धनंजय मुंडे आरोग्य योजनेचे प्रदेश अध्यक्ष म्हणून राज्यात वैद्यकीय सेवा क्षेत्रात ते काम करत असतात. सोबतच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकलचरचे संचालक.
गेल्या पंधरा वर्षापासुन डॉ.संतोष मुंडे यांनी डॉक्टर व्यवसायाच्या माध्यमातुन सामाजिक कार्यास सुरुवात केली आहे. मुळातच डॉ.संतोष मुंडे  यांनी सामाजिक कार्यात हिरारीने भाग घेऊन कार्य करणे हा त्यांचा छंद आहे. डॉक्टर झाल्यापासुन संतोष मुंडे यांनी अनेक रुग्णांना मोफत उपचार व औषधे दिली आहेत. जेष्ठ नागरीकांना मोफत तपासणी ही योजना त्यांच्या श्रीनाथ रुग्णालयातुन सुरु केली असुन ती अखंडित आहे. याच सामाजिक कार्यातुन डॉ.संतोष मुंडे यांनी अपंगांच्या प्रश्‍नावर आवाज उठविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून हजारो अपंगांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
देशातील लाखों अपंगांना त्यांच्या न्याय हक्कासाठी डॉ. संतोष मुंडे यांनी संसदेवरदेखील मोर्चा काढलेला आहे. या मोर्चाची केंद्र सरकारने दखल घेतली असुन विविध २१ प्रकारच्या अपंगांना त्यांचे अपंगांचे ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात केंद्र सरकारला भाग पाडले. 
विशेष म्हणजे या सर्व कार्याची दखल घेवुन ना. धनंजय मुंडे व ना.बच्चुभाऊ कडु यांनी डॉ.संतोष मुंडे यांच्यावर महाराष्ट्र शासनाच्या "दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी" अभियानासाठी राज्य उपाध्यक्ष पदी निवड करून त्यांना नवीन जिम्मेदारी दिली आहे.
तसेच ३८०० गरजूंना मोफत श्रवणयंत्र (कान मशिन), १६०० कुबड्या, तीन चाकी सायकल यासह विविध साहित्य अपंगांना वाटप केले असुन अनेकांचे किडनी, कॅन्सर, ब्रेन ट्युमर, मोतीबिंदू  यासह विविध आजारावर मोफत उपचार करुन दिले आहेत.
परळी नगर परिषदसह जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत दिव्यांगांना एक कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिलेला आहे.
हजारो दिव्यांगांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. यासोबतच तब्बल साडे चार हजार दिव्यांग, जेष्ठ नागरिक, विधवा आदींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. शासनाच्या विविध योजनेचा ही अपंगांनाही लाभ मिळवुन दिला आहे. अपंगांसोबत शेतकरी, शेतमजुर व सर्वसामान्य जनतेला दुष्काळाच्या व करोना परिस्थितीमध्ये परळी डॉक्टर मेडीकल असोसिएशनच्या माध्यमातुन वेळप्रसंगी मोफत उपचार दिले आहेत.

डॉ.संतोष मुंडे हे परळी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होते तेव्हा शासनाच्या विविध आरोग्य योजना जनतेला मिळवुन देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच बालाजीच्या धर्तीवर वैद्यनाथ मंदिरात अपंगांसाठी दर्शन सुविधा उपलब्ध करुन दिली. फक्त अपंगांपुरतेच कार्य नव्हे तर सर्वसामान्य जनतेसाठी त्यांचे कार्य सुरु असते.
या सर्व कार्याची दखल घेऊन देश विदेशातील विविध संघटनांनी त्यांचा गौरव केला आहे. यात परळी भूषण, गोवा युथ आयकॉन, लंडनमध्ये युवा आयकॉन, लोकरत्न रोटरी भूषण आदी पुरस्कारांचा समावेश आहे.

मोठी बातमी! माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं दीर्घ आजाराने निधन .


शेतकरी, बेरोजगारी आणि ऊसतोड कामगारांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे लढवय्ये नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले

वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे आहेत.

संघर्षशील नेते अशी बबनराव ढाकणे यांची ओळख होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांच्यावर अहमदनगरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. निमोनियाचं निदान झाले होते. तीन आठवड्यांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. काल, गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली. यात त्यांचे निधन झाले.

पंचायत समितीपासून जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा त्यांचा राजकीय प्रवास होता. बबनराव ढाकणे चार वेळेस आमदार आणि खासदार म्हणून ते लोकसभेवर निवडूनही गेले होते. राज्यात बांधकाम विभाग, ग्रामविकास विभागाचे मंत्रिपदही त्यांनी भूषवले होते. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात ते राज्यमंत्री होते. जनता दल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांतही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.
बबनराव ढाकणे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पाथर्डी येथे ठेवण्यात येणार आहे. उद्या, शनिवारी दुपारी पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.कांतीकारी साथी च्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली. 

Monday, October 23, 2023

दुष्काळी परिस्थितीतही नवरात्र दांडिया उत्सव जोरात. लाखोंची उधळण.

बीड (प्रतिनिधी) पावसाने ओढ दिल्याने यंदा बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असली तरी नवरात्रौत्सवात दांडिया उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी नेतेमंडळींमध्ये चढाओढच लागली होती. नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून नेते, पदाधिकाऱ्यांकडून दांडिया उत्सवाचे आयोजन केले जात आहेत. गटातटात विखुरलेल्या राजकारणात दांडिया उत्सवाने मात्र चांगलेच रंग भरले असून जास्तीत जास्त गर्दी खेचण्यासाठी चढाओढ लागली होती.
परळीपाठोपाठ बीडमध्येही दांडिया उत्सवाचे रंग पाहायला मिळाला. एकीकडे पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सोयाबीन, कापूस नसल्याने दसरा, दिवाळी साजरी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला असताना दुसरीकडे मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्सवाचे रंग भरण्यात लाखो रुपये खर्च केले जात आहेत.
बीड जिल्ह्यातील राजकारणाची कुस बदलली आहे. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आता मित्रपक्ष म्हणून का होईना सोबत आले आहेत. काही ठिकाणी कौटुंबिक कलहातून नवीन राजकीय समीकरणे जुळू लागली आहेत. राज्यातील सत्तेत शिवसेना शिंदे गट-भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र असल्याने जिल्ह्यातील राजकारणातही तिन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये एकी दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाआघाडी म्हणून सोबत असले तरी त्यांच्याकडून वैयक्तिक राजकीय ताकद वाढवण्यावर भर दिला जात आहे.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रमांची रेलचेल केली जात आहे. अजित पवार गटाचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे वडील माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त गेवराईत सात दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता नवरात्र उत्सवानिमित्त बीड आणि परळी मतदारसंघात दांडिया उत्सवाचे रंग भरण्यात आले. राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्यावतीने परळीत दांडिया महोत्सव घेण्यात आला. अभिनेत्री मानसी नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या महोत्सवाला परळीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. राजश्री धनंजय मुंडे यांनी महोत्सवाचे नेतृत्व करत त्या भागातील महिलांना दांडिया महोत्सवाचे व्यासपीठ उपलब्ध केले.
बीड येथील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही काकू-नाना प्रतिष्ठानच्या माध्यमातून पहिल्यांदाच केशररत्न दांडिया महोत्सव आयोजित करून अभिनेत्री स्मिता गोंदकर यांना आणले होते. या माध्यमातून जयदत्त क्षीरसागर यांनी मुलगा रोहित आणि सून रेशम क्षीरसागर यांना व्यासपीठावर आणले, तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही काकांच्या कार्यक्रमाला तोडीसतोड दांडिया उत्सव घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व कल्पतरूच्या नावाने डॉ. योगेश यांनी नवजलसा दांडिया उत्सव घेत अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना बीडमध्ये आणले. या कार्यक्रमास महिला व बालकल्याणमंत्री आदिती सुनिल तटकरे यांची विशेष उपस्थिती होती. परळीसह बीड विधानसभा मतदारसंघातील दांडिया उत्सवाने राजकारणात चांगलाच रंग भरला असून खास आकर्षण म्हणून सिनेअभिनेत्रींना आणण्याची चढाओढ लागली आहे. दरम्यान या चढाओढीत नेते आणि पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे भानही राहिले नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत यावर्षी केवळ ६७ टक्के पाऊस झाला असून खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. दसरा, दिवाळीत सोयाबीन आणि कापूस या नगदी पिकांचा पैसा शेतकऱ्यांच्या हातात येत असतो. त्याच्यावरच बळीराजाची दिवाळी अवलंबून होती. मात्र, यावर्षी पाऊसच नसल्याने सोयाबीन आणि कापूसही हातातून गेले आहेत. त्यामुळे आता दसरा, दिवाळी साजरी कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शारदा विद्या मंदिर येथे नवरात्री निमित्त जागर नवदुर्गांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.यावेळी माता विद्यार्थी पालकांनी मनोरंजना सोबतच दांडियाचा लुटला मनसोक्त आनंद.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी येथील नाथ शिक्षण संस्था संचलित शारदा विद्या मंदीर, बँक कॉलनी, परळी येथे 21 ऑक्टोंबर 2023 रोजी सायं. 6 वाजता शारदोत्सव निमित्त प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना.श्री. धनंजयजी मुंडे साहेब यांच्या प्रेरणेने, संस्थेचे सहसचिव श्री. प्रदिपजी खाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे समन्वयक तथा यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अतुलजी दुबे सर यांच्या सहकार्यातून जागर नवदुर्गांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आपल्या पाल्यांच्या कला पाहण्यासाठी  पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते हनुमान मंदिरात हनुमानास श्रीफळ अर्पण करून करण्यात आली.
 कार्यक्रमाचे उदघाटन  श्रीमती.अन्सारी मॅडम (विस्तार अधिकारी गटशिक्षण विभाग परळी) व डॉ.सौ.विद्या देशपांडे मॅडम (प्राचार्य महिला महाविद्यालय परळी) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य तथा समन्वयक अतुल दुबे सर, प्रमुख पाहुणे म्हणून सौ. मनिषाताई कांदे (सरपंच जिरेवाडी)सौ.गोदावरीताई कांदे( उपसरपंच जिरेवाडी) सौ. सुमेधाताई फड (ग्रा.स.जिरेवाडी) सौ. धनश्रीताई आंधळे (ग्रा.स. जिरेवाडी)   प्रमुख अतिथी म्हणून सौ. सुजाता बिक्कड (सहाय्यक अभियंता थर्मल पावर स्टेशन परळी )श्री रवि सानप साहेब( पोलीस निरीक्षक परळी शहर पोलीस स्टेशन) श्री राम ओझा सर(समन्वयक प्रा.वि.) विशेष मान्यवर म्हणून श्री कदरकर सर, (प्राचार्य मिलिंद महाविद्यालय)  श्री.प्रा.किरण शिंदे सर, सौ.होळंबे मॅडम, सौ रोडे मॅडम व सौ. ज्योतीताई गिते व श्रीमती वानखेडे मॅडम (मुख्याध्यापिका मा. वि.)व श्रीमती धस मॅडम (मुख्याध्यापिका प्रा. वि.)आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीमती धस मॅडम यांनी केले. उद्घाटक श्रीमती अन्सारी मॅडम, सौ. डॉ. विद्या देशपांडे मॅडम, प्राचार्य श्री. दुबे साहेब, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले अध्यक्षीय समारोपात प्राचार्य दुबे सरांनी  शाळेत राबविण्यात येत असलेल्या संस्कारक्षम शिक्षणासोबतच इतर सहशालेय उपक्रमांची माहिती दिली.
शाळेच्या विकासात व विद्यार्थ्यांच्या भविष्यात कलेचे महत्व सांगितले तसेच डॉ. सौ.विद्या देशपांडे मॅडमनी आपल्या मनोगतात देवीची विविध रूपे आणि भारतीय संस्कृतीत देवींचे महत्व समजावून सांगितले यावेळी श्रीमती अन्सारी मॅडमनी  कार्यक्रमास महिलांची उपस्थिती पाहून आनंद व्यक्त केला. महिलांनी नेहमीच अशा सांस्कृतिक कार्यक्रमास उत्साह दाखवावा अशी इच्छा व्यक्त केली.
 माता पालक व भागातील महिला यांनी दांडियांचा मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थीनींनी विविध सांस्कृतिक गीते, लोकगीते, दांडिया, गरबा नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी उपस्थित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनीला मेडिकल शाखेत प्रवेश मिळाल्याबद्दल कु.मेघना हनुमंत मगर हिचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या तर मेडिकल शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल डॉ.आकांक्षा कदरकर यांचा सत्कार करण्यात आला. 
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील  सर्व  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.डी. मुंडेसर यांनी केले. तर आभार श्री साळवे सरांनी मानले. अशाप्रकारे कार्यक्रम उत्साहात  संपन्न झाला.

भवानीनगर दुर्गोत्सव येथे होम हवन संपन्न.आई जगदंबे सर्वांना आरोग्यमय आयुष्य दे! - भोजराज पालीवाल

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सर्वांना सुख समृद्धी लाभू दे,कोणतेही आरोग्य संकट न येता सर्वांना निरोगी आयुष्य आई जगदंबेने द्यावे अशी प्रार्थना भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा शिवसेना माजी शहर प्रमुख श्री भोजराज पालीवाल यांनी केली.
आज रविवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी भवानीनगर येथे दुर्गाष्टमीच्या निमित्ताने भवानीनगर दुर्गोत्सव मंडळात श्री भोजराज पालीवाल यांच्या हस्ते  होम हवन करण्यात आले. यावेळी कुंडात आहुती देताना सर्वांना सुखी व कसलेही आरोग्य संकट यापुढे न येऊ आणि शेतकरी, व्यापारी व नागरिकांना आनंदाचे दिवस देवो अशी प्रार्थना श्री पालीवाल यांनी दुर्गादेवीला केली.
यावेळी नगजराज पालीवाल, मा.नगरसेवक अनिल अष्टेकर, महेश उर्फ पप्पू केंद्रे, सुधाकर मुंडे, अण्णा कुंभार,  सुधाकर मुंडे, संदीप चौधरी, पिंपळे, नागरगोजे, अण्णासाहेब कुंभार, हरीश पालीवाल, गणेश सिरसाट, गोविंद चौरे, बालाजी गवळी, इंगळे टेलर, नितीन मुंडे, राम अंधारे, विशाल सुगरे, संतोष सावंत, जयचंद मस्के, विजय जाधव, पिंटू जाधव, प्रथमेश वडणे, राहुल उपाडे, रवि गौड, हनुमान कोळी, जगन्नाथ आवाड आदी उपस्थित

Friday, October 20, 2023

भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाच्या दुर्गादेवीची चंदुलाल बियाणी यांच्या हस्ते आरती संपन्न.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाच्या दुर्गादेवीची आरती आज गुरूवार दि.19 ऑक्टोबर रोजी मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते चंदुलाल बियाणी यांच्या हस्ते करण्यात आली.
भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक, शिवसेनेचे मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
आज गुरूवारी सामाजिक कार्यकर्ते चंदुलाल बियाणी यांच्या हस्ते दुर्गादेवीची आरती करण्यात आली.  कार्यक्रमाच्या प्रारंभी चंदुलाल बियाणी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून श्री भोजराज पालीवाल यांनी सत्कार केला. यावेळी श्री बियाणी यांनी दुर्गोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे कौतुक केले. 
यावेळी गजराज पालीवाल, मा.नगरसेवक अनिल अष्टेकर, महेश उर्फ पप्पू केंद्रे, सुधाकर मुंडे, अण्णा कुंभार,  सुधाकर मुंडे, संदीप चौधरी, पिंपळे, नागरगोजे, अण्णासाहेब कुंभार, हरीश पालीवाल, गणेश सिरसाट, गोविंद चौरे, बालाजी गवळी, इंगळे टेलर, नितीन मुंडे, राम अंधारे, विशाल सुगरे, संतोष सावंत, जयचंद मस्के, विजय जाधव, पिंटू जाधव, प्रथमेश वडणे, राहुल उपाडे, रवि गौड, हनुमान कोळी, जगन्नाथ आवाड यांच्यासह भवानीनगर भागातील महिला, पुरूष, व्यापारी, भाविक भक्त मोठठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, October 16, 2023

भवानीनगर दुर्गोत्सवाच्या वतीने देवी मुर्तीची उत्साहात स्थापना.शालेय विद्यार्थ्यां साठी विविध स्पर्धांचेही आयोजन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाच्या दुर्गादेवीची आज रविवार दि.15 ऑक्टोबर रोजी श्री व सौ. निलेश पालीवाल यांच्या हस्ते विधीवत पूजा करून स्थापना करण्यात आली.
आज रविवारी भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक  तथा शिवसेना मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गादेवीची उत्साहपूर्ण वातावरणात स्थापना करण्यात आली. यावेळी दुर्गादेवीची शहराच्या प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. श्री व सौ.निलेश पालीवाल यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.  
यावेळी प्रमुख मार्गदर्शक  तथा शिवसेना मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांनी सांगितले की, नवरात्रीचे नऊ दिवस भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने विविध धार्मीक कार्यक्रम तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून दररोज सायंकाळी भजनी मंडळाचाही कार्यक्रम होणार आहे. याचसोबत विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.
यावेळी भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक भोजराज पालीवाल, वैद्यनाथ बँकेचे संचालक नारायणराव सातपुते, गजराज पालीवाल, महेश उर्फ पप्पू केंद्रे, बद्रीनारायणजी बाहेती, सतिश चौधरी, जरीचंद्र मस्के, अरूण गौड, गणेश सिरसाट, हरीष पालीवाल, विजय जाधव, जगन्नाथ आव्हाड, प्रथमेश वावदने, हनुमान कोळी, विशाल सुगरे, प्रितम जाधव यांच्यासह भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे पदाधिकारी, नागरिक व भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

Saturday, October 14, 2023

बीडच्या तिरूमला ग्रुपची ज्ञानराधा मल्टी स्टेट बँकेचे अध्यक्ष म्हणाले.अफवांवर विश्वास ठेवू नका.तुम्ही जेव्हा बँकेमध्ये याल तेव्हा तुमचे पैसे आम्ही देऊ'.


*कुटे ग्रुपच्या मालकीची असलेली ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या मागचे कारण म्हणजे ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक बुडाली, या आशयाच्या चर्चा सध्या सर्वत्र ऐकायला मिळताय. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता बँकेचे अध्यक्ष सुरेश कुटे यांनी 'कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही जेव्हा बँकेमध्ये याल तेव्हा तुमचे पैसे आम्ही देऊ', असं स्पष्ट केलं आहे.

बीड (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून मोठ-मोठ्या मल्टीस्टेट बँका सर्वसामान्य नागरिकांचे पैसे डुबवत असल्याच्या बातम्यांनी जोर धरलाय. असं असतांनाच आता कुटे ग्रुपच्या मालकीची असलेली ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक बुडाली असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं बँकेतील ठेवीदार मोठ्या प्रमाणात बँकेत गर्दी करतायत. दरम्यान, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे यांनी केलंय.

अनेकांच्या ठेवी मिळाल्या परत :

मागील 2 महिन्यांपूर्वीच मा. जिजाऊ मल्टीस्टेट या बँकेनं कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आणि अनेक लोक रस्त्यावर आले. त्यानंतर काही दिवसांतच पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावरही जीएसटी विभागानं कार्यवाही करत 19 कोटींची मालमत्ता जप्त केली. या प्रकरणानंतर आता कुटे ग्रुपच्या मालकीची असलेली ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक बुडाली अशी अफवा उठवली जात असल्याचे बघायला मिळतंय. त्यामुळं आपल्या ठेवी बुडतील, या भीतीने बँकेतील ठेवीदार मोठ्या प्रमाणात बँकेत गर्दी करतायत. मात्र, काल दुपारनंतर अनेक मोठ्या घडामोडी झाल्या आणि या दरम्यान अनेक लोकांच्या ठेवी परतही मिळाल्या. मात्र हे सर्व प्रकार बीड जिल्ह्यातच का घडतायचत? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय.

बँकेचे अध्यक्ष काय म्हणाले? :यासंदर्भात प्रतिक्रिया देत बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे म्हणाले की, 'तुम्ही जेव्हा बँकेमध्ये याल, तेव्हा तुमचे पैसे आम्ही परत देऊ. कारण बँक सुस्थितीमध्ये आहे. त्यामुळं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. ठेवीदारांना एकच विनंती आहे की, आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी करू नका. शिस्तीत रक्कम काढून घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा. आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी कुठलीही अडकाठी येणार नाही.'

उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष वाळकेंची प्रतिक्रिया :

 ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या समोर आज अचानक ठेवीदारांनी गर्दी केल्यामुळे आम्हाला इथं यावं लागलं. आपापल्या खात्यातून रक्कम काढण्यासाठी ठेवीदारांनी गर्दी केलीय. या अनुषंगाने आम्ही ब्रांच मॅनेजरशी बोललो. त्यांच्या मते, खातेदारांना त्यांची रक्कम परत देण्यात कुठलीही अडचण नाही. फक्त खातेदारांच्या गर्दीमुळे नियोजनात अडथळे येत आहेत. या संदर्भात बॅंकेच्या संस्थापकांनी त्यांना ठेवी परत देण्यात काहीच अडचण नसल्याचं स्पष्ट केल्याचं सांगत ठेवीदारांनी शिस्तीचं पालन करत, रांगेत उभं राहून आपापल्या ठेवी परत घ्याव्यात, संयम दाखवावा, असं आवाहन वाळके यांनी केलंय.

*नवरात्री विशेष* दुर्गा मातेचे दैवी रूप पाहून खरी दुर्गा पूजा साजरी करा : गुरुदेव श्री आशुतोष महाराज जी.संस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान.

आज आपण माँ जगदंबेची  मनोभावे आणि अनेक पद्धतींनी पूजा करत आहोत - कीर्तन! जागरण! तीर्थयात्रा! व्रत उपवास! ज्योत प्रज्वलन! आरती! निःसंशयपणे, या सर्व पद्धती समाजात  देवीचे माहात्म्य स्थापित करतात. देवीचे वैभव आणि प्रतिष्ठा वाढते. पण या पद्धतींमुळे आपली देवी पूर्णपणे आनंदी होते का? हे जाणून घेण्यासाठी 'देवीला' मानण्यासोबतच 'देवीचाही' विचार करणे महत्त्वाचे आहे. माता काय म्हणते? कोणते नियम आणि कायदे त्यांना संतुष्ट करतात? त्यांच्या मते ज्ञानाची भक्ती म्हणजे काय आणि त्याची शाश्वत पद्धत कोणती? चला तर मग मातेच्या शब्दात, स्वतः मातेकडून जाणून घेवू या.
देवी पुराणात एक कथा वर्णन केलेली आहे. गिरीराज हिमालय आणि त्यांची पत्नी मीना यांनी दुर्गा देवीची कठोर तपश्चर्या केली. त्यांची इच्छा होती की ब्रह्मदेवाच्या रूपातील देवीने त्यांच्या  कन्येच्या रूपात जन्म घ्यावा. त्या दोघांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन माता प्रकाशाच्या विशाल किरणाच्या रूपात त्यांच्यासमोर प्रकट झाली.
अवघ्या काही वेळातच हा मोठा समूह एका सुंदर मुलीच्या रूपात साकार झाला. देवीचे हे दिव्य दर्शन पाहून हिमालयाचे डोळे भरून आले. तो मंद स्वरात म्हणाला - 'जिथे मी निर्जीव वस्तू आहे, तिथे तू खरी आणि तेजस्वी देवी आहेस! देवी! मला भक्ती-मुक्ती-योग आणि स्मृती यांचे ज्ञान दे.'' हिमालयाची ही मनोमन प्रार्थना ऐकून देवी श्रुतींचे रहस्य  सांगण्यास तयार झाली. देवी आणि राजा हिमालय यांच्यातील हा संवाद 'भगवती गीता' म्हणून ओळखला जातो आणि देवी पुराणात नोंदवला गेला आहे. हा संवाद श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील गीता संवादासारखाच प्रवाही आहे.
हिमालयाला तिच्या मूळ स्वरूपाचे रहस्य सांगताना आई जगदंबा म्हणते - 'हे हिमालय! मी शाश्वत ज्ञानाचा अवतार आहे. ना तीर्थस्थानी राहते, ना कैलासात, ना वैकुंठात. मी केवळ माझ्या जाणकार भक्तांच्या हृदयातच राहते. खरे तर मी ब्रह्मदेवाचा अवतार आहे. मी तोच शुद्ध आणि निष्कलंक ब्रह्मदेव आहे, जो सर्वात तेजस्वी पराकोश म्हणजेच अंतर्गत दिव्य निवासस्थानात राहते.'जेव्हा गिरीराज हिमालयाने ब्रह्मज्ञान आणि दिव्य दर्शनासाठी मातेची प्रार्थना केली तेव्हा देवी म्हणाली - 'हे राजा! मी तुला दिव्य चक्षु (डोळे) देते. तू त्याद्वारे माझे तेजस्वी रूप पहा.'' असे सांगून मातेने राजा हिमवानला महेश्वराचे अलौकिक विश्व रूप दर्शन घडवले. त्यांचे ते तेजस्वी रूप लाखो चंद्रांच्या तेजाने भरलेले होते. ब्रह्मज्ञान दिल्यानंतर आईने हिमालयाला ज्ञान प्राप्तीचे फायदेही सांगितले - 'हे राजा ! त्या परब्रह्माच्या कार्यकारणभावाचे दर्शन घेतल्यावर जीवाच्या हृदयातील गाठ सुटते. सर्व शंका नष्ट होतात आणि चांगले-वाईट कर्म कमी होऊ लागतात. ब्रह्मज्ञानाद्वारे साक्षात्कार झाल्यावर साधक माझ्यात प्रवेश करतो. शेवटी देवी म्हणाली - 'माझा सल्ला असा आहे - मोक्षार्थी साधकांनी, म्हणजे ज्यांना मला प्राप्त करण्याची किंवा प्रसन्न करण्याची इच्छा आहे, त्यांनी आत्मज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे.' गिरिराज हिमालयाच्या युगात, माता देवी तेथे प्रत्यक्ष उपस्थित होती. ती मानव कन्येच्या रूपात प्रकट झाली. त्याच अवतारी रूपात त्यांनी हिमालयाला ब्रह्मज्ञानाची दीक्षा दिली. पण येणाऱ्या युगात तिच्या भक्तांना आणि साधकांना या ब्रह्मज्ञानाची दीक्षा कशी मिळेल? हे लक्षात घेऊन  देवीने स्पष्ट मार्गदर्शन केले - 'हे ब्रह्मज्ञान माझ्या भौतिक स्वरूपाचे दर्शन देणाऱ्या पूर्ण सदगुरूंकडून मिळवा. या ब्रह्मविद्येचे ज्ञान ज्या सद्गुरूंद्वारे होते ते भगवंताचे अवतार आहेत हे समजून घ्या. निःसंशयपणे, या आध्यात्मिक ज्ञानाचे ऋण फेडता येणार नाही. त्यामुळे शिष्य सदैव गुरूंचा ऋणी राहतो.हे  देवीच्या भक्तांनो! आई जगदंबेने तिच्या दर्शनादरम्यान जगाला दिलेली शिकवण आपण मनापासून आणि आत्मीयतेने पाळली पाहिजे. माता राणीच्या सल्ल्यानुसार पूर्ण सद्गुरूंकडून ब्रह्मज्ञानाची दीक्षा घ्या. दिव्य दृष्टीतून माँ जगदंबेचे प्रत्यक्ष दर्शन घ्या. तरच देवी खऱ्या अर्थाने प्रसन्न होईल आणि आपल्या जिवाच्या अनेक जन्मांच्या इच्छा पूर्ण होतील. 
        दिव्य ज्योती जागृति संस्थेतर्फे सर्व वाचकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.

आजपासून सरकारकडे दहा दिवस.आम्हा ला हक्काचं आरक्षण पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांचा सभेपूर्वी मोठा इशारा!


जालना (प्रतिनिधी) जालन्यातील अंतरवली सराटी गावात आरक्षणासाठी मराठा समाजातील लोक एकवटले आहेत. जरांगे पाटील यांनी सभेला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सूचक इशारा दिला आहे. 

आजपासून सरकारच्या हातात दहा दिवस आहेत. आम्हाला हक्काचं आरक्षण पाहिजे. ते सरकारला द्यावंच लागेल. सरकारने भावना शून्य होई नये, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

ही गर्दी नाहीये. हा जमाव नाहीये. ही सभाही नाहीये. ही वेदना आहे. एका वेदनेतून लोक या ठिकाणी आले आहेत. स्वत:च्या लेकराचं भविष्य आणि अस्तित्व धोक्यात आलं आहे. एक टक्का हुकला तरी सुशिक्षित बेकार म्हणून मराठा तरुणाला घरात बसावं लागतंय. मग तो कितीही हुशार असला तरी त्याची संधी जाते. संधीच मिळत नसल्याने त्याचा नोकरीतील टक्का कमी झाला आहे. म्हणून मी सामान्य माणसाची लढाई लढत आहे, असं ते म्हणालेत.

आजपासून दहा दिवस हातात आहे. दहा दिवसात आरक्षण द्यायचं आहे. हा सुवर्ण क्षण आहे. या क्षणाला साक्षीदार व्हायचं आहे. एकही मराठा घरी राहणार नाही. पण सरकारने भावना शून्य होऊ नये. त्यांनी दहा दिवसात आरक्षण द्यावं, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय.

जालन्यात आज मनोज जरांगेची तोफ धडाडणार; जालना-बीड रस्ते वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?वाचा.

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : मनोज जरांगे यांची आज, शनिवारी (१४ ऑक्टोबर) जालन्यातील आंतरवाली सराटी येथे सभा होणार आहे. या सभेला होणारी गर्दी लक्षात घेता पोलिस अधीक्षकांनी जालना, बीडकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत.
आंतरवाली सराटी येथील रामगव्हाण रोडवर ही सभा होत आहे. सभास्थळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाजवळ आहे. या महामार्गावरून जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन वाहनचालक, नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

शुक्रवारी रात्री दहा वाजल्यापासून ते शनिवारी (१४ ऑक्टोबर) रात्री १२ वाजेपर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिले आहेत. सर्व वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

- छत्रपती संभाजीनगर-पाचोड-शहागडमार्गे बीडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, बिडकीन, पैठण, मुंगी, बोधेगाव, पारगाव, पाडळसिंगीमार्गे बीडकडे जातील. छत्रपती संभाजीनगर, कचनेर कमान, बिडकीन, पैठण, मुंगी, बोधेगाव, पारगाव, पाडळसिंगीमार्गे बीडकडे जातील. छत्रपती संभाजीनगर, पाचोड, डोणगाव फाटा, विहामांडवा, पैठण, मुंगी, बोधेगाव, पारगाव, पाडळसिंगीमार्गे बीडकडे जाता येईल.

- बीड, पाचोडमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहतूक बीड, पाडळसिंगी फाटा, पारगाव, बोधेगाव, पैठण, बिडकीनमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येईल.
- छत्रपती संभाजीनगर ते बीडकडे जालनामार्गे जाणारी वाहतूक छत्रपती संभाजीनगर, बदनापूर, जालना, घनसावंगीमार्गे बीडकडे जाईल.

Thursday, October 12, 2023

भाजपा विचारसरणीमुळे देशात लोकशाही धोक्यात.ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचा घणाघात.


बीड (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीमुळे देशातील लोकशाही धोक्यात आली असून आमचा लढा विचारसरणीच्या विरोधात आहे हे अगोदर समजून घेतले पाहिजे, असे टीकास्त्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी बीड येथे सत्ताधाऱ्यांवर सोडले. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार उदासीन असून केवळ वंचित बहुजन आघाडीच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते, असा विश्वासही त्यांनी उपस्थित
जनसागराला दिला.
बीड शहरात ११ ऑक्टोबर रोजी लढाई वंचितांच्या सत्तेची ही महासभा झाली.  यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदारॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. या सभेच्या मंचावर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे, किशन चव्हाण  सर्वजीत बनसोडे अनिल जाधव विष्णू जाधव,अमित भुईगळ, विष्णू जाधव, रमेश गायकवाड,संतोष सुर्यवंशी दीपक डोके, अमोल लांडगे दोन्ही कडील  जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारणीचे सर्व पदधिकारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 
महासभेला मार्गदर्शन करताना ॲड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, भाजपने देशाची वाट लावली आहे. 
भारतातील धर्म धोक्यात नसून भारतातील सगळे आरक्षणवादी धोक्यात आहेत, असे स्पष्ट मत बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडले. गेल्या पंधरा दिवसापासून वंचित बहुजन आघाडीच्या महासभेची तयारी सुरू होती. बुधवारी बीडमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीतील प्रत्येक पदाधिकाऱ्याने बीडच्या आजी-माजी नेत्यांसह सत्तेत असलेले किंवा नसलेले या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. बीड जिल्ह्यातील नेत्यावर टीकास्त्र सोडत मोठे जिल्ह्याचा कसा विनाश केला यावर वंचितच्या नेत्यांनी सडेतोड भाष्य केले. बाळासाहेब आंबेडकर यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मोबाईल टॉवरच्या रेंज गेल्याने सरकारचे आभार मानत कोपरखळ्या मारल्या.
 तर मोदी सरकारवर सडकून टीका केली. त्याबरोबरच काँग्रेसही त्यांनी टोकावरच ठेवत राहुल गांधीवर अनेक आरोपही यात केले. राहुल गांधींना काँग्रेसच्या लोकांना सल्लाही देण्यासाठी त्यांनी वेळ सांगितला आहे तर आरएसएस वाल्यांनो तुम्ही मोदींना आत्ताच हिमालयात पाठवा देशाचे फार मोठे भलं होईल असं म्हणत मोदींवर टीका केली आहे.  तर काँग्रेसवाले राहुल गांधींचे भरभरून गुणगान गातात मात्र काँग्रेस वाल्यांनो राहुल गांधीला निर्णय घेण्याची शिकवा असं म्हणत राहुल गांधीवरही निशाणा साधला आहे. या सभेत निवडणुकीत होणाऱ्या सभांवर जशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात त्या पद्धतीने राष्ट्रवादी भाजप आणि काँग्रेस यांचा या सभेत चांगलाच समाचार घेतला. भारतातील कोणताच धर्म धोक्यात नाही, तर भारतातील आरक्षणवादी धोक्यात आहेत, असे भाष्य केले. 

बीडच्या सभेने
 रेकॉर्ड मोडले . 


महासभेला बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी हजेरी लावली. इतरही जिल्ह्यातून हजारो नागरिकांची या सभेला वर्णी लावली. गर्दीचा उच्चांक गाठणारी सभा पहावयास मिळाली. भाड्याने माणस आम्ही अनत नाहीत, असेही  मराठवाडा  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष  अशोक हिंगे पाटील यांनी सडकून टीकास्त्र केले. बीडच्या राजकारणात मोठ्या खळबळीचे राजकारण सध्या पाहायला मिळतं आहे.आता या वंचित बहुजन आघाडीच्या सभेतील सडकून टीकास्त्र केल्यामुळे भाजपा, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या सभेला कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार हे देखील आता पाहणे अवसुख्याचे ठरणार आहे. सदरील सभेला राज्याचे , विभागाचे तसेच जिह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..

.....बॉक्स २
अशोक हिंगे मराठवाड्याचे 
प्रभावी नेते

बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे हे प्रभावी नेते आहेत, अशा शब्दांत ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी कौतुक केले. सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेतही हिंगे यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

अवैध वाळू माफियांची मुजोरी; पोलीस निरीक्षकाच्या अंगावर घातली कार.


गेवराई (प्रतिनिधी) जिल्ह्यात पुन्हा एकदा अवैध वाळू माफियांची मुजोरी समोर आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गेवराई तालुक्यात घडली आहे. या घटनेत पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

गेवराई तालुक्यातील राक्षस भुवनजवळ ही घटना घडलीय. गणेश मुंडें असे या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी दोन आरोपी विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलीस पथक सकाळी सहा वाजता म्हाळस पिपंळगाव येथील गोदावरी पात्रात जात होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि पोलीस कर्मचारी विष्णू वायबसे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस पथक राक्षसभुवन फाट्याजवळ आले त्यावेळी वाळू माफियाच्या कारने पथकाच्या वाहनाला धडक दिली. या धडकेत मुंडे यांच्या पायाला आणि हाताला जबर मार लागला आहे. तर वायबसे हे पोलीस कर्मचारीही या घटनेत जखमी झाले आहेत.
या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे आणि पोलीस कर्मचारी विष्णू वायबसे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस पथक राक्षसभुवन फाट्याजवळ आले त्यावेळी वाळू माफियाच्या कारने पथकाच्या वाहनाला धडक दिली. या धडकेत मुंडे यांच्या पायाला आणि हाताला जबर मार लागला आहे. तर वायबसे हे पोलीस कर्मचारीही या घटनेत जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे गणेश मुंडे आणि पोलीस कर्मचारी वायबसे हे गेवराई तालुक्यातील म्हाळस पिंपळगावच्या वाळू साठ्याची पाहणी करून राक्षसभुवनकडे जात होते. त्यावेळी राक्षसभुवन फाट्यावर काळ्या रंगाची बिना नंबरची कार थांबलेली होती. ही कार गणेश मुंडे यांच्या कारचे लोकेशन घेत निघालेली होती. त्यावेळी मुंडे यांनी त्या काळ्या रंगाच्या कारला हात दाखवला आणि विचारपूस करण्याचा प्रयत्न केला.

त्या गाडीतील चालकाने गणेश मुंडेंच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यात मुंडेंच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी हा जालना जिल्ह्यातील गोंदी येथील असल्याचं सांगितलं जात आहे.

Tuesday, October 10, 2023

बीडमध्ये प्रकाश आंबेडकरांची परिवर्तन महासभा. काय बोलणार महाराष्ट्राचे लक्ष..

बीड (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये परिवर्तन महासभा उद्या बीडमध्ये संपन्न होणार आहे यामध्ये याआधी देखील लातूरच्या सभेतही मोदींवर हल्ला करत कुठल्याही परिस्थितीत मोदी यांना पंतप्रधान होऊ देणार नाही अशी कडाडक ललकारी लातूरच्या परिवर्तन महासभेतून प्रकाश आंबेडकरांनी केली होती आता यापुढे नेमकं प्रकाश आंबेडकर बीडच्या सभेतून काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

बीडमध्ये प्रथमच होत असलेल्या बाळासाहेब आंबेडकर यांची सभा ही रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचं कार्यकर्ते सांगत आहेत त्याचबरोबर सध्या राज्यातील राजकारणावर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत यावरच प्रकाश आंबेडकर यांनी अनेक ठिकाणी आपल्या भाषाशैलीतून कडक तोफी काढाव्यात कशा पद्धतीने वक्तव्यही केले आहेत मात्र आता बीड जिल्ह्यात होत असलेली त्यांची सभा ही महाराष्ट्रभर गाजणार आणि यासाठी मोठ्या संख्येने या सभेला नागरिकांची गर्दी ही होणार असंही सभा नियोजकांनी या वेळेस सांगितला आहे मात्र आता उद्याच्या बीडच्या सभेत प्रकाश आंबेडकर हे काय बोलणार याकडेच आता लक्ष लागून राहिला आहे बीडमध्ये उद्याची सभा होणार असल्याने जिल्हाभरात मोठ्या जैत तयारीची सुरुवात ही आता संपन्न होत आहे जिल्हाभरात बॅनरबाजी बाळासाहेब आंबेडकरांची स्वागताची तयारी ही सुरू झाली आहे. याचबरोबर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रभरातून या ठिकाणी नागरिक या सभेला हजेरी लावणार असल्याचाही यावेळेस नियोजकांनी सांगितला आहे.

शिवसेनेच्या वतीने सागर कुकडे यांचा सत्कार. सागर याने क्रीडा क्षेत्रात परळीचा नावलौकिक वाढवावा-अभयकुमार ठक्कर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सागर संजय कुकडे यांना क्रीडा क्षेत्रात परळीचा नावलौकिक वाढवून क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत परळीचे नाव राज्यभरात पोहचवावे असे प्रतिपादन शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर यांनी केले.
सागर संजय कुकडे यांना लोहा येथील शिवाजीरावा वाकडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने दिला जाणारा मराठवाडा विभागीय स्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार परळी येथील हनुमान व्यायाम शाळेचा मल्ल सागर संजय कुकडे यांचा परळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज मंगळवार दि.10 ऑक्टोबर रोजी शाल, श्रीफळ, पुष्पहार व भगवा फेटा घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर, युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे, माजी शहरप्रमुख नागनाथ पवार, माजी उपशहरप्रमुख सतिश जगताप, माजी शहर संघटक संजय कुकडे, छ.शिवाजी महाराज चौक विभागप्रमुख संजय सोमाणे, तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, मनिष जोशी, सचिन लोढा, वैजनाथ शिंदे, शुभम कुलकर्णी, भारत गिराम यांच्यासह असंख्य शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, October 6, 2023

निवेदिता धावडे यांचे सुखी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर रविवारी परळीत प्रबोधन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  थोर समाजसुधारक तत्वज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै. जन्मशताब्दी वर्षा निमित्त रविवारी (ता.8) निवेदिता धावडे यांचे सुखी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर समाज प्रबोधन चा कार्यक्रम होणार आहे. 
थोर समाजसुधारक तत्वज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै. यांचे जन्मशताब्दी वर्ष निमित्त राज्यभर समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी (ता.8) दुपारी 4:00 ते 5:30 पर्यंत परळी येथील श्री शनऐश्वर मंदिरात सुखी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर निवेदिता धावडे (मुंबई) यांचे भव्य समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिवन विद्या मिशन मुंबई च्या परळी शाखेच्या वतीने होणार्‍या समाज प्रबोधन च्या कार्यक्रमास साधकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Thursday, October 5, 2023

हिटरमुळे ड्रम फुटून उकळते पाणी अंगावर पडले, मायलेकराची मृत्यूशी झुंज मदती च्या हातांची गरज.

आष्टी ( प्रतिनिधी): हिटर सुरू राहिल्याने पाण्याने भरलेले ड्रम वितळून उकळते पाणी अंगावर पडल्याने दोन चिमुकल्यासह आई गंभीर भाजल्याची घटना घडली होती. त्यात तीन दिवसापूर्वी मुलीचा मृत्यू झाला. तर आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मायलेकरांच्या उपचाराची परवड होत आहे. याबाबत माहिती मिळताच मदतीचे हात सरसावले. मात्र, अजूनही मोठ्या मदतीची गरज असल्याने दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहेझाला. 

आष्टी तालुक्यातील सांगवी आष्टी येथील २६ सप्टेंबर  रोजी पहाटेच्या दरम्यान ड्रम वितळून उकळते पाणी जवळच झोपलेल्या सुनीता योगेश सावंत ( ३०), श्रेयश ( ८) , श्रेया ( ५) यांच्या अंगावर पडले. यात तिघेही गंभीर भाजले. पुणे येथील ससून रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, रविवारी ( दि.१) सकाळी ५ वर्षीय श्रेयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

तर आई व मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या कुटुंबाची परिस्थिती अंत्यत हलाखीची असल्याने उपचाराचा खर्च पेलवणे अवघड होत आहे. याची माहिती मिळताच काही त्यांना मदत केली. मात्र, आणखी मदतीची गरज असल्याने दानशुरांनी पुढे येण्याची गरज आहे. योगेश सावंत, शहाजी सावंत यांच्या ८८०६२५६१०२ या मोबाईल नंबरवर युपीआय द्वारे मदत करण्याचे आवाहन सांगवी आष्टीचे सरपंच विनोद खेडकर यांनी केले आहे.

कर्मचाऱ्याला मागितले १५ लाख माजलगाव च्या माजी नगराध्यक्षांवर गुन्हा.


माजलगाव (प्रतिनिधी) : येथील माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी नगरपालिकेचे कर्मचारी शिवहर शेटे यांना १५ लाखांची खंडणी मागितली. तसेच धमकी देऊन फसवणुक केल्या प्रकरणी माजलगाव शहर पोलिसात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजलगाव नगरपालिकेचे नामांतर विभाग प्रमुख शिवहर चनबसअप्पा शेटे यांना १४ फेब्रुवारी २०१९ रोजी नगरपालिकेत शेख मंजूर हे गेले. तेथे त्यांनी शेटे यांना काही कामे करण्यास सांगितले. नियमात बसत असेल तरच काम करेल असे सांगताच मंजूर यांनी हुज्जत घातली. तू सामान्य कर्मचारी आहे, तुझी वाट लावतो. माझे न ऐकल्यास तुला जीवे मारील, अशी धमकी दिली. याचवेळी तत्कालीन नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी दोघांनाही बोलवुन घेतले. चाऊस यांच्यासमोरही हा माझे काम कसे करीत नाही, असे म्हणत काटा काढील. त्याला सस्पेंड करील, त्याच्या तक्रारी करीन अन्यथा मला पंधरा लाख रुपये देण्यास सांगा, अशी धमकी मंजूर यांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, शेख मजुर यांनी शेटे यांच्या वेगवेगळ्या तक्रारी करून त्रास देण्यास सुरुवात केली. यामुळे परिवार भयभीत झाला होता. त्यानंतर मी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी ४ जुलै २०२३ बोलून घेतले व पुरावे देण्यास सांगितले. त्यानंतर आपण सर्व पुरावे पोलिसांना दिल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात शेख मंजूरविरोधात गुन्हा दाखल केल्याचे शेटे यांनी म्हटले आहे.

Wednesday, October 4, 2023

दूध खरेदीचा दर वाढवा गायीच्या दूधला 40 रुपये तर म्हशीच्या दूधाला 75 रुपये प्रतिलीटर द्या. शेतक-यांची मागणी.

बीड (प्रतिनिधी) : दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुधाचा भाव लिटरमागे 33 रुपये असला तरी केवळ 28 रुपये मिळतात. यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत. गायीचे दूध 40 रुपये तर म्हशीचे दूध 75 रुपये प्रतिलीटर असा दर द्यावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी करु लागले आहेत.
एकीकडे जनावरांसह चाऱ्याचे भाव वाढले आहेत तर दुसरीकडे दुधाचे दर घसरले आहेत. अशा परिस्थितीत दुग्धव्यवसाय करायचा कसा ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. विशेष म्हणजे मागील 5 वर्षांत गायीच्या दुधाचे दर 24 रुपयांहून 27-28 वर आले आहेत. मात्र 1 हजार 400 रुपये क्विंटलची सरकी पेंड 2 हजार 200 रुपये एवढी झाली आहे. 25 ते 30 हजार रुपयांची गाय आज 80 ते 90 हजार रुपयांवर गेली आहे.

चारा सुद्धा 1 हजार 100 रुपये टनाहून 3 हजार 500 रुपये आला आहे. मात्र दुधाचे दर या प्रमाणात का वाढवण्यात आले नाही ? असा प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यां कडून  शासनाला विचारला जात आहे.

दरम्यान गायीच्या दूधाला 40 रुपये तर म्हशीच्या दुधाला 75 रुपये प्रतिलीटर मिळावेत अशी शेतकरी मागणी करु लागले आहेत. बीड प्रमाणे काेल्हापूरात देखील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूधाच्या दरात वाढ केली जावी अशी मागणी केली आहे.

बीडमधील हातभट्टी दारू विक्रेत्यावर एमपीडीए कारवाई; हर्सूल कारागृहात रवानगी.


बीड (प्रतिनिधी) : शहरात हातभट्टी दारू, शिंदी, ताडी तयार करून विक्री करणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात रवानगी केली. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.

प्रल्हाद बापुराव भालशंकर (रा.हनुमान नगर, बीड) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात बीड शहरात शिंदी, ताडी दारू तयार करणे, जवळ बाळगणे आणि तिची विक्री करणे अशा स्वरूपाचे ९ गुन्हे दाखल आहेत. पाेलिसांनी वारंवार कारवाया केल्यानंतरही तो जुमानत नव्हता. अखेर पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आदेशानुसार बीड शहरचे पोलिस निरीक्षक मुकूंद कुलकर्णी यांनी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला.

याला मान्यता मिळताच बुधवारी त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलिस निरीक्षक संतोष साबळे, शहरचे मुकूंद कुलकर्णी, उपनिरीक्षक किरण पवार, सुशेन पवार, अशपाक सय्यद, मनोज परजणे, शेख शहेंशाह, सिरसाट, अभिमन्यू औताडे, बप्पासाहेब घोडके आदींनी केली. 

पाटोदा पंचायत समितीचा विस्तार अधिकारी १० हजाराची लाच घेताना पकडले.


बीड (प्रतिनिधी) : वर्षभराच्या सिझनमध्ये कारवाई न करण्यासाठी व कृषिसेवा केंद्र दुकानातील औषधांचे सॅम्पल न घेण्यासाठी पाटोदा पंचायत समितीतील विस्तार अधिकाऱ्याने दहा हजारांची लाच मागितली. ती स्विकारतानाच धाराशिवच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारी पाटोदा शहरात करण्यात आली.

जयश मुकूंद भुतपल्ले (वय ३६, विस्तार अधिकारी कृषि, वर्ग-३, पंचायत समिती पाटोदा) असे लाच स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने तक्रारदाराकडून तुमच्या कृषि सेवा केंद्र दुकानातील औषधाचे सॅम्पल न घेण्यासाठी व वर्षभराच्या सिझनमध्ये कारवाई न करण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी दहा हजाराची मागणी केली होती. यामध्ये दहा हजाराची रक्कम घेताना भुतपल्ले याला धाराशिव एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, पोलीस उपअधीक्षक धाराशीव सिद्धराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस अंमलदार विशाल डोके, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य, दत्तात्रय करडे यांनी केली.

सागर संजय कुकडे यांचा क्रीडा रत्न पुरस्काराने गौरव.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शिवाजीराव वाकडे पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, लोहा यांच्या वतीने दिला जाणारा मराठवाडास्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार परळी वैजनाथ येथील सागर संजय कुकडे यांना नांदेड येथे सोमवार दि.2 ऑक्टोबर रोजी एका  शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे.
परळी येथील शिवसेनेचे नेते संजय कुकडे व माजी नगरसेविका सौ.अनिता कुकडे यांचा मुलगा सागर कुकडे याला क्रीडा क्षेत्रात सातत्यपुर्ण योगदान दिल्याबद्दल सोमवार दि.2 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे मराठवाडास्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून प्रदान करण्यात आला. त्याच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Tuesday, October 3, 2023

दारू पिण्यासाठी मोटारसायकलींची चोरी.दुचाकी चोरांची टोळी जेरबंद

बीड (प्रतिनिधी) : मौज मजा करण्यासाठी दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. दुचाकी चोरणाऱ्या या टोळीला जेरबंद करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. ५ आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
बीड शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या होत्या. पोलीस त्यांच्या मागावर असताना चोरी  करणारी टोळी पोराच्या हाती लागली आहे. सद्दाम मुसा शेख (रा. बागवान गल्ली, केज), अमोल रामचंद्र कुरूंद (रा. वानगाव फाटा), ख्वाजामिया नवाब कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, केज), अशोक फुलचंद शिंदे व किरण अरुण पिसुरे (दोघे रा. जानेगाव, ता. केज) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दारू पिण्यासाठी चोरी 

हे आरोपी दारू पिण्यासाठी मोटरसायकल चोरत होते. मोटारसायकल चोरून विक्री करणाऱ्या या टोळीने संपूर्ण जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून अनेक मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

श्री ठक्कर यांचा वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सत्कार.सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या सेवेसाठी यापुढेही कार्यरत राहणार-अभयकुमार ठक्कर.

*प्रभू वैद्यनाथास जलअभिषेक, विविध मंदिरात महाआरती; जिजामाता गार्डन येथे स्वच्छता अभियान राबविले.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहर आणि परिसरातील शिवसैनिकांपासून माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानेच आपल्यावर मनापासून प्रेम केले असून या प्रेमाची शिदोरी घेत आपण कार्यरत आहोत. यापुढेही सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्यरत राहुत असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बीड उप जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष श्री अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांनी व्यक्त केला.दरम्यान आज सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी कार्यकर्त्यांनी   श्री अभयकुमार ठक्कर यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रभु वैद्यनाथ जलअभिषेक, दक्षिण मुखी गणपती व श्री बजरंग बली नेता मंदिरात महाआरती करण्यात आली.
 जिजामाता गार्डन हेल्थ क्लबच्या वतीने आज सकाळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कार्यकर्त्यांच्या वतीने  त्यांचा शाल ,श्रीफळ पुष्पहार व केक कापून सत्कार करण्यात आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा श्रद्धावान सैनिक या नावाने प्रसिद्ध असलेले अभयकुमार ठक्कर यांचा वाढदिवस आज सोमवारी परळी शहर व परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात  साजरा करण्यात आला.
 सकाळी श्री वैद्यनाथ मंदिर येथे श्रीं चे आशिर्वाद घेवून श्री ठक्कर यांच्या आजच्या वाढदिवसाची सुरूवात झाली. निवासस्थानी आई-वडिलांचे प्रतिमेचेही त्यांनी आशिर्वाद घेतले. कार्यकर्त्यांच्या वतीने विविध ठिकाणच्या मंदिरात श्रीं ची महाआरती  करण्यात आली. आज दिवसभर विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त अभयकुमार ठक्कर यांचा सत्कार करण्यात आला. 
याप्रसंगी बोलतांना श्री अभयकुमार ठक्कर यांनी सांगितले की, परळी शहर आणि परिसरातील नागरिकांचे आपल्यावर मनापासून प्रेम असून मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सर्वांसाठी जे शक्य आहे ते काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आपले आशिर्वाद आणि सहकार्य माझ्या पुढील आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे असून यापुढेही आपल्या सेवेत अधिक जोमाने कार्यरत राहुत असा विश्वास श्री अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी विविध ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमास युवासेना बीड जिल्हा समन्वयक तथा जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अतुल दुबे,शिवसेना माजी उप शहर प्रमुख सतीश जगताप, शिवसेना माजी शहर संघटक  संजय कुकडे, युवासेना विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, शिवसेना छ.शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, अमित कचरे, सचिन लोढा, शिवसेना उपशहर प्रमुख किशन बुंदिले, मनीष जोशी, कारभारी शिंदे, प्रकाश देवकर, सायस फड, योगेश घेवारे,  बाबासाहेब शिंदे, लक्ष्मण मुंडे,योगेश जाधव, नवनाथ वरवटकर, ईश्वर इंगळे यांच्यासह शिवसेना, युवा सेना, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Monday, October 2, 2023

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, २० वर्षांचा सश्रम कारावास. आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले.


बीड (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून आरोपी भिमराव बळीराम धुमक (रा. घाटेवाडी, ता. केज, जि. बीड ) याला २० वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंड व दंड न भरल्यास दीड महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा केज येथील सत्र न्या. के. डी. जाधव यांच्या न्यायालयाने सुनावली.

या प्रकरणातील पीडित मुलीस भिमराव धुमक याने बळजबरीने कारमध्ये बसवून अंधोरा मस्सा, पंढरपूर, आळंदी व नंतर भोसरी येथे नेऊन भाड्याने रूम करून तेथे पीडितेची इच्छा नसतानादेखील तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.  अशा आशयाच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात आरोपीविरूद्ध अपहरण, बलात्कार. ३४ भादंवि आणि कलम ४ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. 

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक ए. एन. वाठोडे यांनी करून अंबाजोगाईच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.  या प्रकरणाची अंतिम सुनावणी अतिरिक्त सत्र न्या. के. डी. जाधव यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर झालेला पुरावा व सहायक सरकारी वकील राम बिरंगळ यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी भिमराव बळीराम धुमक यास अतिरिक्त सत्र न्या. जाधव यांच्या न्यायालयाने दोषी ठरविले. 

आरोपीस कलम ३६३ भादंविनुसार दोषी धरण्यात आले. त्यास पाच वर्षे कारावासाची शिक्षा व कलम ४ पोक्सो कायद्यांतर्गत २० वर्षे कारावास व पीडितेस एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी व नुकसान भरपाई न भरल्यास दीड महिना सश्रम कारावसाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. या प्रकरणात अभियोग पक्षाच्या वतीने राम बी. बिरंगळ यांनी काम पाहिले. त्यांना सहायक सरकारी वकील आर. पी. उदार, सहायक सरकारी वकील एस. व्ही. मुंडे, पैरवी अधिकारी पोलिस निरीक्षक लांडगे यांनी सहकार्य केले.

महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने परचुंडी येथे एक तास श्रमदानात ग्रामस्थां चा उत्स्फूर्त प्रतिसाद.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील परचुंडी येथे महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रविवारी (ता.१) सकाळी ग्रामपंचायत च्या पुढाकाराने ग्रामस्थांना सोबत घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजींची जयंती आहे. त्यानिमित्ताने एक तारीख एक तास श्रमदान या शासनाच्या उपक्रमांतर्गत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत परचूंडी येथील जि. प. प्रा. शाळेचा परिसर,अंगनवाड़ी, मंदिर परिसर व संपुर्ण गावामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
 स्वच्छ भारत अभियान सदरील स्वच्छता अभियानामध्ये गावच्या सरपंच सौ. मिना गुरुलिंग नावंदे, उपसरपंच बाळासाहेब थोरात माजी उपसरपंच वैजनाथ पत्रवाळे, शाळेचे मुख्याध्यापक श्री आजले सर, शिक्षक श्री नीलेवार सर, शालेय व्यवस्थापन समिति अध्यक्ष श्री अजय रुपनर, आंगनवाड़ी कर्मचारी आशाबाई नावंदे, सुमन रुपनर, ग्रा. पं. सदस्य रामराव सरांडे, ओम पत्रवाळे, सुभाष दादा रूपनर, व्यंकट पाटील गडदे , सुनील नावंदे, प्रेस फोटोग्राफर गणेश पत्रवाळे, हनुमान होरकटे, गोविंद पडुळे, गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावान सैनिक:-अभयकुमार ठक्कर-परळीतील भगवे वादळ.

शिवसेनेचे बीड जिल्हाउपप्रमुख, परळीतील एक भगवे वादळ म्हणून सर्वपरिचीत असणारा व युवकांचे आशास्थान अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांचा आज वाढदिवस. एक दिलदार मित्र, चतुर राजकारणी व हाकेला प्रतिसाद देणारा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवा शिवसैनिक अशी त्यांची ओळख असणारा सच्चा शिवसैनिक अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर. 
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख  अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांचा आज वाढदिवस. ठक्कर यांनी एक सामान्य शिवसैनिक म्हणून काम सुरू केले आणि पाहता पाहता त्यांचे कार्य व मित्र परिवार वाढत गेला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ठक्कर यांची मोठी श्रद्धा आहे. किंबहूना शिवसेनेचा एक लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आज वाढदिवसानिमित्त त्यांच्या चौफेर कार्याचा परिचय या लेखाद्वारे करून देत आहोत. शिवसेनेचा बाणा, बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारधारेचे नैसर्गिक वर्तन असणारा शिवसैनिक कोणत्याही परिस्थितीत पक्षहिताचाच विचार करणारा असतो. पद, प्रतिष्ठा यामागे न लागता शिवसैनिक’ हे महत्त्वपूर्ण पद असल्याचे मानणारे आणि त्याच ध्येयाने निष्ठेने शिवधनुष्य पेलणारे कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची शक्ती आहे. या संपर्ण लक्षणांचा समुह असणारे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत श्रद्धा असणारा कार्यकर्ता म्हणून व बीड जिल्हयातील शिवसेनेचे नेते म्हणजे अभयकुमार ठक्कर यांच्याकडे पाहिले जाते. अभयकुमार उर्फ  पप्पू ठक्कर या नावाला ओळखण्यासाठी कोणत्याही पदावर असण्याची गरज उरलेली नाही. अभयकुमार ठक्कर हे नाव आले की लगेच-शिवसेनेचेच. हे समीकरण निर्माण झालेले आहे. गेल्या 30 वर्षापासून अविरतपणे शिवसेनेच्या भगव्याखाली एकनिष्ठ ेने काम करीत कार्यकत्यार्ंचे मजबूत संघटन उभे करून अधिकाधिक तरूणांना शिवसेना पक्षाकडे आकर्षित करणारे नेते अभयकुमार ठक्कर आहेत.वयस्कर व्यक्तीनां आपला सहकारी  वाटणारा, वरीष्ठ नेत्यानां प्रमुख शिवसैनिक वाटणारा  मध्यम फळीतील शिवसैनिकांना मार्गदर्शक असणारा, नवनविन कार्यकर्त्यांमध्ये मिळूनमिसळुन त्यांनाही हवाहवासा वाटणारा आपला नेता म्हणजे अण्णा अशी सर्वसमावेशक प्रतिमा सांभाळणारे नेतृत्व हे अभयकुमार ठक्कर यांचे आहे.
प्रसंगी अतिशय आक्रमक, कठोर वाटणारे हे नेतृत्व कार्यकर्त्यांवर, त्यांच्या कुटुंबियावर, संकट आल्यास अतिशय मृदू असल्याचा अनुभव सर्वांना आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी अभयकुमार ठक्कर यांच्या परळीतील निवासस्थानी भेट देऊन आशिर्वाद दिले ते निष्ठावंत शिवसैनिक म्हणूनच.
परळी नगर परिषदेतील शिवसेनेचा पहिला शिलेदार म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली. शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष, सभापती होण्याचा बहुमानही अभयकुमार ठक्कर यांनाच मिळाला होता. शिवसेनेच्या  तत्वाप्रमाणे एक शिस्तबध्द सैनिक काम करतो. त्याप्रमाणे पक्षाची 80 टक्के  समाजकारण 20 टक्के राजकारण करण्याची प्रणाली त्यांच्या कार्यातून दिसून येते. पक्षाबरोबर विविध सामाजिक, सांस्कृतिक कामात ते नेहमीच सक्रीय राहीले आहेत. छत्रपती शिवरायांच्या भव्यदिव्य जयंती उत्सवाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम गेल्या 20 वर्षापासून अविरतपणे त्यांनी राबविले. नेहमी संघटनात्मक बाजू भरभक्कमतेने सांभाळण्याची त्यांची हतोटी कौतुकास्पदच आहे. शिवाजीनगर दुर्गोत्सवाचेही अंखडीतपणे आयोजन ते करतात. युवकांना नेहमीचे प्रोत्साहन देणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख या पदावर त्यांनी कार्य क ेलेले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वरिष्ठ नेते गण यांच्या आदेशाचे पालन तंतोतंत करताना त्यामध्ये कुठलीही कृत्रिमता त्यांच्या कार्यात नसते हे विशेष.
अभयकुमार ठक्कर हे अफलातून व्यक्तीमत्व आहे. त्यांचे अनेक रूपे मी पाहिली आहेत.  एक कुटुंबवत्सल व्यक्ती प्रमाणे कार्यकर्त्यांत त्यांची ओळख आहे. केवळ शिवसैनिकच नव्हे तर पक्षाबाहेरील व्यापारी छोटे - मोठे व्यावसायीक, सर्वसामान्य नागरिक या प्रत्येकालाच आपलेसे वाटावे असे हे व्यक्तीमत्व आहे. अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे अभिष्टचिंतन करणे हे प्रत्येकालाच आवडते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याला उत्तरोत्तर ताकद प्राप्त व्हावी. प्रत्येक कार्यकर्त्याची शक्ती असणार्या या नेत्याच्या प्रगतीची क्षीतीजे उंचावत जावून त्या क्षीतीजाखाली हजारो कार्यकत्यार्ंच्या रूपाने उडत्या पाखरांना मागे वळून पाहण्याची किवां परतीची तमा राहू नये तर या नेतृत्वाकडे पाहून क्षीतीजाच्या ही पलीकडे झेप घेण्याची स्फूर्ती मिळत राहावी त्यासाठी अभयकुमार ठक्कर यांना प्रचंड  शक्ती मिळावी हीच वाढदिवसी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना अभयकुमार ठक्कर (अण्णा) यांना वाढदिवसानिमित्त लक्ष - लक्ष शुभेच्छा!-अभिष्टचिंतन-

      *आण्णाचा कट्टर चाहता सैनिक*
                मोहन परदेशी

          युवासेना विधानसभा प्रमुख 
                   परळी वैजनाथ
              मो.नं. ९८८११७१४३४