Wednesday, January 31, 2024

दिवसा घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला बेड्या; तीन लाखांचे दागिने हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.


बीड (प्रतिनिधी) : दिवसा घरफाेडी करणाऱ्या लातूरच्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. ही कारवाई २८ जानेवारी राेजी चौसाळा परिसरात करण्यात आली. यामध्ये चोरट्याकडून तब्बल तीन लाख रूपयांचे दागिने परत मिळविण्यात पाेलिसांना यश आले आहे. दरम्यान, हा चाेरटा बंद घरांवर विशेष नजर ठेवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

राजाराम उर्फ बबन धोंडिराम बुधवाडे (वय ३२ रा.बाभळगाव जि.लातुर) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. बीड तालुक्यातील नेकनूर व चौसाळा पोलिस ठाणे हद्दीत दिवसा घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. त्याप्रमाणे एलसीबीचे पोलस निरीक्षक संतोष साबळे यांच्या पथकाला राजाराम बुधवाडे याची माहिती मिळाली. चौसाळा परिसरात त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने दिवसा घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तब्बल ३ लाख रूपयांची दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. त्याला आता नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दरम्यान, राजाराम हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात बीड आणि लातूर जिल्ह्यात जवळपास १३ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या टीमने केली.

साखरपुडा झाल्याचे समजताच तरूणीचे अश्लिल फोटो पाठविले भावाच्या मोबाईल वर पीडित तरूणीने सायबर पोलिस ठाणे गाठून दिली फिर्याद.


बीड (प्रतिनिधी) : धारूर येथील रहिवासी असलेल्या व सध्या पुण्यात बी.टेकचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरुणीचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ तिच्या भावाच्या मोबाईलवर पाठवून बदनामी करण्यात आली. हा प्रकार ११ जानेवारी रोजी घडला. याप्रकरणी केजच्या तरूणाविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

धारूर येथील तरूणी शिक्षणासाठी केजला होती. शाळा, महाविद्यालयात जाण्याच्या रस्त्यावर असणाऱ्या दुकानातील आशिष महादेव तेलंग या तरूणासोबत तिची ओळख झाली. नंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सप्टेंबर २०२३ मध्ये हे प्रकरण दोघांच्याही घरी समजले. त्यामुळे तरूणीच्या वडिलांनी तिचे लग्न जमवून साखरपुडाही केला. तरूणीच्या होणाऱ्या पतीने दोघांचे फोटो सोशल मिडीयावर टाकताच ते आशिष याने पाहिले. नंतर त्याने होणाऱ्या पतीच्या मोबाईलवर व्हिडीओ आणि फाेटो पाठविले. त्यामुळे या तरूणीचा जमलेला विवाह मोडला. एवढ्यावरही आशिष शांत राहिला नाही. त्याने तरूणीच्या भावाच्या मोबाईलवर ११ जानेवारी रोजी अश्लिल फोटो आणि व्हिडीओ पाठविले. हा प्रकार समजताच पीडित तरूणीने सायबर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्षक शैलेष जोगदंड, निशीगंध खुळे, गिरी आदी करत आहेत

अवैद्य वाळू वाहतूकीचे बळी! भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीवरील दोघांना चिरडले.


माजलगाव (प्रतिनिधी) : माजलगाव तालुक्यात वाळू माफीयांचा कहर सुरूच आहे.तालुक्यातील सादोळा गावानजीक असलेल्या सांगवी पुलाजवळ वाळूच्या भरलेल्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोराची धडक देऊन त्यावरील दोन व्यक्तींना चिरडले. या अपघातात मोटरसायकल वरील दोन्ही व्यक्ती जागीच ठार झाल्या आहेत.ही घटना बुधवार रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली.

अपघातात मयत झालेले विजय युवराज पगारे (वय ३७ वर्ष ) व महेश रावसाहेब चोले ( वय 33 वर्षे ) दोन्ही राहणार रांजणखोल तालुका राहाता जिल्हा नगर येथील रहिवासी आहेत. बुधवार रोजी पहाटेच्या सुमारास ते मोटार सायकल(क्र.होंडा एम एच-१७ सि.डब्ल्यू.३२०९)वरून माजलगाव तालुक्यातील सादोळाजवळील सांगवी पुलावरून आष्टीकडे जात होते.यावेळी सादोळा गंगा पात्रातून रोडवर येणाऱ्या अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅकटने ( एम.एच.२३ टी ५४२८ ) दुचाकीस जोराची धडक दिली.या अपघातात दुचाकीस्वार दोघे जागीच ठार झाले.

दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.मृत शव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन आले.अपघातातील दोन्ही वाहने ताब्यात घेतले आहेत.अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅकर सादोळा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत ग्रामीण पोलिसात अज्ञात ट्रॅक्टर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक घेत आहे मोकळा श्वास. होतोय बॅनरमुक्त.


बीड (प्रतिनिधी)  : शहरातील सर्वात वर्दळीच्या असणारा छत्रपती शिवाजी महाराज चौक बॅनमुक्त हाेत आहे. बुधवारी सकाळपासूनच बीड नगर पालिका आणि पाेलिसांनी संयूक्त मोहिम राबवित सर्व बॅनर हटविण्यास सुरूवात केली आहे. सध्या छोटे बॅनर काढणे चालू असून, वाहतूक कमी झाल्यास रात्रीच्यावेळी मोठे बॅनर काढले जाणार आहेत. सर्व बॅनर हटविल्याने चौकाने माेकळा श्वास घेतला आहे. आता यापुढे येथे कोणाचेही बॅनर लागणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेण्याची गरज आहे.

बीड शहरात सध्या फुकटात चमकोगिरी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वाढदिवस, कार्यक्रम, जयंती, उत्सव आदींच्या अनुषंगाने सर्रासपणे चौक, रस्ते, दुभाजक या ठिकाणी अनाधिकृतपणे बॅनर लावले जाते. यामुळे शहर विद्रूप हाेत चालले आहे. शिवाय वाहतूकीसह अडथळा निर्माण हाेत आहे. याबाबत तक्रारी प्राप्त होताच पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शहरातील मुख्य चौक बॅनरमुक्त करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सुचना केल्या. त्याप्रमाणे बुधवारी सकाळपासूनच बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बॅनर हटविण्यास सुरूवात झाली. जे मोठे बॅनर आहेत, ते रात्रीच्या सुमारास वाहतूक कमी झाल्यास हटविले जाणार आहेत. या कारवाईने सामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, मारूती खेडकर, मुख्याधिकारी निता अंधारे, स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव, मुन्ना गायकवाड आदींनी केली.

सर्वच बॅनर हटवणारबीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व आण्णाभाऊ साठे चौक सध्या बॅनरमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सर्वच बॅनर हटविले जाणार आहेत. जे मोठे बॅनर आहेत ते रात्रीच्यावेळी हटविले जातील. दिवसा हटविल्यास अपघात होण्याची शक्यता असते.नीता अंधारे, मुख्याधिकारी न.प.बीड

प्रामाणिक कारवाई व्हावी

बीड शहरातील बॅनर काढताना सरसकट काढणे अपेक्षित आहे. काही लोकांचे बॅनर राहिले आणि काहींचेच काढले तर असे चालणार नाही. कारवाईत दुजाभाव व्हायला नको. आमचे प्रशासनाला सहकार्यच असेल, पण कारवाईमध्ये प्रामाणिकपणा असावा.

- सचिन मुळूक, जिल्हाप्रमुख शिवसेना बीड

मनोज जारंगे ने सरकार को दी चेतावनी, कहा- बुधवार से मांग लागू नहीं हुई तो करेंगे आमरण अनशन


मुंबई (संवाददाता) महाराष्ट्र में एक बार फिर मराठा आरक्षण की मांग चर्चाओं में हैं। मराठा आंदोलन के प्रमुख मनोज जारंगे ने मंगलवार को सरकार को अल्टीमेटम दिया है। जारंगे का कहना है कि बुधवार से उनकी मांगों को लागू किया जाए नहीं तो 10 फरवरी से आमरण अनशन शुरू किया जाएगा। पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि कुनबी प्रमाण पत्र वाले मराठों को सरकारी नौकरियों और शिक्षा में कोटा लाभ प्राप्त करने की अनुमति देने के लिए अधिसूचना को कानून में बदलने के लिए राज्य विधानमंडल का एक विशेष सत्र बुलाया जाना चाहिए। ऐसा मनोज जरांगे पाटील ने कहा.