Saturday, January 6, 2024

पालकांनो सावधान! चिमुकल्यांमध्ये वाढू लागलाय हृदयविकार, तब्बल ८८ जणांवर शस्त्रक्रिया.


कांतीकारी साथी न्युज _

मागच्या काही काळापासून हृदयविकाराचे आजार तरुणांमध्ये वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे तरुणांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

पालकांना सावधानतेचा इशारा देणारी बातमी बीडमधून आहे. आता 0 ते 18 वयोगटातील लहान मुलांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीडमध्ये 0 ते 18 वयोगतील तब्बल 88 मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत बीड जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून 88 शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्याचबरोबर या तपासणी अंतर्गत आतापर्यंत हृदय शस्त्रक्रियेसोबतच इतर 400 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रिया व मुलांच्या आजाराचा सर्व खर्च केंद्र सरकारच्या माध्यमातून केला जात आहे. दरम्यान यामुळं आता पालकांनी आपल्या पाल्याच्या आरोग्याविषयी सावधान राहून काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

1. मुलांमध्ये हृदयविकाराचा झटका का येतो?

  • शाळेची लवकर उठण्याची वेळ आणि झोप पूर्ण न होणे यामुळे हृदयावर परिणाम होताना दिसत आहे.

  • खेळण्याच्या वेळेत मोबाईल फोनचा अतिवापर, तसेच शारीरिक हालचाल कमी होणे.

  • मुलांना खेळण्यासाठी न पाठवणे, अभ्यासाचा दबाव आणि मानसिक संतुलन बिघडणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल.

  • लहान वयातच रक्तदाब, शुगर, कोलेस्टेरॉल यांसारखे आजार मुलांमध्ये दिसून येतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

No comments:

Post a Comment