बीड (प्रतिनिधी) बीडच्या परळी शहरातील महेश कॉम्प्लेक्स परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी फ्लोरा स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी चौकशीसाठी २ महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
बीडमध्ये जुलै २०२३ मध्ये देखील अशीच एक घटना घडली हेती. एका कला केंद्राच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. पोलिसांनी कला केंद्रावर छापा टाकून ५ अल्पवयीन मुलींसह काही महिलांची सुटका केली होती. तसेच या प्रकरणी ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बीडमध्ये सातत्याने अशा घटना उघडकीस येत आहेत. सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्टेशन चौक येथील हॉटेल स्टार पॅलेसमध्ये देखील असाच प्रकार समोर आला होता. सुरु असणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी सांगली आणि इतर जिल्ह्यातील दोन महिलांची सुटका करण्यात आली होती.
No comments:
Post a Comment