Saturday, January 27, 2024

मराठा समाजाचा मोठा विजय!मनोज जरांगे पाटील यांनी आरपारची लढाई जिंकली, सरकारकडुन सर्व मागण्या मान्य.


मुंबई (कांतीकारी साथी न्यूज) : मराठा आरक्षणाच्या संदर्भातील मराठा समाज्याच्या मागण्या घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली होती त्या सर्व मागण्या राजी सरकारकडून शनिवार(दि-२७) रोजी पहाटे मान्य करण्यात आली आहेततसा अध्यादेशहि राजी सरकारने काढल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व मागण्या मान्य केल्याचे पत्र घेऊन स्वत: राज्याचे मुखयमनातरी एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येणार आहेत. त्यानंतर मनोज जरांगे पाटील आपले उपोषण सोडणार असल्याची माहिती खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांच्या समोर दिली आहे.

मनोज जररंगे पाटील यांच्या मागण्याच्या संदर्भात काल रात्री उशिरा पर्यंत मुख्यमंत्री व काही वरिष्ठ अधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीला मंत्री दिपक केसरकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फनसळकर आणि काही विभागाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी व सामाजिक न्याय विभगचे सचिव सुमंत भांगे उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटील यांनी कालच्या त्यांच्या वाशी येथील भाषणात नमूद केले होते की, “आजच्या आज अध्यादेश काढला नाही तर, मराठा बांधव उद्या मुंबईला येईल. जर शासनाने अध्यादेश काढला आणि तो योगी असेल तर ते गुलाल उधळायला मुंबईला येणार” अस स्पष्ट केले होते. यामुळे जरांगे पाटील आज नवी मुंबईतच गुलाल उधळणार आहेत आणि मराठा मागण्या विजयी सभेची तारीख जाहीर करणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी सर्व माध्यमांना दिली आहे.

सर्व मराठा बांधवांचे अभिनंदन-

महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून पहाटे त्या संदर्भातील अध्यादेश काढला आहे. त्यामुळे मराठा बांधवांच्या लढ्याला मोठे यश आले आहे. आज सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक,वाशी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थित आपली विजयी सभा होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज्याच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment