गेवराई (प्रतिनिधी) ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीला रिक्षात बसवून नेत अहमदनगर आळंदी येथे बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना गेवराई तालुक्यात घडली आहे.
महेश अर्जुन दरेकर असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला रिक्षामध्ये बसवून नेत अहमदनगर आणि आळंदी या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार चकलांबा पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात चकलांबा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पीडितेचे आई-वडील ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेलेले आहेत.पीडिता आणि तिचा भाऊ दोघेच गावाकडे राहत होते, याचाच गैफायदा घेतं आरोपी महेश अर्जुन दरेकर या रिक्षा चालकाने मुलीस आपल्या रिक्षात बसवत अहमदनगर आणि आळंदी येथे नेले. त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या पीडित मुलीच्या आई वडीलांच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment