Thursday, January 11, 2024

सहायक जिल्हाधिकारी कविता नायर गौण खनीच अधिकारी माधव काळे यांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई. 2 कोटींचा मुद्देमाल जप्त.


गेवराई (प्रतिनिधी) गोदावरी पात्रातून होणाऱ्या वाळू वाहतुकी विरोधात विशेष मोहीम राबवत सहाय्यक जिल्हाधिकारी करिष्मा नायर गौण खनिज अधिकारी माधव काळे यांनी कारवाई करत म्हाळस पिंपळगाव,सावरगाव येथून अवैध वाळू वाहतूक करणारे पाच टिप्पर सह दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

सहायक जिल्हाधिकारी आदित्य जिवने यांनी वाळू पट्ट्यात धुमाकुळ घालणाऱ्या वाळू माफियांच्या चांगल्‍याच मुसक्या आवळल्या होत्‍या. ते असेपर्यंत गोदावरीचे वाळू पात्र स्थिर होते. त्यांची बदली होताच. वाळू माफिया सक्रिय झाले.या भागातून रात्रंदिवस राजरोस वाळू उपसा होऊ लागला. महसूल अधिकारी कर्मचारी तसेच पोलिसांना हाताशी धरून वाळू माफियांनी उच्छाद मांडला होता.वाळू माफियांच्या दहशतीमुळे तसेच महसूल चे अधिकारी त्यांनी पाळल्यामुळे तक्रार करायची तर कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला होता.परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता.मात्र नव्याने आलेल्या सहायक जिल्हाधिकारी कविता नायर यांनी गौण खनीच अधिकारी माधव काळे यांच्या सोबत सयुक्त कारवाई करत, बूधवार दि 10 जानेवारीला पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान म्हाळसपिंपळगाव, सावरगाव येथील गोदापात्रात छापा टाकून विशेष मोहिम राबवत 5 टिप्पर पकडले. तब्बल 2 कोटी रुपयांचे मुद्देमाल जप्त करुन वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे. सदरिल कारवाई जिल्हाधिकारी दिपा मुधोळ, अप्पर जिल्हाधिकारी त्रिभून कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हाधिकारी कविता नायर, गौण खनीच अधिकारी माधव काळे, मंडळ अधिकारी सुनिल तांबारे, अंगद काशिद, तलाठी ससाने, पोहेकॉ,आघाव यांनी कारवाई केली आहे. जप्त वाहन तहसील कार्यालयात लावून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment