Thursday, January 25, 2024

जवाहर एज्युकेशन सोसायटी चे उपाध्यक्ष तथा परळी शहरातील पहिले दंतरोग तज्ञ डॉ देविदास मुंडे (दे.घ. मुंडे ) ह्यांचे अल्पशा आजाराने निधन.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जवाहर एज्युकेशन सोसायटी चे  उपाध्यक्ष तथा परळी तालुक्यातील पहिले व प्रसिद्ध दंत रोगतज्ञ डॉ देविदास मुंडे (दे. घ. मुंडे ) (नाथरेकर) यांचे अल्पश्या आजाराने निधन झाले असून परळी येथील व्यंकुठ भूमी या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी संपन्न झाला. त्यांच्या  पश्चात त्यांची पत्नी दोन मुले डॉ दिपक मुंडे व वैभव मुंडे आणि दोन मुली असे कुटुंब सदस्य आहेत.
 डॉ देवीदास मुंडे मूळचे नाथरा या गावचे रहिवासी होते. परळी तालुक्यातील व परिसरातील पहिले प्रसिद्ध दंतरोग तज्ञ तसेच रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हा मूलमंत्र जपणारे समाजसेवक असे त्यांचे नाव लौकीक होते.
त्यांच्या या आकस्मिक जाण्याने संपूर्ण मुंडे कुटुंबावर तसेच नाथरा गावावर दुःखाचे सावट आले आहे.
या प्रसंगी राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालक मंत्री ना.धनंजय मुंडे तसेच भाजपा नेत्या मा.पंकजा ताई मुंडे यांची उपस्थिती होती.त्यांनी मुंडे कुटुंबातील सर्वांचे सांत्वन केले. दै. कांतीकारी साथी परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली.
         तरी राख सावडण्याचा कार्यक्रम शनिवार दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता होणार आहे असे कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment