Friday, January 12, 2024

माजलगाव तेलगाव राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा.भेगा आणी खड्ड्यामुळे 25जणांनी जीव गमवला.गुत्तेदार अधिकार्‍यावर कारवाईची मागणी.


माजलगाव (प्रतिनिधी. ) माजलगाव तेलगाव राष्ट्रीय महामार्ग महामार्ग नसून नागरिकांच्या मृत्यूचा सापळा बनला आहे रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या भेगा आणि खड्ड्यामुळे मागील सहा महिन्यात 25 नागरिकांना हा आपला जीव गमवावा लागला आहे. या नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या संबंधित गुत्तेदार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकार्‍यावर कारवाईची मागणी आता सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव तेलगाव हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे काही दिवसातच उघड झाले. रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडण्यास सुरुवात झाली. तसेच अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले. रस्त्यावरील भेगा एवढ्या भयानक पडलेले आहेत की मोटरसायकलचे  चाक या  खड्ड्यांमध्ये अडकून अनेक दुचाकी स्वार व मो
ठ्या वाहनांचे अपघात या महामार्गावर झाले आहेत.मोठमोठ्या भेगा आणि खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात मागील सहा महिन्यात 25 नागरिकांचा बळी गेल्याचे समजते. हा राष्ट्रीय महामार्ग तयार करीत असताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्याचा हा परिणाम आहे. त्यामुळेच या रस्त्यावर मोठ मोठ्या भेगा पडलेल्या दिसून येतात. रस्त्यावर पडलेल्या भेगा कायमस्वरूपी बुजविण्यात याव्यात तसेच वाहतुकीसाठी रस्ता चांगला करून देण्यात यावा यासाठी तेलगाव आणि माजलगाव येथील नागरिकांनी अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग तसेच सा.बा. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिलेले आहेत आंदोलने केलेली आहेत.
    परंतु निगरगट्ट अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संबंधित रस्ता बनविणाऱ्या गुत्तेदाराला पाठीशी घातल्याचे स्पष्ट दिसत आहे. आणखी किती लोकांचे बळी घेणार तेव्हा हा रस्ता चांगला करणार अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. तसेच या रस्त्यावर अपघात होऊन नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या अधिकारी आणि गुत्तेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जनतेतून होत आहे. 

No comments:

Post a Comment