Sunday, February 28, 2021

लातूरमध्ये जनता कर्फ्युला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद.


लातूर  (प्रतिनीधी) :- लातूरमध्ये गेल्या कांही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत,कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी बी पी पृथ्वीराज सिंग यांनी शनिवार (२७/०२/२०२१) व रविवार (२८/०२/२०२१) या दोन दिवशी जनता कर्फ्यु पाळण्याचे आव्हाहन केले आहे.त्यांच्या या आव्हानाला आज शनिवारी(२७/०२/२०२१) रोजी लातूरसह अन्य भागात उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे.

* कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशीभविष्य.*

** मेष **

-- दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यासाठी आपण खूप उत्साही राहाल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हा उत्साह द्विगुणित करेल. 

** वृषभ **

- - कुटुंबातील व्यक्तींसमवेत आपण सल्ला- मसलत कराल. गृहसजावट आणि इतर बाबींमध्ये बदल करण्यात आवड निर्माण होईल. 

** मिथुन **

-- कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णयाप्रत स्थिति येईल. 

** कर्क **

-- आजचा दिवस न्यायपूर्वक राहील. नियोजित कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रयत्नांती असा अनुभव येईल की केलेले प्रयत्न व्यर्थ गेलेत. 

** सिंह ** 

-- आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक आणि मानसिकदृष्टया बेचैन आणि व्यग्र राहाल. संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. 

** कन्या ** 

-- आज नवीन कार्यारंभ किंवा प्रवास करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. प्रेम आणि तिरस्काराच्या राग, द्वेष इ. भावना सोडून समानतेने काम करण्याचा आजचा दिवस आहे.

** तूळ ** 

-- आज दिवसाची सुरुवात आनंददायक असेल असे श्रीगणेश सांगतात. जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील.

** वृश्चिक ** 

-- बौद्धिक कार्य, जनसंपर्क आणि इतरांत मिळून- मिसळून राहण्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. असे श्रीगणेश सांगतात. जवळचा प्रवास घडेल.

** धनु ** 

--  शारीरिक आणि मानसिक स्वास्थाच्या दृष्टीने जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खूप परिश्रमानंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका.

** मकर ** 

-- आज आपण फारच संवेदनशील राहाल असे श्रीगणेश सांगतात. भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा.

** कुंभ ** -

-- महत्त्वाच्या कामाचा निर्णय आज घेऊ नये असे श्रीगणेश सांगतात. नवीन कार्यारंभासाठी आज दिवसाच्या सुरुवातीचा वेळ खूप अनुकूल आहे. 

** मीन ** - 

-- स्वार्थी वृत्तीने काम करण्याचा मोह टाळून अन्य विषयाचा विचार करण्याची सूचना गणेशजी देत आहेत. घर, कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी आपणांस वातावरण अनुकूल राहील. 

खळबळजनक! जेवण न दिल्यामुळे कोविड सेंटरमधील रुग्ण थेट रस्त्यावर .


* औरंगाबादमधील कोरोना रुग्णांची जेवणासाठी रस्त्यावर शोधाशोध.

औरंगाबाद  :- सध्या राज्यभरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तर पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान औरंगाबादमधील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. औरंगाबाद शहरातील एका कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना वेळेत जेवण न दिल्याने रुग्णांनी संताप व्यक्त केला.

कोरोना झालेल्या रुग्णांचा आहार व्यवस्थित असणं गरजेचं आहे. मात्र या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना वेळेत जेवण न दिल्याने मोठा गोंधळ समोर आली आहे. याचा एक व्हिडिओदेखील समोर आला असून ज्यामधून रुग्ण गेटबाहेर पडताना दिसत आहेत. कोविड सेंटरमध्ये जेवण न दिल्यामुळे रुग्णांनी थेट रस्त्यावर येऊन जेवणासाठी शोधाशोध सुरू केल्याचं समोर आलं आहे.

औरंगाबाद महापालिकेकडून कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी जेवणाची सोय करण्यात येते. मात्र आज त्यांना जेवण मिळालं नसल्यानं संतप्त रुग्णांनी सेंटरचे गेट उघडून बाहेर पडले. ही घटना शुक्रवारी घडली. औरंगाबाद शहरातील किल्ले अर्क येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असलेल्या 247 रुग्णांना महापालिकेकडून वेळेत जेवण मिळाले नाही. म्हणून संतप्त रुग्णांनी कोविड केअर सेंटरमध्ये धुडगूस घातल्याचं समोर आलं आहे.
सुरुवातीला सेंटर बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णांना सुरक्षा रक्षकाने अडवलं. मात्र तरीही रुग्ण ऐकत नव्हते. अशात मोठ्या संख्येने रुग्ण गेटबाहेर पडले. रस्त्यावर जाऊन जेवणासाठी काही मिळेल का याची शोधाशोध सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे कोरोना पसरू नये म्हणून कडक निर्बंध लावले जात आहेत, मात्र दुसरीकडे कोविड सेंटरमधूनच मोठ्या प्रमाणात रुग्ण रस्त्यावर पडल्याचं दिसत आहे. ही बाब चिंता वाढवणारी आहे.

Saturday, February 27, 2021

बीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते शरीर सौष्ठव स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवल्याबद्दल किरण गिराम व ऋषिकेश फड यांचा सत्कार.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील किरण गिराम व ऋषिकेश फड यांनी औरंगाबाद येथे झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत मराठवाड्यात व्दितीय क्रमांक पटकावल्याबद्दल बीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा परळी विशेष भूषण पुरस्कार प्राप्त पैलवान मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
     शहरात आज शनिवार, दि.27 रोजी भगवान बाबा मंदिर जवळील मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात शरीर सौष्ठव स्पर्धेत किरण गिराम व ऋषिकेश फड यांचा पुष्पगुच्छ देऊन बीड जिल्हा कुस्तीगीर परीषदेचे उपाध्यक्ष तथा परळी विशेष भूषण पुरस्कार प्राप्त पैलवान मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी किरण गिराम यांनी 65 किलो गटातून द्वितीय क्रमांक पटकावला तर ऋषिकेश फड यांनी 55 किलो गटातून क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या यशाने परळीत मानाचा तुरा रोवला गेला आहे. गिराम व फड यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल पैलवान माऊली मुंडे, पैलवान प्रकाश मुंडे, अजय संगवारे, किरण चव्हाण, विनायक कराड आदींची उपस्थिती होती.

माहुर आगारातील प्रकार नादुरुस्त तिकिट मशिन ने घेतला वाहकाचा जीव.बदनामी च्या भीती ने केली आत्महात्या.


* वाहकावरील अन्याय दूर करण्यासाठी लिहली सुसाईड नोट!


नांदेड (प्रतिनीधी ) : माहुर आगारातील एसटी महामंडळाच्या वाहकांना बसेसमध्ये प्रवाशांना तिकीट देण्यासाठी उपलब्ध असलेल्या ईटीआयएम (इलेक्ट्रॉनिक तिकीट व्हेंडिंग मशीन) नादुरुस्त असल्याने तपासणीत कार्यवाही ला सामोरे जावे लागेल,त्यात आपली नाहक बदनामी होईल या भीतीने माहूर आगारातील वाहकाने आज दिनांक २६ रोजी सकाळी एसटी बस मध्ये आत्महत्या केली. वाहकाच्या आत्महत्येला रापम प्रशासन जबाबदार असल्याचे सुसाईट नोट मध्ये नमूद असल्याने मानसिक छळ करणारे ते अधिकारी कोन हे पोलिस तपासात समोर येणार असले तरी नादुरुस्त तिकिट मशिन मुळे संजय संभाजी जाणकार (४९) या वाहकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

माहूर आगारात वाहक म्हणून कार्यरत संजय संभाजी जाणकार (४९) यांनी दोरी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक २६ शुक्रवार रोजी उघडकीस आली.सफाई कर्मचारी लक्ष्मीबाई व्यवहारे यांना एस. टी.बस क्रमांक एम.एच.२० बी.एल.४०१५ मध्ये संजय संभाजी जाणकार यांचा दोरीने लटकलेला मृतदेह दिसून आल्याने त्यांनी ही माहिती इतर कर्मचाऱ्यांना दिली.आगारातून मिळालेल्या माहिती वरून पोलीस कर्मचारी विजय आडे,प्रकाश देशमुख यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला व सुसाईट नोट हस्तगत केली.आत्महत्या पूर्वी सदर ची सुसाईट नोट कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सप ग्रुप वर वाहकाने टाकल्याने घटना स्थळी रापम प्रशासना विरूद्ध रोष व्यक्त करण्यात येत होता.सुसाईट नोट मध्ये जाणकार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ईटीआयएम मशीन नादुरुस्त असल्याने वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून बिघाड असलेल्या मशिनी द्वारे वाहक आपली कामगिरी बजावत आहे.व खोट्या अहवालाने निलंबित व सेवेतून बडतर्फ होत आहे.मी सुद्धा दिनांक २४ रोजी माहूर वरून महागाव साठी साडे तीन प्रवासी घेतले,मात्र मशिनित बिघाड असल्याने साडे तीन ऐवजी एक तिकीट प्रिंट झाली.ती ही अपंगा साठी असलेली तिकीट बाहेर आली.हे सारा प्रकार सुरू असताना धनोडा पर्यंत गाडी पोहचली.परिणामी तपासणीत माझ्यावर केस दाखल झाली. आता मला निलंबित केले जाईल,सोयरे, धायरे,व भावकी आणि रापम कर्मचाऱ्यात माझी बदनामी होईल,प्रत्येक जण मला चोर समजेल.मी रापम मध्ये चार वर्ष प्रामाणिक सेवा केली आहे.त्या मुळे माझी बदनामी होईल. आगारात सदर ची मशीन चेक केली जाईल,बिघाड दुरुस्त करून खोटा अहवाल दिला जाईल.व मला दोषी ठरविले जाईल.मशीन योग्य असती तर तिकीट योग्य निघाली असती माझी बदनामी झाली नसती.माझ्या आत्महत्येला प्रशासन जबाबदार आहे. आगारातील ५० टक्के मशीन नादुरुस्त आहेत.आदिलाबाद, किनवट साठी देण्यात येणाऱ्या मशिनी तर पूर्ण नादुरुस्त आहे.मशिनित डिस्प्ले होत नाही.अंधार असतो.त्या मुळे ना टप्पा दिसतो ना तिकीट… ना..प्रवास भाडे…. वाहकाने आपली कामगिरी कशी करावी,गाडी तपासणीत चूक आढळल्यास केस बुक होते,मशिनित बिघाड असल्याने वाहक दोषी कसा..? रापम प्रशासनाने योग्य मशीन देणे,व प्रशासनाने वाहका वरील अन्याय दूर करावे असे नमूद केल्याने दिनांक २४ रोजी गाडी तपासणी दरम्यान तपासणी अधिकाऱ्याने केलेल्या मानसिक छड व बदनामी च्या भीती ने जाणकार यांनी आत्महत्या केल्याचा एकच सुर बस स्थानक परिसरात होता. सदर प्रकरणी माहूर पोलीस अधिक तपास करीत आहे.

महाराष्ट्रात परत लॉकडाऊन होणार नाही.सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती.


इंदापूर : ( प्रतिनीधी) वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यात परत एकदा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या मनात घोळत होता. माञ, ठाकरे सरकारमधील एक मञ्यांनेच महाराष्ट्रात परत लॉकडाऊन होणार नाही. मात्र नागरिकांनी लॉकडाऊन होऊ नये, यासाठीही सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ते इंदापुरात बोलत होते. 

महाराष्ट्रात कोरोना झपाट्याने पसरतो आहे. पुण्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमिवर आज राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथील स्थानिक प्रशासनाची तातडीने आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भातल्या उपाय योजना आणि सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहे.  इंदापूर तालुक्यात सध्या १०८ जण कोरोना पॉझिटिव रुग्ण आहेत, यामध्ये इंदापूर ग्रामीण मधील ७६, तर इंदापूर शहरात सध्या ३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या सर्वांवरती उपचार सुरू असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात भिगवण, पळसदेव आणि मदनवाडी तर इंदापूर शहरात आंबेडकरनगर या भागात जास्त रुग्ण आढळत असल्यामुळे या भागात घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याचे आदेश राज्यमंत्री भरणे यांनी अधिकार्‍यांना दिले.

कोरोना अजून गेलेला नाही : कोरोना अजून गेलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याची गरज आहे, असा सल्ला दत्ता भरणे यांनी जनतेला दिला आहे. इंदापूर शहर आणि तालुक्यात जे नागरिक मास्क वापरणार नाहीत, त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश भरणे यांनी पोलिसांना दिले आहेत. या कारवाईत अनेक जण नाराज होतील,माञ कोरोना अधिक वाढू नये म्हणून अशी कारवाई करण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरा असे आवाहन दत्ता भरणे यांनी केले आहे.

रेल्वे स्टेशनवर चहा विक्रेत्यांवर गुन्हे; रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ३४३ जणांवर कारवाई.

.


जळगाव- ( प्रतिनीधी) कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत संचारबंदी लागू केलेली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ३४३ जणांविरुध्द जिल्ह्यात रात्रीतून कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय शहरात रेल्वे स्टेशनवर चहा विक्री करणाऱ्या चार विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून रेल्वे स्टेशन परिसरात चहाचे दुकान लावून गर्दी जमविण्यात आली व तेते सोशल डिस्टन्सिग, मास्कचा वापर न करणे आदी नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा व्हिडीओ माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी केला होता व नंतर हा व्हिडीओ अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना पाठविला होता. गवळी यांनी रात्रीच शहर पोलिसांचे पथक पाठवून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार अशोक भागवत पद्मे (३०), सैय्यद हैदर अली (६९, दोन्ही रा.शिवाजी नगर), भगवान कडूबा पाटील (७०,रा.असोदा, ता.जळगाव) व एहसान अली हैदर अली (२०,रा. उमर कॉलनी) या चौघांविरुध्द कलम १८८ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. असे असतानाही नागरिकांकडून त्याचे उल्लंघन होत आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिले आहेत. गुरुवारी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३४३ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ६२ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वाधिक ४७ कारवाया चोपड्यात झाल्या असून धरणगावात ३९ झाल्या आहेत. त्याखालोखाल पाचोरा ३०, यावल २३, चाळीसगाव १९, भुसावळ शहरात १७ कारवाया झाल्या आहेत.

पाटबंधारे विभागाचा कनिष्ठ लिपिक रामदासीला ३ हजारची लाच घेताना एसीबी पथकाने पकडले.



कर्मचाऱ्याचे भविष्य निर्वाह निधी प्रकरण

 प्रेस नोट ::

दिनांक :- 26.02.2021.

पाटबंधारे विभाग जालना येथील कनिष्ठ लिपीक श्री. महेश बाळकृष्ण रामदासी यांना 3,000/- रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालनाच्या पथकाने पकडले.

  1. आरोपीचे नाव, हुद्दा व पत्ता : लोकसेवक श्री. महेश बाळकृष्ण रामदासी वय 39 वर्ष व्यवसाय नोकरी कनिष्ठ लिपीक, कार्यकारी अभियंता कार्यालय, पाटबंधारे विभाग, जालना रा रो हाऊस नं ।2 पांगारकर नगर, अंबड रोड, जालना (वर्ग - 3)
  2. गुन्हा घ ता व ठिकाण : दि- 26.02.2021 रोजी अंबड चौफुली चहाचे हॉटेलवर जालना येथे
  3. लाचेची रक्कम : 3,000/- रुपये.

याबाबत हकीगत अशी की, यातील तक्रारदार यांनी तक्रार दिली की, ते पाटबंधारे उपविभाग, अंबड येथे कार्यरत असुन त्यांनी त्यांचे भविष्य निर्वाह निधीतुन रक्कम मंजुर करण्यासाठी अर्ज दिला होता, सदरचे अर्जावरुन त्यांचे भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढून देण्यासाठी कार्यकारी अभियंता कार्यालय, पाटबंधारे विभाग, जालना येथील कनिष्ठ लिपीक श्री. महेश रामदासी यांनी तक्रारदार यांचेकडे 3,000/- रूपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदारास कनिष्ठ लिपीक श्री. महेश रामदासी यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली. सदर तक्रारीवरून दि. 22.02.2021 रोजी पडताळणी केली असता कनिष्ठ लिपीक श्री. महेश रामदासी यांनी तक्रारदार यांचेकडे 3,000/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पण्ण झाले. तसेच आज दि. 26.02.2021 रोजी आलोसे कनिष्ठ लिपीक श्री. महेश रामदासी यांनी तक्रारदार यांचेकडून त्यांचे भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढुन देण्यासाठी 3,000/- रुपये लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्विकारली असतांना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालनाचे पथकाने अंबड चौफुली चहाचे हॉटेलबर जालना येथे रंगेहाथ पकडले.

लोकसेवक श्री. महेश बाळकृष्ण रामदासी वय 39 वर्ष व्यवसाय नोकरी कनिष्ठ लिपीक, कार्यकारी अभियंता कार्यालय, पाटबंधारे विभाग, जालना रा रो हाऊस नं 12 पांगारकर नगर, अंबड रोड, जालना (वर्ग 3 ) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही चालू आहे.

तसेच अॅन्टी करप्शन ब्युरो कडून आवाहन करण्यात येते की, कोणी लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करीत असल्यास किंवा खाजगी व्यक्ती मार्फत कोणी लाचेची मागणी करीत असल्यास 02482 220252, तसेच टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करावा. तसेच पोलीस उप अधिक्षक जालना मो.नं. 8975762906, पोलीस निरीक्षक मो.नं. 8390757835, 9823216788 वर संपर्क करावा.


पोलीस उप अधिक्षक, 

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,जालना.

जीएसटीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, बाजारपेठात शुकशुकाट.

बीड / परळी वैजनाथ (प्रतिनीधी)  शेतकरी आंदोलनानंतर जीएसटी च्या विरोधात व्यापारी वर्ग एकवटला आहे. या अनुषंगाने व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला प्रचंड प्रतिसाद मिळाला. बीड जिल्ह्यात देखील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवल्यामूळे संपूर्ण बाजारपेठ ठप्प झाली.


बीडचे सीए भानुदास जाधव, सीए गोपाल व्यापारी महासंघाची बुधवारी बैठक झाली होती.जीएसटी कायद्याचा मसुद्यात असलेल्या जटिल तरतुदी व जाचक अटीच्या विरोधात 26 फेब्रुवारी शुक्रवार रोजी भारत व्यापार बंदचे आवाहन कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स केले आहे त्यास बीड शहर व जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला. या भारत व्यापार बंदला देशातील 40 हजार संघटना व 8 करोड व्यापार्‍यांनी पाठींबा दिला. हे सर्व व्यापारी आप आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन जीएसटीच्या जाचक तरतुदी विरुद्ध लढा पुकारत बंद यशस्वीपणे शांततेच्या मार्गाने पार पाडला. व्यापाऱ्यांनी मागच्या दाराने पुन्हा एकदा इनस्पेक्टर राज आणून भ्रष्टाचाराला खतपाणी न देता जीएसटी मधील कुठलीही सुनावणी न करता किंवा नोटिस न देता माल जप्त करणे, जीएसटी रजिस्टरेशन रद्द करणे, रिटर्न्स भरू न देणे, गुन्हे दाखल करणे इत्यादी कलमा मध्ये संशोधन करून व्यापार्‍यांना जीएसटी रिटर्न सुलभतेने भरता येतील असे कायद्यात बदल घडवून आणावे. म्हणजे व्यापार्‍यांना आपल्या व्यापार वाढीकडे लक्ष देता येईल अशी मागणी करण्यात आली. सर्वच व्यापारी संघटनांनी या बंद मध्ये उस्फुर्त सहभाग घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरातील व्यापार पूर्णपणे ठप्प झाला होता. एरवी वर्दळ असलेल्या बाजारपेठेत संचारबंदी लागू असल्यासारखा शुकशुकाट पसरला होता.

बीड नगर पालिकेचा विकासाकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प सादर.

 

* येणाऱ्या वर्षात बीड शहराचा कायापालट करण्याचा संकल्प-नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर.

बीड - (प्रतिनीधी ) गेल्या पंचवीस वर्षापासून बीड शहरात कसलीही करवाढ न करता बीड नगर परिषदेच्या अथक परिश्रमातून शहर विकासाचा संकल्प पूर्णत्वास आपण नेत आहोत शासनाकडून विविध योजना मंजूर करून घेत सार्वजनिक बांधकाम पाणीपुरवठा विद्युत स्वच्छता नगररचना यासाठी पाठपुरावा करून माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून बीड शहरासाठी मोठा निधी उपलब्ध करून विविध विकास कामे पूर्ण केली या वर्षी विविध योजनांचे आराखडे तयार करून पुढील वर्षात बीड शहराचा कायापालट करण्याचा संकल्प आपण केला आहे बीड शहराला विकासाकडे नेणारा हा शिलकी अर्थसंकल्प असून

सन 2021 22 या आर्थिक वर्षामध्ये महसूली उत्पन्न घरपट्टी पाणीपट्टी बेटरमेंट चार्ज बांधकाम परवानगी गुंठेवारी चार्जेस शासनाकडून मिळणारे महसुली अनुदान या स्वरूपात 91 कोटी 44 लक्ष 35 हजार तर शासनाकडून मिळणारे भांडवली अनुदान 185 कोटी 76 लाख व अंदाजे शिल्लक दोन लक्ष असे एकूण 277 कोटी 22 लाख 35 हजार इतके उत्पन्न प्राप्त होणार आहे त्या नुसार 277 कोटी 16 लाख 12 हजार खर्च गृहीत धरता सहा लाख 23 हजार शिलकीचे अंदाजपत्रक सादर करत आहे


शहरातील नागरिकांना विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले आहे

आज दिनांक 26 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बीड नगरपालिकेचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी सादर केला यावेळी बोलताना ते म्हणाले की बीड नगरपालिकेचे उत्पन्न कमी असतानाही विविध योजनांच्या माध्यमातून आपण सर्वच विभागाला नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे उत्पन्नापेक्षा 11 कोटी 91 लाख अधिकचा खर्च करावा लागला हा खर्च इतर अनुदानातून भागवण्यात आला बीड शहरात अनेक योजना राबविल्या असून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून योजनेसाठी निधी मंजूर करून घेतला बीड शहरात सर्वाधिक बचत गट असून महिला बचत गटांना शून्य टक्के व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले केवळ बीड नगरपालिकेच्या माध्यमातून महिला बचत गटासाठी स्वतंत्र मॉल आपण उपलब्ध करून देणार आहोत शहराची हद्दवाढ होऊ लागली आहे त्यामुळे बीड शहरात लोकसंख्येच्या आधारावर 140 अंगणवाड्यांची गरज असून यासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे सध्या बीडची लोकसंख्या 2011 नुसार 2 लाख 3 हजार 240 इतकी आहे त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक वार्डात 2 घंटा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे शहरात बायोगॅस प्रकल्प आगामी काळात उभारण्यात येणार आहे पर्यावरणाच्या दृष्टीने 20000 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे त्यानुसार प्रत्येक भागात वृक्षारोपण करण्यात आले आहे काळात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता कोविड योद्धा म्हणून काम केले आहे त्यांचाही आम्ही सन्मान केला आहे
अमृत योजनेसाठी शासनाकडून 114 कोटी मंजूर झाले आहेत येत्या दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे 180 किलोमीटर लांबीची पाइपलाइन झाली आहे शहरात अतिरिक्त पाणी व्हावा या उद्देशाने काम चालू आहे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून यामुळे नगरपालिकेचे वीस लाख रुपये वीजबिल वाचणार आहे बीड शहरात 165 कोटीची भुयारी गटार योजना काम चालू असून एकूण 143 किलोमीटर पैकी 55 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे यासाठी देखील सातत्याने पाठपुरावा चालू आहे जीवन प्राधिकरण कडे सुरू असलेले ही कामे तात्काळ व्हावी यासाठी आपण सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहोत दुसऱ्या टप्प्यासाठी निधी करता पाठपुरावा चालू असून बीड शहरात 13294 पथदिवे बसविण्यात आले आहेत या पथदिवे यामुळे नगरपालिकेचे 40 लाख रुपये वीज बिल बचत होत आहेत गेल्या वर्षी दहा कोटी चा निधी अण्णांच्या माध्यमातून उपलब्ध करून घेतला ती विविध कामे आता पूर्णत्वास जात आहेत शहरातील प्रत्येक भागात अंतर्गत रस्त्यांची नाल्यांची कामे पुढील वर्षात पूर्ण करण्यासाठी आपण स्वतंत्र निधीची मागणी केली असून तो उपलब्ध होताच ही कामे देखील आपण पूर्ण करणार आहोत अल्पसंख्यांक विकासासाठी 15 कोटीचा निधी उपलब्ध होत असून रस्ते विकास अनुदान योजनेअंतर्गत आणखी 15 कोटी ची मागणी करण्यात आली आहे सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत शहरात 16 रस्ते पूर्ण होत असून यासाठी 85 कोटी ची कामे चालू आहेत हे मुख्य रस्ते झाल्यामुळे शहरात लहान-मोठे व्यापार सुरू झाले आहेत जमिनीच्या किमती वाढल्या आहेत याठिकाणी मार्केट आता वाढू लागले आहे तरूणांच्या हाताला काम मिळाले आहे बेरोजगारी कमी झाली आहे नगरोत्थान चा दुसरा टप्पा 56 कोटी चा आहे तो निधी उपलब्ध झाल्यास शहरातील आणखी काही मोठी रस्ते पूर्ण होणार आहेत शहरात 12 रस्त्याचा प्रस्ताव आपण सादर केला असून ही कामे करण्यासाठी आपला पाठपुरावा चालू आहे शहरात सुसज्ज आणि सर्व सोयींनी युक्त असे निसर्गरम्य पंढरी गार्डन उभारण्यात येणार आहे यासाठी स्वतंत्र 5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत बीड शहरात 6 प्रभाग आरक्षित आहेत याठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेअंतर्गत दलित वस्तीतील कामे करण्यासाठी 10 कोटीचा निधी उपलब्ध असून तो इतरत्र जाऊ देणार नाही बीड शहरात एकूण 1349 घरकुलाची मंजुरी असून त्यापैकी 600 घरकुल पूर्ण झाले आहेत तर 429 घरकुलाची कामे चालू आहे उर्वरित घरकुले ही पूर्ण होतील शहरात नागरिकांसाठी अकरा ओपन जिम उभारण्यात आल्या असून विविध प्रभागांमध्ये आणखी दहा जिमची गरज आहे यासाठीदेखील नगरपालिकेच्या माध्यमातून पाठपुरावा चालू आहे सकल मराठा समाजाने जागेची मागणी केली आहे यासाठी देखील आपण जागा उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर ज्या ठिकाणी इस्तेमा आयोजित करण्यात आला होता त्या आठ एकर जागेचा विकास करण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव दाखल करण्यात येत आहे बीड शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही प्रयत्न केले जात आहेत बीड शहरात एकूण पाच प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे सध्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असून आणखी तीन प्राथमिक आरोग्य केंद्र अंतिम मंजुरीसाठी प्रस्तावित आहेत एकूणच बीड नगरपालिकेचा अर्थसंकल्प हा पुढील वर्षात बीड शहराचा कायापालट करणारा असून विकासासाठी सर्वच नगरसेवकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे विकास कामांमध्ये आपण कधीही भेदभाव केला नाही आणि करणारही नाही प्रत्येक नगरसेवकाला स्वतःच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे एक नगराध्यक्ष या नात्याने शहर विकासाची जबाबदारी माझ्यावर असली तरी प्रभागातील नगरसेवकाच्या मागणीनुसार ही कामे करण्यात येतील बीड शहरात जी कामे झाली आहेत ती स्थानिक नगरसेवकाने मागणी केलेल्या नुसार करण्यात आली आहेत प्रत्येक प्रभागात कोणती कामे आवश्यक आहेत यासाठी संबंधित नगरसेवकाचे मत विचारात घेतले जाईल असेही ते म्हणाले यावेळी मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे,सर्व विभागाचे सभापती नगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी नगरसेवक उपस्थित होते.

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या.आजचे राशिभविष्य.

facebook sharing button
twitter sharing button** मेष **
आपल्या तापट स्वभावावर आज नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. मानसिकदृष्टया थकवा जाणवेल. अधिक कष्ट करूहन त्यामानाने प्राप्ती कमी होईल. संतती विषयी काळजी राहील. कामाच्या तापामुळे घरातील व्य्कतींकडे कमी लक्ष द्याल. सरकारी कामात मात्र यश मिळेल. पोटदुखीमुळे वैतागून जाल.

** वृषभ **

श्रीगणेशाच्या आशीर्वादामुळे आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास यांच्या जोरावर पूर्ण कराल.पैतृक घराण्याकडून आपणाला लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात आर्थिकदृष्टया यश मिळेल. संततीसाठी पैशांची गुंतवणूक करा.

** मिथुन **


आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास आपणाला अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. सरकारी लाभ होतील. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून तुमच्या कामाचे योग्य मूल्य मिळेल. भावंडे आणि शेजारी- पाजारी यांच्याशी झालेले गैरसमज दूर होतील. वैचारिक दृष्टचा बदल घडू शकतात. आर्थिक बाबींमध्ये मात्र सावधानी बाळगावी असे श्रीगणेश सुचवितात.

** कर्क **

नकारात्मक दृष्टीकोनातून व्यवहार न करण्याची सूचना गणेश आज आपणाला देत आहेत. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज मिळणार नाही. निराशा आणि असंतोषाची भावना मनात राहील. कुटुंबियांशी गैरसमज होणार नाहीत या विषयी लक्ष द्या. विद्यार्थ्यांना केलेल्या अभ्यासाचे अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. अनैतिक प्रवृत्तींपासून दूर राहा.

** सिंह **


आज आपणामध्ये आत्मविश्वास परिपूर्ण असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन ध्याल. वडील आणि वडीलधार्यांकडून लाभ होतील. सामाजिक मान- मरातब वाढेल. वाणि आणि कृतीमधील तीव्रता दूर करा असा सल्ला श्रीगणेश देतात. रागाचे प्रमाण जास्त राहील. आरोग्य बिघडेल.

** कन्या **

आज आपल्या अहंपणाचा दुसर्‍या व्यक्तीच्या अहंपणाशी संघर्ष होणार नाही याकडे लक्ष देण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीवरून मित्रांबरोबर गैरसमज होतील. स्वभावात रागाचे प्रमाण वाढेल. धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. अकस्मात खर्च होतील. बांडण तंट्यापासून दूर राहा.

** तुळ **


आजचा आपला दिवस शुभफलदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. मिळकतीत वृद्धी. मित्रांकडून फायदा होईल पण त्यांच्यासाठी खर्च ही होईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देण्याने तुम्ही रोमांचित बनाल. स्त्रीमित्रांशी झालेली भेट आनंददायी होईल. विवाहोत्सुकांना अपेक्षित जीवनसाथी मिळेल. उत्तम भोजन मिळेल.

** वृश्चिक **

आजचा दिवस आपणास शुभफलदायी आहे. नोकरी व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ अधिकारी आपल्यावर प्रसन्न असतील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीही होऊ शकते. कौटुंबिक जीवनात संततीची प्रगती होईल आणि तुम्हाला समाधान वाटेल.

** धनू **

आज आपली तब्येत नरमच असेल असे श्रीगणेश सांगतात. आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. व्यावसायिक दृष्टया अडथळे येतील. संकटाविषयीच्या विचारापासून दूर राहा. कोणतीही योजना सावधगिरीने अमलात आणा. प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांच्याबरोबर वादविवाद टाळा.

** मकर **


श्रीगणेश म्हणात की आज अचानक पैसा खर्च होण्याचे योग आहेत. हा खर्च आजारपणावर, व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळे होऊ शकतो. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. क्रोध तसेच नकारात्मक विचारांवर संयम ठेवा. नोकरी- व्यवसायात अनुकूलता राहील. भागीदारांबरोबर आपसात मतभेद होणार नाहीत याकडे लक्ष द्या.

** कुंभ **

श्रीगणेशजी सांगतात की प्रणयासाठी आज अनुकूल दिवस आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलींची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजन व नवीन वस्त्रपरिधान करण्याचे आज योग आहेत. भागीदारीतून फायदा होईल. वाहन सौख्य मिळेल.

** मीन **

आजचा दिवस आपल्याला शुभफलदायी असल्याचे श्रीगणेश सांगतात. आपले मनोबल आणि आत्मविश्वास दृढ बनेल. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात सुखशांती नांदेल. स्वभावातील तापटपणामुळे संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. सहकार्‍यांकडून सहकार्य मिळेल. माहेरहून चांगली बातमी येऊ शकते.

Friday, February 26, 2021

राष्ट्रसंत प.पू.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.


औरंगाबाद (प्रतिनिधी) राष्ट्रसंत प.पू.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 105 व्या जन्मोत्सवानिमित्त औरंगाबाद येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाथरी मठाचे मठाधिपती ष.ब्र.शिवाचार्य काशिनाथ महाराज पाथरीकर (बापु) यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. 
भगवानबाबा बालिका आश्रमात राष्ट्रसंत प.पू.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचा जन्मोत्सव गुरूवार दि.25 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे विधीवत पुजन करून त्यांचे स्मरण करण्यात आले. या अनुषंगाने संत भगवानबाबा बालिका आश्रम येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रेस फोटोग्राफर भीमाशंकरअप्पा नावंदे उपस्थित होते. स्वाती देशमाने, ज्योतीलिंग देशमाने, सारिका देशमाने, निलाताई देशमाने, आशा देशमाने, मुंजाअप्पा पटवे, रजनी पटवे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना सुरूची भोजन देण्यात आले. आश्रमाती शिक्षक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पाच राज्याच्या निवडणुकीसाठी रामदास आठवले यांच्या पक्षाला मिळाले 'हे' चिन्ह.


आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला पुदूचेरी, आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळ या चार राज्यांमध्ये कपबशी हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर तामिळनाडूसाठी हेलिकॉप्टर हे चिन्ह देण्यात आलं आहे.

शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज-जिल्हाधिकारी जगताप


बीड : शाळाबाह्य सर्व मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाची गरज आहे. दिनांक 1 मार्च ते 10 मार्च 2021 दरम्यान शाळाबाह्य, अनियमित व स्थलांरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहिम राबविण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुलांची शोधमोहिम यशस्वी करण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका, केंद्र आणि गावपातळीवर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या शोध मोहिमेत सर्व संबंधित घटकांनी सहभागी व्हावे आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवार दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ.विक्रम सारुक, यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.याप्रसंगी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी जगताप म्हणाले, शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम यशस्वी करण्यासाठी बालरक्षक,    सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, डायटचे अधिव्याख्याता, प्राचायर्र् आदी सर्व घटकांनी सामुहिक प्रयत्न करावेत. यासंदर्भात कृती कार्यक्रम तयार करून यशस्वीपणे राबविण्यात यावा. सर्व संबंधितांना लेखी सूचना देवून यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी यावेळी दिले.प्रारंभी समितीचे सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात शाळाबाह्य विद्याथ्यार्ंच्या शोध मोहिमेचा उद्देश आणि कार्यवाहीबाबत सविस्तर विवेचन केले. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.विक्रम सारुक यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे प्रतिनिधी म्हणून स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत, अधिव्याख्याता कापसे, यांच्यासह इत्तर समिती सदस्य उपस्थित होते.

संजय राठोडं यांना पूजा भोवणार !अधिवेशनापूर्वी राजीनामा देण्याचे आदेश !!


मुंबई – राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना पोहरादेवी येथे गर्दी जमऊन पूजा केल्याप्रकरणी श्रेष्ठीच्या नाराजीला सामोरे जावे लागले आहे .पूजा चव्हाण प्रकरणानंतर मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेलेल्या राठोड यांना कारवाई करण्यापूर्वी तुझं तू बघ अस स्पष्टपणे सांगत ठाकरे यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे .येत्या दोन दिवसात ते राजीनामा देतील अशी सूत्रांची माहिती आहे .

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्येचा संशय आणि मुख्यमंत्र्यांचे निर्देश धुडकावून पोहरादेवी येथे हजारोंची गर्दी जमवल्याच्या प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. कारवाई करण्यापूर्वी तू निर्णय घे, अशा शब्दांत पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावले आहे.

दि. १ मार्चपासून मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी विरोधक रान उठवणार आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याचे निश्चित केले आहे, अशी खात्रीलायक माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी राठोड यांचा राजीनामा घेण्याबाबत पवारांनी सल्ला दिला होता. तसेच राठोड यांच्या राजीनाम्याबाबत महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांत एकमत आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री, शिवसेना आणि आघाडी सरकारच्या प्रतिमेचा सवाल आहे. तसेच ज्या वेळेस मंत्र्याविरोधात गंभीर आरोप होतात, तेव्हा राजीनामा घेतला जातो असे शरद पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना सुचवले आहे, असे शिवसेनेतील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

मंत्रिपदावरून दूर केल्यास विरोधकांच्या हल्ल्यास बळी पडल्यासारखे होईल, त्यामुळे राठोड यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. तसेच मी कारवाई करण्यापूर्वी तू निर्णय घे, असे उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना वर्षा बंगल्यावरील बैठकीत सांगितले होते. या वेळी आघाडी सरकारमधील वरिष्ठ मंत्रीही उपस्थित होते. आघाडीतील घटक पक्षांचे एकमत झाल्याने राठोड अधिवेशनापूर्वी राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती शिवसेनेतील वरिष्ठ पदावरील सूत्रांनी दिली आहे.

Wednesday, February 24, 2021

सावधान ! चिट्टीशिवाय औषधे देणाऱ्या मेडिकलवर होणार कडक कारवाई.


सोलापूर  (प्रतिनीधी)  सोलापूर जिल्ह्यात १२ मेडिकलचा परवाना रद्द; चिट्टीशिवाय औषधे देणाऱ्या मेडिकलवर होणार कडक कारवाई सर्दी, ताप, डोकेदुखी तसेच इतर आजारांवर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देणाऱ्या मेडिकलवर आता औषध विभागाची कडक नजर राहणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.पालकांनो! मंगळवेढ्यात उद्या नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णप्राशन शिबीर; फायदे वाचून थक्क व्हाल वर्षभरात प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देणार्‍या १२ मेडिकलचे परवाना रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती औषध निरीक्षक तथा औषध विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त नामदेव भालेराव यांनी दिली.वर्षभरापासून कोरोनाचा संकट आहे. सर्दी, ताप खोकला आणि डोकेदुखी सारखी लक्षणे दिसू लागल्यानंतर रुग्ण डॉक्टरांकडे न जाता थेट मेडिकलकडे धाव घेतात.औषध देण्याची मागणी करत आहेत.रुग्णांच्या मागणीनुसार मेडिकल दुकानदारही औषधे देतात. औषधांचा हा पुरवठा बेकायदा असून, याचा विपरीत परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होऊ शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते कोरोना टेस्ट करून घ्या, असे सांगतात. डॉक्टरांच्या या सकारात्मक सल्ल्याची भीती रुग्णांच्या मनात आहे.त्यामुळे रुग्ण डॉक्टरांकडे न जाता मेडिकल कडून औषधे घेत आहेत. ही बाब चुकीची आहे. कोरोनाला प्रोत्साहन देणारी आहे. त्यामुळे प्रशासनाने आता सर्व मेडिकलचालकांना याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.मेडिकल चालकांनी रुग्णांना प्रिस्क्रिप्शन बंधनकारक करावे. तसा फलक दर्शनी भागात लावावा. तसेच मास्क न घातलेल्या रुग्णांना मेडिकलमध्ये प्रवेश देऊ नये, असे भालेराव यांनी सांगितले आहे.विशेष म्हणजे, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची आकडेवारी रोजच्या रोज प्रशासनाला कळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕक निवडणूक. सेवा सोसायटी मतदार संघाचे सर्व अर्ज बाद.



* प्रशासक नियुक्ती कडे वाटचाल.

बीड (प्रतिनीधी) - जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मंगळवारी झालेल्या अर्ज छाननीत लेखापरीक्षणाची पात्रता पूर्ण न करू शकलेल्या सेवा सहकारी सोसायट्यांच्या 11 मतदारसंघातून दाखल झालेले सर्वच 87 अर्ज बाद ठरले. महिलांसाठीच्या २ जागांवरदेखील मंगळवारी रात्रीपर्यंत एकही उमेदवार पात्र ठरला नव्हता मात्र या मतदारसंघातील 5 अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात आला असून तेथील चित्र आज स्पष्ट होणार आहे. तर बँका पतसंस्था, कृषी पणन संस्था, इतर संस्था ,विमुक्त जाती , ओबीसी आणि अनुसूचित जाती मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये राजकीय डावपेचाला सुरुवात झाली. 19 जागांसाठी 214 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.यातील उमेदवारी अर्जाची छाननी मंगळवारी झाली. यात अपेक्षेप्रमाणे सेवा संस्था मतदारसंघात लेखापरीक्षणाचा अ किंवा ब वर्ग असणाऱ्या संस्था नसल्याने या मतदारसंघातील 11 जागांसाठी भरण्यात आलेले सर्व अर्ज बाद ठरवण्यात आले. त्यामुळे 11 जागा रिक्त राहणार आहेत. महिला राखीव जागांचे चित्र देखिल काहीसे तसेच आहे.
ओबीसी (२ ) , अनुसूचित जाती (१ ), विमुक्त जाती (३ ), नागरी बँका (११ ) ,कृषी प्रक्रिया (७ ) आणि इतर संस्था (१४ ) उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यामुळे या ठिकाणी लढती होऊ शकतात . इतर संस्था मतदारसंघात माजी आ. बदामराव पंडित यांच्यासह फुलचंद मुंडे, धनराज मुंडे, अमोल आंधळे, नवनाथ शिराळे आदींचे अर्ज पात्र ठरले आहेत.
बँका पतसंस्था मतदारसंघ हा विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात तब्ब्ल ११ उमेदवार पात्र ठरले आहेत. यामध्ये आदित्य सारडा यांच्यासह राजकिशोर मोदी , दीपक घुमरे , संगीता लोढा ,संजय आंधळे आदींचा समावेश आहे. ओबीसी मतदारसंघात राजेश धोंडे आणि कल्याण आखाडे यांच्यात लढत अपेक्षित आहे तर विमुक्त जाती मतदारसंघात महादेव तोंडे, चंद्रकांत सानप, सत्यसेन मिसाळ यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. अनुसूचित जाती मतदारसंघात रवींद्र दळवी यांचा एकमेव अर्ज पात्र असून इतर 5 जागांवरचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.
भाजपचा गेम केला
सेवा सोसायटीला लेखापरीक्षणात अ किंवा ब दर्जा आवश्यक आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरले गेलेल्या सोसायट्या क दर्जाच्या असल्यामुळे सर्वच अर्ज बाद ठरले. या नियमाला 2015 च्या निवडणुकीत तत्कालीन सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली होती , त्यामुळे त्यावेळी काही अडचणी आल्या नाहीत. मात्र या वेळी त्या नियमाला स्थगिती मिळावी अशी याचिका भाऊसाहेब नाटकात यांनी सहकार मंत्र्यांकडे केली होती. सर्वांनाच मागील निवडणुकीप्रमाणे अशी स्थगिती मिळण्याची अपेक्षा होती. या याचिकेवर सोमवारी सहकार मंत्र्यांसमोर सुनावणी होणार होती. मात्र सोमवारीच भाऊसाहेब नाटकात यांनी ही याचिका मागे घेतल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे साहजिकच या नियमाला स्थगिती मिळू शकली नाही, परिणामी 11 जागा रिक्त राहण्याची वेळ आली आहे. सहा ते आठ जागांवर निवडणूक झाली तरी बहुतांश जागा रिक्त असल्याने संचालक मंडळ स्थापन कसे करायचे असा नवा पेच निर्माण झाला आहे. एकंदरच बँकेवर काही कालावधीसाठी का होईना प्रशासक नियुक्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत भाजपला पटखनी देण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे.

बीडचे नगराध्यक्ष भारतभूषन क्षीरसागर यांची पालकमंत्री व स्थानिक आमदार विरुद्ध जिल्हधिकारी यांच्याकडे तक्रार.

बीड - (प्रतिनीधी) राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना बीड मतदारसंघात मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षात कुरघोडीच अन आडवा आडवीच राजकारण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे,त्यातूनच शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू झाला आहे .त्याचा परिपाक म्हणून बीडच्या नागराध्यक्षांनी थेट पालकमंत्री धनंजय मुंडे आणि स्थानिक आमदार संदिप क्षीरसागर यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे .

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दलित वस्तीची कामे बांधकाम विभागाला वर्ग करण्याचा डाव आखून दलित,मागासवर्गीय समाजावर अन्याय केला जात असल्याचा आरोप बीडचे शिवसेनेचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केला आहे .बीडचे आमदार आणि पालकमंत्री हे जाणीवपूर्वक हा प्रकार करत असून ही कामे नगर पालिकेमार्फत करावीत अशी मागणी डॉ क्षीरसागर यांनी केली आहे .

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना जिल्हास्तरीय समितीने निर्देशित केलेल्या कार्यान्वयन यंत्रणा रद्दबातल करून पहिलीच यंत्रणा पूर्ववत ठेवण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना २०२०-२१ अंतर्गत जिल्हास्तरीय समितीची बैठक दि.०८/१२/२०२० नुसार जिल्ह्यातील नगर परिषद/नगर पंचायत यांना अनु.जाती लोकसंख्येनिहाय निधी मंजूर करण्यात आला होता. सदरचा निधी नियमाप्रमाणे नगर परिषद अतिशय पारदर्शकपणे संबंधीत विकास कामांवरच खर्च करते. मागासवर्गीय वस्त्यांतून येथील नागरिकांनी व सन्मानिय सदस्यांनी आवश्यकतेनुसार नगर परिषदेकडे रस्ते,नाल्या व इतर प्रयोजनासाठी मागणी केल्यानंतर चा निधी मागणी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येतो.ही शासकीय बाब असून यात कुठे ही कुचराई किंवा दिरंगाई केली जात नाही.

आद्यपर्यंत तरी जिल्ह्यातील कुठल्याही नगर परिषद/नगर पंचायत यांनी निधीचा दुरुपयोग केला नाही.अतिशय सक्षमपणे नगर परिषदेने आजपर्यंत या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत.किंबहुना कार्य करणारी यंत्रणा नगर परिषदेकडे उपलब्ध आहे. परंतु बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व स्थानिक आमदार आपल्या पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करून बीड जिल्ह्यातील केवळ तीन नगर परिषदेला वेठीस धरून बीड, धारूर, गेवराई नगर परिषदेला लक्ष करत राजकीय द्वेषातून सदरील योजनेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागास कार्यान्वयन यंत्रणा म्हणून निर्देशित करत आहे, हे उचित नसून मागासवर्गीयांच्यावर व अनुसूचित जाती चे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी यांच्यावर अन्याय करणारे असून सदरचे आदेश रद्द करून कार्यान्वयन यंत्रणा पूर्ववत करून न्याय द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे.यावेळी नगरसेवक विष्णु वाघमारे, भीमराव वाघचौरे, पूजा गणेश वाघमारे, सखुबाई चांदणे, सीता भैय्यासाहेब मोरे उपस्थित होते.

पोहरादेवी येथील गर्दीबाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. कोविडसंदर्भात आरोग्याचे नियम सर्वांना सारखेच;- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.



मुंबई, (प्रतिनीधी) : वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे बैठकीत आढावा घेतला तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्त्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगीन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे.

मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहेच पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे, असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.

Tuesday, February 23, 2021

वनमंत्री संजय राठोड कुटुंबीयांसह पोहरादेवीकडे रवाना; शिवसेना नेतेही सोबत.


संजय राठोड कुटुंबीयांसह पोहरादेवीकडे रवाना; शिवसेना नेतेही सोबत

यवतमाळ : (प्रतिनीधी ) शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड पोहरादेवीकडे रवाना झाले आहेत. शासकीय वाहनांऐवजी खासगी गाडीत बसून राठोड पोहरादेवीकडे कुटुंबीयांसोबत निघाले आहेत. त्यांच्यासोबत यवतमाळचे शिवसेना नेतेही असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केले होते. त्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून संजय राठोड सार्वजनिक ठिकाणी आले नव्हते. ते यवतमाळ येथील त्यांच्या घरीही नव्हते. राठोड काल यवतमाळ येथील त्यांच्या निवासस्थानी आले. आज सकाळीच शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर, राठोड यांचे मेव्हणे सचिन नाईक आणि त्यांचे नातेवाईक आज राठोड यांच्या निवासस्थानी दाखल झाले. राठोड यांनी आज या नेत्यांशी बराचवेळ चर्चा केली. त्यानंतर ते पोहरादेवीकडे जायला निघाले.

* 16 वाहनांचा ताफा.

राठोड यांच्यासोबत 16 वाहनांचा ताफा आहे. त्यात राठोड यांची खासगी आणि सरकारी वाहन, नातेवाईकांच्या गाड्या, शिवसेना नेत्यांची वाहने, पोलिसांची वाहने आणि एस्कॉर्टच्या वाहनांचा समावेश आहे.

* 80 किलोमीटर प्रवास.

राठोड हे यवतमाळ येथून वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे जाणार आहे. हे अंतर यवतमाळ यांच्या घरापासून 80 किलोमीटर आहे. त्यामुळे त्यांना दीड ते दोन तास पोहरादेवीत पोहोचायला लागणार आहेत. राठोड हे 80 किलोमीटर प्रवास करून जात असून ठिकठिकाणई त्यांचं स्वागत करण्यात येत आहे.

* सोबत कोण?

राठोड यांच्यासोबत त्यांची पत्नी शीतल राठोड, मेव्हणे सचिन नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्यासह काही शिवसेना पदाधिकारी असल्याचं सांगण्यात येतं.

* चौकशीतून सत्य बाहरे येईल.

दरम्यान, या प्रकरणावर जितेंद्र महाराज यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पूजाच्या वडिलाची कोणतीही तक्रार नाही. मात्र, तरीही चौकशीतून सत्य बाहेर येईल, असं जितेंद्र महाराज यांनी सांगितलं.

खळबळजनक:- दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांची आत्महात्या?


 

* सुसाईड नोट मधे आत्महत्येचे कारण येणार समोर, सहायक पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील करणार चौकशी.

मुंबई (प्रतिनीधी) :-खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आज मुंबईतील एका हॉटेलात सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मोहन डेलकर यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण लिहिलेलं असल्याची चर्चा आहे. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलाय.

गेली सात टर्म ते सतत निवडून येत आहेत मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे सध्याचे खासदार आहे त्यांचं मुंबईत अधूनमधून येणं-जाणं असायचं. काल संध्याकाळी ते मुंबईत आले होते. हॉटेल सी ग्रीनमध्ये ते उतरले होते. ते गाडी घेऊन आले होते. त्यांच्या सोबत त्यांचा ड्रायव्हरही होता. आज दुपारी मोहन यांच्या रूमचा दरवाजा उघडला जात नव्हता. याबाबत त्याच्या ड्रायव्हरने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, तो उघडला गेला नाही. त्यामुळे अखेर पोलिसांना बोलावून दरवाजा तोडण्यात आला. यावेळी मोहन यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. यात त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.

खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येबाबत माहिती मिळताच सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मी नारायण चौधरी आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वेगवेगळ्या यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. फॉरेन्सिकचे अधिकारीही आले होते. काल डोलकर यांच्या मृतदेहाचा पोस्टमार्टेम करण्यात आला आहे. डोलकर यांच्या मृत्यूबाबत कळताच त्यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले होते.

खासदार असलेल्या मोहन डेलकर यांनी आत्महत्या का केली, याबाबत मुंबई पोलिसांसमोर मोठा प्रश्न आहे. त्या अनुषंगाने मुंबई पोलीस आता तपास करत आहेत. मोहन डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अनेक खुलासे केल्याची चर्चा आहे. त्यांच्या आत्महत्येमागचं कारण ही त्यांनी त्यात नमूद केलंय. त्याच दिशेने आता मुंबई पोलीस तपास करीत आहेत.

* मोहन डेलकर कोण होते?

58 वर्षीय मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. 1989 मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकिटावर खासदार झाले होते. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले.

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या.आजचे राशिभविष्य !

facebook sharing button
twitter sharing button
whatsapp sharing button

** मेष राशी **

विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. निर्णयाप्रत येऊ शकणार नाही. आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल. जवळपासचा प्रवास घडेल. लेखनकार्यास दिवस उत्तम आहे. बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयाला अवधी मिळेल.

** वृषभ राशी **

आज द्विधा स्थितीतील व्यवहार आपणाला अडचणीत आणेल. महत्त्वाचा वेळ त्यासाठी खर्च करावा लागेल. आपला हट्टी स्वभाव सोडा अन्यथा कोणाशी चर्चा, विवादा दरम्यान संघर्ष होईल. आज आखलेला प्रवासाचा बेत पूर्ण होणार नाही किंवा रद्द करावा लागेल. आज लेखक, कारागीर व कलाकारांना आपली प्रतिभा व्यक्त करण्याची संधी मिळेल. सुमधुर वाणीने कोणाला समजावू शकाल. निर्णायक स्थिती नसताना नवीन कामाची सुरुवात करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात.

** मिथुन राशी **


श्रीगणेश सांगतात की आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर आणि मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. घरात किंवा मित्र आणि कुटुंबीयांसमवेत बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल. आर्थिक लाभाची संधी आहे. मनात कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचारांना थारा देऊ नका किंवा ते दूर करा असा सल्ला श्रीगणेश देतात. कोणत्याही स्थितीत मन ताब्यात ठेवा.

** कर्क राशी **


श्रीगणेश सांगतात की आज जास्त खर्च होण्याचा दिवस आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक राहणार नाही. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेदाचे प्रसंग येतील. मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत बेपर्वाह राहू नका. मानप्रतिष्ठा भंग पावेल.

** सिंह राशी **


कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही असे श्रीगणेश सांगतात. मन विचारांत अडकून पडेल. मित्रांकडून व विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. संततीशी चर्चा होईल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ मिळेल.

** कन्या राशी **

सांप्रतकाली नव्या कामासंदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी आणि नोकरदार यांना आजचा दिवस लाभदायक ठरेल असे श्रीगणेश सांगतात. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कृपेमुळे बढतीचे योग संभवतात. व्यापारात लाभाची शक्यता. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल. पित्याकडून लाभ होण्याचे संकेत श्रीगणेश देतात.

** तुळ राशी **


श्रीगणेशांच्या मते आज नोकरीच्या ठिकाणी आपणाला वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संतती विषयक काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन कराल. धार्मिक यात्रेचे योग आहेत. लेखन व साहित्य निर्मिती होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा.

** वृश्चिक राशी **

सध्या शांत राहून वेळ घालवा असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवा. अनैतिक कामांपासून दूर राहा. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा. जास्त पैसे खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. खाण्या- पिण्या विषयी काळजी ध्या. शारीरिक आणि मानसिक बेचैनी राहील. योगाभ्यास आणि आध्यात्मिकता यांतून मनाला शांति लाभेल.

** धनू राशी **

आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी मुलाखात होईल. त्यांच्या सोबत हिंडणे- फिरणे वा मनोरंजक स्थळी जाण्याचा योग येईल. रुचकर भोजन आणि सुंदर वस्त्रे मिळाल्याने मन प्रसन्न राहील. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. भिन्न लिंगीय व्यक्तींबरोबर चांगला वेळ जाईल. भागीदारी लाभदायक ठरेल.

** मकर राशी **


आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचार्‍यात सापडू नका एवढी दक्षता घ्या. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील. पैशाच्या देवाण- घेवाणीचा व्यवहार व्यवस्थित पार पडेल. देश- परदेशात व्यवसाय असणारांना फायदा होईल. घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल.

** कुंभ राशी **

श्रीगणेश सांगतात की आज बौद्धिक क्षमता, लेखनकार्य आणि नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाही. सातत्याने बदल होत राहील. स्त्रियांनी वाणीवर काबू ठेवा. शक्यतो यात्रा- प्रवास टाळा. मुलांचे प्रश्न भेडसावतील. नवीन काम आज सुरू करू नका. अचानक उद्भवणार्‍या खर्चाची तयारी ठेवा.

** मीन राशी **

श्रीगणेश आपणाला सूचना देतात की घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवा. घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईचे आरोग्य बिघडेल. धन आणि प्रतिष्ठेची हानी होईल. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा. उत्साह आणि स्फूर्तीचा अभाव जाणवेल. प्रवास करू नका. पाण्यापासून जपा. जादा हळवे बनू नका.

Monday, February 22, 2021

ब्रेकिंग न्युज ! पिंपरी-चिंचवड : पोलीस कर्मचारी पन्नास हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात.

.

पुणे : -  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकत 50 हजार रुपयांची लाच घेताना एका कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले आहे काही वेळापूर्वी ही कारवाई झाली आहे.

सचिन जाधव असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सचिन जाधव हे वाकड पोलिस ठाण्यात कर्तव्य आहेत दरम्यान यातील तक्रार याच्यावर 498 चा गुन्हा दाखल आहे यात मदत करण्यासाठी लोकसेवक सचिन यांनी 75 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती त्यानंतर तक्रारदार यांनी पुणे एसीबी कडे तक्रार केली होती त्यानुसार या लाचेची पडताळणी केली त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार आज तडजोडी अंती 50 हजार रुपयांची लाच घेताना जाधव यांना एसीबीने रंगेहात पकडला आहे.

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकावर सपंर्क साधण्याबाबतचे आवाहन श्री. राजेश बनसोडे, पोलीसउप-आयुक्त/पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.

हेल्पलाईन टोल फ्रीक्रमांक १०६४

अॅन्टीकरप्शन ब्युरो, पुणे -दुरध्वनी क्रमांक - ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३

व्हॉट्स-ऑप क्रमांक पुणे - ७८७५३३३३३३

व्हॉट्सअॅप क्रमांक मुंबई- ९९३०९९७७

ई-मेलआयडी- पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in

फेसबुकपेज- www.facebook.com-maharashtraACB

वेबसाईट- www.acbmaharashtra.gov.in

*Respected sir*

*Trap Case Report:*

➡ घटक :- पुणे,

➡ तक्रारदार :- पुरुष 33 वर्षे

➡ आरोपी:- लोकसेवक - सचिन कुबेर जाधव, पो.नाईक -1008, वय-37, नेमणुक वाकड पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय.

▶पडताळणी दिनांक :- 22/01/2021 

➡️ लाचेची मागणी ः- 200000/-

➡️लाच स्वीकारली ःः- 50,000/- 

➡️ सापळा दिनांक :- 22/01/2021

➡ हकीकत :- यातील तक्रारदार व त्यांचे कुटुंबियांचे विरुद्ध वाकड पोलीस ठाणे येथे भा.द.वि.स. कलम 498(अ) प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. 

अटकेची प्रक्रिया करून जामिनावर सोडण्यासाठी व दोषारोप लवकर पाठविण्यासाठी प्रथम - 200000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 100000 / - स्वीकारण्याचे मान्य करून 50,000/- रुपये लाच स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले आहे.

➡ सापळा पथक : -अलका सरग - पोलीस निरीक्षक,सुनील बिले- पोलीस निरीक्षक,पो. शिपाई गणेश भापकर,पो. शिपाई रतेश थरकार,

➡मार्गदर्शन अधिकारी :- श्री राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.पुणे परिक्षेत्र. 

श्री. सुरज गुरव,अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.पुणे.

श्री सुहास नाडगौडा,अपर पोलीस अधीक्षक ला प्र वि पुणे.


मोठी बातमी,दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार.


* त्यामुळे या परीक्षा ऑनलाईन होणार नाही, असे स्पष्ट दिसत आहे. 

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार
Maharashtra Board Exam

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. कारण ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड अनुकूल नाही. (SSC HSC Exam will conduct offline)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशापद्धतीने घ्यायच्या यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान या परीक्षा ऑफलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या परीक्षा ऑनलाईन होणार नाही, असे स्पष्ट दिसत आहे.

* 10 वी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार.

दरम्यान काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे.  महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

कोरोनाच्या काळात सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणे पडले महाग ! 25 जणांवर गुन्हा दाखल.

माजलगाव (प्रतिनीधी) सामूहिक विवाह सोहळा आयोजित करत कोरोनाचे नियम पायदळी तुडविल्या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात आयोजकांसह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .विशेष म्हणजे या सामूहिक विवाह सोहळ्याला खा छत्रपती संभाजी महाराज ,आ प्रकाश सोळंके यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी हजर होते .

या विवाह सोहळ्यात मास्क सोशल डिस्टन्सचा अक्षरशः फज्जा उडाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने या सामुदायिक विवाह सोहळ्याला परवानगी नाकारली असताना मिरवणूक आणि विवाहसोहळ्याला गर्दी जमा केल्यावरून 25 जणांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला पाहिजे होते. मात्र, या ठिकाणी बैठक व्यवस्थेमध्ये बसलेल्या महिला एकत्रित बसलेल्या दिसत आहेत. प्रत्येकाने आपापले मास्क लावावे, अशा सूचना देखील छत्रपती संभाजीराजे यांनी या कार्यक्रमाच्या वेळी मनोगत व्यक्त करताना केलेल्या. प्रत्येकाने काळजी घ्यावी, असं देखील संभाजीराजे भोसले यांनी सांगितलं. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असताना मास्क न वापरणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती.

उसाच्या ट्रॕलीला धडकुन दुचाकीचा अपघात दोन तरुण ठार !


बीड (प्रतिनीधी)  रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकून दुचाकीवरील दोन तरुण मित्र जागीच ठार झाल्याची घटना गेवराई माजलगाव रस्त्यावर घडली .अपघातात दुचाकीचा चुराडा झाला .

रविराज शेंडगे आणि विवेक मायकर हे दोघे रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून माजलगाव वरून केसापुरी कॅम्प कडे निघाले होते .रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या ट्रॉलीला मोटार सायकलची जोराची धडक झाली .

ही धडक इतकी जोरदार होती की आसपासचे लोक या मोठ्या आवाजाने जागे झाले,घटनास्थळी लोकांनी धाव घेऊन दोन्ही जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले,मात्र तोपर्यंत या दोघांची प्राणज्योत मालवली होती

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशिभविष्य.


facebook sharing button
twitter sharing button
whatsapp sharing button* मेष *


श्रीगणेश सांगतात की, आज तुमचे मन चंचन राहील. त्यामुळे निर्णय घेणे कठीण जाईल. त्यामुळे महत्त्वपूर्ण काम पुरे करू शकणार नाही. प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागेल पण नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. बौद्धिक किंवा तांत्रित चर्चेत तुम्ही भाग घेऊ नका. आज छोटासा प्रवास योग आहे. श्रीगणेश स्त्रिंयांना बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतात.साहित्य लेखनासाठी चांगला दिवस आहे त्यामुळे आपली प्रतिभा शक्ती तुम्ही दाखवू शकता.

* वृषभ *

आज अगदी स्थिर होऊन काम करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. तसे न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात. आज हट्ट न करता समाधानी राहिलात तर चांगले होईल. ठरविलेले प्रवास होणार नाहीत. भाऊबंदांकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. कलाकार, कारागीर, आणि लेखक हे आपली प्रतिभा दाखवू शकतील. स्वास्थ्य चांगले राहील. प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकाल.

मिथुन *


आजचा आपला दिवस आर्थिक दृष्ट्या लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक दृष्ट्या तुम्हाला प्रसन्नता व उत्साह यांचा अनुभव येईल. स्वादिष्ट भोजन आणि चांगले कपडे घालायला मिळतील. मित्र व परिवाराबरोबर दिवस आनंदात घालवाल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. आर्थिक फायदा होईल. मनात येणार्‍या नकारात्मक विचारांना काढून टाकण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. दांपत्य जीवन चांगले राहील.

कर्क *


श्रीगणेश सांगतात की आज आपण खिन्नता आणि भय अनुभवाल. कुटुंबात मतभेद झाल्याने कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. मन द्विधा असेल त्यामुळे बेचैन असाल. बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर मतभेद होऊ शकतात. स्वास्थ्याकडे लक्ष द्या. आज खूपच खर्च होईल. मानहानी होऊ शकते म्हणून सावध राहा. तसेच गैरसमज दूर करा ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.

* सिंह *


श्रीगणेश कृपेने आज व्यापारात लाभ व मिळकतीत वाढ होईल. उत्तम भोजन प्राप्त होईल. मित्रांबरोबर रम्य स्थळाला भेट देऊ शकता. स्त्री मित्रांचे विशेष सहाय्य मिळेल. मुलाची भेट होईल. वाडवडील किंवा मोठे भाऊ बहिणी यांचा सहवास मिळेल. एखादा मंगलप्रसंग असू शकतो. वैवाहिक जीवन चांगले. पत्नीचे सहकार्य लाभेल. श्रीगणेशांच्या मते नवीन वस्तू खरेदीला आजचा दिवस उत्तम आहे.

* कन्या *

श्रीगणेश कृपेने आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल. व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांची कृपादृष्टी असेल त्यामुळे पदोन्नतीची संधी मिळेल. पितृघराण्याकडून फायदा होईल. स्वास्थ्य चांगले राहील. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. पत्नीबरोबरही चांगला वेळ घालवाल. व्यावसायिक कामासाठी बाहेर जावे लागेल.

* तुळ *


श्रीगणेश म्हणतात की, आज नव्या कामाची सुरूवात करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. बौद्धिक काम व साहित्यलेखन यात गुंतून राहाल. तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळेल. परदेशात राहणार्‍या मित्र आणि सगे सोयरे यांच्या वार्ता समजल्याने तुम्ही प्रसन्न राहाल. सहकार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. संततीची चिंता लागून राहील. आज कोणत्याही चर्चेत किंवा वाद विवादात भाग न घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

*वृश्चिक*

आज तुम्ही स्वास्थ्याकडे जास्त लक्ष द्या असे श्रीगणेश सांगतात. कफ, श्वास, किंवा पोट यांचा त्रास होऊ शकतो. शरीराने व मनाने आज अस्वस्थ राहाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणतेही अनैतिक काम किंवा सरकारी काम यापासून दूर राहा नाहीतर संकटात सापडाल. पाण्यापासून दूर राहा. आज खर्च खूप वाढेल.

* धनू *


श्रीगणेशांच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस सुखशांती व आनंदात व्यतित होईल. मित्रांबरोबर चांगला दिवस. स्वादिष्ट भोजन, नवे कपडे प्राप्त होतील. विरुद्ध लिंगी व्यक्तींबरोबर आकर्षण वाढेल. त्यांच्याबरोबर रोमांचक भेट होईल. विचारात स्थिरता राहणार नाही. भागीदारीत फायदा होईल. सार्वजनिक जीवनात मानसन्मान मिळेल. वैवाहिक सुख उत्तम मिळेल.

* मकर *

आज आपले स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती आणि आनंद प्राप्त होतील. कुटुंबीयांसमवेत आनंदात दिवस जाईल. व्यापारात प्रगती होण्यासाठी दिवस यश देणारा आहे असे श्रीगणेश सांगतात. धनलाभ होईल. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम कराल. सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. कायदेशीर बाबीत आज लक्ष न घातलेले बरे असे श्रीगणेश सांगतात.

* कुंभ *

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस हा आपला दिवस नाही. वैचारिक दृष्ट्या गर्क राहिल्याने कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय न घेणे हेच बरे. प्रवासात त्रास संभवतो. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने खूप निराशा होईल. मन अशांत राहील. पोटदुखी सतावेल. संततीची तब्येत किंवा अभ्यास यादबद्दल चिंता लागून राहील.

* मीन *

श्रीगणेश म्हणतात की आजच्या दिवसात उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव राहील. आईची तब्येत खराब होऊ शकते. मित्र आणि नातेवाईक यांच्या बरोबर वाद-विवाद होईल. काही त्रास किंवा विरोधी परिस्थितीमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य खराब होऊ शकेल. कोर्ट कचेरीची कागदपत्रे सावधानतेने करा, एखाद्यावेळेस मानहानीला ते कारण होईल. स्त्री किंवा पाणी यापासून सावध राहा.