Tuesday, February 16, 2021

विश्व मराठा संघाच्या नाशिक जिल्हा महिला संपर्कप्रमुखपदी सविता खुटे यांची नियुक्ती.


चांदवड (प्रतिनीधी);- चांदवड तालुक्यातील उर्धुळ येथील रहिवासी सौ सविता दत्तात्रय खुटे यांची विश्व मराठा संघाच्या नाशिक जिल्हा महिला संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
विश्व मराठा संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत भोसले, महिला प्रदेशाध्यक्ष सौ,छाया भगत,यांनी सौ सविता खुटे यांची पत्राद्वारे नियुक्ती केली चांदवड तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांसाठी विविध योजना राबविण्यात अग्रेसर, महिला ग्रुह उद्योगांच्या माध्यमातून अनेक महिला साठी त्यांनी स्वयंसहाय्यता गट स्थापन केले त्याच्या कार्याची दखल घेऊन विश्व मराठा संघाच्या महिला जिल्हा संपर्कप्रमुख नियुक्ती करण्यात आली त्याचे सामाजिक राजकीय शैक्षणिक सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment