बीड :- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रश्नाची चिंता वाढली आहे. कोरोना विषयक नियमावलीचे पालन न करता सर्वत्र सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. बाजारपेठांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी, लग्न समारंभात सर्वत्र नागरिक तोंडावर मास्क न लावता गर्दी करत आहेत. यामुळे पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झाले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही औरंगाबाद विभागातील अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्याच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी सुरू झाली असून बीड जिल्ह्यात मंगल कार्यालय व कोचिंग क्लासेस ची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दि.१७ दिले रोजी आहेत.
No comments:
Post a Comment