नांदेड (प्रतिनीधी ) बेल्जीयममधून मिळणाऱ्या पैशाच्या आधारावर भारतात अतिरेकी कारवाया करण्याचा आरोप असलेल्या एकाला पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पंजाब पोलीसांनी पकडल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी सतिश हिवाळे यांनी त्यास प्रवासी पोलीस कोठडी मंजुर केली आहे.
शुक्रवार दि.5 फेबु्रवारी रोजी पंजाब पोलीसांचे एक पथक नांदेडमध्ये आले होते. त्यांनी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्याशी संपर्क साधून आपल्या कामाविषयीची माहिती दिली आणि नांदेडपासून जवळ असलेल्या आमदुरा भागातून सरबजितसिंघ किरट नावाच्या युवकाला पकडले. सोमवार दि.8 फेबु्रवारी रोजी पंजाब पोलीसांनी सरबजितसिंघ किरटला न्यायालयात हजर केले होते.
न्यायालयात सादर केलेल्या माहितीप्रमाणे सरबजितसिंघ हा खालीस्थान जिंदाबाद संघटनेचा सदस्य आहे. या संघटनेवर प्रतिबंध आहे. बेल्जीयममधून या संघटनेला पैसे पुरवले जातात आणि त्यांच्यासमोर खालीस्थान विरोधक नेते टार्गेट होते. या विषयी पंजाबमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात पंजाब पोलीसांनी अगोदरच तीन जणांना अटक केली आहे. सरबजितसिंघ नांदेड परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने पंजाब पोलीसांनी नांदेडपासून जवळ असलेल्या आमदुरा भागातुन ताब्यात घेतले. सादर केलेल्या माहितीनुसार मुख्य न्यायदंडाधिकारी सतिश हिवाळे यांनी सरबजितसिंघला प्रवासी पोलीस कोठडी मंजुर केली आहे. प्राप्त माहितीनुसार मंगळवार दि.9 फेबु्रवारी रोजी पंजाब पोलीस सरबजितसिंघला घेवून रवाना झाले आहेत. त्यावर रासुका कायद्या अंतर्गत पंजाब येथे गुन्हा दाखल आहे.
No comments:
Post a Comment