Saturday, February 27, 2021

जीएसटीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, बाजारपेठात शुकशुकाट.

बीड / परळी वैजनाथ (प्रतिनीधी)  शेतकरी आंदोलनानंतर जीएसटी च्या विरोधात व्यापारी वर्ग एकवटला आहे. या अनुषंगाने व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला प्रचंड प्रतिसाद मिळाला. बीड जिल्ह्यात देखील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवल्यामूळे संपूर्ण बाजारपेठ ठप्प झाली.


बीडचे सीए भानुदास जाधव, सीए गोपाल व्यापारी महासंघाची बुधवारी बैठक झाली होती.जीएसटी कायद्याचा मसुद्यात असलेल्या जटिल तरतुदी व जाचक अटीच्या विरोधात 26 फेब्रुवारी शुक्रवार रोजी भारत व्यापार बंदचे आवाहन कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स केले आहे त्यास बीड शहर व जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला. या भारत व्यापार बंदला देशातील 40 हजार संघटना व 8 करोड व्यापार्‍यांनी पाठींबा दिला. हे सर्व व्यापारी आप आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन जीएसटीच्या जाचक तरतुदी विरुद्ध लढा पुकारत बंद यशस्वीपणे शांततेच्या मार्गाने पार पाडला. व्यापाऱ्यांनी मागच्या दाराने पुन्हा एकदा इनस्पेक्टर राज आणून भ्रष्टाचाराला खतपाणी न देता जीएसटी मधील कुठलीही सुनावणी न करता किंवा नोटिस न देता माल जप्त करणे, जीएसटी रजिस्टरेशन रद्द करणे, रिटर्न्स भरू न देणे, गुन्हे दाखल करणे इत्यादी कलमा मध्ये संशोधन करून व्यापार्‍यांना जीएसटी रिटर्न सुलभतेने भरता येतील असे कायद्यात बदल घडवून आणावे. म्हणजे व्यापार्‍यांना आपल्या व्यापार वाढीकडे लक्ष देता येईल अशी मागणी करण्यात आली. सर्वच व्यापारी संघटनांनी या बंद मध्ये उस्फुर्त सहभाग घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरातील व्यापार पूर्णपणे ठप्प झाला होता. एरवी वर्दळ असलेल्या बाजारपेठेत संचारबंदी लागू असल्यासारखा शुकशुकाट पसरला होता.

No comments:

Post a Comment